#Article 1: औदुंबर (कविता) (288 words)


॥ औदुंबर रसग्रहण ॥

एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे.  हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळतील. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायवाट व काळा डोह-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत चित्र आहे.  बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.

पहिल्या चार ओळींत टेकड्या, गाव, शेतमळे व झरा यांनी व्यापलेले विहंगम दृश्य दिसते.

शेतमळ्यांच्या हिरव्या गरदीतून वाहणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्यावरून जी नजर मागे जाते ती चार घरांचे चिमुकले गाव ओलांडून पैल टेकडीपर्यंत पोचते. केवढा विस्तीर्ण पट कवीने पार्श्वभूमीसाठी घेतलेला आहे! पुढील दोन ओळीत त्या काळ्या डोहाच्या लाटांवर गोड काळिमा पसरून जळात पाय टाकून बसलेला औदुंबर दाखविला आहे.

केवळ निसर्गाचे एक सुरम्य चित्र रंगविण्याचा कवीचा हेतू दिसत नाही. पहिल्या चार ओळींतील आनंदी व खेळकर वृत्तीच्या पार्श्वभूमीवर नैराश्याची छटा पसरविणारे, काळ्या डोहाकडे सरळ चाललेल्या पांढऱ्या पायवाटेचे चित्र पाहून वाचकांची वृत्तीही पार बदलते. जगातील सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा हा औदुंबर वाटतो.  विरक्त वृत्तीच्या दत्त या देवतेशी औदुंबराचा निकट संबंध असल्यामुळे या वृक्षाची येथे केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते.

`ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी, झाकळुनी जळ गोड काळिमा, जळात बसला असला औदुंबर' या गोड शब्दांत सुंदर अनुप्रास साधला आहे.  चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी, गोड काळिमा, आडवीतिडवी पायवाट, अशी अर्थवाही व समर्पक विशेषणे वापरून मूळचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे.  औदुंबराला मनुष्य कल्पून येथे `चेतनगुणोक्ती' हा अलंकार साधला आहे. शब्दमाधुर्य व पदलालित्य यांनी ओथंबलेली ही एक प्रासादिक कविता आहे.

औदुंबर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
 
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे
शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
 
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
 
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)




#Article 2: म्हणी (151 words)


मराठी म्हणींची यादी  सहप्रकल्पात  पहावी.

'म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य.

म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी ' आवडतात . कमी शब्दात परिस्थितीचा  अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो.'म्हण' शब्द समुहात बऱ्याचदा ध्वन्यार्थ हा वाच्यार्था पेक्षा निराळा असू शकतो. या शिवाय गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत.जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात. 

लोकोक्ती,ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते ते वाक्य ल प्रचलनाचे स्वरूप==




#Article 3: वसंत पंचमी (662 words)


वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते.  हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. मध्ययुगात या दिवशी  'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.

वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या  दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात. 

गेल्या किंवा येत्या काही वर्षांतील वसंत पंचमीच्या तारखा : 

सन २०२२ - ४ फेब्रुवारी,
सन २०२१ - १६ फेब्रुवारी
सन २०२० - ३० जानेवारी, ३१ जानेवारी 
सन २०१९ - फेब्रुवारी १०
सन २०१८ - जानेवारी २२

पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांंची देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.

बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन, कलावंंतिणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.

वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान  होते. 

बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.

प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची  माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी राधाकृष्ण, तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते गातात.

पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात.  याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.

लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लीम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर खुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली असे मानले जाते.

वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून  साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीतसिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.

भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबातसुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों (मोहरी) ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे.

बालीमध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात.



#Article 4: मराठी भाषा (1886 words)


मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.

मराठी भाषा मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.

मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते.

भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली) येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.

विष्णू वामन शिरवाडकर, (२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कारविजेते अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद न्या. रानडे यांनी भूषविले.

'लीळाचरित्र' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारतातील सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे)  वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्री.व्यं केतकर), असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

मराठी भाषेचा उदय संस्‍कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.
इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण  मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. 

राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे . अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - चामुण्डराजे करवियले हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे - 

हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.

अर्थ : जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.

कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - वाछि तो विजेया होईवा ।।'
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्‍य वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.

मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.

हा काळ इ.स. १२०० पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.

हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीचा यादवांच़े महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व ज़ातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली ,व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याच़े दालन वैविध्यानी समृद्ध केले.

हा लेख बघा:मराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द

हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांच़ा काळ सुरू झ़ाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झ़ाल्याने मराठी भाषेत ’तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांच़े आगमन झाले. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णुदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.

हा काळ इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. असे मानले ज़ाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी,  संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.

हा काल इ.स. १७०० ते इ.स. १८१८ असा आहे. याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या.
याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.

हा काळ इ.स. १८१८ ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.

छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅंडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.

साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पॅंथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अ‍ॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.

मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-

प्रमुख लेख मराठी साहित्य येथे आहे. मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही लेख -
कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाट्य, बाल साहित्य, ललित लेख, विनोद, मराठी साहित्य संमेलने, अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्‍प्रचार

मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.

या कवीबद्दल रा.चिं .ढेरे म्हणतात, असा हा संतकवी केवळ मुसलमान संत कवीच नव्हे, तर अखिल मराठी संत मंडळात मानाचे स्थान पावणारा आहे . 

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर १९६० ला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. त्याआधि श्री.व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहिला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.

प्रमुख विभागणी - 

तपशीलवार माहिती - 

मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच बहुसंख्य (पण सर्व नाही!) मराठी मुळाक्षरे होत. यात एकोणीस स्वर आणि छत्तीस व्यंजने आहेत. देवनागरी लिपीत नसलेली ॲ, ऑ, दीर्घ ॠ, दीर्घ ॡ, दंततालव्य च, छ, झ,आणि ऱ्य, ऱ्ह ही खास मराठी अक्षरे आहेत.

स्वर

विशेष - 'ङ' आणि 'ञ' चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो.

अधिक माहितीसाठी पहा देवनागरी

संगणकीकरणाच्या सुरूवातीच्या काळात मराठी लेखनासाठी विविध अडचणी होत्या - 

सध्या युनिकोडमुळे मराठी ही संगणकावर बरीच स्थिरस्थावर झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

काळानुसार आणि वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार संगणकावरील टंकलेखनपद्धतीचे पूर्व-टंकनपद्धती आणि आधुनिक टंकनपद्धती असे दोन प्रकार करता येतील.

युनिकोडच्या अगोदर ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप कर
'

आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड टंक व त्या विविध keyboard layout यांचा समावेश होतो.

युनिकोड टंकनपद्धती व software.

यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून software च्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रिय आहेत.

OCR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीतील स्कॅन केलेले दस्तऐवज, छायाचित्रांचे स्वयंचलित पद्धतीने टंकन करता येते.

 हे software लिनक्स परिचालन प्रणालीवर उपलब्ध आहे.

मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि ॲपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधीक प्रमाणात उपलब्ध आहे.

हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली जात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.

संस्था आहे.

या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.




#Article 5: ज्ञानकोश (821 words)


ज्ञानकोश हे एक संदर्भसाधन आहे. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे.    

ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.   

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते.   

ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्साय्क्लोपीडिया   (इंग्लिश: encyclopedia, encyclopaedia;) ह्या इंग्रजी संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने मराठीत विश्वकोश, महाकोश, माहितीकोश अशा संज्ञाही वापरण्यात येतात. उदा. मराठी विश्वकोश किंवा कुमार विश्वकोश, मराठी तत्त्वज्ञान महाकोश तसेच वस्त्रनिर्मिती माहितीकोश इ.

ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ (compendium) होय. ज्ञानकोश हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा विषयविशिष्ट अशा दोन्ही तऱ्हेचा असू शकतो. सर्वसाधारण ज्ञानकोशात त्याच्या रचनेच्या हेतूनुसार विविध विषयांवरील माहिती दिलेली असते तर विषयविशिष्ट ज्ञानकोशात एखाद्या विशिष्ट विषयातील विविध अंगांविषयीची माहिती दिलेली असते. ज्ञानकोशाच्या व्याप्तीनुसार आणि त्यातील लेखांची संख्या ठरते आणि ही संख्या व नोंदींचे आकारमान ह्यांनुसार ज्ञानकोश लहान वा मोठा असू शकतो. मोठे ज्ञानकोश अनेकदा विविध खंडांत विभागण्यात येतात. ही खंडांतील विभागणी विषयानुसार किंवा इतर निकषांनुसार करण्यात येते. मुद्रित स्वरूपाच्या ज्ञानकोशांत नोंदींची मांडणी अकारविल्हे करण्याची प्रथा असल्याने त्यांची खंडांतील विभागणी त्यांच्या नोंदींच्या पृष्ठसंख्येचा विचार करून आद्याक्षरांनुसार करण्यात येते असे आढळते. 

शब्दकोशाची व्याप्ती भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि व्याकरण देण्यापुरतीच मर्यादित असते. शब्दकोशात अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रसंगी चित्रे आणि क्वचित नकाशेही असतात. पण कोणत्याही प्रकारची सखोल माहिती नसते. याउलट, ज्ञानकोश ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची तपशीलवार माहिती देत असतो. आणखी त्यापलीकडे जाऊन, या माहितीचे विश्लेषण करणे, ज्ञानशाखांशी असलेली विस्तृत पार्श्वभूमी विशद करणे, आणि संदर्भ उपलब्ध करून देणे ही कामेही ज्ञानकोश करतो.

अनेक ज्ञानकोशांत चित्रे, नकाशे, आराखडे, आधारभूत पुस्तकांचे संदर्भ आणि सांख्यिकीय माहिती असते. सामन्यतः सुशिक्षित, माहिती-विशेषज्ञ अशा तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.

ज्याला एखाद्या विषयाची संक्षिप्त आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल असा माणूस कधी ना कधी ज्ञानकोशाची पाने चाळतो. अशा ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते. 

इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.   

  
सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..

ज्ञानकोशांची वर्गवारी विषय, व्याप्ती, संकलनाची आणि मांडणीची पद्धत, उत्पादन किंवा उपलब्धतेच्या पद्धतीनुसार करता येते .ज्ञानकोशब्रिटानिका ज्ञानकोशाप्रमाणे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयांना वाहून घेतलेले असू शकतात. शब्दकोशांशी जोडलेले असू शकतात किंवा ते भौगोलिक स्वरूपाच्या दर्शनिका(गॅझेटियर) असू शकतात. ज्ञानकोशातील विवरण पद्धतशीर असते. विषयांचा अनुक्रम बर्‍याचदा मुळाक्षरांनुसार किंवा विषय-सुसंगत असतो.

आधुनिक संगणक, इंटरनेट  व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ज्ञानकोशांच्या मांडणीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनुक्रम लावणे, शोधयंत्राचा सुलभ वापर करणे, परस्परसंदर्भ देणे अशा गोष्टी सुकर झाल्या आहेत. माहितीचे संकलन, पडताळणी, संक्षिप्तीकरण, सादरीकरण यात महत्त्वपूर्ण बदल घडत असून विकिपीडिया, इत्यादीं गोष्टी, या सुधारणांनी कायकाय शक्य आहे हे सांगणारी ज्वलंत उदाहरणे आहेत. काही ज्ञानकोशांची सीडी मिळते किंवा काही ज्ञानकोश आंतरजालावर वाचायला किंवा उतरवून घ्यायला उपलब्ध असतात.

ज्ञानकोश किंवा त्या अर्थाच्या इतर संज्ञा जरी आधुनिक काळातील असल्या तरी त्यांच्या अर्थाशी नाते सांगणारे साहित्य विविध देशांत आणि तेथील संस्कृतींत पूर्वीपासून आढळणे शक्य आहे. त्यामुळेच ज्ञानकोशांचे सध्याचे स्वरूप हे जरी एकोणिसाव्या शतकातील युरोपीय ज्ञानकोशाच्या प्रभावातून साकारलेले असले तरी जगभरात तसेच भारतात त्यापूर्वीच्या काळात निर्माण झालेल्या ज्ञानकोशसदृश अशा साहित्याची उदाहरणे दाखवून देता येणे शक्य आहे.

इ.स. च्या १२व्या शतकात, भारतातील एक राजा सोमेश्वराने 'अभिलाषितार्थ चिंतामणी' हा सुमारे शंभर प्रकरणे असलेला ज्ञानकोष लिहवून घेतला.हा जगातील प्रथम विश्वकोश म्हणून मानला जाते.

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली.   त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.

१९०६मधील मराठी साहित्यसंमेलनातल्या आपल्या भाषणात विष्णु गोविंद विजापूरकर ह्यांनी मराठीत 'विश्वकोश' निर्माण व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आढळते.

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले. 

कोश,मुक्त ज्ञानकोश,विकिपीडिया




#Article 6: महाराष्ट्र (2472 words)


महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची  किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली  भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास संतांची भूमी असेदेखील म्हटले जाते. येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात राष्ट्रिक आणि नंतर महा राष्ट्र या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर  व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. चक्र्धर स्वामी यांनी  महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.

या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.

महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे.
त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.

१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये)  कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.

या विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे.
या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो.  केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी  भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता राहिली.२०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली असून राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे

महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).
२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.
हेसुद्धा पहा
महाराष्ट्रातील तालुके

राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत  (आकडे- कोटी रु.)

सन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.
राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.

मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बॅंका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारतातील सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेअर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त SP CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्लिश सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोकणी, कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. राज्यात ७०.२% हिंदू, १५% बौद्ध, १०.६% मुस्लिम, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.

सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती.

महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम,  पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.

मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा , कलर मराठी, झी मराठी,  स्टार माझा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.

 भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.

मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे  कोळी  . ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य  अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे.

भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.

दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.

स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते.

राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात.

महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. औरंगाबाद, रत्‍नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील  मोठी बंदरे आहेत.

महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी  नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.

महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:-




#Article 7: संगणक विज्ञान (1313 words)


संगणकविज्ञान ही एक  इलेक्ट्राॅनिक  शाखा आहे. गुंतागुंतीच्या विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल डेटाबेसेस (Databases) , क्रिप्टोग्राफी (Cryptograpy), नेट्वर्किंग (networking), इमेज प्रोसेसिंग (Image Processing) इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करत असतात.

स्मृती, तर्कशुद्ध विचारशक्ती/तर्कशुद्धताधिष्ठित कल्पनाशक्ती, आणि तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती ही माणसाच्या बुद्धीची तीन अचाट अंगे आहेत. पण स्मृती हे माणसाच्या बुद्धीचे अंग तीन तऱ्हांनी बरेच मर्यादित आहे: माणूस एकदा शिकलेली/अनुभवलेली कोणतीही लहानमोठी गोष्ट आयुष्यात कधीही विसरत नाही आणि त्यांपैकी काही गोष्टी त्याच्या बुद्धीच्या निदान मागच्या कप्प्यात --सुप्त मनात-- संचित रहातात असे काही बुद्धिशास्त्रज्ञ/मानसशास्त्रज्ञ म्हणतात. तरीही पूर्वायुष्यात शिकलेल्या/अनुभवलेल्या काही काही गोष्टी माणसाच्या जाणत्या मनाला त्याच्या पुढच्या आयुष्यात आठवत नाहीत हा आपणा माणसांचा सर्वसामान्य अनुभव आहे. शिवाय आयुष्यकालात किती गोष्टी माणूस शिकू/अनुभवू शकेल ह्यालाही साहजिक मर्यादा आहेत. तिसरे म्हणजे ज्या गोष्टी माणसाला आठवल्यासारख्या भासतात त्या एकूण एक त्याला अचूकपणे आठवतीलच ह्याची शाश्वती नसते.

जी माणसे खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात त्यांच्याही तर्कशुद्ध विचारसरणीला मुख्यत्वे स्मृतीच्या अपुरेपणाने बरीच मर्यादा रहाते. एक उघड उदाहरण म्हणजे आकडेमोडी. आकडेमोडींमागे तर्कशुद्धता असते, आणि आकडेमोडींकरता स्मृतीचीह गरज असते. पण स्मृतीच्या मर्यादिततेमुळे आपण माणसे मनातल्या मनात फक्त मोजक्या आकडेमोडी करू शकतो. इतकेच नव्हे तर कागदपेन्सिल वापरूनही खूप आकडेमोडी करायला आपल्याला बराच वेळ तर लागतोच, शिवाय रटाळपणामुळे कंटाळाही चट्कन येतो. आता एक अगदी खूप आश्चर्य वाटण्याजोगी बाब अशी की कोणतीही माहिती आकड्यांच्या रूपात प्रकट करता येते आणि कोणत्याही प्रांतातल्या अमुक वस्तुस्थिती असली तर अमुक गोष्ट घडते/घडणार, एरवी दुसऱ्या काही गोष्टी संभवतात ह्या विचारसरणीचे आकडेमोडींमधे रूपांतर करता येते ही अचाट कल्पना गेल्या शतकात माणसाच्या लक्षात आली. अर्थात गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी आकडेमोडींच्या रूपात करण्याकरता लाखो रटाळ आकडेमोडींची गरज असते. संगणक विज्ञान ही आज काळाची गरज आहे 

आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला प्रचंड मदत करू शकणाऱ्या संगणक ह्या चीजेचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी लावला. ती चीज अविश्वसनीय रीत्या अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे चालू आहे. येत्या पन्नास, शंभर, पाचशे, हजार,...वर्षात माणसाने संगणक किती प्रभावी केलेला असेल आणि त्यायोगे माणसाचे आयुष्य भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे असेल ते पाहू शकणारा द्रष्टा ह्या पृथ्वीतलावर असणे अशक्य आहे. केवळ गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत संगणक ह्या चीजेने माणसाचे आयुष्य पार बदलून टाकले आहे. (त्यापूर्वी पंधराव्या शतकातल्या सुकर छ्पाईच्या शोधाने आणि अठराव्या शतकातल्या वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या शोधाने माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल केले होते).

 
माणसाच्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला संगणक प्रचंड मदत करू शकतात ह्यामागे संगणकाची दोन वैशिष्ट्ये आहेत ती अशी : (त्यांपैकी समजा हे ना ते फक्त एकच वैशिष्ट्य संगणकात असते तर संगणक ही चीज माणसाला निरुपयोगी ठरली असती). वर लिहिलेल्या माणसाच्या स्मृतीच्या कोणत्याच मर्यादा निदान प्रभावी संगणकांना जवळजवळ लागू नाहीत हे हल्लीच्या संगणकांचे पहिले वैशिष्ट्य आहे. संगणक चालू ठेवणारी विद्युत ऊर्जा बंद पडली तर पूर्वी संगणक त्यांच्या स्मॄतीत माणसाने कोंबलेल्या सगळ्या गोष्टी एखाद्या अतिवृद्ध माणसाप्रमाणे तत्काळ कायमच्या विसरून जात असत. पण तो प्रकार शास्त्रज्ञांनी/तंत्रज्ञांनी भिन्न रीतींनी झटपट जवळजवळ संपुष्टात आणला आहे. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील ह्याची मर्यादाही शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. आणि संगणकांच्या स्मॄतीत माणसाने कोंबलेल्या सगळ्या गोष्टी ते सर्वकाळ, शेंडी तुटो की पारंबी तुटो, अगदी अचूकपणॆ आठवत राहतील ह्या तिसऱ्या गोष्टीबाबतही शास्त्रज्ञांनी/तंत्रज्ञांनी एव्हाना खूप प्रगती केली आहे.

सं.णकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी आकडेमोडींच्या रूपात करण्याकरता ज्या लाखो रटाळ आकडेमोडींची गरज असते त्या रटाळ, कंटाळवाण्या न मानता काही सेकंदांमधे त्यांचा फडशा पाडणे हा संगणकांच्या हातचा मळ झाला आहे! आणि कमीकमी वेळात आकडेमोडी करण्याचे संगणकांचे कसब शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. संगणकांना गरज असते ती फक्त माणसाकडून गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणीबद्दल अचूक आणि निःसंदिग्ध सूचना मिळण्याची. त्या सूचना संगणकांना विशद करायला जे बरेच कौशल्य लागते ते कौशल्य म्हणजे संगणकसंचालनविज्ञान. तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती (आणि गूढवादात्मक अंतर्ज्ञान) ही माणसाच्या बुद्धीची वैशिष्ट्ये मात्र त्याच्या बुद्धीचे अपत्य असलेल्या संगणकाच्या (निदान सध्यातरी) पार आवाक्याबाहेरची आहेत. गोविंदाग्रजांच्या अरुण कवितेतल्यासारख्या कल्पनाशक्तीच्या भराऱ्या असलेली एखादी कविता लिहू शकणारा संगणक कोणी शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ निदान येत्या पन्नासएक वर्षात निर्माण करू शकतील असे दिसत नाही. पण माणसाच्या बुद्धीची झेप ती मर्यादा कधीच ओलांडणार नाही हे आज कोण निश्चितीने सांगू शकेल?

वाढत्या संगणक वापरामुळे जगातील सर्व माहिती ही क्षणार्धात उपलब्ध होते. त्यामुळे सर्वांच्या समस्यांचे जलद निराकरण होते...

संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो.भ ारतात संगणक आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले  

संगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतो.संगणकांना पुरवलेली माहिती आकडे, चित्रे, आवाज, ध्वनी अशी बहुरूपी असू शकते, पण संगणकसंचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध प्रोग्रॅमनुसार (सूचनांच्या यादीनुसार) व पुरवलेल्या माहितीनुसार आकडेमोडी करणे हे सामान्य लोकांना अगदी अजब भासणारे संगणकांचे एक वैशिष्ट्य आहे.

चर्च-टयूरिंग युतीच्या सिद्धांतानुसार वेळेचे बंधन नसेल तर कमीतकमी क्षमतेचा संगणकसुद्धा कोणत्याही उच्च क्षमतेच्या संगणकाइतकेच काम करू शकतो. त्यामुळे सगळ्या तऱ्हांच्या संगणकांची रचना मूलतः सारखीच असते. पूर्वी अगदी माफक क्षमतेचे संगणक एक मोठी खोली व्यापत असत. आता फक्त अतिकूट आकडेमोडी करू शकणारे अतिप्रभावी संगणक (महासंगणक) तसे मोठे असतात. त्यांना इंग्रजीत मेनफ्रेम अशी संज्ञा आहे. नित्याच्या वैयक्तिक वापरासाठी लागणार्या लहान संगणकांना पर्सनल कंम्प्यूटर अशी इंग्रजी संज्ञा आहे, तर कुठेही सहज नेता येणाऱ्याा छोट्या संगणकंना नोटबुक कम्प्यूटर अशी संज्ञा आहे. आज सर्वांत अधिक वापरले जाणारे संगणक म्हणजे एम्बेडेड कंम्प्यूटर. लष्करी विमानांपासून डिजिटल कॅमेरापर्यंत अनंत गोष्टो नियंत्रित करण्यासाठी ते वापरण्यात येतात.

संगणकात सर्वप्रथम माहिती किंवा डेटा भरावा लागतो. या माहितीवर प्रक्रिया होऊन ही व्यवस्थित माहिती तुम्हाला हव्या त्या स्वरूपात मिळवता येते. माहिती भरण्याच्या क्रियेला इनपुट असे म्हणतात. त्यावर प्रक्रिया होऊन आवश्यक आउटपुट मिळवले जाते. म्हणजेच, 

कच्चे इनपुट - प्रोसेस - आउटपुट' 

माहिती भरण्यासाठी जी साधने वापरली जातात त्याना इनपुट डिव्हाइसेस असे म्हणतात. कोणत्याही यंत्रणेचे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे ज्या भागाद्वारे माहिती आत घेतली जाते तो भाग होय. उदा. आपण आपल्या पाच इंद्रियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो. म्हणजेच नाक, कान, डोळे व जीभ इ. आपले इनपुट डिव्हाइसेस आहेत, माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या भागाला सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट अस म्हणतात. थोडक्यात सीपीयू हा संगणकाचा मेंदू होय. तर अंतिम उत्तरे किंवा माहिती ज्या साधनांद्वारे मिळवली जाते त्यांना आऊटपुट डिव्हाइसेस असे म्हणतात, अशा प्रकारे संगणकाच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रितरित्या काम सुरू असते व ते अतिशय वेगाने होऊन आपणास आपल्याला हवी ती उत्तरे मिळवता येतात. संगणकात भरलेल्या माहितीवर प्रक्रिया होऊन आवश्यकतेनुसार ती साठवून ठेवली जाते. मात्र टाईप करताना आपण जरी डेटा आपल्या नेहमीच्या भाषेत (मराठी, इंगजी किंवा इतर कोणतीही भाषा) लिहीत असलो तरी ही भाषा संगणकाला कळत नसते. संगणकाला कळतात त्या फक्त दोन स्थिती - ० व १। किवा ० ०) या दोन स्थितींच्या सहाय्याने प्रत्येक अक्षरास किंवा अंकास किंवा चिन्हास एक सांकेतिक कोड़ बहाल केले जाते. प्रत्येक अक्षर / अंक 03 च्या संचाने बनलेला असतो. 

म्हणजे या संकेतानुसार अक्षरे खालीलप्रमाणे लिहिली जातात 

अशा प्रकारे ० व १ च्या संचाने एक अक्षर / अंक बनते. यास बायनरी सिस्टिम (Binary System) असे म्हणतात. प्रत्येक 0 व 1 ला बिट (Bit) असे म्हणतात. आठ बिटसच्या संचास एक बाईट (Bite) असे म्हणतात.

म्हणजेच 

अक्षर / अंक = ८ बिटस् =१ बाईट. 

बायनरी सिस्टिममधील इतर एकके खालीलप्रमाणे आहेत -

१०२४ बाईट = १ किलो बाईट (KB) 

१०२४ किलो बाईट = १ मेगा बाईट (MB)

१०२४ मेगा बाईट = १ गिगा बाईट (GB)

१०२४ गिगा बाईट = १ टेरा बाईट (TB)

अशाप्रकारे ० व 1 च्या सहाय्याने संगणकात सर्व माहिती साठविली जाते. संगणकावर काम करताना मात्र ही भाषा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. टाईप करताना आपण आपल्याच भाषेत टाईप करतो व मॉनिटर किंवा प्रिंटरवरील आऊटपुट हाही आपल्याच भाषेत असतो. संगणकाच्या आत मात्र बायनरी सिस्टिम वापरली जाते.

संगणकविज्ञान आणि संगणक अभियांत्रिकी ह्या शाखा भिन्न आहेत. संगणकाची रचना आणि संगणकनिर्मिती/विकासांचा अभ्यास हे संगणक अभियांत्रिकीचे वैशिष्ट्य आहे.

संगणक कार्यप्रणाली (operating system) संगणकाचे मूलभूत नियंत्रण करते. सिस्टिम सॉफ्टवेअर' ह्या वर्गात संगणक कार्यप्रणालीचे वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेअरचे आणि संगणकावर चालणाऱ्या वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सॉफ्टवेअर्सचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. इतर सॉफ्टवेअरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेअर सर्व्हिसेससुद्धा संगणक कार्यप्रणाली पुरवते. संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो.भ ारतात संगणक आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले  

उदाहरणार्थ :

पहा: ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System)

संगणकात डेटा भरण्यासाठी म्हणजेच इनपुटसाठी व आऊटपटसाठी जी साधने वापरली जातात त्यांना टर्मिनल असे म्हणले जाते. * टर्मिनल्स तीन प्रकारचे असतात. 

पहा : प्रोग्रॅमिंग लँग्वेज

संगणकाने करावयाच्या कामासाठी सूचना देण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक 'संगणक प्रणाली' अर्थात प्रोग्रॅमिंग लँग्वेज अस्तित्वात आहेत. संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. संगणक हा विविध प्रकारची कामे एकाचवेळी करत असते.

प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते .

या संगणक भाषा शिकणे खूप जरुरी आहे. 




#Article 8: विनायक दामोदर सावरकर (2997 words)


विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; मृत्यू : मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली.

मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.  लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते  तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना  तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता  मुजोरपणा  सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४). 

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी  रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें )  जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

वीर सावरकरांचे या बाबतीत झणझणीत विचार आहेत. ते लिहितात.. ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.

एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निभ्रेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.’ (संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )

सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चलवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून त्यांना 'पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले.  त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहीत सावरकरांनी त्यांची विकेट घेतली.

सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते  गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.

जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.  सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६  रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत.  त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांनी '१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्र्यसंग्राम होता.

सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.

सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या.  सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत यांनी गायल्या आहेत.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

सावरकरांचा विशेष गुण हा की ते केवळ विचार मांडून थांबले नाहीत तर त्यांनी ते विचार आयुष्यभर प्रत्यक्ष कृतीत उतरविले. या संदर्भात त्यांचे मृत्युपत्र फार वाचण्यासारखे आहे. ते लिहितात :

वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल.  त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा  ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी : 

१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले.  त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली.  टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा०

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दुःखद निधनानंतर दैनिक मराठा मधे आचार्य अत्रे यांनी सावरकर यांच्या देदीप्यमान कारकीर्दीबद्दल अणि कार्याबद्दल चौदा लेख लिहिले होते. त्यांपैकी हा एक :- 

तात्या गेले !

अखेर आज तात्या गेले; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की, 
'घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने, जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे, बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !'*

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठीप्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतिकारक नव्हते, ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते. ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्यप्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला, त्या ज्वलज्जहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुलपुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले. इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि त्यांची प्रज्ञा तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहुना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकुंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुजा देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरेतो झुंजेन ! वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची ज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ' अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली, ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तुलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहिले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदीराम बोस ह्या अठरा वर्षाच्या क्रांतिकारक तरुणाने मुझफ्फरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतियुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतिकारकांना त्यावेळी बजावले की , '१० मे १८५७ रोजी सुरू झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्यसंपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेव्हांच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ' अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटकगृहात अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यच नव्हते. अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून 'मोरिया' बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रिखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते.

म्हणूनच 'भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी' असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर आझाद हिंदचा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे 'पाया' आणि सुभाषचंद्र हे 'कळस' आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातच नव्हें, पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत 'हे कृष्ण, हे श्याम' असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली. तुकोबा 'आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा !‘ असे म्हणत वैकुंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नव्हते.

धन्योऽहमf । धन्योऽहम् ।
कर्तव्यं मे न विद्यते किंचित्
धन्योऽहम् । धन्योऽहम् ।
प्राप्तव्यम् सर्वमद्य संपन्नम् ।

....आचार्य अत्रे.
दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

ता संकेतस्थळावरून सावरकरांचे समग्र मराठी साहित्य उतरवून घेता येते. शिवाय हा स्थळावर सावरकरांच्या पुस्तकांची भारतातील अन्य १० भाषांत झालेली भाषांतरे आहेत.

भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला खूप शब्द दिले आहेत.  




#Article 9: लोकमान्य टिळक (1351 words)


बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

टिळकांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद आधी कोण? राजकीय की सामाजिक? या विषयावर झाला होता. जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.

इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.

तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात.  ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना  त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून.  प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठा चे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :-

राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला आणि महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरुपात साजरी केले. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.

कौटुंबिक स्तरावर  १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या   काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :- 

पुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले.  ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त झाले.

१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते, आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.

कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.




#Article 10: विकी (112 words)


विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा  दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे.

साधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.

विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.

विकी या संकेतस्थळ चे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारुप विकीविकीवेब हे वॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.
   




#Article 11: कादंबरी (487 words)


साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.

कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणाऱ्या करार, काळ,आवाज हे पैलू लक्षात घ्यावे लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मूलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणारा  जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लॅंगरच्या ‘काळ’ या संकल्पनेनुसार भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरूपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत असतो, म्हणजे टी. रास इलियटच्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.

लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू असे नाही. लघुकादंबरी ही तिच्या मुळापासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी 'शिरस्तेदार' लिहिली तेव्हापासूनच मराठीत हिचा आरंभ झाला.
व्यक्ती आणि समाज यांचे यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधले गेले होते. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसेकसे विकसित होत गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. लघुकादंबरी लिहिण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा आणि नेहमीची कादंबरी विचारात घ्यावी लागते.

कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असे म्हणण्यानेच जाणकार वाचकाच्या मनात त्यांतील भेद लक्षात येतो. पण कधीकधी लेखकाचीच द्विधा मन:स्थिती होते.'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही ह.मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि प्रकाशकानेही कादंबरी म्हटले. 'काळा सूर' या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असेच झाले.

डॉ. स्वाती सु. कर्वे यांनी त्यांच्या 'लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या पुस्तकाच्या चौथ्या सूची विभागात गणपतराव शिरके, सद्गुणी स्त्री, ना.ह. आपटे यांच्यापासून ते हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इ.स. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंबऱ्या, दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आहे. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, डॉ. स्वाती सु. कर्वे. यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहिले आहे.

जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचे चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचे, संघर्षाने भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी. वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूहजीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..

१. कसे दिवस जातील (न. वि. कुलकर्णी) : यांचा खेडूत सृष्टीचे कादंबरीकर म्हणून गौरव झाला आहे.
त्यांची मजूर(१९२५) ही कामगार जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे.
२. माकडीची माळ (अण्णा भाऊ साठे) : या कादंबरीत उपेक्षितांच्या जीवनातील वास्तव्य शब्दबद्ध केले आहे..
३. ब्राह्मणकन्या (श्री.व्यं. केतकर ) : कालिंदी या तरुणीची बंडखोर कहाणी या कादंबरीत वर्णिली आहे.




#Article 12: पु.ल. देशपांडे (972 words)


पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे  म्हणजेच  पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल (जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून  २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी  वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत..  

गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते.  त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.

पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे.या चित्रपटाचे दोन भाग आहेत.

पुलं हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्सुमने आणि विनोदी किस्से आहेत. 

पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी. के. पी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.त्यांचे  आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.

मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.

१२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले

देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.

देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.

पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.
वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो.  ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.

कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले.  त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.

१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.

१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.

१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.

भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती. 

१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली.

पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले.  याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल.

'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते.

१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला.  या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.

१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता.  संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.

लेखन :-

गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)

पहा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार




#Article 13: भाषाभ्यास (116 words)


भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार,  भावना व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हीही एक शाखा आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स्वरूपही गुंतागुंतीचे आणि कधीकधी अनाकलनीय भासते. भाषा आणि समाज यांचा एक अनन्यसाधारण संबंध असतो. संस्कृतीच्या परंपरा, श्रद्धा, रुढी, धार्मिक आचार-विचार  इत्यादी बाबींचे दर्शन भाषेतून होत असते म्हणून व्यक्तीसमूह समजून घेण्यासाठी  भाषाभ्यासाची गरज असते. अशा अभ्यासामुळे मानवाचे मनोव्यापार, मानवी संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करण्यास मदत होते. म्हणूनच भाषावैज्ञानिकांनी समाजविज्ञान, मनोविज्ञान आणि मानववंशविज्ञान यांचा अभ्यास सुरू केला त्यातूनच सामाजिक भाषाविज्ञान, मानववंशभाषाविज्ञान, आणि मनोभाषाविज्ञान अशा भाषाभ्यासाच्या नव्या शाखा सुरू झाल्या.




#Article 14: विष्णू सखाराम खांडेकर (187 words)


विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. 

खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

'अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे.




#Article 15: संगीत (124 words)


नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.

सुगम संगीत । नाट्यसंगीत । भावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीत । संगीतातील राग ।  संगीतविषयक ग्रंथ




#Article 16: भारत (4352 words)


भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

भारत नावाचा अर्थ ' भारत हे नाव कसे पडले याबध्दल मतभेद आढळतात. जैन अनुश्रुतिनुसार भगवान ॠषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरुन भारत हे नाव पडले असे सांगण्यात येते. ॠग्वेदकालीन सिंधू प्रदेशातील सर्वश्रेष्ठ टोळी भरत होती. तिच्या नावावरुन भारत हे नाव पडले असेल असेही समजण्यात येते.

'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.

शकुंतला ही विश्वामित्र ऋषींची मेनका या अप्सरेपासून झालेली कन्या होती. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता. त्यांचा पुत्र पराक्रमी भरत होता. यावरून हिंदुस्थान देशाला भारत हे नाव पडले असा एक मतप्रवाह आहे.

काहीच्या मते स्वायंभुव मनूची पत्‍नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती यांचा पुत्र असलेल्या प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्‍नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्‍नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा जडभरत  या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.
सिंधू नदीचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द आला. त्यामुळे हे स्थान हिंदुस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी दंतकथा आहे.

२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी देशाची नवी राज्यघटना अंमलात आल्यानंतर देशाचे नाव अधिकृतपणे 'भारत' अर्थात इंडिया (इंग्रजी: India) असे झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून २ वर्षे ११ महिने १७ दिवसात भारताचे संविधान निर्माण झाले होते.

भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये. रुपांतर झाले. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सूरू झाला. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.

उत्तरं यत्समुद्रस्य
हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद्भारतं नाम
भारती यत्र सन्ततिः ।।

म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत.

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली.

प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन भारताबद्दल लिहीतात,

भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा-वेरूळची लेणी, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशापर्यंत पोहोचला होता.

११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीम ने सिंध प्रांतात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात. दिल्ली सल्तनत ते मोगलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघल राजवट सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली ज्याला त्यांनी स्वराज्य असे नाव दिले , ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. इंग्लिश लोक, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या कारभाराखाली घेतले. १८५७ मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटीश सरकारकडे गेला.

लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर महात्मा गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या. सरते शेवटी १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारतातील दहशतवादही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारतातील विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. मागील एका दशकापासुन कट्टर धार्मिक समुदायांमधील जातीय तेढांमुळे धार्मिक दहशतवाद ही भारतातील एक गंभीर समस्या बनली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्ततावादी चळवळीच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. भारताने १९७४ मधे भूमीगत अणुचाचणी केली. १९९८ मध्ये यापाठोपाठ पाच आणखी अणुस्फोट करण्यात आले,ज्याने भारतास अणुसज्ज देशांच्या यादीत नेऊन बसविले. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरुन सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणिय कामगिरी केली आहे.

भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत (हिमालय), गंगेचे खोरे, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैऋत्य दिशेला  सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ अशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व ईशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूरचे पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालामुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.

भारताला एकूण  कि.मी. इतका समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातील  कि.मी. इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित  द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.

बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडक नदी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मध्य भारतातून नर्मदा सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्वीपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप व बंगालच्या उपसागरातील म्यानमार व इंडोनेशियाजवळील अंदमान व निकोबार द्वीपसमूह हे दोन द्वीपसमूह आहेत.

भारतीय हवामान हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान सुसह्य असते. ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आर्द्र हवामान, विषुववृत्तीय शुष्क हवामान, समविषुववृतीय आर्द्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान.

भारतीय द्वीपकल्प अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेला आहे. हिंदी महासागरात तमिळनाडूच्या जवळ श्रीलंका हा शेजारी देश आहे. पश्चिम बंगाल ते त्रिपुरा पर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात बांगलादेशास वेढलेले आहे. पूर्वेस म्यानमार आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा चीनला भीडल्या आहे. सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यंच्यामधील प्रदेशात भूतान हा देश आहे. सिक्कीम व उत्तरांचल ह्या राज्यांच्या मध्ये नेपाळची सीमा उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांना लागते. उत्तरांचल पासून पुन्हा उत्तरेकडे लद्दाख पर्यंत चीनची सीमा आहे. काश्मीर मधील सियाचीन हिमनदीपासून ते गुजरात राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे पाकिस्तानची सीमा आहे.

प्रशासनाच्या सोयीकरता राजकीयदृष्ट्या भारताचे २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश असे विभाग पाडण्यात आले आहेत.सर्व राज्ये आणि दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या  केंद्रशासित प्रदेशांत निर्वाचित सरकारे आहेत; तर इतर केंद्रशासित प्रदेशांत केंद्र शासननियुक्त प्रशासनाद्वारे राज्यकारभार चालतो.

भारतात ६ प्रमुख धर्म आहेत (सर्व आकडे अंदाजे):

१) हिंदू धर्म – ७५-७९%;

२) इस्लाम – १४%;

३) बौद्ध धर्म – ६%;

४) ख्रिश्चन धर्म – २.५%;

५) शिख – २%;

६) जैन – ०.५%.

वरील धर्मांपैकी बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि हिंदू धर्म या ४ धर्मांचा उगम भारतात झाला.

भारतातील सध्याची शिक्षणपद्धती ही बहुतांशी ब्रिटिश व पाश्चात्य पद्धतीवरून आधारित आहे. पारंपारिक गुरुकूल शिक्षणपद्धती कालौघात लुप्त पावली आहे. काही शिक्षणतज्ञ अजूनही गुरुकूल शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करतात. बहुतेक राज्यांत शालेय शिक्षण १२वी पर्यंत असते तर काही राज्यात १०वी पर्यंत असते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी शास्त्र, वाणिज्य अथवा कला यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊ शकतात अथवा पदविका शिक्षण घेऊ शकतात. पदवीसाठी विद्यापीठाशी संलग्न शिक्षणसंस्थांमध्ये महाविद्यालयांमध्ये घेणे गरजेचे असते. पदवी शिक्षण अभ्यासक्रमानुसार ३ ते ५ वर्षाचे असते.

दक्षिणेकडील महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमध्ये शैक्षणिक सोयी उत्तरेकडील राज्यांपेक्षा जास्त आहेत. काही ठिकाणी इच्छुक विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागा जास्त असतात. भारत सर्वाधिक अभियंते तयार करणारा देश म्हणून आज ओळखला जातो. भारतात पदवी शिक्षणाच्या सोयींवर बऱ्यापैकी सोयी व उपलब्धता यांचे प्रमाण जमलेले आहे. परंतु शालेय शिक्षणावर स्तरावर अजूनही सरकार झगडत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची होणारी गळती हा ग्रामीण तसेच शहरी भागातील एक मोठा प्रश्न आहे. तसेच पदवी शिक्षणात विविध जाती जमातींबद्दलच्या आरक्षणाच्या प्रमाणाबद्दलही अनेक प्रश्न आहेत. सततच्या वाढत्या आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या संधी कमी होउन अन्याय होत असल्याची भावनाही प्रबळ आहे, त्यामुळे या संदर्भात गेल्या काही वर्षात अनेक वेळा सरकार व विद्यार्थी यांच्यात हिंसाचार घडला आहे. परंतु आरक्षणामुळेच भारतातील शैक्षणिक क्रांती घडल्याचे अनेकांचे मत आहे.

विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणही मिळू शकते त्यासाठी संलग्न क्षेत्रामध्ये पदवी असणे गरजेचे आहे. परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाबद्दल आकर्षण व सोयी गेल्या काही वर्षात वाढल्याने भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यात कल वाढला आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी या देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यास भारतीय विद्यार्थ्यांची पसंती असते. काही भारतीय विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहेत. आफ्रिका व आशियातील अनेक देशातील विद्यार्थी स्वस्त व दर्जेदार शिक्षणाच्या शोधात भारतात येतात.

भारतीय संस्कृती ही हडप्पा संस्कृती, नागर संस्कृती, सिंधू संस्कृती आहे.

भारतीय स्थापत्य हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. मोहेंजोदारोचे शहरी स्थापत्य हे प्राचीनकाळातील नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी, प्राचीन लेण्यांमधील कोरीव काम तत्कालीन स्थापत्यामधील बारकावे दर्शवतात. अजिंठा येथील बौद्ध लेणी आणि हिंदु लेणी, वेरूळ येथील हिंदू, बौद्ध व जैन लेणी तत्कालीन सर्वधर्मसमभावाचे उदाहरण आहे. खजुराहो येथील मंदिरांवरील प्रणयक्रीडारत मूर्ती तत्कालीन कलेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक उदाहरण आहे. दक्षिणेमधील अजस्त्र मंदिरे, हंपी बदामी येथील ओसाड शहरे, हळेबीड व वेलूर येथील मंदिरे दक्षिण भारतीय स्थापत्यांची उदाहरणे आहेत.

इस्लामी आक्रमणाबरोबर इस्लामी राज्यकर्त्यांनी मध्य अशियाई, पर्शियन शैली देखील भारतात आणली व काळाच्या ओघात येथील जुन्या शैलीबरोबर सरमिसळून गेली. ताजमहाल व इतर मुघल स्थापत्ये आज भारताची ओळख बनली आहेत. ताजमहाल आज नव्या युगातील ७ आश्चर्यांमध्ये गणला जातो.

आधुनिक काळात स्थापत्यशास्त्रातील प्रगतीनुसार भारतीयांनी अनेक ठिकाणी स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने सादर केले आहेत, अक्षरधामची मंदिरे हे आधुनिक व पौराणिक स्थापत्याचे उदाहरण आहे.

लाल किल्ला (इंग्रजी: The Red Fort हिंदी – लाल क़िला ) दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. मोगल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ ला बांधून घेण्यास सुरु केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा सुद्धा भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्ल्याचे खुपच संबध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजहान यांनी केली. मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ ला बांधून घेण्यास सुरु केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला.

राष्ट्रपती भवन हे भारत देशाच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे. ३४० खोल्या असलेली ही इमारत १९२९ साली बांधली गेली.

सचिवालय इमारत, दिल्ली

सचिवालय इमारत रायसीना टेकडी , नवी दिल्ली , भारत.

इंडिया गेट

इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना सर एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्रजी: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्रजी: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे. सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालीन पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्रामधील मुंबई या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या (आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.

संसद भवन

भारतीय संसद ज्या इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवन म्हणतात. १९१२–१३ साली ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. इमारतीचे बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.

मरीन ड्राइव्ह

मरीन ड्राइव्ह मुंबई मध्ये १९२० मध्ये बांधले गेले. त्याला क्वीन’स नेकलेस असेही म्हटले जाते.

वांद्रे – वरळी सागरीसेतू

भारतीय संगीत हे मुख्यत्वे दोन प्रकारात गणले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत. दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध घराणी असून प्रत्येक घराण्याने आपापला वेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे.

भारतात वेगवेगळे शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार आहेत. भांगडा नृत्य (पंजाब), बिहु नृत्य (आसाम), छाऊ (पश्चिम बंगाल), संबळपुरी (ओडिशा), घूमर (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र) हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत. तसेच आठ नृत्यप्रकारांना नॅशनल अ‍ॅकॅडॅमी ऑफ म्युझिक, डान्स ॲण्ड ड्रामातर्फे शास्त्रिय नृत्यप्रकाराचा दर्जा दिला आहे. ते भरतनाट्यम् ‌(तमिळनाडू), कथ्थक (उत्तर प्रदेश), कथकल्ली, मोहिनीअट्टम्‌ (केरळ), कुचिपुडी (आंध्र प्रदेश), मणिपुरी‌ (मणिपुर), ओडिसी (ओडिशा) व सत्रीया

(आसाम) आहेत.

भारतात पर रंगमंचाची परिकल्पना अतिशय पुरातन असून संस्कृत साहित्यात त्यांची नोंद आहे. गुप्त कालीन अनेक नाटके आजही प्रसिद्ध आहेत. नृत्य, संगीत व त्यांची संवादातील लयबद्धता हे भारतीय रंगमंचाचे खास वैशिष्ट्ये आहे. प्राचीन काळातील अनेक नाटके हिंदू पुराणांवर आधारित आहेत. स्थानिक नाटके देखील लोकप्रिय आहेत. गुजराथमधील भावई, बंगालमधील जत्रा, उत्तर भारतातील नौटंकी व रामलिला तसेच महाराष्ट्रातील तमाशा, तमिळनाडूतील तेरुकूट्टू व कर्नाटकातील यक्षगण ही स्थानिक पारंपरिक रंगामंचाची उदाहरणे आहेत. आधुनिक काळात रंगमंचामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. महाराष्ट्रातील नाटके त्याचे सुरेख उदाहरण आहे. या नाटकांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचे तसेच कलेचे, अभिनयाचे सादरीकरण विविध विषयातून सादर केले जाते.

भारतातील चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे. धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र (चित्रपट)  ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ऍक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगु व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिंकापेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडा आहे . बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला शोले हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये लगान या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली 'स्लमडॉग मिलयोनेर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटीश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.

भारतीय साहित्य हे अतिशय पुरातन आहे. प्राचीन भारतीय साहित्य हे प्रामुख्याने संस्कृत व पाली बौद्ध साहित्य आहे. वैदीक कालात वेदांची निर्मिती झाली. वेद हे जगातील सर्वांत पुरातन ग्रंथ असल्याची मान्यता आहे. प्रामुख्याने संस्कृत साहित्य हे केवळ पठण होत असत व दुसऱ्या पिढीला पठणाद्वारेच सूपूर्त होत. भूर्जपत्रांवर व इतर माध्यमांवर लिहण्याची कला विकसित झाल्यावर साहित्य लिखित स्वरुपात तयार झाले. वेदांसोबत रामायण, महाभारत हे प्राचीन भारतीय साहित्याचे परमोच्च उदाहरण आहे. इतर महत्त्वाच्या साहित्य शृखलांमध्ये पुराणे, शृती व स्मृतींचा समावेश आहे. वैदिक साहित्या सोबत, जैन धर्मीय व बौद्ध धर्मीय साहित्यही प्राचीन भारतीय साहित्यांचे नमुने आहेत. गुप्त कालीन सुवर्णयुगात विविध नाटके लिहीली गेली. १० व्या शतकानंतर विविध प्रातांमध्ये साहित्य तयार झाले. संत ज्ञानेश्वर लिखित भावार्थ दीपीका, नामदेवाच्या ओव्या, एकनाथांची भारुडे, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंग गाथा आदि लिहुन सामाजिक क्रान्ति घडवली. तुकारामांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक चळवळ आणली. तमिळ भाषेचे साहित्य हे संस्कृत भाषेखालोखाल पुरातन मानले जाते. इंग्रजांच्या आगमनाबरोबर इंग्रजी भाषेतही भारतीयांनी साहित्यात आपली चूणूक दाखवली. सुरुवातीच्या लेखकांनी याचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी पुरेपूर करून घेतला. रविंद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी भारतात ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो.

भारतीय पाककला ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. भारतात प्रांतानुसार आहाराच्या सवयी बदललेल्या दिसतात. उत्तर भारतात आहारात गव्हाच्या पदार्थांचा समावेश असतो तर दक्षिण व पूर्वेकडे आहारात तांदळाच्या पदार्थांचा जास्त वापर आहे. मध्य भारतात संमिश्र प्रकारचा आहार असतो. प्रत्येक प्रांतातील हवामान पावसाचे प्रमाण बदलत असल्याने तेथे पिकणाऱ्या फळभाज्या, फळे, कडधान्ये यात फरक पडतो त्यामुळे प्रांतवार आहारात मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावरील वापर भारतीय आहारातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. तिखट, मिरी, लवंग, दालचिनी व इतर अनेक पदार्थ वापरून गरम मसाला, गोडा मसाला, इ. मसाले तयार केले जातात. या विविध प्रकारच्या मसाल्यांचे मिश्रण करून अजून वेगवेगळे मसाले तयार करण्यात येतात. मसाल्यांसोबत विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग चव वृद्धींगत करण्यासाठी केला जातो. मसालेदार आहारासोबत विविध प्रकारच्या मिठाया व गोड पदार्थ आहाराला परिपूर्ण बनवतात. भारतीय जेवणात प्रामुख्याने शाकाहाराचा जास्त वापर होतो. विविध प्रकारच्या भाज्या कडधान्ये, तांदूळ व गव्हाची पोळी अथवा चपाती किंवा बाजरीची/ ज्वारीची भाकरी हे शाकाहारी जेवणात प्रामुख्याने असते. मासांहारी जेवणात कोंबडी व बोकडाचे मांस प्रामुख्याने खाल्ले जाते. किनाऱ्यालगतच्या प्रदेशात (कोकण, केरळ व पूर्व किनारपट्टी), बंगाल, आसाम या प्रांतात माशांचा जेवणात समावेश असतो. भारतीय आहार हा समतोल आहार आहे.

भारत हा उष्ण हवामानाचा देश असल्याने सुती कपड्यांचा वापर जास्त होतो. पारंपारिक वेषभूषा प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्ये आहे. तरीपण पारंपारिक वेषभूषा पुरुषांसाठी धोतर अथवा लुंगी व स्रियांसाठी साडी हे आहे. बदलत्या काळाप्रमाणे भारतीयांनी वेषभूषेतही बदल केला आहे. ग्रामीण भागात पारंपारिक वेषभूषा अजूनही प्रचलित असली तरी शहरी भागात पुरुषांचा प्रामुख्याने पॅंट शर्ट हाच पोषाख आहे. स्रिया प्रामुख्याने साडी अथवा सलवार कमीझ पसंत करतात. गेल्या काही वर्षात शहरी भागात जीन्स व टॉप हा किशोरवयीन मुलींत पसंतीचा प्रकार आहे.

भारतीय लोक हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. एक भारतीय मुख्य सण म्हणजे दिवाळी होय. प्रत्येक प्रांतात सण हे कमी अधिक प्रमाणात साजरा करतात. तसेच प्रत्येक प्रांताचे खास सण आहेत. बौद्ध धर्मीयांचे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे तीन मुख्य सण आहेत. भारतातील बहुतांशी सण हे धार्मिक आहेत. इतर मुख्य सणांमध्ये मकरसंक्रांत, होळी, पोंगल, गणेश चतुर्थी, नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, ओणम हे मह्त्वाचे सण आहेत. ख्रिश्चन व इस्लाम धर्मीय पण नाताळ व ईद चे सण साजरा करतात.

वरील नमूद केलेल्या धार्मिक सणांसोबतच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिवस, २६ जानेवारी गणतंत्र दिवस व गांधी जयंती हे राष्ट्रीय सणदेखील साजरे होतात.

भारतीय राज्यघटनेनुसार भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा व राज्यसभेतील सभासदांना खासदार असे म्हणतात. लोकसभेतील खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात. लोकसभेत एकूण ५४५ खासदार आहेत. राज्यसभेतील खासदार विशिष्ट मतदारसंघांतून निवडले जातात. हे सहसा विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, सामाजिक संस्था अश्या ठिकाणी काम करत असणाऱ्यांना या राज्यसभेत खासदारकी मिळते. राष्ट्रपती घटनात्मक दृष्ट्या भारतीय शासनातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही लोकसभा, राज्यसभा व विविध राज्यातील आमदारांच्या मतदानाप्रमाणे होते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वाधिक खासदार असणाऱ्या पक्षास राष्ट्रपती सरकार स्थापण्यास निमंत्रण देतात. या पक्षास संसदेत आपले बहुमत सिद्ध करावे लागते. बहुमतासाठी ५० टक्यापेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले असून सर्वाधिक वेळा सरकार स्थापन केले आहे. १९८४ च्या निवडणूकीनंतर कोणत्याही पक्षास ५० टक्क्यांचा आकडा पार करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विविध पक्षांशी युती करून सरकार स्थापनेचा पायंडा पडला आहे. सरकार स्थापन केलेला पक्ष पंतप्रधान निवडतात व पंतप्रधान मंत्रीमंडळ निवडतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नरेंद्र मोदी सध्याचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असले तरी घटनेत पंतप्रधान हे सर्वाधिक जवाबदारीचे पद आहे. मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री अशी विभागणी असते. विविध खात्यांचे मंत्री आपपल्या खात्याचा कारभार बघतात. सर्व मंत्री पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतात. गृह, संरक्षण, रेल्वे, अर्थ, कृषी अशी काही विविध मंत्रालये आहेत. नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून संसदही तेथेच आहे.

भारतातील राज्यांची रचना भाषावार झालेली आहे. प्रत्येक राज्यात विधानसभा अस्तित्त्वात आहे. विधानसभेच्या सभासदांना आमदार असे म्हणतात. प्रत्येक राज्यातील आमदारांची संख्या त्या राज्याच्या आकारमान व लोकसंख्येवर अवलंबून असते. महाराष्ट्र, तमिळनाडू या सारख्या मोठ्या राज्यांत विधान परिषद ही असते. राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च नागरिक तर मुख्यमंत्री हे अधिकारीक दृष्ट्या प्रमुख असतात. प्रत्येक राज्याला काही प्रमाणात स्वायत्त अधिकार आहेत उदा: करप्रणाली, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरण इत्यादी.

भारत हा जगातील सर्वाधिक जैववैविध्यपूर्ण देशात मोडतो. भारतात प्राणी पक्षी व वनस्पतींमध्ये कमालीचे वैविध्य आहे. भारतात जगात आढळणारे सस्तन प्राणी पैकी ७.६ टक्के, पक्ष्यापैकी १२.६ टक्के, सरपटणारे प्राण्यांपैकी ६.२ टक्के, भू-जलचर प्रजाती ४.४ टक्के, ११.७ टक्के माश्यांच्या प्रजाती व ६ टक्के वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. भारतातील अनेक प्रदेशात जैववैविध्यात स्थानिक प्रजातींची संख्या लाक्षणिक आहे. भारतीय वनस्पतींतील एकूण ३३ टक्के प्रजाती स्थानिक आहेत. पर्जन्याच्या प्रमाणात असलेली मोठ्या प्रमाणातील विषमतेमुळे भारतात विविध प्रकारची वने आहेत. अंदमान निकोबार, सह्याद्रीतील तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये आद्र विषववृतीय वने आहेत तसेच हिमालयात सूचीपर्णी वृक्षांचे देखील जंगल आहे. या दोन टोकांमध्ये मध्य भारतात साल वृक्षाची आद्र पानगळी प्रकारची जंगले आहेत तसेच बहुसंख्य साग वृक्ष असलेले शुष्क पानगळी जंगले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक व राजस्थान मधील अतिशुष्क प्रदेशात बाभूळ सारख्या काटेरी वनस्पतींची जंगले आहेत.

भारतात आढरणार्‍य अनेक प्रजाती स्थानिक असून पूर्वीच्या गोंडवन या महाखंडातून आलेल्या आहेत. भारतीय पृष्ठाचे युरेशिय पृष्ठाशी टक्कर झाल्यानंतर भारतात इतर प्रजातींचा शिरकाव झाला. दख्खनच्या पठारावरील प्रंचड ज्वालामुखीच्या हालचाली तसेच २ कोटी वर्षांपूर्वीचे हवामानातील बदल यामुळे मूळच्या बहुतांशी प्रजाती नामशेष पावल्या. भारतात आलेल्या सस्तन प्राण्यांच्या जाती ह्या बहुतांशी हिमालयाच्या पूर्व व पश्चिम कोपर्यातून आल्या. उदा वाघ हा भारतात म्यानमार कडून आला असे मानण्यात येते तर सिंह हा इराणच्या मार्गाने आला. म्हणूनच भारतातील सस्तन प्राण्यात केवळ १२.६ टक्के तर पक्ष्यांमध्ये केवळ ४.५ टक्के प्रजाती स्थानिक आहेत व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ४५.८ टक्के तर उभयचर प्राण्यांमध्ये ५५.८ टक्के स्थानिक् आहेत. निलगीरी वानर हे भारतातील स्थानिक् प्रजातीचे खास उदाहरण आहे. भारतात एकूण पक्ष्यांच्या १२०८ प्रजाती तर सस्तन प्राण्यांच्या ४५० प्रजाती आढळतात. भारतात अनेक IUCN ने निर्देशित केलेल्या अनेक प्रजाती आहेत. यात वाघ, अशियाई सिंह, पांढऱ्या पाठीचे गिधाड यांचा समावेश होतो. पांढऱ्या पाठीच्या गिधाड ज्यांची १०–१५ वर्षांपुर्वी संख्या चांगली होती ते आज जनावरांना देण्यात येणारे जे डिफ्लोमेनियॅक या औषधामुळे जवळपास नामशेष होत आले आहेत.

भारतात सस्तन प्राण्यांम्ध्येही कमालीची वैविध्यता आहे. मार्जार कुळातील सर्वाधिक प्रजाती भारतात आढळतात. भारत हा एकच देश आहे ज्यात वाघ व सिंह व बिबट्या सारख्या मोठ्या प्रजाती अस्तित्वात आहेत. तसेच केवळ भारतातच हरिणांच्या सारंग व कुरंग प्रजाती पहावयास मिळतात. गेल्या काही वर्षात मानवी अतिक्रमणामुळे भारतीय वन्यसंपदा धोक्यात आली आहे, बहुमुल्य वन्यसंपदेचे संवर्धन व्हावे यासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. बेसुमार शिकारींनी १९७० पर्यंत वाघांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. १९७२ मध्ये वन्यजीव कायदा मंजूर करण्यात आला व वाघांसह अनेक जीवांना कायद्याने संरक्षण मिळाले. बहुतांशी वन्यजीवांच्या शिकारींवर प्रतिबंध आणले. तसेच अनेक व्याघ्रप्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
अलांछित (untouched ecosystems) नैसर्गिक ठिकाणे अजूनही भारतात अस्तित्वात आहेत. अशी ठिकाणी जशीच्या तशी रहावीत यासाठी यांना बायोस्फेअर रिझर्व म्हणून घोषित केले आहेत्. भारतात सध्या १८ बायोस्फेअर रिझर्व घोषित आहेत.

भारताची अर्थव्यवस्था जगातील १२व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. परंतु अलिकडच्या काळात भारताने औद्योगिक क्षेत्रातही बरीच आघाडी मारलेली आहे. भारतात काम करणार्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योगांवर चालतो, परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलिकडे सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये सध्या १७ % वाटा शेतीचा आहे, २८ % वाटा उद्योगांचा आहे, तर ५५ % वाटा सेवांचा आहे.
सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातिल तिन क्रमावारीत तिसऱ्या स्थानी आहे




#Article 17: नृत्य (264 words)


नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो.  या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.  नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.

फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन,  लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता  व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.या क्षेत्रात मध्ये लोकांने भरपूर नाव कमवले आहे व ते सफल सुद्धा झालेल आहे.

भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. 
देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे.

नृत्यात करियर करू इच्छिणाऱ्याला नृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत असावी लागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.

रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।

नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे.  दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत
यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली  या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.
तर  कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

नृत्यशैलींशी संबंधित विशेष पोशाखांची, फुलाच्या गजऱ्यांची  व दागिन्यांची आवश्यकता असते.  त्यासाठी पुणे-मुंबईत खास दुकाने आहेत. पुण्यातली अशी काही  दुकाने:-




#Article 18: वि.वा. शिरवाडकर (2697 words)


विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (जन्म : नाशिक, २७ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार  व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. 
मराठी  कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या  आहेत.

कुसुमाग्रजांचे कणा ही  कविता  युवकांना स्फूर्ती देणारी आहे.

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे  झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.

कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.

कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात.  कुसुमाग्रजांचा  साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि  श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे.  नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.

कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी आपला  साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. या शोधनिबंधात त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे केलेला नाही.

कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.

ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या  विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy  म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने  जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणाऱ्या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)

या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो.  “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)

यानंतर कुसुमाग्रज कलेच्या आविर्भाव या तत्त्वाचे विवेचन करतात. ते म्हणतात, साहित्याचे साहित्यत्व सिद्ध होते ते आविर्भाव व अनुभव या तत्वांमुळे.  “आविर्भाव म्हणजे जे अरूप आहे किंवा विरूप आहे त्याला परिणामकारक, सौंदर्यबुद्धीला आवाहन करील असा आकार देण्याची प्रवृत्ती होय.  अनुभव मुळात निराकार व निरामय असतो. आविर्भाववृती त्याला शब्दांच्या साह्याने आकार देते, रूप देते. शब्द हे या वाङ्‌मयीन आविर्भावाचे साधन आहे. कुसुमाग्रजांच्या मते, साहित्यप्रकारांचा जन्मही या वृत्तीतूनच होतो. ही वृत्ती मनोगताची रहदारी सुलभ करण्यासाठी साहित्यप्रकार जन्माला घालते.  वाङ्‌मयप्रकारात जे काळानुसार बदल होतात त्याचेही कारण कुसुमाग्रज ही वृत्तीच मानतात. त्यांच्या मते, आविर्भावाच्या प्रयोगशीलतेमुळे व नवीनतेच्या आग्रहामुळेच हे बदल होतात. काळाची गरज भागवण्यासाठी आविर्भाववृत्ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे साहित्यप्रकार जन्मास घालते.

कुसुमाग्रजांच्या मते, आविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. “आविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे...लेखकांमध्ये अहंकाराची प्रेरणा प्रबळ आहे, अविर्भावाचे सामर्थ्यही प्रभावी आहे; परंतु त्याची अनुभव घेण्याची शक्ती जर संकुचित, बोथट आणि केवळ वरच्या थरालाच स्पर्श करणारी असेल तर त्याचे साहित्य उथळ आणि घायपाताच्या रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते.”

म्हणजे, जे स्थान मर्ढेकर आत्मनिष्ठेला देतात तेच कुसुमाग्रज अनुभवाला देतात. या अनुभवाचे  अधिक विश्लेषण करताना ते म्हणतात, अनुभव प्रत्येक माणसागणिक वेगळा असल्यामुळे एकाच विषयाबाबतही सारखेपणा येत नाही.  माणसे संपत नाही, माणसाचे अनुभव संपत नाही, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज, अनुभव आणि आविर्भाव यांचा परस्पर संबंध असा स्पष्ट करतात: आविर्भाव-सामर्थ्य प्रभावी असूनसुद्धा योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही. आशय आणि आकार यांत सुसंवाद असतो मात्र त्यांच्यात अभिन्नता नसते. समाजाने दिलेला शब्द, साहित्यक्षेत्रातील प्रचलित परंपरा, त्या सांभाळण्याची अथवा तोडण्याची प्रवृत्ती आणि आवश्यकता, परिसरातील बदलती परिस्थिती इत्यादी गोष्टी आविर्भावाचे नियमन करतात. “साहित्यासारख्या कलेत हे जे पारंपरिक असते, आवाहनात्मक असते, समाजाच्या जवळ जाणारे असते ते आविर्भावातून उत्पन्न होते. आणि याच्या  पलीकडचे, साहित्यकृतीच्या अंतरंगातील गर्भागार सिद्ध करणारे, त्या ठिकाणी एका नवीन जीवनाची आपल्याला देणगी देऊन आपले व्यक्तिगत जीवन  परमेश्वराच्या साहाय्याशिवाय द्विगुणित करणारे, साहित्याला अजरामरता देणारे, जे काही असते ते या अनुभवामुळेच आपल्याला लाभते.” (रूपरेषा, पृ.३०)   
म्हणजे कलाकृतीत नाविन्य अनुभवामुळेच येते. कलेचे कलारूप याचठिकाणी पूर्ण होते, किंबहुना याचमुळे पूर्ण होते. आविर्भावाच्या म्हणजे आकाराच्या  पलीकडे असलेली कलाकृतीची खास नवीनता, तिची खास स्वतंत्रता या अनुभवातच समाविष्ट असते. एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या  निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता व केवलता प्राप्त होते. “अपार आणि अनंत अशा जीवनाचा एक तुकडा, म्हणजेच एक जाणीव, लेखक-कवीच्या मनात प्रवेश करते. जागृत वा सुप्त अवस्थेत असलेल्या इतर संबंधित जाणिवांचे या जाणिवेवर काही संस्कार होतात, आणि या संस्कारामुळेच पूर्णरूप पावलेला त्याचा अनुभव कथा, नाट्य, अथवा काव्य अशा कलाकृतींच्या द्वारा व्यक्त होतो.” (रूपरेषा, पृ.३०) अशी लेखकाची निर्मितिप्रक्रिया घडून येते.

कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे  ही माणसाची  स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचतो तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. कवी काव्याच्या साह्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशाप्रकारे काव्य म्हणजे अखेरत: कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित, प्रतिमामय संबंध होय.     
काव्य हा  कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे होय. यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच काव्यातील आविष्कारात कल्पना आणि रचना यांचेही पदर विणले जातात. 
शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण ते करतात: “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे  जीवनासंबंधीच्या  प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.”

शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरणआहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात

इथे कुसुमाग्रजांनी लेखकाची निर्मितिप्रक्रिया सांगितली असून तिचे आलंबन लेखकाचे व्यक्तित्व, संस्कार आणि सामाजिक परिस्थिती हे मानले आहे.

कुसुमाग्रज हे नाटककार होते त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक  सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक ‘मी’च असतात. इतर वाङ्‌मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण  नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वतःच्या  नाटकांची उदाहरणे दिली आहेत.
कुसुमाग्रजांच्या मते, नाट्यप्रगती लेखकाच्या तत्त्वज्ञानात्मक समृद्धीनेच होते. नाटक हे मूलत: वाङ्‌मय असते. नाटकाची परिणती प्रेक्षकांच्या  रसास्वादात होत असली तरी त्याचा उगम नाटकाच्या प्रतिभेत होत असल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचे शुद्ध, अविकृत स्वरूप शोधायला हवे. वाङ्‌मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. नाटक म्हणजे प्रेक्षकाचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक वा तांत्रिक बांधकाम नव्हे. 
नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्‌मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली  वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले.       
संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक अमोल वारसा आहे. संगीतकाराच्या सुप्रमाण, कल्पक व प्रयोगशील योजनेने तो अधिक संपन्न करता येईल. शब्दार्थाचे फारसे साहाय्य न घेता, केवळ स्वररचनेच्या प्रभावाने संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते, असे ते म्हणत.

कुसुमाग्रजांच्या काळात, मर्ढेकरांच्या अनुकरणातून आलेल्या दुर्बोधता, अश्लीलता, लैंगिकता या प्रवृत्ती फोफावल्या होत्या. त्याबद्दलची तीव्र नापसंती ते व्यक्त करतात. काव्य दुर्बोध, कथा विश्लेषणात्मक, कादंबरी लैंगिक, नाटक काव्यशून्य आणि त्रोटक असायला हवे, या आग्रहाच्या मुळाशी, ‘लौकिक आहे त्यापासून दूर जाण्याची आणि अलिप्ततेच्या अंधाऱ्या अरुंद गुहेमध्ये स्वतःला कोंडून घेण्याची’ एक समान प्रवृत्ती आहे, असे ते म्हणतात.

येथे कुसुमाग्रजांनी लेखकांच्या मध्यमवर्गीय, समाजापासून अलिप्त राहण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे. दुर्बोधतेला नकार दिला असून सामाजिकतेचा स्वीकार केला आहे. साहित्यिक स्वतःला दुर्बोधतेच्या, अतिरेकी विश्लेषणाच्या, विकृत आत्मनिष्ठेच्या आणि पढिक पांडित्याच्या कैदखान्यात स्वतःला बांधून ठेवत आहे. जुनी समाजरचना ढासळली आणि नव्याची रूपरेषा नीट ठरली नाही या परिस्थितीमुळे ते असे करीत आहेत. ‘हजारो वर्षे अज्ञानाच्या, जातिभेदाच्या आणि दारिद्र्याच्या खाईत बेशुद्धावस्थेत पडलेला समाज आपले हातपाय हालवू लागला आहे.. नव्या जाणिवांनी, आकांक्षांनी आणि अहंकारांनी निपचित पडलेल्या मनात चैतन्य निर्माण केले आहे’ असे हे जग मध्यमवर्गाच्या पलीकडचे असून; या घडामोडींची वार्ता न ठेवत मध्यमवर्गीय लेखक, ‘कोणत्याही सामाजिक प्रतिक्रिया वैफल्याच्या स्वरूपातच हवी’ असा आग्रह धरतो आहे, ‘तिरसट, कडवट आणि सहानुभूतिशून्य उद्गार तेच उस्फूर्त व प्रामाणिक काव्य’ असे मानतो आहे. आणि कोणी लेखनात प्रागतिक, राष्ट्रीय अथवा  दलितांसंदर्भात सहानुभूती मांडली तर ते प्रचारी, आक्रस्ताळी, कृत्रिम आहे असे मानतो आहे.. यावर कुसुमाग्रजांनी, ‘साहित्यात ही नवी पुरोहितशाही अवतीर्ण होत आहे’ अशी टीका केली आहे.

कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात. त्यांचा साहित्यविचार लौकिकतावादी आहे. जीवनवादी आहे. मानवी संसाराच्या समग्र नकाशात साहित्याचे स्थान असते; तर मानवी जीवनाच्या आराखड्यातच साहित्यशास्त्राचे स्थान असते, असे सांगून कुसुमाग्रजांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध  जोडला आहे. ते म्हणतात, साहित्यिकाची प्रतिभा कितीही आकाशमार्गी असली तरी त्याचे पाय-नव्हे सारे जीवन पृथ्वीवरती टेकलेले असते. लेखकाचे  व्यक्तित्व स्वयंभू आणि स्वतंत्र असत नाही. परिसरातील परिस्थितीचे नानाविध संस्कार त्याच्यावर होत असतात व त्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट रंग प्राप्त होतो. लेखकाच्या अलिप्ततेतून निर्माण होणारे साहित्य आणि साहित्यशास्त्र केव्हाही निरामय आणि विकसनशील असू शकणार नाही. साहित्यविचाराबाबत निर्विकल्पतेचा आव खरा नसतो, असे ते म्हणतात. 
कुसुमाग्रज साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि जातीयतेचा निषेध करतात. त्यांच्या मते, साहित्य आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो.  त्यामुळे साहित्याचा जीवननिरपेक्ष अथवा संस्कृतिनिरपेक्ष असा विचार करता येत नाही. ज्या समाजातील जीवन समृद्ध आणि विशाल आहे तेथेच साहित्याचा निरामय आणि निर्वेध विकास होऊ शकेल. जातिभेदामुळे आमच्या सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक विकासाचाही मार्ग कुंठित केला आहे. “आमच्या लेखकाच्या सभोवार जन्मापासून असलेल्या जातीयतेचा तट इतका अभेद्य असतो की आपल्या जागेवरून समग्र समाजजीवनाचे यथार्थ दर्शन त्याला कधी घेताच यायचे नाही.” (रूपरेषा, पृ.६८) असे ते म्हणतात. 
त्यांच्या मते, श्रेष्ठ लेखनाच्या मागे अप्रत्यक्ष अनुभूती असते; तरी तिचा धागा प्रत्यक्षाशी जुळलेला असल्यामुळेच अप्रत्यक्ष अनुभूती ही अनुभूती होते. त्यासाठी लेखकाजवळ प्रतिभाबळ असावे लागते. ‘मराठी वाङ्‌मयाची उंची आपणा सर्वाना अभिमान  वाटावी अशीच आहे. परंतु आपले साहित्य आणि साहित्यामागे असलेली आपली जीवनदृष्टी प्रगतिशील असल्यामुळे ज्या तळावर आपण आलो आहोत त्यापुढील तळ कोणते हे पाहणे आवश्यक ठरते.’ त्यामुळे आपले साहित्य संपूर्ण आणि समृद्ध होण्यासाठी जातीयतेची बंधने नष्ट होणे आवश्यक आहे.

इथे कुसुमाग्रज, मराठी साहित्य, सकस समृद्ध आणि परपुष्ट नसण्याचे कारण आपली समाजरचना मानतात. आचार्य धर्माधिकारी यांचा दाखला  देऊन कुसुमाग्रज सांगतात, हिंदू समाजात हिंदू कोणीच नाही; जे आहेत ते तेली, वंजारी, मराठा असे आहेत. या सर्व भिंती ओलांडून सर्वत्र संचार  करण्याचे सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत येणे कठीण आहे. त्यामुळे विविध जातींतील लेखक लिहू लागल्यावर वाङ्‌मयाचे क्षितिज खूप रुंदावेल यात शंका नाही. म्हणजे साहित्य समृद्धीसाठी सर्व जातिसमूहांचा समावेश त्यांना महत्त्वाचा वाटतो.

सामाजिकतेलाच कुसुमाग्रज साहित्याचे परतत्त्व मानतात. काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील कवित्वाने आणि रसिकत्वाने सिद्ध होते. त्याला परतत्त्वाचा  स्पर्श झाल्यास अधिक श्रेयस्कर होय. पण परतत्त्वाचा अर्थ सध्याच्या सामाजिक संदर्भात, जे दलित पतित व व्यथित आहेत त्यांच्या हिताहिताची जाणीव ठेवणे होय. ते म्हणतात, जातिभेदाप्रमाणेच दारिद्र्य्, अज्ञान आणि ऐहिकनिष्ठेचा अभाव यांचाही समाजजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. औदासिन्य आणि निवृत्तीची छाया समाजावर शतकानुशतके पडली आहे. सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या नावाखाली आध्यात्मिक धुके पुन्हा लादले जात आहे. या काळोखातून मार्ग काढण्याची प्रतिभा, प्रज्ञा आणि सहानुभूती असलेल्या साहित्यिकाला, कलावंताला साहाय्य करायला हवे. अशाप्रकारे त्यांनी वंचितांच्या साहित्याचे स्वागतच केले आहे.

कुसुमाग्रज बांधिलकीपेक्षा सामिलकीला मानतात. “एखाद्या विचाराशी व अनुभूतीशी बांधलेल्या बांधिलकीपेक्षा, विचारशक्ती आणि अनुभवक्षमता मुक्त ठेवणाऱ्या ‘सामिलकी’चे महत्त्व मला अधिक वाटते. सामिलकीत बांधिलकी समाविष्ट असतेच, पण बांधिलकीची मर्यादा आणि कृपणता तीत असत नाही. बांधिलकी हा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग असतो, तो बाहेरून आणता येत नाही”(रूपरेषा, पृ.१०६)
बांधिलकी ही विचाराच्या बाबतीत खरोखर संभवतच नाही. कारण बांधून घेणे हे जे स्थिर आहे त्याच्याबाबतीत शक्य आहे; पण विचार स्थिर नसून  गतिमान असतात. ‘सामिलकी म्हणजे घटनांच्या प्रवाहात मनाने सामील होणे, आणि संस्कृतीच्या वरच्या बांधकामावर नव्हे तर तिच्या मुळाशी असलेल्या आधारभूत मूल्यांची जाण आणि त्यासाठी आग्रह असणे’ होय. अशाप्रकारे कुसुमाग्रज विचारांच्या प्रवाहीपणाला महत्त्व देतात. 

कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे होय. ही प्रेरणा सौंदर्यात्मक (बालकवी), भावनात्मक (खांडेकर), संशोधनात्मक (गाडगीळ-गोखले), तात्विक (खाडिलकर), पारमार्थिक (संतकाव्य) अशी जशी असू शकते तशी ती क्रांतिकारक असू शकते. त्यांच्या मते,  “सृष्टीतील सौंदर्य खरे तेवढेच सामाजिक जीवनातील प्रक्षोभही खरे आहेत. श्रद्धा प्रेमावर परमेश्वरावर जशी असू शकते तशी ती एखाद्या राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानावर असू शकते” (रूपरेषा, पृ.५३)

कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा  त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाऱ्या शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. द.दि. पुंडे म्हणतात, कुसुमाग्रज, नीतीची उभारणी मध्ययुगीन पापपुण्यादि कल्पनांच्या आधारे न करता  माणुसकीच्या तत्त्वावर, न्यायअन्यायाच्या मूलगामी विचारांवर करतात..(कुसुमाग्रज/ शिरवाडकर: एक शोध, पृ १४)

कुसुमाग्रजांच्या मते, अश्लीलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे. “आधुनिक काळातील परिस्थितीने आणि ज्ञानाने संस्कारित झालेल्या जाणिवा म्हणजेच त्यांच्या पासून सिद्ध होणारा अनुभव, वाङ्‌मयात प्रामाणिकतेने यायचा असेल, आणि तो आल्याशिवाय राहणार नाही, तर श्लीलतेच्या सरहद्दी आपल्याला आणखी व्यापक करण्यावाचून गत्यंतर नाही.” (रूपरेषा, पृ.३६) असे त्यांनी म्हटले आहे. अशा रीतीने कुसुमाग्रजांनी केलेल्या वाङ्‌मयीन चिंतनातून त्यांचा साहित्यविचार शोधता येतो.

त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असे असूनही यश साजरे करतांना ते मागे राहणंच पसंत करत.

कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

मराठी साहित्यात अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रकाशित न झालेल्या साहित्यापैकी बरेच साहित्य दुर्लक्षित असल्याची बाब समोर आली आहे. हे दुर्लक्षित साहित्य नाशिक शहरात असताना ना रसिकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली, ना कुसुमाग्रजांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानला. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यातील सर्व प्रकारांमध्ये विपुल लेखन केले. यात कथा, कविता, नाटक, एकांकिका, बालसाहित्य अशा सर्व प्रकारांचा समावेश आहे.




#Article 19: मंगेश पाडगांवकर (996 words)


मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.  पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.  ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.

त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’  या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.

पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि  हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बॅंक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

१. रिमझिम पावसात जाऊ गं,  
गुण गुण गाणे गाऊ गं, 
थेंब टपोरे आले गं, 
सगळे गोकुळ न्हाले गं, 
थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||

२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान; 
ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान. 
काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;
एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||

३. या मेघांनो आभाळ भरा 
या धरतीवर अभिषेक करा 
विहंगाचे मधुगान हरपले 
या मातीचे श्वास करपले ||
वाहु दे सुखाचा पुन्हा झरा 
सुकून गेल्या वनांवनांवर 
सचिंत झाल्या मनांमनांवर 
करुणेची संतत धार धरा ||

एखाद्या नव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.

साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. 

वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.  

इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.

बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असे नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेकजण गळेपर्यंत.

बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारुन जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली.




#Article 20: नाटक (2178 words)


नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात आलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे,  वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा०. ब्रेथ) बारा तासांपर्यंत (उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्‌महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.

नाट्य हे सर्वकर्मांनुदर्शक आहे. कर्म हे संचित असते आणि त्याचे दर्शन कृती द्वारा होणारे असते . त्याचे अनुसंधान म्हणजे नाट्य म्हणता येईल  .नाट्य हे त्रैलोक्याचे 'भावानुकीर्तन' असते. सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन असते. संपूर्ण विश्वातील सर्व जीवन व्यवहारातील भावांच्या श्रनुकीर्तनातून नाट्य प्रकट होते असे म्हटले की नाट्याची ही व्याप्ती लक्षात येईल .भावकीर्तनात जे जे असेल त्याचा परस्पर अन्वय, संबंध येथे प्रकट असतो असे म्हटले तर? नाट्य हा सर्वभावान्वयापेक्षी वेद आहे. 

संदर्भ:- 
(संपा) आनंद वास्कर,वाङमयप्रकार: संकल्पना व स्वरूप, अन्वय प्रकाशन, पुणे.२००४, पृ.क्र.६७-६८

महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्टाला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे.

मराठीतील नाटकांपेक्षा हिंदीत आणि बंगालीत जास्त नाटके होतात. फरक एवढाच आहे की, एखादे मराठी नाटक दशकानुदशके रंगमंचावर येत राहते, आणि हिंदी नाटकाचे एक-दोन प्रयोग झाले की ते रंगमंचावर येणे बंद होते. 

अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम नाटक :- नाटकासारखे जिवंत माध्यम जेथे असते, तेथे जिवंत माणसे जिवंत माणसांशी संवाद साधत असतात. जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणे, त्यांचे विचार, त्यांना काय वाटते हे लोकांसमोर मांडणे हा एक त्यांतला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप मोठा आनंद असतो. नाटकाचा झालेला कुठलाही प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नवीनच होत असतो, म्हणून नाटकाला  प्रयोग म्हणतात. प्रत्येक वेळी त्याच्यात प्रेक्षकाला काहीतरी नवीन सापडते. आता सापडणे हेच जर तत्त्व मान्य केले तर ते सापडण्यासाठी प्रेक्षकाच्या फुटपट्ट्या काय असाव्यात, हा केवळ त्याचा व्यक्तिगत मुद्दा असतो. त्याला काय आवडते, काय वाटते, त्याच्या स्वतःच्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, संवेदना काय आहेत, त्याला समाजकारण - राजकारणाविषयी काय वाटते, माणूस म्हणून जगत असताना त्याचे अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत, की ज्यामुळे त्याला कोंडीत पकडल्यासारखे वाटते, हे महत्त्वाचे असते. अभिव्यक्त कशातनेही होणे याला मराठीतण माध्यम म्हणतात. म्हणूनच नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.

नाटक आणि प्रयोगानुभव :- 

माणूस जेव्हा एखादे नाटक पहायला जातो, तेव्हा तो अनुभव कसा असतो ?

एकतर त्याने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते, किंवा कोणीतरी त्याला नाटकाविषयी सांगितलेले असते. मग तो नाटक पहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी त्याला नाटक पहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग तो तिकिट काढतो.

प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस नाटकघरात पोचतो. त्याच्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पहायला आलेले असतात. नाटकघराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स, इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे, इत्यादी) देखील नोंदवलेले असते. कधीकधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच माणसाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते. 

त्यानंतर माणूस तिकिट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. तो त्याच्या आसनावर जाऊन बसतो. त्याच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. मग तोपण ह्या प्रेक्षकसमूहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरुन त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या त्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा त्याच्याच समाजातील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिकदेखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे बोलणे असे काही असते की, ज्या जगात ते राहतात त्याची प्रेक्षकाला कल्पना कल्पना येऊ शकते. 

हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकालार नाटकातील व्यक्तिरेखांमधले नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येताहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही व्यक्तिरेखा त्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा त्याला राग येतो. मंचावर जे काही घडते आहे त्यामुळे कधी त्याला गंमत वाटते तर कधी तो गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःचीच चेष्टा करतात, तेव्हा तोपण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने तोही दुःखी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, प्रेक्षक श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्च बिंदुपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते, आणि शेवटी त्याला हायसे वाटते. 

पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात.नाटक बघायला आलेली माणस टाळ्या वाजवतात. लोक हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून काल्पनिका विश्वातून वस्तुनिष्ठ विश्वात प्रवेश करतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही; कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. नाटकाचा हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कधी एका मोठ्या प्रेक्षाघरात हजारो लोकांसोबत हा अनुभव घेता येतो, तर कधी समीपमंच घरात अगदी साठ-सत्तर प्रेक्षकांसोबत हा अनुभव घेता येतो. कधी नाटकातल्या गोष्टीत प्रेक्षक गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे त्याला सभोवतालची जाणीव होते. कधी त्याला स्वतःसारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून त्याच्या भोतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ केवळ अनुभव देतात. असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.

भारतीय रंगभूमीचा इतिहास बराच प्राचीन आहे.

भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता, असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला, आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.

इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.

संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. सन १९१२मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि ऊरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालिदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शूद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारांमध्ये भवभूती (नाटक - उत्तररामचरित), विशाखादत्त (नाटक - मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो. 

भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवीही नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत असत.

मुख्यत्वे मराठी भाषेतील  नाट्यसृष्‍टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

मराठी संगीत नाटकांच्या उत्कर्षकाळात मराठी नाट्यसंगीत या नावाचा एक नवाच गीतप्रकार उदयास आला. मराठी नाट्यसृष्टीची शताब्दी झाली तरी संगीताचा हा प्रकार महाराष्ट्रात अजूनही लोकप्रिय आहे. मराठीत नाट्यसंगीताचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.

ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.

विष्णुदास भावे हे आद्य संगीत नाटककार होते. 

मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील पदे अनेकदा अन्य गायकांकडून गायली जातात.

मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
नाटकांमधील नावीन्य आणि प्रयोग हे प्रायोगिकमध्ये पाहायला मिळतात. प्रायोगिक नाटक काही वेळा सामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. 
प्रायोगिक नाटकात नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा आदींचा वापर अत्यंत कमी असतो. यात नेपथ्य “सूचक’ आणि प्रतिकात्मक असते. संगीत मर्यादित असू शकते किंवा अजिबात नसू शकते. यामध्ये संहिता आणि संहितेचा आशय मांडण्यावर अधिक भर दिलेला असतो; परंतु व्यावसायिक नाटकात या सगळ्याचा वापर आणि भर हा कलाकृती आकर्षक करण्यावर दिलेला असतो. संहिता आणि संहितेचा आशय याचा विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून कलाकृती आकर्षक करण्यावर अधिक असतो. यामध्ये असणाऱ्या स्पर्धा आणि प्रेक्षकांचा विचार केला, तर प्रेक्षक वर्ग दोन्ही ठिकाणी भिन्न किंवा एकसारखा असू शकतो. आर्थिक गणिते मात्र, सर्वस्वी संहिता कोणत्या प्रकारची आहे?, तिचे किती प्रयोग करायचे आहेत?, प्रायोगिक का व्यावसायिक? यावरूनच मांडावी लागतात. विविध रुची संपन्न प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकसंख्या नेहमीच कमी-जास्त होत असतात.

मराठी नाटकांमध्ये गाजलेल्या नाटकांत नटसम्राट हे नाटक खूप चर्चिले जाते. हे नाटक शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणे हे एक आव्हान समजले जाते. फारच थोड्या नटांनी ते स्वीकारले आणि यशस्वीरीत्या पार पाडले. श्रीराम लागू, दत्ता भट, दत्ता मयेकर, मोहन जोशी, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हे त्यांपैकी काही अभिनेते होत. ह्या नाटकावर एक मोठा चित्रपटही झाला. त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारली होती. नटसम्राट नाटकाचे हिंदी रूपांतरही झाले आहे.  त्यात अप्पा बेलवलकरांची भूमिका आलोक चटर्जी करतात. ३० मे २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या या नाट्यप्रयोगानंतरच्या नाट्यप्रसंगाचे वर्णन  वाचता येईल.

नाटक, आणि त्या नाटकात एकाच व्यक्तीची अनेक रूपे सादर करणारे अभिनेते: -

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद.

महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. असे काही नाट्य महोत्सव  --

नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते.  मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --

१९९०च्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांना नोंद घेण्याइतपत प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता. टीव्ही मालिकांच्या सस्त्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटके देऊन प्रेक्षकांना वश करून पाहण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. या बदलांत मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतले नाटकाचे अग्रस्थान घसरत घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे असले तरी एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी नाटकांना परत ऊर्जितावस्था आली. या काळात रंगभूमीवर नवीनच किंवा नव्याने येऊन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेली नाटके अशी :

अतुल पेठे, अनिल दांडेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशुतोष पोतदार, इरफान मुजावर (नंगी आवाजे), किरण यज्ञोपवीत, केदार शिंदे, चैतन्य सरदेशपांडे, तुषार भद्रे (लादेनच्या शोधात), दिलीप जगताप, *धर्मकीर्ती सुमंत ('गेली एकवीस वर्षे', 'पाणी चारु आरो इत्यादी...', ‘नाटक नको’ ), डॉ. निलेश माने, प्रदीप वैद्य, प्राजक्त देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, महेश एलकुंचवार, मिहिर राजदा (मराठी नाटक - Don't Worry Be Happy), युगंधर देशपांडे (दीर्घांक- अगदीच शून्य प्रयोग), राजकुमार तांगडे (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला),  राजन देऊसकर,  राजीव मुळे (बैल-अ-बोलबाला), विद्यासागर अध्यापक (दर्द-ए-डिस्को), संतोष गुर्जर, सौरभ पाटील, प्रा. हिमांशु स्मार्त (ढेकर आख्यान, परफेक्ट मिसमॅच)

(अपूर्ण यादी)

मराठी नाटक आणि मनोविकृती:-

मराठी नाटक आणि मनोविकृती या आगळ्यावेगळ्या विषयावरती चर्चा करण्याचे कारण असे की मराठी नाटकांचा मनोविकृतीच्या अंगाने अद्यापपर्यंत फारसा अभ्यास झालेला नाही. मराठी साहित्यातील अशाप्रकारचे प्रयत्न फारच कमी आहेत. ज्या मराठी नाटकांमध्ये म्हणून विकृतीचे चित्रण आहे अशा काही प्रातिनिधिक नाटकांची निवड करून त्यांच्यावर मनोविकृतीतज्ञ ,मानसशास्त्रज्ञ ,नाटककार ,दिग्दर्शक कलावंत ,समीक्षक आणि प्रेक्षकांची खुली चर्चा व्हावी ही काळाची गरज आहे.  या नाटकांकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहताना त्यातील विकृती जडलेल्या पात्रांच्या अभ्यासाबरोबरच नाट्यलेखनाच्या प्रेरणा ,लेखकाची शैली ,कलाकृतींचे बाह्य आणि अंतर्गत स्वरूप याविषयी चर्चा होऊन त्यायोगे नाटकांकडे पाहण्याची आणि नाट्यानुभव घेण्याची समज प्रगल्भ व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात. 

बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :

नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे.  प्रसिद्ध स्त्री नाटककारांची संख्या मात्र साठाहून अधिक नसावी.  नाट्यलेखन करणाऱ्या काही लेखिका : 

यांशिवाय काही नवोदित लेखिकाही आहेत.

स्वतंत्र पानावर पहावे.

सरकारने, विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्‍न केलेली काही नाटके : 

कोणत्याही नाटकाचा प्रयोग करावयाचा असेल तर त्या नाटकाच्या संहितेच्या दोन प्रती. महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाला सादर कराव्या लागतात. या सेन्सॉर बोर्डाचे दोन प्रतिनिधी ही संहिता वाचून त्याविषयीचा अभिप्राय बनवतात. मंडळाच्या अध्यक्षांची सही झाल्यावर एक प्रमाणपत्र आणि डीआर‍एम क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र किंवा हा क्रमांक नसेल तर नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर करता येत नाही. 

मात्र, महाराष्ट्र नाट्य-परिनिरीक्षण मंडळाची स्थापना १९९०मध्ये झाली असल्याने,. जर नाटक इ.स. १९९० पूर्वीचे असेल तर त्याचे परिनिरीक्षण करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही.  ते नाटक डीआर‍एम क्रमांकाशिवाय सादर करता येते.

एकाच नाटकात किंवा एकाच एकपात्रीत अभिनेते एकाहून अधिक भूमिका करत आले आहेत, अशी काही नाटके, व त्यांतील अभिनेत्याचे नाव : 

पटेल/ लुमुम्बा/बॉबी मॉड/कृष्णराव हेरंबकर, दिलीप प्रभावळकर)

पहा : महाराष्ट्रातील नाट्य संस्था, नाट्यस्पर्धा,  एकपात्री नाटक, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन




#Article 21: संस्‍कृत भाषा (136 words)


संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, बौद्ध,आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात.  संस्कृतमधूनच  उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले(????) व  इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. 

कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. 
 
कवी कालिदास  या कवीची मेघदूत खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् ऋतुसंहार ही काव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.




#Article 22: धुंडिराज गोविंद फाळके (419 words)


धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, मृत्यू : नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली. 

भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.

दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते. 

इ.स. १८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९० साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.

त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे लाईफ ऑफ ख्रिस्त (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या  व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.

सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.

रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.

सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला. 

सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते. 

सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.

मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.




#Article 23: मुंबई (3792 words)


मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ [//upload.wikimedia.org/wikipedia/mr/f/fe/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88.ogg उच्चार ऐका]) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने ५०% मालवाहतूक होते.

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याची राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

 ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणारी मूळ कोळी लोक जमातींचे येथे वास्तव्य होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. मुंबई बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यापूर्वी १६६१ मध्ये इंग्लंडच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिचा हुंडा म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे दिली. १८ व्या शतकाच्या मध्यभागी हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले. शेवटी समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुन:प्राप्ती झाली व मुंबई ह एकच बेट झाले. माहीम काॅजवेमुळे वरळी वांद्रेला जोडले गेले, कुलाबा काॅजवेमुळे कुलाबा व छोटा कुलाबा मुख्य भूमीशी संलग्न झाले, हाॅर्नबी व्हेलार्डमुळे वरळी मलबार हिलशी जोडले गेले. 

रिझर्व्ह बॅंक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे बॉलीवूडचे व मराठी सिनेउद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे.  पोर्तुगीजांच्या बोम बाहीयाचे इंग्रजांनी बॉंबे केले. मुंबई, बम्बई आणि बॉंबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला हिला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.

मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.

मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्या अगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची आहे असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला  कोळीवाडा  असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत. 

जसे माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ.

आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.

मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.

१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard) च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.

पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.

१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.

१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.

दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.

   
मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साल्सेट बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.

मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. मुंबई जिल्ह्याला आयलंड सिटी किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.

मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो  आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.

या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.

याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला, जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत.

एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला 

जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला

जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला

एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्टेशन नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला 

एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला

एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला

एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट

एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला,  दातार कॉलनी नाला,  टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला 

एच/पूर्व- ओएनजीसी,  गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी

एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला.

के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला

के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला 

पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला

पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला

आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली

आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली

आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला,  केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे.  

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बॅंक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बॅंका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.

१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.

मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.

मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो.

मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात.

मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.

मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलिस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.

मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.

मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरु आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत:
१) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे).
२) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर).
३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग.
४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर).

मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.

मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.    

मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर.

२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले.

भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारतातील इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारतातील पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.

मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई  येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते.

बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व
घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल्.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.

मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.

मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.

विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.

१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता.

२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %), शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत. भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत.

मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरास्ट्रॅिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.

मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.
तसेच झणझणीत नादखुळा कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव,गरमागरम कांदा भजी,शुद्ध देशी गीर गाईच्या दुधापासुन बनवलेल्या साजुक तुपात तळलेली गरमागरम जिलेबी आणि शुद्ध जेमिनी रिफाईण्ड तेलात तळलेला अस्सल अहमदाबादी चवीचा फाफडा हे काही पदार्थ सुद्धा मिटक्या मारत खाल्ले जातात.

मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.

न्यूयॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.

मुंबईत एक खास हिंदीची बोली बोलली जाते, तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. त्यांतही सामान्य माणासांची बम्बय्या हिंदी आणि गुंडांची हिंदी/भाईलोकांची हिंदी यांसारखे काही भेद आहेत:-

मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारतातील इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात.

दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत.

मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई / आयसीएस्‌ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते. भारतातील १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे.

क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचे आहेत.

फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषत: हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात.

वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर.




#Article 24: कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद (612 words)


The expression limitations and exceptions to copyright refers to situations in which the exclusive rights granted to authors, or their assignees under copyright law do not apply.

Some critics prefer to regard limitations and exceptions as user rights; that is, rather than cutting down or modifying some idealized form of copyright, user rights provide an essential balance to the rights of copyright owners. There is no consensus amongst copyright experts on this point; see for example the National Research Council's . The concept of user rights has also been recognized by courts, including the Canadian Supreme Court in  (2004 SCC 13), which classed fair dealing as such a user right. These kinds of disagreements in philosophy are quite common in the philosophy of copyright, where debates about jurisprudential reasoning tend to act as proxies for more substantial disagreements about good policy.

Two important examples of limitations and exceptions to copyright are the fair use doctrine found in the United States, and the fair dealing doctrine found in many other common law countries. Other more fundamental boundaries of copyright are caused by thresholds of originality, a threshold below which objects cease to be copyrightable, the idea-expression dichotomy, the public domain and the effect of Crown copyright. Even copyright maximalists might interpret these as defining copyright, rather than being limitations or exceptions to it. In addition copyright can only protect the artist's expression of his/her work and not the ideas, systems, or factual information conveyed in it. Likewise, the US court systems have determined that stock characters are also uncopyrightable.

While fair use in the United States is popularly understood as the only limitation to an author's exclusive rights, it is only one of several important limitations. Section 106 of the U.S. copyright law, which defines , is subject to , which limit the copyright holder's exclusive rights.

In the USA, the United Kingdom, and several other countries, it is legal to produce alternate versions (for example, in large print or braille) of a copyrighted work to provide improved access to a work for blind and visually impaired persons without permission from the copyright holder. (See references at Copyright.)

The scope of copyright limitations and exceptions became a subject of significant controversy within various nations in the late 1990s and early 2000s, largely due to the impact of digital technology, the changes in national copyright legislations for compliance with TRIPS, and the enactment of anti-circumvention rules in response to the WIPO Copyright Treaty. Defenders of copyright exemptions fear that digital rights management technology, which they sometimes call digital restrictions management, will massively reduce the scope of important exceptions. Their opponents believe that if existing exemptions are allowed to continue, they will necessarily allow huge amounts of private copying or large-scale copyright infringement — if consumers can make a copy of a CD for their car, they can give MP3 files to everyone. The development of permissive DRM, such as that formerly employed by iTunes, has not ended these debates.

Limitations and exceptions are also the subject of significant regulation by international treaties. These treaties have harmonized the exclusive rights which must be provided by copyright laws, and the Berne three-step test operates to constrain the kinds of copyright exceptions and limitations which individual nations can enact.  On the other hand, international copyright treaties place almost no requirements on national governments to provide exemptions from exclusive rights; a notable exception to this is Article 10(1) of the Berne Convention, which guarantees a limited right to make quotations from copyrighted works.

The convention also allows exceptions for educational reasons under article 10 - although the extent of this exemption has been interpreted differently in different countries.




#Article 25: वल्लभभाई पटेल (420 words)


वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ ओक्टोबर १८७५; मृत्यू : १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक  राजकीय व सामाजिक नेते होते. 

वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी  ‘सरदार’ ही उपाधी दिली.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील  बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील  बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले.   भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.    

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी  झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई  खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई  - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. ते१८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई.  गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. 
वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.

जुनी सांगवी (पुणे) येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन भरवते. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आठवे एकात्मता संमेलन होणार आहे.




#Article 26: मराठी साहित्य (236 words)


हसवा फसवी 11 std नाटक साहित्यप्रकार परिचय

कादंबरी

कथा

कविता

ललित लेख
(कविता )

नाटक

लोक साहित्य

बाल साहित्य

कथा

विनोद

अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा

चारोळी

गझल

ओवी

अभंग

भजन

कीर्तन

पोवाडा

लावणी

भारूड

बखर

पोथी

आरती

लोकगीत

गोंधळ

उखाणे

पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली.  शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे.  ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.

भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे.
त्या यादीतील काही नावे :-

स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :- 




#Article 27: युनिकोड (620 words)


युनिकोड (रोमन लिपी: Unicode ;) हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत होत असलेला असा एक कॅरॅक्टर सेट (कॅरॅक्टर एनकोडिंग) आहे.

'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे कोठल्याही 'कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे'.

येथे (२१,२२,२३,२४,२५) ह्या आकड्यांच्या समूहाचे ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ह्या पाच अक्षरांच्या समूहाशी आपण जे नाते ठरवले त्यास एक कॅरॅक्टर संच म्हटले जाते.

हेच उदाहरण पुढे वाढवल्यास मराठीतील १२ स्वर आणि ३६ व्यंजन अक्षरे ही एकूण ४८ आकड्यांनी ओळखता येतील. असे केल्यास हा नवीन कॅरॅक्टर संच एकूण ४८ अक्षरांना आकड्यांचे स्वरूप देईल.

असे करण्याचे एकच कारण आहे व ते म्हणजे संगणकास कोणत्याही भाषेचे ज्ञान नसते. संगणकावर साठवलेली सर्व माहिती ही केवळ आकड्यांच्या स्वरूपात साठवलेली असते. त्याचप्रमाणे संगणकास समजणारी सर्व आज्ञावली हीदेखील आकड्यांच्याच स्वरूपात साठवली जाते.

उदा. cat हा शब्द आस्कीमध्ये ९९ ९७ ११६ ह्या तीन आकड्यांत साठवला जातो; तर Cat हा शब्द ६७ ९७ ११६ असा साठवला जातो. 'Windows 95' हा मजकूर '८७ १०५ ११० १०० १११ ११९ ११५ ३२ ५७ ५३' असा होईल व संगणकात साठवला जाईल. आस्कीप्रमाणे इतर अनेक कॅरॅक्टर सेट्‌स प्रचलित असून बहुतांश देशांमध्ये त्या देशाच्या भाषेप्रमाणे कोणतातरी एक कॅरॅक्टर संच प्रमाण मानला जातो. भारतीय भाषांकरिता प्रमाण कॅरॅक्टर सेट इस्की (इस्की) हा आहे. (हा भारतीय सरकारद्वारे साधारणतः १९८० च्या दशकात विकसित करण्यात आला)

असाच एक कॅरॅक्टर सेट म्हणजे युनिकोड.

आस्की किंवा इस्की यांसारखे कॅरॅक्टर सेट फक्त ठरावीक भाषेसाठी ठरवण्यात आले आहेत. भारतीय भाषांसाठी जरी 'इस्की' संच असला तरी तो 'आस्की'चेच रुप आहे. कारण 'आस्की'ला फक्त इंग्रजीलाच बरोबर घेऊन पुढे जायचे होते, तर 'इस्की'ला देवनागरीसह इंग्रजीला घेऊन पुढे जायचे होते. जगातील सर्व भाषांचा संगणकावर वापर करता यावा व सर्व भाषा एकाच कॅरॅक्टर सेटमध्ये वापरता याव्यात यासाठी युनिकोडची निर्मिती करण्यात आली.

(The  range for Devanāgarī is U+0900 .. U+097F.)

राखाडी रंगाचा ठोकळा अक्षरांसाठी सध्या रिकामी ठेवलेली घरे दाखवतो.
जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर  संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)

जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर  संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)

जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर  संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)

टंक म्हणजे font. देवनागरी लिपीसाठी हजारो टंक उपलब्ध आहेत.
खालील दुव्यांवरून ते मिळवता येतील.

काही अक्षरे ही दोन युनिकोड जोडून तयार करावी लागतात, परंतु काही अक्षरांना स्वतःचा युनिकोड असतो, तरीही बऱ्याचदा ही अक्षरे चुकीची लिहिली जातात. जसे की ॲ च्या जागी ऍ (ही चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे ).(ही चूक कशी? ऍ  हे अक्षर मराठीत नाही, अ‍ॅ (‘अ’ वर चंद्र) हे आहे. 

क + ् + ष = क्ष 

ज + ् + ञ = ज्ञ 

ऱ +् + य = ऱ्य 

(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. ऱ्य च्या जागी र्‍य ). .)

ऱ +् + ह = ऱ्ह 

(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. ऱ्ह च्या जागी र्‍ह ). .)

क + ् + र = क्र

प + ् + र = प्र

क + ् + क + ् + य = क्क्य  

त + ् + र = त्र 

र +् + क = र्क 

र + ् + व = र्व

ब + ृ = बृ 

व्यंजनाला पायाशी लावलेले हलन्त(पाय मोडायचे) चिन्ह त्या व्यंजनाचा निभृत(स्वरहीन) उच्चार करावा असे सूचित करते. अशा हलन्त व्यंजनापाठोपाठ दुसरे व्यंजन आले की जोडाक्षर बनते.जोडाक्षर झाल्यामुळे पहिले हलन्त व्यंजन तसे रहात नाही. पण कधीकधी हे पायमोडके अक्षर दिसावे अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर विलगक’(ZWNJ-Zero Width Non-joiner) वापरून एका पायमोडक्या व्यंजनाशेजारी दुसरे व्यंजन टंकित करता येते. हे साध्य करण्यासाठी युनिकोडने U+200C या संकेताक्षराची योजना केली आहे. 

उदा० 

या उलट कधीकधी दोन्ही व्यंजने आडव्या बांधणीने जोडली जावी अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर सांधक’((ZWJ-Zero Width Joiner) लागतो. युनिकोडने त्यासाठी U+200D या कोडची योजना केली आहे. (कधीकधी अक्षरे उभ्या जोडणीने जोडली जावी अशीही आमची इच्छा असते, त्यासाठी युनिकोडने काय सोय केली आहे?)

जर अक्षर-सांधक किंवा विलगक वापरला नाही तर, 
 

  

आणि, 




#Article 28: धर्म (714 words)


 

(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : , वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो.

महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.'

धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. Basic Instinct हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्द आहे. .तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. रिलिजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. सर्व धर्म समान असतात ही एक खुळचट समजूत आहे.

वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल.  धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे.

धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरुन आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -

उदा  १ - पाणी व या वस्तूचा अंगभूत गुण - शीतलता

उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता

उदा ३ - अग्नि या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता

उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता

उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)

उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले, असे जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे)

उदा ३ - गाय-वासरू -  वात्सल्य

उदा ४ - गरुड - आकाशात विहार करणे

उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे

उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्‍न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्‍स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय. 

उदा २ -  पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.

उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म

उदा ४- मित्र - मित्र-धर्म

उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म

वरील उदाहरणे मनुष्याशी निगडिडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये आहे यावर त्याचा धर्म ठरतो. उदाहरणादाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवीला एक शासक म्हणून राजधर्म पाळायचा होता व त्याचवेळी भल्लालची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडून राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते, ते तिने योग्यरीत्या ठवायला हवे होते. कोणत्या ही पूर्वग्रहाशिवाय तिने एक शासक या नात्याने, बाहुबली व त्याची पत्‍नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितील धर्म होय. 

धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही.. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.




#Article 29: वेद (937 words)


जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते. वेद बंगल्यावर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदांमधील काही सुप्त हे स्त्रियांनी रचलेल्या आहेत वैदिक मारण्याची भाषा संस्कृत ही होती वैदिक लागणे अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विविध म्हणजे जाणणे त्यापासून वेध ही संज्ञा तयार झाली त्याचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पटना च्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे म्हणतात पुरुषांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुप्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधी मध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये केलेले आहे त्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे स्पष्टीकरण अशी या समितीची रचना आहे तर साम वेदामध्ये यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यामुळेच संहितेमध्ये केलेला आहे भारतीय संहितेच्या निर्मितीमध्ये सामवेद याचा मोठा वाटा आहे तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले अथर्व वेदांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुःखांवर कशा पद्धतीने उपाय करायचे हे त्यामध्ये सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या  नंतर ब्राह्मणग्रंथ उपनिषदे याची रचना केली गेली त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत तर आरण्यक यहे अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेली चिंतन अरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञ विधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते तर उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय जन्म-मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वांग्मय हे महत्त्वाचे साधन आहे

वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे.  वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद असे नाव मिळाले आहे. सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला ब्रह्म असेही म्हणतात. जो ग्रंथ इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला वेद असे म्हणावे.

वेद असे निर्माण झाले याविषयी अनेक मते आढळून येतात.परमात्मा किंवा ईश्वर या म्हाभूताचे नि:श्वास म्हणजे वेद होत असे बृहदआरण्यक उपनिषदात सांगितले आहे.वेद हे शब्दस्वरूप असल्याने ते आकाशातून उत्पन्न झाले असेही एक मत आहे.वेद आपला धर्म आहे...

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे.

ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते. काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा. लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रंथ लिहून  वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे. वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे.
डॉ.भांडारकर ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर अविनाशचंद्र दास  यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका मागे जातो.

व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली.हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते. वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये यासाठी प्राचीन ऋषींनी अनेक कॢप्त्या योजल्या आहेत.
हे वेदमंत्र सस्वर असे टिकावेत यासाठी आणखी एक युक्ती प्राचीन आर्यांनी योजिली आणि ती म्हणजे वेदांच्या विकृती तयार करणे ही होय...

वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरूण, उषा,मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था, लोकजीवन, संस्कृती, आश्रम व्यवस्था, शिक्षण पद्धती ,राष्ट्र दर्शन ,तत्त्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळते.

खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील ऋचांचा चा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे सांगितले जाते. गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे.

वेदांशी निगडित असे -

हिंदू धर्माचे अनेक विश्लेषक असा दावा करतात की हिंदू धर्म सर्व समकालीन धर्मांचे घटक स्वीकारतो आणि हिंदू धर्मातील वैदिक पुराणांसह अनेक धर्मग्रंथांमध्ये बौद्ध, जैन आणि शीख धर्माचे घटक आहेत आणि ग्रीक आणि झोरोस्ट्रियन धर्मातील महत्त्वपूर्ण घटकांनी दत्तक घेतलेले आहे. अवेस्ताः आहूरा ते असुर, देयब ते देवा, अहुरा ते मजदा ते एकेश्वरवाद, वरुण, विष्णू व गरुड, अग्निपूजा, सोम ते होम असे सोम, स्वर्ग ते सुधा, यासना ते योजना किंवा भजन, नरियसंघ ते नरसंघ (ज्याचे बरेच लोक म्हणतात) इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचे भविष्यवाणी), इंद्र ते इंद्र पर्यंत, गंडरेवापासून गंधर्व, वज्र, वायु, मंत्र, याम, आहुती, हुमाता ते सुमती इ.




#Article 30: ऋग्वेद (576 words)


ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद
ब्रह्मदेवाने लिहिला आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.

ऋग्वेद संस्कृत वाङ्‌मयातील पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० मंडले व १०२८ सूक्ते आहेत. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास 'ऋचा'  म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल इ.स.पू. ६००० पूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली. 

ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांचे लोक आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो.

पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सु्रू झाली.

ऋग्वेद हा स्तुतिपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातल्या पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे. श्रीसूक्त हे देवीच्या वर्णनपर असलेले प्रसिद्ध सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे.

ऋच्‌ धातूचा अर्थ पूजा करणे असा आहे. यावरून ऋचा या शब्दाचा अर्थ स्तुतिपर कविता असा होतो. वेद शब्दामध्ये विद् असा धातू आहे, त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. अशा १०|२० ऋचांचे एक पद म्हणजे एक सूक्त. अशा १०|२० सूक्तांचे एक अनुवाक्‌ व अनेक अनुवाकांचे एक मंडल. अशी दहा मंडले ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदातील मंत्र हे अतिशक्करी, अनुष्टुभ, गायत्री, जगती, द्विपदाविराज, पंक्ति, अशा विविध छंदांत रचलेले आहेत.

देवता- ऋग्वेदात  अग्नी, अश्विनीकुमार, इंद्र, उषा, द्यावापृथिवी, मरुत, मित्रावरुण, पूषा, ब्रह्मणस्पती, वरुण, सूर्य, अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते.

देवता सूक्ते, संवाद सूक्ते, लौकिक सूक्ते, ध्रुवपद सूक्ते, आप्री सूक्ते असे सूक्तांचे विविध प्रकार ऋग्वेदात आढळतात.

ऋग्वेद संहितेच्या २१  शाखा असल्याचा उल्लेख पतञ्जलीने आपल्या व्याकरण महाभाष्यात केला आहे. तथापि आज शाकल ही एकमेव शाखा उपलब्ध आहे. ऋग्वेदाच्या आश्वलायन, बाष्कल, मांडूकेय, शाकल व शांखायन अशा पांच प्रमुख शाखा होत्या परंतु त्या लुप्त होऊन आता शाकल ही एकच शाखा शिल्लक आहे.
ऋग्वेदात एकूण १०२८ सूक्ते आहेत. पहिल्या व दहाव्या मंडलात समानच म्हणजे १९१ सूक्ते आहेत. 
ऋग्वेदात एकूण अक्षरांची संख्या ४३२००० आहे.

मृत्यूनंतरच्या जीवनासंबधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात देवता अंतरिक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे म्हटले आहे.
 
१) सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो; पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो. 
२) सृष्टीच्या उत्पत्तीचे सूक्तही ऋग्वेदात आहे. हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कोणा उत्पादकाकडून निर्माण झाले असावे. तो उत्पादक म्हणजे पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ किंवा प्रजापती या नावाने ओळखला जातो. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात म्हटले आहे की, देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवापासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे. हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्याने सृष्टी निर्माण केली, असेही काही ठिकाणी म्हटले आहे. काही ठिकाणी पाणी हे सृष्टीचे बीज आहे असे म्हटले आहे. 
३) पापी, दुष्ट लोकांना परलोकांत स्थान नाही. यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दुःखमय अशा निवासस्थानी आणतो. अशा या निवासस्थानी अधार्मिक, यज्ञ न करणारे, असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात. 
४) पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे. 
५) ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे ५६ वेळेस आला आहे. नैतिक कायदे व आचार असा काहीसा अर्थ काही ठिकाणी आहे. 

ऋग्वेदकालीन मूर्तिपूजेविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. मॅक्समुल्लर, विल्सन, मॅकडोनाल्ड यांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती. भारतीय विचारवंतांतील  वेंकटेश्वर दास व वृंदावन भट्टाचार्य हे वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित असावी, असे म्हणतात. वेदांमध्ये देवांच्या मानवी रूपाचे वर्णन आढळत असले, तरी वेदांत त्यांच्या मूर्तिपूजा ध्वनित करणारी वचने मुळीच सापडत नाहीत. ऋग्वेदातील रचना आणि शब्द द्विअर्थी आहेत.

           




#Article 31: मनाचे श्लोक (105 words)


मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व  सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात. 
  

'या पद्यात  श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे.  प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.

शाहतुराब हे सूफी धर्म प्रचारक होते. ते स्वतःस हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब हे सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले. 
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला.




#Article 32: श्वास (चित्रपट) (110 words)


श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील 'केईएम' या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वास ला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल असे याचे मुख्य कथानक आहे.

आजोबा व नातू यांच्या मधील नाट्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट वेगळीच छाप सोडतो




#Article 33: इतिहास (428 words)


इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.

धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णु पुराण टीका}

अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात

हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.

इतिहास हा सोप्या भाषेत सांगायचं म्हणाल तर मागील काळात घडले एक आठवण . इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो किंवा झलेल्या घटना आंपण जरी पहिली नसली तरी  इतिहासामुळे ती आपल्याला कळते . उदा. : छत्रपती शिवाजी महाराजचा  इतिहास  हा खूप मोठा आणि सामर्थ्यचा आहे .  या  इतिहासामुळे च तर कळ की महाराज कोण होते किंवा महाराजांनी या महारष्ट्रासाठी काय केल मराठी माणसांसाठी काय केलं . त्यानी त्याचं संपूर्ण आयुष्य या महारष्ट्राचा लोकांसाठी आणि या मातीसाठी दिलं . महाराज होते म्हणून आज इथे आज आहोत . आशा करतो कि तुम्हला इतिहास हा सोप्या भाषेत  समजला असेल . 




#Article 34: भौतिकशास्त्र (509 words)


भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे.  यामध्ये पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत-चुंबकशास्त्र, अणुभौतिकी, कणशास्त्र, ऊर्जाशास्त्र, अंतराळ विज्ञान, वातावरणशास्त्र या व अशा इतर उपशाखांचा समावेश होतो. ढोबळमानाने, हे नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव शोधणारे शास्त्र आहे असे म्हणता येईल. यासाठी प्रामुख्याने पदार्थावरील (यात पदार्थाचे अविभाज्य घटक असणारे अणु-रेणु व मूलकण देखील समाविष्ट आहेत) बल व कार्य यांचा अभ्यास केला जातो.  तसेच त्यामुळे होणारी हालचाल, मिळणारी ऊर्जा व गती, तसेच या सर्वांचा आजुबाजुच्या परिस्थितीशी असणारा संबंध देखील अभ्यासला जातो.   

पुरातन असणारी ही ज्ञानशाखा खगोलशास्त्राच्या त्यातील समावेशामुळे कदाचित सर्वात प्राचीन ठरते. भौतिकशास्त्राचे मानवी प्रगती (विशेषतः गेल्या दोन शतकांमधील) वृद्धिंगत करण्यामागील योगदान वादातीत व एकमेवाद्वितीय आहे. भौतिकशास्त्र हा एक विज्ञानाचा प्रकार आहे.  
सुमारे दोन सहस्र वर्षे भौतिकशास्त्र हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित अशा इतर शास्त्रशाखांच्या बरोबरीने तत्त्वज्ञानाचा भाग समजले जात असे. परंतु सोळाव्या शतकात प्रारंभ झालेल्या वैज्ञानिक क्रांतीमुळे या सर्व शाखांना समर्पकपणे त्यांच्या हक्काचे स्वतंत्र अस्तित्व मिळाले. भौतिकशास्त्र तरीही इतर शास्त्रशाखांच्या कक्षांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारित करते, उदाहरणार्थ जीवभौतिकशास्त्र (इंग्रजी: biophysics) किंवा पुंजरसायनशास्त्र (इंग्रजी: quantum chemistry). अशा आंतरशाखीय संशोधनक्षेत्रांमुळे सर्वच शास्त्रशाखांच्या कक्षा आता ठळक न राहता विरळ झाल्या आहेत. भौतिकशास्त्रातील नवीन संकल्पना बरेचदा इतर शास्त्रशाखांमधील मूलभूत तत्त्वे समजण्यास मदत करतात.
मूलभूत संकल्पनांवर आधारित असणार्‍या नवीन तंत्रशाखा वाढवण्यास भौतिकशास्त्राचे मोठे योगदान आहे. विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासातूनच पुढे दूरचित्रवाणी, घरगुती वापराची विद्युत उपकरणे, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) या तंत्रशाखा विकसित झाल्या व मानवी जीवन अक्षरशः नाट्यमयरीत्या उजळून निघाले. उष्मागतिकी प्रगत होण्याने औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला. यामिकी व गतिशास्त्र (इंग्रजी: mechanics and dynamics) यातील प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्‍नांमुळे उपयोजित गणित व कलन  यांचा विकास प्रेरित झाला.  

नैसर्गिक घटना, त्यांच्या मागचा कार्यकारणभाव, त्यांचे परिणाम यांच्या अभ्यासाच्या पद्धती तत्त्वज्ञानातून विकसित झाल्या. पुढे विविध प्रागतिक टप्प्यांवर या अभ्यासाला नैसर्गिक-तत्त्वज्ञान व नंतर नैसर्गिक-शास्त्र अशी नावे मिळाली. अंतिमतः सध्या आपण त्याला भौतिकशास्त्र या नावाने ओळखतो. हाच इतिहास पुढील काही परिच्छेदांमध्ये वर्णन केला आहे. 
नैसर्गिक-तत्त्वज्ञान याची पाळेमुळे पुरातन ग्रीक कालखंडात (ख्रिस्तपूर्व ६५०-४८० वर्षे) शोधता येतात. सॉक्रेटीस-पूर्व काळात थेल्स याने नैसर्गिक घटना घडण्यामागे काही अतिभौतिक, धार्मिक अथवा दैवी शक्तींचा हात असतो हे नाकारून त्यामागे केवळ नैसर्गिक कारणच असते असे प्ततिपादन केले. काळजीपूर्वक मांडलेले विचार व प्रयोगांच्या परिणामांचे केलेले निरीक्षण यांमुळे संकल्पना सिद्ध करता येतात हेही त्याच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी दाखवून दिले. आधुनिक काळात अणु व रेणुंचे अस्तित्त्व सिद्ध करता आल्याने मुलभूत, अविभाज्य कणांनी सर्व पदार्थ बनलेले असतात हा प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींमधील विचारवंतांनी मांडलेला सिद्धांत पडताळून पहाता आला. 

नैसर्गिक-विज्ञान हे ख्रिस्तपूर्व सुमारे ४थे ते १०वे शतक या काळात भारत, चीन व अरब प्रदेशात विकसित झाले.  विविध मोजमापांचे गणन करण्याची पद्धती याच काळात प्रयोगकर्त्यांमधे रुजली. घटनांची निरीक्षणे करणे, वैचारिक प्रयोग करून बघणे अशा पद्धती वापरून युरोपमध्ये आर्किमिडीज तसेच मध्यपूर्वेत अल्बेरूनी यांनी स्थितिशास्त्र (इंग्रजी: statics) किंवा स्थैतिकी, यामिकी , द्रव-स्थितिशास्त्र (इंग्रजी: hydrostatics) याचा पाया रचला.
 

मध्ययुगीन युरोपमध्ये पूर्वार्धात केपलर आणि गॅलिलिओ व उत्तरार्धात प्रामुख्याने न्यूटन यांनी प्रायोगिक व मोजणी पद्धती वापरून विविध नियम मांडले जे आज भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र यातील मुलभूत नियम मानले जातात. यातूनच अभिजात यामिकी (इंग्रजी: Classical mechanics) ही भौतिकशास्त्राची प्रमुख शाखा म्हणुन स्थापित झाली.  

आधुनिक भौतिकशास्त्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला येऊन लोकप्रिय झाले ते प्रामुख्याने  अल्बर्ट आइनस्टाइन यांनी केलेल्या सापेक्षता  व पुंजवाद (इंग्रजी: quantum theory) या क्षेत्रांतील असाधारण कामगिरीमुळे विश्वनिर्मिती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत झाली.E=mc^२ या सूत्रावरून त्यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला.




#Article 35: खगोलशास्त्र (1183 words)


खगोलशास्त्र ( ग्रीक  : ἀστρονομία ) एक नैसर्गिक विज्ञान आहे ज्याने आकाशीय वस्तू आणि घटनांचाअभ्यास केला आहे . हे गणित , भौतिकशास्त्रआणि रसायनशास्त्र वापरुन त्यांचे मूळ व उत्क्रांतीप्रयत्न करतात . आवडीच्या वस्तूंमध्ये ग्रह , चंद्र , तारे , निहारिका , आकाशगंगे आणि धूमकेतूंचा समावेश आहे . संबद्ध घटनेत सुपरनोवा स्फोट, गामा रे स्फोट , क्वासर ,ब्लेझर , पल्सर आणि कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी विकिरण . सामान्यत: खगोलशास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेरउद्भवणार्‍या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो . कॉसमोलॉजी ही खगोलशास्त्राची एक शाखा आहे,  संपूर्ण विश्वाचा अभ्यास करते .

खगोलशास्त्र सर्वात प्राचीन विज्ञानांपैकी एक आहे; रेकॉर्ड इतिहासाच्या सुरुवातीच्या सभ्यतांनी रात्रीच्या आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण केले . यामध्ये बॅबिलोनी , ग्रीक , भारतीय , इजिप्शियन , न्युबियन्स , इराणी , चिनी , माया आणि अमेरिकेतील अनेक प्राचीन देशी लोकांचा समावेश आहे . पूर्वी, खगोलशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र , खगोलीय नॅव्हिगेशन , वेधशाळा खगोलशास्त्र आणि कॅलेंडर तयार करण्याइतकी विविध विभागांचा समावेश होता . आजकाल व्यावसायिक खगोलशास्त्र हे बर्‍याचदा अस्ट्रोफिजिक्ससारखेच म्हटले जाते . व्यावसायिक खगोलशास्त्र निरीक्षणासंबंधी आणि सैद्धांतिक शाखांमध्ये विभागले गेले आहे . पर्यवेक्षण खगोलशास्त्र खगोलशास्त्रीय वस्तूंच्या निरीक्षणावरील डेटा मिळविण्यावर केंद्रित आहे; भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्वे वापरून या माहितीचे विश्लेषण केले जाते. सैद्धांतिक खगोलशास्त्र खगोलशास्त्रीय वस्तू आणि घटनेचे वर्णन करण्यासाठी संगणक किंवा विश्लेषणात्मक मॉडेल्सच्या विकासाकडे केंद्रित आहे; या दोन्ही शाखा एकमेकांना पूरक आहेत. सैद्धांतिक खगोलशास्त्र निरीक्षणासंबंधी निकाल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि निरीक्षणे सैद्धांतिक परिणामाची पुष्टी करण्यासाठी वापरली जातात.

खगोलशास्त्रामध्ये हौशी खगोलशास्त्रज्ञांची सक्रिय भूमिका असते, हे अशा काही विज्ञानांपैकी एक आहे ज्यामध्ये ही घटना आहे. क्षणिक घटनांच्या शोधासाठी आणि निरीक्षणासाठी हे विशेषतः खरे आहे . हौशी खगोलशास्त्रज्ञांनी नवीन धूमकेतू शोधण्यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण शोधांमध्ये मदत केली.  प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोल शास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केलेला होता एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला 1:10 अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ प्रथम लिहिलेला होता त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्र दिलेली आहेत आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ देखील होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर यांनी पंच सिद्धांत टीका नावाचा ग्रंथ लिहिला त्यात भारतीय खगोल शास्त्रीय सिद्धांत बरोबर ग्रीक-रोमन इजिप्त या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांत याचा विचारही त्याने केलेला दिसतो. इसवीसनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेला ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले कनादा चे वैशेषिक दर्शन हा ग्रंथ याच काळात लिहिला गेला या ग्रंथात अनु परमाणूंच्या विचार प्रामुख्याने केलेला आहे त्याच्या मते विश्व हे असंख्य वस्तूंनी भरलेले आहे या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत ही स्वरूपे बदलतात पण अणु मात्र अक्षय राहतात

खगोलशास्त्र (पासून ग्रीक ἀστρονομία पासून ἄστρον Astron स्टार आणि -νομία, -nomia पासून νόμος nomos , नियमशास्त्राच्या किंवा संस्कृती) याचा अर्थ असा तारे कायदा (किंवा भाषांतर अवलंबून तारे संस्कृती) . खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्रात गोंधळ होऊ नये , अशी विश्वास प्रणाली जी मानवाच्या कार्ये आकाशीय वस्तूंच्या स्थितीशी संबंधित आहे असा दावा करते. दोन फील्ड एक समान मूळ असूनही , ती आता पूर्णपणे वेगळी आहेत.

सामान्यत: खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्रशास्त्र या दोन्ही शब्द एकाच विषयाचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.  कडक शब्दकोशाच्या परिभाषावर आधारित, खगोलशास्त्र  पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच्या वस्तूंचा आणि त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास तर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स संदर्भित करते खगोलशास्त्राची शाखा वर्तन, भौतिक गुणधर्म आणि आकाशीय वस्तू आणि घटनेच्या गतीशील प्रक्रियेचा व्यवहार करते. काही प्रकरणांमध्ये, फ्रॅंक शू यांनी दि फिजिकल युनिव्हर्स या प्रास्ताविक पाठ्यपुस्तकाच्या परिचयात, खगोलशास्त्र या विषयाच्या गुणात्मक अभ्यासाचे वर्णन करण्यासाठी वापरले जाऊ शकते, तर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या विषयाची भौतिकशास्त्र देणार्या आवृत्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते.  तथापि, बहुतेक आधुनिक खगोलशास्त्रीय संशोधन भौतिकशास्त्राशी संबंधित विषयांशी संबंधित असल्यामुळे आधुनिक खगोलशास्त्र प्रत्यक्षात खगोलशास्त्रशास्त्र म्हणू शकते;  अ‍ॅस्ट्रोमेट्रीसारखी काही फील्ड केवळ खगोलशास्त्र नसून खगोलशास्त्र आहेत. शास्त्रज्ञ या विषयावर संशोधन करीत असलेले विविध विभाग खगोलशास्त्र आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स वापरू शकतात, हे विभाग ऐतिहासिकदृष्ट्या भौतिकशास्त्र विभागाशी संबंधित आहे की नाही यावर अवलंबून आहे,आणि बर्‍याच व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांना खगोलशास्त्र डिग्रीऐवजी भौतिकशास्त्र आहे; या क्षेत्रात अग्रगण्य वैज्ञानिक जर्नल्स काही शीर्षके समावेश खगोलीय जर्नल , Astrophysical जर्नल , आणि खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी .

खगोलशास्त्र

प्रस्तावना
खगोलशास्त्राला इंग्लिशमध्ये अस्त्रोनोमी म्हणतात. खगोलशास्त्र हा एक  प्राकृतिक विज्ञानाचा भाग आहे. खगोलशास्त्रामध्ये आपल्याला विविध तार्यांच्या व ग्रहांच्या बाबतींत माहिती मिळिते.

खगोलशास्त्राचा इतिहास –
पूराण काळीं खगोलशास्त्र फक्त निरीक्षण आणि उघड्या डोळ्यानी बगितलेल्या वस्तूंची भविष्यवाणी पूर्तींत मर्यादित होतें. निरीक्षण केलेल्या वस्तूंच्या माहितीचा उपयोग विविध ऋतूंच्या बाबतींत प्राप्त करण्यास होतो व एक वर्ष किती लांब असू शकितो याची माहिती पुरवितें. दूरबिणीच्या संशोधनाच्या पहिलें, विविध तार्यांचा अध्यय करण्यासाठी केवळ काही उंच जागेवर त्या तार्यांचें निरीक्षण करावें लागायचें. दूरबिणीच्या संशोधनानंतर सर्वांत पहिलें विविध तार्यांची व ग्रहांची स्थिती या बाबतींत माहिती पुरवली गेली. या निरीक्षणाच्या आदरे विविध ग्रहांची गती, आणि सूर्य, चंद्र, व पृथ्वी च्या संदर्भित माहिती दिली गेली. पहिलें सर्व लोकांमध्ये असा अंधविश्वास होता कि पृथ्वी, चंद्र आणि सूर्यांच्या मध्यभागी स्थित आहे. परंतु विविध संशोधनांनांतर हें सिद्ध झालें कि सूर्य सर्वग्रहांच्या मध्यभागी स्थित आहे. एक विशेष रूपामध्ये महत्त्वपूर्ण प्रारंभ विकासाच्या वैज्ञानिक आणि गणितीय खगोलशास्त्र, जें बाबुल मध्ये प्रारंभ झालें, ते नंतर खगोलीय परंपरा अनेक अन्यसभ्यता मध्ये विकसित करण्यासाठी तदियों माहिती झालें कि चंद्रग्रहण एक दोहरा चक्र मध्ये परतिते एक सरोस च्या रूप मध्ये मानला जातो. ३ शताब्दी ई.पु., of सामोस ने पृथ्वीच्या आकाराची गणना केली, आणि सूर्य व चंद्राच्या मधील दूरी नापली.

वैज्ञानिक क्रांती
पुनर्जागरणाच्या वेळीं,, निकोलौस कोपेर्निकुस यानी सूर्यमालेच्या एक मॉडल कॅ प्रस्ताव मांडला, गालिलेओ आणि केप्लर यानी त्यांच्या कामामध्ये सुधारणा आणली. गालिलेओ दूरबिणीचा उपयोग करून केलेल्या निरीक्षणामध्ये सुधारणा केली.

रेडियो खगोलशास्त्र
रेडियो खगोलशास्त्र विविध किरणोत्सर्गाच्या अध्यय करितो. त्यांची तरंगलांबी एक मिलिमीटर च्या आस-पास असिते. रेडियो च्या विविध तरंग आपण विवध फ़ोटो नाहीं मानलें तरी चालितें, ज्या कारणानें आपण त्याचें कोणांकाची लांबी मापायला सोपा होतें.

इन्फ्रारेड खगोलशास्त्र
अवरक्त खगोलशास्त्र विविध प्रकाराच्या प्रार्न्न स्म्भातीत माहिती देतें. बहुतेक वेळा ही किर्नानला वातावरण शोषून घेतें, ज्या कारणामुळीं त्याचे उत्सर्जन होतात. अवरक्त पंक्ती, विविध प्रकाराच्या वस्तू जे खूप थंड असितात ते दृश्य पंक्तीय प्रदेश करू नाहीं शकीत.
यांचा उपयोग अंतरीक्षा रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यास साह्य करितो.

ऑप्टिकल खगोलशास्त्र
ऑप्टिकल खगोलशास्त्र हें एक खगोलशास्त्राची प्राचीन शक आहे.
जुन्या काळी ग्रहांचे प्रतिमा हाताने काढली ज्याची,२० शतकानंतर विविध प्रकारच्या  च्हायाचीत्न सामग्री संशोधन झाल्या मुले त्याचा वापर वाढला .
ज्ण्बूलातीत खागोलश्स्त्र
ज्ण्बूलातीत खागोलश्स्त्र बहुतेक वेळा ज्ण्बूलातीत तरंगलांबीच्या निरीक्षणासाठी उपयोग होतो. त्याची तरंगलांबी १० ते ३२० nm च्या आस-पास असितें. पृथ्वीच्या वातावरण बहुतेक वेळा हे किरणे शोषून घेते. वरील सर्व खगोलशास्त्राचे विविध प्रकारे आहेत.

सूर्यमाला
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळीं त्याच्याभोवतीं फिरणाऱ्या खगोलीय वस्तूनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे १६५ ज्ञात नैसर्गिक उपग्रह, बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असांख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.

सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपटून. आठ पैकीं सहा ग्रहांच्या भोवतीं नैसर्गिक उपग्रह आहेत.

वर्गीकरण
सुर्याभोवतीं फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गांत वर्गीकरण केलें जातें ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू.

रचना
सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणिजे सूर्य होय. सूर्याचें वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इत्कें आहे. इत्क्या प्रचंड वस्तूमानामुळींच सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूना त्याच्या भोवतीं फिरावण्यास लावतें.[४] उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हें गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.
सूर्याभोवतीं फिरणार्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू या एकाच पातळींत सूर्याभोवतीं फिरितात. ग्रहांची फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीच्या अगदी जवळ आहे तर धूमकेतू व क्यूपरचा पट्टा यांची फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीशीं काही अंशांचे कोन करितात.

चित्रकाराच्या नजरेतून सूर्यमाला
सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानितात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळीं सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वीं झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्ष अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक तार्यांची निर्मिती झाली.




#Article 36: वनस्पतीशास्त्र (119 words)


वनस्पतीशास्त्रात विवध वनस्पतींचा अभ्यास केला जातो.

झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. 

बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुसऱ्या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुद्धा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.




#Article 37: रसायनशास्त्र (386 words)


रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो.

रसायने अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात. 

रसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. [4] उदाहरणार्थ वनस्पती रसायनशास्त्र (वनस्पतीशास्त्र), अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे कमी होतात (पर्यावरणशास्त्र), चंद्रावरील व इतर ग्रहावरील जमिनीचे गुणधर्म (खगोलभौतिक), औषधे कसे कार्य करतात (औषधशास्त्र), आणि गुन्हेगारांचा डीएनए, तसेच इतर पुरावे (फॉरेनसिक) कसे गोळा करावेत.

रसायनशास्त्राचा वापर इतिहासमध्ये फार पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आल्याचा दिसून येतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून विविध संस्कृती रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत होत्या, जे अखेरीस रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा आधार बनले. उदाहरणार्थ खनिजापासून धातू काढणे, मातीची भांडी आणि glazes बनवणे, बीयर आणि वाइन आंबवणे, औषधी  आणि सुगंधी वनस्पती पासून रसायने काढणे, साबण मध्ये चरबी वापरणे, काच बनवण्यासाठी, आणि कांस्य सारख्या मिश्रक बनवण्यासाठी इ. रसायनशास्त्राची सुरुवात त्याच्या प्रतिशास्त्रापासून, अल्केमीने केली होती, जी वस्तूंच्या घटकांना आणि त्यांच्या परस्परक्रियांना समजण्यासाठी एक अंतर्ज्ञानी पण गैर-वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु, पदार्थ आणि त्याच्या परिवर्तनांचे स्वरूप समजावून सांगण्यात ते अयशस्वी ठरले. तरीसुद्धा, विविध प्रयोग करून आणि परिणामांचे लेखण/ नोन्द् करून, अल्केमिस्टने आधुनिक रसायनशास्त्रासाठी पाया रचला. रसायनशास्त्रातील शोध हे इतर शास्त्रांमधील शोधांपेक्षा अलौकिक किंवा वेगळे होते. तेव्हा रॉबर्ट बॉयल यांनी त्यांच्या कामात द स्काप्टिकल केमिस्ट (1661) मध्ये स्पष्ट फरक निर्माण केला तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला होता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले. रसायनशास्त्र हे एंटोनी लेवेसियरच्या कामामुळे एक स्थापित विज्ञान झाले आहे असे मानले जाते, ज्यांनी सावधगिरीचा मोजमाप केला आणि रासायनिक गुणधर्माचा परिमाणवाचक निरीक्षण करण्याची मागणी केली. रसायनशास्त्राचा इतिहास विशेषत: विलार्ड गिब्सच्या कार्याद्वारे, उष्मप्रदेशांचा इतिहास यांच्याशी घनिष्ठ आहे. [5]

रसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. इस्पितळामध्ये दिली जाणारी औषधे ही रासायनेेेच असतात. इमारतीला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते.  

साबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत.




#Article 38: गणित (1463 words)


मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे (पॅटर्न) शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रतिमाने शोधता येतात. 

नवीन संकल्पना(थिअरी) मांडून तिला, तिच्यातील तथ्ये, मूळवाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात.

इतिहास
अमूर्तता आणि तर्क यांच्या वापराने मोजणी, आकडेमोड, मापन यांपासून भौतिक जगतातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ्यासातून गणितशास्त्र विकसित पावले. गणिताचे ज्ञान व वापर हा नेहेमीच व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळींवर जीवनाचा अविभाज्य भाग होता. मूळ कल्पनांचा विकास होतांना प्राचीन भारत, प्राचीन ग्रीस, इजिप्त, मेसोपोटॅमिया, प्राचीन चीन, इत्यादी संस्कृतींमध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथांत दिसून येतो. पाश्चात्य इतिहासलेखकांना गणिताची कठोर तर्कट चालवण्याची पद्धत लिखित स्वरूपात युक्लिडच्या एलिमेंट्स या ग्रंथात सर्वप्रथम मिळाली. सोळाव्या शतकाच्या रेनैसन्स चळवळीच्या काळापर्यंत गणिताचा विकास कमी-अधिक मगदुराने झालेला दिसतो. रेनैसन्स ही एक बौद्धिक चळवळ होती. तिच्यात गणित आणि विज्ञानातील नवीन शोधांची सुयोग्य सांगड यशस्वीरीत्या घालण्यात आली होती. अशा चळवळीमुळे संशोधनाचा वेग वाढण्याचा घटनाक्रम आजवरही अबाधित राहिला आहे.

आज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते आणि त्यांचा वापर करते. त्यामुळे ज्ञानाच्या सर्वस्वी नवीन शाखाही उदयास येतांत. कलेसाठी कला या न्यायाने केवळ गणितासाठी गणित अशा ध्येयाने शुद्ध गणिताचा अभ्यास करणारे गणितीही आहेत. अशा शुद्ध गणितातील शोधांचा कालांतराने उपयोजित गणितात वापर कसा करावा त्या पद्धतींचा शोध बहुधा लागतोच.

गणित या शब्दाची व्युत्पत्ती गण् या संस्कृत धातूपासून झाली आहे; गण् म्हणजे मोजणे.

गणिताविषयी एक संस्कृत श्लोक असा आहे :

यथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा |
तथा वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् ||

अर्थ: ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात वर(उच्च) आहे.  हा श्लोक वेदाङ्गज्योतिषामधील ३५व्या श्लोकामधे बदल करून हा बनवला आहे.

गणिताचा सध्याचा विकास अमूर्त संकल्पनांच्या चढत्या भाजणीतून किंवा विषयाच्या विस्तारातून झाला असे मानता येईल . संख्या ही अमूर्ततेची पहिली पायरी होय. भौतिक वस्तूंची मोजदाद करण्याशिवाय प्राचीन लोकांना काळासारख्या अमूर्त कल्पना (जसे दिवस, महिने वर्ष) कसे मोजावे याचेही ज्ञान होते . अर्थातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत अंकगणिती क्रिया येणे क्रमप्राप्तच होते. प्राचीन काळातील भव्य वास्तू पूर्वजांच्या  ज्ञानाची साक्ष देतात.

गणिताच्या अधिक प्रगतीसाठी लेखनाची किंवा संख्यांची नोंद करण्याची पद्धतीची गरज पडली. पडताळ्याच्या रेघा किंवा इंका साम्राज्यातील क्विपू नावाच्या गाठ मारलेल्या दोऱ्या वापरून संख्यात्मक माहितीची नोंदी ठेवल्या जात होत्या. जगभर विविध संख्यापद्धती प्रचलित होत्या.

लिखित इतिहासाच्या प्रारंभापासूनच कर आणि वाणिज्याशी संबंधित व्यवहारांची आकडेमोड करण्यासाठी, संख्यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी आणि खगोलीय घटनांचा वेध घेण्यासाठी गणिताची निकड भासली. यावरूनच मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्या अभ्यासांचा गणिताच्या शाखांशी स्थूलरूपाने संबंध जोडता येतो.

विज्ञान आणि गणित यांचा एकमेकांशी परस्परपोषक असा संबंध असल्याने असून हल्लीचे गणित अतिशय विकसित आहे. ऐतिहासिक काळापासूनच गणितात विविध शोध लागले आणि हे चक्र सुरूच आहे.

अमेरिकी गणिती संघटनेच्या (American Mathematical Society जानेवारी २००६ च्या वार्तापत्रातील मिखाईल बी. सेव्हरिक यांच्या लेखानुसार, संघटनेच्या मॅथॅमॅटिकल रिव्ह्यू या विदागारात, त्याच्या प्रथम वर्षापासून म्हणजेच इसवी सन १९४० पासून १९ लाख पुस्तके आणि प्रबंध होते. दरवर्षी त्यांत ७५ हजार नवीन रचना जोडल्या जातात . यातील बहुतांश कृती या नवीन प्रमेये आणि त्यांच्या सिद्धान्तांशी संबंधित आहेत.

जेव्हा मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्याशी संबंधित क्लिष्ट समस्या उभ्या ठाकतात तेव्हा गणित प्रगटते. प्राचीन काळी जमिनीची मोजणी, कर, खगोलशास्त्र इत्यादींमध्ये या समस्यांची सुरुवात झाली. आज विज्ञानातील सर्व शाखांत निर्माण होणाऱ्या समस्या गणिताच्या वापराने सुटू शकतात. तसेच, खुद्द गणितातही अनेक मनोरंजक समस्या प्रगटतात. अनंताश्रयी कलनाचा शोध लावणाऱ्यांपैकी न्यूटन हा एक मानला जातो. फेनमन पथ कलनाचा शोध फेनमनने भौतिकशास्त्रातील अंतर्दृष्टी आणि तर्काच्या साहाय्याने लावला. सांप्रत काळी भौतिकशास्त्रात, ब्रह्मांडशास्त्राशी संबंधित तंतुसिद्धान्तामुळे गणितात नवनिर्मिती होत आहे. गणिताचा काही भाग हा एखाद्या विशिष्ट शाखेशीच निगडित असतो आणि तेथेच त्याचा वापर होतो. परंतु, बहुतेक वेळा ज्ञानाच्या एखाद्या शाखेतील प्रेरणेने विकसित झालेले गणित इतर शाखांमध्येही उपयोगी पडते आणि गणितातील विविधोपयोगी भव्य कोठाराचा भाग बनते. अगदी शुद्धतम गणिताचासुद्धा उपयोजित शाखांमध्ये कुठे ना कुठे उपयोग होतोच. या अद्भुत सत्याला स्तिमित होऊन यूजिन विगनर या भौतिकीतील शास्त्रज्ञाने गणिताची अतर्क्य कार्यक्षमता () असे संबोधले आहे.

ज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणेच गणिताच्या देदीप्यमान विकासामुळे त्यांतही वैशेषीकरण झाले आहे. मुळात शुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन प्रमुख शाखा होत्या. आता मात्र, गणिताच्या नाना उपयोजित शाखांचा गणिताबाहेरील परंपरांशी संगम होऊन सांख्यिकी, क्रियन संशोधन आणि संगणन विज्ञानासारख्या अनेक नवीन विषयांची निर्मिती झाली आहे.

अनेक गणिती, गणिताच्या नेटकेपणाबद्दल म्हणजेच त्याच्या कलात्मक आणि उस्फूर्त सौंदर्याबद्दल बोलतात. गणिताच्या साधेपणाला आणि व्यापकत्वाला विशेष महत्त्व दिले जाते. चतुरपणे मांडलेली सिद्धता (उदाहरणार्थ, जसे मूळ संख्या अनंत असल्याची युक्लिडची सिद्धता) किंवा आकडेमोड सोपी करण्याच्या पद्धती (जसे चपळ फोरियर रूपांतर) यांतही सौंदर्य आहे. जी. एच. हार्डीने एका गणितीचे वक्तव्य या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की सौंदर्याचे हे निकषच शुद्धगणिताचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे आहेत. नेटक्या प्रमेयांच्या सिद्धता शोधण्यासाठी गणिती विशेष प्रयत्न करतात. पॉल इरडॉजने या प्रकारास देवांच्या गणितविषयावरील आवडत्या पुस्तकातील प्रमेयांचा शोध असे म्हटले आहे. बऱ्याच लोकांना गणिती समस्या उकलण्यास आवडते. अशानेच गणिताचे रंजकत्व आणि लोकप्रियता समजते कि ज्यामुळे गणिताची भीती कमी होण्यास मदत होईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) चे एस जी. त्यांचा असा विश्वास आहे की याने गणिताच्या शिक्षणाच्या अध्यापनशास्त्राला कोणत्याही वैचारिक कठोरतेशिवाय युक्त्यांचा गुच्छ म्हणून सादर केले आणि इतिहासशास्त्रातील संशयास्पद मानदंडांचे पालन करून भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासाला (एसटीएस) या दोहोंचा उच्छेद केला. [२] [ अ] तीर्थ यांची प्रणाली शिकवण्याच्या सहाय्याने वापरली जाऊ शकते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले की “पब्लिक” चा वापर रोखण्याची गरज होती

गणितात हल्ली वापरल्या जाणाऱ्या नोटशनपैकी काहीच सोळाव्या शतकापर्यंत शोधले गेले होते. त्या आधी गणित हे केवळ शब्दांत व्यक्त केले जात असे. शब्दांच्या बोजडपणामुळे गणिताचा फारसा विकास होऊ शकलेला नव्हता. आधुनिक नोटेशनमुळे तज्ज्ञांसाठी गणित सोयीचे, परंतु, नवशिक्यासाठी अधिक क्लिष्ट झाले आहे. आधुनिक नोटेशन अतिशय संक्षिप्त आहे. मोजक्याच मुळाक्षरांमध्ये प्रचंड माहिती देता येते. पाश्चात्य संगीताच्या नोटेशनप्रमाणेच गणिताच्या नोटेशनचे कडक नियम असून ते नोटेशन ज्या प्रकारची माहिती लिखित रूपात सांगते, ती इतर कोणत्याही पद्धतीने व्यक्त करणे जवळजवळ अशक्यच आहे.

नवशिक्यांसाठी गणिताची भाषासुद्धा अंमळ क्लिष्टच आहे. अगदी, किंवा-केवळ सारख्या साध्यासुध्या शब्दांनाही गणितात दैनंदिन व्यवहारापेक्षा अधिक नेमका अर्थ असतो. तसेच ‘उघड’ आणि १क्षेत्र’, सारख्या कित्येक शब्दांना गणितात विशेष अर्थ असतो. गणितात सारणिक आणि कलनीय अशा तांत्रिक संज्ञाही आहेत. या विशेष नोटेशन आणि तांत्रिक संज्ञांमागे एक मोठेच कारण आहे. ते म्हणजे, गणिताला दैनंदिन व्यवहारातील बोलीपेक्षा अधिक नेमकेपणा लागतो. भाषेच्या आणि तर्काच्या या नेमकेपणास गणिती काटेकोरपणा म्हणतात.

मूलतः काटेकोरपणा हे गणितातील सिद्धतांसाठी आवश्यक आहे. शिस्तबद्ध कार्यकारणभाव लावून मूळ वाक्यांपासून प्रमेये सिद्ध करण्याची गणितींची इच्छा असते. अंतःप्रेरणा आयत्या वेळेस दगा देऊ शकते. त्यामुळे चुकीचे सिद्धान्तही मांडले जाऊ शकतात. गणिताच्या इतिहासात असे अनेक वेळा झालेही आहे. हे टाळण्यासाठी काटेकोरपणा पाळावाच लागतो. हा काटेकोरपणा काळानुसार कमी-अधिक झालेला आहे. 

ग्रीकांच्या काळी सिद्धतांचे मुद्दे विस्तृत रितीने मांडण्यावर भर होता. न्यूटनच्या काळी काटकोरपणा त्या मानाने कमी होता. न्यूटनने वापरलेल्या व्याख्यांमधील कच्च्या दुव्यांमुळे १९ व्या शतकात काळजीपूर्वक विश्लेषण आणि औपचारिक सिद्धतांचा पुन्हा उदय झाला. संगणकाच्या मदतीने लिहिलेल्या सिद्धता वापरल्या जाव्यात अथवा नाही यावर आजच्या गणितींमध्ये मतभेद आहेत. अतिभव्य आकडेमोडींचा पडताळा करणे अत्यंत अवघड असल्याने अशा प्रकारच्या सिद्धान्तांमध्ये अपेक्षित काटेकोरपणाचा अभाव असू शकतो. परंपरेच्या दृष्टीने मूलवाक्ये ही स्वयंप्रकाशित तथ्ये होती. परंतु, पुढेपुढे ती तथ्ये जशीच्या तशी मानण्यात बऱ्याच व्यावहारिक अडचणी असल्याचे लक्षात आले. औपचारिक दृष्टीने पाहता, ज्याचा मूळ अर्थ त्या-त्या मूळवाक्याच्या विधिविधानातील सूत्रांच्या संदर्भातच असतो असे मूलवाक्य म्हणजे चिन्हांनी बनलेले केवळ एक नाम असते,

सगळ्याच गणितास मूलवाक्याच्या आधाराने सिद्ध करणे हे हिलबर्टच्या आज्ञावलीचे उद्दिष्ट होते. परंतु गोडेलच्या अपूर्णतेच्या सिद्धान्तानुसार कुठल्याही यथोचित मूळ वाक्यांच्या विधिविधानात सिद्ध न करता येण्याजोगी सूत्रे असतातच. त्यामुळे गणिताचे संपूर्ण मूलवाक्यायन अशक्य आहे. इतके असले तरी गणित हे कुठल्यातरी संच सिद्धांतातील (संचप्रवादातील) मूळवाक्यायन आहे असे समजले जाते. या दृष्टीने पहाता प्रत्येक गणिती वाक्य किंवा सिद्धान्त हा संचसिद्धान्तातील सूत्रांच्या रूपात मांडला जाऊ शकतो.

याबद्दलचा विस्तृत लेख येथे आहे.

ग्रीक भाषेतले अक्षर पाय पाय x व्यासाची लांबी = परीघाची लांबी ह्या वर्तुळासंबंधित समीकरणात रूढीने वापरण्यात येते आणि त्यात 

पायची किंमत जवळ जवळ ३.१४१५९ आहे.  वर्तुळातील परिघाची लांबी व व्यासाची लांबी यांचे गुणोत्तर म्हणजेच पाय हे स्थिरांक म्हणून मानले जाते.

पिएर फर्मा (इ.स. १६०१ -१६६५) हे एक बुद्धिमान फ्रेंच गणिती होते. वास्तविक कायदेशास्त्राच्या शिक्षणानंतर ते सरकारी नोकरीत  वकिलीचा व्यवसाय करत असत, पण गणितशास्त्राचा अभ्यास हा त्यांचा आवडता छंद होता.

ह्या समीकरणात, 'न'ही २ हून मोठी नैसर्गिक संख्या असेल, तर
या समीकरणाचे समाधान करणारे 'क', 'ख' आणि 'ग' असे तीन पूर्णांकात अस्तित्वात नाहीत असे एक विधान फर्माने आपल्या एका शोधनिबंधात मांडले. शिवाय या विधानाची एक खास सिद्धता मी शोधून काढली आहे, पण ह्या पानावरची (छापील मजकुराभोवतीची) समासाची जागा ही सिद्धता लिहायला अपुरी आहे असेही त्याने या शोधनिबंधात लिहिलेसंदर्भ?. मात्र फर्माने आपल्या हयातीत ही सिद्धता कुठेही लिहिली नाही. त्याच्या पश्चात जेव्हा हे विधान सिद्ध करण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा गणितज्ञांच्या ध्यानात आले की हे विधान सिद्ध करणे सोपे नाही.

फर्मा ह्यांच्या निधनानंतर हे विधान फर्माचे शेवटचे प्रमेय ह्या नावाने गणितशास्त्रात प्रसिद्धीला आले --- सिद्ध केले नसले तरी या विधानाले प्रमेय म्हटले जात होते. सुमारे ३३० वर्षे ते प्रमेय सिद्ध करण्याचे किंवा ते चूक असल्याचे सिद्ध करायचे जंगी प्रयत्‍न अनेक बुद्धिमान गणितज्ञांनी केले, पण त्या प्रदीर्घ काळात कोणालाही त्यात यश मिळाले नव्हते. सरतेशेवटी आंड्र्यू वाइल्स ह्या ब्रिटिश गणितज्ञाने अनेक वर्षांच्या प्रयत्‍नाने १९९४ साली ते प्रमेय सिद्ध केले!

पिएर फर्मा, रेने देकार्त, आणि ब्लेस पास्कॅल हे तीन श्रेष्ठ फ्रेंच गणिती समकालीन होते.




#Article 39: शिल्पकला (120 words)


शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.

संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात  मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे.

मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या शैली असतात. त्यास डौलही म्हणतात. 

यात शरीरास असलेल्या वाकास 'भंग' असे नाव आहे.

मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.

इत्यादी.

इत्यादी.

हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.

इत्यादी.

इत्यादी.




#Article 40: पाककला (1177 words)


पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.

 महाराष्ट्रातसुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.

स्वयंपाक किंवा स्वयंपाकाचे भांडे म्हणजे कला, तंत्रज्ञान, विज्ञान आणि अग्नी किंवा उष्णता यांच्या वापरासह किंवा त्याव्यतिरिक्त वापरासाठी अन्न तयार करण्याचे शिल्प. स्वयंपाक तंत्र आणि साहित्य जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत, जे अग्निशामक स्टोव्ह वापरण्याकरिता खुल्या अग्नीवर अन्न खाणे, विविध प्रकारचे ओव्हनमध्ये बेकिंग, अद्वितीय पर्यावरण, आर्थिक आणि सांस्कृतिक परंपरांवर व ट्रेन्डचे प्रतिबिंबित करतात. स्वयंपाकाच्या मार्गांमुळे किंवा प्रकाराचे कौशल्य देखील वैयक्तिक कुकच्या कुशलतेवर आणि प्रशिक्षणाच्या प्रकारावर अवलंबून असतो. स्वयंपाक घरात स्वयंसेवक आणि रेस्टॉरंट्स आणि इतर अन्न आस्थापनांमध्ये व्यावसायिक स्वयंपाकी व शेफ यांच्या द्वारे पाककला केली जाते. रासायनिक अभिक्रियांच्या माध्यमातून उष्णतेच्या उपस्थितीशिवाय पाककला केली जाऊ शकते जसे की सेव्हचेस, एक पारंपारिक दक्षिण अमेरिकन डिश जिथे मासा लिंबू किंवा लिंबाचा रस यातील ऍसिडसह शिजवला जातो.

उष्णता किंवा आग्नेसह अन्न तयार करणे ही मानवजातीसाठी एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. कदाचित सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी हे पुरातत्त्ववादी पुरावे १ दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत पोहोचत असले तरी

शेती, व्यापार, व्यापार आणि विविध क्षेत्रातील संस्कृती यांच्यातील वाहतूक विस्ताराने अनेक नवीन साहित्य शिजवल्या जात आहेत. नवीन शोध आणि तंत्रे, जसे की धारण आणि उकळत्या पायीसाठी मातीचा शोध, विस्तृत पाककला तंत्र. काही अद्ययावत कूक अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी अन्न तयार करतात.

फिलेजेनेटिक विश्लेषण सुचवितो की मानवी पूर्वजांनी १.८ दशलक्ष ते २.३ दशलक्ष वर्षांपूर्वी पाककृती शोधली असू शकते. दक्षिण आफ्रिकेच्या वॅंन्डरक गुहेतील बर्न फ्रॅग्रेम्स आणि वनस्पती ऍशचे पुनर्नवीनीकरणाने १ दशलक्ष वर्षांपूर्वी सुरुवातीच्या मानवांच्या द्वारे अग्निशामक नियंत्रण करणारे पुरावे प्रदान केले आहेत. असा पुरावा आहे की होमो ईटेन्टस ५००००० वर्षांपूर्वीचे त्याचे अन्न स्वयंपाक करत होते. जवळजवळ ४००००० वर्षांपूर्वी होमो ईटेक्टसच्या आगमधल्या नियंत्रित वापरासाठी पुरावा म्हणून व्यापक विद्वत्तापूर्ण आधार आहे.३००००० वर्षांपूर्वीचे पुरातत्त्व पुरावे,  प्राचीन हिरे, पृथ्वी ओव्हन, जाळलेले पशू हाडे, आणि फ्लिंट या स्वरूपात, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये आढळतात. मानवशास्त्रज्ञांना असे वाटते की, कचरा पेटी मोठ्या प्रमाणात सुमारे २५०००० वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा हेरथची सुरुवात झाली. 

अलीकडे, लवकरात लवकर हेरथची संख्या किमान ७९०००० वर्षांपूर्वी नोंदवली गेली आहे.

ओल्ड वर्ल्ड आणि द न्यू वर्ल्ड इन द कोलम्बलयन एक्स्चेंज यांच्यात दळणवळणाचे आक्रमण कुकिंगच्या इतिहासावर पडले. न्यू वर्ल्डमधून अत्यावश्यक पदार्थांची चळवळ, जसे बटाटे, टोमॅटो, मका, याम, सेम, बेल मिरी, मिरची मिरपूड, या वनस्पतीसाठी केलेला अर्क, भोपळा, कसावा, आवाकोडा, शेंगदाणे, पेकॅन, काजू, अननस, ब्ल्यूबेरी, सूर्यफूल , चॉकलेट, गोवरी, आणि स्क्वॅशचा जुन्या जागतिक पाकळीवर मोठा परिणाम झाला. जुन्या जगापासून अत्यावश्यक पदार्थांमधील चळवळी जसे की गुरेढोरे, मेंढी, डुकरे, गहू, ओट्स, जव, तांदूळ, सफरचंद, नाशवंत चिअर, मटार, चणे, हिरवे सोया, सरस आणि गाजर यामुळेच नवीन विश्व पाककृती बदलली. 

सतराव्या आणि अठराव्या शतकात, युरोपमधील अन्नपदार्थ ओळखणे हा क्लासिक मार्कर होता. १९ व्या शतकाच्या राष्ट्रवादाची वय खाद्यपदार्थ राष्ट्रीय ओळखीचे परिभाषित प्रतीक झाले.

औद्योगिक क्रांतीमध्ये प्रचंड प्रमाणावर उत्पादन, जन-विपणन आणि अन्नाचे मानकीकरण आणले गेले. निरनिराळ्या पदार्थांचे संसाधित, संरक्षित, कॅन केलेला आणि पॅकेज केले जाणारे कारखाने, आणि प्रक्रिया केलेले अन्नधान्यांचा पटकन अमेरिकन नाश्त्याचा एक निर्णायक वैशिष्ट्य बनला. १९२० च्या दशकात फ्रीझिंग पद्धती, कॅफेटेरिया आणि फास्ट फूड रेस्टॉरंट्स उदयास आले.

स्वयंपाक करण्याचे बरेच घटक जिवंत प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. भाजीपाला, फळे, धान्य आणि पिके तसेच वनस्पती आणि मसाल्या वनस्पतीपासून येतात, तर मांस, अंडी आणि डेअरी उत्पादने प्राण्यांमधून येतात. मशरूम आणि बेकिंगमध्ये वापरलेले यीस्ट प्रकारचे बुरशी आहेत कूक देखील मीठ म्हणून पाणी आणि खनिजे वापर कुक वाइन किंवा आत्मीतेही वापरू शकतात.

नैसर्गिकपणे येणार्या घटकांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि चरबी नावाचे अणू असतात. त्यात पाणी आणि खनिजे देखील आहेत पाककलामध्ये या रेणूंच्या रासायनिक गुणधर्मांचा हेतू आहे.

कार्बोहायड्रेट

कार्बोहायड्रेटमध्ये सामान्य खोबरेल, सुक्रोज (टेबल सॅचर्स), डिसाकार्डिड, आणि अशा साध्या शर्करा जसे ग्लुकोज (सूरोझनाच्या एन्झामाय विभाजनाने बनवलेला) आणि फळांच्यापासून बनवलेले पदार्थ (फळापासून) आणि अन्नधान्य आंबा, तांदूळ, अर्रोक आणि बटाटे.

उष्णता आणि कार्बोहायड्रेटचे ऑनस्क्रान्स जटिल आहे लांबचिकर शुगर शुक्ल जसे स्टार्च शिजवल्यावर सोवळ्या शुद्ध विघटनित असतात, तर साधारण साखर शुक्ल तयार करतात. जर हा कार्बोहाइड गरम झाला तर क्रिस्टलझिझेशनचा सर्व पाण्याने वाहून गेला असेल तर कार्मिलायझेशन सुरू होईल, ज्यामुळे कार्बन तयार झाल्याने तेमल विघटन होणारी साखर आणि कॅरमैल उत्पादक इतर ब्रेकडाउन उत्पादने वापरली जातील.

चरबी किंवा पाण्यातून द्रव एक मिश्रण, नंतर ताजे गरम करून, शिजवलेला डिशला अस्थिरता द्या. युरोपियन पाककला, लोणी व आलेठ या मिश्रणाचा एक रौक्स वापरला जातो ज्यामुळे द्रव किंवा सोस तयार होतात. आशियाई पाककला, तांदूळ किंवा कॉर्न स्टार्च आणि पाण्यास मिश्रणे हीच प्रभाव प्राप्त होतात. या तंत्रांवर स्टॉच गुणधर्म अवलंबून असते जे तयार करताना सरळ म्युसेललागिनस सैकराइड तयार करतात, ज्यामुळे सॉसचे परिचित जाड होते. तथापि, अतिरीक्त उष्णतामुळे विघटन कमी होऊ शकते.

चरबी 

चरबी प्रकार म्हणजे भाजीपाला, जनावरे इत्यादी जसे की बटर आणि चरबी, तसेच धान्य आणि फ्लेक्स ऑइलसह अन्न देखील पाककला आणि बॅकिंग अनेक प्रकारांचा चरबी वापरतो. मिस फ्रीज, ग्रील्ड चीज किंवा पॅनकेस तयार करा, पॅन किंवा कांदयाचे इ. नीट ढवळत जाणे वारंवार चरबी किंवा तेल सह भाजलेले पदार्थ जसे की कुकीज, केक्स आणि पाईप्समध्ये देखील चरबी वापरतात. चरबी उष्णकटिबंधातील पाण्याच्या पातळीपेक्षा जास्त तपमान असणे आणि ते इतर द्रव्यांचे जसे तेफ, भिजवून किंवा सॉटिंगमध्ये जास्त उष्णता वापरते. अन्नामध्ये चव डालना अन्न (तेलात किंवा खारटलेला डुकराचे मांस चरबी) ते चरबी वापरत असल्यास, खाद्यपदार्थांना चिकटून राहाणे आणि एक अपेक्षित पोत तयार करणे थांबवा.

प्रथिने

स्नायु, ऑफल, दूध, अंडे आणि अंडे श्वानांचा समावेश आहे प्रथिने सामग्रीमध्ये प्रथिने खूप प्रमाणात आहेत जवळजवळ सर्व भाजी पदार्थ (विशेषतः शेड्ये आणि बियाणे) प्रथिनेच त्यात समाविष्ट होते, साधारणपणे लहान प्रमाणात मशरूम उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत की कुठल्याही अत्यावश्यक अमीनो एसिडचे स्रोत. जेव्हा प्रथिने गरम होतात तेव्हा ती विकृत होते (उघडकीस होतात) आणि पोत बदलतो. बर्याच प्रकरणांमध्ये, या पदार्थांचे रचना मलम किंवा अधिक सुगंधी बनविणे कारणीबूड - मांस शिजलेले आहे आणि ते ते अधिक सुगंधी आणि कमी लवचिक असतात. काही प्रसंगी, प्रथिने अधिक कठोर संरचना बनविते, जसे की अंडे पंक मध्ये ॲलेकनचा दाग अंडा पांढरा पिसांचा एक लवचिक पण लवचिक मॅट्रिक्स तयार करणे बॅकिंग केक्स एक महत्त्वाचा घटक प्रदान करते आणि मिडीयअम आधारीत अनेक डिझर्ट्स मिस होतात.

पाणी

पाककला सहसा इतर द्रवांमध्ये वारंवार आढळलेले पाणी, जे शिजलेले पदार्थ (विशेषत: पाणी, स्टॉक किंवा वाइन) विसर्जित करणे आणि खाद्यपदार्थांतून ते स्वतःच सोडले जातात डिश मध्ये एक व्यवस्थित पद्धत जोडणे एक आवडीचे पद्धत जोडण्यासाठी एक द्रव पदार्थ द्रव पदार्थ द्रव पदार्थ स्वयंपाक करणे इतके महत्त्वाचे आहे की वापरण्याजोगी पाककृती पध्दती नाव सहसा द्रव कसे अन्न एकत्रित करते, जसे की वाफाळ, उकळत्या, उकळत्या पाण्यात, आणि ब्लीचिंग करते. ओपन केटेनर परिणामी गरम द्रव वाढते ज्यामुळे बाष्पीभवन वेगाने वाढते, जे उर्वरित चव आणि साहित्य लक्ष केंद्रित करते - हे एक विशेष घटक आहे.

जीवनसत्त्वे आणि खनिजे

सामान्य चयापचय प्रक्रियेसाठी विटामिन आणि खनिजे आवश्यक असतात परंतु शरीर स्वतः निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे बाह्य स्रोतांमधून येणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन्स ताजी फळे आणि भाज्या (व्हिटॅमिन सी), गाजर, यकृत (व्हिटॅमिन ए), अन्नधान्य कोंडा, ब्रेड, यकृत (ब जीवनसत्त्वे), फिश लिव्हर ऑइल (व्हिटॅमिन डी) आणि ताजी हिरव्या भाज्या (व्हिटॅमिन के) यासह अनेक स्त्रोतांमधून येतात. लोहा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराईड आणि सल्फर यासारख्या छोट्या प्रमाणातील अनेक खनिज देखील आवश्यक असतात; आणि लहान प्रमाणात तांबे, जस्त आणि सेलेनियम फळे आणि भाज्यामधील सूक्ष्म पोषक घटक, खनिजे आणि जीवनसत्वे नष्ट होऊ शकतात किंवा स्वयंपाकाद्वारे बोलता येते व्हिटॅमिन सी विशेषतः स्वयंपाक करताना ऑक्सिडेशनला बळी पडतो आणि प्रदीर्घ स्वयंपाक करून पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.[दिलेल्या उद्धरणानुसार नाही] काही जीवनसत्वे जसे की थायामिन, व्हिटॅमिन बी , नियासिन, फॉलेट आणि कॅरोटीनॉड्स यांची जैवउपउपलब्धता वाढवते. 




#Article 41: जब्बार पटेल (571 words)


जब्बार रझाक पटेल (जन्म : पंढरपूर, महाराष्ट्र (भारत),  २३ जून, इ.स. १९४२) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत.

जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली

पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले.  त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० तेंडुलकरांची ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले.  अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बर्‍याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले.. हे नाटक खूप गाजले.

जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्‍नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडले.  जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्‍नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील रेल्वेत होते, म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी पुण्यात यायचे. असे साडेतीन महिने चालू होते.

एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला चित्रकलेचे शिक्षक आणि वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे आले.  त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची पटकथा ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे! तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाले. (इ.स. १९७४)

डॉ. जब्बार पटेलांनी  अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. २०११ मध्ये  ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही. 

डॉ, जब्बार पटेलांनी थिएटर ॲंकेडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.

इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.

डॉ. जब्बार पटेल यांची पत्‍नी डॉक्टर आहे.  त्यांना दोन मुली आहेत.




#Article 42: सई परांजपे (127 words)


सई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.

सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा-  केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरूवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्‍त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिर्‍या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत. 

चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. 

पहा : बाल नाट्य




#Article 43: व्ही. शांताराम (148 words)


शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.

व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत  १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे.

राजकमल कलामंदिरच्या सर्व चित्रपटांच्या नेगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवल्या आहेत.

मधुरा जसराज यांनी व्ही. शांताराम यांचे चरित्र लिहिले आहे.

महाराष्ट्र सरकार दरवर्षी चित्रपटांशी संबधित असलेल्या एखाद्या व्यक्तीला व्ही. शांताराम यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देत असते.  असा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : 




#Article 44: अरुण खोपकर (405 words)


अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना मराठीसह एकूण बारा भाषा येतात.

अरुण खोपकर सातवी आठवीपासूनच रंगमंचावर वावरायला लागले. त्यानंतर रेडिओवर लहान मुलांच्या 'गंमतजंमत' या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला, तेव्हा त्यांची व पुलंची ओळख झाली. रेडिओवर त्यानंतर ते श्री.ना. पेंडसे यांच्या 'हत्या' या कादंबरीच्या वाचनातही खोपकर सहभागी झाले. खोपकरांनी रेडिओवरील बऱ्याच म्हणजे ७०-८० श्रुतिका केल्या. 

खोपकरांनी पुढे नाटकातही कामे केली. भक्ती बर्वे, सुधा करमरकर, वसुंधरा पेंडसे या त्यांच्यासोबत होत्या. त्या काळात त्या 'नाट्यनिकेतन'च्या दौऱ्यांवरही गेल्या होत्या. तेव्हा  बालमोहन नाट्यसंस्थेमध्ये गंगाधर पाटील, गुमास्ते हे शिक्षक होते. पाटीलसरांनी त्यांचा कल ओळखला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. या अभिनयाच्या अनुभवांतर अरुण खोपकर साहित्यलेखनाकडे वळले.

ज्याची भुरळ पडेल ते करायचे, असे खोपकरांना वाटे.  आठवी-नववीत असतानाच 'सौंदर्य आणि साहित्य'सारखा सौंदर्याशास्त्रावरचा ग्रंथ त्यांचा वाचून झाला होता. त्यांना तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करावासा वाटत होता आणि विज्ञानातही रस होता. ज्यांनी इंग्रजी-मराठी डिक्शनरी लिहिली ते खोपकरांचे इंग्रजीचे शिक्षक एस.व्ही. सोहनी त्यांना मला म्हणाले, ’हे बघ, तू जर साहित्याकडे गेलास तर तुला विज्ञानाचा अभ्यास करता येणार नाही, मात्र तू विज्ञान शिकलास तर कलेचा, तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करण्यात काही अडचण येणार नाही’ म्हणून अरुण खोपकर बी.एस्‌सी. झाले आणि ते करताकरता त्यांनी कलाशाखेचा अभ्यास सुरू केला. त्यांना मराठी शिकवायला रा.ग. जाधव, म.वा. धोंड, आणि विजया राजाध्यक्ष होत्या. या प्राध्यापकांमुळे खोपकरांना भाषेची गोडी लागली आणि त्यांचा नाटकाचा छंद कमी झाला. त्याच काळात अरुण खोपकरांची लच्छू महाराजांशी ओळख झाली आण‌ि खोपकरांना नृत्यातही रस वाटू लागला. मध्येच त्यांनी मणी कौलच्या 'आषाढका एक दिन' मध्ये भूमिका करण्याचीही संधी मिळाली, आणि अरुण खोपकरांचा चित्रपटाकडे प्रवास सुरू झाला...

चित्रपट हा खोपकरांचा खरा ध्यास आणि श्वास. त्यामुळेच पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेमध्ये ('एफटीआयआय') चित्रपट-दिग्दर्शनाचे रीतसर शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिनेक्षेत्र हेच कार्यक्षेत्र निवडले आणि तेव्हापासून चित्रपट करणे आणि चित्रपटांवर बोलणे हे जणू त्यांचे जीवनध्येय बनले. सिनेमाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे तर ते पिढी दरपिढीला शिकवत आहेत. निखिलेश चित्रे, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे असे अनेक चित्रपटसमीक्षक खोपकरांच्या चित्रपटविषयक मार्गदर्शन आणि गप्पाटप्पांतून घडले. खोपकरांमध्ये चांगला कथाकथक दडलेला आहे. त्यामुळे लिहिणे असो, बोलणे असो किंवा एखाद्या विषयावर फिल्म करणे असो, प्रत्येक कृतीत त्यांचा आश्वासक सूर लागतो. त्यामुळे वाचणारा, ऐकणारा आणि पाहणारा त्यांच्याशी, त्यांच्या कलाकृतीशी सहज जोडला जातो. 

त्यांनी भूपेन खक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.

अरुण खोपकर विविध संस्थांमध्ये चित्रपट ह्या विषयाच्या थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे वर्ग घेतात. त्यांनी चित्रपटकलेच्या सौंदर्यप्रधान अंगाबद्दल लिहिलेले संशोधन लेख अनेक राष्ट्रीय आणि आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

स्मिता पाटील यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात अरुण खोपकर यांच्या ’डिप्लोमा’साठी बनवलेल्या लघुपटापासून झाली.




#Article 45: अमोल पालेकर (440 words)


अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.

पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर अनिकेत या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. 
त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या  शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते.
इ.स. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना मध्यमवर्गीय माणसाच्या भूमिका मिळत गेल्या.  नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत. 

गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. 
इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला.

मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली  हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये  सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.  

मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो.

त्यांनी आपला आवाज टीच एड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे.

अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले.  त्यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात..

मराठी:

हिंदी :

अमोल पालेकर यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. त्यामुळे पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही त्यांची नाटके गाजली.  दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.

हिंदी चित्रपटांतील दमदार कारकीर्द

बासु चॅटर्जी यांच्या 1947मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे अमोल पालेकर यांनी हिंदी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्याचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट हिट ठरला आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘बातो-बातो में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’ यासारखे अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये ते मध्यमवर्गीय समाजातील नायकांचे प्रतिनिधित्व करताना दिसले. 




#Article 46: निळू फुले (449 words)


निळू फुले (१९३१ - जुलै १३, २००९) हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठीही काम केले आहे.

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले.   

नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणार्‍या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्‍या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला . 

नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले . 

निळू फुले यांचे जुलै १३, २००९ रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले.  अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी'  या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन'  यांतील भूमिका विशेष गालल्या.

कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे. 



#Article 47: श्रीराम लागू (381 words)


डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; मृत्यू : पुणे, १७ डिसेंबर २०१९) हे  मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता  आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात  पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू  या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री  आहेत.

श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.  नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते. 

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे.  बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. 

श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला.  त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते. 




#Article 48: राजा परांजपे (332 words)


 (जन्म: एप्रिल २४ इ.स. १९१०- फेब्रुवारी ९ १९७९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते

४० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कामे केली. सचिन(पिळगांवकर) या नटाच्या कारकिर्दीची सुरुवात त्याच्या वयाच्या ४ थ्या वर्षी राजा परांजपे यांनी करून दिली.


#Article 49: शरद तळवलकर (253 words)


 (नोव्हेंबर १, १९१८ - ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

शरद तळवलकर हे के.ना. वाटवे यांचे जावई लागत.

कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्‌स’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.

विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. 

मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेहऱ्याच्या ह्या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणाऱ्या ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.




#Article 50: अशोक सराफ (626 words)


अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.

त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. 

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत.

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

हे उत्तम अभिनेते असून आपल्या अभिनयातून दर्शवले आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान,  आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. 

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.
अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले आहे.

अशोक सराफ जी यांनी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला.मुुुख्यात्वे . त्यानी सचिन , लक्ष्मीकांत बेर्डे  सारख्या  प्रसिद्ध अभनेत्यान बरोबर कार्य केले.

अशोक सराफ यांनी मराठी नाटकां तून अभिनय शेत्रत पदार्पण केले. त्यांच्या वडिलां चा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. अशोक सराफ यांनी बॅंकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे. त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषका ची होती. दादा साहेब कोंडके यांच्या ' पांडू हवालदार' या चित्रपटात त्यांनी ' सखाराम हवालदार' या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनाल कॉमेडी स्वरूपाची आहे.

अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व सहाय्यक भूमिका निभावल्या त्या चित्रपटांची नावे खाली दिलेली आहेत.

अशोक सराफ यांनी अभिनय केलेले नाटक-

अशोक सराफ यांनी अभिनय केलेले टीव्ही कार्यक्रम
 




#Article 51: महेश कोठारे (289 words)


महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत.

महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले .

महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.

कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. 

महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.

महेश कोठारे यांनी पुढील चित्रपटांत अभिनय केलेला आहे.

  

महेश कोठारे यांचे बालकलाकार म्हणून अभिनित चित्रपट

महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट

महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट




#Article 52: यजुर्वेद (740 words)


यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची  रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे  प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ  व श्रौतसूत्रे यांनी  मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.

यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत - शुक्ल संहिता व कृष्ण संहिता.दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचे मंत्र आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेतच ब्राह्मणग्रंंथातील गद्य भाग दिले आहेत, तर शुक्ल यजुर्वेदासाठी ते शतपथ ब्राह्मणात स्वतंत्रपणे दिले आहेत. 
शतपथ ब्राह्मण हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. याज्ञवल्क्यशिक्षा हा ग्रंथ या वेदाच्या पठणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

शुक्ल यजुर्वेदाच्या 'वाजसनेयी संहिता' म्हणून नाव असलेल्या (आणि बरेच साम्य असलेल्या)दोन शाखा आहेत.

वाजसनेयी माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत , गुजरात , महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे. तर, काण्व ही शाखा नाशिकच्या दक्षिणेकडीलओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत प्रसिद्ध आहे..

जगदगुरु आदि शंकराचार्य यांच्या चार प्रमुख् शिष्यांपैकी एक असणाऱ्या सुरेश्वराचार्य यांनी, काण्व शाखेचा स्वीकार केला. त्यांच्या गुरुंनी आपस्तंब कल्पसूत्रासहित तैत्तिरीय शाखा अवलंबिली.  म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या,  श्रीरंगम येथील रंगनाथस्वामीच्या देवळात,काण्व शाखीय वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा होते. रघुवंश,दशरथ, रामाने व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचे अनुसरण केले. शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदे संलग्न आहेत- ईशोपनिषद व बृहदारण्यकोपनिषद .त्यापैकी, 'बृहदारण्यक'हेहा सर्व उपनिषदांत आकाराने सर्वात मोठे आहे. ईशोपनिषदालाच ईशावास्य उपनिषद असेही म्हटले जाते. 

वाजसनेयी संहितेत,खालील मंत्रांचे एकूण ४० अध्याय आहेत(ओरिसात-४१ अध्याय). ते असे -

अध्याय-

'वाजसेनीय संहिते' चे संपादन व प्रकाशन 'वेबर'(लंडन व बर्लिन,१८५२) आणि इंग्रजीत भाषांतर, राल्फ टी.एच. ग्रिफिथ (बनारस,१८९९) यांनी केले.

कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत.

प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मणे व बहुतेकांसमवेत, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, आरण्यके, उपनिषद व प्रातिशाख्ये संलग्न होते.

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचे तात्पर्य 'यज्ञ' हे आहे.(१)

तैत्तिरीय शाखा : यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैत्तिरीय संहिता आहे. हे नाव ' निरुक्तकार  यास्काचार्य यांंचा शिष्य 'तैत्तिरी' वरून पडले. त्यात ७ अध्याय /कांडांचा समावेश आहे.त्याची  पुढे 'प्रपाठक' व नंतर 'अनुवाक्'म्हणुन विभागणी  झाली आहे. त्यापैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचे स्थान पटकावले आहे. उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात 'रुद्र चमक' आहे आणि १.८.६.१ यात  महामृृत्युंंजय मंत्र. भूः ,भुवः,स्वः हे बीजमंत्र ऋग्वेदातील सवितृ गायत्री मंत्रास जोडले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्ण यजुर्वेदाची तैत्तिरीय पाठ्य असलेल्या शाखेचे सध्या प्रचलन आहे. या शाखेच्या लोकांत आपस्तंब सूत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तिरीय शाखेत, तैत्तिरीय संहिता(७ कांड), तैत्तिरीय ब्राह्मण(३ कांड), तैत्तिरीय (७ प्रश्न) तैत्तिरीय उपनिषद-(शिक्षावली, आनंदवल्ली भृगूवल्ली व महानारायण उपनिषद.

इतर वेदांपेक्षा स्वर व उच्चार या बाबतीत शुक्ल यजुर्वेद फार वेगळा आहे. माध्यंदिन शाखेचे लोक य च्या जागी ज आणि श च्या जागी ख उचारतात. काही वर्ण द्वित्व पद्धतीने उचारतात.अनुस्वाराचा उच्चार विशेष सानुनासिक करतात आणि स्वर मानेने व्यक्त न करता हाताने करतात.

याज्ञवल्क्य' हा 'वैशंपायन ऋषीं'कडून परंपरेनुसार 'वेद शिकला. ते त्याचे मामा होते. त्याचा जन्म हा या कामासाठीच देवदत्त होता असे मानले जाते. तो एकपाठी(एकसंधीग्रही) होता. त्यास एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असे. वेदांच्या निरूपणात(interpretation ) दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले. एका प्रसंगी,'वैशंपायन ऋषी' इतके संतापले की, त्यांनी त्यांंचे ज्ञान परत मागितले.
याज्ञवल्क्य याने ते ओकून टाकले. 'वैशंपायन ऋषी' यांंच्या एका शिष्याने, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचे रूप घेउन ते खाऊन टाकले. म्हणून, यास 'तैत्तिरीय संहिता' असे म्हणतात. गुरूने दिलेले सर्व ज्ञान ओकून टाकल्यावर, याज्ञवल्क्याने सूर्याची आराधना केली व सूर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी सूर्याने घोड्याचे रूप घेतले होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. वैशंपायन  मूळ संहितेला शुक्ल यजुर्वेद आणि ओकून टाकलेल्या ज्ञानातून स्वीकारलेला तो कृष्ण यजुर्वेद अशी मान्यता आहे.

श्री.शकुंतला राव शास्त्री यांचे मत :- देवताविषयक कल्पनांमध्ये ऋग्वेदापेक्षा यजुर्वेदात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ऋग्वेदातील देवतांचीच यजुर्वेदातही आराधना व प्रार्थना असून यज्ञात त्याच देवतांना हविर्भाग अर्पण करण्यास सांगितले आहे. ब्रह्मा,विष्णू व रुद्र या देवतांच्या दर्जामध्ये फेरफार झाला आहे. या देवतात्रयीचे गुणकर्मानुसार पृथकत्व पुराण ग्रंथांमध्ये पूर्णावस्थेला गेले आहे. त्याचा प्रारंभ यजुर्वेदात झालेला दिसून येतो. उपनिषद साहित्यात वाढीस लागलेली एका ईश्वराची कल्पना यजुर्वेदात निश्चित व सप्रमाण मांडली गेली आहे. यजुर्वेदातल्या नीतिविषयक कल्पना ऋग्वेदातील कल्पनांपेक्षा बऱ्याच प्रगत झालेल्या दिसतात. तिथे उच्चतर नैतिक जीवनाबद्दल खरीखुरी तळमळ दिसून येते. ज्ञान, पापाची क्षमा, अमरत्व इ.आध्यात्मिक गुणांच्या प्राप्तीबद्दलच्या प्रार्थना यजुर्वेदात विपुल प्रमाणात आढळतात.

. 

Sanskrit Web Freely downloadable, carefully edited Sanskrit texts of Taittiriya-Samhita, Taittiriya-Brahmana, Taittiriya-Aranyaka, Ekagni-Kanda etc. as well as English translations of the Taittiriya-Samhita etc. 
Albrecht Weber, Die Taittirîya-Samhita 1871 
Ralph Griffith, The Texts of the White Yajurveda 1899, full text, (online at sacred-texts.com) 
A. Berridale Keith, The Yajur Veda - Taittiriya Sanhita 1914, full text, (online at sacred-texts.com) 
Retrieved from 




#Article 53: अथर्ववेद (501 words)


अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णु अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांचीही माहिती आहे. समाजातील सर्व थरांमध्ये, तसेच भारतातील सर्व धर्मांमध्ये अथर्ववेदीय उपासनांचा प्रचार आजही दिसतो.

हा वेद ऋषी अथर्व यांनी लिहीला आहे.
हा वेद सोडून सर्व वेद ब्रह्मदेवाने त्यांच्या मुखातून 
सांगून लिहीले आहे.
याला शंकरदेवाने चौथ्या वेदाच्या रुपात मान्यता दिली.

भारतीय संस्कृती-इतिहासात चतुर्थ वेद म्हणून मान्यता पावलेला,परंतु परंपरागत ब्राह्मण वर्गाने वेद त्रयीमध्ये समावेश करण्यास नाकारलेला अथर्ववेद, यज्ञीय धर्मसाधनेच्या दृष्टीने ऋग्वेदाहून कमी महत्त्वाचा असला, तरी भारतीय लोकसाहित्याचा आद्य स्रोत या दृष्टीने सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तो ऋग्वेदाहूनही अधिक महत्त्वाचा आहे. सर्वंकष समाजाभिमुखता हे अथर्व वेदाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, समाजातील निष्कांचन ग्रामीण जनतेपासून उच्चपदस्थ राजा-महाराजांपर्यंतच्या समस्त वर्गांचा परामर्श या ग्रंथात आढळतो.

अथर्ववेद हा अथर्वन आणि अंगिरस या दोन ऋषि समूहांनी रचला म्हणून यास अथर्वांगिरस असे एक प्राचीन नाव आहे. वैदिक गोपथ ब्राम्हणाच्या लेखनकाळाच्या उत्तरार्धात हा भृगु आणि अंगिरस यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. याखेरीज परंपरेनुसार यातील काही रचनांचे श्रेय हे कौशिक, वसिष्ठ, कश्यप ह्या ऋषींनाही दिले जाते. अथर्वशिरस, घोरस्वरूपी अंगिरस, आथर्वण, क्षत्रवेद, ग्रामयाजिन, पूगयज्ञीय, ब्रह्मवेद, भेषज, भृगु अंगिरस, सुभेषज अशी याची विविध नवे आहेत.

शौनकीय व पैपलाद या अथर्ववेदाच्या दोन शाखा आहेत. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदाने स्पर्श केला आहे.

करण्यव्यूहांनी (शौनकीय) अथर्ववेदाच्या नऊ शाखा सांगितल्या अहेत.

यापैकी केवल शौनकीय शाखा गुजरात अणि बनारस येथे अस्तित्वात आहे, शेवटच्या काही दशकांन मध्ये ही सर्वत्र विस्तारते होते. आणि ओडिशा येथे पैपलाद ही टिकून आहे. अलीकडील काळात यात काही भर घालण्यात आली, परंतु पैपलादीय सहित्य हे शौनकीय साहित्यापेक्षा प्प्राचीन मानले जाते. अनेकदा अनुरूप स्तोत्रांमध्ये दोन आवर्तनामध्ये वेगवेगळे छंद पाहण्यात येतात, किंवा जे दुसर्‍या ग्रंथामध्ये नाहीत असे काही अधिक स्तोत्र एखाद्या प्रतीत आढळतात. पाच कल्पांपैकी संहिताविधी, शांतिकल्प, नक्षत्रकल्प हे काही कल्प स्वतंत्र शाखा म्हणून नसून दाखले म्हणून शौनकीय परंपरेत आढळतात. अथर्ववेदात विविध कालखंडाचे दीर्घ असे ७२ भागांची परिशिष्टे आहेत, त्यांतील बहुतेक सर्व पुराणकालीन आहेत.

अथर्ववेदाच्या उत्तरार्धात वैनतेय सूत्र आणि कौशिक सूत्र अशा दोन संबधित उत्तर संहिता आहेत.वैनतेय सूत्र हे अथर्ववैदिकांच्या श्रौत्र विधींमधील सहभागासंबधित आहे,तर कौशिकसूत्रातील अनेक सुत्रांमध्ये चिकित्सेसंबधित व तंत्रासंबधित माहिती आहे.ह्यांचा उद्देश ऋग्वेदामधील विधानांन समान आहे आणि म्हणुन अथर्ववैदिक साहित्यातिल उपायुक्ततेचा अभ्यास हा वैदिक काळात बहुमुल्य समजला गेला आहे.अथर्ववेदांशी संबधित सुद्धा अनेक उपनिषदे आहेत,परंतु परंपरेमध्ये अलिकडेच सामाविष्ट करण्यातआलेले अढळते. यांमध्ये मुडंक आणि प्रश्न उपनिषद हे सर्वधिक महत्त्वाचे मानले गेले.त्यांतील पहिल्यामध्ये (मुडंकामध्ये)शौनकिय शाखेचा प्रमुख, शौनकांबद्दल महत्त्वाचा सदंर्भ मिळतो, तर नंतरचा(प्रश्न उपनिषदात) हा पैपलादिय शाखेशी संबंधित आहे.

भारतीय अभिचारविद्येचा आद्य स्रोत अथर्ववेदात आढळत असून, या ग्रंथात अंगभूत असणारी आंगिरसी विद्या हे अभिचार अथवा यातुविद्येचेच अन्य रूप होय. अथर्वविद्येतील यातुविद्येचे दोन आवडीचे विषय म्हणजे स्त्रीवशीकरण आणि रणभूमीतील शत्रूंचे निर्दालन हे होत. अभिचार, यातुविद्येसारख्या समस्त बर्‍या-वाईट आचारांची नोंद त्यामध्ये धर्मविधी म्हणून आढळते.

अथर्ववेद आणि त्याच्या कौशिकसूत्र संज्ञक याज्ञिक ग्रंथात वैदिक आर्यांच्या सामान्य जीवनाचे सर्वांगीण दर्शन घडत असून, त्यास पूरक साहित्य गृह्यसूत्रात आढळते. गृह, शेती, पशू, प्रेम आणि विवाह, व्यापार आणि ग्रामीण रीतिरिवाजासंबंधीची या ग्रंथातील माहिती गृह्यसूत्रांच्या तुलनेने सर्वंकष वाटते. अथर्ववेदातील राजकर्मणि सूक्ते, ब्राह्मणहितार्थ प्रार्थना, ब्रह्मशत्रूंना अभिशाप देणारी सूक्ते ही या वेदाची वैशिष्ट्ये आहेत.




#Article 54: सामवेद (340 words)


सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे 'गायन' आणि वेद म्हणजे 'ज्ञान' होय.हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते..

ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यांच्यापैकी एक म्हणजे सामवेद.

साम शब्दाचा पहिला अर्थ प्रिय किंवा प्रियकर वचन असा आहे. कुठे कुठे गान या अर्थानेही तो प्रयुक्त आहे. प्रचलित सामवेदाला हाच अर्थ लागू पडतो. सा च अमश्चेति तत् साम्न: सामत्वम्‌।  (बृहदारण्यक उपनिषद १.३.२२) सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे गांधारादी स्वर होत. दोन्ही मिळून साम होते.

सामवेदात ॠग्वेदातील ॠचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते.  यातील  ७५ ऋचा ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून घेतल्या, तर इतर ७५ या बाष्कल शाखेमध्ये मोडतात. या ऋचांचे गायन-सामगान हे सुचवलेल्या विशिष्ट सुरांमध्ये गायले जाते.  सामगान गाऊन विशिष्ट विधी करतांना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून  दूध व इतर पदार्थाबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई.

सामवेदातील काही ऋचा या इ.स.पू. १७०० च्या आधी (ऋग्वेदाच्या कालखंडात) रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानां अहम् सामवेदोस्मि असे म्हटले आहे,  हा सामवेदाचा गौरवच आहे. कौथुम आणि राणायनीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. ताण्ड्य/पञ्चविंश, षड्विंश, साम विधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद् आणि वंश ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.

गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे.

वेदा हि यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:| वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ऋत्विज वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावे असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचे गायन करण्याचे काम सामवेद्यांचे असते. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.त्यांच्या प्रमुखाला उद्गाता म्हणतात. एखादे साम तयार झाले की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात, ते असे :-

१. प्रस्ताव

२. उद्गीथ

३. प्रतिहार

४.उपद्रव 

५. निधन

सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते त्याला स्तोम असे म्हणतात. साम हे प्राय: तीन ऋचांवर गायले जाते आणि त्याचे तीन पर्याय म्हणजे तीन आवृत्त्या करतात.

सामगानात पदांच्या  १ ते ७ अंकांनी संगीताच्या सात स्वरांचा निर्देश केला जातो. प्राय: अधिकांश मंत्रांमध्ये पाचच स्वर लागतात. सहा स्वरांनी गायिली जाणारी सामे थोडी आहेत आणि सात स्वरांची त्याहून थोडी आहेत.

यात तेरा प्रपाठक असून, सामगायनाचा विधी, त्याचे संकेत आणि त्याच्या पद्धती यांचे हे वर्णन आहे. हे एका प्रकारचे सामवेदाचे व्याकरणच आहे.

  




#Article 55: रमा बिपिन मेधावी (1071 words)


पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.

पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते.  त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १७-१८  वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.

मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते. 

मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. 

इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम  पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या आर्य महिला समाजाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. परंतु तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले.  १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या परंतुप्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.

१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामत: २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.

११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन'(अपंग व दुबळ्या साठी)‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.

आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना' त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.

याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.

त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. 

मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. सत्य तुम्हा समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील बायबल मधील या वचनानुसार पंडिता रमाबाई ज्या स्त्रियांसाठी काम करत होत्या त्या स्त्रियांना सांगितलेल्या ख्रिस्ताच्या  सुवार्ता वर विश्वास ठेवून या स्त्रिया ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करीत होत्या रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरवात केली. 
रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते.  मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.

महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.

अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली  त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’  हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.




#Article 56: राजा राममोहन रॉय (346 words)


राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता,  २२ मे  १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.

पाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या बाराव्या वर्षी जिच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, त्या आपल्या आईच्या आग्रहामुळे, हिंदु धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर  तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले. 

घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले.

मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम ब्रह्मपत्रिकानावाचे वृत्तपत्र सुरू केले.

राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.

राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.




#Article 57: दयानंद सरस्वती (262 words)


स्वामी दयानंद सरस्वती (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत

महर्षी दयानंद सरस्वतींचा जन्म सौराष्ट्रातील मोरबी संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले.

वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी वेदभाष्य लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर संस्कारविधी हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. पंचमहायज्ञविधी या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. गोकरुणानिधी या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.

आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.




#Article 58: जोतीराव गोविंदराव फुले (1595 words)


महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू :  २८ नोव्हेंबर १८९०), इतर नावे: महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स. १८८८ या साली मिळाली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात.

'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती  त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.

ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म  ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव  आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.  कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे  घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. 

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. 

त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद 

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. 

महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने नि उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

Web results
सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू'  हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाही चे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता होती.  यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे.

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :- 

महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. 

या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.

आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.

या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.   

नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल.  दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.

या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.

हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.

विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.

   

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
short चरित्र (मराठी)

 




#Article 59: महादेव गोविंद रानडे (1454 words)


महादेव गोविंद रानडे (जन्म : १८  जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१), हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते, तसेच अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते.१८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.  

निवड  झाली. न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.

महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२(?) साली ते मॅट्रिक तर १८६४ साली  एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली.   त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली. 

न्यायमूर्ती रानडे यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयात कनिष्ठ असलेले दिनशा वाच्छा रानडे यांबद्दल लिहितात :-

म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला.  ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला(बाल विवाह). लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले.  माधवरावांची त्या काळात 'बोलके सुधारक' म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.

काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश  म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.

भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.

दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. त्याआधी इ.स. १८७१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय कॉंग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.
   
न्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इत्यादी अनेक संस्था पुढाकार घेऊन स्थापन केल्या. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले.

विष्णुबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्या काळात समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला. 

माधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही, आणि पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला.

ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी त्या त्या प्रांतातील शिक्षणाची व्यवस्था लावण्यासाठी १८४०मध्ये प्रांतनिहाय शिक्षणमंडळे (बोर्ड ऑफ एज्युकेशन) स्थापन केली. त्यांपैकी मुंबई प्रांताच्या शिक्षणमंडळाचे अध्यक्ष सर आर्स्किन पेरी ह्यांनी मंडळाच्या सभेत उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांत शिक्षणाचे माध्यम केवळ इंग्लिश हेच असेल असा ठराव मांडला. (त्यावेळी महाविद्यालये अथवा विद्यापीठ नसल्याने उच्चशिक्षण ह्या संज्ञेचा अर्थ माध्यमिक शाळांतील शिक्षण असा होता.) ह्या ठरावाला तीन भारतीय सदस्य आणि कर्नल जार्विस ह्यांनी विरोध केला. त्यामुळे पेरी ह्यांचा ठराव लगेच मान्य झाला नाही. परंतु कलकत्ता येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो मान्य केल्यामुळे मुंबई प्रांतातील सर्व माध्यमिक शाळांतून (तत्कालीन चवथी ते सातवी (मॅट्रिक)) ह्या वर्गांत मराठी भाषा वगळता अन्य सर्व विषय मातृभाषेऐवजी इंग्लिशमधून शिकवण्यात येऊ लागले.

चार्ल्स वुड ह्यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई प्रांतातील शिक्षणविषयक व्यवस्थापनाची एक संहिता १८५४ मध्ये तयार करण्यात आली. तिच्यातील एका कलमात शिक्षणव्यवस्थेत देशी भाषांना उत्तेजन देण्याचे कलम असले तरी त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही झाली नव्हती.

१८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठी हा विषय मॅट्रिक ते एम. ए.पर्यंतच्या सर्व परीक्षांना वैकल्पिक म्हणून घेण्याची सोय होती. पण १८५९ ह्या वर्षी झालेल्या विद्यापीठाच्या पहिल्या मॅट्रिक परीक्षेत मुंबई प्रांतातून परीक्षेला बसलेल्या १३२ विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि अनुत्तीर्ण झालेल्या ११० विद्यार्थ्यांपैकी ८९ विद्यार्थी हे मराठी इ. देशी भाषांत अनुत्तीर्ण झाले होते. ह्या प्रकाराची पुनरावृत्ती १८६२ पर्यंत होत राहिल्याने २९ नोव्हेंबर १८६२ रोजी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळापुढे (सिंडिकेट) विद्यापीठाचे कुलगुरू सर अलेक्झॅंडर ग्रॅंट ह्यांनी मॅट्रिक्युलेशननंतर विद्यापीठात केवळ अभिजात भाषाच (उदा. संस्कृत, अरबी, हीब्रू, ग्रीक, लॅटिन) शिकवण्यात याव्यात असा ठराव मांडला. ह्या ठरावाला डॉ. एम. मरे आणि डॉ. जॉन विल्सन ह्यांनी विरोध केला. पण हा ठराव १८६३मध्ये मान्य झाला. त्यामुळे मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व स्तरावर मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन बंद झाले.

१८७० ते १८८७ ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे ह्यासाठी जनमत तयार करण्यासाठी रानडे ह्यांनी प्रयत्न केले. 

तसेच देशी भाषांत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या शासनाने नेमलेल्या रजिष्ट्रार ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स ह्या अघिकाऱ्याशी संपर्क साधून त्या वर्षीच्या अहवालात देशी भाषांत पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण विद्यापीठात ह्या भाषांना स्थान नसणे हे असल्याचे रानडे ह्यांनी नोंदवून घेतले. ह्यावर तत्कालीन भारतमंत्र्यांनी मुंबईच्या गव्हर्नरांना ह्या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केल्याने विद्यापीठाच्या कार्यकारी सभेत (सिंडिकेट) ह्या विषयावर चर्चा झाली. रानडे ह्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. 

१८९७ ह्या वर्षी रानडे ह्यांनी मराठी आणि इतर देशी भाषा ह्यांच्या पुरस्कर्त्यांच्या सह्यांसह पुन्हा एक अर्ज कार्यकारी सभेपुढे मांडला. पण त्यावर चर्चा होऊन ती अनिर्णित राहिली. रानडे ह्यांनी विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ आर्ट ह्या मंडळापुढे तो ठराव मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही पाठिंबा मिळाला नाही. 

१९०० ह्या वर्षी मुंबई प्रांताच्या शिक्षणसंचालकांनी ह्या प्रश्नी विद्यापीठाला पत्र लिहून विचार करण्याची सूचना केली असता बी. ए. आणि एम. ए. ह्या परीक्षांना नेमण्यासाठी देशी भाषांतील पुस्तके सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने मराठीतील अशा पुस्तकांची यादी सादर केल्यावर २९ जानेवारी १९०१ ह्या दिवशी (रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या १३ व्या दिवशी) सिनेटच्या बैठकीत विद्यापीठाच्या परीक्षांत देशी भाषांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.  हा प्रस्ताव मांडणारे सदस्य चिमणलाल सेटलवाड ह्यांनी रानडे ह्यांच्या निधनाने झालेल्या हानीचा उल्लेख करून सदर प्रस्तावासंदर्भात रानडे आणि आपण ह्यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेखही केला. ह्या सभेत हा प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला. त्यायोगे मॅट्रिकप्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय विकल्पाने उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती आणि उत्तरेही इंग्लिशमध्येच देण्याची अट होती.

रानडे यांनी १६ जानेवारी १९०१च्या रात्री जस्टीन मेकार्थी याचे ‘हिस्ट्री ऑफ अवर ओन टाईम्स’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तक वाचायला बसले नाहीत तोवर त्यांना त्रास सुरु झाला व त्यांची जीवनयात्रा संपली. 

 




#Article 60: गोपाळ गणेश आगरकर (1286 words)


गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली.  दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली.

१८८८ साली त्यांनी  'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.

गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे  अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत

आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.

राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी  ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला

आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.  
 
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी  त्यांचे  निधन झाले. 

१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.

आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.

१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण. 

अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``

आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.``

यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,
``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेऊन संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत``

आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती.




#Article 61: धोंडो केशव कर्वे (1225 words)


धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे, (जन्म : १८ एप्रिल १८५८; मृत्यू : ९ नोव्हेंबर १९६२) यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव  र. धो. कर्वे हे होत.  त्यांनीदेखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. भारतामध्ये च्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले या काळामध्ये त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं समाजाकडून त्यांची उपेक्षा केली गेली. सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने या काळामध्ये स्वीकारला नाही. मात्र त्यांचा हा विचार नक्कीच स्पृहणीय होता काळाची पावले ओळखणारे असे हे समाजसुधारक होते.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. 

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. 

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून  इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह  ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली.  विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये  पुनर्विवाह साठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.

स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या 

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचेच नाव पुढे '`महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' (थोडक्यात, कर्वे शिक्षण संस्था) असे झाले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.

अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.

जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे झाले.

अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.

मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.

त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९१०1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.

इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.

इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली.  त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.

आज २०१९ सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी 'हिमालयाची सावली' नावाचे नाटक लिहिले आहे. 




#Article 62: अंकगणित (499 words)


अंकगणित ही गणिताची एक प्रमुख शाखा आहे. यात अंक व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो

मुलभूत अंकगणितामधे संख्याच्या गुणाकार व भागाकारविषयक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. बीजगणितीय अंकगणित (अल्जेब्राईक नंबर थिअरी) नामक याची एक शाखा असून तीमधे केवळ नैसर्गिक संख्या वा कॉम्प्लेक्स संख्यांचा (= काम्प्लेक्स नंबर्स) अभ्यास न करता अनेक अमूर्त संख्यांचाही अभ्यास केला जातो. आधुनिक अंकगणित हे बीजगणितीय भूमिती (अल्जेब्राईक जिअोमेट्री), कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांसोबत अत्यंत मुळापासून जोडलेले आहे.

जगप्रिद्ध फर्माचा शेवटचा सिद्धांत व गोल्डबाखचे तर्कीत (गोल्डबाखचे कंजक्चर) हे गणितातील प्रश्न मुळात अंकगणितातीलच आहेत. मुंबईमधील टाटा मूलभूत-संशोधन-केंद्र हे अंकगणित, बीजगणितीय भूमिती, कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांतील त्यांच्या संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे.

अंकगणित : अंकगणितात प्रामुख्याने धन पूर्णाकांच्या (म्हणजे १, २, ३, ४... या नेहमीच्या स्वाभाविक संख्यांच्या) गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. धन पूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इ. गणितकृत्ये तसेच क्षेत्रफळ, घनफळ, व्याज, सरासरी, शेकडेवारी इ. व्यवहारोपयोगी प्रश्नांमध्ये उपयुक्त असणारी सूत्रे व त्यांचा वापर करण्याच्या विविध पद्धती यांचा अंक गणितात विशेष उपयोग होतो. अंकगणितात वापरली जाणारी सूत्रे तर्क कठोरपद्धतीने सिद्ध करण्यावर फारसा भर दिला जात नाही तर ती गृहीत धरून त्यांचा नित्य व्यवहारातील प्रश्न सोडविण्यासाठी कसा उपयोग करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. संख्यांच्या व्याख्या आणि त्यांचे गुणधर्म यांचा ⇨संख्या सिद्धांत या गणितीय शाखेत विचार करण्यात येतो व या दृष्टीने अंकगणित हे संख्या सिद्धांताचे प्राथमिक स्वरूप आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

 

संच या संकल्पनेच्या आधारे धनपूर्णांक व यांची बेरीज म्हणजे काय हे सुलभतेने मांडता येते. १, २, ३, ४,... ही अंक चिन्हे सुपरिचित आहेत. त्यांच्या संचास ध म्हणतात. आता कोणत्याही दिलेल्या संचास किती घटक आहेत हे कसे मोजतात ते पाहू. समजा का या संचात या चिन्हांनी निर्देशित असे घटक आहेत. म्हणजेच का = { } या संचातील कोणताही एक घटक घेऊन त्याच्याशी १ या अंकचिन्हाची जोडी लावली. नंतर दुसरा घटक घेऊन त्याच्याशी २ या अंकचिन्हाचा संबंध जोडला आणि राहिलेल्या घटकाशी ३ ची जोडी जमवली. अशा प्रकारे दिलेल्या का या संचाशी {१, २, ३} या ध च्या उपसंचाशी एकास-एक संबंध प्रस्थापित झाला. उपरोक्त उपसंचातील शेवटचे अंकचिन्ह ३ म्हणजेच का मधील घटकांची संख्या होय. हेच, का चा संचांक ३ आहे असेही मांडतात. याचप्रमाणे दुसऱ्या एखाद्या खा संचांक {१, २, ३..., १०, ११} या ध च्या उपसंचाचा एकास-एक संबंध जोडता येत असेल तर खा मध्ये ११ घटक आहेत किंवा खा चा संचांस ११ आहे असे म्हणता येईल. याच पद्धतीने कोणत्याही दिलेल्या संचासाठी संचांक (म्हणजे त्यात असलेल्या घटकांची संख्या) काढता येईल. यामध्ये संचातील वस्तू कोणत्या प्रकारच्या आहेत याला महत्त्व नाही हे सहजच लक्षात यावे [→ संच सिद्धांत].

 

आता दोन धन पूर्णांकांची बेरीज म्हणजे काय ते पाहू. समजा का आणि खा हे दोन वियुक्त संच आहेत (म्हणजेच या दोन संचांमध्ये कोणताही घटक समाईक नाही). या का आणि खा या दोन संचांचे सर्व घटक एकत्रित करून गा हा संच बनवला तर गा ला का आणि खा यांचा युतिसंच असे म्हणतात, व तो का U खा असा दर्शवतात. या युतिसंचातील घटकांच्या संख्येस (का U खा च्या संचांकांस) ग म्हटले, आणि का, खा चे संचांक अनुक्रमे क आणि ख आहेत असे मानले तर ग ही संख्या क आणि ख ची बेरीज आहे असे म्हणतात, आणि हेच ग = क + ख असे लिहितात.




#Article 63: भूमिती (296 words)


भूमिती (ग्रीक: γεωμετρία ; इंग्रजी: Geometry, जॉमेट्री / जिऑमेट्री ; अर्थ: भू -जमीन, मिती -मापन ;) ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म अभ्यासणारी गणिताची एक शाखा आहे. ज्ञात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखांमधील सर्वाधिक प्राचीन शाखांमध्ये भूमितीची गणना होते. आरंभिक कालखंडात लांबी, क्षेत्रफळ व घनफळ इत्यादी गुणधर्मांच्या व्यावहारिक अभ्यासापर्यंत सीमित असणाऱ्या भूमितीला इ.स.पू.च्या ३ ऱ्या शतकात युक्लिड या ग्रीक तत्त्वज्ञाने केलेल्या विषयाच्या संगतवार मांडणीमुळे सैद्धान्तिक बैठक मिळाली. आर्किमिडीज या ग्रीक पदार्थवैज्ञानिकाने याने क्षेत्रफळे आणि आकारमान मोजण्यासाठी  आधुनिक पूर्णांकी गणन पद्धतीचे तंत्र कुशलतेने विकसित केले . खगोलशास्त्रामुळे, विशेषत: ग्रहताऱ्यांची आकाशातील स्थाने निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींमधील परस्पर संबंध मांडून दाखवण्यासाठी पुढची दीड हजार वर्षे भूमितीचा उपयोग केला गेला. पूर्वीच्या काळी युरोपात भूमिती आणि खगोलशास्त्र हे सात कलांमध्ये गणले जात. 

रेने देकार्त याने लावलेला निर्देशकांचा (coordinates) शोध आणि त्याच दरम्यान लागलेल्या बीजगणितातील शोधांमुळे वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचे गणिती समीकरणांद्वारे विश्लेषण करणे शक्य झाले. या शोधांनी १७ व्या शतकात अतिसूक्ष्म कलनशास्त्राचा (infinitesimal calculus) विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे जाउन त्रिमितीदर्शनाद्वारे असे दिसून आले की भूमितीचा उपयोग केवळ आकृत्यांच्या मोजमापापुरता मर्यादित नाही. यातूनच पुढे प्रक्षेप भूमितीचा (projective geometry) विकास झाला. पुढे ऑयलर आणि गाउस यांनी भौमितिक वस्तूंच्या अंगभूत संरचनेचा अभ्यास करून भूमितीशास्त्रात मोलाची भर टाकली. यातूनच topology आणि अवकल भूमितीची (differential geometry) मुहूर्तमेढ रोवली गेली.

युक्लिडच्या काळात भौतिक आणि भौमितिक अवकाशातील सीमारेषा सुस्पष्ट नव्हती. एकोणिसाव्या शतकात अयुक्लिडीय भूमितीचा शोध लागल्यापासून अवकाश या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाले आणि त्यातून भौतिक अवकाशाला भौमितिक अवकाशाची कोणती संकल्पना जुळेल असा विचार सुरु झाला. विसाव्या शतकात गणिताचा अधिकृतरित्या उदय झाल्यानंतर अवकाश या संकल्पनेचा नैसर्गिक आशय लुप्त झाला त्यामुळे भौतिक, भौमितिक आणि अमूर्त अवकाश यांमध्ये फरक करणे आवश्यक झाले. सध्या भूमितिमध्ये  (असे अवकाश कि जे युक्लिडीय अवकाशापेक्षा बरेच वेगळे असते, पण लहान प्रमाणात युक्लिडीय अवकाशाशी मिळतेजुळते असते) या संकल्पनेचा विचार केला जातो. आधुनिक भूमितीचा भौतिकशास्त्राशी खूप ठिकाणी संबंध येतो, उदा. सापेक्षता सिद्धांत आणि कृतक-रीमानीय (pseudo-Riemannian) भूमिती. 




#Article 64: त्रिकोणमिती (312 words)


त्रिकोणाच्या, विशेषतः काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या गणितशाखेस त्रिकोणमिती असे म्हणतात. प्राचीन काळापासून खगोलशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र, अंतर - मापन यासाठी त्रिकोणमितीचा वापर होतो. पृष्ठीय त्रिकोणमितीच्या संकल्पना वापरून गोलीय तसेच वक्र भूमितीचा अभ्यास करता येतो. या दोन शाखांचा संकर करून गोलीय त्रिकोणमिती ही शाखा निर्माण झाली आहे.भूमिती त्रिकोणमिती कल्पना ईसापूर्व तिसर्‍या शतकात आली. ती भूमिती आणि खगोलशास्त्रीय अभ्यासांच्या अनुप्रयोगांमध्ये वापरली जात होती. भारतीयांनी त्रिकोणमितीय प्रमाणातील सर्व मूल्ये मिळवण्यासाठी एक तक्ता तयार केला. आमच्या इतिहासात भूगर्भीय, सर्वेक्षण, खगोलीय यांत्रिकी, नॅव्हिगेशन, व्हिडिओ गेम्स, बुल्डींग्जची उंची मोजण्यासाठी इत्यादी सारख्या अनेक फाईलमध्ये त्रिकोणमिती लागू केली जाते. ट्रिंगोमेट्री संबंध आणि ओळख म्हणून ओळखली जाते जी सर्वत्र स्वीकारली जाते. त्रिकोणमिती कार्ये दरम्यान नवीन संबंध मिळविण्यासाठी कोणीही त्रिकोणमिती ओळख वापरू शकतो.

इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात, युक्लिड आणि आर्किमिडीज सारख्या गणितांनी वर्तुळांमधील जीवा आणि कोरलेल्या कोनांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. ते आधुनिक त्रिकोणमितीक सूत्राच्या बरोबरीचे सिद्धांत सिद्ध करण्यास सक्षम होते. त्यांनी सूत्रांचे पुरावे भूमितीय पद्धतीने सादर केले. इ.स. १४० बी.सी मध्ये हिप्परकसने त्रिकोमिती आणि गोलाकार त्रिकोणमितीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जीवाचे प्रथम तक्ते (जे आता साइन व्हॅल्यूजचे टेबल म्हणून वापरले जातात) दिले. दुसर्‍या शतकात ग्रीको-इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी तपशीलवार त्रिकोणमितीय सारणी तयार केली .त्यांनी त्रिकोमिती कार्याची व्याख्या करण्यासाठी जीवाची लांबी वापरली (जी आपण आज गणनामध्ये वापरतो).आधुनिक साइन संमेलनाची प्रथम साक्षात सूर्यसिद्धांतात झाली. भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी इ.स.५ व्या शतकात याची आणखी स्थापना केली. दहाव्या शतकात, इस्लामिक गणितज्ञ सर्व सहा त्रिकोणमितीय कार्ये वापरत होते, त्यांचे मूल्ये मांडले होते, आणि त्यांना गोलाच्या भूमितीतील अडचणींवर लागू करीत होते.

त्रिकोमितीचा वापर गणिताच्या प्रमुख शाखांमध्ये वाढला. हे नेव्हिगेशनमध्ये वापरले जाते.१५९५ मध्ये त्रिकोनोमेट्रिया प्रकाशित करून बार्थोलोमियस पिटिसकस हा शब्द वापरणारा सर्वप्रथम होता. आज गेममा फ्रिशियस पहिल्यांदाच त्रिकोणीकरणाची पद्धत वर्णन करते जी आज सर्वेक्षणात वापरली जाते. १७ व्या शतकात स्कॉटिश गणितज्ञ जेम्स ग्रेगरी आणि कोलिन मॅकलॉरिन यांनी काम केले.  १८ व्या शतकात ब्रूक टेलरने सामान्य टेलर मालिकेची व्याख्या केली.

समीप आकृतीमध्ये () कोन. अ (विरुद्ध), ब (समीप) आणि एच (कर्ण) बाजू

 = अ/एच

 = ब/एच

 = अ/ब




#Article 65: त्रिभुज प्रदेश (220 words)


त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते : 

नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.

सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, र्‍हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत.




#Article 66: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (394 words)


बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (जन्म : धरणगाव, १३ ऑगस्ट १८९०; मृत्यू : जळगाव, ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते.  इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबऱ्यांना बालकवी ही उपाधी दिली. 

बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी  रेव्हरंड नारायण वामन टिळक  यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह.ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे.

बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते. 
मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल. 

विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमानुष व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे.

बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.

जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले. 




#Article 67: संंत तुकाराम (1649 words)


 

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात.  वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात.  त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. 
  
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. वि. का. राजवाडे यांनी  संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे. संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात, संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले (की आंबिले?) आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती.  पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे  आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..

तुकारामांचा  सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर  मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या  गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.  तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. 

समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले. 

संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. 

संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत.

संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.  

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत. 

महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे ज्यू बहुजनांच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. देव-धर्म प्रथेपुढे समाज गांजलेला होता. अंधश्रद्धेने सारा समाज पोखरला होता. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आला. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे. 

ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. 

संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला विरोधक नमले परंतु अभंग, अभंग राहिले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकर चा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले. 

तुकारामांचे ’तुकारामबाबांचे चरित्र’ नावाचे मराठीतले पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी इ.स. १८९६ साली लिहिले. ’आध्यात्मिक ज्ञान रत्‍नावली’ नावाच्या मासिकात हे चरित्र क्रमश: प्रसिद्ध झाले होते.  न्यायमूर्ती रानडे यांनी या चरित्राचे कौतुक केले होते. दक्षिणा प्राईज कमिटीने या पुस्तकाला पहिले बक्षीस दिले होते. चमत्कारांवर भर न देता संत तुकारामांचे थोरपण या पुस्तकात सांगितले आहे. २०१५ साली औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने या पुस्तकाची ’संत तुकाराम’ या नावाची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके - 

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंडमध्ये वास्तव्य असलेल्या चित्रकार, शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध (पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.




#Article 68: सुधीर फडके (385 words)


रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या प्रभात चित्र संस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले. 

त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर () वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले.  या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे.  पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४)

कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे  :

एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :

सुधीर फडके यांच्या कारकीर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीतरामायण. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी अर्थामध्ये एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात. 

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले.

१. राष्ट्रपती पदक (१९६३) - हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
२. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२)
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)

सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम होत असतात, त्यांपैकी काही हे :- 




#Article 69: जगदीश खेबुडकर (418 words)


जगदीश खेबुडकर (मे १०, इ.स. १९३२ - मे ३, इ.स. २०११) हे मराठी गीतकार होते. 

खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस..  हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले.  त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या  सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.

त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.

त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.

त्यांच्या कारकीर्दीत  भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६  दिग्दर्शक, वसंत पवार ते  शशांक पोवार असे ४४  संगीतकार आणि सुधीर फडके ते  अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले. 

इ.स. १९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा  रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये रंगतरंग व इ.स. १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली. 

जगदीश खेबुडकर यांना ६०हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 




#Article 70: यशवंत देव (181 words)


यशवंत देव(१ नोव्हेंबर १९२६-३० ऑक्टोबर २०१८)  हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक होते.

यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले.  जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

यशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या कथा ही रामजानकीची या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.

 




#Article 71: शिव्या (720 words)


__विनाक्रमीत__
शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा प्रभाव दिसून येतो. साहित्यात किंवा लिखित स्वरुपात शिव्या उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणाऱ्या शिव्या या भ या शब्दापासून सुरू होतात म्हणून कोणी यास भकार शब्द असेही म्हणतात.

रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची, किंवा परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी दिली जाते. कधीकधी कारण नसताना पुरूषार्थाचा, पुरूष असण्याचा भाग म्हणून किंवा शाब्दिक सवयीचा भाग म्हणूनही शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, समूह वा परिस्थिती यांच्या स्त्री नात्यांच्या संदर्भात संभोग वा लिंगनिदर्शक समाज अमान्य अशी वाचिक क्रिया शिवी देताना केली जाते. 

प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे.  
 
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरुन देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत: या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हटले जाते.

भारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाति-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते.

कृपा करून अशा शिव्या (विशेषतः जातिवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपीडियावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातिवाचक शिव्या हा विभाग पहा.'

गाढव, नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चावट, कृतघ्न, बावळट, मूर्ख, बेअक्कल, पागल

(या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) असभ्यता उदाहरणे

                                                    

हे दोन्ही शब्द शिंदळीच्या आणि रांडेच्याची लघुरुपे आहेत. शिंदळीचा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर रांडचा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.)

अनौरस पुत्राला कोकणात 'अक्करमाश्या' असे बोलीभाषेत म्हटले जाते. मराठीतील कादंबरीकार श्री.ना. पेंडसे यांच्या लेखनात हा शब्द सापडतो.

कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS'  असा लांब मोठ्या आवाजात सुर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरूद्ध बाजूने (तळहाताची विरूद्ध बाजू) सुर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते).
बोंब मारणे आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणाऱ्या शिमगा सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या होळी भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते.  महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे. 

(या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) शिमग्यातील असभ्यता उदाहरणे

 

समोर दिसलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याक्षणीचे त्याचे हावभाव किंवा हातातल्या कामाचा उल्लेख करत *** करतंय कोण, त्याच्या ***त *** दोन  अशा किंबहुना अधिक अश्लील शिव्यांचा समावेश असे. 

'साला' हा वस्तुत: 'मेहुणा' (अर्थात 'बायकोचा भाऊ'; 
बहिणीचा नवरा' नव्हे.) या अर्थीचा हिंदी भाषेतील शब्द आहे. 'बायकोचा भाऊ' अशाच अर्थाने याचेच 'साळा' हे रूप मराठी भाषेतही काही भागांत/काही समाजांत प्रचलित आहे.

हा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून का गणला जातो याचे एक सुंदर स्पष्टीकरण श्री. खुशवंत सिंह यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' या पुस्तकात आढळते.

थोडक्यात स्पष्ट करावयाचे झाल्यास, प्रत्यक्षात नात्याने बायकोचा भाऊ नसलेल्या व्यक्तीस, अशा व्यक्तीची बहीण ही शिवी देणाऱ्यास पत्नीसमान आहे हे सुचवण्यामागील अध्याहृत गर्भितार्थामुळे हा वरकरणी साधा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून गणला जातो.

महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत हा शब्द शिवीबरोबरच एखादे हलके संबोधन म्हणून सर्रास वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी, नाटक चित्रपटांत या शब्दाचा वापर सहजगत्या केलेला आढळतो.

उदा.: चित्रपटातील एक गीत-पप्पू कांट डान्स साला

मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे.

उभ्या बाजारात कथा। हे तो नावडे पंढरीनाथा।।
अवघे पोटासाठी सोंग। तेथे कैचा पांडुरंग।।
लावी अनुसंधान। काही देईल म्हणून।। 
काय केले रांडलेका। तुला राजी नाही तुका।। २४७८

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥
तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥
थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७॥




#Article 72: हृदयनाथ मंगेशकर (178 words)


 (ऑक्टोबर २६, १९३७ - हयात) हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत.

त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत.

त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात.




#Article 73: लता मंगेशकर (1251 words)


लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकराना भारतीय कोकिळा (Indian Nightingale) म्हणतात.

'भारतरत्‍न'पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील त्या पहिल्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला. 

लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्zwnj;समध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे.

लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.

लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या.  त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.

इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज अतिशय बारीक म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील मराठी उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.

लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)

१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.

इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.

१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.

इ.स. १९६१ मध्ये लताने  सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून  बर्मनदादांसोबत  पुन्हा वाटचाल सुरू केली.

इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार  पटकावला.

२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत  भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.

इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी  बर्मनदादांची  अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.

इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या  लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि  हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

अभिजात संगीतातलेउस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.

लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले आहे.




#Article 74: उषा मंगेशकर (168 words)


 (१९३५ - हयात) या मराठी गायिका, संगीतकार आहेत.त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या.  ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी, लागली कुनाची उचकी ही चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत.पंडित दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती (शुधामती) यांची  ती सर्वात लहान मुलगी . लता मंगेशकर, आशा भोसले आणि मीना खाडीकर यांच्यामधील ती सर्वात लहान बहीण आणि संगीत-दिग्दर्शक भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी बहीण  आहेत. ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जय संतोषी मां (1975)' साठी कमी बजेट असलेल्या चित्रपटासाठी काही भक्तीगीते गायल्यानंतर त्या  पार्श्वगायिका म्हणून चर्चेत आलया . त्या चित्रपटातील त्यांच्या  मै तो  आरती गाण्यासाठी त्यांना  फिल्मफेअर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. २००६ मध्ये त्या चित्रपटाच्या रीमेकसाठी त्यांनी तीच गाणी गायली.

उषा यांना  चित्रकलेची आवड आहे. त्यांच्या मुंगडा या प्रसिद्ध गाण्यासाठी आणि पिंजरा या मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी त्या प्रामुख्याने ओळखलया  जातात .

त्यांनी दूरदर्शनसाठी 'फूलवंती' संगीत नाटकही तयार केले होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पुरस्कार लता दीदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.




#Article 75: दीनानाथ मंगेशकर (635 words)


दीनानाथ गणेश मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.

दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थानाच्या संरक्षणासाठी त्यांनी अभिषेकी हे आडनाव घेतले. गणेशभट आणि येसूताई अभिषेकी यांना चार अपत्ये झाली; दीनानाथ थोरले, नंतर विजया (विजया कृष्णराव कोल्हापुरे), मग कमलनाथ आणि शेवटची देवयानी. दीनानाथांची दोन्ही लहान भावंडे अल्प वयातच वारली. 

गोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.

इ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.  

गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले.

मा. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले.

या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचे होते. ‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती.

दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. इ.स. १९२२ साली  इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती.  सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर (वादी-संवादीच्या फरकाने) कसे तेच आहेत (उदा० देसकार-भलप-तोडी-मुलतानी) वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले.

 

दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे.  त्यांचे नाव असलेल्या काही संस्था  :

दीनानाथ मंगेशकर याच्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात.

दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर ’स्वरमंगेश’ नावाचा माहितीपट आहे. माहितीपट एक तास सतरा मिनिटांचा असून त्याची संकल्पना, त्याचे लेखन. दिग्दर्शन शैला दातार यांचे आहे. विक्रम गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर आणि संगीत समीक्षक अशोक रानडे आदींचे या चित्रपटात निवेदन आहे.

दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार,  (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमी  पुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतात.
पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.

(अपूर्ण)




#Article 76: उन्हाळा (162 words)


उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान उष्ण आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते.

भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते .

सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७० सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.भारताच्या इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. राजस्थानमध्ये ४९० इतके तापमानही राहते.fuhfggfhjjhhhhgftujj

लोकसंख्यावाढ, त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, जमिनीवर झालेल्या रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून  प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण, इत्यादी कारणे आहेत.
 




#Article 77: पावसाळा (305 words)


 जगभरातील विविध देशातील  तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते.  पर्यटन संस्थेने त्याला हिरवा ऋतू (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले आहे.
अरबी शब्द मौसम यापासून मान्सून असा शब्द तयार झाला आहे. मौसम याचा अर्थ ऋतू असा आहे.

Rainy जगातील विविध ठिकाणी पावसाळ्याचे-पर्जन्यमानाचे  वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.प्रमाण वेगळे आहे.  काही देशात केवळ एकदाच पावसाळा असतो तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. उष्ण कटिबंधात पावसाळा अधिक प्रमाणात असतो, कारण  दिवसभर  असलेल्या सूर्याच्या प्रखरतेमुळे हवेत असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्याचे रूपांतर पाण्यात होऊन संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते.विषुववृत्तीय परदेशात वनांच्या परदेशात पावसाळा असा स्वतंत्र ऋतू नसून तेथे वर्षभर पाऊस पडत असतो.

भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाळ्याचे महत्त्व भारतात विशेष आहे.  
दक्षिणेतील समुद्रात तयार होणार-या हवेच्या कमी दांबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. याचे परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो ज्याला मान्सून असे म्हटले जाते.यामुळे भारताचा विचार करता अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो.

प्रामुख्याने उष्ण परदेशातील गवताळ भागात वनस्पतींची वाढ होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे पावसाळ्यात असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अन्नधान्याची मुबलकता तुलनेने कमी असते. पावसाळ्यानंतर भरभरून पिके आल्यानंतर हा तुटवडा कमी होतो. 

पावसाळ्याच्या सुरुवातीला गायी ,म्हशी गरोदर (गाभण) रहातात तसेच वासरांना जन्म देतात. परदेशातील मेक्सिकोसारख्या प्रांतात फुलपाखरे स्थलांतर करतात. मासे,विविध प्रकारच्या बुरशी, बेडूक , आळंबीचे विविध प्रकार यांच्या वाढीचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. 

पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणे, त्यांच्या किना-यावरील प्रदेशाचे नुकसान होणे, पर्वतीय प्रदेशात भूसख्लन होणे  अशा आपतींना सामोरे जावे लागते.

भारतातील जैवविविधता आणि पावसाळा यांचे समीकरण आहे. भारताच्या विविध प्रांतात पावसाळ्यात वाहणारे धबधबे,पश्चिम घाटातील निसर्गाचा हिरवेपणा याचा अनुभव घेता येतो.पावसाळ्यात येणार-या रानफुलांनी  फुलणारं महाराष्ट्रातील सह्याद्रीचे पठार (सातारा जिल्ह्यातील कास पठार)प्रसिद्ध आहे.  श्रावण महिन्यात भारतातील विविध राज्यात महिला आनंदाने सण आणि उत्सव साजरे करतात. 




#Article 78: वसंत (522 words)


 भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसन्ताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसन्ताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसन्त ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत.वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते.

मात्र, वसन्त पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसन्तोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते. 

इंग्रजीमध्ये वसन्त ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात.वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते.युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसन्त ऋतूचे असतात, तर ऑस्ट्रेलियातील वसन्त ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेम्बर महिन्यांत येतो.

वसन्त हे वासुदेव बळवन्त पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले टोपणनाव आहे. 'वसन्त' हे दत्तप्रसन्न काटदरे यांनी चालवलेले मराठीतील एक दर्जेदार मासिक होते. 

वसन्ताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो.  सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌  कुसुमाकरः' असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. कवीश्वर जयदेव तर वसन्त ऋतूचे वर्णन करताना थकलाच नाही. 

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौन्दर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.

मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक अशी अजब जादू आहे की, तो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तात्काळ पुरेसे विस्मरण करवितो.  जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो.

निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात  गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो.

निसर्ग सुखदुःखाच्या द्वन्द्वापासुन दूर आहे. वसन्त असो अथवा वर्षा, वेगवेगळ्या रूपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभुस्पर्श प्राप्त करून फुलून उठतो. जीवनातही जर प्रभूचा स्पर्श झाला, प्रभूचा हात फिरला तर सम्पूर्ण जीवनच बदलून जाईल, जीवनात वसन्त फुलून उठेल आणि जीवनातून दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणभरात दूर होईल.

प्रभुस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतू असतो आणि तो म्हणजे वसन्त! त्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहाते आणि ती म्हणजे यौवन!

परन्तु निसर्गाची सुन्दरता व मानवाची रसिकता
ह्यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाला नाही तर ही
सुन्दरता व रसिकता विलासाचा मृदुल पन्थ निर्माण
करून मानवाला विनाशाच्या गर्तेतदेखील ढकलून
देईल. म्हणूनच वसन्ताच्या संगीतांत गीतेचा सूर
मिसळला पाहिजे.

वसन्ताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक
आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत
नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात,
पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.

वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम.
कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. खर्‌या
महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणा‍र्‌या
साधनांचे फारच महत्त्व असते. तो केवळ कल्पनात
रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक
जीवनापासून जरादेखील वर पाहू नये इतका जडही असत
नाही.

जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला
आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त
फुलतो तो सन्त!

यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव्य,
जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन ह्या
सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौन्दर्य,
संगीत व स्नेह प्रकट करणारा वसन्त आपल्या जीवनात
साकार बनला तरच आपण वसन्ताच्या वैभवाला जाणले,
अनुभवले व पचवले असे म्हणता येईल.




#Article 79: ऋतू (485 words)


ऋतू हा हवामानावर आधारलेला असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला भाग आहे.

प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
उदा. उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात, कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंध प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र भारतामधील वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.

विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पृथ्वीचा अक्ष पृथ्वीचे भ्रमण प्रतल|पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण कक्षेशी] काटकोनात नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर पडणारे सूर्याचे किरण कमीअधिक तिरपे पडतात. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात. 

ऋतूंमध्ये होणारे हवामानातील किरकोळ बदल इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. उदा० पृथ्वीची गती (परिवलन आणि परिभ्रमण), सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता, समुद्र किंवा मोठी सरोवरे, गल्फ स्ट्रीम, एल निनो सारखे समुद्रातील प्रवाह, आणि वाऱ्यांचे प्रवाह, वगैरे. या गोष्टी हवामानावर परिणाम करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे - जागतिक तापमानवाढ किंवा .

जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात. 
उदा०.भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतीकात्मक आहेत.

किंवा, 

पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात वर दिलेल्या ऋतूंच्या तारखा आणि महिने बदलले गेले असण्याची शक्यता आहे. परंतु परंपरा फारश्या बदलेल्या नाहीत. 

उत्तर ऑस्ट्रेलिया प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये सुका ऋतू आणि ओला ऋतू (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात, ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. प्राचीन इजिप्तमध्ये तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू.

त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे टोर्नाडो अ‍ॅली या अमेरिका देशातील भागामध्ये उत्तर हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंत टोर्नाडो वादळाचा ऋतू असतो. भारतातही मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या चार महिन्यांच्या काळाला चक्री वादळाचा ऋतू म्हणतात.

भूमध्यसागरी हवामान असणाऱ्या प्रदेशांमध्ये (उदा. पश्चिम ऑस्ट्रेलिया, कॅलिफॉर्निया किनारपट्टी आणि स्पेन, वगैरे) उन्हाळातील वणव्यांचा ऋतू असतो. चक्रीवादळांचा ऋतू उत्तर वसंताच्या आसपास सुरू होतो. पूर्वोत्तर प्रशांत महासागरी प्रदेशांमध्ये हा ऋतू मे १५ तर उत्तर अटलांटिक प्रदेशांमध्ये जूनच्या एक तारखेला सुरू होतो.

प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काहीशे किंवा काही हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्त्वाची ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ यांमधील हवामान एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटरपर्यंत वाढविल्यास विविधता आणखी वाढते. 

वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. पैकी शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग आहेत.




#Article 80: निसर्ग (299 words)


निसर्ग  देवाने  दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे .निसर्गामध्ये  हवा ,पाणी, वृक्ष  यांचा समावेश होतो.नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. निसर्ग भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानांचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असत, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजली जाते.

निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा, किंवा आवश्यक गुणधर्म, जन्मजात स्वभाव पासून प्राप्त झाला आहे आणि प्राचीन काळात शाब्दिक अर्थ जन्म असा होतो. [1] Natura ग्रीक शब्द फिजिस (φύσις) चा एक लॅटिन अनुवाद आहे, जो मूळतः वनस्पती, प्राणी आणि इतर वैशिष्ट्यांसह अंतर्गत मूलभूत वैशिष्ट्यांशी संबंधित आहे. [2] [3] निसर्गाची संकल्पना, संपूर्ण भौतिक विश्वाची मूळ कल्पना ही अनेक कल्पनांपैकी एक आहे; हे -ύσις शब्दाच्या काही मूलभूत अनुप्रयोगांसह प्रारंभिक-तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञानींनी सुरू केले आणि त्यानंतरपासूनच चलन प्राप्त केले आहे. गेल्या काही शतकांमध्ये आधुनिक वैज्ञानिक पद्धतीच्या प्रारंभामध्ये हा उपयोग चालू राहिला. [4] [5]

आजच्या शब्दांच्या विविध उपयोगांमध्ये, निसर्ग सहसा भूगर्भ आणि वन्यजीव याचा संदर्भ देते. निसर्ग जिवंत वनस्पती आणि प्राण्यांचे सामान्य क्षेत्र आणि काही प्रकरणांमध्ये निर्जीव वस्तूंशी संबंधित प्रक्रियांचा संदर्भ घेऊ शकतो - विशिष्ट प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात असतात आणि पृथ्वीच्या हवामान आणि भूगर्भशास्त्र यासारख्या गोष्टी त्यांच्या स्वतः च्या बदलानुसार बदलतात. नैसर्गिक पर्यावरण किंवा वाळवंटातील जंगली प्राणी, खडक, जंगल आणि सर्वसाधारणपणे त्या गोष्टी ज्या मानवी हस्तक्षेपाने मोठ्या प्रमाणात बदलल्या नाहीत किंवा मानवी हस्तक्षेपानंतरही टिकत नाहीत. उदाहरणार्थ, उत्पादित वस्तू आणि मानवी परस्पर सहसा निसर्गाचा भाग मानले जात नाहीत, जसे की, मानवी स्वभाव किंवा संपूर्ण निसर्ग म्हणून पात्र नाही. नैसर्गिक वस्तूंच्या या अधिक परंपरागत संकल्पना आजही आढळतात ज्यात मानवी चेतनेमुळे किंवा मानवी मनामुळे कृत्रिम समजले जाणारे कृत्रिम आणि कृत्रिम दरम्यानचे फरक सूचित होते. विशिष्ट संदर्भावर आधारित, नैसर्गिक शब्द देखील अप्राकृतिक किंवा अलौकिक शक्तीपासून वेगळे केला जाऊ शकतो.निसर्ग म्हणजे नेमके काय?? यात एकूणच जैविक अजैविक घटक मिळून तयार होणारी परिसंस्था.यात प्राणी ,मानव,झाडे,नदी,पर्वत एकूणच प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो.




#Article 81: सह्याद्री (1942 words)


सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू  आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.

या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे . अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे हा तमिळनाडू आणि केरळ यांना जोडतो.. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी). 

पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. सह्याद्रीवर सरीसृपांच्या १८७ पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातल्या निम्म्या फक्त इथेच सापडतात; बेडकांच्या शंभर जाती आहेत, त्यातल्या ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाईबंद आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती फक्त सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० अर्वाचीन जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.

पश्चिम घाट ही रांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते .

गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..

बसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात.

उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू झालेल्या सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांग आणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. कलसुबाइ हे उच शिखर आहेेे..

काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे.

पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात. 

पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही  पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.

पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत.

अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला. या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण. 

पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा , डब्बे धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत.

पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.

पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.

पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीचीजंगले व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात.

केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात.

पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.

१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. 

भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या  जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो. केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक वधेता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट. 

नुकतेच कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्याचे एकत्रीकरण करून नवीन अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

२००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला  समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
ही रांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.. 

सुंदरबननंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात. कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. 

भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.

गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, आणि तामिळनाडू - केरळातील निलगिरी व मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट “राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन” असा रम्य प्रदेश आहे.  ह्या डोंगर रांगा म्हणजे दक्षिण भारताचे उदकभांडार आहे. येथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई  यांसारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार  अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात. शिवाय ही श्रेणी जैवविविधतेचे एक आगळे भांडार आहे. जोडीलाच इथे विपुल खनिज संपत्ती आहे. हा प्रदेश सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. साहजिकच, साऱ्या देशाप्रमाणेच इथेही वेगेवेगळे विकास प्रकल्प अधिकाधिक जोमाने राबवले जात आहेत. ह्या प्रदेशाची जीवसंपत्ती व संवेदनाशीलता लक्षात घेऊन भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली चार शासकीय अधिकारी व दहा विशेषज्ञ ह्यांचा पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट गठित केला. ह्या गटापुढे खालील उद्दिष्टे ठेवण्यात आली -

संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशासाठी संवेदनशील परिसरक्षेत्रे  आखणे व तेथील व्यवस्थापन कसे असावे हे सुचवणे ही तज्ज्ञ गटावर सोपवण्यात आलेली मुख्य जबाबदारी होती.  अर्थातच तज्ज्ञ गटाच्या कामाच्या संदर्भात १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार  १९८९पासून प्रचलित झालेली संवेदनशील परिसरक्षेत्रे ही संकल्पना महत्त्वाची आहे. संवेदनशील परिसरक्षेत्रांचे निकष सुचवण्यासाठी नेमलेल्या प्रणव सेन समितीने परिसर संबंधित माहितीचा एक देशव्यापी संग्रह तातडीने बनवावा अशी शिफारस २००० सालीच केली होती, परंतु २०१०पर्यंत ह्या शिफारसीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले होते. तेव्हा तज्ज्ञ गटाने  पश्चिम घाट प्रदेशासाठी असा माहिती संग्रह बनवणे, आणि मग संवेदनशील परिसरक्षेत्रांच्या स्थल-कालानुरूप व्यवस्थापनाची रूपरेषा आखणे ही कामे हातात घेतली. ह्यासाठी काही मूलभूत संशोधन करण्याची आवश्यकता होती; ते करून शास्त्रीय निष्कर्ष प्रकाशित केले.
 
सर्व उद्दिष्टे साधण्यासाठी गटाने अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, ठिकठिकाणी खुली चर्चासत्रे आयोजित केली. खाण मालक व व्यवस्थापक, उद्योगपति, शिक्षक, बागायतदार, शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार अशा विविध व्यावसायिकांचा, आणि सर्व संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री, गोव्याचे आजी व माजी मुख्य मंत्री, केरळ राज्यातील कृषि व वन मंत्री, कर्नाटकातील मंत्री दर्जाचे आयुक्त, सर्व राज्यांतील आमदार व खासदार, जिल्हा परिषदा, तालुक पंचायती व ग्राम पंचायती सदस्य ह्यांच्याशी चर्चा केली. सर्व राज्यांच्या तसेच केन्द्रीय शासनातील वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव व अभिप्राय समजावून घेतले. हे सर्व अत्यंत पारदर्शकतेने केले व वेळोवेळी सर्व इतिवृत्ते  अधिकृत संकेतस्थलांवर उपलब्ध करून दिली.
  
१९८९ साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र  जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नव्हती.  २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृद्ध जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार व नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो.  उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत.  तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही.  परंतु पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी मोलाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.

पहा : 




#Article 82: मराठी शुद्धलेखन (170 words)


हा लेख सध्या  स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. Made by Aditya Sunil chaudhary

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. म्हणजेच प्रमाणलेखन. शुद्धलेखनाचा विचार करताना  साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यांचे पालन करून  शुद्धलेखन सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणे अवघड आहे. अधिक माहिती मराठी व्याकरण या लेखात दिली आहे.

शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणार्‍या चुका या ऱ्हस्व/दीर्घ  वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात.  अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे मो.रा.वाळिंबे यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले शुद्धलेखनाचे नियम पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्‌धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम   व  येथे उपलब्ध आहेत. 

या खेरीज अरुण फडके यांचे 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे पुस्तकही उपयुक्त आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची सुगम मराठी शुद्धलेखन (लेखक - श्री माधव राजगुरू) ही पुस्तिका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे.  




#Article 83: ईमेल (313 words)


ईमेल किंवा ई-मेल (मराठीत:विपत्र): हे Electronic Mail ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ई-मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. ई-मेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो.  आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोअर(साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाइन असण्याची गरज नाही.  ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.

ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, पाठवणाऱ्याचा ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचाही ई-मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश  लिहिलेला असतो.

प्राथमिक स्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टिमीडिया अ‍ॅटॅचमेन्ट्‌स म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टिमीडिया फायली पाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टिपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME)असे म्हणतात.

ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला अर्पानेट” पर्यंत मागे घेऊन जातो. १९८० चा दशकात “अर्पानेट” चे इंटरनेट मध्ये झालेल्या रूपांतरामुळे  ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवले गेलेले ई-मेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले  ई-मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे.

संगणकीय जाळ्यांचा मदतीने पाठवलेला ई-मेल प्रथमत: “अर्पानेट” वर फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP) चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून  ईमेल पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होत असतो.

व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा पुल्लिंगी शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टु ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.

हॉटमेल ही ईमेल प्रणाली सामान्य जनतेला फुकट वापरता येणारी पहिली यशस्वी ईमेल प्रणाली होती.

इंटरनेट मुळे मोठ्या प्रमाणात फायदे तसेच तोटे झाले आहेत.

स्पॅम ईमेल म्हणजे अनाहूतपणे पाठविलेले, बहुतांशी जाहिराती करण्यासाठी पाठवलेले ईमेल होत.

 




#Article 84: एप्रिल १ (116 words)


एप्रिल महिन्यात भारतात (बहुधा) कडक उन्हाळा असतो. त्या काळात चैत्र-वैशाख हे हिंदू महिने असतात. 

१६६९ -उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१८२६ : इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.

१८६९ : भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.

१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१९१२ : भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.

१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.

१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला. यापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असे म्ह्टले जाते.

१९३३ : भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण

मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - (एप्रिल महिना)




#Article 85: अभयारण्य (215 words)


अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.

अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मीळ होत जाणार्‍या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. डायनोसॉर किंवा भीमसरट, स्मायलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वूली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडो पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणार्‍या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे आणि तो बर्‍याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मीळ जैवसंपदेची अधिक माहिती दुर्मिळ जैवसंपदा या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती लुप्त जैवसंपदा या लेखामध्ये मिळेल.

प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यांसाठी संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या  जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषित केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.

काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:

पहा : विदर्भातील अभयारण्ये




#Article 86: भारतीय विज्ञान संस्था (103 words)


भारतीय विज्ञान संस्था (इंग्लिश: Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच doctoral  कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.

भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.




#Article 87: महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर (1978 words)


महालक्ष्मी मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.

पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.

पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.. 

कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती  पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाव्दार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्‍या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणार्‍या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .

देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.

शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.

नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणार्‍या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्‍त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो. 

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणार्‍या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी  त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते. 

हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

कोल्हापूरची महालक्ष्मी की अंबाबाई? 

माझ्या मते कोल्हापूरची देवी दोन्हीपैकी एकही नाही. मात्र देवता म्हटलं की अंबाबाई किंवा रेणुका असेच तोंडवळी पडले आहे. फक्त सप्त शृंगी च्या महात्म्य वर्णनात आंबा चौंडी चा उल्लेख आढळतो. सप्तशृंगी ही वायु पुराणातील सप्त मारुत म्हणजे सप्त शिखरांची माता असे म्हटले जाते. तिचे खरे नाव दिति.   आदिती व दिती या कश्यप ऋषींच्या दोन वेगवेगळ्या  होत्या. 

महालक्ष्मीचा पती बालाजी हाच खरा गोंधळ आहे. बालाजी नेमका कोण कळणे त्यासाठी महत्त्वाचे आहे. वसुदेवाचा ज्येष्ठ पुत्र बळीराम चा अपभ्रंश झाल्याची जाणीव खोलवर चिंतन केल्यास निश्चित होते. अंधक व वृष्णी पैकी अंधक वंशात वसुदेवाचा जन्म झाला. त्या वंशाचा अधिकार प्रांतात असल्यामुळे आंध्र राज्याची ओळख. तर दक्षिणेत पांडू पुत्र सहदेव च्या वंशजाचा अधिकार असल्याने आराध्य दैवत माळावर बलीराम तर खाली तिरुपतीत लहान भाऊ गोविंदराज म्हणजे श्रीकृष्ण मंदिर आहे. काही अंतरावर रुसून गेलेल्या पद्मावतीचे ठिकाण आढळते. मूळ ठिकाण सोरठी सोमनाथ जवळील द्वारका असून लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या रेवती सी बलरामाचा विवाह झाला. रेवती लाच पद्मावती असेही म्हटले जाऊ लागले. 

शिलाहार म्हणजेच पांडू वंशज हे बलराम व रेवती पदमावती चे भक्त. पांडव म्हणजेच,  पौड रांचे पोंड पूर म्हणजेच पंढरपूर!  म्हणून पंढरपूरला श्रीकृष्ण - रुक्मिणी बरोबरच कुंतल कूळाची कन्या रेवती म्हणजे पदमावती ची ही स्थापना करण्यात आली. हे कुंतल कुळ म्हणजे 11 - 12 व्या शतकातील होयसळ राज्य.  जे महाराष्ट्रात सातारा - माण या परिसरात महत्त्व होते. तसेच धाराशिव बीड सीमेवरील कूंतलगिरि सही महत्त्व होते.

पारगाव हे कुंतल किंवा होयसळांचे मूळ गाव.  जे वर्तमानात बीड जिल्ह्यात भगवानगडाजवळ घोगस पारगाव म्हणून परिचित आहे.  रेवती म्हणजे पद्मावती ही नागकन्या म्हणून ओळखली जाते.  इथे नागपंचमीला पिंडीवर नाग खात्रीने उपस्थित राहतो. तेथे जागेश्वर व रेवती चे पुरातन मंदिर आहे.  द्वार पार गाव येथे शेजारी शेजारीच आहेत हे तीसरे कोलहा किंवा कैवल्य पूर दुसरे तर मुळस्थान द्वारकेत आहे.

वडवणी,  बीड 

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभार्‍यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्यार्‍या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभार्‍याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभार्‍यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :- 

१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. 
२. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात.
३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.   

या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.

महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दॄष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी. 

नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्‌पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणार्‍या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणार्‍या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे. 

वरील दोन देवळांव्यतिरिक्‍त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्‍वर, मुक्‍तेश्‍वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात.

देवीची साडेतीन शक्तिपीठे :-




#Article 88: भारतीय दिनदर्शिका (108 words)


भारतीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे.

चैत्र -  चैत्र शुद्ध प्रथमा  चैत्र शुद्ध द्वितीया   चैत्र शुद्ध तृतीया   चैत्र शुद्ध चतुर्थी  चैत्र शुद्ध पंचमी  चैत्र शुद्ध षष्ठी  चैत्र शुद्ध सप्तमी  चैत्र शुद्ध अष्टमी चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध दशमी चैत्र शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध द्वादशी चैत्र शुद्ध त्रयोदशी चैत्र शुद्ध चतुर्दशी चैत्र पौर्णिमा  चैत्र वद्य प्रथमा  चैत्र वद्य द्वितीया   चैत्र वद्य तृतीया   चैत्र वद्य चतुर्थी  चैत्र वद्य पंचमी  चैत्र वद्य षष्ठी  चैत्र वद्य सप्तमी  चैत्र वद्य अष्टमी चैत्र वद्य नवमी चैत्र वद्य दशमी चैत्र वद्य एकादशी चैत्र वद्य द्वादशी चैत्र वद्य त्रयोदशी चैत्र वद्य चतुर्दशी चैत्र अमावस्या

वैशाख
ज्येष्ठ
आषाढ
श्रावण
भाद्रपद
आश्विन
कार्तीक
मार्गशीर्ष
पौष
माघ
फाल्गुन




#Article 89: पुरातत्त्वशास्त्र (4507 words)


पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे  अध्ययन आहे.  ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, हे शास्त्र विज्ञान व मानवशास्त्र अशा दोन्ही विभागांत समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाची पुरावे हे पुरातत्त्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे

पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो...त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी  सुमारे ९९ % काळ आहे. म्हणज्र प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ. पुरातत्त्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे.

पुरातत्त्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरीक्षण व सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर पुरातन काळाची अधिक माहिती मिळू शकते.  व्यापक अर्थाने, पुरातत्त्वशास्त्र हे परस्परावलंबी शाखांतील शोधांवर अवलंबून आहे.  त्या शाखा म्हणजे इतिहास, कलेचा इतिहास,  वैज्ञानिक शास्त्रे,  भूगर्भशास्त्र, तसेच भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, माहिती विज्ञान, रसायन शास्त्र, संख्याशास्त्र, जीवशास्त्राच्या इतर शाखा पुरापर्यावरणशास्त्र(paleoecology), paleontology, पुराप्राणिशास्त्र(paleozoology), paleoethnobotany, व पुराजीव शास्त्र(paleobotany)

१९व्या शतकात युरोपमध्ये पुरातनधर्म म्हणून या शाखेचा उदय झाला.  त्यानंतर संपूर्ण जगात ही एक विद्याशाखा म्हणून मान्यता पावली.  शास्त्राच्या विस्तारादरम्यान अनेक विद्याशाखांचा विकास झाला.  पुरातत्त्वशास्त्रास साहाय्यभूत ठरणारी अनेक वेगवेगळी वैज्ञानिक तंत्रे विकसित करण्यात आली. या शास्त्रास नकली पुरातत्त्वशास्त्र यापासून ते मानवी अवशेषांच्या उत्खननास विरोध अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

१९व्या शतकाचे मध्यात आधुनिक पुरातत्त्वशास्त्राचे मूळ युरोप मध्ये रुजले. भूगर्भशास्त्राच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर त्याचा विकास झाला. त्यामुळे पृथ्वीचे वय केवळ हजारो वर्षे नसून कोट्यवधी वर्षे आहे हे सिद्ध झाले. यानंतर  सन १८५९ मध्ये, चार्ल्स डार्विनचे 'ओरिजिन ऑफ स्पीशीज्' हे पुस्तक प्रकाशित झाले व त्याने उत्क्रांतीचा सिद्धान्त अधोरेखित झाला. ,मानवजात ही खरोखरच लाखो वर्षे जुनी आहे यावर वैज्ञानिकांना विश्वास ठेवावयाला लागला.  त्यामुळे भूगर्भशास्त्र चळवळीस प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे अधिकाधिक लोक या शास्त्राच्या अभ्यासात रस दाखवू लागले. दरम्यान, सन १८४८ मध्ये, डॅनिश इतिहासकार क्रिस्चियन जर्गेनेसेन थॉमसेनने 'ए गाईड टु नॉर्दर्न अ‍ॅन्टिक्विटीज' हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्याने एक कल्पना मांडली. ती अशी की, युरोपमधील प्रागैतिहासिक काळ हा त्या काळच्या मानवांनी वापरलेल्या सामग्रीनुसार, तीन कालखंडांत विभागला जाऊ शकतो.  अश्म युग, ताम्र युग व लोह युग.  मानवाची पौराणिकता,  उत्क्रांती व हा तीन-युग-सिद्धान्त या तीन तत्त्वांवर आधुनिक पुरातत्त्वशास्त्राचे बांधकाम झाले आहे. 

त्यानंतर, पूर्वीच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी जगातील विविध स्थळांवरती संशोधन सुरू केले. हेन्‍रिच श्लिमान याने ट्रॉय येथे ईजियन संस्कृती, तसेच ऑर्थर ईव्हान्स याने क्रीट तर जॉन लॉईड स्टिफेन्स हा  मायासंस्कृतीबद्दल पुनःसंशोधन करण्यात प्रमुख होता. या संशोधकांनी अवलंबिलेली पद्धत आजच्या मानकांच्या दृष्टिकोनातून बघितले असता दोषपूर्ण होती. त्यांची विचारसरणी ही अगदी युरोपधार्जिणी व पूर्वग्रहित होती.

प्राचीन काळातील पुरातन पुरातत्त्वशास्त्र्यांनी ट्रॉय येथील हेनरिक स्लीमॅनॅन आणि क्रेट येथील आर्थर इव्हान्स यांच्या उत्खननात प्राचीन एजियन संस्कृतीचा अभ्यास करुन जगभरातील विविध क्षेत्रांचे अन्वेषण करण्यास सुरुवात केली, तर जॉन लॉईड स्टीफन्स पुन्हा शोधात एक महत्त्वाची व्यक्ती होती. माया सभ्यता संपूर्ण मध्य अमेरिका. तथापि, या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी नियोजित केलेली पद्धती आजच्या मानदंडांद्वारे अत्यंत खराब झाली आणि बहुतेक युरोपियन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी अनेकदा ॲडवर्ड टायलर आणि लुईस हेन्री मॉर्गन यांच्यासारख्या मानववंशीय आणि नृवंशविज्ञानविषयक खात्यांवर विश्वास ठेवला ज्यायोगे समकालीन क्रूर अशा मूलतत्त्वांमध्ये युरोपच्या ऐतिहासिक लोक असलेल्या मूळ अमेरिकन लोकांसारखे लोक. [8] लवकरच पुरातत्त्वशास्त्राचा नवीन विषय उत्तर अमेरिकेत पसरला, जिथे तो सॅम्युअल हेवन आणि विलियम हेन्री होम्स सारख्या आकृत्यांनी घेतला गेला, ज्याने प्राचीनांना खोदले होते. मूळ अमेरिकन स्मारक. [9]
पुरातात्वशास्त्राचा खरा विकास १९व्या शतकाच्या शेवटी होऊ लागला. त्यावेळी ऑगस्टस पीट रिव्हर्स याने दक्षिण इंग्लंड मध्ये क्रानबोर्न चेज येथे पद्धतशीररीत्या उत्खनन करून  हे दर्शविले की, तेथील उत्खननातील सौंदर्य व मूल्य हेच महत्त्वाचे नाहीत तर सापडणारी प्रत्येक वस्तू ही अमूल्य आहे. या विद्याशाखेत नंतर काही संशोधकांनी १९व्या शतकाच्या अखेरीस व २०व्या शतकाच्या सुरुवातीला झळाळी आणली. इजिप्त व पॅलेस्टाइन येथे सर विल्यम फ्लिंडर्स पेट्री यांनी उत्खनन केले तर भारतात सर मोरटाइमर व्हीलर यांनी.

पुरातत्त्वशास्त्रीय सिद्धान्त

 

प्रागैतिहासिक काळाबद्दल जाणून घ्यायचे असल्यास पुरातत्त्वशास्त्र हा एकच मार्ग उपलब्ध आहे.मानवाची उत्क्रांती ही याच प्रागैतिहासिक काळात घडली.  पुरातत्त्वशास्त्र हे मानवाच्या अनेक तांत्रिकदृष्ट्या झालेल्या विकासावर प्रकाश टाकते. उदा०  अग्नी (क्षेपणास्त्र)चा वापर करण्याची कल्पना, दगडांच्या हत्यारांचा विकास, धातुशास्त्राचा शोध, धर्माची सुरुवात व शेतीची सुरुवात इत्यादी.  जुन्या काळातील या मानवजातीत घडलेल्या उत्क्रांतीबद्दल व तांत्रिकदृष्ट्या झालेल्या बदलाबद्दल  पुरातत्त्वशास्त्राच्या मदतीशिवाय आपण काहीच जाणू शकणार नाही.

तथापि, केवळ प्रागैतिहासिक, पूर्व-साक्षर संस्कृतीच नव्हे तर ऐतिहासिक पुरातत्त्वशास्त्राच्या उप-अनुशासनाद्वारे पुरातत्व वापरून, ऐतिहासिक, साक्षर संस्कृतींचा अभ्यास केला जाऊ शकतो. प्राचीन ग्रीस आणि मेसोपोटेमिया सारख्या बर्याच साक्षर संस्कृतींसाठी, त्यांचे उर्वरित रेकॉर्ड नेहमी अपूर्ण आणि नेहमीच हळूहळू पक्षपाती होते. बर्याच समाजात, साक्षरता अभिजात वर्गांसारखीच होती, जसे की पाळक किंवा न्यायालय किंवा मंदिराची नोकरशाही. कुटूंबातील साक्षरतेला कधीकधी कर्जाच्या आणि करारावर मर्यादित केले गेले आहे. कुटूंबांची आवड आणि जागतिक दृष्टी बहुतेकदा लोकांच्या जीवनातील आणि लोकांच्या आवडींकडे वेगळे असते. सामान्य जनतेच्या अधिक प्रतिनिधींनी उत्पादित केलेल्या लेखनांना ग्रंथालयेमध्ये आपले मार्ग शोधण्याची शक्यता नव्हती आणि वंशावळीसाठी ते जतन केले जाऊ शकत होते. अशा प्रकारे, लिखित नोंदी पूर्वाग्रह, मान्यते, सांस्कृतिक मूल्ये आणि संभवत: मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा एक लहान भाग असलेल्या व्यक्तींच्या मर्यादित श्रेणीची फसवणूक दर्शवितात. म्हणून, लिखित रेकॉर्ड एकमेव स्त्रोतावर विश्वास ठेवू शकत नाही. भौतिक अभिलेख समाजाच्या वाजवी प्रतिरूपाच्या अगदी जवळ आहे, जरी त्याचे स्वतः च्या अकार्यक्षमतेच्या अधीन आहे, जसे सैम्पलिंग पूर्वाग्रह आणि विभेदक संरक्षण

सर्व पुरातत्त्वशास्त्रज्ञांची एखाद्या पुरातत्त्वशास्त्रीय सिद्धान्तास चिकटून राहण्यास एकवाक्यता नाही.  १९व्या शतकात जेव्हा या शास्त्राचा विकास होत होता त्यावेळेस सांस्कृतिक इतिहास पुरातत्त्वशास्त्र हा सिद्धान्त प्रथम प्रतिपादला गेला.  त्याचे ध्येय, संस्कृती का व कशी बदलली यावरील विवेचन आणि त्यांनी केलेल्या कामांचे उदात्तीकरण एवढाच होता. २०व्या शतकाच्या सुरुवातीस ज्या संशोधकांनी पूर्वीच्या समाजाचा अभ्यास केला,  त्यांनी ते दुवे सरळ सध्या अस्तित्वात असलेल्या समाजाशी जोडले.(जसे अमेरिकेतील रहिवासी, सायबेरियातील लोक,  मेसोपोटेमियातील लोक इत्यादी). त्यांनी पूर्वीच्या संस्कृतीची व सध्याच्या संस्कृतीची तुलनाच केली. १९६०व्या दशकात ल्युविस बिनफोर्ड, केंट फ्लॉनेरी सारख्या अमेरिकेन संशोधकांनी सुरू केलेल्या एका मोहिमेत  याविरुद्ध एकप्रकारचा लढाच पुकारला. 
त्यांनी नवीन पुरातत्त्वशास्त्र प्रस्तावित केले. हे नवे शास्त्र वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम व वैज्ञानिक पद्धतीवरच अवलंबून असून, परीक्षण करून कारणमीमांसा देणारे होते. त्यापैकी एक भाग processual archaeology म्हणून ओळखला जाऊ लागला.

सन १९८०मध्ये जी अत्याधुनिक मोहीम सुरू झाली तिचा प्रमुख ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ 'मायकल शांक्स' होता. 
 Christopher Tilley, Daniel Miller, and Ian Hodder,
ती मोहीम पुढे  post-processual archaeology म्हणून ओळखली जाऊ लागली.
त्यांनी जुन्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले व स्वयं-सिद्धान्त प्रतिक्रियेचे महत्त्व विशद केले. यामुळे विवाद उत्पन झाला व तो अजूनही सुरूच आहे.  मध्यंतरी, एक वेगळाच सिद्धान्त समोर आला.

पुरातत्त्वशास्त्रीय सिद्धान्त हे सध्या अनेक प्रभावांखाली आहेत. उदा० डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त,
Archaeological theory now borrows from a wide range of influences, including neo-Darwinian evolutionary thought, phenomenology, postmodernism, agency theory, cognitive science, Functionalism, gender-based and Feminist archaeology, and Systems theory.

पुरातत्त्वशास्त्रीय संशोधन हे बहुधा अनेक टप्प्यांचे बनलेले असते. त्यापैकी प्रत्येक टप्पा वेगवेगळी पद्धती अवलंबतो.  कोणतेही प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना स्पष्टपणे कोणते ध्येय गाठावयाचे आहे यावर एकमत व्हावयास हवे.  हे केल्यावर त्याने त्या व सभोवतालच्या क्षेत्राची जास्तीत जास्त माहिती होऊ शकेल अशा रीतीने त्या जागेचे सर्वेक्षण व्हावयास हवे. दुसरे,  पुरातत्वशास्त्रीय घटकांना जमिनीतून काढण्यासाठी उत्खनन करावे लागू शकते.  तिसरे,  त्यातून प्राप्त माहिती ही अभ्यासून व तिचे मूल्य निश्चित करून मूळ संशोधनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन तपासली जावयास हवी.  प्राप्त माहितीचे प्रकाशन करणे हे चांगले समजले जाते. असे केल्यानंतर ही माहिती पुरातत्त्वशास्त्रज्ञांना व इतिहासकारांना उपल्ब्ध होऊ शकेल. पण सर्वसाधारणपणे अशीप् रसिद्धी टाळलीजाते.

आधुनिक पुरातत्त्वशास्त्रीय प्रकल्प हा सर्वेक्षणाने सुरू होतो. क्षेत्रीय सर्वेक्षण हे त्या क्षेत्रात असलेल्या, पूर्वी न कळलेल्या जागा पद्धतशीरपणे जाणून घेण्याचा एक प्रयास आहे.  त्यामुळे त्या जागेत असलेली घरे व इतर बाबी जाणून घेता येतात.  
पुरातत्त्वशास्त्राच्या प्राथमिक दिवसांत सर्वेक्षण केले जात नसे. सांस्कृतिक इतिहासकार व आधीचे संशोधक हे त्या जागेतील ठळकपणे दिसणाऱ्या गोष्टीच उत्खनन करून काढीत असत. गॉर्डन विली या संशोधकाने सन १९४९ मध्ये सर्वेक्षणाचे तंत्र पेरू देशातील विरू खोऱ्यात उत्खनन करतांना विकसित केले.
 व त्यानुसार प्रत्येक पातळीचे सर्वेक्षण ठळकपणे पुरातत्त्वशास्त्रात समोर आले.
प्राथमिक काम म्हणून सर्वेक्षणाचे अनेक फायदे आहेत.त्यास त्यामानाने कमी पैसा व वेळ लागतो, कारण त्यात अवशेष शोधण्यास मोठ्या प्रमाणात मातीची उलाढाल व प्रक्रिया करावी लागत नाही.  जास्त मोठ्या जागेचे सर्वेक्षण हे खर्चिक असू शकते म्हणून काही संशोधक सॅंपल सर्व्हे करतात.
दिवंगत लोकांच्या समाध्या वा कबरींच्या बाबतीत स्थळाचा नाश वाचविण्यासाठी, तोडफोड करून सर्वेक्षण करण्यात येत नाही. 
गैर-विनाशकारी पुरातत्त्वविज्ञानच्या इतर प्रकारांप्रमाणे, सर्वेक्षणाने उत्खनन माध्यमातून साइट नष्ट करण्यासंबंधी नैतिक समस्या (वंशांवरील विशिष्ट चिंता संबंधित) टाळतात. काही प्रकारचे माहिती गोळा करण्याचा एकमात्र मार्ग आहे जसे की सेटलमेंट पॅटर्न आणि सेटलमेंट स्ट्रक्चर. सर्वे डेटा सामान्यत: नकाशेमध्ये एकत्र केला जातो, जो पृष्ठ वैशिष्ट्ये आणि / किंवा आर्टिफॅक्ट वितरण दर्शवू शकते.
यात सर्वांत सोपा मार्ग म्हणजे पृष्ठभागाचे सर्वेक्षण.  यात क्षेत्राचे पायी वा वाहनांच्या साहाय्याने विंचरण करणे येते.  असे केल्यावर पृष्ठभागावर काही वस्तु वा अवशेष सापडू शकतात. पृष्ठभागाचे सर्वेक्षण हे जमिनीत पूर्णपणे गाडल्या गेलेल्या किंवा जेथे वनस्पतींची वाढ झाली असेल तेथील अवशेष शोधू शकत नाही.  मर्यादित स्वरूपात खोदकाम करणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने वा परीक्षण खड्ड्यांचे साहाय्याने ते करता येऊ शकते.  त्यात काही सापडले नाही तर ते क्षेत्र निःशेष समजले जाते.

हवाई सर्वेक्षण हे विमानांना वा बलूनला  कॅमेरे लावून तर पुष्कळ वेळेस पतंगांना कॅमेरा लावूनही केले जाते.  याद्वारे केलेले चित्रण हे  मोठ्या क्षेत्राचे वा किचकट जागांचे त्वरित काढण्यास मदत करते. जमिनीत पुरल्या गेलेल्या मानवनिर्मित बांधकामांवर वनस्पतींची वाढ हळूहळू होते.  त्यामानाने इतर ठिकाणी ती लवकर होते. गाडल्या गेलेल्या बांधकामावर उगवलेल्या धान्याच्या वनस्पती ह्या पिकल्यावर सापेक्षतेने लवकर रंग बदलतात असे दृष्टिपथात आले आहे.  असे आढळल्यास ती बांधकामे जास्त अचूकतेने शोधण्यास मदत होते.  दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेस काढली गेलेली छायाचित्रे, सावलीच्या बदलामुळे, बांधकामांची बाह्यरेषा दाखवून कामात मदत करतात.  हवाई सर्वेक्षणात अतिरक्त जमीन भेदून खाली जाण्याची क्षमता असलेली रडार तरंगलांबी, उष्माछायांकन इत्यादी तंत्रे वापरली जाऊ शकतात. 
 
भूभौतिक सर्वेक्षण हे जमिनीखालील वस्तू बघण्याचे सर्वांत परिणामकारक तंत्र आहे.मॅग्नेटोमीटर हे जमिनीखालील लोखंडाच्या पुरावस्तू, भट्ट्या, काही प्रकारचे दगडी बांधकाम, खड्डे व उंचवटे यामुळे होणारे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रामधील होणारे सूक्ष्म बदलही नोंदविते.  जमिनीची विद्युत अवरोधकता मोजणारे उपकरणही मुक्तपणे वापरण्यात येते.   ज्यांची विद्युत अवरोधकता सभोवतालच्या जमिनीच्या अवरोधकतेपेक्षा विपर्यस्त असते  अशा पुरातत्त्वशास्त्रीय बाबी शोधल्या जातात व नकाशावर त्याची नोंद केली जाते.   दगडी वस्तु वा विटा असल्या काही पुरातत्त्वशास्त्रीय गोष्टींची विद्युत अवरोधकता साधारण जमिनीपेक्षा जास्त असते. या उलट, जैविक लेपन वा न भाजलेली माती यांची विद्युत अवरोधकता कमी असते.

जरी काही पुरातत्त्वशास्त्रज्ञ धातु शोधक यंत्राचा  वापर खजिन्याच्या शोधासाठी ग्राह्य धरतात?????तर काही त्यास सर्वांत परिणामकारक अवजार समजतात.काही पुरातन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी मेटल डिटेक्टर चा वापर खजिना शिकार करण्याच्या बाबतीत असल्याचे मानले असले तरी इतरांना पुरातत्व सर्वेक्षणांमध्ये प्रभावी साधन मानले जाते.

मेटल डिटेक्टरच्या औपचारिक पुरातत्त्विक वापराच्या उदाहरणांमध्ये इंग्रजी गृहयुद्ध रणांगणांवर मस्ककेटबॉल वितरण विश्लेषण, 1 9व्या शतकाच्या जहाज अपघातात उत्खननापूर्वी मेटल वितरण विश्लेषण आणि मूल्यांकन दरम्यान सेवा केबल स्थान समाविष्ट आहे. मेटल डिटेक्टरिस्ट्सने पुरातत्व अभिलेख मध्ये योगदान दिले आहे जिथे त्यांनी त्यांच्या परीणामांचे तपशीलवार रेकॉर्ड केले आहेत आणि त्यांच्या पुरातत्व संदर्भातील कलाकृतींचा संग्रह करण्यापासून परावृत्त केले आहे. यूके मध्ये, पोर्टेबल ॲंटीकविटीज स्कीम मध्ये भाग घेण्यासाठी मेटल डिटेक्टरिस्ट्सची विनंती केली गेली आहे.

अंडरवॉटर पुरातत्व मधील प्रादेशिक सर्वेक्षण जियोफिजिकल किंवा रिमोट सेंसिंग डिव्हाइसेस जसे की समुद्री मॅग्नेटोमीटर, साइड-स्कॅन सोनार, किंवा उप-तळाशी सोनार वापरते.



#Article 90: हवामान (199 words)


मराठी मध्ये हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ हि तितकाच भिन्न आहे. 

Weather ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द वातावरणाची सद्य स्थिती दर्शवितो. तर Climate ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द वातावरणाची किमान ३० वर्षे असलेली सरासरी स्थिती दर्शवितो. 

वातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.

नायट्रोजन आणि ऑक्सिजन आतापर्यंत सर्वात सामान्य आहेत; कोरडी हवा सुमारे ७८ % नायट्रोजन (n२) आणि सुमारे २१ % ऑक्सिजन (o२) असते. आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साईड (co२) आणि इतर बर्‍याच वायू देखील कमी प्रमाणात उपलब्ध आहेत; वातावरणातील वायूंचे मिश्रण 1% पेक्षा कमी बनवते. वातावरणात पाण्याची वाफ देखील समाविष्ट आहे. पाण्याच्या वाष्पाचे प्रमाण बरेच बदलते, परंतु सरासरी सुमारे १ % आहे. बरेच छोटे कण देखील आहेत - घन आणि द्रव - वातावरणात फ्लोटिंग. या कणांना, ज्यांना शास्त्रज्ञ एरोसोल म्हणतात, त्यात धूळ, बीजाणू आणि परागकण, समुद्राच्या फवारण्यातील मीठ, ज्वालामुखीची राख, धूर आणि बरेच काही समाविष्ट आहे.

Climate ह्या अर्थी वापरल्या जाणारे जागतिक हवामान हे ५ प्रकारात विभागले जाऊ शकते.




#Article 91: असा मी असामी (126 words)


असा मी असामी मध्ये पु.ल. एका मध्यमवर्गीय माणसाचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र रेखाटतात. 

धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाच्या गिरगावात रहायला असणाय्रा एका सामान्य कारकुनाचे हे खास पु. लं. च्या शैलीतले आत्मचरित्र आहे. गिरगावातील चाळीतले प्रसंग, लग्नाचा प्रसंग आणि त्यातला उखाणा घ्यायचा किस्सा, पार्ल्याच्या मावशीचे घर शोधणे, ठिगळ्याचे टेलरिंग शिकवणे, एकत्र नानू सरंजाम्याच्या नाटकाला जाणे, सांताक्रूझच्या गुरुदेवांचे प्रवचन अशा अगदी साध्या प्रसंगांतून हसता हसता पुरेवाट होते. नंतर आधुनिक परिस्थिती प्रमाणे राहणीमान व एकंदर जीवनात झालेल्या बदलांचे चित्रण करण्यासाठी मुख्याध्यापिका सरोज खरे यांची भेट तर केवळ अप्रतिम.

शेवटी पु.ल. म्हणतात, त्यावेळचा तो धोतरवाला धोंड्या जोशी तो तसा मी होतो आजचा डी.बी. जोशी हा असा मी आहे. ह्यापुढला कसा मी होईन हे मी आजच काय सांगू? हे इतकं पुराण सांगायचा उद्देश केवळ आज आपला जसा मी आहे ते कळावे......




#Article 92: कृष्णा नदी (352 words)


कृष्णा नदी (मराठी: कृष्णा; कन्नड: ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ; तेलुगू: కృష్ణా నది ;) ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे १,३०० कि.मी. अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेमध्ये ती वाई, भुईंज, चिंधवली,लिंब गोवे, उडतरे, माहुली(सातारा ) कऱ्हाड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास २८१ कि.मी.चा आहे. 

महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो व त्रिभुजप्रदेश निर्माण होतात. कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी आहे. 

आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण ही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.

कृष्णा नदी आता बंगालच्या उपसागराला मिळत नाही कारण ती आता सुकत चालली आहे.

इ.स. सन १२१५ मध्ये यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वराच्या हेमांडपंथी शिवमंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले. त्या देवळाच्या जवळपास कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे, असा सर्वसामान्य भाविकांचा समज असतो.

दक्षिणी भारतातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच कृष्णेच्या खोऱ्यातही अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहेत.

कऱ्हाड, वाई, सांगली, वाळवा, मिरज, औदुंबर, नरसोबाची वाडी

अथणी, कुरुंदवाड, चिक्कोडी, धनगांव, धोम, नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी), पसरणी, बहे, माहुली, मेणवली, उगारखुर्द, रायबाग, उडतरे, भुईंज, कुरुवपूर भिलवडी, औदुंबर, अंकलखोप, कराड, संतगाव, डिग्रज, उदगांव

कृष्णा खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ३६८०५५ चौरस. कि.मी. आहे. या एकूण क्षेत्रफळापैकी ६९४२५ चौ. कि.मी. म्हणजे २७ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात, ११३२७१ चौ. कि.मी. म्हणजे ४४ टक्के क्षेत्र कर्नाटकात तर ७६२५२ चौ. कि.मी. म्हणजे २९ टक्के क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे.

कृष्णा नदीच्या जवळपास असणारे साखर कारखाने, इतर उद्योग आणि गावांचे सांडपाणी यामुळे प्रदूषण वाढले आहे. यामुळे मासे मृत होण्याच्या घटना घडत असतात. जुलै २०१९ मध्ये नदीतील विषारी रसायनांमुळे असंख्य मासे मृत होऊन नदीकाठच्या गावांत दुर्गंधी पसरली होती. याच काळात पाच वर्षाच्या मोठ्या मगरीचा मृत्यू हे मासे खाल्याने झाला होता.

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या




#Article 93: झाकिर हुसेन (666 words)


डॉ. झाकिर हुसेन (; फेब्रुवारी ८, इ.स. १८९७ - मे ३, इ.स. १९६९) हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. १९५७  ते १९६२  या काळात त्यांनी  बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. हुसेन यांच्याखाली, जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंधित झाले. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

हुसेन हे तेलंगना येथे अफ्रिदी वंशाच्या एका पश्तुण कुटुंबात जन्मलेले होते. उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील कैमगंज आणि शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे निकट संबंध होते. हुसेनचा जन्म झाल्यानंतर त्याचे कुटुंब हैदराबाद पासून ते कैमगंज येथे स्थायिक झाले.सात मुलांपैकी दुसरा तो होता: सहकारी शिक्षणकर्त्या युसूफ हुसेन यांचे मोठे भाऊ होते. हुसैन यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय राहीले होते.  त्यांचे नातं सलमान खुर्शीद, कॉंग्रेसचे राजकारणी आहेत. ते भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत.आणि त्यांचे भगिनी प्रसिद्ध शैक्षणिक मासूद हुसेन होते. त्यांचा भाऊ महमुद हुसेन पाकिस्तान चळवळीत सामील झाला आणि त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले, तर त्यांचे भतीजे अनवर हुसेन पाकिस्तान दूरदर्शनचे संचालक होते. हुसेनचे वडील फिदा हुसेन खान यांचे वय दहा वर्षांचे असताना मरण पावले. १९११ मध्ये चौदा वर्षांचा असताना त्यांची आई मरण पावली. हुसेनची  प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण झाले. त्यांनी इस्लामिया हायस्कूल, इटावा येथून हायस्कूल पूर्ण केले आणि त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न मुहम्मद एंग्लो-ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षित केले जेथे ते एक प्रमुख विद्यार्थी नेते होते. १२६ मध्ये त्यांनी बर्लिन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली. १९१५ मध्ये १८ वर्षांच्या वयात त्यांनी शाहजहां बेगमशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली, सईदा खान आणि सफिया रहमान यांचे लग्न झाले.

जेव्हा हुसेन २३ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासह राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. २९ ऑक्टोबर १९२० रोजी  अलीगढ येथे स्थापन करण्यात आले.आणि नंतर १९२५ मध्ये नवी दिल्ली येथे कारोल बाग येथे हलविण्यात आले. त्यानंतर १ मार्च १९३५ रोजी पुन्हा एकदा जामिया नगर, नवी दिल्ली आणि त्यास जामिया मिलिया इस्लामिया (केंद्रीय विद्यापीठ) असे नाव देण्यात आले. त्यानंतर ते जर्मनीत बर्लिनच्या फ्रेडरिक विलियम विद्यापीठातून पीएचडी मिळविण्यासाठी जर्मनीला गेले. जर्मनीत असताना हुसेन हा सर्वात मोठा उर्दू कवी मिर्झा असदुल्ला खान गालिब (१७९७-१८६८) वादग्रस्त शब्दसंग्रह आणण्यात महत्त्वाचा होता.

१९२७ साली जामिया मिलिया इस्लामियाच्या डोक्यावर जाण्यासाठी ते भारतात परतले. पुढच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी ब्रिटिश सरकारच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या संघर्षाने घट्ट सहभाग घेतलेल्या संस्थेला शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व प्रदान केले आणि महात्मा गांधी व हकीम अजमल खान यांच्या वतीने वस्तुनिष्ठ शिक्षणासह प्रयोग केले. या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक सुधारणांच्या हालचाली करून स्वतः ला गुंतवून ठेवले आणि विशेषतः त्यांच्या जुन्या अल्मा मातृ मुहम्मद एंग्लो ओरिएंटल कॉलेज (आता अलीगढ मुस्लिम विद्यापीठ) च्या कार्यात सक्रिय होते. या कालखंडात हुसैन आधुनिक भारतातील प्रमुख शैक्षणिक विचारवंत आणि व्यावसायिकांपैकी एक म्हणून उभ्या राहिल्या. जामिया यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये बलिदान देण्यासाठी आणि अनधिकृत प्रयत्नांमुळे मोहम्मद अली जिन्नासारखे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक झाले. भारत स्वातंत्र्यानंतर लवकरच, हुसेन अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सहमत झाले जे पाकिस्तानच्या निर्मितीच्या चळवळीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक विभाग सक्रियपणे सक्रिय झाल्यामुळे भारत विभागीय काळात प्रयत्न करण्याचा सामना करीत होता.हुसेन यांनी पुन्हा १९४८-१९५६ पासून अलीगढ येथे झालेल्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यात नेतृत्व प्रदान केले.कुलगुरू म्हणून आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर लवकरच १९५७ मध्ये त्यांनी भारतीय संसदेच्या उच्च सदस्याचे सदस्य म्हणून नामांकन केले. १९५७ मध्ये त्यांनी बिहार राज्यपाल म्हणून राज्यसभेवर पदार्पण केले.

१९५७ ते १९६२ या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून काम केले. नंतर १९६२ ते १९६७पर्यंत भारताचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून हुसेन १३ मे १९६७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या उद्घाटन भाषणात त्यांनी सांगितले की संपूर्ण भारत त्यांचे घर होते आणि त्याचे सर्व लोक त्यांचे कुटुंब होते.शेवटच्या दिवसांत, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वादविवाद करीत होता.९ ऑगस्ट १९६९ रोजी हा विधेयक मोहम्मद हिदातुल्लाह (कार्यकारी अध्यक्ष) यांच्याकडून राष्ट्रपतींच्या सहमतीला प्राप्त झाला.आपल्या अध्यक्षपदीच्या काळात जकीर हुसेन यांनी हंगेरी, युगोस्लाविया, यूएसएसआर आणि नेपाळ येथे चार राजकीय भेटी केल्या.

हुसेन ३ मे १९६९ रोजी मरण पावले, जो पहिल्या भारतीय राष्ट्राध्यक्ष पदावर मरण पावणारे होते. त्यांना नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया परिसर येथे त्यांच्या पत्नीबरोबर (जे काही वर्षांनंतर मरण पावले) दफन केले गेले. इलयुंगी येथे उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरविण्याच्या मुख्य उद्दीष्टाने, १९७०मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एक महाविद्यालय सुरू करण्यात आला.

अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्याच्या नावावर आहे.




#Article 94: भालजी पेंढारकर (250 words)


भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ चित्रतपस्वी भालजी पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या. 

भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली.

भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे... चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.

१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.




#Article 95: हमीद दलवाई (331 words)


हमीद उमर दलवाई (जन्म : मिरजोळी, चिपळूण तालुका, २९ सप्टेंबर १९३२; मृत्यू : ३ मे १९७७) हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. 

दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांत झाले. हमीद यांनी महात्मा जोतिराव फुले याच्या प्रभावामुळे संघटनेची स्थापना केली

मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्‍न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे. हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६ मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्‍नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा.
महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.

हमीद दलवाई हे रॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे,मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतीिारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न  इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे.

मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनने २०१७ सालच्या जानेवारीमध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला. हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्‍नी मेहरुन्‍निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट'  हा हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा लघुपट आहे.




#Article 96: ए.पी.जे. अब्दुल कलाम (650 words)


ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती  केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.

अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून अवकाशसंशोधन(एरोनाटिक्स)चा  डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर  त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
,
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व DRDO चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

२००२ च्या निवडणुकीच्या निवडणुकीत ९,२२,७८४ मतदारांच्या मतांनी लक्ष्मी सहगल यांनी मिळवलेल्या १,०७,३६६ मतांना मागे टाकीत कलाम यांना राष्ट्रपती केले. कलाम भारताच्या प्रजासत्ताक देशाच्या ११व्या अध्यक्षपदावर यशस्वी ठरले [47] आणि २५ जुलै रोजी शपथ घेण्याआधी राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झाले. [48] ज्यांना राष्ट्रपती बनण्यापूर्वी भारत रत्न, भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला आहे, असे कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. यापूर्वी डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन (1 9 54) आणि डॉ. जाकिर हुसेन  (1 9 63) हे आधी भारतरत्नचे लाभकर्ते होते व नंतर  भारताचे राष्ट्रपती झाले. [4 9] कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते. [50]

कलाम यांच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना  पीपल्स प्रेसिडेंट म्हणतात. [51] [52] [53] त्यांनी सांगितले की,  त्यांचे कार्यकालात प्रॉफिट बिल ऑफिसवर घेण्यात आलेले निर्णय सर्वात कठीण होते. [54] [55] [ 56] आपल्या कार्यकाळात tyana सादर केलेल्या २१ दया याचिकापैकी २० फेटाळून लावल्यामुळे कलाम यांच्यावर टीका झाली.  कलाम यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात बलात्कार करणाऱ्या धनंजय चॅटर्जी यांच्या दयायाचिकेस नकार दिला.त्यांनी २००५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. [5 9]

सप्टेंबर २००३मध्ये, पीजीआय चंदीगडमधील परस्पर संवादात, कलाम यांनी देशातील लोकसंख्या लक्षात घेऊन, भारतातील समान नागरी कायदा असण्याच्यी आवश्यकता प्रतिपादित केली. [60] [61] [62] [63]

कलाम यांचा  कार्यकाळ  २५ जुलै २००२पासून २५ जुलै २००७ पर्यंत झाला. [38]

कार्यालय सोडल्यानंतर कलाम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलांग, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर येथे व्हिजिटिंग प्राध्यापक झाले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बॅंगलोरचे मानद सहकारी; [78] भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्थान, चांसलर तिरुवनंतपुरम; अण्णा विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक; आणि संपूर्ण भारतातील इतर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये संलग्न. त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हैदराबाद येथे माहिती तंत्रज्ञान आणि बनारस  हिंदू युनिव्हर्सिटी आणि अण्णा विद्यापीठात तंत्रज्ञान शिकवले. [7 9]

मे  २०१२मध्ये कलाम यांनी 'भ्रष्टाचाराचा पराजय करण्यासाठी मी काय करू शकतो' याबद्दल भारताच्या तरुणांसाठी एक कार्यक्रम सुरू केला. [80] [81]

कुडानकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्पावरील कलाम यांच्या भूमिकेवर २०११मध्ये नागरी गटांनी टीका केली होती; स्थानिक लोकांशी बोलून त्यांनी परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचे समर्थन केले. [82] विरोधक त्यांच्या स्थानिक लोकांच्या भेटीला विरोध करत होते. लोकांनी कलाम यांना फक्त  परमाणु शास्त्रज्ञ म्हणून पाहिले होते आणि वनस्पतींच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल त्यांनी दिलेल्या आश्वासनांशी ते अजिबात संमत नव्हते. [83]




#Article 97: राजेंद्र प्रसाद (779 words)


डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. 
व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कॉंग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले.  महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.

डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.

प्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, १८९६ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.

डॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला. १९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.

राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत  सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.

१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट ॲंड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला.  १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी  १९२० मधील कॉंग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.

गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.

१९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले. दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.

ऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

२ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या  १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.




#Article 98: सर्वेपल्ली राधाकृष्णन (784 words)


 हे भारतीय तत्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
   सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय
इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन, चरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते.  प्रत्यश्यात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते.
पण  सर्वेपल्ली राधाकृष्णन यांची  परिस्थिती याहून वेगळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते.  सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्वज्ञान प्रसिद्ध होती.
स्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला. 

१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. 

राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.

त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते. 

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.

ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.

एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.

संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

(१९५४) :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.

राधाकृष्णन यांचे ग्रंथलेखन




#Article 99: बाळ ठाकरे (501 words)


बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.

ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.

बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी  ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. इ.स. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या श्‍याम‘ या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.

ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता. या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळ ठाकरे यांचे अग्रलेख असे.

झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.

ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळ ठाकरे यांचे निधन झाले..

बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती, तर नवाजुद्दीन सिद्दिकी हे ठाकरेंची भूमिकेत होते.




#Article 100: शकुंतला परांजपे (234 words)


शकुंतलाबाई परांजपे यांचा (जन्म : १७ जानेवारी १९०६; मृत्यू : ३ मे  २०००)  या त्यांच्या संततिनियमनाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्zwnj;सी. झाल्या. रँग्लर र.पु. परांजपे या आपल्या वडिलांसारखे त्यांना रँग्लर व्हायचे होते. त्यासाठी १९२६मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.

केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. पॅरिस आणि कोलोन येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड ट्रायपास पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली.  त्यांनी १० वर्षे युरोपमध्ये राहून जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिसमध्ये काम करून अनुभव मिळविला. त्या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, असे विविधांगी होते. व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते. 

त्यांचे वडील रँग्लर परांजपे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅट्रिक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या. त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक, उच्चशिक्षित व वाचनव्यासंगाने परिपूर्ण होते.

युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पर्स्वेशन हा लघुपट बनविला.  शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.

संततिनियमनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१९९१)




#Article 101: भीमसेन जोशी (563 words)


पंडित भीमसेन जोशी (जन्म : फेब्रुवारी ४, १९२२, गदग-कर्नाटक; मृत्यू : जानेवारी २४, २०११, पुणे-महाराष्ट्र) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.

भीमसेन जोशींचे  वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. 

त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खॉं, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खॉं, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खॉं यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खॉं यांच्याकडे काही काळ शिकले.
अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ  ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.

भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.

त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.

भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे  ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.

भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे  वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.

अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक जानेवारी २४,इ.स. २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.

 
भीमसेन जोशींना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही :-

भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

भीमसेन जोशी हे ६४ चुलत भावंडांपैकी एक होते.

भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि मुले राघवेंद्र आणि श्रीनिवास हे सर्वच गायक आहेत/होते.




#Article 102: मध्य प्रदेश (209 words)


मध्य प्रदेश () हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती.याचे ६ सांस्कृतिक विभाग आहेत. निमाड, मालवा, बुंदेलखंड, बघेलखंड, महाकौशल, ग्वालियर हे आहेत. 
भारतातील मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात हठ्नोरा आदिमानव हा मध्य प्रदेशात सुमारे ३,००,००० वर्षांपूर्वी, मिडल Pleistocene कालखंड पासून जगात आले असते हे दर्शविते. नंतर मेसोलीठीक कालावधी दिनांक ?? पेंट मातीची भांडी भीमबेटका रॉक shelters मध्ये सापडला आहे . कायथा संस्कृती (2100-1800 सालच्या) आणि माळवा संस्कृती (1700-1500 सालच्या) राज्यातील पश्चिम भागात शोधला गेले आहेत राहण्याचे चाल्कॉलीठीक साइट.

मध्य प्रदेशला लागून

मध्य प्रदेश या राज्याच्या मध्यावर नर्मदा नदी आहे व सातपुडा व विंध्य हे पर्वत आहेत.

मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे.

मध्य प्रदेश राज्याचे खालील दहा प्रशासकीय विभाग आहेत.

मध्य प्रदेश राज्यात् खालील ४८ जिल्हे आहेत.

यावरील विस्तृत लेख पहा - मध्य प्रदेशमधील जिल्हे.




#Article 103: महाराष्ट्र दिन (213 words)


महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा  दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. 

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट
स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून
गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे
झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे




#Article 104: गुजरात (212 words)


गुजरात (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८%  आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.

ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारतातील पहिले बंदर उभारले गेले.

 

यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे.

गुजरात मधील समूहायांचे प्रमाण

सुरुवातील येथे कॉंग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९०च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य होते.

डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य

२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान

३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.

४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.

५) राणी नी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. हि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे. 

६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.




#Article 105: अकोला (1093 words)


अकोला हे महाराष्ट्राच्या  उत्तर भागात असलेल्या विदर्भातले एक शहर आहे. हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई पासून ६०० किलोमीटर पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. दैनिक देशोन्नती हे वृत्तपत्र अकोल्यातून प्रसिद्ध होते. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर अक्षांश व ७६.५९ पूर्व रेखांश आहे. हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी पूर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे.
अकोला शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.[६] जातो. जिल्ह्यात बाळापूर, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, अकोला असे एकूण सात तालुके आहेत.

अकोला शहराला त्याचे नाव अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून पडलेले आहे.

१ जुलै १९९८ ला वाशिम हा जिल्हा वेगळा झाला.

असदगड हा नरनाळा व बाळापूर किल्ल्यांसह अकोला जिल्ह्यातला एक प्रमुख किल्ला आहे.

१. हरिहरपेठ

२. जठारपेठ

३. रामदासपेठ
४. जठारपेठ

हरिहरपेठ हे जुन्या शहर परिसर भागात असून इथे जुनी वस्ती आहे. येथील पुरातन विठ्ठल मंदिर फार प्रसिद्ध आहे.

अकोला शहराचा विस्तार मागील १० वर्षांत खूप झाला असून शहराची वाढ उपनगरांत व आजूबाजूच्या खेड्यांत होत आहे.  गोरक्षण रोड, कौलखेड, खदान, सिंधी कॅंप ही अकोला शहराची उपनगरे आहेत. शिवाय बाजूची गुढधी, उमरी, शिवनी, शिवर, खरप, न्यू तापडिया नगर,  डाबकी, भौरद ही खेडी संपूर्णपणे निवासी झालेली आहेत. ही सर्व खेडी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली असून अकोला शहराची लोकसंख्या अंदाजे ६.५ लाखाच्या आसपास आहे.

अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश, वारी भैरवगड चा मारोती, काटेपूर्णाची चंडिकादेवी, पातूरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. संत गजानन महाराजांचे शेगांव येथील मंदिर अकोल्याहून ५० किमी अंतरावर आहे.
अकोल्यातील राजराजेश्वराचे मंदिरातील शिव हे अकोल्याचे ग्रामदैवत असून श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.येथील लोकं पूर्णा नदीवरून कावडीने पाणी आणून मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करतात.

नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे. नरनाळा किल्ला व अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांत खूप वाढली असून जिल्हा प्रशासनाने दरवर्षी भरणारा 'नरनाळा महोत्सव' सुरू केला आहे. वारी भैरवगड येथून जवळच आहे.ह्याशिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्य व येथील मोठे धरण सुद्धा लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. इथे शासकीय निवासस्थाने व व्यावसायिक हॉटेल्स उपलब्ध आहेत.

उष्ण व विषम हवामानाचा हा जिल्हा असल्याने उन्हाळा अतिशय उष्ण तर हिवाळा अतिशय थंड असतो. जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा असून हा जिल्हा तापी- पूर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे.

जिल्ह्यातील इतर नद्या - उमा , काटेपूर्णा, मोर्णा, शहानूर, मन, आस, विश्वामित्री, निर्गुणा, गांधारी, आणि वान.

काटेपूर्णा, उमा , शहानूर आणि वान या नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत.

मुंबई ते कोलकाता या मध्य रेल्वेमार्गावरील;  तसेच अजमेर-पूर्णा या मार्गावरील अकोला हे महत्त्वाचे जंक्शन आहे.  हे रेल्वेने मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोल्हापूर या शहरांशी थेट जोडलेला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेवरील पूर्णा-अकोला हा मार्ग ४ वर्षापूर्वी ब्रॉडगेज करण्यात आला आहे. ह्या मार्गावरून आता अकोला-पूर्णा, अकोला-काचीगुडा, नागपूर-कोल्हापूर अशा रेल्वेगाड्या धावत आहेत. पण अजूनही अकोला-खांडवा हा रेल्वेमार्ग मीटर गेजवरच आहे. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यास चेन्नई-दिल्ली मार्गावरील सर्वांत कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या ह्या मार्गावरून अकोला-महू, अकोला-खांडवा, अकोला-जयपूर अशा रेल्वेगाड्या धावतात.

२००९मध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर शिवनी-शिवर येथे नवीन स्थानक झाले आहे. ते मुख्यत: औद्योगिक परिसरातील मालवाहतुकीसाठी बांधण्यात आले आहे. ह्या मार्गावरून अकोला-धुळे, अकोला-नागपूर आणि अकोला-नांदेड अशा पॅसेन्जर ट्रेन्स सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

अकोला हे राष्ट्रीय महामार्ग ६ वर असून त्याद्वारे ते मुंबई, कोलकाता, सुरत ह्या शहरांशी जोडलेले आहे. हा मार्ग ४ पदरी करण्याचा प्रस्ताव मान्य झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय अकोला-हैदराबाद हा नांदेड मार्गे जाणारा राज्य महामार्ग आहे. त्यापेकी अकोट-अकोला-वाशीम-हिंगोली हा, व बाळापूर-पातूर हा राज्य महामार्ग ४ पदरी होण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. इंदूर-अकोला-नांदेड-हैदराबाद हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्याची मागणी होत आहे.

अकोला इथे हवाई वाहतुकीसाठी विमानतळ आहे. सध्या विस्तारीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, विस्तारीकरणासाठी लागणारी जमीन कृषिविद्यापीठाकडून मिळविण्यात अडचणी येत आहेत.   हे विस्तारीकरण झाल्यास पश्चिम विदर्भातील औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ अतिशय उपयोगी ठरणार आहे.

अकोला ही परिसरातील फार पूर्वीपासून एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कापसाची, शेती अवजारांची, सोन्याची आणि गुरांची अशा प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. जवळच्या वाशीम, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या परिसरातील लोक अकोल्यातूनच मालाची खरेदी करतात.

शहरात सोन्याची सुद्धा मोठी बाजारपेठ असून अख्ख्या पश्चिम विदर्भातील लोक जुन्या-नवीन पद्धतीचे दागिने खरेदीसाठी इथे येत असतात. 
त्यामुळे अकोला शहरात व्यापारी वर्ग फार पूर्वीपासून वास्तव्यास आहे. विदर्भ प्रदेशातील नागपूर पाठोपाठ अकोला ही मोठी बाजारपेठ गणली जाते.

अकोला शहरात नागरी प्रशासन अकोला महापालिकेतर्फे पाहिले जाते. त्यामधे ७१ वार्ड समाविश्ट आहेत. अकोला महापालिकेतर्फे AMT या अंतर्गत शहरी बससेवा पुरविली जाते. अकोला महापालिकेत शहराला लागून असलेली  उमरी, गुढधी, शिवनी, शिवर, डाबकी, खरप, खदान, भोरद, बाभुळगाव इत्यादी खेडी समाविष्ट आहेत.मात्र अकोला शहरात निवासी सोयी चांगल्या नाहीत

अकोला जिल्ह्याचे ठिकाण असून जिल्ह्यासाठी असणारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय येथे आहे.

    सध्या अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर हे आहेत.

अकोला शहर येथिल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. अकोला शहरातले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वोपचार रुग्णालय आहे. तसेच विभागीय वैद्यकीय उपसंचालकाचे कार्यालय अकोल्यात असून पश्चिम विदर्भातील वैद्यकीय सुविधांचा कारभार येथून चालतो.
अकोला शहरातील इतर रुग्णालये व इस्पितळे खालीलप्रमाणे:

तसेच इथे नर्सि॑ग महाविद्यालय, दंतशिक्षण महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व  होमिओपॅथिक महाविद्यालय आहे.  
अकोला शहर येथील Elizarov Technique आणि IVF टेक्निकसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध  आहे. तसेच येथील संत तुकाराम हॉस्पिटल मध्ये गरीब रोगपीडितांसाठी स्वस्त दरांत उपचार केले जातात.
अकोला येथील जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात परावर्तित झाल्यापासून इथे वेगळे जिल्हा रुग्णालय होणे जरुरीचे होते, परंतु ते झाले नाही. अकोला जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर निर्माण करावे ही जिल्ल्ह्यतील गरीब जनतेची वाढती मागणी आहे.

अकोला शहारातील वाहतूक व्यवस्था महापालिकेद्वारे चालविल्या जाणाऱ्या AMT बसेसद्बारे चालविले जाते. AMT बसेस शहरातील वाहतुकीसाठी सर्वांत स्वस्त पर्याय आहे. ह्याशिवाय  रिक्षा व खासगी बसेस शहरात वाहतूक करतात.

जिल्ह्यातील जमीन काळी, कसदार (रेगूर) आहे. मुख्य पीक कापूस व तेलबिया आहे.  खरीप ज्वारी उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे. अकोला जिल्ह्यातील शेतीचे ढोबळमानाने ३ गटांमध्ये वर्गीकरण करता येईल :

यांपैकी खारपान पट्टा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा आहे.

पारस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहे.

अकोला जिल्ह्याची विभागणी होऊन वाशीम हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला.
अकोला जिल्ह्याचे एकूण ७ तालुके आहेत १) अकोला  २) मुर्तिजापूर ३) बार्शीटाकळी ४) बाळापूर ५) पातूर ६) तेल्हारा ७) अकोट

अकोला शहरातील महत्त्वाची महाविद्यालये खालीलप्रमाणे सांगता येतील:

१. शासकीय वैद्यकीय महाविद्यलय, अकोला

२. अकोला इंजिनिअरिंग कॉलेज, अकोला (श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालीत)

३. भोंसला कॉलेज ऑफ इंजीनीअरींग ॲन्ड रिसर्च, अकोला

४. श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी, अकोला

५. कृषी महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख क्रुषी विद्यापिठ, अकोला

६. अन्न प्रक्रिया अभियान्त्रीकी महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, अकोला

७. स्नातकोत्तर पशू वैद्यकीय महविद्यालय, अकोला

८.श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला

९. श्री. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स ॲंड सायन्स, अकोला.

१० . स्व. पांडुरंग पाटील नर्सिंग (B.Sc) कॉलेज (कान्हेरी सरप) अकोला

अकोल्यात ३ मोठ्या संशोधन संस्था आहेत.

१. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ: विद्यापीठात विदर्भातील शेतीजीवनाचा अभ्यास व विविध पिकांवर संशोधन केले जाते. विद्यापीठाने आतापर्यंत अनेकविध प्रकारची वाणे व शेती अवजारे संशोधित केली आहेत.

२. महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ, अकोला

३. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला

या शहरात बाबुजी देशमुख व्याख्यानमाला चालविली जाते.




#Article 106: अहमदनगर (1603 words)


  

अहमदनगर हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० किलोमीटरवर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी होय. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. हिंदुस्थानामध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीला हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे.

अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू होता.त्याच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले.

मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात त्याने बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. 

आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहमदनगरमध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली.

तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. 

अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९० ची अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी १७२४ ची हैदराबादचे निजामशाही. या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही.

अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवाजीवे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले/आहे. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केले.

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत होत. मलिकअंबर नंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन  परांडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाही विरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटण  चे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनांतून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परांडा, औसा, उदगीर, धारूर,देवगिरी यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्ग येथे मरण पावला परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या बुऱ्हाणशहाला (१५०८ ते १५५३) इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला.

निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले.

तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजीविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.

मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला होत.त्यामुळे त्याच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला आहे.

पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते.
पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी कॉंग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला आहे.

छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही.

निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वररांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे.

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपत  च्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे.देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्या हस्ते राष्ट्रीय भूजल पुरस्कारमिळालेला आहे.हा पुरस्कार  मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरदराव पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला होता.देशातील फक्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे.

१. स्थान :- अहमदनगर शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे.या जिल्हाला सात जिल्ह्यांच्या सिमा नी जोडले आहे/आहेत.

२. जमिनीचे प्रकार :-अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्र्चंद्रगड डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. पुणे-संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला  विटा घाट दिसेल.

अहमदनगर जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात. 

१) पश्चिमी डोंगराळ क्षेत्र २) मध्यवर्ती पठार प्रदेश ३) उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र

१. पश्चिमी डोंगराळ क्षेत्र : अकोले तालुका व संगमनेर तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगड च्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. सह्याद्रीतील ५४२७ फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे.

२. मध्यवर्ती पठार प्रदेश : या क्षेत्रात पारनेर,अहमदनगर तालुका आणि संगमनेर,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येतो.

३.उत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र : या क्षेत्रात उत्तरी कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवास्याचा समावेश आहे. हा गोदावरी आणि प्रवरा नदीच्या खोरयाच भाग आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या दक्षिणेकडील तालुक्यांचा भागही या भौतिक विभागात समाविष्ट केला आहे. या प्रदेशात घोड, भीमा आणि सिना नद्यांचे खोरे आहे.

जिल्ह्यात दोन प्रमुख नद्या आहेत.गोदावरी आणि भीमा. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.या नद्यांचे पाणलोट क्षेत्र हरिश्चंद्रगडावर आणि जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्या नद्या:प्रवरा,मुळा,सिना आणि धोरा.प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे.प्रवरा नदीचे पाणी एके ठिकाणी खूप उंचीवरून पडते,ज्यामुळे रंधा धबधबा तयार होतो. भीमा नदी आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील  डोंगराळ भागात जंगल आहे. साग, बाभूळ, धावडा, हळदू आणि नीम ही या जंगलात आढळणारी प्रमुख झाडे आहेत.आंबा,हळदी,आवळा,बोर आदी फळझाडे जिल्ह्यात आढळतात.

मुंबई - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगर शहरातून जातो/जात आहे.अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, बीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहेत/आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अहमदनगरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.

दौंड-मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे  रेल्वे स्थानक आहे.येथून जाणार्‍या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात.
अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक येथे पहा.

  येळी या ठिकाणी अतिप्राचिन हेमाडपंथी बांधकाम असलेले येळेश्वराचे मंदिर आहे 
ह.भ.प.रामगिरी महाराज यांचे येळेश्वर संस्थान आहे.
  महानुभव पंथीय लिळाचरित्र या ग्रथांत येळी गावचा उल्लेख असलेले सुप्रसिद्द ठिकाण नदी किणारी आहे.




#Article 107: उस्मानाबाद (479 words)


उस्मानाबाद (इंग्रजी मध्ये: ) शहर हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.शहराचे जुने नाव उस्मानाबाद ची ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे खुप पुरावे सापडतात पण निजामशाही मधील राजा उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात.

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या ११२०८५ होती. पैकी ५८०९८ पुरुष तर ५३९८७ स्त्रिया होत्या. १३३४६ व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. उस्मानाबाद शहराचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहे. साक्षरता प्रमाण ८८.१५% आहे. पुरुष साक्षरता ९३.४५% आहे, तर स्त्री साक्षरता ८२.५२% आहे.

उस्मानाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.

उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा निझाम मीर उस्मान अली खान याच्या नावावरून पडले. उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते.

तुळजाभवानी ही उस्मानाबादची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते.आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील जलदुर्ग आणि परंडा येथील भूईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून, येथील जलमहाल हा वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदुर्ग जवळ अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, डोमगाव येथील कल्याणस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहेत. उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनीचे मंदिर तसेच शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे.

शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत. उस्मानाबादचा इतिहास रामायण काळापासून आढळतो. वनवासात असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव केल्याचे सांगतात. उस्मानाबाद शहरानजीक पापनाश येथे सीतेची नहाणी आहे. या परिसरात केवड्याची झाडे आहेत. त्यापूर्वी उस्मानाबाद मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते. त्यानंतर उस्मानाबाद बहामणी आणि विजापूर संस्थानात अाले. १९४८ पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात होते.

खास पदार्थ :

उस्मानाबादचे गुलाब जामून प्रसिद्ध आहेत. खवा, मैदा आणि साखरेचा पाक यापासून बनवलेले गुलाब जामून स्वादिष्ट आहेत. याशिवाय उस्मानाबादी शेळीचे चवदार मटन प्रसिद्ध आहे. या मटनाचा शेरवा किंवा रस्सा वैशिष्ट्यपूर्ण असून मटन शिजवलेल्या गरम पाण्यात हळद, तीखट, काळा मसाला, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आदी टाकून त्यापासून बनवलेला शेरवा लोकप्रिय आहे.

कुंथलगिरी जवळील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाटा येथील खवा, पेढे प्रसिद्ध आहेत.

उस्मानाबाद शहर राष्ट्रीय महामार्ग ५२ वर वसले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-औरंगाबाद-बीड-उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर-विजयपूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक) असा जातो.

उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे. उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

उस्मानाबाद जिल्हा
या जिल्ह्यामध्ये परंडा व नळदुर्ग या ठिकाणी किल्ले आहेत.तुळजापूर या ठिकाणी तुळजा भवानीचे भव्य मंदिर आहे.उस्मानाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बालाघाट डोंगर रागामध्ये वसलेले गाव आहे.उस्मानाबादची शेळी प्रशिध्द आहे.त्या जवळ तुळजाभवानी देवी चे मंदिर जवळ लाभले गेले आहे. त्या ठिकाणी प्रसिद्ध असे हतलादेवी मंदिर ही आहे. श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे उस्मानाबाद पासून १५ कि. मी. अंतरावर दत्तमहाराजांचं एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम आहे.




#Article 108: कोल्हापूर (5506 words)


कोल्हापूर हे  महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी ठिकाणे आहेत. [शाहू महाराज छत्रपती शाहूमहाराजांच्या] काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे.

               
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे कि ज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे.कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यासोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील खाण्या पिण्यापासून फिरण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी खास आहेत.येथे येणाऱ्या पर्यटकांचे येथील संस्कृतीची सुंदरता पाहून मनच भरत नाही.महाराष्ट्रातील या सुंदर शहरामध्ये अशा बरयाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आकर्षक वाटतील.कोल्हापूर एक प्राचीन शहर आहे कि ज्याच्यावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते. स्थळ कोणतीही असो पण त्या ठिकाणची ट्रीप स्मरणात राहील अशी मजेदार होण्यासाठी त्या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ खाण्यास कधीच विसरायचे नाही.आणि विषय जेव्हा  कोल्हापुर चा होतो तर त्याठीकाव्ची मिसळ कोण विसरेल .महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापुर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते जसे की बावडा मिसळ, फडतरे मिसळ , चोरगे मिसळ , हॉटेल साकोलीमिसळ ,खासबाग मिसळ आणखीन अशा भरपूर आहेत. ही गोष्ट झाली शाकाहारी पदार्थांच्या खाण्यासंदर्भात आता आपण मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात पाहू तांबडा रस्सा (मटणाचे सूप ),पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे ),मटणाचे लोणचे ,खिमा राईस बॉल्स कोल्हापुरात आलेली प्रत्येक व्यक्ती या पदार्थांची चव घेतल्याशिवाय राहत नाही. 
             
कोल्हापूर ठिकाण तांबडा आणि पांढरा रस्सा, मिसळपाव, वडापाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच, कोल्हापूरची 'कोल्हापूरी चप्पल' ही खुप प्रसिद्ध आहे त्याला कोल्हापुरी चप्पल असे म्हंटले जाते .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे.तसेच बावडा मिसळ, फडतरे, चोरगे, हॉटेल साकोली अशी अनेक मिसळपावची ठिकाणे प्रसिद्ध आहेत.मिरजकर तिकटी,गंगावेस येथे दुध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दुध मिळते.कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांपुढं सर्वप्रथम येतो तो तांबडा रस्सा-पांढरा रस्सा. नंतर आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी खाद्यजीवनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मांसाहार. इथल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते. याच खाद्यसंस्कृतीचा हा परिचय, काही शाकाहारी पदार्थांसह.कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातलं मोठं शहर. इथलं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणं आहेत.लवंगी मिरची आणि तमाशा यासाठी विख्यात असलेल्या कोल्हापुरातला तांबडा रस्सा व पांढरा रस्साही प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्हा (जुना) शाहूमहाराजांचा जिल्हा म्हणूनही सर्वपरिचित आहे.
        
एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला.  कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं. कोल्हापूरची मिसळ आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. पिवळाधमक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचं वैशिष्ट्य. सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पण ‘व्हेज कोल्हापुरी’ हा प्रकार कोल्हापुरातच मिळत नाही. कारण, या नावाचा प्रकारच मुळात कोल्हापुरात नाही! असो. इथली गंमत म्हणजे, तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचं. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो. हा रस्सा बाकी रश्शांाप्रमाणे किंवा ग्रेव्हीप्रमाणे टिकाऊ नाही. तांबडा रस्सा तयार करताना कोल्हापुरी चटणी वापरावी लागते. कोल्हापूरचा अजून एक प्रकार मला आवडतो व तो म्हणजे दावणगिरी लोणी दोसा. हा दोसा ‘जनता बाजार’ इथं मिळतो. भरपूर लोणी आणि जाळीदारपणा ही त्याची खासियत. यात चुरमुऱ्याचा वापर केला जातो. कोल्हापुरी मांसाहारी, शाकाहारी स्वयंपाकाची घराघरातली पद्धत जवळपास सारखीच असते. पांढरा तांबडा रस्सा, सुकं मटण, खिमा हे प्रकार आख्ख्या कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्यांचीही (चपात्या) एक खासियत आहे. तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली ही गरम गरम चपाती अप्रतिम लागते. इथली आणखी एक खासियत म्हणजे ‘पोकळा’ नावाची पालेभाजी. तव्यावर केलेली ही भाजी, भाकरी आणि खर्डा यांना तोड नाही. याबरोबरच दूधकट्ट्यावर मिळणारं आणि ग्राहकासमोरच काढण्यात येणारं म्हशीचं धारोष्ण दूध. थेट पेल्यातच धार काढायची व पेला तोंडाला लावायचा! आणखी एक अफलातून प्रकार म्हणजे, ताज्या दुधात सोडा घालून प्यायची पद्धत अशा पद्धतीने दुधाचे निर्जंतुकीकरण होत

एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला.  कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं.
कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे.प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी १०८ शक्तीपीठांची सूची तयार केली आहे कि जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे.यामध्ये करवीर क्षेत्राची श्री महालक्ष्मी (जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे) चे विशेष महत्त्व आहे.श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते.यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. ही ती जागा आहे कि जिथे विष्णू ची पत्नी श्री महालक्ष्मी ला मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करते.

श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू दोघेही नेहमी करवीर क्षेत्रामध्ये राहतात असे म्हंटले जाते आणि ते दोघेही हे करवीर निवास महाप्रकाश्याच्या वेळेस पण सोडणार नाहीत.करवीर क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रुपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे.भगवान विष्णू स्वतः या क्षेत्राला वैकुंठ आणि क्षीरसागर या दोन स्थानांपेक्षाही अधिक पसंत करतात.कारण इथे त्यांची पत्नी लक्ष्मी चे निवासस्थान आहे.म्हणूनच या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते कि श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.

महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल कि हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच ६०० ते ७०० काळातील असावे.मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रात्नापासून बनवली आहे ही जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते.महालक्ष्मी ची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे.कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे.यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.  [श्री करवीर निवासिनी]

इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२५ ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती.
इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला.  त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले .१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहेत्.

१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले होते . २ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे.३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला.४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली..५ संभाजीराजास पकडणार्‍या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली.  ६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी या भूमीत घडला. 

शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले . कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले.

कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानयानासाठी स्वतची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरण पूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती व आज हि सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे.या सिंचन व्येव्स्तेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झरा ला सुरवात होते तीतून ते कळंबा तलाव येथे आणले.तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच ठेवला जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा केवा इतर काही जाऊन दुषित होऊ नये कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्या द्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले या साठी भौगोलिक परीस्थिती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहरात पुरवले जात होते.

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे. राष्ट्रीय  महामार्ग ४ इथून जातो.

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे कि ज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे.कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यासोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील खाण्या पिण्यापासून फिरण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी खास आहेत.येथे येणाऱ्या पर्यटकांचे येथील संस्कृतीची सुंदरता पाहून मनच भरत नाही.महाराष्ट्रातील या सुंदर शहरामध्ये अशा बरयाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आकर्षक वाटतील.कोल्हापूर एक प्राचीन शहर आहे कि ज्याच्यावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते.
कोल्हापूरच्या हवामानात सागरी हवामान आणि जमिनीवरील हवामान यांचे मिश्रण आहे . तापमान १०°सें ते ३५° सें दरम्यान असते. शेजारील शहरांच्या तुलनेत कोल्हापूरमधील उन्हाळा तुलनेने सौम्य आहे,  परंतु हवामान जास्त दमट असते. उन्हाळ्यात शहराचे कमाल तापमान हे ३८°सें असून सरासरी ३३°सें ते ३६°सें च्या दरम्यान असते.

हिवाळा साधरणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो . महाराष्ट्रातील इतर शहरांच्या (पुणे आणि नाशिक) मानाने कोल्हापूरचे तापमान हिवाळ्यात बरेच उबदार असते. हिवाळ्यातले येथील तापमान हे दिवसा २६°सें ते ३२°सें च्या दरम्यान असते तर रात्री ते ९°सें ते १६°सें पर्यंत खाली जाते.

कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. तलाव शहर आहे असे म्हणतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी  होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. यातील फक्त रंकाळा, आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत.   १७९२ साली कात्यायनीहून नळ घालून शहरात पाणी आणून ते शहरातील निरनिराळया ठिकाणच्या ३२ विहिरीमध्ये सोडले गेले. १३० वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कळंबा तलाव बांधण्यात आला. ओघळणारे पावसाचे पाणी कळंबा गावाजवळ दगड मातीचा बंधारा घालून अडवण्यात आले.  शहरापेक्षा उंच ठिकाणी हा तलाव असल्याने त्यातील पाणी नैसर्गिक उताराच्या साहाय्याने शहरात नळावाटे आणले.

कोल्हापूर आता दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण शहर म्हणून ओळखले जाते.राजकिय, शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. कोणतेही नव्याने होणारे बदल योग्य प्रकारे स्वीकारून आपल्या योग्य परंपरा पुढे ठेवण्याची कला कोल्हापूरला योग्य प्रकारे साधली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे महत्त्वाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो.येथे गुळ संशोधन केंद्राची स्थापना ही करण्यात आली. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर,स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी.पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ४०० कारखाने इथे आहेत.कागल फाईव स्टार एमआयडीसी आहे.

महापौर - सौ. सूरमंजिरी लाटकर

उप महापौर - श्री. भूपाल शेटे

महानगरपालिका आयुक्त - डॉ. mallinatha kalshetty

महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त - श्री. नितिन ना देसाई

जिल्हाधिकारी - दौलत देसाई

अपर जिल्हाधिकारी - नंदकुमार काटकर

निवासी उपजिल्हाधिकारी -संजय शिंदे

जिल्हा पुरवठा अधिकारी - श्रीमती राणी ताटे

उप विभागीय अधिकारी करवीर-सचिन इथापे

तहसीलदार करवीर -सचिन गिरी

कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापूराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे.

कोल्हापूर शहरात खालील काही नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. येथे दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामध्ये सायबर(छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रीसर्च,कोल्हापूर) गेल्या ४० वर्षापासून प्रसिद्ध आहे.ही एकमेव स्वायत्त संस्था आहे ज्याला NAAC A+ मिळाले आहे आणि ह्या ठिकाणी संशोधन पण होते. पर्यावरण व्यवस्थापन या विषयामध्ये एम.बी.ए. व  पर्यावरण व सुरक्षा या विषयामध्ये  एम्म.एस्सी. असे नाविन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत.इ.स.१९६२ मध्ये स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
तसेच कोल्हापूर छ. शिवाजी महाराज यांचे नावाने परिपूर्ण व सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे
जिल्ह्यातील गारगोटी येथे परिपूर्ण शिक्षणाची सोय आहे .महावीर कॉलेज . श्रीमती ताराराणी ट्रेनिंग कॉलेज. ‍‍ राजाराम कॉलेज .
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर हे देखील येथील अग्रगण्य शिक्षण केंद्र आहे.

कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली.चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रभात स्टुडिओ आणि कोल्हापूर चीत्रनगरी सारखी उत्तम ठिकाणे उपलब्ध आहेत.

     कुस्ती’ मर्दानी कुस्ती हा कोल्हापूरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वतः एक चांगले पैलवान आहेत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात. येथील राजे शाहु महाराज हे एक पैलवान होते आणि त्यांनी स्वतः खासबाग मैदानाची कुस्ती खेळासाठी बांधणी केली. जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी तेथे रोम येथील प्रसिद्ध ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान उभारले.खासबाग हे एकमेवच भारतातील कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे.
एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्‍या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या.  अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३००  तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत.  त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते.  ते आखाडे असे :-१. कसबा बावडा कुस्ती केंद्र२. खासबाग३. नवी मोतीबाग तालीम४. पंत बावडेकर आखाडा५. मोतीबाग तालीम६. शाहू आखाडा, चंबूखडी७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड८. शाहूपुरी आखाडा९. शाहू विजयी गंगावेस10.कालाईमाम तालिम

झणझणीत व मसालेदार जेवणासाठी कोल्हापूरची ख्याती आहे.कोल्हापूरची मिसळ, भडंग आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्‍सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरात मिळणारा तांबडा पांढरा रस्सा कुठेच मिळत नाही.  कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. झणझणीत खाद्य संस्कृती कोल्हापूरमध्ये पहावयास मिळते.

कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत.हि चप्पल पूर्णपणे चामड्या पासून बनवली जाते.कोल्हापुरी चपलाला GI मानांकन मिळाले.(२०१९) कोल्हापूरी साज, चपला हार इत्यादी दागिने प्रसिद्ध आहेत.

कोल्हापूर पासून २२ किमी अंतरावर श्री क्षेत्र जोतीबा (वाडीरत्नागिरी) हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ श्री जोतीबाच्या दर्शनाला येतात.जोतीबा चैत्र याञेला प्रसिद्ध अशी गर्दी असते आणि मंदिरावर गुलालाचा वर्षाव असतो .

सद्य राजकीय स्थिती:

कोल्हापूर मध्ये लोकसभेचे दोन तर विधानसभेचे दहा मतदारसंघ पाहायला मिळतात.त्यापैकी लोकसभेचे कोल्हापूर आणि हातकनंगले असे दोन आहेत पैकी हातकनंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यांचा समावेश झालेला आहे. सध्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचे नेतृत्व शिवसेनेचे संजयदादा मंडलिक व शिवसेनेचे धैर्यशील माने हे करत आहेत.कोल्हापुर जिल्ह्यात २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणे दहा मतदारसंघात राष्ट्रीय कॉंग्रेस ला ५ , राष्ट्रवादी कॉंग्रेसला १ , शिवसेना १ , जनसुराज्य शक्ती पक्ष १ व अपक्ष २ असे एकूण १० विधानसभा सदस्य कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताना पहावयास मिळतात.ठाकरे सरकारच्या नवीन झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानुसार कोल्हापूरच्या वाटयाला तीन मंत्रीपदे आलेली आहेत पैकी एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपदे आहेत.यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट तर कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना राज्यमंत्रीपद तर पूर्वीचे राष्ट्रवादीचे पण सध्या अपक्ष लढलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाटयाला शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपद आले आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थिती ही सुरवातीच्या काळात वेगळी होती आणि आता नव्याने महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या महाआघाडीच्या माध्यमातून वेगळी पाहायला मिळते.सुरवातीच्या काळात अडीच वर्ष जिल्हा परिषद हि भाजपच्या ताब्यात होती.पहिल्या अडीच वर्षाच्या कालात भाजप माजी आमदार अमल महाडीक यांच्या पत्नी शौमिका महाडीक या जिल्हा परिषद अध्यक्षा पदावर होत्या. पण अलीकडेच महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाचा परिणाम म्हणून ती पुन्हा कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना आणि शेतकरी संघटना यांना मिळून महाआघाडीच्या ताब्यात गेली.सध्या कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या गटाला जिल्हा परिषद अध्यक्ष पद तर राष्ट्रवादीच्या वाटयाला उपाध्यक्ष पद आहे शिवाय शिवसेनेच्या वाटयाला तीन सभापातीपदे आली आहेत.

सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कॉंग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे काम पाहत आहेत.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे अहमदनगर चे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत.संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून गोकुळ दुध संघाकडे पहीले जाते. जो गट किंवा पक्ष गोकुळच्या सत्तेत असेल  त्या गटाचे/पक्ष्याचे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय सत्तेत उच्च स्थान असते.कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जनतेला पुरक अशा दूग्ध व्यवसायाचा एक भक्कम पर्याय निर्माण व्हावा या अपेक्षेने स्थापन झालेला हा गोकुळ दुध संघ आज संपूर्ण भारत देशातील नंबर दोनचा सर्वात मोठा दुध संघ आहे.आणि सध्या हाच दुध संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या सत्तेचे केंद्र स्थान आहे. कोल्हापूर जिल्हयात एकूण बारा पंचायत समिती आहेत.कोल्हापूर जिल्हयातील गोकुळ दुध संघाप्रमानेच कोल्हापूर मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक हि देखील कोल्हापूरच्या सत्तासमीकरणाचे केंद्रस्थान मानले जाते.

कोल्हापूर महानगरपालिका हि गेली दहा वर्षापासून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या ताब्यात आहे.त्या अगोदर ती गटातटांच्या मदतीने अपक्षांच्या ताब्यात असायची पण अलीकडे दहा ते बारा वर्षापासून वेगळी राजकिय समीकरणे घडून आली.त्याचाच परिणाम म्हणून सध्या कोल्हापूर महानगरपालिका ही कॉंग्रेस नामदार सतेज उर्फ बंटी पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखालील संयुक्त आघाडी काम करत आहे.

ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. 
छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी(खासबाग मैदान), गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. आता उन्हाळ्याच्या कालावधीत शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर पर्यटनासाठी सहकुटूंब बाहेर पडण्याचा ट्रेंड रुळला आहे. याच काळात पर्यटकांना कोल्हापूर हे डेस्टिनेशनही खुणावते आहे. शहर परिसरातील, जिल्ह्यातील निसर्ग सर्वांना मोहात पाडतो. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर. एका बाजूला संध्यामठ. पश्चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. 
मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचं तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात. 
निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचं गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण राधानगरीतले. चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत फिरता येतं. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लींग चेतवतात.

माणसाच्या जीवनातील धावपळ जसजसी वाढत जाईल, तसतसे ताणतणावाला फाटे देवून चैतन्याच्या वाटाही शोधण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे विविध निमित्तांनी, उद्देशाने, मार्गाने पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ धार्मिक उद्देशाने होणाऱ्या पर्यटनाचे स्वरुप आज नक्कीच बदलले आहे. निखळ आनंद, मौजमजा यापासून अगदी सामाजिक विषयावरील जनजागृतीपर्यंतच्या साऱ्या उद्देशांना पर्यटन या विषयाने स्वत:मध्ये सामावून घेतले आहे. धार्मिक, सामाजिक, गडकिल्ले पाहणी असो, वन्यजीवांना विविध वनस्पतींना भेटणे असो, पर्यटनाच्या साऱ्या वाटा, सारे रस्ते आपसूकच कोल्हापुरला आल्याशिवाय राहत नाहीत हेच खरं... आणि एकदा कोल्हापूरात आलं म्हटलं की, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरची भेळ, कोल्हापुरी साज, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गुळाचा गोडवा, कोल्हापूरची चंदेरीनगरी, हुपरी येथील चांदीचे कलाकुसरीचे दागिने, कोल्हापुरी फेटा या साऱ्या गोष्टींबरोबरच ‘या पाव्हणं’ असं म्हणणारी कोल्हापुरी माणसं आहेतच आपल्या स्वागताला ...तर आपण आज जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाविषयी...दक्षिण काशी...महालक्ष्मी रंक असो वा राव साऱ्यांचे हात निस्सीम भक्तीनं जिथं जोडले जातात ती सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवतं असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदीर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्यावरील कोरीव काम ही प्रेक्षणीय आहेत. याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रातील रोषणाई या मुळातच अप्रतिम सुंदर असणाऱ्या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलविते. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. जुना राजवाडा आणि भवानी मंडप हे याठिकाणचे आकर्षण आहे. कोल्हापूर एस. टी. स्टँडपासून केवळ दोन कि.मी. अंतर आहे. बस, रिक्षा, आदि सर्व माध्यमातून या ठिकाणी पोहोचता येते. दख्खनचा राजा ज्योतिबा दख्खनचा राजा असा लौकिक असणारे सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजे ज्योतिबा. लगतच्या अन्य राज्यांमधूनही भाविक याठिकाणी येतात. वाडी रत्नागिरी येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. ज्योतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. ज्योतिबाच्या सासन काठ्या प्रसिद्ध आहेत. ज्योतिबावर 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. यात्रेच्यावेळी कित्येक टन गुलाल, खोबरे उधळले जाते. जवळच यमाई मंदिर आहे. यात्रेत ज्योतिबाची पालखी यमाई मंदिरास भेट देते.कसे जाल- कोल्हापूरपासूनचे अंतर 20 कि. मी.चे आहे. त्यासाठी सुमारे 40 मिनिटे लागतात. बसस्थानकापासून एस. टी. महामंडळाच्या बसेस अथवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत. न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी न्यू पॅलेस दिमाखात उभा आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे. राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. मध्यवर्ती बसस्थानकापासून 3 मि.मी. अंतरावर हे ठिकाण असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. टाऊन हॉल म्युझियम
कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय असून याठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती येथे पाहता येतात. बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.
बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.

खासबाग मैदान
कुस्ती म्हटले की कोल्हापूर ही संज्ञाच ठरलेली. खासबाग मैदान म्हणजे देशोदेशीच्या मल्लांच्या शिक्षणाचे माहेरघर, राजर्षि शाहू महाराजांनी दिलेली अनमोल भेट. 20 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतील इतके प्रशस्त मैदान. कुस्ती परंपरेत अजूनही या मैदानाला मानाचे स्थान आहे.
कोल्हापूर बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बसेसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते राजर्षि शाहू जन्मस्थळ- लक्ष्मीविलास पॅलेस रष्टा राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिजे जाते ते राजर्षि शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून शासन विकसित करीत आहे. शाहूकालिन कागदपत्रे, आरक्षणाचा जाहीरनामा, महाराजांच्या वापरातील वस्तू याठिकाणी आहेत. कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस व रिक्षानेही जाता येते. कणेरी येथील सिद्धगिरी मठ करवीर तालुक्यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणारे हॉस्पिटल येथे आहे. प्राचिन विद्वानांची शिल्पे आहेत.
कोल्हापूर बसस्थानकातून 15 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. तसेच बस व अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. दत्ताची वाडी अर्थात नृसिंहवाडी शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री दत्ताचे 500 ते 800 वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. देशभरातून भाविक दत्त पादुकांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रापर्यंत आहेत.
कोल्हापूरपासून 55 ते 60 कि. मी. अंतर असून तेथपर्यंत जाण्यासाठी 1.30 ते 2 तास असा कालावधी लागतो. नजिकच्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी राहण्याची व जेवणाची स्वस्त दरात सोय होऊ शकते. याठिकाणी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज आदी स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध आहे. जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही या ठिकाणाने दिलेली देणगी आहे. कमालीची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. सभोवताली 24 तीर्थकरांची लहान-लहान मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी याठिकाणी महामस्तकाभिषेक होतो. या ठिकाणी दुर्गामातेचे पठार व त्यावर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे.
जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संग्रहालय, कारंजे, रंगसंगतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार, उद्यान, धबधबे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. श्री आदिश्वर स्वामींची विशाल प्रतिमा परिवारासह आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्वाचा परिसर आहे.
कोल्हापूरपासून 27 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुमारे एक तास लागतो. कोल्हापूर, हातकणंगले स्थानकापासून बसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते.

शाहू तलाव व पुरातन शिव मंदीर आणि जागृत हनुमान मंदीर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर.
श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर

कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे.
पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्याी रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.हा किल्ला रक्षन करणार्याठ 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे, सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.किल्ल्या मध्ये अशाच प्रकारची आणखी एक ईमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, 1500 ए. डी. मध्ये ही ईमारत ईब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथुन फरार झाले.
      
येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट नाही आहे की, त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले, पन्हाळा हा असा गड आहे की, जेथे शिवाजी महाराजांनी 500 रहिवासी होते. ब्रिटीशांच्या काळात 1782 ते 1827 पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.हा किल्ला कोल्हापूर च्या ऊत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. ऊंचीवर येतो.युध्दकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे, त्याच्यातील एक जो महत्त्वाची भुमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे, जो मोठा व ईतिहासकालीन आहे. शिलहारा मुख्य राज्यकर्ता भोज II (1178 – 1209) यांच्या नंतर ही कारकिर्द यादवांच्याकडे सुफुर्त करण्यात आली. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, बिदारचे बहामनिस; महमुद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावनीपासुन दुर सैन्य ठेवुन पावसाळ्याच्या कालावधीत 1469 मध्ये ह्या गडावर हल्ला केला. पुढे जाऊन 16 व्या शतकात हा किल्ला बिजापुर ह्यांनी काबीज केला. अदिल शाहा यांनी ह्या गडाचे काही चबुतरे व दरवाजे करून घेतले.त्यानंतर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, व पुर्णपणे प्रस्थापित होईसतोपर्यंत गडाच्या दुरूस्तीचे काम थांबवले.
      

      
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला टाकीसारखे हिरवे आणि पांढरे दरगे पहायला मिळतात. तीन दरवजा पर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ 400 मी. जातो.अदिल शाही पध्दतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण ऊदाहरण आहे. प्रवेशद्वारा आतील त्रिज्या खंड गोलाकार खंड दर्शवते. नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेंची ऊपखंडे आहेत.ह्याच्या वरती गणपती व ईतर देवांच्या मुर्त्या आहेत.बाजुच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली मार्या ची तटावरील भिंत आहे आणि सुधारीत पाने व फांद्या असलेली नक्षी आहे. सर्वात समोरची मार्यातची तटावरील भिंत वरती दिसते. पश्चिम बाजुच्या आंगणाच्या बाहेरील बाजुला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत. दोनभिंतीच्या मधल्या भागांमध्ये बाहेरच्या बाजुने प्रवेश द्वार आहे. इब्राहीम अदिल शहा यांची आतील त्रिकोणी जागांमध्ये इराणची कोरलेली नाणी आहेत. पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे.पन्हाळा टेकडीच्या मध्यावरती बालेकिल्ला येत नाही तोपर्यंत ऊत्तरेला जवळजवळ 1 कि.मी. पर्यंत हा मार्ग सलग्न आहे. हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे, आत्ता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे व काही पडला आहे. येथे तीन मोठ्या चौकोनी ग्यालरी आहेत,ह्यांच्या मध्ये संपुर्ण भुदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे व ते मोकळेणाने येथे ऊभा राहु शकतात. मोठ्या, काही 40m by 10m चे 16 रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत ज्याच्यामध्ये वरती 8 मी. पर्यंत चौकोनी जागा आहेत.काही पायर्यां वरून बाहेरील छतावर जाता येते.

अयोध्या चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव राजाराम.. याचे बांधकाम छत्रपती राजाराम महाराजांच्या सूचनेनुसार श्री. भोजराज दादासाहेब निंबाळकर यांनी १९३७ साली केले. त्याचे नामकरण १२ एप्रिल १९८६ साली अयोध्या असे करण्यात आले. सध्या या चित्रपटगृहाची क्षमता, बाल्कनी २५४, स्टॉल ३९४ आणि फर्स्ट १०० अशी एकूण ७४८ आहे. येथील ध्वनियंत्रणा ही अत्याधुनिक डॉल्बी तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

ऊर्मिला चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव लक्ष्मी. आणि त्याच्याच शेजारी सरस्वती हे चित्रपटगृह. कोल्हापुरातील ताराबाई रोडवर असणारी ही दोन चित्रपटगृहे. ऊर्मिला अर्थात जुन्या लक्ष्मी सिनेगृहाचे बांधकाम नाना बेरी यांनी केले. याचे पूर्वीचे मालक श्री नितीन रेड्डी. त्यांच्याकडून १९९९ साली ’अयोध्या’ चित्रपटगृहाचे मालक दादासाहेब निंबाळकर यांनी ते विकत घेतले आणि त्याचे नाव ऊर्मिला केले. ऊर्मिला आणि सरस्वती ह्या चित्रपटगृहांचा बाहेर जाण्याचा रस्ता एकच आहे.

६ जून १९३१ साली तय्यब अली बोहरा यांनी याचे बांधकाम केले. कोल्हापुरात बांधले गेलेले हे पहिलेच चित्रपटगृह. ह्याच तय्यब अली यांनी व्हीनसच्याच शेजारी अप्सरा हेही सिनेगृह बांधले. आजतागायत दोन्ही चित्रपटगृहांची मालकी बोहरा कुटुंबीयांकडेच आहे. व्हीनसमध्ये ७८३ प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतात. जिथे व्हीनस उभे आहे तिथे पूर्वी दलदलीची जागा होती. आणि आजही जेव्हा पंचगंगा नदीला जोरदार पूर येतो तेव्हा इथे जाणारा मार्ग बंद पडतो. गेले ५ वर्षे येथे केवळ दक्षिणी भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. आर्या हा इथे आलेला पहिला तेलुगू सिनेमा. ह्या सिनेमाने या चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली करण्याइतके यश मिळवले. कोल्हापुरात २५ आठवडे चाललेला हा एकमेव तेलुगू सिनेमा. कोल्हापुरात राहणार्‍या दाक्षिणात्य भारतीय लोकांना तिकडचे सिनेमे पाहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच व्हीनस.

. कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत शेजारी शेजारी ५ चित्रपटगृहे आहेत आणि स्टेशन रोड वर ५. त्यातीलच एक अप्सरा.. अप्सरा आणि व्हीनस ह्या दोन्हीचे मालक एकच. श्री. तय्यब अली बोहरा. १९४८ च्या सुमारास हे चित्रपटगृह बांधले गेले. याचे पूर्वीचे नाव होते अन्वर. कारण तय्यबअलींच्या तिसर्‍या मुलाचे नाव होते अन्वर. नंतर याचे नाव झाले लिबर्टी आणि आता याचे नाव आहे अप्सरा..अप्सराची प्रेक्षकक्षमता आहे ६७३.

१४ जानेवारी १९४७ रोजी नगीनदास शहा यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. नागीनदास यांच्या दुसर्‍या मुलीच्या नावानेच (उषा) हे चित्रपटगृह ओळखले जाते. सर्वाधिक हिट चित्रपट देणार्‍या कोल्हापुरातील काही मोजक्या चित्रपटगृहापैकी एक म्हणजे उषा. हम आपके है कौन इथे ६० आठवड्याहून अधिक चालला. इथे लागलेले काही सुपरहिट चित्रपट म्हणजे.. लावारीस, बर्निंग ट्रेन, शोले, लगान, सत्या, तेजाब इत्यादी. या चित्रपटगृहाची प्रेक्षकक्षमता आहे ७८६.

लक्ष्मीपुरीत असणार्‍या ५ चित्रपटगृहापैकी एक म्हणजे प्रभात. दादासाहेब रुईकर यांनी १९४० साली प्रभात बांधले. याचे प्रेक्षकक्षमता आहे ५३१. २००३ साली प्रभातचे नूतनीकरण झाले. चित्रपटगृह संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले. पारंपरिक फर्स्ट, स्टॉल आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था बदलून फर्स्ट, स्टॉल, ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी करण्यात आली. मराठीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचे ७ सिल्वर ज्युबिली चित्रपट रुईकर यांच्या प्रभात आणि रॉयल मध्येच लागले.

दादासाहेब रुईकर यांचे आणखी एक चित्रपटगृह म्हणजे रॉयल. प्रभातच्या पाठीमागच्या बाजूला वसलेले हे चित्रपटगृह. रॉयलचा बाहेर जायचा मार्ग प्रभातमधूनच आहे. रॉयलची आसनक्षमता ५१३ आहे. याची बांधकाम १९३० चे आहे. २००५ साली या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.

कोल्हापुरातील मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे शाहू. गेली कित्येक वर्षाची मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. १५ मे १९४७ साली या चित्रपटगृहाचे ओपनिंग झाले. शाहू महाराज व्हीनसमध्ये चित्रपट पाहायला जात असत. पण काहीतरी कारणाने खटका उडाला आणि महाराजांनी स्वतःचे एक चित्रपटगृह बांधले. आणि त्यांच्याच नावावरून याला शाहू नाव पडले.

कोल्हापूरच्या राजकुमारी पद्माराजे यांच्यावरून ह्या चित्रपटगृहाचे नाव  पद्मा असे पडले. १९४० साली श्री. इंगळे यांनी या चित्रपटगृहाची उभारणी केली. फर्स्ट, स्टॉल, एक्झिक्युटीव आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था इथे आहे. इथे एकूण ६९६ प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. इथे सॅटेलाईट प्रोजेक्टर आहे.

शिवाजी महाराज पुतळा अश्वारुढ (शिवाजी विद्यापीठ)

शहरात बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले, शिवाजी महाराज, संभाजी, शाहू महाराज आणि अनेक नामवंत व्यक्तींचे अर्धाकृती व पूर्णाकृती पुतळे जागोजागी उभे करण्यात आले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे पुतळे :

ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस 
लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती आणि बंगळूरकडे जाणार्‍या गाड्या दररोज आहेत.

कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबर च्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से. च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.

१. घाटगे पाटील उद्योग समूह
२. स्टार उद्योग समूह
३. मेनन उद्योग समूह
४. पॉप्युलर शेती अवजारे

कोल्हापुरातील पुतळे- कावळा नाका येथील ताराराणी पुतळा, शिवाजी विद्यापीठातील शिवाजी महाराजांचा पुतळा,  इत्यादी.




#Article 109: चंद्रपूर (657 words)


चंद्रपूर (आधीचे रूढ नाव चांदा) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंकलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूर पट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. इ.स.२०११च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या ३,७३,००० इतकी होतीआहे.
या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.

गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती.  यास पूर्वी चांदागढ म्हणून नाव होते. त्याला चांदाही म्हणत असत.११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार याचे नाव चांदावरून चंद्रपूर असे करण्यात आले.

चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर  Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते.

चंद्रपूर शहरालगत सिमेंटचे बरेच कारखाने आहेत. उदाहरणार्थ Larsen and Toubro Limited (LT) , माणिकगढ सिमेंट.  येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे .

१९५६ मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला ‘दीक्षा’ सोहळा बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक स्वरूपाचा शहरात १ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कित्येक भागांतून आलेल्या लाखो अनुयायांचे बौद्ध धर्मात रुपांतर केले. १ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर या जागेला “दीक्षाभूमी” म्हणून ओळखले जाते. दीक्षा म्हणजे अक्षरशः धर्म स्वीकारणे आणि भूमी म्हणजे जमीन. तर अक्षरशः म्हणजे भूमी म्हणजे भूमी म्हणजे लोक बौद्ध धर्मात बदलतात. चंद्रपूर हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्मस्थान आहे. आंबेडकरांनी केवळ धर्मपूर (बौद्ध धर्म स्वीकार) साठी नागपूर व चंद्रपूरची निवड केली आणि म्हणूनच चंद्रपूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ”दीक्षाभूमीच्या आवारात. बुद्धगया पासून बौद्धवृक्षाची एक शाखा आवारात लावली आहे आणि कृपेने वाढत आहे. या पवित्र ठिकाणी दरवर्षी १ ऑक्टोबरला “धम्म चक्र प्रवर्तन दिन” चे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केले जातात. समारंभात हजारो यात्रेकरू आणि भिक्षू दीक्षाभूमीला भेट देतात. दीक्षाभूमी रेल्वे स्टेशन व बसस्थानकापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. वाहन रिक्षा सहज उपलब्ध आहे.

तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान एकंदरीत उष्ण असून मुख्यत: दोन ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.

गोंडी परंपरा

चंद्रपूर शहर आपल्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.
 चंद्रपुरात तीन मुख्य पारंपारिक पदवी महाविद्यालये आहेत.

चंद्रपूर शहरात नवीनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) सुरु झाले आहे.

शहरातील बाबुपेठ परिसरात सुप्रसिध्द असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC) आहे. येथील विद्यार्थ्यांना कॉलेजमधूनच नौकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, बऱ्याच साॅफ्टवेअर कंपन्या ह्या कॉलेजमध्ये 'कॅम्पस भरती' (Campus Recruitment) साठी येत असतात.
त्याचप्रमाणे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (RCERT) हे चंद्रपुरातील दुसरे प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय विनाअनुदानीत तत्वावर चालवले जाते.

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार उच्च माध्यमिक  व कनिष्ट महाविद्यालय ( ज्युबिली हायस्कूल ), लोकमान्य टिळक विद्यालय (LTV),
केंद्रीय विद्यालय,
विद्या विहार महाविद्यालय, 
विद्या निकेतन उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय, 
भवानजी भाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, 
माऊंट कार्मेल महाविद्यालय, 
जनता महाविद्यालय, 
महर्षी विद्या मंदिर, 
लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (LTKV)

येथे वनविभागाचे वन प्रशिक्षण संस्था आहे. यालाच वनविकास व व्यवस्थापन प्रबोधिनी असेही म्हटले जाते.
या संस्थेत RFO अर्थात वनक्षेत्रपाल (वन परिक्षेत्र अधिकारी) यांचे प्रशिक्षण होते.
ही संस्था मुल रोडवर आहे.

शहराच्या दक्षिणेकडील टोकाला विसापूरनजिक नवीन सुरु झालेले सैनिक विद्यालय उभारण्यात आले आहे. 
ही संस्था केंद्र शासनाच्या अधिनस्थ कार्य करते.

  
चंद्रपूर शहरात व शहराच्या आसपास खालील पर्यटन स्थळे सुप्रसिद्ध आहेत:

महाकाली मंदिर: चंद्रपूर येथील हे महाकालीचे मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. चंद्रपूर शहराच्या बस स्थानकापासून पूर्वेस ७ किमी वर हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मुबलक प्रमाणात मिळतात. येथे दरवर्षी हिवाळ्यात चैत्र पौर्णिमेला भरणारी महाकालीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे.

ताडोबा: हा भारतातील सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूरपासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेले ताडोबा एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात येथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.

आनंदवन:

दीक्षाभूमी, चंद्रपूर:- हे एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यांनी याआधीच्या दोन दिवशी म्हणजेच १४ व १५ ऑक्टोबर रोजी नागपूर मधील दीक्षाभूमी येथे ७ लाख अनुयायांना दीक्षा दिली होती.




#Article 110: जळगाव (533 words)


जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.

जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत.  येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत.जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.

जळगाव शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणतः २०९ मीटर उंचीवर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते. 

जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे सातार्‍याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते. 

जळगाव जिल्ह्यात हिंदू,मुस्लिम, शीख,इसाई,ज्यू,ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोक राहतात. सोबतच ब्राम्हण, कुणबी पाटील,माळी, मराठा, लिंगायत समाज,धनगर तसेच भिल्ल,पावरा,टोकरे-कोळी या आदिवासी जमाती आहेत.

जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महापालिकेमार्फत चालविला जातो. महापालिकेची प्रशासकीय इमारत १७ मजली आहे. त्या इमारतीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे आहे.

अधिक माहितीसाठी पहा - जळगाव जिल्हा

जळगाव शहर हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा सांभाळणे, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकारकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकांचे व्यवस्थापन करणे हे असते.

राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा  जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ये्ते.

जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून ते  भारतातल्या  मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते. 

जळगाव शहरात विमानतळ असून जळगांव ते मुंबई ही ट्रू जेट या एअरलाईनची विमानसेवा सुरू आहे.नुकतीच जळगाव ते अहमदाबाद विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत-धुळे-एदलाबाद-नागपूर) जातो. तसेच जिल्ह्यातली महत्त्वाची शहरेही राज्य महामार्गांनी जोडली गेली आहेत.

जळगावात मराठी बोलली जाते. बहुतेक लोक खान्देशी म्हणजेच लेवा गणबोली ही भाषा बोलतात. याच लेवा गणबोलीमध्ये प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आहेत. अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात.काही ठिकाणी वऱ्हाडी बोली भाषा सुद्धा बोलली जाते.

जळगाव अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. जळगाव स्थानकाजवळील रीगल, मेट्रो, नटवर इत्यादी मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने अशोक आणि  राजकमल  या चित्रपटगृहांत पहायला मिळतात.
आयनाॅक्स,PVR
छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह,
बालगंर्धव खुलं नाटयगृह

जळगावचे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, तसेच शेव भाजी प्रसिद्ध आहे.  याचबरोबर हिंदु लेवा पाटीदार या समाजाच्या सणांच्या वेळी देण्यात येणाऱ्या भंडाऱ्यात बनणारी वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजीही खूप प्रसिद्ध आहे.

college of social work (Dncvp)

केळी संशोधन केन्द्र आणि 
तेलबिया संशोधन केन्द्र जळगाव ला आहे

सॉफ्टबॉल, खो-खो,फुटबॉल, कब्बड्डी, क्रिकेट, कुस्ती, मुष्टियुद्ध, बैडमिंटन,लॉन टेनिस, हॉकी, टेबल टेनिस इत्यादि प्रसिद्ध

उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, जळगाव पासून 35 किमी अंतरावरील सातपुडा पर्वतातील मनुदेवी मंदिर 
पाल व यावल अभयारण्ये, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरी व गंगाश्रम, पाल ही थंड हवेची ठिकाणे.
🌴🥀भाऊ उद्यान आहे खुप छान
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जळगावपासून दक्षिणेस ५५ किमी अंतरावर आहेत.
गांधी रिसर्च फाउंडेशन (गान्धी तीर्थ ) जळगाव




#Article 111: गोंदिया (1590 words)


गोंदिया शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग () व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे. त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲॅंड बेरारमध्ये येत होते. त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे.

येथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते.

पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली. त्यावेळची प्राथमिक शाळा रेलटोली (वर्ष १९१६) आणि ॲंग्लो व्हर्नाकुलर मिडल स्कूल म्हणजेच आजचे मनोहर म्युन्सिपल हायस्कूल (१९१८) सुरू झाले. परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.

गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.

या शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत. शहर छोटे आणि मनमिळाऊ संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. मोहन महाराज पेढेवाले व लालजी भाईच्या समोस्याचे दुकान, नक्काभाई सोनी, धन्नालाल मोहनलाल तिवारी हे स्टीलचे दुकान, खिल्लुमल तालेवाला, दिल्ली हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे होती. आज यासारखी दुकाने वाढली असली तरी त्यांची महिमा अजूनही जशीच्या तशीच असून ही दुकाने त्यांच्या वारसदारांच्या हाती आहेत.

गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२०मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १०असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४०वर पोहोचली आहे.

१ एप्रिल १९२०मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सेठ रामप्रताप लक्ष्मण अग्रवाल यांना मिळाला, तर पहिले मुख्याधिकारी म्हणून जी.व्ही. काने यांनी काम पाहिले. गोंदिया शहराची तेव्हा लोकसंख्या केवळ २०हजार होती. मात्र आज शहराची लोकसंख्या १ लाख २०हजार ६३२ वर पोहोचली आहे. आधी नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या २०हजार असल्याने तेव्हा न.प. मधील नगरसेवकांची संख्या १०होती. यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली. त्यामुळे सन २0११ मध्ये नगरसेवकांची संख्या ४०वर पोहोचली असून आधीच्या ४०वॉर्डांचे रूपांतर आता नवीन प्रभाग पद्धतीत याचे १०प्रभागांत विभाजन झाले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १८ स्क्वेअर कि.मी.आहे. सन १९४९ मध्ये शहराचा विस्तार सी.पी. ॲंन्ड बेरारअंतर्गत करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर शहराचा विस्तार करण्यात आला नाही.

नगर परिषदेत आतापर्यंत २०नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.सध्याचे नगराध्यक्ष श्री अशोक इंगळे हे आहेत जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले. अर्थात शहरातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिले.

गोंदिया शहर महाराष्ट्रात अगदी ईशान्येकडे आहे.

गोंदिया शहर शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणक्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. जगत शिक्षण संस्था, दिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था, पंजाबी शिक्षण संस्था अशी गोंदियात अनेक संस्था जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. गोंदियाचे हे संचित आहे. जुन्या नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. जुन्या काळातील जे.एम. हायस्कूल, हिंदी टाऊन प्राथमिक शाळा, सुभाष प्राथमिक शाळा, लोकोशेड प्राथमिक शाळा, धन्नालाल मोहनलाल नगरपालिका प्राथमिक शाळा, माताटोली प्राथमिक शाळा, मरारटोली प्राथमिक शाळा या शाळांना आता विद्यार्थी मिळेनासे झालेले आहेत. विकासांच्या गतीत फोफावलेली कॉन्व्हेंट संस्कृतीने त्यांची जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळते ती विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरूनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल आदी शाळांना मिळत आहे. 

गोंदिया शिक्षण संस्था ची स्थापना स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी ८ डिसेंबर १९५८ ला गोंदिया येथे केली.
गोंदिया शिक्षण संस्था विदर्भात नावाजलेली संस्था आहे.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मुखे उद्देश :

विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरूनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, सावरी

गोंदियाच्या उत्तरेला जवळच प्राचीन गाव नागरा आहे. येथील एका टेकडीचे उत्खनन केल्यानंतर प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आढळले. नागनाथपासून नागेश्वर बनलेला आहे. नागराजमुळे या गावाचे नाव नागरा पडले. ही हेमाडपंथी लोकांची वस्ती असावी, असे मानले जाते. येथील एका टेकडीचे खोदकाम केल्यावर हेमाडपंथी शिवमंदिर, नंदी व हनुमानाची मूर्ती मिळाली. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे आणि १६ खांबांवर विना जोडणीने बनलेले आहे. ते काळ्या दगडाचे आहे. मंदिरात गणेश-पार्वती व नागदेवताची मूर्ती आहे. शिवमंदिरात यज्ञाकरिता खड्डय़ाचे खोदकाम करताना एक भुयार आढळले. त्याजवळच काही काळात बनवलेली सिद्ध योगी महात्माची समाधी आहे. मंदिराच्या सभागृहाला कालांतराने कोच लावून आकर्षक बनवण्यात आले आहे.

नागझिरा महाराष्ट्रातील एक जुनं अभयारण्य आहे. एकोणीसशे सत्तरमध्ये या वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत घेतलेल्या काळजीमुळे आज नागझिऱ्याचं जंगल खऱ्या अर्थानं फोफावलेलं आहे आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखलं जात आहे. या अरण्याचं क्षेत्र सुमारे १५३ कि.मी. असून, हे अरण्य दक्षिण उष्णकटिबंधीय, शुष्क पानगळीचं जंगल आहे. येथील घनदाट वृक्षराजीमध्ये कमालीचं वैविध्य आहे. यामध्ये साग, ऐन, बीजा, साजा, तिवस, धावडा, हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसुम अशी उंचच उंच वाढणारी आणि घनदाट पानोरा असणारी झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती वृक्षांना लगटून फोफावलेल्या आहेत. विविध प्रकारचे बांबू आणि वेगवेगळे गवत यांच्यामुळे भूभाग आच्छादित असतो. त्यामुळेच हे जंगल सर्व प्रकारच्या वन्य पशू-पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच ठरते. विविध प्रकारचे वन्य पशू, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. सस्तन प्राण्यांपैकी वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, चितळ, नीलगाय, अस्वल, चांदी अस्वल, रानकुत्रे, डुक्कर, चौसिंगा, तरस, कोल्हा, लांडगा, साळिंदर, उडणारी खार, खवल्या मांजर इत्यादी प्राणी इथं मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात.

मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये  जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे,  गोंदियात घरी जरी मराठी बोलत असले तरी गोंदियाच्या बाजारात फिरल्यावर ही बाब लक्षात येते.  गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. शहरातील इतर भाषा इंग्रजी आहे.   शहरात गुजराती आणि सिंधी लोकवस्ती उल्लेखनीय प्रमाणात आहे, त्यामुळे गुजराती आणि सिंधी ह्या भाषांचा पण वापर होतो.

इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,०००  पर्यंत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शहरात पाणी पुरवठा केला जातो.  त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही. शहराची वाडती लोकसंख्या लक्षात घेऊन विभिन्न ठिकाणी  पाण्याच्या ४ टाक्या  निर्माण करण्याचे काम चालू आहे.  गोंदियाला सध्या(इ.स.२०१२) विजेच्या भारनियमनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव कमी झाला आहे.

गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. त्यातल्या त्यात दुर्गापूजेच्यावेळी तयार करण्यात येणारे  देखावे बघण्यासारखे असतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात. 'मारबत व बडग्या' या मिरवणूक प्रकार गोंदियात होतो. पोळा  व तान्हा पोळा हे सण उत्साहात होतात. एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक सामूहिकपणे सध्याच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर साजरा व्हायचा. स्टेडियम उभारणीच्या पूर्वी या पटांगणावर चटईच्या पत्र्यांचा आडोसा लावून फुटबॉल व हॉकीचे राज्यस्तरीय सामने खेळले जायचे. मात्र, त्यांना आता स्टेडियम असूनही ग्रहण लागले आहे.

नेहरू चौकाजवळील कार्नरवर दर रविवारी होणाऱ्या देशी कुस्तीच्या दंगलीने शहरातील बरेच पहेलवान घडवले. शहरातील एकमात्र प्रसिद्ध बापूजी व्यायाम शाळा तिची ओळख जपण्याकरिता धडपडत आहे. त्याची जागा आता स्टेपअप जिम, गोल्डन जिम, अशा आधुनिक साहित्यांनी सुसज्ज जिमने घेतलेली आहे.

नाटय़क्षेत्रातही गोंदियाचे योगदान उल्लेखनीय ठरावे. स्वातंत्र्यपूर्वकाळात कन्हारटोली परिसरातील भवभूती रंग मंदिर, गुर्जर क्षत्रिय समाजवाडी आदी उभारण्यात आले. हिंदीभाषिक लोकांची वाढती लोकसंख्यामुळे या नाटय़गृहात होणाऱ्या मराठी नाटकांना अवकळा आली. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृद्ध व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रमांची रेलचेल सतत वाढत गेली. यात प्रामुख्याने हातभार लावला तो दिवं. मनोहरभाई पटेल, दिवं. शंकरलाल अग्रवाल यांनी.

मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते. गोंदियाजवळील भाग वन आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण नटलेला आहे. या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते.

गोंदिया रेल्वे स्थानक मुंबई-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथूनच सुरू होतात.

गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८८ पासून २००५ पर्यंत सोपवले होते. त्या काळात एम.आय.डी.सी.तर्फे केवळ हवाई धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिली जात. त्यावेळेस या धावपट्टीवर लहान व मध्यम आकाराचे नॉन-इस्ट्रुमेंटल विमान केवळ दिवसाच उतरू शकत होते. अलीकडे म्हणजे जानेवारी २००६ च्या सुरुवातीपासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३२१.५४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यासाठी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली. सध्या प्राधिकरणातर्फे बिरसी विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच, या परिसरात नव्याने एअर ट्राफिक कंट्रोलची उभारणी करण्यात आली असून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे.




#Article 112: जालना (812 words)


.   Pin code 431114

मराठवाड्यातील जालना शहर हे जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते.

जालना शहरातील किल्ला काही काळ महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अधिपत्याखाली होता तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जालना शहरातील पलंग बारवेचा जिर्णोध्दार  करुन इंदेवाडीजवळ एक शिवलिंग आकाराची बारव निर्माण केली. तिचा उपयोग पालखीसाठी होत होता तर होळकर सरकारच्या काळात हरिरिसाला अर्थात हत्तीवरून रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती.  छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची लुट जालना येथे केली असुन जालना शहर हे प्रगतशील शहर होते शहरात अमृतेश्वर मंदिर, बारव असुन आजही सुस्थितीत आहे. आनंदी स्वामी मंदिर, दत्त मंदिर पहायला मिळतात तसेच अनेक मस्जिद, दर्गा, वेशी ही जालना शहराचे आकर्षण आहे.

मराठीतील महानुभाव पंथाच्या आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झाले्ल्या ६व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.रोहिलागड हे ऐतिहासिक गाव जालना जिल्ह्यात येते. हंबीरराव मोहिते उर्फ चव्हाण घराणे ता. जि. जालना येथील मंहमंदाबाद (पिंपळगाव) येथे राहते. त्यांचे 5 वाडे असुन 3 भव्य वास्तु व मोठी गढी आहे व तसेच बुरूजाजवळच निळकंठराव मोहिते-चव्हाण (हंबीरराव) यांची समाधी आहे.

१. जालना येथे मोसंब्यांची मोठी बाजारपेठ आहे. 

२. रोहिलागड हे मोठा बाजारपेठेचे गाव आहे.

३. जालना हे बी-बियाणे उद्योगच्या नावाने ओळखले जाते.

४. जालना जिल्यात एकूण आठ तालुके आहेत.

५. जालना जिल्ह्यातील राजुर हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून आहे. तिथे गणपती मंदिर आहे.

६. जालना शहरातुन कुंडलिका नदी जाते.

७. जालना जिल्ह्यातुन जाणारी गोदावरी नदी जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविते.

८. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथे श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी अन्नछत्र सुरू केलेले असुन त्यांचा शिलालेख तेथे पहायला मिळतो तर अहिल्यादेवी होळकर यांनी गावात बारव निर्माण केलेली आहे.

९. आसई युध्द, अंबडचे मराठा इंंग्रज युध्द 

जालना रेल्वे स्थानक हे  दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर आहे. जालन्याहून भारताच्या अनेक प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. मुंबईहून औरंगाबादपर्यंत धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ऑगस्ट २०१५ मध्ये जालन्यापर्यंत वाढवण्यात आली. ह्याव्यतिरिक्त तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस. नंदीग्राम एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस इत्यादी गाड्या जालन्याहून रोज धावतात.

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नागपूर–औरंगाबाद–मुंबई द्रुतगती मार्ग जालन्यामधूनच जाईल असा अंदाज आहे. शासनाने जालना-खामगाव लोहमार्गालाही मंजुरी दिली आहे. औरंगाबाद ते जालना अंतर जवळपास 75 कि.मी. आहे.

१. जालना शहरापासून ४६ कि.मी. अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे. तेथून जवळच वटेश्वर महाराज मंदिर आहे; तेथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते.२. येथून २५ कि.मी. वर राजूर गणपती हे देवस्थान आहे

४. जालना पासून १० कि.मी. अंतरावर सिंदखेड राजा रोड वर माळाचा गणपती तसेच त्याच रस्त्यावर अलीकडे जालना बसस्थानकापासून अंदाजे ५ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध दत्ताश्रम आहे जेथे वर्षभर काही न काही अध्यात्मिक कार्यक्रम होत असतात.     

५.जालन्यापासून ४४ कि.मी. अंतरावर अंबड पासून १७ कि.मी. वर जांबुवंतगड, जामखेड ता. अंबड येथे रामायण काळातले व हनुमानानंतर श्रीरामांचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आहे.  

६. तसेच त्या शेजारी रोहिलागड ता. अंबड या ऐतिहासिक गावी  येथे अनेक प्राचीन मंदिर व अनेक शिलालेख आहेत.

७. जालना जिल्ह्यामध्ये अंबड येथे मत्सोदरी देवीचे मंदिर आहे. प्रती वर्षी नवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते येथे एक शिलालेख आढळतो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दार करीत अडीचशे एकर जमीन इनाम दिलेली आहे अंबड हे होळकरांचे खाजगी वतन होते. यावर अरुणचंद्र पाठक यांनी होळकरकालीन अंबड हे पुस्तक लिहलेले आहे.

८. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वनारशी हे ग्रामीण देवस्थान आहे. तिथे अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यातील भक्त येतात.

९. पाथरवाला गावची ऐतिहासिक अशी नोंद पुरातत्व खात्याकडे असुन यादवाचा सेनापती खोलेश्वर च्या नावाने खोलेश्वर महादेव मंदिर तसेच पार्थ मंदिर आहे. याच गावचे विद्यमान पालकमंत्री राजेश अकुंशराव टोपे हे भूमीपुत्र आहेत.

१०. डोनगाव येथे बोहरी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा आहे.

११. जामखेड येथे कोरीव मुर्तीकाम असलेले खडकेश्वर महादेव मंदिर आहे.

१२. भारतातील एकमेव जांबुवंत मंदिर जामखेड येथे आहे श्रीकृष्ण जांबुवंत यूध्दभूमी म्हणून जामखेडला लौकिक आहे.

१३. चिचंखेड येथे खंडोबा तसेच शिवमंदिर असून सातवाहन काळातील व्यापारी मार्ग असलेले हे गाव आहे.  गावात मातीची एका ताम्रपटातुन गावातील समाजजीवनाची माहिती मिळते

येथे सर्व सामान्य लोकजीवन आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मत्स्योधरी शिक्षण संस्थेमुळे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व भागात शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील विद्यार्थी सर्व सामान्य बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम हे करताना आढळतात. जिल्ह्यात पॉलिटेक्निकल करणारे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात आहे. जिल्ह्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था, अंबड, घनसावंगी, परतुर, जालना तालुक्यात आहे.

बारवाले संशोधन संस्था जालना औद्योगिक वसाहत येथे आहे. तसेच जालना जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या बदनापूर तालुकयामध्ये मोसंबी संशोधन केंद्र तसेच  कडधान्य संशोधन केंद्र आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इतिहास, संस्कृती, कला संशोधन, वारसा जतन व ग्रंथ, वस्तू संग्रहालय अंबड या संस्थेच्या माध्यमातून इतिहास संशोधक रामभाऊ लांडे जालना जिल्ह्यातील अज्ञात इतिहासावर संशोधन करीत असुन ते मत्स्योदरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील अध्यासन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केलेले असुन मराठा कालखंडातील ऐतिहासिक माहिती संदर्भासहीत पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

१. जालना येथे राज्य राखीव पोलीस दलाचा गट क्रमांक ३ आहे.२. महाराष्ट्र पोलीस  प्रशिक्षण केंद्र आहे.

कब्बडी,खो-खो,क्रिकेट, खेळ खेळले

जालना जिल्हा




#Article 113: धुळे (371 words)


धुळे हे धुळे जिल्ह्याचे  मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्त्वाचे शहर आहे. २०१७ जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ६,२४,३५८ आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. धुळे या शहरातून महत्त्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि क्र. ६ जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू / कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत.  मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनजवळ चाळीसगाव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद .  ह्या मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात  व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहाल चे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स. १६३० मध्ये एका स्वारी दरम्यान केले. शहरातील सुभाष नगर हे व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी साठी प्रसिद्ध आहे.  अजांनशाह वली रहे. दरगाह हे हिन्दु व मुस्लिमांचे अत्यंत पवित्र व देखानिय श्रद्धास्थान आहे.

धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे. शहराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २४० मीटर (७८७ फूट) आहे. शहराचा विस्तार १२० कि.मी. आहे. धुळे शहर पांझरा नदीच्या तीरावर वसले आहे.

हवामान 

जिल्ह्याचे हवामान सामान्यत: उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४५. से. ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये तापमान १२ से. पर्यत खाली येते. उन्हाळयातील सरासरी तापमान ३० ते ३५  से. इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान २३ ते २५ से. इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६० से. मी. इतके आहे. जिल्ह्यातील पडणारा पाऊस अनिश्चित स्वरुपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रातच होतो.

धुळे जिल्हयात बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वार्‍यांपासून पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिकेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम भाग अधिक उंचीचा असल्याने या भागात पाऊस अधिक पडतो. पश्चिमेकडील साक्री तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शिरपूर, शिदखेडा व धुळे या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी होत जाते. धुळे  प्रांताचे एकूण [४] तालुके आहेत. धुळे प्रांतातील ५८५ गावे तर ग्रामपंचायत एकूण [९८०] असून  धुळे महानगरपालीका [१] आहे .  

हेसुद्धा पहा




#Article 114: नंदुरबार (424 words)


नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे, आणि त्या नावाचे शहर हे त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असुन निसर्गाच्या वैविध्याने परिपूर्ण असा आहे. वाहरु सोनवणे या कविच्या कविता मराठी वाङ्गमयात प्रसिद्ध असून होली हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने असली ची होली ही मोठ्या स्वरूपाची असून,तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगरया बाजार असे म्हणतात.

नंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. 'देवमोगरा देवी' हे येथील आदिवासींचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.

नंदुशरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी (महाल/धडगाव), तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर असे ६  तालुके आहेत. 

भुगोल

सातपुडा पर्वताच्या रांगेत हे गाव वसलेले आहे. येथे पाताळगंगा नावाची नदी आहे.

खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नंदुरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा.(नाशिक प्रशासकीय विभागात.)

तापी नर्मदा या मुख्य नद्या. (इतर नद्या  -गोमाई, रंगवली, उदाई)

नंदुरबार परिसरावर पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते. इंग्रजांविरुद्ध लढा देतांना इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा नवयुवक सत्याग्रहादरम्यान पोलीसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने गावात हुतात्मा चौक आहे.

एकलव्य विद्यालय, D.R.High school (श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल), डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार तालुका विधायक समितीचे (NTVSचे) G.T.P.(गजमल तुळशीराम पाटील) कॉलेज, यशवंत विद्यालय, Smt. H.G.Shroff High School (श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल)...अशा शाळा नंदुरबारमध्ये आहेत.येथे टिळक वाचनालय प्रसिद्ध आहे.

नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. या भागातून कुठलीही मिरवणूक, मोर्चा, रॅली गेल्यास त्या पुतळ्याला अभिवादन करूनच ती पुढे जात होती. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा पालिकेच्या तत्पुरत्या इमारतीत एका बंदिस्त खोलीत ठेवला होता. नंतर नागरिकांच्या मागणीवरून तो मोकळ्या जागेत आणण्यात आला. हाच पुतळा पूर्वी होता त्याच ठिकाणी पुनःस्थापित करावा, अशी मागणी एक वर्षभर होत होती. नगरपालिका त्यांच्या ताब्यात असलेला छत्रपती शिवरायांचा  पुतळा बसवत नाही हे लक्षात घेता शिवसेनेने तसाच हुबेहुब पुतळा तयार करून तो २२ जानेवारी २०१७ या दिवशी सकाळी अकरा वाजता पालिका चौकात आणला. सोबत पुतळा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅण्डदेखील आणला.  कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा पुतळा पालिका चौकात नाही तर व्यापार संकुलातच हवा होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी झाली. शेवटी शिवसैनिकांचा विजय झाल्याने पोलिसांनी तो पुतळा चौकात राहू द्यायला परवानगी दिली. 

नंदुरबार- बाल हुतात्मा शिरीषकुमार याचे स्मारक.

प्रकाशे -शहादा तालुक्यात तापी-गोमाई संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र(खानदेशची काशी ,दक्षिण काशी)

शहादा तालुक्यात ,अनवदेव येथे गरम पाण्याचे झरे.

अक्राणी तालुक्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण.येथे यशवंत तलाव ,सिताखीची दरी व धबधबा आहे.

अक्कलकुवा येथे होराफली धबधबा.

तळोद्यानजिक हिडिंबा जंगल.




#Article 115: ठाणे (385 words)


ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते.
  हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.

ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.

पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.

ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.

ठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत. ठाणे हे सुंदर शहर आहे.

ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.

ठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.

कुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत. 2015 साली 'मेतकूट' नावाचे उपहारग्रृह नौपाडा, घंटाली येथे सुरू झाले. महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील ( कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ) खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध झाले.

ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.

ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वहातूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.

ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.

गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव, राम मारूती रस्ता, येऊर, उपवन, कोपनेश्वर मंदिर, वर्तकनगर साईबाबा मंदिर, घंटाली मंदीर व पोर्तुगीजानी १५८२ साली बांंधलेले सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च.




#Article 116: परभणी (499 words)


परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात. प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे. परभणी शहराला प्रभावतीनगरी हे नाव प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते. प्रभावती या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती आणि लक्ष्मी असा होतो. परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरूप आहे.

       परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला  दर्ग्यामध्ये उरूस  भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. उरुसामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपआपल्या आवडीनुसार या सर्व ठिकाणी जातो व त्यांच्या आनंद घेतो. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे या उरूसामध्ये  कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक जातीधर्माचे व्यक्ती सहभागी होतात आणि एकमेकांसोबत आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. या उरुसाच्या कालावधी मध्ये दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून ऊंठांची मिरवणूक काढण्यात येते, या मिरवणुकीला संदल असे म्हणतात. या संदल मध्ये उंठांच्या पाठीवर नवीन चादर आणि फुलांच्या झुली अंथरूण त्यांना वाजत्र्यांसहित नाचतगात शहरातून फिरवले जाते आणि शेवटी दर्ग्याजवळ आणले जाते. नंतर ह्या चादर, झुली उंठांवरून काढून दर्ग्यामध्ये चढवल्या जातात. परभणी शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या गावातील लोक या उरुसाच्या प्रतीक्षेत असतात आणि या मध्ये उत्साहाने सहभागी होतात.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.

परभणी शहरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पारधेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला पारद शिवलिंग असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे. 
या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.

परभणीपासून जवळच गंगाखेड हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे जनाबाईची समाधी आहे. तसेच  गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या  गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी  मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.

तसेच परभणी पासून जवळच पाथरी येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुद्धा आहे. ञिधारेला तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओॅंकारनाथ भगवान या सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.




#Article 117: बीड (950 words)


हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.

बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात. 

बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.

किल्ले मैदान, लक्ष्मीबाग==
बीडचा तुरुंग इ.स. १९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकाऱ्याच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.

इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये, हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड - जालना अशी धावायची.

विसाव्या शतकात केवळ भौतिकच नव्हे बीडकरांचे सांस्कृतिक जीवनदेखील विलक्षण बदलून गेले. बीड शहरातील शंभर वर्षांपूर्वीची अनेक महत्त्वाची स्थळे कालौघात नष्ट झाली. काही स्थळे मात्र अद्यापही अवशेषांच्या रूपात शहराच्या शतकापूर्वीच्या कथा सांगत आहेत. फरशीचा वाडा, खिडकी, कान्होबाची हवेली, सटवाई मैदान, लक्ष्मीबाग, खासबाग, नेताजी मैदान, लाईन गल्ली, महेबूबगंज, धोंडीपुरा ही शंभर वर्षांपूर्वीची बीड शहरातील महत्त्वाची स्थळे.  यात धोंडीपुरा नावापुरता उरलाय, तर अन्य स्थळे विस्मृतीत गेली आहेत. फरशीवरचा वाडा हे बीडच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचे स्थळ होते. इथे अवघ्या बीडकरांचा न्याय व्हायचा. बांधकामात सर्वप्रथम फरशी वापरली गेल्याने बीडकर त्याला फरशीवरचा वाडा म्हणत.

बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व 'धोंडीपुरा' करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण या भागात राहणाऱ्या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुऱ्यातील मशिदीलाही जागा दिली होती, असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे. त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती.

पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणाऱ्याभागाचे पूर्वीचे नाव महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला (इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले. पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना निवडले ते कट्टर गांधीवादी  हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो. 'बलभीम चौक' या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ 'चौक' या नावानेच ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणाऱ्या कदम घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी 'छोटा सुभाष' ही पदवीच दिली होती. सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक 'सुभाष रोड' संबोधू लागले तर ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही 'नेताजी मैदान' संबोधले गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले.

शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने इ.स. १८९० मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.

बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे  स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो. 

गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन) नावावरून सन इ.स. १६८५ मध्ये ठेवले. 

कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आहे. येथील कंकालेश्वर महोत्सव प्रसिद्ध आहे.




#Article 118: रत्‍नागिरी (627 words)


रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे.

हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्त्‍न सचिन तेंडूलकर, भारतरत्त्‍न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहेत.

पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्‍नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.

विजापूरचे शासक पोत्तु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्‍नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्‍नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्‍नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.

ब्रह्मदेशाचा(म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्‍नागिरीमध्ये थिबा राजवाड्यात ठेवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.

रत्‍नागिरी नगर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर वसले आहे. रत्‍नागिरी नगर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे. हे नगर समुद्रसपाटीपासून ११ मीटर उंच आहे.

इ.स.२०११च्या जनगणनेनुसार रत्‍नागिरीची लोकसंख्या ७६,२३९ एवढी आहे. याच्या ५५% पुरुष व ४५% स्त्रिया आहेत. ८६% पुरुष व ८७% स्त्रिया साक्षर आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७०% हिंदू असून उर्वरित मुस्लीम, जैन, बुद्ध व ख्रिश्चन जातीचे आहेत.रत्नागिरीतील ११% लोकसंख्या ही ६ वर्षाखाली आहे.

मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट,भारती शिपियार्ड, गद्रे मरिन प्रोडक्ट्स, आणि जे.के. फाईल्स हे ७६,२३९ एवढी मधील मुख्य उद्योग आहेत.

रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय , शासकीय पॉलिटेक्निक, फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज, ह्यामुळे रत्‍नागिरी हे उच्चशिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे.

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२ )

रत्‍नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग तसेच रत्नागिरीला कोल्हापूरसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग २०४ हे प्रमुख हमरस्ते रत्‍नागिरीमध्ये मिळतात.

रत्‍नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, दिल्ली तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यांत प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्नागिरी शहरातूनच पार पडला होता. छशिट-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस, लोटिट-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस, लोटिट-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांमुळे रत्‍नागिरी ते मुंबई हा जलद रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.

रत्नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर असून ते मिरकरवाडा येथे आहे. जयगड येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे. फिनोलेक्स व अल्ट्राटेक या कंपन्यांच्या खाजगी जेट्टी रत्नागिरीमध्ये आहेत.

रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. २०१८ मध्ये येथून मुंबई साठी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे.

टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, रत्‍नागिरी किल्ला, दीपस्तंभ, भगवती बंदर, भाट्ये चौपाटी, काळा समुद्र, सुवर्णदुर्ग किल्ला

हा रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला होता. त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन स्थळ म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर एक भुयारी मार्गही आहे. हा मार्ग समुद्रात तीन वेगवेगळ्या दिशांना उघडतो. डिसेंबर २०१७ मध्ये जिद्दी माउन्टेनिअर्स या रत्नागिरीतील साहसी खेळांच्या / गिर्यारोहकांच्या संघटनेने या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोध लावला आहे. याची दखल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतली होती. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने येथे हौशी पर्यटक आणि साहसी शहरवासियांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या किल्ल्यावर नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीच्या पहिल्या दिवशीही रत्नागिरीकर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

हेसुद्धा पहा




#Article 119: यवतमाळ (331 words)


यवतमाळ (Yavatmal/Yeotmal) शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत.  त्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर (cotton city) म्हटले जाते.येथे जवळच लोहारा येथे एमआयडीसी (महाराष्ट् इंडस्ट्रियल काॅरपोरेशनने बनवलेली औद्योगिक व्यावसायिकांची उद्योग-वसाहत) आहे.

यवतमाळ शहराचे पूर्वीचे नाव यवत किंवा यवती , योतमाड असे होते . आजूबाजूला दाट व उंच झाडांची दाटी असल्यामुळे याला योतमाड असे नाव पडले होते . नंतर याला यवतमाळ म्हणजे माळावर वसले असल्या मुळे यवतमाळ म्हणायला सुरवात झाली  यवतमाळ हे बेरार सल्तनतेचे मुख्य शहर होते आणि जुन्या लिखाणांनुसार जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण होते. यवतमाळ (सध्या यवतमाळ जिल्हा) नंतरचा प्रदेश, अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या राजवटीत १३४७ मध्ये बहमनी सल्तनतीची स्थापना केली. १५७२ साली, अहमदनगर सल्तनत (वर्तमान दिवस अहमदनगर जिल्हा ) चे शासक मुर्तजा शाह, यवतमाळ जिल्हा १५९६ मध्ये, अहमदनगरच्या योद्धा रानी चांद बीबीने यवतमाळ जिल्ह्याचे मुघल साम्राज्य, नंतर भारतातील मोठ्या भागाचे राज्यकर्ते सोडले. १७०७ मध्ये सहाव्या मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर यवतमाळ हा मराठा साम्राज्यात गेला. १७८३ मध्ये जेव्हा रघोजी भोसले नागपूर साम्राज्याचे शासक झाले तेव्हा त्यांनी आपल्या क्षेत्रात यवतमाळ जिल्हाचा  समावेश केला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ मध्ये बेरार प्रांत उभारल्यानंतर १८६३ मध्ये यवतमाळ पूर्वेकडील बेरार जिल्हा बनला आणि नंतर दक्षिण पूर्व बेरार जिल्हा-मध्य प्रांत आणि बेरार या दोन्ही जिल्ह्यांचा भाग बनला. यवतमाळ १९५६ पर्यंत राज्य पुनर्रचना होईपर्यंत मध्य प्रदेशचा भाग राहिला. 

ऐन -ई -अकबरी या प्राचीन ग्रंथात यवतमाळ चा उल्लेख दिसून येतो . तसेच अकबर च्या दरबारात अबुल फाजल याच्या लेखकात यवतमाळ मधील योत लोहार या गावाचा उल्लेख पाहायला मिळतो . १९३० साली प्रसिद्ध झालेल्या केसरी प्रबोध या ग्रंथात यवत म्हणून यवतमाळ चा उल्लेख मिळतो  १ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.

यवतमाळात अनेक देवाची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-

तसेच शहारात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नऊही दिवस शहरातील व आजुबाजुच्या खेड्यातील भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र ऊत्सवामध्ये भारतात कलकत्त्यानंतर यवतमाळ शहराचा दुसरा क्रमांक लागतो.
  




#Article 120: वर्धा (411 words)


वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर  कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती. 

सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे  . येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण  प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते.

१८५०च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले. सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील कवठा इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले. १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले. इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.आहे .जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले

वर्धा आणि जवळील सेवाग्राम हि दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती. 

वर्धा  येथे स्थित आहे. वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची  आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.

वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत. शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.

२०११च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे त्यात ५२% पुरुष आणि ४८%  महिलांचा समावेश आहे.  वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.

शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.

सन १९६९ मध्ये मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम शिवराम रेगे होते.

वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे  शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:

वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.

भारतीय रेल्वेचे वर्धा रेल्वे स्थानक हे हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व कोलकात्याकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-नागपूर व दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग जुळतात. 

शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.




#Article 121: वाशिम (150 words)


वाशिम हे वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या ६२,८६३ आहे.

वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात.
इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन.  वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती.  वाकाटकांचे साहित्यातील  योगदान महत्त्वाचे आहे.  त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती.  आजही वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे.  त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले.  त्यांनी आपली राजधानी दुसर्‍या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले.  त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.

वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.

त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वर्‍हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु,  महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ १९९८ मध्ये पुन्हा वाशिम हा जिल्हा घोषित करण्यात आला.  




#Article 122: सांगली (1788 words)


सांगली  हे महानगर पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर  सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.

मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णूदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगली संस्थानाचे तत्कालीन राजा, चिंतामणराव पटवर्धन ह्यांच्या पुढाकाराने संस्थानामध्ये ('सीतास्वयंवर)' ह्या संगीत नाटकाचं पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं जे विष्णुदास भावे ह्यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला (नाट्यपंढरी) ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे.

सांगली शहर हे पहिलवानांसाठी  प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसह कुंडल, पलूस, शिराळा, वाळवा, मिरज, कोल्हापूर ह्या ठिकाणी ही कुस्ती ला प्राधान्य दिलं जातं. ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात .  

सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्हा द्राक्षाच्या उत्पादनासाठी तसेच निर्यातीसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. मुख्य पिके  ऊस, डाळींब, द्राक्ष ही सुद्धा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द मराठी कवी,गीतकार,संगीतकार ग.दि.माडगूळकर हे  याच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माडगुळ गावचे.            

भडंग (एक प्रकारचे चुरमुरे), वडापाव आणि मिसळपाव हे सांगलीकरांचे आवडते खाद्यपदार्थ आहेत.

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात : १) गांव भाग २) पेठ भाग ३) गवळी गल्ली  ४) चांभार वाडा  ५) वखार भाग  ६) जांभवाडी सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. या सहा गल्ल्या गावभागातील हरिदास गल्ली, वैद्य गल्ली, जोशी गल्ली, फडणीस गल्ली, खाडिलकर गल्ली अशा क्रमाने शहरच्या आराखड्यात दाखविण्यात आल्या आहेत. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रूपांतर झाल्याचेही मानले जाते.

                
सांगली हे मुंबई  पासून ३९० किमी व बंगलोरपासून ७०० किमी आणि कोल्हापूर पासून ५० किमी अंतरावरील एक प्रमुख शहर आहे.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली हळद व्यापार आणि साखर कारखाने यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात आघाडीवर आहे. सांगली एक प्रमुख शिक्षण आणि आरोग्य केंद्र देखील आहे. विष्णुदास भावे ह्यांचं पहिलं नाटक एकंदरीत, महाराष्ट्रातील पहिलं नाटक सीता स्वयंवर हे येथील पटवर्धन संस्थान च्या राजवाड्यात प्रथम इ. स. १८४२ साली सादर करण्यात आलं त्यामुळे नाट्यपंढरी अशी देखील सांगली शहराची ओळख आहे. सांगली जवळ कृष्णा नदीच्या खोऱ्यात पर्यटन स्थळांची विविध ठिकाणे आहेत.

प्राचीन काळामध्ये, सांगलीचा प्रदेश कुंडल म्हणून ओळखला जात होता. या भागावर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याची राजधानी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात, सांगली  हे पटवर्धन  राजघराण्यातील एक राज्य होते. १९४८मध्ये, सांगली भारताच्या प्रजासत्ताकामध्ये विलीन करण्यात आले. सांगली ही भारतात हळद व्यापार राजधानी आहे. येथे साखर उद्योग लॉबी आहे. सांगली शहरात वसंतदादा साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सांगली द्राक्षांसाठीदेखील  प्रसिद्ध आहे.

सांगलीत  अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र ही सुनियोजित औद्योगिक वसाहत आहे . या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी सोयी आहेत. नव्या दळणवळणाच्या माध्यमातून आणखी मोठे उद्योग शहरात आणि जिल्ह्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे.

येथे मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत . अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था तसेच अनेक सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहेत. अभियंते, दूरसंचार सॉफ्टवेअर व्यावसायिक, आधुनिक दूरसंचार व इंटरनेट सुविधा आणि मोबाईल सेवा भरपूर प्रमाणात असल्याने सांगली हे माहिती तंत्रज्ञान उद्योग असणारे एक आकर्षक स्थान झाले आहे.

सांगलीमध्ये रुंद  रस्ते, रेल्वे जंक्शन, सायबर कॅफे, मल्टि-खाद्यप्रकार, खूप चांगले शिक्षण, आरोग्य, दूरसंचार आणि मनोरंजन सुविधा, हॉटेल्स, मॉल्स वगैरे असल्याने ते एक आधुनिक शहर बनले आहे. शहराला जोडले जाणारे चार नवे महामार्ग विकासाच्या आधीन आहेत, त्यामुळे नव्या औद्योगिक प्रकल्पांसाठी ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतील. सांगली शहर माहिती तंत्रज्ञान उत्कर्षाला आले आले आहे. शहरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क एकाच संकुलात उभारले आहे. सांगलीत भारतीय आणि परदेशी माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणखी एक सॉफ्टवेअर पार्क 'उभारण्याच्या प्रयत्नात आहे. या शहराजवळ हरिपूर हे गाव आहे. सांगलीत नारळाची झाडे खूप आहेत.
सांगली जवळ हरिपूर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध असून प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे  स्थान आहे.

सांगली शहराचा इतिहास हा पटवर्धन या पेशव्यांच्या सरदारांच्या मिरजेतील जहागिरी मध्ये झालेल्या वाटणी नंतर सुरु होतो असे मानले जाते, परंतु त्यापूर्वीही सांगली या गावाचे अस्तित्व होते. तशा खुणा सांगलीतील गावभागात बघण्यास मिळतात. सांगली शहराचा व्यापारीदृष्ट्या विकास सन १९२९ साली आयर्विन पूलाच्या उभारणीनंतर सुरु झाला. आयर्विन पुलाला शंभरहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.

कृष्णाकाठची अतिशय सुपीक अशी जमीन सांगलीला लाभलेली आहे. त्यामुळे येथे चवदार भाजीपाला पिकवला जातो. ऊस व द्राक्षे इथे पिकतात. ज्वारी व बाजरी इथे बहरतात.तासगाव तालुक्यातील द्राक्षे  व बेदाणे तर जगभर प्रसिद्ध आहेत.

सांगली मिरज हे जुळे शहर म्हणुन ओळखले जाते. अमराई बाग( Garden ) फार सुंदर आहे. सध्या बापट मळा म्हणजेच महावीर उद्यान शहरवासीयांचे आवडते ठिकाण झाले आहे.

सांगली परिसर वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांनी समृद्ध आहे.कृष्णा नदी आणि लहानमोठ्या तलावांमुळे परिसर समृध्द आहे.

सांगलीचे अर्थकारण मुळ व्यापार आहे. सबंध जिल्ह्यातून तसेच शेजारील जिल्ह्यातील व कर्नाटकातील काही भागाचा दैनंदिन व्यवहार सांगलीतूनच चालतो. येथील अर्थकारण व राजकारण यांचा मिलाप येथे दिसून येतो. येथील ऊस , द्राक्ष तसेच दूध याभोवती समाजकारण व त्याभोवती राजकारण फिरते. 

सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तसेच  द्राक्ष उत्पादनातही  सांगली  आघाडीवर आहे. साखरेसाठी ही सांगली प्रसिद्ध आहे 
सांगलीत गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा, मार्केट  यार्ड, मारुती  रोड, हरभट  रोड, माधवनगर या व्यापारी पेठा आहेतच पण सांगलीमध्ये  `सांगली लोंखड मार्केट नावाचे एक प्रसिद्ध मार्केट आहे, सलीमभाई नदाफ हे त्याचे त्याचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ही १७० दुकाने एकत्र असलेली अधयावत बाजारपेठ सांगलीत कोल्हापूर रोडवर  टी.व्ही. केंद्राजवळ आहे. येथे सर्व प्रकारचे लोंखडी पत्रे. पाईप, अँगल.प्लेट्स असे नवे जुने साहित्य, सर्व  प्रकारचे कार/ट्रक/.मोटारसायकलचे नवे व जुने स्पेअर पार्ट‌्स मिळतात.तसेच येथे सर्व  प्रकारच्या स्क्रॅपची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे येथे संपूर्ण देशभरातून मालाची  आवक जावक  होते. सांगलीमध्ये १०० फुटी रोडवर शामराव नगरच्या काॅर्नरवर महाराष्ट्र एकता चौकात जुने व नवे  सर्व प्रकारचे कारचे स्पेअर पार्ट‌्स एकदम वाजवी व सवलतीच्या दरात मिळतात येथे कार  स्ल्रॅपची २५ दुकाने आहेत.  या ठिकाणी मारुती कारपासून होंडा सिटी-BMW  पर्यंत सर्व प्रकारचे पार्ट‌्स उपलब्ध आहेत. तसेच माधवनगर हे सबमर्सिबल पम्पाचे होलसेल मार्केट म्हणून ओळखले जाते. माधवनगर मध्ये कोणतेही प्रकारचे सबमर्सिबल पम्पाचे विक्री होते, त्याबरोबर कसलेही सबमर्सिबल पम्पाचे रीपेअरी सुद्धा होते. भारतात येथूनदेखील मालाची आवक जावक  होते.  अधिक  माहिती www.caroldpart.com  अथवा  www.autorelife.com येथे मिळते.
सांगलीची बाजारपेठ ही प्रसिंद्ध बाजारपेठम्हणून प्रसिंद्ध आहे .शेअर मार्केट प्रमाणे संगलीमध्ये हळदीचा वायदा बाजार देशात प्रसिद्ध आहे
सांगली व तासगाव ची बाजारपेठ बेदाणे सौदयासाठी प्रसिद्ध आहे

अधिक माहितीसाठी पहा - 

सांगली रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे अनेक महालक्ष्मी एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबतात. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगलीमधून जातो. पुणे-बंगळूर महामार्गावरून पेठ ह्या गावापासून सांगली ४५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक हिरकणी,निमआराम व शिवशाही बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरु झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव या शहरांना जोडले गेले आहे. रत्नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो सांगली मधून जातो

सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे सर्व वर्गातील लोक अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. सर्व धर्माचे लोक आपली संस्कुती जतन करतात.सांगली  शहरात ब-याच जाती चे लोक रहात असून सर्व भाऊ भाऊ प्रमाने  वागत असतात,या पैकी एक तळागाळातील मुस्लिम  समाजातील, नदाफ,पिंजारी,समाज  सम्पूर्ण  महाराष्ट्रा मध्ये  विखुरलेला आहे,  हा समाज  फारच मागासलेला असून तो मिळेल ती कामे करून आपले जीवन  जगत आहे  , प्रामुख्याने हा समाज कापूस  पिंजून  गादी, ऊशी व लोकरीचे  पासून  `जेन`  तयार,   करण्याची  कामे  करतात आहे  , परंतू  आजच्या  यांत्रिक  यूगात  या कामाची/ कलेची जागा  यंत्रानी  घेतल्याने ही हस्तगत कला हळूहळु लोप पावनेच्या मार्गावर  आहे,  या साठी च समाज  बांधवांसाठी सांगली चे  श्री. सलीमभाई  नदाफ  यानी संम्पूर्ण  महाराष्ट्र  मधील  सर्व  नदाफ.पिंजारी, मन्सूरी , समाजातील  बांधवांना एकत्रित  आणने साठी ' अखिल भारतीय नदाफ  सामाजिक  संस्थेची' स्थापना  केली आहे  व या माध्यमातून नदाफ बांधवांना  व्यवसाय, ऊधोग, शैक्षणिक, आर्थीक ,वैवाहीक ,व ईतर सर्व  मार्गदर्शन  व मदत  या संस्थेच्या  माध्यमातून  संम्पूर्ण  महाराष्ट्रात करणार  आहेत त्या  साठी  संस्थेची  www.shadibandhan.net  ही वेबसाईट  कार्यरत आहे सर्व  समाज  बांधवांनी सम्पूर्ण  महाराष्ट्रातुन सहभागी  होण्याचे आवाहन संस्थेचे  संस्थापक  अध्यक्ष, सलीमभाई नदाफ  यांनी  केले आहे .अधिक  माहिती साठी  सम्पर्क;  09850155823 / 09096064147. www.autorelife.com.

मराठी रंगभूमीचा जन्म सांगली शहरात झाला.विष्णुदास भावे हे पहिले नाटककार येथे होऊन गेले. त्यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला अधुनिक चेहरा दिला. त्यांची अनेक नाटके आजवर गाजली असून सांगलीत त्यांच्या नावाचे प्रशस्त अशी नाट्यगृहं उभारण्यात आली आहेत. नाटकांमुळे कलाकारांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. सांगली शहराची नाट्यपंढरी अशीही ओळख आहे. सांगली जशी नाट्यपंढरी आहे तसेच सांगलीची ओळख बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.सांगलीचा गणपती खूप प्रसिद्ध आहे.

सांगलीकरांचा  व सांगलीचा सर्वात  चटकदार खाद्य पदार्थ म्हणजे  भडंग व भेळ. सांगलीतील कपाले व भोरे भडंगाला खूप मागणी आहे.
सांगली मधील क्रीडा क्षेत्रात नुकतेच मानाचे पान लिहिले गेले. भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी केली. या संघात सांगलीची Smriti Mansana स्मृती मानधना हिने चांगली कामगिरी बजावली.
सांगली मधून चतुरंग अन्वय हा प्रसिद्ध दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. या अंकाने आत्तापर्यंत 15 वर्षात 24 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.या अंकांचे महेश कराडकर हे संपादक असून अविनाश सप्रे कार्यकारी संपादक आहेत.

सांगलीची प्रसिद्ध अशी केबल आहे एस एम एस - सांगली मिडिया सर्विसेस, एस बी एन मराठी, सी न्यूज सांगली, जनप्रवास लाईव्ह 
तसेच  लोकसंदेश न्यूज चॅनल जे संपूर्ण  महाराष्ट्रात  प्रसारण होत आहे, ९०.४ ग्रीन एफ एम, ९१.१ रेडीओ सिटी आणि  ९१.९ आपलं एफ एम ही रेडिओ चैनल  अग्रभागी  आहेत या सांगली  शहरातुन बरेचसे  वृत्तपत्रे प्रसीद्ध होतात जसे  पुढारी, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, जनप्रवास, ललकार, लोकसत्ता, तरुण भारत, तिसराडोळा,  ईंडियान्युज,  लोकसंदेश, अशी मराठी  वृत्तपत्रे प्रसीदध होत  असतांत ही वृत्तपत्रे  आॅनलाइन वाचू शकता जसे INDIA NEWS  वाचण्या साठी www.indianewsepaper.com वर ही पाहू शकता.सांगलीमध्ये फार पूर्वी पासून आकाशवाणी चे शक्तिशाली केंद्र असून याची सेवा अगदी धारवाड पर्यंत ऐकली जात होती. एफ एम केंद्राद्वारे ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात.

सांगली शहरात  अनेक नावाजलेल्य प्राथमिक शिक्षण संस्था आहेत  

सिटी हायस्कूल, हि. हा.  रा. चिं. पटवर्धन  हायस्कुल, रामदयाल मालु  हायस्कुल, कै.ग.रा. कन्यापुरोहित  प्रशाला, म के आठवले विनय मंदिर, बापटबाल शिक्षण मंदिर ,सिटी इंग्लिश मिडीयम स्कूल,  इत्यादी .

सांगली हायस्कूल, आरवाडे  हायस्कूल

सांगलीतील पर्यटनस्थळे ही अगदी मोजकीच आहेत, पण ही पर्यटनस्थळे सांगलीकरांसाठी एक प्रकारची पर्वणीच आहे, जी काही जणांसाठी एकांतातले भक्तीचे अध्यात्मिक स्थान, तर काही जणांसाठी पिकनिक पॉईंट तर काही जणांसाठी कपल्स् आणि जोडप्यांचे रमणीय ठिकाण वा मित्रांसाठी एकदिवसीय ट्रिपची एक प्रकारची अविस्मरणीय पर्वणीच आहे, असे म्हटल्यास काही हरकत नाही. यात प्रामुख्याने काही मंदिरे आणि काही बाह्य परिसरातील ठिकाणे आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील ठिकाणांचा समावेश होतो:



#Article 123: सोलापूर (4070 words)


सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी श्री.शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. 

पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे
येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत),  शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा  ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे. 

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी श्री.शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली.  इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग!  मे- जून, १९३०मध्ये सुमारे ४९ दिवस सोलापूरला मार्शल लॉ लागू केला होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत),  शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा  ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात.

तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो . हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला होळकर वाडा आहे. तसेच चंद्रभागा नदीवरील घाट ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला आहे.  

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी सोलापूरचे वैभव दिवसेंदिवस उज्ज्वल होत आहे. सोलापूरची सध्या स्मार्ट शहर म्हणून प्रगती होत आहे. सोलापूर हे सिद्धरामेश्वर नगरी म्हणून ओळखले जाते.

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा धान्याचे कोठार आहे.

भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला  आहे.

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी श्री.शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. 
सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली.

सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.

सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. 

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व माढा. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोले या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो.
विधानसभा मतदारसंघ (११) : अक्कलकोट, उत्तर सोलापूर शहर, करमाळा, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, सांगोले, .

सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून ४ प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.

सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये  याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

सोलापूर मध्ये हुतात्मा स्मृति मंदिर हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो.  हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर  जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे.

सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे.  'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात.

सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.  सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.

सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने  सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.

सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे.

सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.

१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय  या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगर हून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगर हून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरु केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती .

सोलापूर समाचार चे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचार ची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते हि वडीलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब हि उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकीर्दीतच सोलापूर समाचार चे रुपांतर दैनिकात झाले .

मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्स च्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.

बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचार चे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचार चे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचार चे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन हि संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन स्वताची इमारतही उभी केली .

करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शं भा येवले १९६९ साली सुरु केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरु केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरु करण्यात आले होते .

सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरु झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली  सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय  ,वारकरी हि पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली  याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे .

लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरु केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरु केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरु केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरु केले तर च रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरु केले .

१९३३ साली कर्मयोगी ची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन सुदर्शन साप्ताहिक सुरु केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते  साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरु केले .

काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरु केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरु केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरु केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले .

सोलापूरचे कवी कवी कुंजविहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरु केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरु केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरु केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान हि पत्र १९३९ साली सुरु केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म हि धार्मिक पत्रही निघाले  .
कर्मयोगी वृत्तपत्र
१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली.
' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.
रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची  जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली.
कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलिस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगी चे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगी चा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूक चे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली
राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे.
पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले.
कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.

आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.

दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात.

सोलापूर शहरात हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय आहे. या वाचनालयाने सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकली आहे. या वाचनालयाचे सभासद असणे प्रतिष्ठेचे मानले जाते. सुरुवातीला ३० सभासद असलेल्या वाचनालयाचे जवळपास ३००० सभासद झाले आहेत. येथील ग्रंथसंपदा १ लाख १२ हजारांवर गेली आहे.१९४८ पासून येथे बालविभाग सुरू करण्यात आला.वाचन संस्कृतीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किर्लोस्कर सभागृह, संगीत विभाग, वातानुकूलित ॲम्फी थिएटर असा विकास झाला आहे. वाचनालयाच्या प्रगतीमध्ये प्रा.श्रीराम पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे.

दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. 
नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच  येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.

सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते.

पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगे चे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते. 

मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.

मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले. 

सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला.

स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात  मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलिस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते श्री. रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११  या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली.

स्वातंत्र्यापूर्वीच इ स वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेवून सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक श्री मल्लप्पा धंनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना मंगळवार पोलिस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटल च्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते.    
धरण ;-उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. 




#Article 124: हिंगोली (266 words)


हिंगोली शहर हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचे आणि हिंगोली तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. 

हिंगोली शहराच्या ईशान्येस, तालुक्यात सिरसम बुद्रुक येथे मोठी बाजारपेठ आहे.

मराठवाडा विभाग हा आगोदर निझामाच्या राजवटीचा भाग होता. हिंगोली हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका होता. इंग्रजशासित वऱ्हाड विभागाच्या सीमेवर असल्याने हिंगोली शहर हे निजामाचे लष्करी तळ होते. त्याकाळी लष्करी दळ, दवाखाने, प्राण्यांचे दवाखाने हिंगोलीवरून चालत. हिंगोलीचे नागरिक दोन मोठ्या लढायांना सामोरे गेले आहेत - १८०३ मधलं मराठे आणि टिपू सुलतान यांमध्ये झालेलं युद्ध आणि १८५७ सालचं नागपूरकर आणि भोसल्यांचं युद्ध. लष्करी तळ असल्यामुळे हिंगोली हे निझामाच्या राज्यातलं महत्त्वाचं तसंच प्रसिद्ध शहर होतं.

पलटण, रिसाला, सदर बाजार, तोफखाना, पेन्शनपुरासारखी ठिकाणे आजही प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मराठवाडा मुंबई प्रांतात सामील झाला आणि १९६० मध्ये हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात आलं. १ मे १९९९ रोजी हिंगोली येथे मुख्यालय असलेला नवीन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला.

हिंगोली शहरातील खालील मंदीरे प्रसिद्ध आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली शहराची लोकसंख्या ही ८५,१०३ इतकी आहे. हिंगोली शहरात ६७% लोकं साक्षर असून ७४% पुरुष आणि ६०% महीला साक्षर आहेत. ६ वर्षाखालील मुलांची टक्केवारी १५% आहे.
हिंगोली शहरात ५३.४१ टक्के हिंदू, ३३.४७ टक्के मुस्लिम, ०.२४ टक्के ख्रिशचन, १०.६३ टक्के बौद्ध, २.०३ टक्के जैन, ०.०२ टक्के इतर धर्म आणि ०.०७ टक्के माहीती सांगितली नाही. 

मराठी ही शहरातली प्रमुख भाषा आहे. सर्व शासकीय व दैनंदीन व्यवहार मराठीतूनच होतात. शहरात दख्खनी उर्दू, मारवाडी, गुजराती, तेलुगू भाषाही बोलल्या जातात. मराठी ही संपर्कभाषा आहे. विदर्भाचा वाशिम जिल्हा जवळच असल्याने येथिल भाषेवर वऱ्हाडी भाषेचा प्रभाव आढळतो. 

शहरात दरवर्षी नवरात्रीत दहा दिवसांचा सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. यात शहरातील रामलीला मैदान भागात मोठी जत्रा भरते. दीडशेहून जास्त वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो.

हिंगोली जिल्हा




#Article 125: भंडारा (320 words)


भंडारा शहर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.  हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या भंडारा शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणाऱ्या पुरामुळे शहराला चहूबाजूंनी प्रोटेक्शन भिंतींनी घेरले आहे.  

भंडाऱ्याचे तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५  अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यात कमीत-कमी ८ अंश सेल्सिअस तापमान असते..

२०११साली झालेलया जनगणनेमध्ये, भंडारा शहराची लोकसंख्या ११,९८,८१० होती. त्यांत पुरुष ५१% व महिला ४९% होत्या. भंडारा येथे सरासरी साक्षरता दर ८०% आहे हा. ७४.०४% या राष्ट्रीय सरासरी पेक्षा किंचित जास्त आहे. शहरातील ८५% पुरुष आणि ७५% स्त्रिया साक्षर आहेत. भंडारा शहरात ६ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११% आहे.

सन २०११च्या जनगणनेच्या तुलनेत त्यात ५.६५ % इतकी वाढ झाली आहे.

अशोक लेलॅंड (जड वाहन निर्माता), सनफ्लॅग (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, एलोरा पेपर मिल आणि मॅंगेनिझ माती खाणी येथे आहेत. व्हिडीओकॉन इंटरनॅशनलचा इलेक्ट्रॉनिक्स हा प्रस्तावित कारखाना भंडाराशहरा जवळच होणार आहे. (२०१७ची स्थिती). शहरामधून एक रेल्वे लाईन जाते, ती पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा सनफ्लॅग या उद्योगांसाठी वापरली जात होती.  

भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो. 

बहिरंगेश्वर मंदिर हे अजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरातीचा उत्सव होतो.  त्यावेळी तेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन असल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खांब आहे. हा खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते.

भंडारा शहरात एक शंभर वर्षापेक्षा जुने सार्वजनिक वाचनालय आहे.

गांधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते. 




#Article 126: गुढीपाडवा (1756 words)


गुढीपाडवा हा एक भारतीय  सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.
दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. 

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.  सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.

साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो. पण शके १९३८मध्ये दोन गुढीपाडवे आले होते. 

८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला. 

काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे. 'इव्होल्यूशन ऑफ गॉड' या ग्रंथातील ग्रॅंट ॲलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरीयातील 'सामोयीड्स' ते दक्षिण आफ्रिकेतील 'दामारा' या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. इस्रायलमधील अशेराह पोल (Asherah pole) या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या. युरोपात नॉर्वेजियातील Mære चर्च  उत्खननामध्ये काठीपूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात, युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात. पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथकातून 'व्हाकापोकोको आतुआ' नावाने शेती-पिकांचा देव रोंगोची पूजा होत आली आहे. कुक बेटांवरील आदिवासी 'आतुआ राकाऊ' नावाने काठीपूजा करतात. चीनच्या युनान प्रांतातील मिआओ आणि अनशूनमधील येलांग संस्कृती, व्हिएतनाम मधीले 'के न्यू', कोरियातील 'जॉंगशॉंग' आणि 'सोटडे',म्यानमार देशातील 'के होते बो' उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या अथवा होत आलेल्या काठी उत्सवांची अथवा पूजांची उदाहरणे आहेत. अमेरिका खंडात देवक-स्तंभाच्या स्वरूपात प्राचीन काठ्यांचे वा स्तंभांचे जतन केले जाते.

भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात 'बास पूजा' साजरी करतात महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय जतरकाठी, काठीकवाडी, नंदीध्वज हे काठी-उत्सव साजरे केले जातात. डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी.

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी)च्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्ध वर्णने फारच कमी वाटतात.  जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यांतही आपआपसांत फरक आहे. त्यांमध्ये इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही केली गेली आहे असेही दिसते.

रामायण, महाभारत आणि पुराणे असोत, अथवा नाटके, इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात आलेले दिसतात. नायकांना  इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते.

श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे. 

हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. ह्यांत गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर  गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९ (?) असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. 

हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ग चा क (अथवा क चा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेन्सस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.

गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो.
तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. 
दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

स्नान इ.दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात.  गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.  ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.

या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||

अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो.  करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते 
 
चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा-   अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.

मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात.
पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) 
शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.(टिप: सदर अभंग संत नामदेव गाथेत असला तरी 'विष्णुदास नामा' हे १६व्या शतकातील वेगळे संत कवि, संत नामदेवांचे उत्तरकालीन, कदाचित संत एकनाथांचे समकालीन असल्याची बऱ्याच संतसाहित्य अभ्यासकांना आणि संपादकांनाही कल्पना नसल्याने त्यांचे अभंग नामदेव गाथेत सरमिसळ केलेले दिसून येतात) तो अभंग असा

आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ।।
मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ।।
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णुदास नामा गुढीयेसी ||
 

अर्वाचीन साहित्यात  कवयित्री बहिणाबाई चौधरी  त्यांच्या 'गुढी उभारनी' या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात. अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांच्या मतानुसार बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना खानदेशातील लेवा पाटीदार गणबोलीत आहे.
 आरंभ  होई चैत्रमासीचा गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा                   
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

स्त्री लोकगीतांत गुढीपाडव्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येताना दिसते.

.....
गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥२४॥

गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ ॥२५॥

गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥२६॥

गुढी पाडव्याला घरोघरी गुढी
पडू दे माझी कुडी देवासाठी ॥२७॥

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी गोपूबाळाची ॥२८॥

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या ॥२९॥

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी उषाताईचा ॥३०॥
.....

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. 

जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.

 - मराठी शुभेच्छापत्रे




#Article 127: रामनवमी (228 words)


चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात.श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

भारतभर रामजन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जात असले तरी, ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला, त्या अयॊध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे मानतात. त्या पंचमीला अगहन पंचमी म्हणतात. (मार्गशीर्षाला हिंदीत अगहन म्हणतात!)

याला आधार म्हणजे तुळशीदासाच्या 'राम चरित मानसा'मधील खालील उल्लेख. : 
मंगल मूल लगन दिनु आया|  हिम रिपु अगहन मासु सुहावा||
ग्रह तिथि नखतु जोगु वर बारू|
लगन सोधि विधि कीन्ह विचारू||




#Article 128: चैत्र पौर्णिमा (255 words)


चैत्र पौर्णिमा साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे नि विशेष महत्त्व आहे.

मचैत्र महिन्यात मार्तंड भैरव अवतार दिन, श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, होम हवन व पालखी सोहळा असतो. हा हनुमानाचा जन्मदिवस मानला जातो. (वाराणशी भागात हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असेही मानले जाते) या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात.
चैत्र पौर्णिमा या दिवशी  शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते. याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खीर दिली होती.

चैत्र पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येतते. सिंहली मान्यतेनुसार संबोधी प्राप्तीनंतर पाचव्या वर्षी भगवान बुद्धांच्या लंका (श्रीलंका) भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सिंहली ग्रंथ दिपवंस, महावंसच्या मान्यतेनुसार तेथील परंपरा मानते की, बुद्ध श्रीलंकेला गेले होते मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चूुोदर या दोन नागवंशीय राजांचा रत्नजडीत सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दु:ख, नुकसान , निवारण करावे म्हणून केवळ करुणेपोटी तथागत बुद्ध हयांनी ही भेट दिली अशी मान्यता आहे. रणमैदानाजवळच्या जागेत वास्तव्य करून तथागतांनी राजांना धम्मोपदेश दिला. यामुळे दोघांत समेट घडून आला. उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडीत सिंहासन त्यांनी तथागत बुद्धांला दान केले गेले.

कल्याणीचा नाग राजा मणिअख्खिका जो ययद्धात भाग घेण्यास आला होता, भगवंताजवळ आला आणि म्हणाला – भगवान आपण आपल्या अपार करुणेचा वर्षाव आम्हांवर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतानी अशीच करुणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावी. भगवान बुद्धांनी राजाचे निमंत्रण स्वीकारले. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भगवान बुद्ध जेतवनाराम येथे परतले.

भारतीय मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी सुजाताने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खीर दिली होती.




#Article 129: श्रावण पौर्णिमा (533 words)


श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कारविधी सांगितलेला आहे. आजही वैदिक धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरु़ाषांसाठी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी म्हणतात. बौद्ध धर्मीयांसाठी सुद्धा हा सण वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचा आहे. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज व्यक्तीच्या पोटजातीनुसार अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून श्रावण पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते असे. 

ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.

एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसऱ्या पौर्णिमेला असते.

सूर्योदयापासून दोन तास चोवीस मिनिटांपेक्षा जास्त काळ श्रावण पौर्णिमा असेल आणि त्यावेळी ती विष्टी करण रहित असेल तर त्या दिवशी अपराण्हकाली रक्षाबंधन करावे. दुसऱ्या दिवशी यापेक्षा कमी पौर्णिमा असेल आणि आतल्या दिवशी विष्टीकरण रहित अपराण्हकाळी किंवा प्रदोषकाळी पौर्णिमा असेल तर आदल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे, असे दा,कृ. सोंमण सांगतात..

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.
समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ, म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ मूळ उत्तरी भारतातला हा सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.
या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या इंद्राच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असा संकेत रूढ झाला आहे.

सूर्योदयापासून दोन तास चोवीस मिनिटांपेक्षा जास्त काळ श्रावण पौर्णिमा असेल आणि त्यावेळी  विष्टी करण नसेल तर त्या दिवशी अपरान्हकाली (दुपारी १२ नंतर) रक्षाबंधन करावे. दुसऱ्या दिवशी यापेक्षा कमी पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी विष्टीकरण रहित अपरान्हकाळी किंवा प्रदोषकाळी पौर्णिमा असेल तर आदल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे, असे दा.कृ. सोमण सांगतात..

श्रावण महिन्यातील अमावास्येला पोळासण साजरा केला जातो.  प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी हा सण साजरा करतात.  या दिवशी घरातील बैलांना आंघोळ घालून सजवतात.. त्यांना (पुरणपोळीयुक्त) गोडाचे जेवण देतात. या दिवशी बैलांकडून शेतातील कामे करवून घेत नाहीत.
गोठ्यातील भिंती आणि जमिनी शेणाने सारवतात व तांदळाच्या पिठीने त्यावर रांगोळी काढतात.

श्रावणी पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा एक सण आहे. बौद्ध भिक्खूंचा आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास असतो. तीन महिन्यांच्या काळात भिक्खू एका जागी निवास करून धम्माचा अभ्यास व ध्यान साधनेचे चिंतन नमन करीत असतात.  या दिवशी बौद्ध भिक्खू लोकांना धम्माचे नियम व परंपरा यांचे मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनविण्याचा प्रयत्न करतात.




#Article 130: भाद्रपद अमावास्या (101 words)


हिंदू पंचांगाप्रमाणे दक्षिणी भारतात हा दिवस भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस असतो, तर मध्य आणि उत्तरी भारतात हा दिवस आश्विन महिन्याच्या मध्याला येतो. इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो. या अमावास्येला 'सर्वपित्री अमावस्या' किंवा 'पितृमोक्ष अमावस्या' असेही म्हणतात. ज्या हिंदूंना आपल्या पितरांची मृत्युतिथी नक्की माहीत नसेल असे सर्व धार्मिक प्रवृत्तीचे लोक, या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. किंवा निदान, कावळ्यासाठी वाढलेल्या अन्‍नाचे ताट ठेवतात.

हिंदू पंचांगाप्रमाणे कधीकधी एका वर्षात, दोन भाद्रपद महिने आणि त्यामुळे दोन भाद्रपद अमावास्या येतात. पहिला भाद्रपद अधिक भाद्रपद असतो, तर दुसरा निज भाद्रपद. अशा वेळी दुसऱ्या म्हणजे निज भाद्रपद महिन्यातली अमावास्या, ही सर्वपित्री अमावास्या समजली जाते.




#Article 131: तिथी (862 words)


तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यान्त पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. शुक्लपक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात. 

उत्तर भारतात पैर्णिमान्त महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष. दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात. 

एका विशिष्ट वेळी चंद्र आणि सूर्य एकत्र आले की अमावस्या होते. चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.


भद्रा तिथीच्या दिवशी, म्हणजेच द्वितीया, सप्तमी वा दशमी या तिथीच्या दिवशी जर रविवार, मंगळवार किंवा शनिवार आला की चंद्रनक्षत्रानुसार द्विपुष्कर किंवा त्रिपुष्कर योग होतो. 

धनिष्ठा, चित्रा किंवा मृग नक्षत्रात चंद्र असेल तर द्विपुष्कर योग आणि  कृतिका, पुनर्वसु, विशाखा, उतराफाल्गुनी, उत्तराषाढ़ा वा उत्तराभाद्रपद नक्षत्रात असेल तर त्रिपुष्कर योग होतो.

द्विपुष्कर योगामध्ये ज्या शुभ कार्याची सुरुवात होते त्याची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. हा योग चालू असताना ज्या शुभाशुभ घटनेची समाप्ती होते ती कालान्तराने दुप्पट होते, असे शास्त्र सांगते.  म्हणून या काळात धन-संपत्तीविषयक शुभ काम करावे, श्राद्धादी अशुभ कार्ये करू नयेत, अशी कल्पना आहे. 

द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते.

मास दुणा, तिथीगणा, तीन उणे नक्षत्र जाणा. 

मास दुणा - ज्या (हिंदू) महिन्यातील नक्षत्र पाहिजे असेल, त्या महिन्यासुद्धा चैत्रापासून सर्व महिने मोजून त्या संख्येची दुप्पट करावी. अधिक महिना असल्यास तोही मोजावा.
तिथीगणा - महिन्याच्या क्रमांकाची दुप्पट करून प्राप्त झालेल्या संख्येत ज्या तिथीचे नक्षत्र हवे असेल ती तिथी मिळवावी (बेरीज करावी); कृष्णपक्षाची तिथी असेल तर आणखी १५ मिळवावे.  
तीन उणे नक्षत्र जाणा - वरीलप्रमाणे आलेल्या बेरजेतून ३ वजा करावेत. जो आकडा मिळेल, त्या क्रमांकाचे नक्षत्र हे आपल्याला हवे असलेले नक्षत्र जाणावे. मिळालेले उत्तर २७हून अधिक असल्यास त्यातून २७ कमी करून नक्षत्राचा क्रमांक मिळतो. 

उदा० ज्येष्ठ वद्य नवमीचे नक्षत्र हवे असल्यास - ज्येष्ठ हा ३रा महिना, म्हणून ३ ची दुप्पट ६. अधिक ९ + वद्यपक्षासाठी १५ = ३०. ३० वजा ३ = २७, हा हव्या असलेल्या नक्षत्राचा क्रमांक. २७वे नक्षत्र म्हणजे रेवती.  म्हणजे ज्येष्ठ वद्य नवमीला चंद्र हा रेवती नक्षत्रात असतो. 




#Article 132: आश्विन (118 words)


हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन महिना भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याआधी येतो. 

आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात वद्य नवमीला झाला. 

आश्विन महिन्यात हिंदूंचे शारदीय नवरात्र, दसरा हे सण आणि दिवाळीतले नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवस येतात. आश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी, तर कृष्ण एकादशीला रमा एकादशी ही नावे आहेत.  द्वादशीला वसू बारस (गोवत्स द्वादशी) आणि त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. 

आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते. या दिवशी ज्याने अजमेर शहराची स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते. 

आश्विन वद्य चतुर्थीला उत्तर भारतीय स्त्रियांचा करवा चौथ हा सण असतो. 

 हा भारतीय सरकारी पंचांगानुसारही वर्षातील सातवा महिना आहे. हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.




#Article 133: आश्विन पौर्णिमा (122 words)


हिंदू पंचांगातील आश्विन महिन्यातल्या या पौर्णिमेला  कोजागरी पौर्णिमा किंवा  शरद पौर्णिमा म्हणतात. हा हिंदुधर्मातील एक व्रताचार आहे ज्याला सामूहिक स्वरूपात साजरे करताना सण मानले गेले  आहे आणि तो उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मातापित्यांचा ज्येष्ठ पुत्र किंवा ज्येष्ठ पुत्री हिची आश्विनी असते. त्यादिवशी त्याला किंवा तिला ओवाळतात, व भेटवस्तू देतात. 

या दिवशी अजमेर शहराची ज्याने स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते.

याच पौर्णिमेला महाप्रवारणा पौर्णिमा म्हणतात. हा एक बौद्ध सण आहे. ही पौर्णिमा अशोक विजयादशमीनंतर येते. या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावास संपतो. वर्षावास संपताना होणाऱ्या उत्सवाच्या दिवशी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून सर्व उपासक व उपासिका एकत्र जमतात आणि बुद्ध वंदना घेऊन तथागत बुद्धांना वंदन करतात. त्यांनंतर ज्येष्ठ बौद्ध भिक्खू धम्म प्रवचन देतात, प्रवचन संपल्यावर बौद्ध उपासक-उपासिका भिक्खूंना कठीण चिवरदान करतात.




#Article 134: कार्तिक शुद्ध एकादशी (151 words)


कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना  यामागे आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत  देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.

कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात. 

आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.




#Article 135: मार्गशीर्ष पौर्णिमा (104 words)


मार्गशीर्ष पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.  या दिवशी दत्त जयंती असते. याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीही असते.
मार्गर्शीष पौर्णिमा हा एक बौद्ध धर्मीयांचा सण आहे. या दिवशीच मार्गर्शीषातल्या पौर्णिमेला गौतम बुद्ध राजगृहाला गेले होते. तेव्हा श्रेणीय बिंबिसार राजाने यष्टिवन दान दिले. तथागत बुद्ध आल्याचे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी राजा व प्रजा गेली. सर्वांनी भिक्खू संघासह बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर राजाने बुद्ध व भिक्खू संघाला येणाऱ्या उद्याचे भोजनदान स्वीकारण्याची नम्र विनंती केली. दुसऱ्या दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसमवेत भोजनासाठी गेले, तिथे त्यांचा आदरसत्कार केला गेला. भोजनदान संपल्यावर  धम्म उपदेश श्रवण करून राजाने बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाला वेळूवन दान दिले.
 

 
	

 

 




#Article 136: माघ पौर्णिमा (288 words)


माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते.

माघ पौर्णिमेला “नव्याची पुनव” म्हणतात. नव्याची म्हणजे नवीन धान्याची. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असाच सण आहे.पश्चिम महाराष्ट्रात  शेतात पिकलेल्या नवीन धान्याची  मुठीच्या आकाराची  पेंधी एक किंवा दोन आणतात. त्या घराच्या दाराजवळ बांधतात. मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उंब-याजवळ सारवलेल्या जमिनीवर त्या ठेवतात. अंगणात नवीन धान्याची नैवेद्य  शिजविला जो. तो या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवितात. ज्वारीची पाच ताटे आणतात.त्यांच्या टोकाला गाठ मारतात. गव्हाच्या पाच मुठीएवढ्या पेंढ्या तेथे ठेवल्या जातात. या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात व त्यांची पूजा करतात. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे. काही ठिकाणी धान्याची एक पेंढी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात.  त्या मेढीची पूजा करून  तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवितात. काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंढी पूजतात  व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात.

मराठा कुणबी लोक  भात कापून त्याचा ढीग घातल्यावर  ते झोडपण्यापूर्वी  सा दगडांची पूजा करून त्यांना बळी देतात. सात दगड म्हणजे पाच पांडव आणि दोन वनदेव. वारली लोक भात तयार झाल्यावर तो खाण्यापूर्वी  नृत्य करतात. भाताच्या राशीवर नारन नावाच्या  देवीची स्थापना करून  तिच्याभोवती पुरुष फेर धरून नाचतात. ओरिसामध्ये भुवान  नावाचा देव शेताचे रक्षण करतो. या देवाला अफू आणि काकवीचा नैवेद्य दाखवितात. कर्नाटकात शेतकरी  भाताची कापणी करण्यापूर्वी  काहे रोपे कापून त्याची शेतातच पूजा करतो. त्याच्या लोंब्या घराच्या खांबाला किंवा छपराला बांधतात. या सणाला ‘ होस्थू’ असे म्हणतात.




#Article 137: गोदावरी नदी (1566 words)


 

गोदावरी (मराठी - गोदावरी) नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे हि  म्हटले जाते.  गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ  बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होते असते. नदीतुन वाहणार्‍या  पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोंबर या चार महिन्यांतच वाहुन जाते.नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी.(समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जात आहे. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट,उर्वशी तट इत्यादी स्नानाचे खुप महत्त्व आहे.

प्रवरेकाठी पाषाण युगापासून  गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले.

रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात.
एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते.

त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत.

अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात.

ऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्माण करण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉॅंग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला आहे.

गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. 

गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. जायकवाडी सिंचन प्रकल्प  हा अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.

आंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर  वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथेही श्री‍रामाचे सुंदर मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. 

आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.

सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी व खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.

गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.

गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.

एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे.
ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत.
कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी  अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका  एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

दारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी मुळा धरण] प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - भोजापुर प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प

कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी,  वाण नदी, बिंदुसरा नदी

मध्यप्रदेशातून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्यप्रदेशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते.  तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.

खेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा) प्रकल्प  या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत.

नाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा 
गोसीखूर्द प्रकल्प

कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र  १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र  ११९०० वर्ग मैल  आहे.

नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात.

नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.

गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील  माशांच्या प्रजाती आढळून येतात. 

गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात  प्रजातीच्या झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.

डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले.

गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे.

नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.

गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात  १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी.,  नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.

आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.

नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे.

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते, परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली (प्रस्तावित), वाकी (प्रस्तावित), भाम, मुकणे , अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत.

जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी.

अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी  नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे. 

गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय  सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते, त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते.
नाग  पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात. सर्फेस वॉटर मध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे आणि बी. ओ. डी. जास्त आहे. तसेच फ्लोराईड आणि डिझॉल्वड सॉलीड्स यांचे प्रमाण सुद्धा अधिक आहेत. 




#Article 138: आषाढ शुद्ध नवमी (178 words)


हिला कांदे नवमी किंवा भडली नवमी म्हणतात. 

यादिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी होते. पावसाळ्यात कांदा सडल्यासारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज्य केलेला आहे. तसेच वांगीदेखील वर्ज्य असतात.

यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जातोच जातो. एकेकाळी हे नियम प्रामाणिकपणे लागू व्हायचे. कोणाच्याही घरातून कांदा, लसणाच्या फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यच नव्हते. म्हणून कांदे नवमीच्या दिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. कांद्याची भजी-भाजी-कोशिंबीर, थालपीठे, झुणका, कांदे पोहे, कांदे घातलेला फोडणीचा भात वगैरे खाऊन हा दिवस साजरा होतो.

भडली नवमीच्या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात धडाक्यात लग्ने होतात. या मुहूर्तासाठी पंचांग पहावे लागत नाही. भडली नवमीनंतर दोनच दिवसांनी चातुर्मास सुरू होतो आणि तो संपेपर्यंत लग्नाचे मुहूर्त नसतात. 

पहा : नवमी




#Article 139: आषाढ पौर्णिमा (180 words)


१. या पवित्र पौर्णिमेच्या रात्री सिद्धार्थ गौतमाने माता राणी महामाया यांच्या गर्भात प्रवेश केला होता.  

२. याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते 

३. राजकुमार सिद्धार्थ आणि राणी यशोधरा यांचे एकमात्र पुत्र राजकुमार राहुल यांचा जन्म हि याच दिनी झाला.

४. भगवान बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश सुद्धा याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी दिला जो पुढे धम्मचक्रप्रवर्तन सुत्त म्हणून प्रसिद्ध झाला.

५. भगवान बुद्धांनी याच दिवशी दुहेरी चमत्कार दाखविला होता (खांद्यातून अग्नी व पायातून जल आणि शरीरातून सप्त रंग) प्रकाशित केले 

६. तवातिंसा देवलोकात जाऊन ३ महिने त्यांची माता राणी महामाया यांना अभिधम्माचा उपदेश दिला. 

७. आषाढी पौर्णिमा याच पवित्र पौर्णिमेला वर्षावास सुरु होतो. जेथे ३ महिने भिक्षु आणि उपासक धम्माचा अभ्यास करतात. 

आषाढ हा अधिकमास आला असता त्या मासाच्या पौर्णिमेला या व्रताची सुरुवात व  श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती करतात . कोकीलारूपी गौरी ही या व्रताची प्रधान देवता आहे . नक्तभोजन व पूजा ही याची प्रधान अंगे आहेत. हे व्रत संपूर्ण  एक महिना करणे शक्य नसेल, तर कमीत कमी सात दिवस , निदान तीन दिवस तरी करावेच. महिलांनी करावयाचे व्रत . 




#Article 140: भाद्रपद शुद्ध पंचमी (371 words)


हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा  रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी आहे.

गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो. स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते असे मानले जाते.ज्या विद्यार्थ्याना श्रावणी (वेदाध्ययन करणाऱ्या वर्गासाठी विहित व्रत)संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषिपंचमी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.

कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. त्यानुसार चातुर्मास काळात येणाऱ्या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन, पंचगव्य प्राशन, सुवासिनींना हरिद्रास्नान, भस्मस्नान, गोमय स्नान, मृत्तिकास्नान, महासंकलपयुक्त  तीर्थस्नान, अर्घ्यदान, अशा अनेक महत्त्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि ऋषी स्मरण (सप्तर्षीची पूजा ) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे.कारण एरवीच्या उपासात रसाहार,फलाहार किंवा हविष्यान्न विहित असते.परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते.तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणाऱ्या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात हे व्रत महिला करतात त्याचप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात.

या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ( भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.  यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते.

भाद्रपद शुक्ल पंचमीच्या म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी शेगावचे संत गजानन महाराज यांचा समाधीदिन असतो.

श्री गणेश चतुर्थी या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेल्या दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन या पंचमीला करतात.

भाद्रपद

भोगीची भाजी




#Article 141: अक्षय्य तृतीया (450 words)


अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.
या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.

ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे.  असे दुर्(योग) यापूर्वी अनेक अक्षय्य तृतीयांना आले होते, त्यांपैकी हे काही प्रसंग :- 

शुक्रास्त असलेले दिवस : १ मे १९४९, ३ मे १९६५, ५ मे १९७३, ७ मे २००८, ९ मे २०१६.

अस्त झाल्याने आकाशात गुरू दिसत नसलेले दिवस : १६ मे १९५६, १ मे १९७६, २३ एप्रिल २०२३.

या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.

भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा  हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा  आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता. 

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते.  ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र  त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. 
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे

या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही.प् रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.




#Article 142: आषाढी एकादशी (171 words)


आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात.

देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी  येतात. अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

आषाढ महिन्यातील  शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला  पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.  त स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी  श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.

आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी  एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.




#Article 143: नागपंचमी (828 words)


नागपंचमी हा श्रावण महिन्यातील  सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. 
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून  नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. 

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.

एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे.  श्रद्धाळू माणसे  नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.

मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत.

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)

भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे  चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते.  प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले.

या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.

पूर्वी च्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.

या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात. 

या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. 
भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.

सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेला बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पद्धती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.

पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना, पेठ नाका (इस्लामपूर)पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तेथून साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गसमृद्ध आहे. बत्तीस शिराळ्यापासून जवळच चांदोली अभयारण्य, चांदोली धरण आहेत. 

जेेव्हा पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत असे. पकडलेल्या नाग, साप, धामण यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.

नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यांतील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालून फोटो काढत.

शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशांतही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली.

त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.

नागभाऊरायाला नैवेद्य : 

नागपंचमीच्या गं दिवशी       मी गं नेसले हिरवी साडी 
नाग भाऊराया              मला पाठवितो गं गाडी 
नागपंचमीच्या दिवशी          मी गं भरीला चुडा 
नागा रे भाऊराया           तुला नैवेद्य ताजा पेढा 
तूच रे रक्षण करी          माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया           तुला नैवेद्य कढीचा 
नागा रे भाऊराया          तुला वहिल्या मी लाह्या 
तुझ्या दर्शनाला आल्या       शेजारच्या आया बाया 
नागा रे भाऊराया          तुला नैवेद्य गुळाचा 
आता रक्षण करी          माझ्या  बंधूच्या कुळाचा

चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला ।
ताज्या लाह्या वेचायाला वेचायाला, हळदकुंकू व्हायायाला व्हायायाला

या गं या गडयिनी या गं या मैतरणी 
तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई 

जमूनिया साऱ्या जनी जाऊ बाई म्हणा 
चल गं सये वारुळाला वारुळाला 

नाग भाउराया तुला वाहते दूधलाह्या 
दर्शनाला येती शेजारच्या आयाबाया 

नागपंचमीच्या सणाला बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू यायचा. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंदा, पतिराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशीण सासूला म्हणते _ _ _ _ _

पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला ।

बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायला ।

सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला । 

सासरा म्हणे, मला काय विचारतीस? विचार तुझ्या पतीला ।.......

चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)

श्रावण

 




#Article 144: लिनक्स (669 words)


लिनक्स (इंग्लिश: Linux) हा एक युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम (संचालन प्रणाली)चा गाभा (इंग्लिश: Kernel) आहे. लिनक्स ही मुक्त सॉफ्टवेअर आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. 

लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली लिनक्स वितरणेही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या 'लिनस टोरवाल्ड्स'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेअर्स, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेअर, ही ग्‍नू प्रकल्पाने विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव ग्‍नू/लिनक्स हे आहे. (खालील लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)
 
लिनक्स सुरुवातीला इंटेल-३८६ मायक्रोप्रोसेसरवर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या व्यक्तिगत संगणक, महासंगणक, तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.गूगल कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. आय.बी.एम. , एचपी, अधिक विकसित करीत आहेत. सेवा संगणक क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा विंडोज आणि युनिक्स यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात. 

लिनक्स गाभा प्रथम फिनलंडच्या लिनस टोरवाल्ड्स या विद्यार्थ्याने लिहिला. त्याच्याकडे सुरुवातीला अँड्रु टॅनेनबॉम यांनी लिहिलेली मिनिक्स कार्यप्रणाली होती. पण टॅनेनबॉम ती वाढवू इच्छित नव्हते. म्हणून लिनसने त्याला पर्यायी लिनक्स प्रणाली विकसित केली.

ज्यावेळी लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनसने प्रसिद्ध केली त्यावेळी ग्‍नू प्रकल्प बऱ्याच प्रमाणात विकसित झाला होता. संगणक प्रणालीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या भागांपैकी केवळ गाभ्याच्या भागाचे काम पूर्ण व्हायचे होते. लिनक्स गाभ्याच्या प्रोग्रॅमने ही महत्त्वाची गरज पूर्ण केली. त्यामुळे लिनक्स लगेचच नवीन ग्‍नू संगणक प्रणालीचा गाभा म्हणून वापरण्यात आली. लिनक्स ही नंतर ग्‍नू सार्वजनिक परवान्याच्याखाली आणण्यात आली.

टक्स पेंग्विन लिनक्सचे प्रतीक आहे.

स्वतः लिनस टोरवाल्ड्सच्या म्हणण्याप्रमाणे  'लिनक्स' हा उच्चार योग्य आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये 'लिनक्स' हा उच्चार प्रचलित आहे. मात्र, बऱ्याच वेळा (विशेषतः भारतात) 'लायनक्स' हा उच्चार केला जातो.

'ग्‍नू' प्रकल्प आणि 'मुक्त सॉफ्टवेअर' चळवळीची प्रणेती 'फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन' ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पूर्ण संगणकप्रणालीसाठी 'लिनक्स' पेक्षा 'ग्‍नू/लिनक्स' (इंग्लिश: GNU/Linux) हे नाव अधिक योग्य आहे. फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, लिनक्स हा संपूर्ण संगणकप्रणालीतील केवळ एक छोटासा भाग आहे व ग्‍मू प्रकल्पाचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. अशा प्रकारे कार्याच्या तौलनिकदृष्ट्या संपूर्ण संगणकप्रणालीस 'ग्‍नू/लिनक्स' नाव दिल्याने ग्‍नू प्रकल्पाच्या कामाची वाजवी दखल घेतली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्‍नू नावाचा उल्लेख केल्याने लोकांमध्ये मुक्त सॉफ्टवेअर संकल्पनेची जागरूकता वाढते.

काही लोक हा फ्री सॉफ्टवआर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेअरपेक्षा 'मुक्तस्रोत' (इंग्लिश: Open Source) हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात. 

इ.स. २०११च्या सुरवातीस लिनक्स व ग्‍नू/लिनक्स ही दोनही नावे प्रचलित होती. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर्समध्ये ग्‍नू/लिनक्स हे नाव अधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण माध्यमांमध्ये (वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन) लिनक्स हे नाव जास्त वापरले जाते. लोकप्रिय लिनक्स वितरणांपैकी डेबिअन वितरण हे आपल्या नावामध्ये ग्‍नू/लिनक्स नाव वापरते. इतर अनेक वितरणे त्यांच्या नावामध्ये केवळ लिनक्स वापरतात.

लिनक्स वितरण हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्‍नू'(GPL)साठी दिलेल्या मुक्त परवानग्यांमुळे कोणीही स्वतःचे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरित करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे डेबिअन, रेड हॅट, उबुंटू, मँड्रिवा, बॉस ऑपरेटिंग सिस्टिम इत्यादी आहेत.

'मोर दॅन अ गिगाबक: एस्टिमेटिंग ग्‍नू/लिनक्सेस साइझ' या लेखामध्ये रेडहॅट लिनक्स ७.१ या वितरणाच्या अभ्यासात असे दिसून आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १०८ कोटी डॉलरइतका खर्च आला असता.

नंतरच्या एका अभ्यासात ('काउंटिंग पटेटोज: द साइझ ऑफ डेबियन २.२') डेबिअन २.२ या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १९० कोटी डॉलर इतका खर्च आला असता.

पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत. 

सेवा संगणक क्षेत्रात लिनक्स, अपॅची वेब सर्व्हर, 'मायएसक्यूएल' डेटाबेस व पीएचपी/पर्ल/पायथॉन स्क्रिप्टिंग भाषा ) या सॉफ्टवेअरांचा संच एलएएमपी (इंग्लिश: LAMP) या लघुनामाने प्रसिद्ध आहे.

लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत.




#Article 145: जन गण मन (559 words)


जन गण मन हे  भारताचे राष्ट्रगीत आहे. हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचलेले आहे.   याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे. भारतो भाग्यो बिधाता या रचनेला २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.   राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला ५२ सेकंद वेळ लागतो. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या कलकत्ता (आता कोलकाता ) अधिवेशनात सर्वप्रथम हे सार्वजनिकपणे गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून  स्वीकार केलेला आहे.

या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वत: ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले आहे.
बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले  ‘जन गण मन’ कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले. 

या गीतात भारत देश  सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.

घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले

 
जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता

पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग

विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय गाथा

जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री

तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री

दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे

संकंट दुखयात्रा

जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले

गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले

तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे

तव चरणे नत माथा

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा.... 

जन-गण-मन अधिनायक जय है 
भारत भाग्य विधाता 

तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो! 

पंजाब सिंध गुजरात मराठा 
द्राविड उत्कल बंग। 

पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो. 

विंध्य हिमाचल यमुना गंगा , 
उच्छल जलधितरंग। 
विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. 

गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात. 

तव शुभ नामे जागे , 
तव शुभ आशिष मांगे ; 
गाहे तव जय गाथा। 
जन-गण मंगलदायक जय है , 
भारत-भाग्य-विधाता। 

हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस. 

जय हे , जय हे , जय हे , 
जय जय जय जय है।। 

तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.




#Article 146: शिवाजी महाराज (3622 words)


छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. 

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो. 

सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.

 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला.  महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.

हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.

युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांचेकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग  चेतविले. 

इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही  मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.

शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.

शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.

शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली.

आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.

अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर  प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

पहा प्रतापगडाची लढाई

पहा कोल्हापूरची लढाई

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले.
ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.

पहा पावनखिंडीतील लढाई

पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. 

शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.

शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

पहा पुरंदराचा तह

तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.

मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.

एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. 

अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना  ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर  हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. 

लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट  केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. 

शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता.
काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले.  कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते. 

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.

शिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती. मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.

ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.

महाराष्ट्रातील काही प्रागतिक विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी त्यांची इच्छा होती. हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती.

प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. शिवाजी महाराज हे कुणबी होते. त्यांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.

शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता. सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्टाचे जंगी स्वागत केले.

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.

गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊ मांसाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यानंतर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आदिलशाहीची फारशी भीती नव्हती, परंतु दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा येईल याचा नेम नव्हता. मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला; म्हणून त्यांनी दक्षिणेकडे मोहिमा करण्याचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट होते. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले. दक्षिण मोहिमेमागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता. 

शिवरायांच्या दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. 

चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला. त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना; तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकले. 

यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले : “परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पराक्रमाचा तमाशा दाखवावा.” 

कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली.

भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत.  इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.

ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.

तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.

आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.  इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.). अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते.  सरकारी जयंती तारखेनुसार असते.

शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.

शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.

भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.




#Article 147: मराठा साम्राज्य (937 words)


मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिणदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले.या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, म्हणून याला मराठी साम्राज्य असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली.  स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या (प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर तिसऱ्या लढाईत पराभूत झाला व  इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बिठूर येथे स्थायिक झाला (झाशीच्या राणीच्या काळात)

गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या क्षेत्रावर वचक ठेवणे हा मराठी साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे साम्भाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठी साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.

महाराष्ट्रात पुण्याजवळ राहणाऱ्या हिणदूमराठ्यांनी मुघलांना या भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतत्र करून घेतले. यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बऱ्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता. आणि उत्कृष्ट शासन पद्धती मांडली होती.

१६८१ मध्ये महाराजांचे ज्येष्ठ पुत्र  संभाजी राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपूत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या साऱ्या राजदरबाराला आणि ५,००,००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला.

अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील  छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८८ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही. जंजिय्राचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची माहिती दिली आणि  १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज फितुरीमुळे पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी शरण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली  व ते अधिक तीव्रतेने लढू लागले.

छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बंधू राजाराम हा नंतर राजा बनला. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबीज केले. याच काळात राजारामाचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे नर्मदेच्या पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि हैद्राबादमध्ये केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. १७०५ मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.

बादशहाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू, जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र (म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू) होता त्याला बहादुरशाहने सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य हळुहळू खिळखिळे होत गेले आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.

१७१३ मध्ये फारूख्सियार मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे सय्यद बंडा म्हणून ओळखले जात होते. ते अलाहाबाद आणि पाटणा येथील राज्यपाल होते. पण बादशहाबरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरुद्धच्या लढाईत सामील झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि गुजरात, माळवा इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.

ते १७३५ मध्ये राजस्थानात, १७३७ मध्ये दिल्ली आणि १७४० मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य फारच सैल पद्धतीने बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालील भागांची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, माळव्याचे होळकर यांच्यात करण्यात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईला बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि नागपूर ही तिची राजधानी बनली.

बाजीराव १७४० मध्ये वारला. शाहूने त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले. याच वेळी त्याचा भाऊ रघुनाथराव राज्य विस्तार करत पंजाबपर्यंत पोचला. १७६० मध्ये निजामाच्या पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.

मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.

१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहीही मिळाले नाही. इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओडिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.




#Article 148: काळ (504 words)


काळ आणि अवकाश ह्या दोन कल्पना भिन्न मानून आणि काळ ही गत क्षण, आत्ताच़ा क्षण, आणि भावी क्षण ह्या तीन संज्ञांनी निदर्शवलेल्या क्षणांची एक गूढ अनादिअनंत फीत असल्यासारखे समज़ून आपण माणसे हज़ारो वर्षे रोज़चे व्यवहार करत आलो आहोत, पण विसाव्या शतकाचा सुरवातीला अल्बर्ट आइनस्टाइनने प्रसिद्ध केलेल्या तौलनिक सिद्धांतानुसार काळ आणि अवकाश ह्या दोन कल्पना भिन्न नसून काळ-अवकाश ही एक संलग्न कल्पना आहे. (ह्या कल्पनेतल्या संलग्नतेच़े महत्त्व फक्त अतिसूक्ष्म आणि अतिविशाल घटनांच़ा विचार करतानाच़ तेवढे असते.) आइन्स्टाइनचा सिद्धांतानुसार काळ ही च़तुर्मितीय विश्वाचा चार मितींपैकी एक मिती आहे. उरलेल्या तीन मिती म्हणजे त्रिमितीय अवकाशाचा तीन मिती.

स्मृती आणि कल्पनाशक्ती ही माणसाचा अतिविकसित बुद्धीची दोन मुख्य अंगे आहेत. त्यांचामुळे गत काळ आणि भावी काळ ह्या दोन कल्पना आणि त्या काळांमधल्या घटनांसंबंधी विचार आपण माणसे आत्ताचा क्षणासंबंधित विचारांसमवेत करू शकतो आणि सतत करत असतो. असे असूनही आपण सगळे आपापली आयुष्ये अनुभवत असतो फक्त आत्ताचा क्षणी. प्रत्येक क्षणी आत्ताच़ा क्षण गत काळातल्या क्षणांचा महासागरात गूढपणे विलीन होऊन गत क्षण ही संज्ञा धारण करत रहातो, आणि त्याच क्षणी एक गूढ भावी क्षण आत्ताच़ा क्षण अशा संज्ञेने क्षणमात्र राज्यारूढ होतो! हा एक सगळा सृष्टीतला महान चमत्कार खास आहे, पण आयुष्य जगण्याचा रोज़चा धांदलींमधे आपणा बहुतेक माणसांना त्या चमत्काराची ज़ाणीव क्वचितच़ असते.

काळाची व्याख्या दोन भिन्न प्रकारे करण्यात येते. एक गणितातला अमूर्त काळ आणि दुसरा भौतिकशास्त्रातला मूर्त काळ. गणितात काळ ही गोष्ट वास्तविक अनेक मितींपैकी फक्त एक मिती आहे. भौतिकशास्त्रातल्या काळाचे मूर्त गुणधर्म गणितात अमूर्त रूपांत प्रदर्शित होतात. म्हणजे भौतिकशास्त्रातल्या काळाचे मूर्त गुणधर्म गणितात प्रच्छन्न रहातात.

मिती म्हणजे कोणत्याही वस्तूच़े/स्थितीच़े स्वरूप व्यक्त करण्यासाठी लागणारे विभिन्न परिमाण. विभिन्नता म्हणजे विशेष भिन्नता. पहा : गणितातील मिती. मितीची ही व्याख्या गणितातल्या काळाच्या व्याख्येला लागू आहे.

भौतिकशास्त्रातल्या काळाची (किंवा कालमितीची) व्याख्या अशी :

कोणत्याही वस्तूचा अवकाशस्थितीतला बदल दाखवते ती कालमिती.

घड्याळातल्या सेकंदकाट्याची हालच़ाल, हृदयातल्या ठोक्यांची हालच़ाल, ऋणविद्युद्रासायनिक हालच़ालींद्वारे आपल्या मेंदूत च़ाललेली हालच़ाल--विचारांची ये-जा-- वगैरे कुठल्या ना कुठल्या वस्तूतल्या बदलाचा --हालचालीचा-- निरीक्षणामुळेच़ काळ ह्या अमूर्त गोष्टीची कल्पना आपणा माणसांना शक्य होते. 

कोणत्याही वस्तूच़े तापमान -२७३ अंश सेल्सिअस ह्या काल्पनिक (जास्तीत जास्त) अंशावर उतरले आणि त्या वस्तूतली अंतर्भूत ऊर्जा पूर्णपणे संपुष्टात आली तरच़ त्या वस्तूची किंवा वस्तूतली हालच़ाल पूर्ण थांबणे शक्य आहे! रस्त्याचा कडेला पडलेला दगड ज़री आपल्याला अविचल भासला तरी त्या दगडाच़े तापमान -२७३ अंश सेल्सिअस अंशाहून खूपच़ जास्त असल्याने त्या दगडातल्या अंतर्भूत ऊर्जेपायी त्याचा आत प्रत्येक अणूची आणि प्रत्येक अणूचा आत ऋण परिंमाणूंसारख्या --electrons-- परिंमाणूंची हालच़ाल अविरत च़ालू असते! परिणामी ह्या विश्वातल्या प्रत्येक लहानमोठ्या वस्तूत कालौघात अविरतपणे च़ालू असलेला बदल हे एक (कालौघ संपेपर्यंतच़े आणि त्याबरोबरच़ प्रत्येक वस्तूतली ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईपर्यंतच़े!) शाश्वत सत्य आहे. 

ऊर्जा, काळ, अवकाश, वस्तुमान (द्रव्य, वस्तूतले अणुपरिमाणू) आणि गुरुत्वाकर्षण ही सृष्टीतली अगदी अविश्वसनीय अशी आश्चर्ये आहेत.

ऊर्जा, काळ, अवकाश, वस्तुमान आणि वस्तूंमधला अविरत स्थितिबदल ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा निगडित आहेत ते वरचा संक्षिप्त वर्णानातून प्रदर्शित होते. 

विश्वाची निर्मिती महास्फोटातून झ़ाली असा बऱ्याच़ विश्वघटनाशास्त्रज्ञांच़ा एक सिद्धांत आहे. पण त्या सिद्धांताबाबत अज़ून गूढे आहेत. महास्फोटापूर्वी वस्तुविश्वच़ अस्तित्वात नसल्याने काळही अस्तित्वात नव्हता असा निष्कर्ष ह्या सिद्धांतातून निघतो! महास्फोटाचा घटनेपूर्वी काळ अस्तित्वात नसावा आणि कधी काळी काळ संपुष्टात येईल ह्या कल्पना माणसाची मती गुंग करतात. (वास्तविक महास्फोटासारख्या कुठल्याही घटनेची कल्पना काळ ह्या गोष्टीचा कल्पनेवाच़ून अशक्य आहे!)

पहा :काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण .

पहा :कालमापन.




#Article 149: कालमापन (181 words)


कालमापनासाठी संदर्भादाखल नियमित अशी एकादी गती आवश्यक असते. गेली हजारो वर्षे कालमापनासाठी ग्रहभ्रमणाचा --विशेषतः पृथ्वीच्या परिभ्रमणाचा-- उपयोग माणसांनी केला आहे. प्राचीन काळी माणसांनी दिवस आणि रात्र ह्यांच्या जोडलेल्या कालव्याप्तीचे २४ समान भाग केले, आणि प्रत्येक भागाला तास (लॅटिन/संस्कृत : होरा) अशी संज्ञा दिली;  तासाचे ६० समान भाग करून प्रत्येक ६०व्या भागाला मिनिट (लॅटिन: मिन्युता) ही संज्ञा दिली. पुन्हा प्रत्येक मिनिटाच्या ६०व्या भागाला सेकंद (लॅटिन: सेकुंदा) ही संज्ञा दिली. २४ आणि ६० ह्या अंकांचे  २, ३, ४, ५(?), आणि ६ ह्या अंकांनी सहज पुनर्विभाजन होऊ शकते म्हणून प्राचीन बाबिलोनी संस्कृतीत २४ आणि ६० ह्या अंकांचा वापर लोकांनी बुद्धीची चमक दाखवून कालमापनासाठी केला. 

पृथ्वीच्या परिभ्रमणाखेरीज लंबकांदोलनांसारख्या इतर काही नियमित गतींचाही उपयोग लोकांनी कालमापनासाठी केला.

नव्या जमान्यात जास्तीत जास्त अचूकतेसाठी किरणोत्सर्जक सेझिअमच्या अणुकेंद्रक आणि सर्वात आतल्या इलेक्ट्रॉन कक्षेमधल्या चुंबकीय आंतर्क्रियेतील कंपनाचा उपयोग करण्यात येतो. बाहेरच्या इलेक्ट्रॉनकक्षांच्या आवरणामुळे रासायनिक, प्रकाशीय, किंवा विद्युत ह्यांसारख्या बाह्य गोष्टींचा ह्या आंतर्क्रियेवर काहीएक प्रभाव नसतो हे तिचे वैशिष्ट्य आहे. शिवाय अणूच्या मानाने ही आंतर्क्रिया प्रदीर्घ कालावधीची असल्याने ती प्रत्येक कंपनाचे मापन कमालीच्या अचूकपणेही देते. अशा ९,१९,२६,३१,७७० कंपनांचा कालावधी तो एक सेकंद अशी व्याख्या १९६४ साली तज्‍ज्ञांनी मुक्रर केली. 

पहा: काळ




#Article 150: नळदुर्ग (456 words)


 हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामधील  एक  किल्ला आहे. 
नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे.  

 हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे.
याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे धबधबा आहे त्यासाठीहि  हा किल्ला प्रसिद्ध आहे

सौजन्य:- मा.श्री.स्वप्निल मोटे.

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव लागते. तसेच हे नाव निजामशाही काळात देण्यात आले. नंतर नळ राजाने हा किल्ला काबीज केला व आलीयाबाद चे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले.

स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली.

सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्‍यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्‍या बंधार्‍यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्‍यामध्ये चार मजले आहेत. बंधार्‍याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे. बंधार्‍याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. शिलालेखात सांगितले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्‍यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत.

नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहळणीचा उपळ्या बुरूज, त्यावरील लांब तोफ, दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेंमुळे चांगलाच लक्षात रहातो.




#Article 151: प्रतापगड (595 words)


ही माहिती देणारे आकाश लंघे पाटील

प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक  किल्ला आहे.
                                   

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच  च्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात.आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा महाराजांचा  अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..

अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनचलेकिल्ल्यात बा प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून  पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
इतिहास-:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल १६८९ ते १० ऑगस्ट १६८९ पर्यंत वास्तव्यास होते, छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखान सोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली, नेत्रदीपक कामगिरी बजावली होती या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपती सोबत चिलखती प्रमाणे पुढे होते , 

इ.स.१६५६ ते इ.स १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रु पासुन अभेद्य राहिला.

१७ फुटाचा ब्रॉन्झ चा शिवाजी महाराजाचा पुतळ्याचे उदघाटन इ.स १९५७ पंडित. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.

उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हाबुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.या ठिकाणी इतिहास अभ्यासक, शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात. हे एक पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे. दर वर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रतापगड परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात .शूरता आणि गनिमीकावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते.जवळी खोरे कसे होते व आहे याचा उलगडा येथे गेल्यावरच होतो. 




#Article 152: सिंहगड (1151 words)


 हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक  किल्ला आहे.

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा आहे.स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकानुसार कौडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्य केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगर चे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ(नागा) नाईक यांच्या ताब्यात होता. 

इ.स. 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दक्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते.म्हणून त्याने कोळी साम्राज्यवर आक्रमण केले.त्यावेळी स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठी युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला त्यांनी तब्ब्ल 9 महिन्यपेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. तसेच सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे पुढे रसद तुटल्यामुळे किल्ला सोडून दिला. सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला. पुढे निझामशाही पर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता. 

  पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी  कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. 
पुढे इ. स. १६४७ मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इ.स. 
१६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी 
शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे 
उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र 
तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून 
भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत 
तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे 
शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले.पण जसं सगळ्यांना वाटतं तसं नही.सिंहगड हे नाव अधिपासुनच होते. 

पहा सिंहगडाची लढाई  गड आला पण सिंह गेला

या युद्धाबाबत सभासद 
बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 
'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५००  
माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री 
गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, 
गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन,  हाती तोहा बार 
घेऊन,  मशाल , चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, 
बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. 
एक प्रहर मोठे युद्ध  झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा 
त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक 
एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. 
मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला. 
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.  
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.

सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने 
फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. स. १३५०) महंमद तुघलकाने इ. स. १3२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या महादेव कोळी राजाच्या  ताब्यात होता.
अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख 
इ. स. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारासचे आहेत. इ. स. १६३५ च्या सुमारास 
कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ. स. १६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा 
सरदार मुधाजी मायदे याने लुटला. 
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.
दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी 
एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ. स. १६४७) कोंढाणा 
घेण्याचा प्रयत्‍न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला. 
इतिहासकार श्री.ग. ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग  घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत.  कै.ह. ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी
प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे..
शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उद्‌ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ. स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले.

सुभेदार तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. ‘सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. दरवर्षी माघ  नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे. 

स्वारगेट पासून ५० क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.




#Article 153: मुरुड जंजिरा (650 words)


              परस्तावना-1

रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर  आहे. राजपुरीहून या  किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

              प्रसतावना-2

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.

राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.

पुढे पिरमखानाच्या जागी बुर्‍हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्‍हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
जंजिर्‍याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

         परसतावना-3
जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे १९ बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'

असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.




#Article 154: शिवनेरी (527 words)


 किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक  किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.

शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे...

 

 

यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते.अशी नोंद आहे 
काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली. 

शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले.  [२]

गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.  भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटर.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो

पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या आरामदायक विनाथांबा बससेवेला शिवनेरी असे नाव दिलेले आहे.




#Article 155: विशाळगड (1632 words)


 हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक  किल्ला आहे.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. 

किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचिन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. मलिक रेहानच्या दर्ग्याला येणार्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव जेव्हा या भक्तांना होईल तोच सुदिन. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे.
इतिहास
इ.स. ११९०च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. (किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली.
इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रु व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा, नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत, तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले. या अमिषाला भुललेल्या मलिकने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविल्यावर प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडात/जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसर्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या लोळागोळा घालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की, जेथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते. त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोर्यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले. या प्रसंगाचे फेरिस्ताने केलेले तपशिलवार वर्णन मुळातूनच वाचायला हवे.

१४६९ साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करुनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो.यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लीम सत्तांकडे होता. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. ३ मार्च १६६० ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नविन बांधकामे केली. १६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले, परंतू पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला.

इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या.डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशूराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झूंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत.

इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.पहाण्याची ठिकाणेएस टी किंवा खाजगी वहानाने विशाळगडासमोरील वहानतळावर उतरल्यावर, वहानतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतू आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. या पूलावरुन विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन वाटा दिसतात. समोरची खड्या चढणीची शिडीची वाट, तर उजव्या बाजूची पायर्यांची फिरुन जाणारी कमी चढणीची वाट. आपण वर जाताना शिडीच्या वाटेने जाऊन उतरताना पायर्यांच्या वाटेने उतरावे. म्हणजे किल्ल्यावरील सर्व ठिकाणे पाहून होतात.शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायर्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायर्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जूनी फरसबंदी(दगडांची) वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर ५ मिनिटातच अमृतेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरा समोरील कड्यावरुन पडणारे पाणी कुंड बांधून आडवलेले आहे. मंदिरात पंचाननाची मुर्ती आहे. मंदिरावरुन तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलिकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. मंदिर पाहून पून्हा दर्ग्यापाशी दोन रस्ते फुटतात त्या ठिकाणी यावे.तेथून उजव्या बाजूच्या सिमेंटने बांधलेल्या पायर्यांच्या वाटेने ५ मिनिटात आपण भगवंतेश्वर मंदिरापाशी येतो. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नविन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहिर आहे. श्री हर्डिकर हे मंदिराची देखभाल पाहातात. त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे.
     या मंदिरात रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हार्याकडील पायरीवर मोडीलिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके१७०१, विशाळगड’ ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. प्रदक्षिणामार्गावर भिंतीत दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे आहेत. विठ्ठल मंदिराच्या लाकडी दरवाजावर व महिरीपीवर केलेले कोरीव काम पाहाण्यासारखे आहे.मंदिर पाहून जवळच असलेल्या पंतप्रतिनीधींच्या वाड्याकडे(राजवाड्याकडे) जाताना वाटेत एक मोठी चौकोनी पायर्यांची विहिर लागते. राजवाड्याचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे; प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक छोटेसे भूयार आहे. या भूयारातून (उंची ३ फूट) रांगत जाता येते. भूयाराचे दुसरे तोंड चौकोनी विहिरी जवळ आहे. राजवाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी गोल विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कमान असलेला, दिंडी दरवाजासारखा छोटा दरवाजा आहे.
     या विहिरीत महादेवाचे मंदिर आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहिर आहे. या विहिरीवरुन पुढे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो.हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे. येथे दुकानांची / हॉटेलांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे. या दरवाजाचा एक बुरुज व कमान शाबूत आहे. दरवाजाच्या बाजूने एक वाट वर चढत टेकडीवर जाते त्यास ‘रणमंडळ’ टेकडी म्हणतात. येथेच खालच्या बाजूस एक ८ फुटी तोफ पडलेली आहे. ती पाहून पायर्यांच्या वाटेने गड उतरण्यास सुरुवात करावी. वाटेत एका चौथर्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात; ती आहे राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. या शिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.
	

पुण्याहुन कराडला गेल्यालर पुढे पाचवड फाटा,तेथुन उजवीकडे वळल्यावर २० किमी वर शेडगेवाडी गाव लागते.डावीकडे वळल्यावर ४ किमीवर केकरुड गाव लागते.नंतर नदीवरील पुल ओलांडल्यावर लगेच उजवीकडे वळा.केकरुड घाट,मलकापुर ला कोल्हापुर रत्नागिरी हायवे वर आंबा गावातुन डावीकडे विशाळगडाकडे वाट जाते..

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. 
साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय, त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे. 

पुढे शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले.  हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर  संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच,पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून, ते विशाळगडाचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.

वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. चढताना ढासळलेला बुरूज दिसतात. साधारण ३० मिनिटे चालल्यानंतर माणूस गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. गडावर हजरत मलिक रिहान' यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.
किल्क्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे.

गडावर मलिक रेहान साहेब नामक अवलियाचा दर्गा आहे. हे एक जागृत देवस्थान असून दररोज बरेच मुस्लीम व हिंदू भावीक या दर्ग्याला भेट देतात. त्यामुळे गडावर भाविकांना किंवा पर्यटकांना निवासासाठी खोल्या सहज आणिणी वाजवी किंमतीत मिळतात.

गडावर मलिक रेहान दर्ग्याच्या अवतीभवती छोट्या मोठ्या भरपूर खानावळी व हॉटेले असू तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध होऊ शकते.

गडावर पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असून ती देखील उन्हाळ्यात आटते. उन्हाळ्यात स्थानिक ग्रामस्थ पांढरेपाणी किंवा आंबा गावातून पाणी आयात करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसते. परंतु पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष अडचण नाही. गडावरील बहुतेक दुकानांमध्ये किंवा हॉटेलात पिण्याचे पाणी मिळू शकते.

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात.

कोल्हापूर वरून गाडीने 3 तास




#Article 156: सज्जनगड (869 words)


सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक  किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैर्‌ऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. 

हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच आहे, तर पठारापासून १००० फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे.

प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला आश्वलायनगड म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली.  २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९,पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नैरससातारा म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे - 

सज्जनगड : सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटरवर सज्जनगड आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामीयांचे मंदिर आहे.  पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे.  किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामीयांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.  प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे.  अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती.  अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले.  शके १६०३ माघ नवमी (सन १६८२) रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले.  राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे.  मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.  भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.  मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे.  दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे.  माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.

आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. 

फार्सी वाचन :
दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद बिनाए दरवाज इमारत किलआ परेली  आमिर शुद बतारीख 3 
दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही

त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे :

ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीदवजा इमारत आहे, तर समोरच आंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.

गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर  श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. 

मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे.

राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. 
गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात.

गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते, साधारणत: १०० मीटर अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. 
कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.

सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो. 

सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ किलोमीटरवर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

एस.टी. महामंडळाच्या बसने साताऱ्याहून जाता येते.सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. 
कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे

गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. 
कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे




#Article 157: रामचंद्र गणेश कुंदगोळकर (240 words)


सवाई गंधर्व (१९ जानेवारी १८८६, २ सप्टेंबर १९५२) हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.

रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत.

व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते, त्यांना कसा वाव देते व मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांच्या शिष्यपरंपरेतील गायक/गायिकाच नव्हे तर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हनगळ, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळीत बाल गायक-नट म्हणून सुरू केली होती. तिथे त्यांना काही काळ सवाई गंधर्वांकडून प्राथमिक नाट्य संगीत मार्गदर्शन लाभले. त्यावेळी सवाई गंधर्व हे नाटक दौऱ्यांमध्ये अत्यंत व्यस्त असल्यामुळे मास्तरांनी पं. भास्करबुवा बखले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे समग्र शिक्षण घेतले.




#Article 158: गुरुत्वाकर्षण (869 words)


वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. 

गुरुत्वाकर्षण हे विद्युतचुंबकत्व आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतःप्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम आयझॅक न्यूटन यशस्वी ठरला. त्याने न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला.  गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता अल्बर्ट आइनस्टाइनच्या साधारण सापेक्षता सिद्धान्ताने घेतली आहे. न्यूटनचे नियम प्रकाशापेक्षा फार कमी वेग असणाऱ्या वस्तूंसाठी पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम अजूनही बहुतेक जागी लागू होतात.

विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे.

अ‍ॅरिस्टॉटलची अशी कल्पना होती की जड वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक वेगाने खाली पडतात. त्याच्या मतानुसार पृथ्वीचे केंद्र (जे विश्वाचेही केंद्र मानले जात होते) ते जड वस्तूंना आकर्षित करते. जेवढी वस्तू जड, तेवढे जास्त आकर्षण असते. ही कल्पना पुढे चुकीची असल्याचे सिद्ध झाले.

ज्यामुळे पृथ्वी सर्व वस्तू तिच्या पृष्ठभागावर ओढून ठेवते, आणि म्हणून सर्व विश्व सुरळीतपणे काम करते अशा पृथ्वीच्या केंद्राकडे ओढणाऱ्या बलाची कल्पना टॉलेमीला होती.

७व्या शतकामधील भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ह्याच्या मते पृथ्वी गोलाकार होती.  हा दृष्टिकोन तत्कालीन पृथ्वी सपाट अथवा पोकळ असल्याच्या पौराणिक दृष्टिकोनाच्या विपरीत होता. ब्रह्मगुप्ताने सांगितल्या प्रमाणे :

११व्या शतकातील गणितज्ञ भास्कराचार्याने आपल्या 'सिद्धान्त शिरोमणि' ह्या ग्रंथात लिहिले:
 आकृष्टशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखः स्वशक्त्या।
आकृष्ट्यते तत्पततीव भाति समेसमान्तान् क्व पतत्वियं खे॥

न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलप्रमाणे आहे:
वस्तुमान
थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक.
 
न्यूटनच्या ह्या सिद्धान्ताचा सर्वात मोठा विजय नेपच्यूनच्या शोधाच्या रूपात ठरला. यूरेनसच्या कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बॅं ल वेर्ये यांनी केली.

कमी वेग आणि ऊर्जा असलेल्या वस्तुमानांसंबंधित असापेक्षीय गणनांसाठी न्यूटनचा नियम जवळजवळ अचूक ठरतो.  हा नियम वापरून अंतराळयानांचे प्रक्षेपपथ सुद्धा बऱ्यापैकी अचूक काढणे शक्य आहे. असे असले तरीही सापेक्षीय गणनांसाठी ह्या नियमाने बरोबर उत्तर येत नाही. एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे बुध ग्रहाच्या कक्षेतील छोट्या विसंगती. १९व्या शतकाच्या अंतापर्यंत हे माहीत होते की बुधाच्या कक्षेतील जे काही क्षोभ होते ते न्यूटनच्या नियमाचा आधार घेऊन हिशेबात घेणे शक्य नव्हते, व म्हणून असे मानले जायचे की बुधाच्याहूनही सूर्याच्या जवळ एक प्रक्षोभकारी वस्तू असावी. ह्या वस्तूचा शोध निष्फळ राहिला. अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धान्ताने हे क्षोभ हिशेबात घेतले. परंतु असे असले तरीही बहुतेक जागी न्यूटनचाच नियम वापरण्यात येतो कारण तो वापरण्यात फार सोपा आहे आणि तो वापरून नीटनेटके उत्तरही मिळते.

समतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबून असते व वस्तूच्या स्वरूपाशी निरवलंबी असते. साधारण सापेक्षता सिद्धान्ताची सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धान्ताने होते, आणि अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) त्वरण लागत नाही, म्हणजेच ती  जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वतःच्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते.

आइनस्टाइनच्या मते गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या काल-अवकाशात निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या काल-अवकाशाला वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण.

मुक्त पतनात कोणतीही वस्तू वक्र काल-अवकाशात स्थानिकरीत्या सरळ पथावर चालते. ह्या पथांना अल्पिष्ट रेषा (geodesic) असे म्हणतात. जेव्हा वस्तूवर बल लागते, तेव्हा ती वस्तू त्या अल्पिष्ट रेषेपासून विचलित होते. उदाहरणतः आपण स्वतः जेव्हा पृथ्वीवर उभे राहतो तेव्हा आपण अल्पिष्ट रेषेपासून विचलित होतो. अश्या वेळी पृथ्वीचा भौतिक रोधामुळे आपल्यावर बल लागते, आणि म्हणून आपण स्वतःच जमिनीवर अजडत्वीय स्थितीत राहतो.

आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतेसाठीची क्षेत्र समीकरणे शोधून काढली.  ही समीकरणे वस्तुमानाचा काल-अवकाशातील वक्रतेशी संबंध जोडतात. ह्यांना आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे असे म्हणतात. ही १० एकसामायिक, अरेषीय विकलन समीकरणे आहेत. ह्यांच्या उकली म्हणजे काल-अवकाशाच्या दूरिक प्रदिशाचे घटक. दूरिक प्रदिश हा काल-अवकाशाची भूमिती रेखाटतो व त्याच्या मदतीने काल-अवकाशातील अल्पिष्ट रेषा काढू शकतो.

आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे खालीलप्रमाणे लिहिली जातात : 

या समीकरणांच्या काही उल्लेखनीय उकली खालीलप्रमाणे आहेत:

साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत. गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते.  . परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.

इतर ग्रहांसारखेच, प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावणारे पृथ्वीचेही स्वतःभोवतीचे गुरुत्व क्षेत्र आहे. हे क्षेत्र संख्यात्मकदृष्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला g किंवा g0 या अक्षराने दर्शवतात. वजन व मापांच्या आंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे:

 

ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वीजवळ पडणाऱ्या कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमापासूनच्या प्रत्येक सेकंदानंतर ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणात वाढते. 

न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीवरसुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेने लागणारे एक बल असते.  त्यामुळे पृथ्वी त्या वस्तूजवळ सरकते. पण वस्तूच्या तुलनेत पृथ्वीचे वस्तुमान फारच जास्त असल्यामुळे हे बल अतिशय किरकोळ असते.

फिरणाऱ्या पृथ्वीच्या संदर्भ चौकटीत असल्यामुळे, गुरुत्वाकर्षणाव्यतिरिक्त पृथ्वीवरील वस्तूवर एक अपकेंद्री बल सुद्धा लागू होते.




#Article 159: वसंतराव देशपांडे (148 words)


डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, इ.स. १९२० ; मूर्तिजापूर, ब्रिटिश भारत - जुलै ३०, इ.स. १९८३ ; पुणे, महाराष्ट्र) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.

वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

वसंतराव देशपांडे यांचा नातू राहुल देशपांडे याच्यात वसंतरावांचे बरेच गुण उतरले आहेत. 

डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या : 

 * संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे (पं. जयराम पोतदार)




#Article 160: भाऊबीज (181 words)


भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या  दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो. 

कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.
यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली.
आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.




#Article 161: बलिप्रतिपदा (278 words)


दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा  तिसरा दिवस असतो.  हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात.  या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले!  बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले

बलिप्रतिपदेतला बली हा दुष्ट असुर होता, शेतकरी नव्हता.तो राज्या होता त्याला विष्णूच्या वामन अवताराने मारले शेतकऱ्यांचा राज्या बळी राज्या आणि श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम आहे ,बलराम आणि बळी या दोन शब्दात खूप फरक आहे ल आणि ळ चा बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधीत्व करतात त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणूनच इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो अशी म्हण रूढ आहे!  ती फक्त बळी राज्या साठी आहे .

याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.

दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व !




#Article 162: दिवाळी लक्ष्मीपूजन (156 words)


दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी  केली जाते. 

अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
याखेरीज चलनी नोटा, नाणी,  सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.  

   

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे.

दिवाळी




#Article 163: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (458 words)


पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे  उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले.

पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरु सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरुबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरुभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता. 

हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडे व पु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले.

गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.

प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांच्या पचनी पडले नसल्याने महोत्सव पुन्हा एकदा  रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा संगीत महोत्सव होतो.

महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते.
कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली. 

रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या महोत्सवाचे स्वरूपही बदलले. पूर्वी तीन रात्री चालणारा हा महोत्सव न्यायालयाच्या आदेशानंतर चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला. 

महोत्सवाची सांगता पूर्वी स्वत: पंडीत भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली संगमेश्वर गुरव यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. 
उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी जमुना के तीर ची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते.

महोत्सवात हजारोंच्या संख्येने रसिक सहभागी होतात, हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध गावातून, तसेच परदेशातूनही ह्या महोत्सवासाठी रसिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.




#Article 164: पोळा (323 words)


पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’

हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,  गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर)  आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.
 त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.  

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.  




#Article 165: अनंत चतुर्दशी (255 words)


अनंत चतुर्दशी हा विष्णूच्या व्रताचा तसेच उत्सवाचा दिवस मानला जातो.

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.  हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा  आहे.
आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते. पांडवांना द्यूतात  हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत  करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात.कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील जळाला यमुना म्हणतात. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. नंतर दोरकाची प्रार्थना  करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात. जुन्या दोऱ्यांचे विसर्जन करतात. वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात.
या व्रतात सर्पपूजेचे  अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो.
हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात. पूजा करतात. हातात 'अणत' बांधतात.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य  स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करतात.

विष्णू 

गणेशोत्सव 




#Article 166: विजयादशमी (624 words)


  
विजयादशमी  म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला  दसरा  असेही म्हटले जाते.    देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.  आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या  सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे .  लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात.  सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. 

प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत.
ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्ये करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी होते.

श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या  वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. 
ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.
कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते. 

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.

घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना  झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.  

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.
 

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन  धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. 
लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.

आंध्र प्रदेश येथील विजयवाडा  येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.

महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. तेथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. 
संध्याकाळी  भवानी मंडपातून  मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज,  वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. 
शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.

म्हैसूर

चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात.संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

दसऱ्याच्या दिवशी सोन्याची (म्हणजे आपट्याच्या पानांची) देवघेव करून सायंकाळी उशिरा घरी यायची प्रथा आहे. त्यासंबंधीची एक प्रसिद्ध कविता : - 

सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।|
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ॥

शारदीय नवरात्र

दुर्गापूजा




#Article 167: गणेश चतुर्थी (353 words)


श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.
गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुुुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते.

गाणपत्य संप्रदायाचे हे एक  व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी  असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून  आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून  .तिचा 1 मित्र आहे एक चुहा  नदीतच  विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.

गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. 
श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा  केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात.   मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र  म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।  श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.
काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.

गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव  साजरा होत असतो.सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.     गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपतीबाप्पांचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभारावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, व्याख्यानाला कुणाला निमंत्रण द्यावे या विचारात दंग असतात.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरवात

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी  सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं.




#Article 168: दिवाळी (3312 words)


दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते. हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे.

उपलब्ध पुराव्यांनुसार  किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत  बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश  निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.

दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराणया ग्रंथात  या सणास दीपमाला असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीपप्रतिपदुत्सव असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात दिवाळी हा शब्द वापरला आहे.
भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दीपालिका म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख सुखरात्रि असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते.

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते याप्रमाणे-

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. 

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.

हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.

जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.

आख्यायिका -

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस  नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.
नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. 
 
वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. 

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर  स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते. 

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.

अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे.
भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि  राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला शुभा असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.

मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले असे मानले जाते.{१}
बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. 

भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची  जयंती म्हणून साजरा करतात.

दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. 

दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात.  शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. 

दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते. दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात.दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते. तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरीकही सहभागी होतात.

मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे.

१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... ||
२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा
आज मारील नरकासुरा,किसन देव 
३. गाई म्हशीने भरले वाडे 
दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो.
अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.

दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात. दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते.  
महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात. 

मी अविवेकाची काजळी।

फेडोनी विवेक दीप उजळी॥

ते योगिया पाहे दिवाळी॥

निरंतर॥  --  संत ज्ञानेश्वर  

१) साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥  .. संत तुकाराम

२) दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥ .. संत तुकाराम

३) तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥ --  संत तुकाराम  
 

आनंदाची दिवाळी।

घरी बोलवा वनमाळी॥

घालीते मी रांगोळी।

गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई  

सण दिवाळीचा आला।

नामा राऊळाशी गेला॥

हाती धरोनी देवाशी।

चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव  

मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो.

राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात.प्रतिपदेला  खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्‍या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.

पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.
सहावे गुरु हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात. 

दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.

उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.

नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.

गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.

दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.

हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.

या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात.  हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या वजनाचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात.

अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत.

सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.

पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुर्‍या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुर्‍यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुर्‍यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुर्‍या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल.

दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.

लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे  होणारे अपघात लक्षात घेवून संभाव्य  सूचना दिल्या  जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.

या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.

भारत, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो.

दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते.

लक्ष्मीपूजन

वसुबारस

नरक चतुर्दशी

भाऊबीज

आकाशकंदील




#Article 169: रंगपंचमी (200 words)


रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंग पंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो.

द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे.  तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत.

रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.

संपूर्ण भारतभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.

देशाच्या काही भागात  या सणाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात.
व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही आहे.

अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते.या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात.

फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.




#Article 170: महाशिवरात्र (262 words)


माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात  म्हणतात.  प्रत्येक  महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.  

संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे.  या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात.

दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शिवाचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य  आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.

काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात.पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.

शिव

 




#Article 171: होळी (1352 words)


होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे. या सणाला होळी पौर्णिमा असेही संबोधले जाते. 

ह्या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात.
फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव,आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंतोत्सव असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते.  एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पुतना ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या  प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला.  प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो.
कोकणात विशेषतः  रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.

फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.

पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाते पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते.

ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.

होल्टा होम-
कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.

कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात.. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात.  होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.

कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.

छोट्या गावचे व त्या त्या वाडीचे  देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.

गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवली जातात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सान’ असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो.
या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.

नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.

कोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण (चौथरा व छप्पर) देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.

रत्नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात.

देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात.

कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यांची वस्ती होती.स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’ च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो.धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही पाळतात.

भारतातील आदिवासी जमातीत हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून स्त्री-पुरुष उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते.

उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतातील खेडेगावांत होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटविली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.

बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात गौरपौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.

ईशान्य भारतात विशेषकरून मणिपूर मधील विष्णुपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.

या प्रदेशात एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात. राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.

गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो. 

होळी हा सण कवींच्या व गायकांच्या आवडीचा आहे. होळीवर अनेक मराठी-हिंदी गीते/ठुमऱ्या आहेत. त्यांपैकी काही : 




#Article 172: रथसप्तमी (192 words)


रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. 

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. 
या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे. 
सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात.तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात.  या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो. 
महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन/तीन दिवसांनी येते.

दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये या दिवशी ब्रह्मोत्सव  साजरा होतो. रथयात्रा काढली जाते. 

तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. 
बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतांत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.

याच दिवशी नर्मदा जयंती असते(?) यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.

मकरसंक्रांत 

सूर्य 

 




#Article 173: त्रिपुरारी पौर्णिमा (348 words)


कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. 
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. 

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते  तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून  आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे.  विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते.  महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले हरिहर भेटीचे चित्र प्रसिद्ध आहे.

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात. 




#Article 174: चंपाषष्ठी (217 words)


चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे  नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. 

कुलाचाराप्रमाणे  ज्यांच्या पूजेत  सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या  माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही |खंडोबाचा उत्सव असतो. 
घटाची स्थापना,नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे(एकभुक्त),शिवलिंगाचे दर्शन घेणे,ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे शा दिवस केले जाते. चंपाषष्ठी या  दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या  कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.खंडोबाची तळी भरून आरती करतात.

मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धती आहे. 

देव दिवाळी




#Article 175: कार्तिकी एकादशी (105 words)


कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. 

ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात.
चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशी!!! तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..




#Article 176: मकरसंक्रांत (1366 words)


मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय  संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.

मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणत.

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०

इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)

इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)

इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)

इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)

सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :- 

१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.

१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.

१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.

१६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)

१७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)

१८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)

१९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)

२० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)

२१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)

२२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)

२३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)

महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.

संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते.मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही.

संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.

मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू.  तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.

लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.

संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. 

कोलकाता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात.

दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.

............

मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।

तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।

(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी.

मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिनमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिीसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. 'फरगीविह ॲन्ड फरगेट' हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. 

महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे.

बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनवेल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात.

हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात.

दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे.

........

संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.

संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात.

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो.

पहा : कर्कसंक्रांती




#Article 177: कोजागरी पौर्णिमा (733 words)


कोजागरी पौर्णिमा किंवा बुद्ध  पौर्णिमा, हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो.   इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान  असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते. 

पण हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.आणि मध्यरात्री  (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे')  असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. 
मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.

बौद्ध पौर्णिमेस होणाऱ्याप्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.

सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।

या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.

या दिवशी चंद्र  पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.

या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते.  उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे.  या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र ,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात. 

ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.

विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष  उपासना केली जाते.

पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या  संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.  चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात.श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती.  वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन  वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष  उपासना केली जाते. 

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून,  लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.
.

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. 
घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)

दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.

भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो.

शरद ऋतू

शारदीय नवरात्र

 




#Article 178: दत्तजयंती (262 words)


दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. 

हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 

दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी,  कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत. श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.

दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया (अनुसया नव्हे!) यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे. श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले.  ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.
महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.

भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या  गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात. दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.

दत्त जयंतीच्या दिवशी, दत्ताच्या देवळात  भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते.
पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते. या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात. अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते.   केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते.




#Article 179: पंढरपूर (3784 words)


पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव  भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे.  पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव 'पंडरगे' असे आहे. मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे. 

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.  या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात. .हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत

पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितांत पौंड्रीकपूर- पुंडरिकपूर- पंढरपूर- पंढरी- पंडरिगे- पंडरगे अशा विविध नावांनी ओळखले जाते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.  या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.

पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा  मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे.  म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!)  दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो. डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते. शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. 'स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा 'लानमडू' हळूहळू वाढत गेला. शके ११५९ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली.आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाला.विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला, अशीही कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्त, तसेच इतर जातिधर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान्न ‘पुरणपोळी’च विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे.

भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.

भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 'नमामि चंद्रभागा अभियान' हाती घेतले आहे. यामध्ये भीमाशंकरपासून ते रायचूरपर्यत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.  त्याच बरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वछता, नदीकाठी वृक्ष लागवड अश्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न आहे, अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे.

पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा  मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे.  म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!)  दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो.

पंढरपूरची लोकसंख्या २३७४४६ (२०११) इतकी आहे.

पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे.  हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणाऱ्या बस वाहतुकीची सोय आहे.

पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.

देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैनधर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवतास सूर्याचा अंशही मानतात.

पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळातील घुसळखांब घुसळल्याशिवाय जात नाही. चार प्रमुख एकादश्यांना (आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री) आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात.

या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात. येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांची खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात, असे सांगितले जाते. .विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.

चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलीक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेलपट्टी वगैरे पुरातन चुनेगच्ची नक्षीकाम आहे . 

मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवऱ्यांत सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.

चौखांबीच्या दरवाजास चांदीचे नक्षीदार पत्रे लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. 

देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते.  सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असते.

विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या ह्क्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत; आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते, तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.

नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.

त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.

चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर ५१६ मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून, होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठलदेवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामघील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कडूर तुलाक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. 'चौऱ्याऐंशीच्या  शिलालेखा'त (१२७३) पंढरपुरास फागनिपूर व विठेबास विठ्ठल किंवा विठल म्हटले आहे. १२६० ते १२७० च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. १२५८ च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचरिते ग्रंथात पंढरपूर, विठ्ठल मंदिर व तेथील गरुड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या १३११ च्या मराठी शिलालेखात पंडरिपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.

विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या  लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा सांधला जातो.
विशेष म्हनजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती होय.

टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.

चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.

इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.

या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
 महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे हे श्रद्धास्थान आहे.गरिबापासून श्रीमान्तापायंत सार्वजन दरवर्षी मनोभावे इथे भेट देतात.

पंढरपुर हे महाराष्ट्रचे एक सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे  तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये  आहे.भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते.
आषाढ महिन्यात इथे जवळ जवळ ५ लाखापेक्षा जास्त लोक पंढरपूर यात्रेमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून पताका  घेऊन या ठिकाणी पायी चालत येतात. येथील नगरपालिका १८५८ मध्ये स्थापन झाली असून गावास शुद्ध पाणीपुरवठा, अग्‍निशामक सेवा, घरगुती, औद्योगिक, व्यापारी आणि सार्वजनिक उपयोगांसाठी वीज इ. सोयी आहेत. गटारे उघडी असून संडास सफाई भंग्यांमार्फत व मैलावाहतूक ढकलगाडी व ट्रॅक्टरमार्फत होते. यात्रेच्या दिवसांत सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखणे हे एक आव्हानच असते. सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळीही घाणेरड्या गल्ल्या साफ करवून घेण्याबद्दल व त्यासाठी हलालखोरांस घर पाहून दरमहा एक-दोन पैसे देण्याबद्दल हुकूम झाला होता. गावात नऊ रुग्णालये व २११ रुग्णशय्या, दोन शुश्रूषागृहे व ६० रुग्णशय्या, २० दवाखाने व कुटुंबनियोजन केंद्र आहे. यांशिवाय यात्रेच्या वेळी खास वैद्यकीय सोयी आणि रोगप्रतिबंधक व्यवस्था केली जाते. गावातील ५७-६ टक्के लोक साक्षर व शिक्षित असून पुरुषांपैकी ७० टक्के स्त्रियांपैकी ४४.१ टक्के साक्षर व शिक्षित आहेत. येथे वाङ्मय, विज्ञान व वाणिज्य शाखांचे एक महाविद्यालय, आठ माध्यमिक शाळा, २८ प्राथमिक शाळा, चार इतर (टंकलेखन, लघुलेखन व व्यावसायिक) शाळा, एक सार्वजनिक वाचनालय तसेच तीन चित्रपटगृहे आहेत. गावात १९७१ मध्ये  ५,४०७ राहती घरे व ९,८३८ कुटुंबे होती. तसेच ५३,६३८ लोकसंख्येपैकी २७,९७२ पुरुष व २५,६५६ स्त्रिया, अनुसूचित जातींचे २,५६४ पुरुष आणि २,२,६७ स्त्रिया, अनुसूचित जमातींचे ४८ पुरुष व ४४ स्त्रिया होत्या.

गावात पक्के रस्ते ३४.५३ किमी. व कच्चे रस्ते १.५३ किमी. असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोळ आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजीपंत,  संत गाडगे महाराज, बंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटगे महाराज इत्यादीचे मठ व धर्मशाळा आहेत.

गोरक्षण, अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडलिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय इ. संस्था येथे मोलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलिसठाणे आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्या यांचा मोठा बाजार असतो. येथे आठ बॅंका व दोन कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, खण, बांगड्या, तुळशीमाळा, अष्टगंध यांचा चांगला खप होतो. वारकऱ्यांस लागणारे टाळ, मृदंग, चिपळ्या इ. वस्तूही येथे मिळतात.

(इ.५ वी ते १० वी )पर्यंतची शाळा. याची एक शाखा सुस्ते येथे आहे.(  श्री दत्त विद्या मंदिर सुस्ते)

विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वात प्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदिर सुमारे २०० मीटरवर आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १०७ मीटर व दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ५२ मीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत.

पंढरपुरात गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशी विश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे.  १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेशमंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मीमंदिर आहे. ओवरीत नारदाची व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.

पंढरपूरचा वारसा जपणे, तेथील मठ, फड, मंदिरे यांचा इतिहास शोधणे यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. सदानंद मोरे आणि  वा. ल. मंजूळ यांच्याकडे हा एक प्रकल्प सोपविला होता. २०१५ सालच्या जुलै महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याचे तपशील ग्रंथरूपाने लोकांसमोर येत आहेत.

सर्वसामान्यांना पंढरपूर घरबसल्या दाखवणारी ‘पंढरपूर आणि श्री विठ्ठल’ ही दूरदर्शनवर नव्याने सुरू होणारी मालिका आकार घेत आहे. त्यामध्ये १) पुराणकालीन कथा भाग, २) संतांची कामगिरी, ३) सामाजिक प्रबोधन असे तिहेरी स्वरूप आहे. त्या दृष्टीने काही मंडळी काम करीत आहेत.

भीमा की चंद्रभागा, तिचा इतिहास, आजचे स्वरूप, तीर्थस्वरूप होण्यासाठी काय करणे आवश्‍यक याचा सखोल विचार महाराष्ट्र सरकारच्या इरिगेशन खात्यातर्फे ‘भीमा सर्वेक्षण’ हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे, त्यामुळे तिच्या काठावरची सर्व क्षेत्रे लोकांसमोर (क्रमशः उगमापासून कृष्णेला मिळेपर्यंतची) येणार आहेत. यासंबंधी प्राथमिक विचार चालू आहे.

या खेरीज पंढरपूरचा क्षेत्रीय वारसा, तेथील वास्तू, नगररचना, लोकजीवन, विविध कला आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सिंहगड कॉलेजच्या पदव्युत्तर वास्तू विभाग (एम आर्किटेक्‍चर डिपार्टमेंट) आणि भोपाल - मध्य प्रदेशच्या एस.पी.ए. कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१५ हे चार महिने काम केले. अठरा विद्यार्थ्यांनी प्रा. वैशाली लाटकर (पुणे), प्रा. विशाखा कवठेकर (भोपाळ) आणि प्रा. रमेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अवघड काम केले. नाव ‘वास्तुशास्त्रीय अभ्यास’ असले तरी क्षेत्र पंढरपुराचा सर्वांगीण अभ्यास जो आजवर कधीच केला गेला नाही, तो या वर्षी त्यांच्या हातून घडला.

या प्रकल्पामध्ये पंढरपुरास येणाऱ्या भाविकांची वाढलेली संख्या, त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, या सुविधा पुरविताना येणाऱ्या अडचणी, ते कार्य करताना क्षेत्राचा समृद्ध वारसा जपणे, केवळ ऐतिहासिक - धार्मिक - सामाजिक वास्तू, वाडे, बाजार, नदीवरचे घाट, परंपरा सांभाळणाऱ्या गल्ल्या-बोळ, तेथील लहान-मोठी मंदिरे या सर्वांचा वास्तुविषयक अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला. जो लवकरच म्हणजे वारीच्या काळात प्रदर्शन रूपात पुणेकरांना पाहावयास मिळेल.

पंढरपुरातील छोटे उद्योग कुंकू-बुक्का-अष्टगंध, उदबत्ती तयार करणारे कारखाने, तुळशीच्या माळा आणि लाखेच्या बांगड्या तयार करणारे कारागीर, जुने ऐतिहासिक वाडे, जवळपासचे पंचक्रोशीतील मंदिरे, त्यांचा इतिहास, धार्मिक महत्त्व आदी गोष्टी महत्त्वाच्या मानून, त्याचा या प्रकल्पात सविस्तर अभ्यास केला गेला आहे.

वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरमधील मठ, फड आणि दिंड्यांचा ग्रंथबद्ध इतिहास प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांनी एका प्रकल्पाद्वारे केला असून त्यांना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा, काíतकी एकादशी, चत्री आणि माघी एकादशीनिमित्त वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी ज्या वास्तू अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, त्यांना ‘मठ’ अशी संज्ञा आहे. तसेच या भौतिक रचनेपलीकडे जाऊन, तत्त्वज्ञानाच्या आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला ‘फड’ असे म्हटले जाते. पंढरपूरमध्ये असे अनेक मठ आणि फड अस्तित्वात आहेत. त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरीही आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा मठ, फड आणि दिंडय़ा यांचे महत्त्व आहे. त्यामुळे मठ-फडांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा, ही कल्पना सर्वप्रथम ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. ग. हर्षे यांना सुचली होती. तसा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला होता. पण, त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. डॉ. हर्षे यांनी सुरू केलेल्या कामाचे तपशील वा.ल. मंजूळ यांना उपलब्ध झाले आणि त्यात मोलाची भर घालून त्यांनी पंढरपूरमधील मठ-फडांचा-दिंड्यांचा इतिहास शब्दबद्ध केला.

पुणेकर संशोधक डॉ. वैशाली लाटकर यांनी ‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ असा  संशोधन प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करत आणला आहे. (मार्च २०१७ची बातमी).

डॉ. वैशाली लाटकर या कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट असून त्या या प्रकल्पावर  पाच वर्षे काम करीत होत्या.  त्या पाच वर्षांत त्यांनी पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू, मंदिरे, मठ, फड आणि घाट यांचा स्थापत्त्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास केला. पंढरपुरात यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट आणि फड यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. तो जसा लिखित स्वरूपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार असणाऱ्या म्हणजे तत्कालीन वास्तूंच्या स्वरूपात आढळतो.  वास्तुसंवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम करताना डॉ. वैशाली लाटकर यांनी पंढरपुरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तूंचा प्रामुख्याने विचार केला. त्यांमध्ये मंदिरे, मठ, फड, जुने वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. त्यांच्या मते, फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते. पुराण वाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. ह्या वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू आणि हस्तलिखिते यांचे जतन केलेले आहे. हे सारे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत, मात्र ते कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत, असे त्या म्हणतात. त्या वास्तूंचा स्थापत्त्याच्या अंगाने अभ्यास आता झाला आहे.

पंढरपूरचे माहात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-

आदि शंकराचार्यानी आठव्या शतकात ‘पाण्डुरंगाष्टक’ रचून- महायोग पीठे तटे भीमरथ्याम्। वरं पुण्डरिकाय दातुंमुनिंद्रै:।। विठ्ठलाला आठव्या शतकात नेले. त्यानंतर संस्कृतमधील ‘स्कंद’ आणि ‘पद्म’ पुराणातील पांडुरंग माहात्म्ये अभ्यासकांसमोर आली. या लोकप्रिय दैवतावर विविध भाषांतून माहात्म्ये लिहिण्याचा नंतर प्रघात पडला. त्यामध्ये आज उपलब्ध छापील हस्तलिखित स्वरूपामधील माहात्म्ये अशी-

१) गोपाळबोधाचे पंढरी माहात्म्य (काळ इ.स. १६५०/१७४०), २) बाळक व्यासकृत पांडुरंग माहात्म्य (कन्नड कवी; काळ मिळालेला नाही), ३) कन्नड कवी गुरुदास रचित पांडुरंग माहात्म्य (काळ इ.स. १६५० च्या सुमारास), ४) अनन्तदेव कृत (धुळ्यात हस्तलिखित, बारा अध्याय; काळ नाही), ५) रुद्रसुतरचित पंढरी माहात्म्य (काळ नाही, २३० ओव्या), ६) प्रल्हादबुवा बडवे विरचित पंढरी माहात्म्य (काळ शके १६४०पूर्वी) ७) तेनाली राम (आंध्रातील विकट कवी; तेलगू भाषेत, (काळ इ.स. १५६५ म्हणजे सर्वात जुने), ८) श्रीधरस्वामी नाझरेकर (मराठीतील विख्यात संतकवी रचना- इ.स. १६९०), ९) लोहदंड ऊर्फ पंढरपूरची कैफियत (मूळचे तमीळ भाषेतील, मद्रासच्या ओरिएंटल इन्स्टिटय़ूटमध्ये मिळाले. मोडी लिपीत लिहिलेले, काळ १८०७), १०) बाल मुकुंद केसरीचे पांडुरंग माहात्म्य (बडोद्याच्या प्राच्य विद्या संस्थेत आहे. काळ नाही.), ११) मराठीतील महिपतिबुवा ताहराबादकर (कांबळे) यांचे शके १६७८ मध्ये रचलेले, १२) संत नामदेवांचे अभंगात्मक पांडुरंग माहात्म्य, १३) दत्तवरदविठ्ठल (पेशवेकालीन कवी, नगर जिल्हा, जयकर ग्रंथालयात हस्तलिखित, काल १७४८-१७९८ इसवी), १४) हरि दीक्षित रचित पांडुरंग माहात्म्य (७ पृष्ठे फक्त उपलब्ध), १५) गिरीधर कवी रचित पंढरी माहात्म्य (८ पृष्ठे, अपूर्ण ग्रंथ), वगैरे.

पंढरपूर हे मराठी लेखक द. मा. मिरासदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचे जन्मस्थळ आहे.

११ नोव्हेंबर १९४७ रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त झाले. साने गुरुजींनी त्यासाठी महात्मा गांधीचा विरोध पत्करून सत्याग्रह केला.

पंढरपूर शहर हे महाराष्ट्राशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. पूर्वी येथे मीटरमापी लोहमार्ग होता. नंतर  त्यावेळी मालगाडीतून वारकऱ्यांना आणले जाई. पुढे, मिरज-कुर्डुवाडी हा लोहमार्ग परिवर्तित होऊन रुंदमापी झाला. इ.स.२०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर-लोणंद रेल्वे fecocaofereaमार्गासाठी अर्थिक तरतूद केली गेली. प्रलंबित असलेल्या पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचे कार्य आता सुरू होत आहे. पंढरपूर हे गाव सोलापूरला बसमार्गे जोडलेले आहे.पंढरपूरला जवळपास विमानतळ
सोलापूर येथे आहे.

५. 




#Article 180: शिर्डी (572 words)


शिर्डी  हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.

शिर्डीला साईनगर देखील म्हणतात, हे शहर वेस्टर्न सीशोर लाइन (अहमदनगर - मनमाड रोड) या व्यस्त मार्गाच्या पूर्वेस १८५ कि.मी. आहे,

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर (संस्था) आहे. 

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार शिर्डीची लोकसंख्या, ३६००४ होती. पुरुष लोकसंख्येपैकी ५३% आणि महिला ४७% आहेत. शिर्डीचा सरासरी साक्षरता दर ७०% आहे, जो राष्ट्रीय प्रमाना पेक्षा ५९. ५ % जास्त आहे: पुरुष साक्षरता ७६% आहे, आणि महिला साक्षरता ६२% आहे. शिर्डीमध्ये, लोकसंख्येपैकी १५% लोक 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत 

शिर्डीत आता साईनगर शिर्डी नावाचे एक नवीन रेल्वे स्थानक आहे, जे मार्च २००९ मध्ये कार्यरत झाले.

२०११ पर्यंत शिर्डीत चेन्नई, मुंबई, विशाखापट्टणम, काकीनाडा, हैदराबाद म्हैसूर व इतर शहरांमध्ये / राज्यांत शिर्डी रेल्वे स्थानक टर्मिनल थांबे म्हणून आहे.१ ऑक्टोबर २०१७ रोजी शिर्डी विमानतळाचे उद्घाटन भारताचे अध्यक्ष श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. शिर्डी विमानतळापासून तीन विमाने निघतात, एक दिल्ली विमानतळ, एक हैदराबाद विमानतळ आणि दुसरे मुंबई विमानतळ. शिर्डीच्या दक्षिण-पश्चिमेस १४ कि.मी. अंतरावर काकडी (कोपरगाव तालुका) येथे विमानतळ हे आहे. परंतु मूळ योजनांनुसार बांधकाम फेब्रुवारी २०१६ मध्ये पूर्ण झाले आणि पहिल्या ट्रायल फ्लाइटने २ मार्च २०१६ ला उतरविले. धावपट्टी २२०० मीटर ते ३२०० मीटर पर्यंत वाढवण्याची योजना आहे. लक्ष्यपूर्तीची तारीख २०१७ किंवा २०१८ आहे. शिर्डीपासून अनुक्रमे औरंगाबाद आणि पुणे येथे सर्वात महत्त्वाची विमानतळ आहेत.

शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.
 
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.

आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१९ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.

शेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़. १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची  स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़

याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.

शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी.आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे. शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी  बहुतेक गाड्या आहेत.शिर्डीला विमानतळ झाले आहे.

शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी.आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.कोपरगावपासून शिर्डी केवळ १५ कि.मी. आहे. श्रीरामपूर पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे ३५ कि.मी.आहे.




#Article 181: देहू (130 words)


देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते.

देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडा वर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे 




#Article 182: आळंदी (370 words)


महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत.  ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. 

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पहा.) 

ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. 

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला  ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.

चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते.  त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.हे तीर्थक्षेत्र आहे .

आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत. मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही. 

स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.

एकोणीसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते. या ग्रंथाची हाताने लिहिलेली नकल प्रत डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे.

आळंदी मधील धर्मशाळेच वेगळे वैशिष्ट्यपूर्ण  कार्य म्हणजे वारकरी सांप्रदायिक धार्मिक  शिक्षणासाठी आलेल्या शिकाऊ विद्दार्थी वर्गाला शिक्षणसाठी विनामुल्य सोय करणे.

देविदास धर्मशाळा गोपाळपूर 

फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

घासवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

मुक्ताबाई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

माहेश्वरी धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

आगरी धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड

डबेवाले धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड

हरिहर महाराज धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड

विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगांव रोड

पाषाणकर धर्मशाळा

माई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे :-




#Article 183: तुळजापूर (918 words)


तुळजापूर  हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात.

तुळजापूर हे  उस्मानाबाद जिल्ह्यातल्या  तुळजापूर तालुक्यातील १५५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९९ कुटुंबे व एकूण १३९२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर तुळजापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७२५ पुरुष आणि ६६७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २०० असून अनुसूचित जमातीचे ४४ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६१५३४  आहे.

सोलापूर श्हारापुस्न जवळपास ४५ किलीमितर अंतरावर आहे.  तुळजापूर कानडा भाविक मोठ्या प्रमाणात येतो.  सोलापुरातून जनासाठी एस टी ची सोय आहे.

तुळजापूरची तुळजाभवानी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.
        
उस्मानाबाद - तुळजापूर अंतर 22 कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. रेल्वे ने सोलापूर किवा उस्मानाबाद ला येवु शकता तेथून बस चालू आहेत. 

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे ५००० इतकी होती.

भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.

या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे. हे पाच मजली इमारत असून धर्म दर्शन व मुख दर्शन अशे भाग केले आहेत. 

गाभा-याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो.देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)

तुळजाभवानी दसरा महोत्सव मध्ये देवीच्या आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात. भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक 
वेळा नगर वरुण पलंग येतो. 
       
सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती ,शंकराची स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.
येथील काही प्रेक्षणीय स्थळे:-

देवीच्या मुर्ती वर सुंदर नक्षी असुन डाव्या हाताच्या करंगळी ने रमला मार्ग धावले हे मुर्ती वर दिसुन येते. याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.

      
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.एक आकर्षण करून घेणार देवस्थान 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली, अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती. रामदास स्वामी हे देखील उपासक होते.

तुळजापूर ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):




#Article 184: संयुक्त महाराष्ट्र चळवळ (1421 words)


स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला  होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

इ. स. १९३८ रोजी पटवर्धन  व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला.
स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.

डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण  १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजीझाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.


#Article 185: थालीपीठ (249 words)


थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालीपीठ , शिंगाड्याचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, तांदळाचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ , गव्हाचे थालीपीठ
सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालीपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे  एकत्र करूनही थालीपीठ बनवता येते. असा हा थालीपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.

प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले  ‍इत्यादी वापरावयाचे असल्यास, नीट धुवून बारीक चिरून घ्यावे.

कणिक घेऊन त्यात भरपूर मोहन (गोडेतेल)घालावे.   वरील सर्व वस्तू आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.  मग पाण्याने कणीक अशा प्रकारे भिजवावी की त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. तव्यावर थोडे तेल घालून त्यावर गोळा थापा. वरून थोडा पाण्याचा हात लावून सारखे करा. मंद आचेवर शिजू द्या नंतर उलथवून(?) पुन्हा थोडे तेल घाला व शिजू द्या.

खायला देताना सोबत लोणच्याचा रस्सा(?)/टोमॅटो सॉस द्या.

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ‌

साहित्य

२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी

१०० ग्राम उपवासाची भाजणी

५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा जिरेपूड

चवीप्रमाणे साधे/सैंधव मीठ

आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल

कृती:

प्रथम उकळलेल्या/शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घ्यावी.   एका परातीत/बाउलमध्ये साल काढलेली रताळी कुस्करून एकजीव करून घ्यावी. . आता एकजीव केलेल्या रताळ्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे. वरील मिश्रणात सामावेल तशी उपवासाची भाजणी घालत जाऊन, मिश्रणाचा एकसंघ गोळा होईपर्यंत मळावे. मळलेल्या मिश्रणाचे लिम्बापेक्षा किंचित मोठे गोळे करावे आणि पोळपाटावर प्लास्टिक टाकून त्यावर थोडे तूप/तेल लावून थालीपीठ थापावे . गरम तव्यावर तूप/तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावे.

सर्व कडधान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालीपीठ करावे.  पौष्टीक लागते.(?)




#Article 186: पुरणपोळी (324 words)


पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे.
देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा सणाच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी  लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता  पुरणपोळी करत.(पोळी/पुरणाची पोळी ,गुजराती: પોળી, तमिळ: போளி पोली, कन्नड: ಹೋಳಿಗೆ ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु या बोब्बाटु या बोब्बाटलु या पोलेय्लु, भाकशालू).

मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये  वेगवेगळी पद्धत आहे.

महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात . 

पुरणपोळी तूप, ताक, दुध, गुळवणी किवा कटाची आमटी ह्या सोबत खातात. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटक मध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.

साहित्य—

अपवाद : गुजरात मधे तूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.
काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात. पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि पापड हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात. जेवताना ताटात गरमागरम पुरण पोळी गुळवणी ' 'आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. कटाची आमटी कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .




#Article 187: महाराष्ट्रातील उपवासाचे खाद्यपदार्थ (112 words)


धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रद्धा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने त्या दिवशी उपवास करतात. कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवडयातून एकदा सोमवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी असे उपवास करीत असतात. उपवासाच्या दिवशी काही खास पदार्थ खाण्याची परवानगी असते. रोजच्या जंवणातल्या पदार्थापेक्षा वेगळया वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू - पोटाला विश्रांती देणे - दूरच राहून 'एकादशी दुप्पट खाशी' अशी वस्तुस्थिती असते. उपवासाचे पदार्थच तितके चविष्ट असतात हे त्यामागचे खरे कारण. त्यामुळे उपवास नसतानासुद्धा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ हल्ली हॉटेलांमधूनही वर्षभर मिळतात. बटाटा, शेंगदाणे, रताळी, राजगिरा, वरई वगैरे वापरून केलेले पदार्थ हे खास महाराष्ट्रीय उपवासाचे पदार्थ समजले जातात.




#Article 188: राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत) (217 words)


भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. 
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

India is my country.

All Indians are my brothers and sisters.

I love my country and, I am proud of it’s rich and varied heritage.

I shall always strive to be worthy of it.

I shall give my parents, teachers and all elders respect and treat everyone with courtesy .

To my country and my people, I pledge my devotion.

In their well being and prosperity alone, lies my happiness.

Jai Hind !

इंडिया इज़ माई कन्ट्री।

ऑल इंडियन्स् आर माई ब्रदर्स् ऐंड सिस्टर्स्।

आई लव माई कन्ट्री ऐंड आई ऐम प्राउड ऑफ़ इट्स् रिच ऐंड वैरीड हेरिटेज।

आई शैल ऑल्वेज़ स्ट्राइव टू बी वर्दी ऑफ इट।

आई शैल गिव माई पैरेंट्स, टीचर्स एंड ऑल एल्डर्स, रेस्पेक्ट एंड ट्रिट एवरीवन विथ कर्टसी।

टू माय कंट्री एंड माय पीपल आई प्लेज माई डिवोशन।

इं देयर वेल्बींग एंड प्रॉस्पेरिटी अलोन लाइज़ माई हैप्पीनेस।

जय हिन्द!




#Article 189: गंगा नदी (2966 words)


गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा..जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते .अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात.

गंगा नदी (इंग्रजीत Ganges) ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी ही भारतातील  मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड  राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. 

हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेले आहे.  गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर,  मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.

अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७ चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.

यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते. 

डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगेतिल डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत.
गंगा नदीमधील विरघळलेला प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे.

गंगा नदीची मुख्य शाखा भागीरथी आहे, ही गढवाल मधील हिमालयातील गौमुख नावाच्या ठिकाणी गंगोत्री हिमनदी (गुरुकुल) पासून उगम पावते. या गंगेच्या उगमस्थानाची-गौमुखाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४० मीटर आहे. येथे गंगेचे मंदिर आहे. शहराच्या उत्तरेस १९ कि.मी. उंचीवर गंगोत्री तीर्थ हा हिमनदीचा उगम ३८९२ मी. उंचीवर आहे. हा हिमनग २५ किमी लांब, ४ किमी रुंद आणि सुमारे ४० मीटर उंच आहे. या हिमनदीतून भागीरथी छोट्या लेण्यासारख्या मुखातून अवतरते. या पाण्याचा स्रोत ५००० मीटर उंचीवर वसलेले खोरे आहे. या खोऱ्याचे मूळ पश्चिम उतारातील संतोपंत शिखरावर आहे. गौमुखकडे जाणाऱ्या मार्गावर, चिरबासा गावातून ३७०० मीटर उंच विशाल गौमुख हिमनदीचे दृश्य दिसते. या हिमनदीत नंदा देवी, कामत पर्वत आणि त्रिशूल पर्वत येथील हिम वितळतो. जरी अनेक छोटे-छोटे प्रवाह गंगा घेण्यास हातभार लावत असले तरी 6 मोठ्या आणि 5 उपनद्यांचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व जास्त आहे. अलकनंदा (विष्णूुगंगा)च्या उपनद्या आहेत - धौली, विष्णुगंगा आणि मंदाकिनी. विष्णुप्रयाग येथे धौलीगंगा अलकनंदाला भेटते. हे ठिकाण १३७२ मीटर उंचीवर आहे. मग २८०५ मीटर उंच नंदप्रयागमध्ये अलकनंदा नदीचा संगम नंदाकिनी नदीसह होतो. यानंतर, कर्णप्रयागमध्ये, अलकनंदाचा कर्णगंगा किंवा पिंडर नदीचा संगम आहे. त्यानंतर ऋषिकेशपासून १३९ किमी अंतरावर असलेल्या रुद्र प्रयाग येथे अलकनंदा मंदाकिनीला भेटते. यानंतर भागीरथी आणि अलकनंदाची भेट देवप्रयाग येथे १५०० फूट अंतरावर होते, आणि येथून गंगा नदीच्या नावाने हा एकत्रित जलप्रवाह वाहतो. या पाच प्रयागांना एकत्रितपणे पंचप्रयाग म्हणतात. अशाप्रकारे गंगा नदी २०० कि.मी.चा अरुंद डोंगराळ मार्ग बनल्यानंतर ऋषिकेशच्या द्वारे गंगा पहिल्यांदाच हरिद्वारच्या मैदानी भागाला स्पर्श करते.

हरिद्वारपासून सुमारे ८०० किमी मैदानी प्रवास करून गंगा बिजनौर, गढ़मुक्तेश्वर, सोरोन, फर्रुखाबाद, कनोज, बिठूर, कानपूरमार्गे प्रयाग (प्रयागराज) येथे पोहोचते. येथे ती यमुना नदीला भेटते. हे संगम स्थळ हिंदूंचे महत्त्वपूर्ण तीर्थस्थान आहे. तीर्थराज प्रयाग म्हणतात. यानंतर, गंगा हिंदू धर्मातील प्रमुख मोक्षदायिनी शहर काशी (वाराणसी) मध्ये वळते, येथून तिला उत्तरावाहिनी असे म्हणतात. येथून ते मिरजापूर, पाटणा, भागलपूर मार्गे पाकूरला पोहोचते. दरम्यान, सोन, गंडक, सरयू, कोसी इत्यादी अनेक उपनद्या त्यामध्ये मिळतात. हे भागलपूर मधील राजवाड्याच्या टेकड्यांपासून दक्षिण-पूर्वेस आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या गिरिया जागेजवळ, गंगा नदी भागीरथी आणि पद्मा अशा दोन शाखांमध्ये विभागली गेली आहे. भागीरथी नदी गिरियापासून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात करते तर पद्मा नदी आग्नेय दिशेला वाहते आणि १९७४ साली बांधलेल्या फरक्का धरणामधून गंगा बांगला देशात प्रवेश करते. गंगेचा डेल्टा-त्रिभुज भाग येथून सुरू होतो. मुर्शिदाबाद शहरापासून हुगळी शहरापर्यंत गंगेचे नाव भागीरथी आणि हुगळी शहरापासून मुहाने शहरापर्यंत हुगळी नदी असे आहे. हे गंगेचे मैदान म्हणजे मुळात एक भूगर्भीय खड्डा असून तो  मुख्यतः हिमालयीन रेंज बनण्याच्या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे तीन-चार कोटी वर्षांपूर्वी बनला.. तेव्हापासून हिमालयातून आणि भारतीय उपखंडातून उगम पावणाऱ्या नद्या आपल्याबरोबर आणलेल्या गाळाने ही मैदाने सुपीक केली आहेत.. या मैदानातील गाळांची सरासरी खोली एक ते दोन हजार मीटर आहे. या मैदानामध्ये नदीची धूप झाल्यामुळे आणि वाळू, खडक, विसर्प (नागमोडी प्रवाह), गोखूर तलाव (यू आकाराचे तलाव) आणि गुंफित नद्या (एका नदीपासून उद्भवलेल्या छोट्याया छोट्या नद्यांचे जाळे) असे उपशास्त्रीय भूगोलविशेष आढळतात. 

गंगेच्या या खोऱ्यात, एक संस्कृती उदयास आली आणि विकसित झाली, जिचा प्राचीन इतिहास खूप वैभवशाली आणि भव्य आहे. जेथे ज्ञान, धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा एक किरण उदयास आला आणि ज्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला प्रकाशित केले. पाषाण युगाच्या जन्माच्या आणि विकासाचे बरेच पुरावे येथे सापडले आहेत. याच खोऱ्यात रामायण आणि महाभारत काळाचा जन्म व अस्त झाला. शतपथ ब्राह्मण, पंचविश ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण, ऐतरेय आरण्यक, कौशीतकी आरण्यक, सांख्य आरण्यक, वाजसनेयी संहिता आणि महाभारत, इत्यादींमधील घटना नंतरच्या वैदिक काळात गंगेच्या खोऱ्याबद्दल माहिती देतात. प्राचीन मगध महाजनपाडाचा उगम गंगा खोऱ्यातच झाला, तेथून प्रजासत्ताकांची परंपरा जगात प्रथमच सुरू झाली. येथे जेव्हा मौर्य आणि गुप्त घराण्यांनी राज्य केले तो काळ भारताचा सुवर्णकाळ ठरला.

आपल्या मृत पूर्वजांना (सगरांच्या पुत्रांना) मुक्ती मिळवून देण्यासाठी भगीरथाने महत्प्रयासाने गंगेला पृथ्वीवर आणले, असे मानले जाते.  त्यामुळे पराकाष्ठेच्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न म्हणतात.

गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्ये लिहिली आहेत.  त्यांपैकी काही ही :-

गंगा आणि तिथल्या सर्व उपनद्या, विशेषत: यमुना प्राचीन काळापासून सिंचनासाठी वापरल्या जात आहेत. इ.स.पु . चौथ्या शतकात गॅजेटिक मैदानामध्ये धरणे व कालवे सामान्य होते. गंगा-ब्रह्मपुत्र-मेघना खोiऱ्यात २,००,००० ते २,५०,००० मेगावाटच्या ऑर्डरवर प्रचंड जलविद्युत क्षमता आहे, त्यातील निम्म्या जागेवर सहजतेने नुकसान होऊ शकते. १९९९ पर्यंत, गंगेच्या जलविद्युत क्षमतेच्या १२% आणि ब्रह्मपुत्रांच्या अतुलनीय संभाव्यतेच्या केवळ 1% जलद गतीने काम केले. 

हरिद्वार (१९६०) मधील गंगे कालव्याचे मुख्य काम सॅम्युएल बॉर्न यांचे छायाचित्र आहे.

इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात  मौर्यांनी भारतावर राज्य केले त्या काळात ग्रीसचे वंशशास्त्रज्ञ मेगास्थेनिस यांनी महाकाय मैदानावरील कालव्याचे वर्णन केले आहे. मौर्य साम्राज्याचे संस्थापक, चंद्रगुप्त मौर्याचे  सल्लागार-कौटिल्य (ज्याला चाणक्य देखील म्हटले जाते) यांनी युद्धाच्या वेळी धरणे आणि कुंडे नष्ट करण्याची रणनीती असल्याचे म्हटले आहे.. फिरोजशाह तुघलकच्या कारकिरदीतये बरेच कालवे बांधले गेले. त्यापैकी सर्वात लांब कालवा २४०किमी (१५० मैल) हा यमुना नदीवर १३५६मध्ये बांधला गेला. आता पश्चिम यमुना कालवा म्हणून ओळखला जाणारा, हा मोडकळीस आला होता आणि बऱ्याच काळाने पूर्ववत झाला आहे. मोगल सम्राट शाहजहांने १७ व्या शतकाच्या सुरूवातीला यमुना नदीवर सिंचन कालवा बांधला. १८३० पर्यंत तो यमुना कालवा म्हणून ब्रिटिशांच्या कारकिर्दीत वापरात होता. पुन्हा सुरू केलेला हा कालवा, अप्पर गंगे कालवा व त्यानंतरच्या सर्व कालवा प्रकल्पांसाठी एक मॉडेल बनला.

१८४२ ते १८५४ दरम्यान बांधलेला गंगा कालवा - भारतातील पहिला ब्रिटिश कालवा होता. कर्नल जॉन रसेल कोल्व्हिन यांनी १८३६ मध्ये त्याचा आराखडा बनवला. तेव्हा पहिल्यांदा त्याच्या वास्तुविशारद सर प्रोबी थॉमस काउटली यांनी फारसा उत्साह दाखविला नाही, त्यांनी नदीकाठच्या सुगंधी प्रदेशात जाण्यासाठी विस्तृत सखल भागातून कालवा तोडण्याचा विचार केला गेला.  तथापि, १८३७-१८३८च्या आग्रा दुष्काळानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाने  दुष्काळ निवारणासाठी २३ लाख रुपये खर्चाची, कालव्याची कल्पना कंपनीच्या बजेट-जागरूक संचालक कोर्टाला अधिक आकर्षक वाटली. १८३९मध्ये, भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी कोर्टाच्या मान्यतेने कॅटलला कालव्याच्या अंदाजानुसार खोदलेल्या आणि जमीन खोदलेल्या जमिनीचा संपूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी निधी मंजूर केला. संचालक कोर्टाने त्याव्यतिरिक्त, प्रस्तावित कालव्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविली, ज्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणि भौगोलिक प्रमाणात परिणाम झाला होता, आता ते संपूर्ण डोआब प्रदेश असल्याचे समजतात.

हा उत्साह मात्र अल्पकाळ टिकला. गव्हर्नर जनरल म्हणून ऑकलंडचा उत्तराधिकारी, लॉर्ड ॲलेनबरो, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कामांना कमी ग्रहण करणारे दिसले आणि त्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी मोठा निधी रोखला. फक्त १८४४ मध्ये, जेव्हा नवीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांची नेमणूक झाली तेव्हा अधिकृत उत्साहाने व गंगा कालवा प्रकल्पात निधी परत आला. मध्यंतरी झालेल्या या गतिविधीचा परिणाम कॅटलीच्या आरोग्यावर दिसू लागला होता आणि त्यांना बरे होण्यासाठी १८४५ मध्ये ब्रिटनला परत जाण्याची आवश्यकता होती, परंतु त्याच्या युरोपियन वास्तव्यामुळे त्यांना युनायटेड किंगडम आणि इटलीमध्ये समकालीन हायड्रॉलिक कामांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. भारतात् परत येईपर्यंत वायव्य प्रांतांमध्ये जेम्स थॉमसन हे लेफ्टिनेंट गव्हर्नर म्हणून आणि ब्रिटिश भारतात लॉर्ड डलहौसी यांच्याकडे गव्हर्नर-जनरल म्हणून काम करणारे अधिक समर्थ पुरुष होते. कॅटलच्या देखरेखीखाली कालव्याचे बांधकाम आता जोरात सुरू झाले. ५६० कि.मी.लांबीचा कालवा, आणखी ४८० किमी शाखा ओळीच्या शेवटी, हरिद्वारमध्ये हेडवर्क दरम्यान पसरली, अलीगढच्या खाली दोन शाखांमध्ये विभागली, आणि त्याचे दोन संगम यमुना (नकाशामध्ये Jumna) सह कानपूरमधील इटावा आणि गंगेमध्ये (नकाशामधील Cawnpore) आहेत. गंगा कालवा, ज्यात एकूण २.१15 दशलक्ष डॉलर्सची भांडवली तरतूद होती, लॉर्ड डलहौसी यांनी १८५४ मध्ये अधिकृतपणे उघडली. 

२१ एप्रिल १९५५ रोजी फरक्का येथे एक मोठा बंधारा उघडण्यात आला. नदीचा मुख्य प्रवाह बांगलादेशात ज्या ठिकाणी घुसला त्याच्या अगदी जवळच आहे आणि कोलकत्याच्या पश्चिम बंगालमध्ये उपनगरी हुगली (ज्याला भागीरथी देखील म्हटले जाते) सुरू आहे. नदीच्या हुगळी शाखेत २ किमी (२ मैल) लांबीचे फीडर कालव्यात पाणी भरणारे हे बंधन, आणि तिचे जलप्रवाह व्यवस्थापन बांगलादेशाशी दीर्घकाळ विवादाचे कारण बनले आहे.  १ डिसेंबर १९९६ मध्ये झालेल्या भारत-बांगलादेश गंगेच्या जल कराराने भारत आणि बांगलादेशमधील पाण्याच्या वाटणीच्या काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. कानपूरमध्ये गंगा नदीच्या पलिकडे लव्ह कुश बॅरेज आहे.

गंगेची उपनदी भगीरथी नदीवर टिहरी धरण बांधले गेले. हे भव्यंगाना भागिरथीला भेटणार्‍या ठिकाणी गणेश प्रयागच्या १.५ कि.मी. डाउनस्ट्रीमवर आहे. भगीरथीला देवप्रयागानंतर गंगा म्हणतात. भूकंप प्रवण क्षेत्रात धरण बांधणे विवादास्पद होते.

बाणसागर धरण सोन नदीवर, सिंचन आणि जलविद्युत या दोहोंसाठी गंगेची उपनदी बनविली गेली. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर पाणी साठवण्यासाठी किनार्यावरील जलाशय बांधून ब्रह्मपुत्र पाण्याबरोबर गंगेच्या पूरातील पाण्याचा पुरवठा मध्य आणि दक्षिण भारतासह उजव्या बाजूच्या खोऱ्यातील भागाला केला जाऊ शकतो.

हुगळी नदी कोलकाता, हावडा मार्गे सुंदरवानातील भारतीय भागातील महासागरात मिळते. पद्मा येथे ब्रह्मपुत्र येथून निघालेली उपनदी जमुना नदी आणि मेघना नदीला जोडते. अखेरीस हे 350 किमी रूंद सुंदरवन डेल्टामध्ये सामील होते आणि बंगालच्या उपसागरात सामील होते. हा डेल्टा एक सपाट व निम्न-साधी मैदान आहे, ज्याची निर्मिती गंगा आणि त्याच्या उपनद्यांद्वारे आणलेल्या नवीन जलोढाने 1000 वर्षात केली. गंगा आणि बंगालच्या उपसागरात गंगा-सागर-संगम नावाच्या ठिकाणी प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. जगातील सर्वात मोठा डेल्टा (सुंदरवन) येथे अनेक प्रसिद्ध वनस्पती आणि प्रसिद्ध बंगाल वाघ आहेत. हा डेल्टा हळू हळू समुद्राच्या दिशेने जात आहे. काही काळापूर्वी कोलकाता हा सागर किनाऱ्यावर वसला होता आणि महासागर राजवाडे आणि सिल्हेटपर्यंत पसरलेला होता, पण आता तो समुद्रकिनाऱ्यापासून १५-२० मैलांवर (२०--३० किमी) अंतरावर सुमारे १,८०,००० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेला आहे. आहे जेव्हा डेल्टा समुद्राकडे निरंतर विस्तारतो तेव्हा त्याला प्रगतिशील डेल्टा म्हणतात. सुंदरवन डेल्टा मधील जमिनीची गती फार कमी झाल्यामुळे येथे गंगा वाहते आणि तेथे आणलेली माती मुखात ठेवते. जे डेल्टाचे आकार वाढवते आणि नदीचे अनेक प्रवाह आणि उप-प्रवाह तयार करते. गंगाच्या मुख्य नद्यांमध्ये जलंगी नदी, इच्छमती नदी, भैरव नदी, विद्याधारी नदी आणि कालिंदी नदी आहेत. नद्यांच्या वाहत्या वेगामुळे दक्षिणेकडील भागात अनेक कमानी तलाव तयार झाले आहेत. उतार उत्तरेकडून दक्षिणेस आहे, म्हणून बहुतेक नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. भरतीच्या वेळी या नद्यांमध्ये भरतीच्या पाण्यामुळे या नद्यांना भरती नदी देखील म्हणतात. डेल्टाच्या दक्षिणेकडील खाऱ्या समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचल्यामुळे हा भाग कमी, खारट आणि दलदलीचा आहे आणि सहजपणे खारफुटी वनांनी भरला आहे. हा डेल्टा भातशेतीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वाधिक कच्च्या ज्यूटचे उत्पन्न होते. कातका अभयारण्य सुंदरबनमधील अशाच क्षेत्रांपैकी एक आहे जिथे लहान कालव्यांमधून मार्ग जातो. येथे मोठ्या संख्येने सुंदर झाडे आढळतात, या कारणास्तव या जंगलांचे नाव सुंदरवन आहे. याशिवाय देवा, केवडा, तमजा, अमळोपी आणि गोरण वृक्ष अशा प्रजाती आहेत, ज्या सुंदरवनमध्ये आढळतात. इथल्या जंगलांची एक वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त ती झाडे उगवू किंवा टिकून राहू शकतात, जी गोड आणि खाऱ्या पाण्यात जगू शकतात.

गंगेमध्ये उत्तरेकडून येणार्‍या प्रमुख उपनद्या यमुना, राम गंगा, कर्नाली (सरयू), ताप्ती, गंडक, कोसी आणि काकशी आणि दक्षिणेच्या पठारामधून येणा major्या प्रमुख नद्या म्हणजे चंबळ, सोन, बेतवा, केन, दक्षिणी तोस इ. हिमालयातील बंदरपुच्छ टेकडीच्या पायथ्याशी यमुनोत्री हिमखंडातून उगम होणारी यमुना ही गंगेची सर्वात महत्वाची उपनदी आहे. हिमालयच्या वरच्या भागात आणि नंतर लघु हिमालयात, गिरी आहे आणि आसन नद्या आढळतात. चंबळ, बेतवा, शारदा आणि केन ही यमुनेच्या उपनद्या आहेत. चंबळ इटावाजवळील यमुना आणि हमीरपूरजवळ बेतवा यांना भेटते. प्रयागराजजवळ यमुना डाव्या बाजूने गंगा नदीत सामील झाली. रामगंगा मूळ हिमालयाच्या दक्षिणेकडील नैनीतालजवळ उगम पावते आणि बिजनौर जिल्ह्यात वाहते आणि कन्नौजजवळील गंगामध्ये सामील होते. मप्सातुंग नावाच्या हिमनदीतून उद्भवणारी कर्नाली नदी अयोध्या, फैजाबादमार्गे बलिया जिल्ह्याच्या सीमेजवळील गंगेला मिळते. या नदीला डोंगराळ भागात कौरियाला आणि मैदानी प्रदेशात सरयू म्हणतात. हिमालयातून निघालेल्या गंडकला नेपाळमधील शालिग्राम म्हणून वाहणार्‍या मैदानावर तिला नारायणी नदी म्हणतात. काळे गंडक आणि त्रिशूल नद्यांच्या पाण्यामधून वाहून ते सोनापूरजवळील गंगेमध्ये जाते. कोसीचा मुख्य प्रवाह अरुण आहे जो गोसाई धामच्या उत्तरेकडून उगम पावतो. अरुण नदी ब्रह्मपुत्र खोऱ्याच्या दक्षिणेकडून गोलाकार स्वरूपात वाहते, जिथे यारू नावाची नदी जोडली जाते. त्यानंतर ती एव्हरेस्टच्या कंचनजंगा शिखरावरुन वाहते, ती दक्षिणेकडे ९० किलोमीटर वाहते, जिथे पश्चिमेला त्सुन्कोसी आणि पूर्वेकडून तामूर कोसी नावाच्या नद्या त्यात सामील होतात. यानंतर कोसी नदीच्या नावाखाली शिवालिक ओलांडल्यानंतर ती मैदानात उतरते आणि बिहार राज्यातून वाहणाऱ्या गंगेस सामील होते. सोन नदी अमरकंटक टेकडी (मध्य प्रदेश) वरुन निघते आणि पाटणाजवळील गंगेला मिळते. चंबळ नदी मध्य प्रदेशातील मऊ जवळ जनायाब डोंगरावरून उगम पावते आणि इटावापासून ३८ कि.मी. अंतरावर यमुनाला मिळते. बेतवा नदी मध्य प्रदेशातील भोपाळ येथून उगम पावते आणि उत्तर हमीरपूरजवळील यमुनाला मिळते. बसलाई, द्वारका, मयुराक्षी, रूपनारायण, कंसवती आणि रसूलपूर हे भागिरथी नदीचे मुख्य नद्या आहेत. जलांगी आणि मठा भंगा किंवा चुनिन डाव्या किनाऱ्याला मीठतात. पूर्वी गंगा किंवा पद्मा या शाखा नद्या होत्या. परंतु सध्या ते गंगेपासून विभक्त झाले आहेत आणि पावसाळ्याच्या नद्या बनल्या आहेत.

उपनदी 1 महाकाली 2 कर्नाली 3 कोसी 4 गंडक 5 सरयू 6 यमुना 8 सोमानी 9 महानंदा.

ऐतिहासिक पुराव्यांनुसार गंगा-यमुना प्रदेश १६ व्या आणि १७ व्या शतकापर्यंत घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्याचे ज्ञात आहे. या जंगलात वन्य हत्ती, म्हैस, गेंडा, सिंह आणि वाघ यांची शिकार केली गेली. गंगा किनाऱ्याने शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणामुळे आपल्या वेशीवर रंगीबेरंगी पक्ष्यांचे जग जपले आहे. त्या किनारपट्टीत माशांच्या १४० प्रजाती, ३५ सरपटणारे प्राण्यांच्या ३५ आणि नीलगाय, सांबर, ससा, मुंगूस, चिंकारा (ब्लॅक बक) अशा सस्तन वन्यजीवांच्या ४२ प्रजाती आहेत. या भागातील काही प्रजाती संरक्षित घोषित केल्या आहेत. लंगूर, लाल माकड, तपकिरी अस्वल, कोल्हा, बिबट्या, बर्फाळ बिबट्या, हरीण, भुंकण हरण, सांभर, कस्तुरी हरीण, सेरो हरीण (अजहरीण), बार हरीण, सुदंर, ताहर (रानबकरा) इत्यादी मोठ्या प्रमाणात गंगेच्या पर्वतीय किनाऱ्यावर आढळतात. फुलपाखरे आणि वेगवेगळ्या रंगांचे कीटक देखील येथे आढळतात.  वाढत्या लोकसंख्येच्या दबावाखाली, हळूहळू जंगले नष्ट होत आहेत आणि गंगा खोऱ्यात सर्वत्र शेती केली जात आहे, तरीही गंगेच्या मैदानावर हरण, रानडुक्कर, रान मांजरी, लांडगा, खोकड व कोल्ह्यांच्या अनेक प्रजाती मोठ्या संख्येने आढळतात. डॉल्फिनच्या दोन प्रजाती गंगेमध्ये सापडतात. ज्याला गंगा डॉल्फिन आणि इरावाडी डॉल्फिन म्हणून ओळखले जाते. याशिवाय गंगा नदीत सापडलेल्या शार्कमुळेही गंगा प्रसिद्ध आहे, वाहत्या पाण्यात सापडलेल्या शार्कबद्दल जगातील शास्त्रज्ञांची खूप कुतूहल आहे. गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागराला मिळते त्या ठिकाणच्या त्रिभुजाला सुंदरबन म्हणून ओळखतात. हे सुंदरबन जगातील अनेक नावीन्यपूर्ण वनस्पती आणि बंगाल वाघ यांकरिता प्रसिद्ध आहे.

गंगा आपल्या उगम भागात भारत आणि बांगलादेशच्या शेती-आधारित अर्थ व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार तर लावतेच त्यासोबत ती तिच्या उपनद्यांसह मोठ्या क्षेत्रासाठी बारमाही सिंचनाचा स्रोत आहे. या भागात मुख्यतः तांदूळ, ऊस, डाळ, तेलबिया, बटाटे आणि गहू ही पिके घेतली जातात.  गंगेच्या किनारपट्टी भागाततील दलदलींमुळे व तलावांमुळे शेंगदाणे, मिरची, मोहरी, तीळ व ऊस ही पिके मुबलक प्रमाणात निघतात. नदीत मासेमारी खूप जोरात चालू असते. गंगा नदी प्रणाली ही भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे; त्यामध्ये सुमारे ३७५ माशांच्या प्रजाती आहेत. उत्तर प्रदेशातील आणि बिहारमधील वैज्ञानिकांनी १११ माशांच्या प्रजाती असल्याचे नोंदविले आहे. फराक्का धरण तयार झाल्याने गंगा नदीत हिलसा माशाच्या निर्मितीस मदत झाली आहे. गंगेचे महत्त्व देखील पर्यटन आधारित उत्पन्नामुळे आहे. तिच्या किनाऱ्यावर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशी बरीच पर्यटन स्थळे आहेत. ही स्थळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोलाचे स्रोत आहेत. गंगा नदीवर राफ्टिंगसारखे साहसी खेळ आयोजित केले जातात. या साहसी खेळांमुळे व त्यासंबंधीच्या वातावरणाद्वारे भारताच्या आर्थिक सहकार्यास मदत होते. हरिद्वार, प्रयागराज आणि वाराणसी ही गंगा किनारपट्टीची तीन मोठी शहरे असून तीर्थक्षेत्रांमध्ये विशेष स्थान आहे. यामुळे येथे मोठ्या संख्येने भाविक येत असून धार्मिक पर्यटनामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा पर्वतातून बर्फ वितळतो तेव्हा नदीत पाण्याचे प्रमाण आणि प्रवाह जास्त होतो, यावेळी उत्तराखंडमधील ऋषिकेश, बद्रीनाथ मार्गावरील कौडियाळा ते ऋषिकेश दरम्यान रॅफ्टिंग, कायाकिंग आणि कॅनोइंग शिबिरे आयोजित केली जातात. ही शिबिरे विशेषतः साहसी, क्रीडा उत्साही लोकांना आणि पर्यटकांना आकर्षित करून भारताच्या आर्थिक सहकार्यात महत्वाची भूमिका बजावतात.

गंगेवर बांधलेली अनेक धरणे भारतीय सार्वजनिक जीवन आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे फरक्का धरण, टिहरी धरण आणि भीमगोडा धरण. फरक्का धरण (बैराज) भारताच्या पश्चिम बंगाल प्रांतात गंगा नदीवर बांधले गेले आहे. कोलकाता बंदर कचरामुक्त करण्यासाठी हे धरण बांधण्यात आले होते, हे १९५० ते १९६० या काळात या बंदराची मुख्य समस्या होती. कोलकाता हुगळी नदीवर वसलेले एक प्रमुख बंदर आहे. उन्हाळ्यात हुगळी नदीचा प्रवाह कायम राहण्यासाठी गंगा नदीच्या पाण्याचा मोठा भाग फरक्का धरणातून हुगली नदीत वळविला जातो. गंगेवर बांधलेले दुसरे मोठे टिहरी धरण म्हणजे उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात स्थित टिहरी विकास प्रकल्पातील प्राथमिक धरण. गंगा नदीची मुख्य उपनदी भागीरथी नदीवर धरण बांधले गेले आहे. टिहरी धरणाची उंची २६१ मीटर असून जगातील पाचवे सर्वात जास्त धरण बनले आहे. या धरणातून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दररोज २४०० मेगावॅट वीज निर्मिती, २,७०,००० हेक्टर सिंचन आणि १०२.२० कोटी लिटर पिण्याचे पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. तिसरा मोठा भीमगोडा धरण हरिद्वार येथे आहे. ब्रिटिशांनी १८४० मध्ये गंगा नदीचे पाणी विभाजित करण्यासाठी व त्यास अप्पर गंगा कालव्यामध्ये वळविण्यासाठी बांधले होते. गंगा नदीच्या उजव्या काठावरुन हा कालवा हरिद्वारमधील भीमगोडा नावाच्या ठिकाणाहून उगम पावतो. प्रारंभी गंगा नदीत तात्पुरते बंधारे बांधून या कालव्यात पाणीपुरवठा केला जात असे. पावसाळा सुरू होताच तात्पुरता धरण खंडीत व्हायचे आणि पावसाळ्यात कालव्यात पाणी वाहून जायचे. अशा प्रकारे या कालव्याद्वारे केवळ रब्बी पिकांनाच सिंचनास बसली. भीमगोडा बॅरेज तात्पुरते धरणाच्या बांधकाम साइटच्या डाउनस्ट्रीम (डाउनस्ट्रीम फ्लो) मध्ये १९७८-१९८४ दरम्यान बांधण्यात आले. ते बांधल्यानंतर, वरच्या गंगा कालव्याच्या पाण्याचे पाणीही खरीप पिकाला पुरविले जात असे.

गंगा नदी ही तिच्या शुद्धीकरण क्षमतेसाठी जगभरात ओळखली जाते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या नदीतील पाण्यामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचे व्हायरस आहेत, जे बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव टिकू देत नाहीत. पाण्यातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) प्रमाण राखण्यासाठीची गंगा नदीच्या पाण्याची विलक्षण क्षमता आहे; परंतु यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य योजनांमुळे भारतातील कॉलरा आणि आमांश (आंव) यासारख्या आजारांचा धोका बराच कमी झाला आहे.

नदी स्वच्छ करण्यासाठी कित्येक उपक्रम घेतले गेले परंतु समाधानकारक कोणीही पोहोचले नाही. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीतील प्रदूषण नियंत्रण व स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविली. त्यानंतर त्यांनी जुलै 2014 मध्ये भारताच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात नमामि गंगा नावाचा प्रकल्प सुरू केला. [२ या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भारत सरकारने गंगेच्या काठावर औद्योगिक एकके बंद करण्याचे आदेश दिले आहेत. भारतात, 25 मार्च ते 3 मे 2020 पर्यंत lockdown गंगेच्या काठावरील सर्व कारखाने बंद आहेत, ज्यामुळे त्यांचे घाणेरडे पाणी गंगेमध्ये जात नाही आणि गेल्या दहा वर्षांत गंगेचे पाणी अत्यंत स्वच्छ झाले आहे. प्रथमच हरकीपोडीतील गंगा पाणी पिण्यास उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.

गंगा नदी :भूलोकावरील अवतरण

पौराणिक समजुती संपल्या.

विशेष माहिती : रोमन लिपीत अकारान्त किंवा आकारान्त शब्द नाहीत, त्यामुळे 'गंगा' हा शब्द लिहिणे शक्य नाही. Ganga असे स्पेलिंग केले तर उच्चार गॅंगऽ असा होतो. तस्मात् Ganges हे सुयोग्य स्पेलिंग आहे. 




#Article 190: धनत्रयोदशी (253 words)


धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी  लक्ष्मी मातेची पूजा करतात.  दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी  मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.)

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो.
या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.  

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.

त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.




#Article 191: लाडू (161 words)


लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.

घटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनवले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. यात मुगाच्या वाटल्या डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू हे प्रकार यात मोडतात. खेरीज   मोतीचुराचे (अर्थात बारीक बुंदीचे) लाडू हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये  गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू,राजगिऱ्याचे लाडू, कुटकीचे  लाडू, कोदोचा  लाडू, अळिवाचे लाडू, मेथीचे लाडू' '  इत्यादी प्रकारांची गणना होते. याशिवाय  ' 'रव्याचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, पोळीचे लाडू, डिंकाचे लाडू, पोह्याचे लाडू, अळीवाचे लाडू दाण्याचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनवलेले प्रकारही आहेत.




#Article 192: बासुंदी (198 words)


बासुंदी हे दूध व साखरेपासून बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे.

मलईयुक्त दुधास मंद आंचेवर लोखंडी कढईत तापवून व आटवून,त्यात साखर घालून हा पदार्थ तयार करतात.
घट्ट बासुंदीला रबडी म्हणतात. कुरुंदवाड तसेच नृसिंहवाडी येथील बासुंदी सुप्रसिध्द असून तिला पुणे, मुंबई इथून मोठ्या प्रमाणात मागणी असते. या गावातील बासुंदीचे वैशिष्ट्य म्हणजे साखर न घातलेली बासुंदी येथे मिळते. लातूर जिल्ह्यातील उजनी, सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे ही गावे सुद्धा बासुंदीसाठी प्रसिद्ध आहेत.
हल्ली बासुंदीमध्ये सीताफळाचा गर मिसळून सीताफळ बासुंदी केली जाते.

{विस्तार

तयारी

उकळत्या प्रक्रियेदरम्यान घट्ट होण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी भारी क्रीम जोडली जाऊ शकते. एकदा कमी झाल्यावर थोडी साखर, वेलची, चारोळी आणि / किंवा केशर घाला.साखर घातल्यानंतर बासुंदी चांगलीच जतन केली जाते.साखर ठराविक कालावधीत काही प्रमाणात आम्लता वाढवते.जर ते जास्त असेल तर ते बासुंदीला वलय करू शकते. कधीकधी साखर घालल्यानंतर, थोडा वेळ ते शिजवतो; यामुळे बासुंदीला एक चांगला गुलाबी रंग मिळतो,कारण साखरदेखील दुधामध्ये शिजवल्यामुळे हलके कारमेल बनते. साखर घालण्यापूर्वी, बासुंदी जाड आहे, परंतु जोडल्यानंतर पुन्हा द्रव होते. चांगले ढवळत राहिल्यामुळे मालाई शीर्षस्थानी येण्यापासून रोखते आणि सर्व पाहुणे (उशीरा येणारेही) तितकेच जाड आणि साध्या बासुंदीचा आनंद घेऊ शकतात.बदाम आणि पिस्ताचे तुकडे नेहमी सजवलेले असतात. [१] कमी केशर घालण्याने रंगाची तीव्रता कमी होते.  घनरूप दुधाची जोड बासुंदीला एक छान चव आणि समृद्धी देते. 




#Article 193: चिवडा (178 words)


चिवडा हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ बऱ्याचदा खाऱ्या, तिखटसर तसेच गोड चवीचा बनवतात. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली हा सण अपूर्ण असल्यासारखा वाटतो.

प्रथम पोहे कडक उन्हात ४-५ तास वाळवून घ्यावेत व कढईमध्ये चांगले भाजून घ्यावेत, म्हणजे त्यांतील ओलसरपणा निघून जाईल व चिवडा चामट होणार नाही. आले, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदे यांचे वेगवेगळे वाटण करून घ्यावे.(मिक्सरमध्ये पेस्ट करावी)

कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यानंतर आले, लसूण, गोडलिंबाची पाने, खसखस, डाळ्या, शेंगदाणे हे तेलात वेगवेगळे तळून घ्या व काढून घ्या. तेलात कांदा वाटण / कांद्यांचे काप टाका. मंद आचेवर त्यातील ओलसरपणा निघेपर्यंत चांगले गुलाबी होऊ द्या. आता त्यात हिरव्या मिरच्यांचे वाटण टाका. त्याचा रंग किंचित बदलल्यावर त्यात हळद, तिखट टाका. लगेच नंतर धने कूट, जिरे कूट टाका. आधी तळून ठेवलेले आले, लसूण, गोडलिंबाची पाने, खसखस, डाळ्या, शेंगदाणे हेदेखील त्यात टाका. आता पोहे व मीठ टाका. चवीसाठी थोडा आमचूर व साखर घालून झाऱ्याने नीट एकत्र करा.

चिवड्याला विशेष अशी सजावट नाही. खायला देताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व कांदा घालून देतात. त्यामुळे तो आकर्षक दिसतो.

महाराष्ट्रात चिवडयाचा न्याहारी म्हणूनही अनेकदा वापर होतो.




#Article 194: चकली (108 words)


चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.

चकली बनविण्यासाठी तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरे व धणेही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून सोर्‍या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.

चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.




#Article 195: पेढा (120 words)


पेढा हा खवा आणि साखर यापासून गोल आकाराचा बनवला जातो.त्यात केशर, खाण्याचा रंग, जायफळ इत्यादी पदार्थही घालतात. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, पुणे, सातारा, कोल्हापूर ही गावे पेढ्यासाठी प्रसिद्ध आहेत.

सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात म्हणून कंदी पेढे तर कोल्हापूरचे पेढे हे फिके पेढे (तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत.
पुण्यामधे चितळे बंधू, कोल्हापुरात दगडू बाळा भोसले हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. खव्यापासून बनवलेले आणि मलईपासून बनवलेले असे दोन प्रकारचे पेढे इथे मिळतात. खव्यापासून बनविलेल्या पेढ्यास नुसते 'पेढा' तर मलईपासून बनविलेल्या पेढ्यास 'मलई पेढा' असे म्हणतात. शिवाय साखर लावलेला साखरी पेढा, धारवाडी पेढा, कुरुंदवाडचां पेढा हा खव्या पासून बनवलेला व कोरडा पेढा असतो.तो अनेक दिवस टिकतो.
साखरपुडा,लग्न, बारसे, परीक्षेतील यश अशा आनंदाच्या प्रसंगी आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना पेढे वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. 




#Article 196: भात (105 words)


पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.

भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात गोव्यातील लोकांना पेेज  (पाण्यातला  भात )जेवायला  अजून  ही  आवडतात. भाता बरोबर वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. पदार्थ खाल्ले जातात. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्यानी,मसाले भात, गोळाभात हे भातापासून   केलेले वेगवेगळे  पदार्थ आहेत. भाताची शेती पावसाळ्यात   केेली जाते.तकलकककके

भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते. 

भातापासून खीर,लाडू पण बनवले जाते. 




#Article 197: पोळी (278 words)


चपाती हा गव्हापासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे . दळलेल्या गहू पिठास मराठी भाषेत कणिक म्हणतात. कणिक पिण्याचे पाणी व किंचित तेल वापरुन भिजवली जाते. कणिकेचे छोटे छोटे गोळे बनवुन हे गोळे लाटण्याच्या साहाय्याने पोळपाटावर गोल आकारात लाटले जातात. चपाती छान पदर सुटावे व मुलायम व्हावी याकरिता लाटलेली चपाती दोनदा घडी करून पुन्हा गोल आकारात लाटली जाते व तव्यावर अथवा तंदुर मधे भाजली जाते.

चपाती विविध भाज्या, विविध गोड पदार्थ, चटण्या, ठेचा, भुरका, झुणका, कोशिंबीर इत्यादी सोबत खाल्ली जाते.

चपातीचे तुकडे फोडणी देउन खातात या पदार्थास तुकडे/कोल्हापुरी चिवडा/माणिक पैंजण नावे आहेत.

भाजण्याच्या ऐवजी तळण्याची क्रिया केल्यास लहान आकारास पुरी व मोठ्या आकारास भटुरा असे म्हणतात.

कणिक भाजण्याच्या ऐवजी उकडुन तळ्ल्यास बिट्ट्या व वरणात घालुन उकडल्यास वरणफळे हे पदार्थ बनतात.

गोड चवीचे सारण अर्धगोलाकार आकारात तळल्यास करंजी; संपूर्ण गोलाकार आकारास मोदक असे म्हणतात.

चपातीस हिंदी भाषा भाषेत रोटी असे संबोधतात. पराठा, दशमी, नान, रुमाली, पुरी हे पोळीचे उपपदार्थ आहेत. पाण्या ऐवजी दुधात भिजवलेल्या कणिकेच्या चपातीस 'दशमी' असे म्हणतात. चपातीत विविध सारण प्रकारचे सारण भरता येते जसे गुळपोळी, तिळ-गुळ पोळी, पुरण पोळी, खवा पोळी, बटाटा पोळी, मेथी पोळी इत्यादी.
अलिकडे चपाती महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक बनली आहे.सारणाप्रमाने नाव बदलते जसे तिळ-गुळ पोळी, पुरण पोळीस महाराष्ट्रात मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. पारंपारीक दृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणीपासून बनवलेली भाकरी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे.

चपातीस महाराष्ट्रातील काहीच शहरी (नागर भागातील) लाेक पोळी म्हणतात, मात्र ज्या कणकेत ज्याचे सारण असते त्यास तसे संबोधतात.
उदा.गुळ असेल तर गुळपोळी इ.

चपाती (flat bread) हा भारतीयांच्या रोजच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे. भारतात प्रामुख्याने गव्हाच्या पिठापासून चपाती बनते. पीठ पाण्यात भिजवून, त्याचा छोटा गोळा करतात. हा गोळा लाटून सपाट केल्यावर गरम तव्यावर शेकून चपाती बनवली जाते. जगात इतरत्रही अनेक प्रकारे चपाती बनवण्यात येते.

अशा चपात्या विविध पद्धतींनी खाल्ल्या जातात.




#Article 198: भाकरी (140 words)


भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नपदार्थ आहे. महाराष्ट्रात भाकरी करण्याच्या विविध पद्धती दिसून येतात. 
भाकरी हा आहारदृष्ट्या शरीरासाठी पौष्टिक अन्नपदार्थ मानला जातो. 

पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी /तांदूळ यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.

छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, पालेभाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते पण विशेषत: पिठ्ल्याबरोबर भाकरी खाल्ली जाते.

ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटे व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे. 




#Article 199: खिचडी (142 words)


मुगाची खिचडी , हा भारतातील सर्वांच्या परिचयाचा असा रुचकर व पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. हा बनवायला तांदूळ, मूगडाळ, हळद आणि मीठ लागते. २:१ या प्रमाणात तांदूळ व् मूगडाळ घेऊन ते मिश्रण भाताप्रमाणे शिजवले जाते. लहान मुलांकरिता खिचडी आसट (जास्त पाणी घालून) करतात. खिचडी पचनास सोपी व पोटाला हलकी समजली जाते. म्हणून ती खास उपवासाला बनवली जाते. 

खिचडीचा रुचकरपणा वाढवण्याकरिता आधी जिऱ्याची फोडणी करावी. तिच्यात आवडीप्रमाणे लसूण, मसाला, (वेलदोडे) ,लवंग, जायपत्री, कलमी दालचिनी, टाकावे त्यात चिमूटभर हळद टाकावी. फोडणी केलेल्या पातेल्यात तांदूळ-मुगडाळीचे मिश्रण टाकावे. मीठ टाकून भाताप्रमाणे शिजवावे. कालावधी १५ मिनिटे. गरम वाढावे.

सोबत विविध पदार्थ खाण्यास द्यावे जसे : पापड, लोणची, मोहरीची फोडणी, दूध, दही, ताक, लोणी, तूप,किंवा टोमॅटो/चिंच इत्यादीचे सार ,भजी.

भारतीय संस्कृतीत खिचडी हा साधारण पदार्थ समजला जातो. बहुधा साधे जेवण हवे असेल तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करतात. पचायला सोपी असल्याने लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाथी खिचडी चांगला आहार समजली जाते..




#Article 200: ताक (261 words)


ताक हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे.

दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.

दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.

ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे.
प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात. 

ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.

ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असये. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करतात. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.

अर्थात - भाजलेले जिरे, सैंधव मीठ व हिंग मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मुळव्याध, अतिसारासारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते.

अधिक माहितीसाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्यावा.

लोणीविरहित १०० ग्रॅम ताकाचे साधारणतः पोषणमूल्य-




#Article 201: पंचामृत (115 words)


पंचामृत हा  खाद्यपदार्थ आहे.पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धीकरण करण्यास
प्यायचे द्रव्य.

दोन प्रकारच्या पदार्थाना पंचामृत अशी संज्ञा वापरली जाते.

दाण्याचे कूट, तीळ, गूळ, काजू, धने आणि जिरे पूड, सुके खोबरे, चिंचेचा कोळ या मिश्रणाला फोडणी देवून चटणी सारखा पदार्थ केला जातो. त्यालाही पंचामृत म्हटले जाते. 

गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.
सोळा उपचारात पंचामृतस्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे.
पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे.

गर्भवती स्त्रीने तिच्या आणि गर्भाच्या उत्तम वाढीसाठी दररोज पंचामृत म्हणजे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण प्यावे असे सांगितले आहे.
ज्योतीसतत्व या ग्रंथात गर्भवतीला दिनशुद्धी पाहून पंचामृत प्यायला द्यावे असे सांगितले आहे.
 




#Article 202: तमाशा (1724 words)


तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ(प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.

तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली लावणीगायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्त्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे. भारूड, गोंधळ, पोवाडा (१३ व्या शतकात होऊन गेलेला शारंग देव याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात. मृदंग, वीणा, तंबोरा, झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून सनई, चौघडा, तुतारी हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, खंजिरी, सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत.

मराठवाड्याला लोककला आणि लोकनाट्याची समृद्ध परंपरा आहे.कीर्तन, भजन, भारुड, वासुदेव, जागरण, गोंधळ, बहुरूपी, सोंगे इत्यादी लोककला प्रकार मराठवाड्यातील प्रमुख लोककला प्रकार आहेत. ग्रामीण नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना लोककला हा रंगभूमीचा फॉर्म अधिक जवळचा असल्याने लोकनाट्य अंगाने अनेक लेखकांनी नाटके लिहिली आहेत. प्रा.चंद्रकांत भालेराव यांनीही वगनाट्य लिहिली आहेत. इश्काच्या पायी बुडाले, हे त्यांचे एक उत्कृष्ट वगनाट्य .गणेश स्तवन करणारा गण न वापरता त्यांनी जनगणनायक अर्थात रसिकांनाच नमन केले आहे. चंद्रसूर्याचा वग अर्थात काळ्या दगडावरची रेघ ,नाक दाबलं तोंड उघडलं अर्थात झालं गेलं विसरून जा, असे तमाशाच्या वगाप्रमाणे दोन दोन नाव असलेली वगनाट्य प्रा.भालेराव यांनी लिहिली आहेत.लोककलेचा मानबिंदू असणारे थोर संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकरंगभूमीवर विपुल लेखन केले आहे. लोकनाट्य म्हणताच त्याचे नाव घेणे अपरिहार्य ठरते .ते म्हणजे हरहुन्नरी कलाकार लेखक शाहीर विश्वास साळुंखे .शाहीर साळुंखे यांनी भरपूर वगनाट्य लिहिली. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवर, भ्रष्टाचार कसा होतो ,सामान्य माणसाची कशी लुबाडणूक होते हे दर्शवणारे अनेक प्रयोग केले. त्यांचे पैशाला अनेक वाटा, झगडा लोकनाट्य प्रचंड गाजली. राजकारण, समाजकारण अंधश्रद्धा असे अनेक विषय हाताळले. शाहीर साळुंके यांनी झगडा हे नाट्य दलित प्रश्नावर लिहून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. सगळ धाब्यावर बसवलं ,खाली डोकं वर पाय ,कॉलर ताठ बायका साठ अशी अनेक वगनाट्य शाहिरी विश्वास साळुंखे यांच्या नावावर आहेत . लोककलावंत, संशोधक ,अष्टपैलू व्यक्तीमत्व डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे नाव लोकरंगभूमीवर कोरले गेले आहे ते त्यांनी सादर केलेल्या गाढवाचं लग्न, आंबेडकरी शाहिरीचे रंग, आणि रंगबाजी या कलाकृतींमुळे .बेबंद नगरी हे डॉ.देवदत्त म्हात्रे यांचे एक राजकीय विडंबन असलेले लोकनाट्य होय.गाढवानं वाचली गीता हे सूर्यकांत सराफ यांचे प्रसिद्ध लोकनाट्य आहे.टेम्भुर्णी येथील मूळचे असणारे आणि सध्या मुबंई लोककला अकादमीचे प्रमुख असणारे लोककलेचे संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे लोककला सातासमुद्रापार पोचवत आहेत.गोंधळमहर्षी राजाराम कदम गोंधळी यांनी गोंधळाला प्रतिष्ठा मिळवून दिली.भारुडरत्न निरंजन भाकरे,खंजिरीवादक भारूडकार मीरा उमाप लोकप्रबोधन करीत आहेत.शाहीरमहर्षी अंबादास तावरे, शाहीर सुरेश जाधव,शाहीर प्रवीण जाधव, शाहीर अरविंद घोगरे,शिवकर्तनकार डॉ. गजानन महाराज व्हावळ लोकप्रबोधन करीत आहेत.लोककलेचे अभ्यासक डॉ. राजू सोनवणे,डॉ. ज्ञानेश्वर उंडनगावकर ,डॉ. गहिनीनाथ वळेकर, डॉ. शिवाजी वाघमारे,योगेश निकम चिकटगावकर,विकास एडके आदी मंडळी लोकरंगभूमीवर कार्यरत आहेत.

गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. तमाशाचा खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून तमाशाचा सरदार म्हणजे मालक हे आवाहन करतो, सर्व साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवतात आणि सुरत्ये ध्रुपदाचा अंतिम सूर झेलून उंचावर नेतात.

गण संपल्यावर काही काळ ढोलकी व कडे यांचे वादन होते. ढोलक्याची लय पुरेशी अंगात भिनल्यावर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते आणि मग गौळण. गौळणींचा  विषय असतो श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला. नर्तकी या गोपी होतात आणि त्यांच्यामध्ये वयस्कर असणारी एक ‘मावशी‘ असते. या गोपी मथुरेला दूध, दही, लोणी वगैरे घेऊन जात असतात आणि वाटेत श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी किंवा पेंद्या त्यांना अडवतो. या पेंद्याचे काम करणारा बहुधा सोंगाड्या (हास्य कलाकार) असतो. या वेळेस या दोन पक्षांमध्ये जे विनोदी संवाद होतात ते ऐकून प्रेक्षक खदखदून हसतात. पौराणिक काळाला आधुनिक संदर्भ देऊन केलेला ह्या गौळणी हास्य व शृंगार रसाने ठासून भरलेल्या असतात.

एकेकाळी ग्रामीण भागातील मनोरंजनाचा हुकमी एक्का असलेला तमाशा व त्यातील गण, गौळण, बतावणी आणि फार्स काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी त्यांचे दस्ताऐवजीकरण करण्याचे मोलाचे काम सोपान खुडे यांनी ‘तमाशातील फार्सा’ हे पुस्तक लिहून केले आहे. ‘तमाशातील फार्सा’विषयीची त्यांनी दुर्मिळ अशी माहिती जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन मिळवली आहे. या पुस्तकामध्ये ‘फार्सा’बरोबरच लेखकाने गण, गौळण, रंगबाजी, मुजरा, बतावणी आणि वगाविषयी माहिती देऊन, शाहीर पठ्ठे बापूराव, रामा-नामा लबळेकर, सखाराम कोऱ्हाळकर, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, जगताप पाटील-पिंपळेकर, काळू-बाळू कोल्हापूरकर, दादू इंदुरीकर, किसन कुसगावकर, दगडोबा कोऱ्हाळकर आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या अल्प परिचयाबरोबरच त्यांनी त्यांच्या तमाशात सादर केलेल्या बतावणी फार्साचे काही नमुनेही सदर पुस्तकात दिलेले आहेत. पुस्तक पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर यांनी लिहिलेले फार्स विविध तमाशा फड मालकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले. मोमीन कवठेकर यांनी लिहिलेला 'लंका कोणी जाळली !' हा फार्स खूप प्रसिद्ध होता आणि 1980 मध्ये मुंबईत झालेल्या तमाशा लेखकां च्या स्पर्धेत या फार्सला प्रथम क्रमांकाचे 'छोटू जुवेकर पुरस्कार' मिळाला होता. 

मंचावर जर दोन फडांचे (तमाशामंडळांचे) तमासगीर एकाच वेळी असतील तर त्यांच्यांतील सरसनीरस ठरवण्यासाठी त्यांच्यामधे आपाआपसात सवालजवाब होतात. बहुधा पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो.

मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजेच रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतील तर त्या रंगबाजीला संगीतबारी म्हणतात. याबरोबरच गायक विविध प्रकारची लोकगीते सादर करतात. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली बरीच गीते ही दत्त महाडिक पुणेकर यांनी संगीतबद्ध करून आपल्या कार्यक्रमांतून सादर केली. मोमीन कवठेकर लिखित आणि आजही लोकप्रिय असणारी काही लोकगीते :

वग म्हणजे नाट्यरूपाने सादर केलेली कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वतःच्या बुद्धीने म्हणायचे असतात. अधूनमधून समयसूचकतेने शेरे मारणारा सोंगाड्या इथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. सोंगाड्यामुळेच वगाद्वारे सांगितल्या जाणाऱ्या कथावस्तूला चांगली रंगत येते. सोंगाड्या हा उत्कृष्ट नकलाकार असतो. तो हजरजबाबी असावा लागतो. तो प्रेक्षकांची करमणूक तर करतोच पण त्याचबरोबर समोर घडणारे प्रसंग ही खरेखुरे नसून नाटकी आहेत याची जाणीव करून देणे, त्या प्रसंगाची आधुनिक काळाशी सांगड घालणे, सद्य जीवनावर भाष्य करणे, प्रतिष्ठितांचा दंभस्फोट करणे आणि प्रसंगी सादर होत असलेल्या नाटकाचे विडंबन करणे ही कामेही तो करीत असतो. आपल्या लेखणीने तब्बल पाच दशके तमाशा सृष्टीला वगनाट्य आणि लावण्या पुरवणारे ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर लिखित खालील वगनाट्ये ही महाराष्ट्राच्या पसंतीस पडली:

अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अवतीभोवती पसरलेले अफाट  दु:ख, दारिद्रय व अज्ञान हेच त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे विषय होते. त्यांचे साहित्य विपुल आहे. त्यांचे तेरा कथासंग्रह, तीन नाटके, चौदा लोकनाट्ये, पस्तीस कादंबर्‍या, दहा पोवाडे आणि एक प्रवासवर्णन असे एवढे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या सात कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले आहेत. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे साहित्य निर्माण केले.

अण्णा भाऊ हे स्वत: रंगकर्मी होते. त्यांनी केवळ नाट्यलेखनच केले नाही; तर रंगमंचावरील सादरीकरणदेखील केले. अण्णा भाऊंनी वग नाटकांमधूनही स्त्रीप्रश्नाला मध्यवर्तीत्व देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वगनाट्य भांडवलदारी समाजरचनेत भरडल्या जाणार्‍या गरीब-शेतमजूरांच्या प्रश्नांची उकल करणारे आहेत.

अण्णाभाऊंच्या वगनाट्यात पोटतिडीक आहे. त्यांची वर्गसंघर्षाची जाणीव सखोल व उत्कट होती. त्यांचा आवाज हा दलित शोषितांचा आवाज होता. दलित हा शब्द त्यांनी व्यापक अर्थाने वापरला आहे. जो जो शोषित व पीडित तो तो दलित! समाजाच्या तळागाळातला माणूस हा त्यांच्या साहित्याच्या विषय होता. तो त्यांच्या वगनाट्य-कथा-कादंबर्‍याचा नायक होता. अन्यायाच्या शृंखला तोडण्याचे आवाहन त्यांच्या वगनाट्यात आहे. अण्णा भाऊंना मार्क्सचे तत्त्वज्ञान प्रिय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला विद्रोह त्यांना लढण्याची प्रेरणा देत होता. घाव घालून जग बदलण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी या दोन महामानवांकडून घेतले होते. देशातील धनदांडग्यांनी, जातदांडग्यांनी व धर्मदांडग्यांनी ज्यांचे शोषण केले त्या दलितांच्या बाजूने ते ठामपणे उभे होते. शोषकांवर व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर त्यांची लेखणी आघात करते. कामगारांच्या लढ्यात तिने प्रेरकाचे काम केले. कामगारांच्या लढ्याने त्यांच्या मनात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण केली होती.

तमाशा कलावीर शाहिरीत आणून अण्णांनी जशी प्रचारकार्याला गती दिली तशी शाहिरी परंपरेला लोकनाट्याची अक्षय किमया दिली. ‘ देशभक्त घोटाळे', ‘खापऱ्या चोर’, ‘पुढारी सापडला’, ‘शेठजीचे इलेक्शन’ आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात लोकप्रिय झालेले ‘माझी मुंबई’ अशी अनेक लोकनाट्य-वगनाट्य लिहून सादर केली.

गुलाबबाई संगमनेरकर:-
लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना महाराष्ट्र शासनाने २०१९-२० या वर्षीचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.तमाशाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कलेवर श्रद्धा ठेवून  तमाशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुलाबबाई यांनी 
लहानपणीपासूनच  लावणी नृत्यकलेत स्वतःला झोकून दिले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. गुलाबबाई  संगमनेरकर सुरुवातीला राधाबाई बुधगावकर पार्टीत काम करत होत्या.अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे .
बबूताई शिर्डीकर, सुगंधाबाई  सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. दुर्लक्षित राहिलेल्या या कलाप्रकारावर उदरनिर्वाह चालविताना गुलाबबाईंना त्याचा अभ्यास, शास्त्रीय व कलात्मक दर्जा ओळखून यशवंतराव चव्हाण, जयश्री गडकर, यशवंत दत्त यांसारखे चाहते लाभले. त्यांचे कार्यक्रम मुंबई-दिल्ली दूरदर्शनहून प्रसारित करण्यात आले होते. त्यांनी परदेशी पर्यटकांसमोर ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात सहभाग घेतला.आपल्या अभिनय व नृत्य कलेने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
ज्येष्ठ लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना यंदाचा (२०२०)तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. रुपये पाच लाख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो . त्या मराठी तमाशा परिषदेच्या सदस्य आणि पुण्यातील लावणी विकास संघाच्या मानद अध्यक्ष आहेत. गुलाबबाई  संगमनेरकर यांचे तमाशा क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.

तमाशातील अजरामर नाच्या :- गणपत पाटील
 
मराठी नाटय-चित्रपट अभिनेते मा.गणपत पाटील यांचा जन्म १९१९ साली कोल्हापूर येथे झाला.

तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अश्या परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.

दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्या सुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली. चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. मा.गणपत पाटील यांचे २३ मार्च २००८ रोजी निधन झाले. 

गणपत पाटील यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीवर ' रंग नटेश्वराचे' हे पुस्तक लिहिले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक आणि समाजोपयोगी साहित्य पुरवले. लावणी, गण, गवळण, पोवाडे, सवाल जवाब आणि वगनाट्य अशा सर्व प्रकारच्या लेखांतून त्यांनी भरीव असे योगदान दिले. महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१८-१९ सालच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.




#Article 203: पोवाडा (725 words)


पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद == पवद == पवड == पवाडा == पोवाडा) असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा, असा पोवाडा शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे .  

पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये पवद असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.

मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणाऱ्या आणि गाणाऱ्या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.

इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला.  त्या प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणाऱ्या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे. 

महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होनाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली.
 
हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ हे पुस्तक लिहून सन १८९१मध्ये प्रसिद्ध केले. यापैकी १० पोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.   

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे. 

महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले.

महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुऱ्याचे अनेक प्रयोग केले.

शाहीर पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर यांचे 'वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा', 'शाहिस्तेखानाचा पराभव' हे पोवाडे 

१. पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे वर्ग घेते. पिंपरी चिंचवडमध्येही पोवाडा शिक्षणाचे वर्ग सातत्याने चालतात.

२) शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच  ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन,संवर्धन,आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.
सेवानिवृत्त दारूबंदी सहाय्यक आयुक्त - समाज कल्याण, महाराष्ट्र शासन या पदावर काम केलेले राज्यशासनाचा राज्यसांस्कृतीक पुरस्कार प्राप्त *ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे* यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली  *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच * या संस्थेची सुरवात केली , पुढल्या वर्षी या संस्थेला १० वर्ष होत आहेत . या संस्थेने १० वर्षात केलेल्या कामाचा आढावा आपणांस पाठवीत आहे .
 *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच , औरंगाबाद .* 
     शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच  ही संस्था गेल्या  १० वर्षापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन, संवर्धन, आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. ह्यामुळे उदयोन्मुख शाहीर, वादक, कवी व कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात, स्पर्धेत या मंडळींनी वाहवा मिळविली आहे,तसेच अनेक कलावंत व्यावसायिक कसोटीला पात्र ठरले असून शाहिरी व लोककलेची पताका उंचावत आहे.
       शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाने आत्तापर्यंत *शाहिरी प्रशिक्षण शिबीर* , *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील बालशाहीर पुरस्कार* 

प्रथम बाल शाहीर पुरस्कार प्राप्त.
२) युवा शाहीर पृथ्वीराज माळी सांगली.
व इतर.आघाडीचे शाहीर
व *महिला शाहीर पुरस्कार*,शाहिरी गायन स्पर्धा , शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धा , शाहिरी पुस्तक प्रकाशन,ढोलकी प्रशिक्षण शिबीर , लोककलावंत मेळावे ,महिलांसाठी शाहिरी प्रशिक्षण शिबीर, शाहिरी सन्मान सोहळे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .
     आणि याच सोबत 'लोकरंग', 'अक्षरधारा' ,'रात्र शाहिरांची', 'रंग शाहिरीचे',' जागर आत्मशाहिरीचा',*आत्मरंग* अशा या माध्यमातून शाहिरीचे व लोककलेचे असणारे रंग महाराष्ट्रात उधळले आहे .

 आत्तापर्यंत मंचाने आठ बालशाहीर पुरस्कार प्रदान केले आहेत, याचे स्वरूप ५०००/- रु. रोख , स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा, श्रीफळ असे आहे . यामुळे बालशाहीरांना खूप प्रोत्साहन मिळाले असून यामुळे हे पुरस्कार प्राप्त बालशाहीर आज व्यावसायिक तसेच टीव्ही चॅनेल सारख्या कसोटीस पात्र ठरले आहे .
त्याचसोबत मंचातर्फे झालेले पुस्तक प्रकाशन -
१) *मराठवाड्याची शाहिरी* 
 ( मराठवाड्यातील ५० शाहिरांचा परिचय पुस्तक )
२) *शाहिरी ललकार* 
 ( मंचातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धेतील निवडक पोवाडे व गीत यांचे पुस्तक )
३) *शाहीर अज्ञानदास* 
  (आद्यशाहीर अज्ञानदास यांच्या माहितीचे पुस्तक )
४) *लोकरंग* 
  (ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे यांच्या पोवाडे व कवणाचे पुस्तक)
  हे साहित्य उपलब्ध आहे .
यासोबत शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच व लोककला प्रशिक्षण वर्ग - गरवारे कम्युनिटी सेंटर, गरवारे बालभवन , औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 

तरी असे हे शाहिरीचे व  लोककलेचे कार्य मंचातर्फे चालू आहे .
 

                   प्राचार्य दत्ता कांबळे 
  प्रकाशक -शाहीर आत्माराम यादव गौरव समिती कराड




#Article 204: लावणी (612 words)


लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे..  लावणी ही पारंपारिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे. लावणीमध्ये ढोलकी व तुणतुणे  या वाद्याचा साथीने सादर केली जाते. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठेच योगदान आहे.  महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशात लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया या नऊवारी साड्या परिधान करून लावणी म्हणतात. ही गाणी खटकेबाज ,प्रासयुक्त ,गेय  असतात.तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात लावणी अस्तित्वात असली तरी पेशवाईत तिला  वैभव प्राप्त झाले.लावणीला अलिकडे चांगली प्रतिष्ठा मिळाली आहे.तिचे स्वरुपही बदलले आहे.
भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत. लावणी हा नृत्यप्रकार मुख्यतः महाराष्ट्र या राज्यात बघायला मिळतो.

पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली.
'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला, हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान्‌पिढ्या गायली जात आहे.

'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यांत लावणीचा समावेश होता. महाराष्टातील संतांचे संस्कार हे तंतांवर होते. बाराव्या, तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतिपर्वात अनेक संत उदयाला आले ते भिन्न जातीपातीचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, तुलसीदास, महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकाराम,रामदास,एकनाथ, गोरोबा, सावता, चोखा, कान्होपात्रा, नरहरी अशी अनेक संत मंडळी विविध सामाजिक स्तरातील होती. संतांचा हा कार्यकाळ थेट १७ व्या शतकापर्यंतचा मानला जातो. 

त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यांत प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहिरांनी अनेक गण, लावण्या रचल्या. त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी, कवी बशीर मोमीन कवठेकर आदी कलावंतांनी गण, गौळणी, लावण्या, कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन कवठेकर यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य पुरवले. लावणी, गण, गवळण, पोवाडे, सवाल जवाब आणि वगनाट्य अशा सर्व प्रकारच्या लेखनातून त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. महाराष्ट्र सरकारने मोमीन कवठेकर यांना २०१७ सालच्या तमाशासम्रादणी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे.  कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते. संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदयकाळ मानला जातो.

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. 

प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छक्कड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

घुंगरांच्या बोलांचा आवाज, घोड्याच्या टापांसारखा काढण्याचे कसब या लावणी सम्राज्ञींनी आत्मसात केले होते. नृत्य, अदाकारी आणि गायन असा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या लावण्या, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, सुरेखा पुणेकर सादर करीत असत. 

अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवातून तसेच शासनाच्या लावणी महोत्सवातून अलीकडच्या काळात ज्या लावणी नर्तकी प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यात राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर आदींचा उल्लेख करावा लागेल. 

आशुक माशुक नार नाशिकची,
गोदे तटी रामाच्या घाटी चांदीची लोटी
बसले घाशीत
हशी खुशीने पदर सावरी गं
भिजे लुगडे वरती आवरी गं
हळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा
उडे चालताना बाईचा झुबा झुबा
पुढे रस्त्यात मैतर उभा उभा




#Article 205: महाराष्ट्रातील लोककला (412 words)


महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली . 

कीर्तन ,दशावतार तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा -उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य ,बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, गोंधळ ,जागरण, कलगीतुरा, लळीत ,बहुरूपे ,कुडमुडे जोशी, वासुदेव, यात  लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.लोककलेत पुढील प्रकारांचा समावेश होतो-

ही गीते बरेचदा चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे म्हणताना ती तुलनेने सोपी जातात,दादरा आणि केरवा या तालाच्या पलीकडे यांची लय जात नाही. सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व –दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ते ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.

वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.

अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला 
जनामातेला काम भारी 
घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी

यावे यावे जगजेठी 
तुमच्या नावाची आवड मोठी
खुटीला घालून मिठी

दोन बोलू सुखाच्या गोष्टी
अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चचलेल्या गितांना भीमगीते असे म्हणतात. मराठी भाषेत असंख्य भीमगीते गायली गेली आहेत. इतर अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा भीमगीतांती रचना झालेली आहे.भीमगीताचे वातावरण चैतन्य निर्माण करते. समोरच्या गर्दीला गाण्यातून बाबासाहेब समजावून सांगणे आणि परिवर्तन घडवणे यासारखा दुसरा आनंद नाही’, गायिका पंचशिला भालेराव हिची रोखठोक भूमिका नेहमीच आश्वासक वाटते. फिल्मी गाण्यांचा तिला कधीच मोह झाला नाही. खडतर परिस्थितीवर मात करून हजारो कार्यक्रम गाजवणारी ही सामर्थ्यशाली गायिका आहे.

गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥

अवचित कान्हा घरात शिरतो
दही दूध तूप चोरूनी खातो
धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥

पाण्यासी जाता घागर फोडी
भर रस्त्यावर पदराला ओढी
लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥

मुरलीधर हा नटखट भारी
खट्याळ काळा कृष्ण मुरारी
सोडू नका याला आता सोडू नका याला
चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥

उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी

माज्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्ह्यारी

पोथी पुस्तक  वाचताना  बाई कानीचा डूल हाले

सावळा बाळराजा सये कागद संग बोले

सरी बिंदलीच सोनं बाई सवाई सातरंग

इंद्रसभेचा सोनार ग  हरी घडविता झाला दंग

काळी चोळी , मोती जाळी

हार गुंफी गळया घाली

काळी करटूली कारली

वटी मैनाची भरली

आमी गौळणी बायका

इंद्रावनी गोष्ट  सांग

दिल्लीच्या नायका

झाडावरी मोर काय

बोलतो ऐका 

आई जगदंबा रेणूका सुंदरी

नांदसी तुळजापुरी

धरित्री गांजली दैत्याने

बुडाले अवघे जन जी ||

तेहतीस कोटी देव मिळुन

केले अंबेचे स्मरण जी

निघाली ग माय तेव्हा होमातुन

महिषासुर मर्दिला तिने जी||

File:वासुदेव.jpg|thumb|वासुदेव
File:Lavni.jpg|thumb|लावणी नृत्य
File:काटखेळ लोकनृत्य.jpg|thumb|काटखेळ लोकनृत्य
File:शिमगा सोंग - नकटा.jpg|thumb|शिमगा सोंग - नकटा
File:Aashaadhee Waari.jpg|thumb|वारकरी भजन
File:Vaghya.jpg|thumb|वाघ्या




#Article 206: भजन (145 words)


देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही  महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना  भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.

स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम),मृदंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महारापष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत.
शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही.

परदेशात चिन्मयानंद मिशन तसेच हरेकृष्ण संप्रदायाचे अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्तियोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. 




#Article 207: कीर्तन (1107 words)


वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.  

महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणार्‍या कीर्तनांत *नारदीय* कीर्तन आणि *वारकरी*कीर्तनअसे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा  भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.  

कीर्तन हा शब्द संस्कृतात 'कॄत्‌’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे.  या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी.  या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून  केल्या गेल्या. 

भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..

वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. 
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या  कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले.
 गोव्यात जीवन्मुक्त महाराजांनी पोर्तुगीजविरुद्ध कीर्तानातून क्रांती केली.

नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत. 
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संकीर्तन,नामसंकीर्तन,कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता)
भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे.  नंतरच्या काळात  वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.

कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं,
सख्यं आत्मनिवेदनम! अशा ९ भक्तींपैकी एक.  कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे.

कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.

कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात.१. पूर्वरंग आणि २. उत्तररंग 
नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात. 
सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते.  हे सर्व  कीर्तनकार एकट्याने करीत असतो. फारतर त्याला तबला-पेटी वाजविणार्‍यांची साथ असते.

संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्‌धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच  मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते. ⇨ पल्लवी ,  ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे एका गीताचे तीन भाग ह्या कीर्तनांतून प्रथमच प्रचारात आले. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनांचा एक विशेष प्रकार. त्यांत फक्त पल्लवी आणि चरण हे दोन गीतभाग आढळतात. चरणसंख्या बरीच असून सर्व चरण एकाच चालीत गायिले जातात,  किंबहुना कधीकधी पल्लवी आणि चरण ह्यांचीही चाल एकच असते. ⇨ त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम् रामदास ह्यांनी अशा प्रकारची कीर्तने रचिली

आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे. 

वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अश्या पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते.या माधमातून संतानी भक्तीमार्ग शिकविला.
     संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला.वारकरी कीर्तन ही सांस्कृृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली.

(सकलसंतगाथा) 

रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारीत असते. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात. श्रीधरस्वामी, केशवस्वामी , रंगनाथ स्वामी अश्या रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते.

१) संयुक्त कीर्तन
२) जुगलबंदी कीर्तन आणि
३) राष्ट्रीय कीर्तन.

पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली.  टाळ, मृदंग,  एकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात.

तबला
पेटी / ऑर्गन (ही पारंपरिक वाद्ये). हल्ली काही कीर्तनकार व्हायोलिनची साथ घेतात
चिपळ्या
झांज
करताल - हे एक वैशिष्टपूर्ण पारंपरिक वाद्य चार लाकडी पट्ट्यांच्या आधारे वाजवले जाते. महाराष्ट्रात काणे बुवा हे बुजुर्ग कीर्तनकार हे वाद्य वाजवितात

सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हे हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते. 

मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनी.  संत ज्ञानेश्वर,  संत एकनाथ,  संत तुकाराम, समर्थ रामदास हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले.  आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.

बंडातात्या कराडकर (कराडचे), संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, मामासाहेब दांडेकर, निजामपूरकर, भगवानबाबा,बाबामहाराज सातारकर, विठ्ठल दादा वास्कर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरनारायणबुवा काणे,  बालकीर्तनकार,किरण महाराज असवले-पाटील(जुळेवाडी,ता.पाटण जि. सातारा ) ,वै.सद्गुरू आनंद स्वामी उर्फ शंकर महाराज धोटे (तिरकवाडी ता.फलटण)असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत.

अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी,  विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत.

महाराष्ट्रात प्रथम वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदी येथे झाली.वै.मारुतीबोवा ठोंबरेंनी या संस्थेची मुहुर्तमेढ रोवली.त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी त्यांनी ही जबाबदारी वै.जोग महाराजांकडे सोपविली.जोग महाराजांनी अथक परिश्रम करुन ही संस्था ऊभी केली.

वारकरी पद्धतीचे कीर्तन शिकविणारी व विष्णुबुवा जोग यांनी स्थापन केलेली संस्था -वारकरी शिक्षण संस्था महाविद्यालय- आळंदीला आहे.

खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्‍तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही  खानदेशात कीर्तनकारांची संख्या वाढत आहे. खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत.




#Article 208: गोंधळ (900 words)


महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात.  गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभूमीवरील रंगाविष्‍काराला संस्‍थात्‍मक स्‍वरूप प्राप्‍त करून दिले आहे.

गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख असले तरी गोंधळ्यांनी रेणुराई आणि कदमराई अशाच आपल्‍या पोटजाती असल्‍याचे सांगितले. यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे.

लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळाच्‍या कुळाचारास अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. गोंधळ या विधिनाट्यात गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो. त्‍यांना देवीची गाणी मात्र येत असतात. आजचे गोंधळाचे जे प्रचलित स्‍वरूप आहे त्‍यात गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते. त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत.  तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो. आज रूढ असलेल्‍या गोंधळाच्‍या प्रकारात काकड्या गोंधळ व संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार आढळतात. काकड्या गोंधळ हे कोणत्‍याही जातीचे लोक करू शकतात, तर संबळ्या गोंधळ हा गोंधळी जातीचे लोकच घालतात. गोंधळ करण्‍याच्‍या पद्धतीत दोन्‍ही उपजातींच्‍या पोषाखामुळे आणि परंपरेने चालत आलेल्‍या संकेतांमुळे काही भेद निर्माण झाले आहेत. उदा. रेणुराई गोंधळी विधिनाट्याच्‍या वेळी समोर दिवटी ठेवतो. कदमराई गोंधळी हातात जळता पोत घेऊन गाणी म्‍हणतात. ते एका हाताने संबळ वाजवतात. कदमराई गोंधळ्यांनाच भुत्‍ये‚ राजदरबारी गोंधळी असे म्‍हणतात. गोंधळी हा गोंधळ विधी सादर करताना परंपरेने चालत आलेल्‍या सांकेतिक करपल्‍लवीने प्रेक्षकांना चकित करतात. करपल्‍लवीच्‍या वापराने त्‍यांचे सादरीकरण न केवळ चमत्‍कृतीपूर्ण होते तर नाट्यपूर्ण व रंजकही होते. परशुरामाने गोंधळ्याची निर्मिती कशी केली हे जसे ते कवनांमधून सांगतात त्‍याचप्रमाणे उदरनिर्वाहाची तरतूद भवानी मातेने आशीर्वाद दिल्‍यामुळे कशी झाली यासंबंधीची कथाही त्‍यांच्‍या कवनांतून गातात.

गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतिगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात. वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात. ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात. गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो. 

थोडक्यात, महाराष्‍ट्रातील लोकसंगीतात गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्‍थान महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्‍या भक्‍तांची भटकी जात आहे. गोंधळ हा लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी  देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे. 

संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, डिमडी, इत्यादी वाद्यांचा व हातातल्या दिवटीचा उपयोग केला जातो.

मुख्‍य गोंधळ्याच्‍या कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट असतो. तसेच गळ्यात कवड्यांची माळ असते. 

या लोककला प्रकारामध्‍ये मुखवट्याचा वापर केला जात नाही. 

पोषाखात झब्बा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा, मुंडासे, उपरणे इ. घटकांचा समावेश असतो.
 

या लोककला प्रकारामध्‍ये महिलांचा सहभाग असत नाही.
 

पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागात गोंधळ सादर केला जातो. गोंधळ सुरू होण्‍यापूर्वी पाच उसांची मखर केली जाते. त्‍यामध्‍ये देवीच्‍या स्‍वरूपात घट ठेवतात आणि गोंधळाला सुरुवात होते. या विधिनाट्याची सुरुवात गणेशस्‍तुतीने होते. कुलस्‍वामिनी अंबाबाईच्‍या विविध रूपांचे गायन केले जाते. व उत्तररंगात एखादे पौराणिक, सामाजिक किंवा देवाविषयीचे आख्‍यान सादर केले जाते. शेवटी भैरवीच्‍या माध्‍यमातून समारोप होतो. आरतीने शेवट होतो.
 

माहूर आणि तुळजापूर ही शक्तिपीठे आहेत.  रेणुकेच्‍या उपासकांना रेणुराई म्‍हणतात तर तुळजाभवानीच्‍या उपासकांना कदमराई असे म्‍हणतात. 

गोंधळी समाजातील लोकच ही लोककला सादर करताना दिसतात 

एके काळी चार- चार तास चालणारा गोंधळ आज तासाभरात उरकला जातो. वाढत्‍या मनोरंजनाच्‍या साधनांमुळे गोंधळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. गोंधळातील गीतांच्‍या चाली बदलत आहेत. योग्‍य तो प्रतिसाद मिळत नाही.एक  उपचार म्‍हणून आज गोंधळ पार पाडला जातो. 

लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवतात. 

या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवतांची नावे घेतात. त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्नदान केले जाते.

महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेले आहे. विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली.

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व  कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजांत कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

अंबे जोगवा दे जोगवा दे
माय माझ्या भवानी जोगवा दे ।

हे जसे शक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे-

मी मिरचीचे भांडण ।
एका रोज खटखटीन जी ॥
मिरची अंगी लईच ताठा ।
म्हणतिया मी हाई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जाते.

उदा.
रत्नागिरी ज्योतिबा ।
गोंधळा या हो ।
तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो।
पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।

असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो. संत एकनाथांनी -

द्वैत सारूनि माळ मी घालीन।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन।
भेदरहित वारीस जाईन।

असा जोगवा मागितला.

असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते.




#Article 209: शिक्षण (6108 words)


शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, प्रशिक्षण]‌], कथा सांगणे व संचलीत संशोधन]‌] यांचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःला सुद्धा शिकवू शकतात.  शिक्षण हे औपचारीक किंवा अनौपचारीक वातावरणात होऊ शकते व प्रत्येक अनुभव ज्याचा व्यक्तीच्या विचार करणे, अनुभवणे किंवा कृतींवर प्रगत परिणाम असतो त्यास शैक्षणीक गृहीत धरता येते. अध्यापनाच्या पद्धतीला अध्यापनशास्त्र म्हणतात.

औपचारीक शिक्षण हे औपचारीकपणे पुर्व प्राथमिक विद्यालय किंवा बालवाडी, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय]‌] व नंतर महाविद्यालय]‌], विद्यापीठ]‌] किंवा प्रशिक्षण या टप्प्यांमध्ये विभागले आहे.

काही शासन व संयुक्त राष्ट्रद्वारे शिक्षणाचा अधिकार मान्य केलेला आहे. बहुतांश भागात विशीष्ट वयापर्यंत शिक्षण अनिवार्य आहे. शैैैैैैक्षणिक सुुधारणेसाठी व विशेषतः प्रमाण आधारीत शिक्षणासाठी  एक चळवळ आहे.

औपचारिक शिक्षण
हे शिक्षण विद्यालय, महाविद्यालय आणि विश्वविद्यालय मध्ये दिले जाणारे औपचारिक शिक्षण म्हणटले जाते. या शिक्षणाचा उद्देश्य, पाठ्यचर्या आणि शिक्षण विधियाँ, सगळे निश्चित असते. हे योजनाबद्ध असते तसेच याची योजना कठोर असते. यात शिकणार्याला विद्यालय, महाविद्यालय अथवा विश्वविद्यालय च्या समय सारणी अनुसार कार्य करावे लागते. यात परीक्षा घेणे आणि प्रमाण पत्र प्रदान करण्याची व्यवस्था असते. या शिक्षणातील सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की व्यक्ति, समाज आणि राष्ट्राच्या आवश्यतेची पूर्तता करते. हे व्यक्ति मध्ये ज्ञान आणि कौशल्याचे विकास करते तसेच त्याला काही व्यवसाय अथवा उद्योग साठी योग्य बनवते. परन्तु हे शिक्षण खूप व्यय-साध्य असते याने धन, समय आणि ऊर्जा सगळे जास्त व्यय करावे लागते.

प्रागैतिहासात शिक्षणाचा प्रारंभ झाला, कारण प्रौढांनी बालकांना त्यांच्या समाजात आवश्यक मानलेले ज्ञान व कौशल्यामध्ये प्रशिक्षित केले. पुर्व साक्षर समाजात हे मौखिक व अनुकरणाच्या माध्यमातून साध्य व्हायचे. कथा सांगण्याने एकापासुन पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान, मुल्ये व कौशल्ये दिली. जसे  संस्कृतींनी त्यांच्या ज्ञानाचा सहज अनुसरणातून शिकल्या जाऊ शकणार्या कौशल्यांच्या पलीकडे विस्तार केला, तेव्हा औपचारीक शिक्षण निर्माण झाले. मध्य साम्राज्याच्या काळात इजिप्तमध्ये विद्यालये होते.

प्लॅटोने अथेंस येथे युरोपमधील पहिल्या उच्च अध्ययन प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली.  इ.स.पु. ३३० मध्ये स्थापन झालेले, इजिप्तमधील अलेक्झांड्रीया नगर हे प्राचीन ग्रीसच्या बुद्धीजिवीतेचा आधार म्हणुन अथेंसचे उत्तराधिकारी बनले. तिथे, इ.स.पु. ३ र्या शतकात अलेक्झांड्रीयाचे महान ग्रंथालय बांधले गेले. इ.स. ४७६ मध्ये युरोपीय समाजास रोमच्या पतनामुळे साक्षरता व संघटना कमतरतेचा सामना करावा लागला.

चीनमध्ये, लु राज्यातील, कंफुसिअस (५५१-४७९ इ.स.पु.) हा देशातील सर्वात प्रभावी प्राचीन विचारवंत होता, ज्याचा शैक्षणिक दृष्टिकोन चीन व शेजारील कोरिया, जपान व व्हिएतनामसारख्या समाजाला सतत प्रभावित करतो. कंफुसिअसने शिष्य गोळा केले व उत्तम शासनाच्या त्याच्या आदर्शांना स्विकारणार्या शासकाचा व्यर्थ शोध केला, पण त्याचे तत्वज्ञान शिष्यांनी लिहिलेले होते व आधुनिक काळात पुर्व आशियात सतत प्रभावित करते.

अझटेक समाजातसुद्धा चांगले विकसित शैक्षणिक सिद्धांत होते, ज्याला नहुआत्ल भाषेत त्लाकाहुआपाहुआलिझटली असे म्हणतात. त्याचा अर्थ व्यक्तीचे संगोपन करणे किंवा शिकवण्याची कला   किंवा व्यक्तीला सशक्त करणे किंवा उत्थान करणे असा होतो.  औपचारीक शिक्षा

र आधारलेली व समाज जीवनाद्वारे सशक्त झालेली ही शिक्षणाची व्यापक संकल्पना होती, जिने सांगितले की ते घरी सुरू ह. इतिहासतज्ञ दाखला देतात की औपचारीक शिक्षण सामाजिक वर्ग व लिंगभेद दुर्लक्षित करुन सर्वांसाठी अनिवार्य होते.  तेथे नेक्स्ट्लामॅचिलीझ्टली हा शब्द देखील होता, जो  चेह to्यावर शहाणपणा देण्याचे कार्य आहे.  या संकल्पनांमध्ये शैक्षणिक पद्धतींच्या जटिल संचाचे अधोरेखित होते, जे वैयक्तिक विकासाच्या उद्देशाने आणि समाजात त्याचे एकीकरण करण्याच्या उद्देशाने पुढील पिढीला भूतकाळातील अनुभव आणि बौद्धिक वारसा संप्रेषण करण्याच्या दिशेने होते. 

. There was also the word neixtlamachiliztli, which is the act of giving wisdom to the face. These concepts underscore a complex set of educational practices, which was oriented towards communicating to the next generation the experience and intellectual heritage of the past for the purpose of individual development and his integration into the community.

After the Fall of Rome, the Catholic Church became the sole preserver of literate scholarship in Western Europe. The church established cathedral schools in the Early Middle Ages as centres of advanced education. Some of these establishments ultimately evolved into medieval universities and forebears of many of Europe's modern universities. During the High Middle Ages, Chartres Cathedral operated the famous and influential Chartres Cathedral School. The medieval universities of Western Christendom were well-integrated across all of Western Europe, encouraged freedom of inquiry, and produced a great variety of fine scholars and natural philosophers, including Thomas Aquinas of the University of Naples, Robert Grosseteste of the University of Oxford, an early expositor of a systematic method of scientific experimentation, and Saint Albert the Great, a pioneer of biological field research. Founded in 1088, the University of Bologne is considered the first, and the oldest continually operating university.

मध्ययुगात इतरत्र, इस्लामिक विज्ञान आणि गणिताची पूर्वोत्तर इबेरियन द्वीपकल्प पासून पूर्वेस सिंधू आणि दक्षिणेकडील अल्मोराविड राजवटी व माली साम्राज्य पर्यंतच्या मध्य-पूर्वेस स्थापना केली गेलेली इस्लामिक खलिफाच्या अंतर्गत प्रगती झाली.Elsewhere during the Middle Ages, Islamic science and mathematics flourished under the Islamic caliphate which was established across the Middle East, extending from the Iberian Peninsula in the west to the Indus in the east and to the Almoravid Dynasty and Mali Empire in the south.

युरोपमधील नवनिर्मितीचा काळ नवीन ग्रीक आणि प्राचीन ग्रीक व रोमन सभ्यतांची वैज्ञानिक आणि बौद्धिक चौकशी आणि कौतुक करण्याच्या युगात सुरू झाला. १ 1450० च्या सुमारास, जोहान्स गुटेनबर्ग यांनी एक मुद्रण प्रेस विकसित केले, ज्यामुळे साहित्याची कामे अधिक वेगाने पसरली गेली. युरोपियन युग साम्राज्याने तत्वज्ञान, धर्म, कला आणि विज्ञान या विषयांतील शिक्षणाची युरोपियन कल्पना जगभर पसरली. मिशनरी आणि विद्वानांनी इतर संस्कृतींकडील नवीन कल्पनाही परत आणल्या - जसे चीन आणि युरोप यांच्यातील ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती प्रसारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा Jes्या जेसुइट चीन मिशनमुळे , युरोपमधील कृत्यांचे युक्लिडच्या घटकांचे भाषांतर चिनी विद्वानांसाठी आणि युरोपियन प्रेक्षकांसाठी कन्फ्यूशियसचे विचार. युरोपमध्ये अधिक धर्मनिरपेक्ष शैक्षणिक दृष्टीकोन उदयास आला.The Renaissance in Europe ushered in a new age of scientific and intellectual inquiry and appreciation of ancient Greek and Roman civilizations. Around 1450, Johannes Gutenberg developed a printing press, which allowed works of literature to spread more quickly. The European Age of Empires saw European ideas of education in philosophy, religion, arts and sciences spread out across the globe. Missionaries and scholars also brought back new ideas from other civilizations – as with the Jesuit China missions who played a significant role in the transmission of knowledge, science, and culture between China and Europe, translating works from Europe like Euclid's Elements for Chinese scholars and the thoughts of Confucius for European audiences. The Enlightenment saw the emergence of a more secular educational outlook in Europe.

आज बहुतेक देशांमध्ये, शालेय किंवा अन्यथा पूर्णवेळ शिक्षण हे एका विशिष्ट वयापर्यंतच्या मुलांसाठी अनिवार्य आहे. यामुळे लोकसंख्या वाढीसह अनिवार्य शिक्षणाचा प्रसार, युनेस्कोने केले आहे की पुढील .० वर्षांत आतापर्यंतच्या मानवी इतिहासापेक्षा जास्त लोकांना औपचारिक शिक्षण मिळेलIn most countries today, full-time education, whether at school or otherwise, is compulsory for all children up to a certain age. Due to this the proliferation of compulsory education, combined with population growth, UNESCO has calculated that in the next 30 years more people will receive formal education than in all of human history thus far.

Formal education occurs in a structured environment whose explicit purpose is teaching students. Usually, formal education takes place in a school environment with classrooms of multiple students learning together with a trained, certified teacher of the subject. Most school systems are designed around a set of values or ideals that govern all educational choices in that system. Such choices include curriculum, organizational models, design of the physical learning spaces (e.g. classrooms), student-teacher interactions, methods of assessment, class size, educational activities, and more.

The International Standard Classification of Education (ISCED) was created by UNESCO as a statistical base to compare education systems.In 1997, it defined 7 levels of education and 25 fields, though the fields were later separated out to form a different project. The current version ISCED 2011 has 9 rather than 7 levels, created by dividing the tertiary pre-doctorate level into three levels. It also extended the lowest level (ISCED 0) to cover a new sub-category of early childhood educational development programmes, which target children below the age of 3 years.

Education designed to support early development in preparation for participation in school and society. The programmes are designed for children below the age of 3. This is ISCED level 01.  Preschools provide education from ages approximately three to seven, depending on the country when children enter primary education. The children now readily interact with their peers and the educator. These are also known as nursery schools and as kindergarten, except in the US, where the term kindergarten refers to the earliest levels of primary education. Kindergarten provide[s] a child-centred, preschool curriculum for three- to seven-year-old children that aim[s] at unfolding the child's physical, intellectual, and moral nature with balanced emphasis on each of them. This is ISCED level 02. 

This is ISCED level 1.  Primary (or elementary) education consists of the first four to seven years of formal, structured education. They are typically designed to provide young children with functional literacy and numeracy skills and to is guaranteed, solid foundation for most areas of knowledge and personal and social development to support the transition to secondary school. In general, primary education consists of six to eight years of schooling starting at the age of five to seven, although this varies between, and sometimes within, countries. Globally, in 2008, around 89% of children aged six to twelve were enrolled in primary education, and this proportion was rising. Under the Education For All programs driven by UNESCO, most countries have committed to achieving universal enrollment in primary education by 2015, and in many countries, it is compulsory. The division between primary and secondary education is somewhat arbitrary, but it generally occurs at about eleven or twelve years of age. Some education systems have separate middle schools, with the transition to the final stage of secondary education taking place at around the age of fifteen. Schools that provide primary education, are mostly referred to as primary schools or elementary schools. Primary schools are often subdivided into infant schools and junior school.

In India, for example, compulsory education spans over twelve years, with eight years of elementary education, five years of primary schooling and three years of upper primary schooling. Various states in the republic of India provide 12 years of compulsory school education based on a national curriculum framework designed by the National Council of Educational Research and Training.

This covers the two ISCED levels, ISCED 2: Lower Secondary Education and ISCED 3: Upper Secondary Education. 

In most contemporary educational systems of the world, secondary education comprises the formal education that occurs during adolescence.  In the United States, Canada, and Australia, primary and secondary education together are sometimes referred to as K-12 education, and in New Zealand Year 1–13 is used. The purpose of secondary education can be to give common knowledge, to prepare for higher education, or to train directly in a profession.

Secondary education in the United States did not emerge until 1910, with the rise of large corporations and advancing technology in factories, which required skilled workers. In order to meet this new job demand, high schools were created, with a curriculum focused on practical job skills that would better prepare students for white collar or skilled blue collar work. This proved beneficial for both employers and employees, since the improved human capital lowered costs for the employer, while skilled employees received higher wages.

Secondary education has a longer history in Europe, where grammar schools or academies date from as early as the 6th century,  in the form of public schools, fee-paying schools, or charitable educational foundations, which themselves date even further back.

It spans the period between the typically universal compulsory, primary education to the optional, selective tertiary, postsecondary, or higher education of ISCED 5 and 6 (e.g. university), and the ISCED 4 Further education or vocational school.

Depending on the system, schools for this period, or a part of it, maybe called secondary or high schools, gymnasiums, lyceums, middle schools, colleges, or vocational schools. The exact meaning of any of these terms varies from one system to another. The exact boundary between primary and secondary education also varies from country to country and even within them but is generally around the seventh to the tenth year of schooling.

Programs at  ISCED level 2, lower secondary education are usually organized around a more subject-oriented curriculum; differing from primary education. Teachers typically have
pedagogical training in the specific subjects and, more often than at ISCED level 1, a class of
students will have several teachers, each with specialized knowledge of the subjects they teach.
Programmes at ISCED level 2, aim is to lay the foundation for lifelong learning and human development upon  introducing theoretical concepts across a broad range of subjects which can be developed in future stages.  Some education systems may offer vocational education programs during ISCED level 2 providing skills relevant to employment. 

Programs at ISCED level 3, or upper secondary education, are typically designed to complete the secondary education process. They lead to skills relevant to employment and the skill necessary to engage in tertiary courses. They offer students more varied, specialized and in-depth instruction. They are more differentiated, with range of options and learning streams. 

Community colleges offer another option at this transitional stage of education. They provide nonresidential junior college courses to people living in a particular area.

Higher education, also called tertiary, third stage, or postsecondary education, is the non-compulsory educational level that follows the completion of a school such as a high school or secondary school. Tertiary education is normally taken to include undergraduate and postgraduate education, as well as vocational education and training. Colleges and universities mainly provide tertiary education. Collectively, these are sometimes known as tertiary institutions. Individuals who complete tertiary education generally receive certificates, diplomas, or academic degrees.

The ISCED distinguishes 4 levels of tertiary education. ISCED 6 is equivalent to a first degree, ISCED 7 is equivalent to a masters or an advanced professional qualification and ISCED 8  is an advanced research qualification, usually concluding with the submission and defence of a substantive dissertation of publishable quality based on original research.  The category ISCED 5 is reserved for short-cycle courses of requiring degree level study. 

Higher education typically involves work towards a degree-level or foundation degree qualification. In most developed countries, a high proportion of the population (up to 50%) now enter higher education at some time in their lives. Higher education is therefore very important to national economies, both as a significant industry in its own right and as a source of trained and educated personnel for the rest of the economy.

University education includes teaching, research, and social services activities, and it includes both the undergraduate level (sometimes referred to as tertiary education) and the graduate (or postgraduate) level (sometimes referred to as graduate school). Some universities are composed of several colleges.

One type of university education is a liberal arts education, which can be defined as a college or university curriculum aimed at imparting broad general knowledge and developing general intellectual capacities, in contrast to a professional, vocational, or technical curriculum. Although what is known today as liberal arts education began in Europe, the term liberal arts college is more commonly associated with institutions in the United States such as Williams College or Barnard College.

Vocational education is a form of education focused on direct and practical training for a specific trade or craft. Vocational education may come in the form of an apprenticeship or internship as well as institutions teaching courses such as carpentry, agriculture, engineering, medicine, architecture and the arts.
 Post 16 education, adult education and further education involve continued study, but a level no different from that found at upper secondary, and are grouped together as ISCED 4, post-secondary non-tertiary education. 

In the past, those who were disabled were often not eligible for public education. Children with disabilities were repeatedly denied an education by physicians or special tutors.  These early physicians (people like Itard, Seguin, Howe, Gallaudet) set the foundation for special education today. They focused on individualized instruction and functional skills.  In its early years, special education was only provided to people with severe disabilities, but more recently it has been opened to anyone who has experienced difficulty learning.

मुख्य लेख: वैकल्पिक शिक्षण

आज पर्यायी मानले जात असताना, बहुतेक वैकल्पिक प्रणाली प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. १९ व्या शतकाच्या सुरूवातीस सार्वजनिक शाळा प्रणाली व्यापकपणे विकसित झाल्यानंतर, काही पालकांना नवीन प्रणालीमुळे असंतुष्ट होण्याचे कारण आढळले. पारंपारिक शिक्षणाच्या कथित मर्यादा आणि अपयशाच्या प्रतिक्रियेच्या रूपात काही प्रमाणात वैकल्पिक शिक्षण विकसित केले. पर्यायी शाळा , स्वत: ची शिक्षण , गृहशिक्षण आणि कृती आधारित अनौपचारिक शिक्षण(अनस्कूलिंग) यासह शैक्षणिक दृष्टिकोनाची विस्तृत श्रृंखला उदयास आली. उदाहरणार्थ पर्यायी शाळांमध्ये मॉन्टेसरी शाळा , वॉलडॉर्फ शाळा (किंवा स्टीनर शाळा), फ्रेंड्स शाळा , सँड्स शाळा , समरहिल शाळा , वाल्डनचा पथ , पीपल उपवन शाळा , सुडबरी खिंड शाळा , कृष्णमूर्ती शाळा आणि खुल्या वर्गातल्या शाळा समाविष्ट आहेत.

सनदी शाळा ही पर्यायी शिक्षणाचे आणखी एक उदाहरण आहे, ज्यात अलिकडच्या काळात अमेरिकेत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे आणि सार्वजनिक शिक्षण प्रणालीत त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

१९ व्या शतकातील जर्मनीतील बालवाडीच्या शिक्षणाबद्दल फ्रेडरिक फ्रॅबेल यांनी जसे बालवाडीच्या वर्गात एकत्र केले होते त्याप्रमाणे या प्रयोगांमधून आणि नमुनेदार आव्हानांमधून काही कल्पना शिक्षणाच्या रुढी म्हणून स्वीकारल्या जाऊ शकतात. इतर प्रभावी लेखक आणि विचारवंतांमध्ये स्विस मानवतावादी जोहान हेनरिक पेस्तलोझी  ; अमोस ब्रॉन्सन अल्कोट , रॅल्फ वाल्डो इमर्सन आणि हेन्री डेव्हिड थोरॉ हे अमेरिकन तत्ववेत्ते ; पुरोगामी शिक्षणाचे संस्थापक, जॉन डेवी आणि फ्रान्सिस पार्कर ; आणि मारिया माँटेसरी आणि रुडॉल्फ स्टीनर आणि शैक्षणिक प्रणेते आणि अलीकडे जॉन कॅल्डवेल हॉल्ट , पॉल गुडमॅन , फ्रेडरिक मेयर , जॉर्ज डेनिसन आणि इव्हान इलिच यांचा समावेश आहे.

स्वदेशी शिक्षण म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक शैक्षणिक प्रणालींमध्ये स्वदेशी ज्ञान, नमुने, पद्धती आणि सामग्री समाविष्ट करणे होय. वसाहतीनंतरच्या संदर्भात, स्थानिक शिक्षणाच्या पद्धतींची वाढती ओळख आणि उपयोग ही वसाहतवादाच्या प्रक्रियेतून स्थानिक ज्ञान व भाषेची धूप आणि तोटा याला प्रतिसाद ठरू शकते. याव्यतिरिक्त, हे स्वदेशी समुदायांना त्यांच्या भाषा आणि संस्कृतींचा पुन्हा अधिकार सांगण्यास आणि त्यांचे मूल्यमापन करण्यास आणि त्याद्वारे स्वदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश सुधारण्यास सक्षम करू शकते.

आर्थिक सहकार आणि विकास संस्था (ओईसीडी) द्वारा परिभाषित शिक्षणाच्या तीन प्रकारांपैकी अनौपचारिक शिक्षण ही एक आहे. अनौपचारिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी  जसे की घरी , कामावर आणि दैनंदिन संवादातून आणि समाजातील सदस्यांमधील सामायिक संबंधांद्वारे होते. बर्‍याच शिकणार्यांसाठी, यात भाषा संपादन , सांस्कृतिक नियम आणि शिष्टाचार समाविष्ट आहेत.

अनौपचारिक शिक्षणामध्ये, बर्‍याचदा संदर्भ व्यक्ती, एक समवयस्क किंवा तज्ञ असतो, जे शिकणार्‍याला मार्गदर्शन करतात. जर विद्यार्थ्यांना अनौपचारिकपणे शिकवल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये वैयक्तिक रस असेल तर त्यांचे विद्यमान ज्ञान वाढविण्याकडे आणि शिकलेल्या विषयाबद्दल नवीन कल्पना गृहीत धरायला शिकणार्यांचा कल असतो. उदाहरणार्थ, संग्रहालयाला पारंपारिकपणे एक अनौपचारिक शिकण्याचे वातावरण मानले जाते, कारण तेथे विनामूल्य निवड, विविधता आणि संभाव्य-अ-प्रमाणित विषयांची श्रेणी, लवचिक संरचना, सामाजिक समृद्ध संवाद आणि बाह्यरित्या लागू केलेले मूल्यांकन नाही.

अनौपचारिक शिक्षण बहुतेक वेळा शैक्षणिक आस्थापनांच्या बाहेरील ठिकाणी होते आणि विशिष्ट अभ्यासक्रमाचे पालन करत नाही, हे शैक्षणिक वातावरणात आणि अगदी औपचारिक शिक्षण परिस्थितीत देखील उद्भवू शकते. शिक्षक त्यांच्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये अनौपचारिक शैक्षणिक कौशल्यांचा थेट वापर करण्यासाठी त्यांचे धडे रचू शकतात.

स्वशिक्षण हे स्वयं-निर्देशित शिक्षण आहे. एखाद्याच्या आयुष्यातील जवळजवळ कोणत्याही क्षणी एखादा स्वयंंशिक्षित होऊ शकतो. उल्लेखनीय स्वयंशिक्षितांमध्ये अब्राहम लिंकन (अमेरिकन अध्यक्ष), श्रीनिवास रामानुजन (गणितज्ञ), मायकेल फॅराडे (रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ), चार्ल्स डार्विन (निसर्गशास्त्रज्ञ), थॉमस अल्वा एडिसन (शोधक), टाडो अंडो (वास्तुविशारद), जॉर्ज बर्नार्ड शॉ (नाटककार), फ्रँक झप्पा (संगीतकार, ध्वनिमुद्रण अभियंता, चित्रपट दिग्दर्शक) आणि लिओनार्डो दा विंसी (अभियंता, वैज्ञानिक, गणितज्ञ) यांचा समावेश होतो.

पुरावा-आधारित शिक्षण म्हणजे कोणत्या शैक्षणिक पद्धती उत्तम कार्य करतात हे निर्धारित करण्यासाठी सुयोग्य योजना केलेल्या वैज्ञानिक अभ्यासाचा वापर होय. यात पुरावा-आधारित अध्यापन आणि पुरावा-आधारित अध्ययन असते. अंतरावरील पुनरावृत्तीसारख्या पुरावा-आधारित शिक्षण पद्धती शिकण्याचे प्रमाण वाढवू शकतात. पुरावा-आधारित शिक्षण चळवळीचे मूळ पुरावा-आधारित-पद्धतींबद्दलच्या मोठ्या चळवळीत आहे.

बर्‍याच मोठ्या विद्यापीठ संस्था आता हार्वर्ड , एमआयटी आणि बर्कलेसारखे ईडीएक्स तयार करण्यासाठी विनामूल्य किंवा जवळजवळ विनामूल्य अभ्यासक्रम देण्यास प्रारंभ करीत आहेत. मुक्त शिक्षण देणारी अन्य विद्यापीठे अशी प्रतिष्ठित खासगी विद्यापीठे आहेत जसे की स्टॅनफोर्ड , प्रिन्सटन , ड्यूक , जॉन्स हॉपकिन्स , पेनिलव्हानिया विद्यापीठ आणि कॅलटेक , तसेच सिंघुआ , पेकिंग , एडिनबर्ग , मिशिगन विद्यापीठ आणि व्हर्जिनिया विद्यापीठ यासारख्या नामांकित सार्वजनिक विद्यापीठे. 

मुद्रण यंत्रापासुन लोकांना शिकण्याच्या पद्धतीतील सर्वात मोठे बदल मुक्त शिक्षणास म्हणतात. परिणामकारकतेवर अनुकूल अभ्यास करूनही, बरेच लोक सामाजिक आणि सांस्कृतिक कारणांसाठी पारंपारिक संकुुल शिक्षण निवडण्याची इच्छा बाळगू शकतात.

बर्‍याच मुक्त विद्यापीठे विद्यार्थ्यांना प्रमाणित चाचणी आणि पारंपारिक पदव्या आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्याची क्षमता ठेवण्याचे कार्य करत आहेत.

पारंपारिक गुणवत्ता-प्रणाली पदवी सध्या संकुल विद्यापीठांप्रमाणेच मुक्त शिक्षणाइतकी प्रचलित नाही, जरी आधीच संयुक्त राजतंत्रमधील मुक्त विद्यापीठ सारखे काही मुक्त विद्यापीठ पारंपारिक पदव्या प्रदान करतात. सध्या, बरेच मोठे मुक्त शिक्षण स्त्रोत त्यांचे स्वतःचे प्रमाणपत्र देतात. मुक्त शिक्षणाच्या लोकप्रियतेमुळे, ही नवीन प्रकारची शैक्षणिक प्रमाणपत्रे पारंपारिक पदव्यांपेक्षा अधिक आदर आणि समान  शैक्षणिक मूल्य  मिळवित आहेत.

२००९ मध्ये सर्वेक्षण झालेल्या १८२ महाविद्यालयांपैकी जवळपास अर्ध्यांनी सांगितले की, संगणकांतर्गत अभ्यासक्रमांसाठीचे अध्यापन संकुल-आधारित अध्यापनापेक्षा जास्त आहे.

नुकत्याच झालेल्या विश्लेषणामध्ये असे आढळले आहे की संगणकांतर्गत आणि मिश्रित शैक्षणिक पध्दतींचा संपूर्णपणे समोरासमोर ठेवणार्‍या पद्धतींपेक्षा चांगला परिणाम होता.

शिक्षण क्षेत्र किंवा शिक्षण प्रणाली हे संस्थांचा (शिक्षण मंत्रालये, स्थानिक शैक्षणिक विभाग, शिक्षक प्रशिक्षण संस्था, विद्यालये, विद्यापीठ, इ.) गट आहे, ज्यांचा प्राथमिक उद्देश्य शैक्षणिक वातावरणामधील बालक व तरुण व्यक्तींना शिक्षण पुरवणे हा आहे. यात अनेक व्यक्तींचा (अभ्यासक्रम निर्माते, निरीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, रुग्णसेवक इ.) समावेश होतो. या संस्था विविध अनुषंगाने वेगळ्या असू शकतात.

शिक्षण प्रणालीचे इतर विविध घटक जसे की शिक्षण धोरणे व मार्गदर्शक तत्वे- ज्यांचा विद्यालय धोरणे संदर्भ घेऊ शकतात- अभ्यासक्रम व अध्ययन साहित्य, तसेच पुर्व व सेवेअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यांच्या साहाय्याने, विद्यालये शिक्षण देतात. विद्यालय वातावरणसुद्धा- भौतिक (स्थापत्य) व मानसिक (विद्यालय वातावरण) हे दोन्ही- विद्यालय धोरणांद्वारे मार्गदर्शीत आहे, ज्याने विद्यार्थ्यांचे हित जोपासले पाहिजे, जेव्हा ते विद्यालयात असतात.

आर्थिक सहकार्य व विकास संस्थेला असे आढळले की, जेव्हा मुख्याध्यापकांना संपुर्ण अधिकार व पदवीवर मुलभुत विषयांत प्रविण असण्याची जबाबदारी असते, तेव्हा विद्यालयांचा सर्वोत्तम सादरिकरणाकडे कल असतो. दर्जाची हमी व सुधारणेसाठी ते विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया घेतात. शासनांनी विद्यार्थी निपुणतेची परिक्षा घेण्यापासुन स्वतःस मर्यादित केले पाहिजे.  

ncy.

शिक्षण क्षेत्र हे काही भागधारक व इतर क्षेत्रासोबत परस्पर संबंधांच्या माध्यमातून समाजाशी पुर्णपणे एकरुप झाले आहे. यात पालक, धार्मिक नेते, अशासकीय संघटना, आरोग्य, बालक सुरक्षा, न्याय व अंमलबजावणी, माध्यमे व राजकीय नेतृत्व यांचा समावेश होतो.



#Article 210: आत्माराम रावजी देशपांडे (179 words)


आत्माराम रावजी देशपांडे (जन्म : मूर्तिजापूर, ११ सप्टेंबर १९०१; मृत्यू : ८ मे १९८२) हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

मूर्तिजापूर ह्या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा अभ्यासक्रम करीत असतानाच त्यांचा कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय झाला, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर होऊन, प्रेमाची ६ ऑक्टोबर  १९२९ रोजी विवाहात परिणती झाली. . 

पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कवी अनिलांनी कलकत्त्याला प्रयाण केले. तेथे त्यांना अवींद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी व नंतर सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे त्यांची सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९५६ साली दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राच्या मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार ह्या पदांवर त्यांच्या नेमणुका झाल्या.

कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.

कवी अनिलांचे ८ मे १९८२ रोजी नागपूर येथे निधन झाले.




#Article 211: राम गणेश गडकरी (933 words)


राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.

विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.

गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी  नवसारी येथील गणदेवी या गावात  झाला. वयाच्या ८ व्या  वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी  निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती   नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.

गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला.  संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य:-

भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :- 
भांबूराव : आंबेमोहर काय भाव?
दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला. 
भांबूराव : बोला; एकच गोष्ट
दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.
भांबूराव : जातो.
दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.
भांबूराव : साडे पंच्विस द्या.
दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?)
भांबूराव : पल्ला.
दाणेवाला : चला माप घ्या. 

हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :- 

आंबे॒मो | हर का | य भाव | असडी
सत्तावि |साने | दिला
बोला; | एकच गोष्ट |
हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.| 
जातो |
माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |
साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? |
पल्ला. || चला माप घ्या. ||

(अपूर्ण)

राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-

राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्याचा निखालस खोटा आरोप ठेवून त्यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी उचकटला व मुठा नदीत बुडवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली. पुतळ्याच्या जागेवर तूर्तास गडकरींची तसबीर ठेवली आहे. लवकरच तेथे गडकरींचा नवीन पुतळा उभारला जावा अशी पुणेकरांची इच्छा आहे.

या गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे बाहेर काढण्यात आली.

कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी सन १९९८ मध्ये सावनेर तालुक्यात हेटीसुरला येथे राम गणेश गडकरी साखर कारखाना काढला. तो काही वर्षे चालला. पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे त्यावरील कर्ज वाढत गेले. सन २००५मध्ये कर्जाची रक्कम ७१.४६ कोटी रुपयांवर पोहोचली. ६० दिवसांची जप्तीची नोटीस बजावायची आणि कारखान्याची संपत्ती विक्रीस काढायची, अशी कर्जवसुलीची पद्धत रूढ झाली होती. कारखाना विक्रीस काढण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन केले जाते. सावनेर तालुक्यातील या कारखान्याच्या ११०.८० एकर जमिनीचे मूल्यांकन के.आर.व्ही. चारी आणि व्ही.आर. देशकर यांनी २६ कोटी ३१ लाख रुपये इतके ठरवले. त्यात कारखान्याची यंत्रसामग्री, जमिनीची किंमत आणि इमारत अशा सगळ्यांचा समावेश होता. ही किमान रक्कम आल्याशिवाय कारखाना विक्री करू नये, असा नियम असला तरी या कारखान्याची केवळ १३ कोटी ३६ लाखांत विक्री करण्यात आली.

हा राम गणेश सहकारी साखर कारखाना सात वर्षे बंद होता. कसेबसे तीन उसाच्या हंगामांचे गाळप झाले होते. कारखाना बंद पडल्यावर तेथील यंत्र सामग्रीची चोरी झाली.  कारखाना विकल्यावर तेथील यंत्रे राहुरीमध्ये आणून तो कारखाना सुरू करण्यात आला.

राम गणेश गडकरी यांच्या कारकिर्दीवर श्रीराम रानडे यांनी लिहिलेला आणि विजय गोविंद यांनी सादरीकरण केलेला हा श्राव्य कार्यक्रम आहे. 




#Article 212: टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी (140 words)


टोपणनावाला इंग्रजीत 'निकनेम' (Nickname) म्हणतात. मराठीले अनेक लेखक 'निकनेम'ने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :-

     

मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. (अपवाद - सौमित्र)

काही मराठी आणि अन्य कवी/लेखकांच्या टोपणनावांची ही यादी :



#Article 213: महाराष्ट्र गान (153 words)


बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे

आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे

अटकेवर जेथले तुरंगी जल पिणे

तेथ अडे काय जलाशय नदाविणे

पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें

सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें

रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे

रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे

शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे

चतुरंग चमूचेही शौर्य मावळे

दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले

भासत शतगुणित जरी असति एकले

यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥ 

विक्रम वैराग्य एक जागि नांदती 

जरी पटका भगवा झेंडाहि डोलती

धर्म-राजकारण समवेत चालती

शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती

पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ॥ ४ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो

स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो

वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो

सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो

देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा॥ ५ ॥ 




#Article 214: रवींद्रनाथ ठाकूर (1203 words)


 (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, इ.स. १८६१ - ऑगस्ट ७, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते. 

बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा. 

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात  जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत.
पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत. ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे),  अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले. 

१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात  मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध कविता निर्झरेर स्वप्नभंग आदी रचना लिहिल्या. 

बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९-नोव्हेंबर-१८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनाव भावतारिणी १८७३-१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.  १८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्‍नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.

१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९-जाने-१९०५ ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. 

१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे श्री-निकेतन असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

 संसद सदस्यांसोबत १९३२ .
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्‌र्‍यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.  याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), and चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०), गल्पस्वल्प (१९४१).

रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते. ७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.

रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.. कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली  'मनेर मानुष' (मनातील माणूस) आणि 'जीवन देवता' ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.

गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (titleः प्रार्थना) मराठी भाषांतर

प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर 
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे 
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा 
एवढीच माझी इच्छा|

जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|

माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे 
एवढीच माझी इच्छा|

माझे ओझे हलके करून 
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी 
एवढीच माझी इच्छा|

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन 
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|

रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे. 

गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात. 

'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी'वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. 
'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.

रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.




#Article 215: भारतरत्‍न (376 words)


भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.

 भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.

इ.स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.

पुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते :

राष्ट्रपतींनी दि. ८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रातून पदकासंबंधी काही नवीन बदल अधिसूचित केले. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :

सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात २०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते.  

'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.हा पुरस्कार मिळणे खूप मानाचे समजले जाते.




#Article 216: पांडुरंग वामन काणे (891 words)


महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे (जन्म : पेढे परशुराम , तालुका [चिपळूण , जिल्हा : रत्नागिरी, ७ मे १८८०, मृत्यू : १८ एप्रिल १९७२) हे भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते.

कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले. म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव ! डॉ. पां. वा. काणे यांचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते. 

पां.वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरु केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अश्या रीतीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाले. नंतर झाला वेदान्त पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम.ए. झाले. त्यानंतर  ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. झाले.  या परीक्षेत त्यांना व्ही.एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले. त्यांना मराठी, हिंदी,इंग्रजी खेरीज संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या.  

काणेंनी १९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.

प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे ग्रंथ त्यांच्या महत्त्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यांवर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.

प्राचीन ज्योतिषशास्त्र, खगोलविद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मीमांसा, सांख्य तत्त्वज्ञान, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, धर्मशास्त्र, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय/परीक्षणे लिहिली आहेत. यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका आणि प्रचंड विस्तार लक्षात येतो.

ब्रिटिशांनी येथे आपले बस्तान बळकट करतांनाच इथल्या संस्कृती, विद्या, ग्रंथ, प्रथा, समाज, रूढी यांची कुचेष्टा सुरू केली. मिशनऱ्यांनी हिंदू धर्माची विविधांगी टिंगल सुरू केली. त्यांमध्ये त्यांनी इथल्या काही तथाकथित विद्वानांनाही सामील करून घेतले. इंग्रजीतील एखादी कविता ही संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे अत्यंत उर्मट उद्गार, मेकॉलेसारख्या अधिकाऱ्याने काढले होते. लॉर्ड कर्झनने तर भारतीयांना सत्य म्हणजे काय याची कल्पनाच नसल्याची दर्पोक्ती केली होती. डॉ.काणे या सर्व गोष्टींनी व्यथित झाले होते. १९२६ मध्ये त्यांनी व्यवहारमयूख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमविलेली कागदपत्रे आणि अन्य साधने, आजवरचे धर्म आणि कायदा यांचे ज्ञान अशा भक्कम तयारीनिशी त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. इंग्रज आणि इतर युरोपीय देशांना कळावे म्हणून त्यांनी हा परिपूर्ण इतिहास इंग्रजीत लिहिला. सुमारे ७००० पाने आणि ५ खंडांमध्ये त्यांनी लिहिलेला हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक आणि प्रमाण म्हणून मानला जातो. 

समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे ही डॉ. काणेंची वैशिष्ट्ये होती.

भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.

विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते.

आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९  या काळात पां.वा. काण्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

महामहोपाध्याय पां.वा. काणे ह्यांना सन १९६३मध्ये भारताचा  भारतरत्न  हा सर्वोच्च नागरी 'किताब देण्यात आला.
भारतात २०१९ सालापर्यंत ४५ व्यक्तींना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला. भारतीय टपाल खात्याचा एक खास नियम आहे. सहसा जिवंत व्यक्तीवर टपाल तिकीट काढले जात नाही. तथापि या नियमाला अपवाद म्हणून आजवरच्या इतिहासात डॉ. विश्वेश्वरैय्या, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजीव गांधी, मदर तेरेसा आणि सचिन तेंडुलकर या पाच व्यक्तींवर त्यांच्या हयातीतच टपाल तिकिटे प्रसिद्ध झाली. डॉ. विश्वेश्वरैय्या, महर्षी कर्वे यांना भारतरत्न सन्मान मिळाला आणि त्यांनी वयाची शंभरी पार केली म्हणून त्यांच्यावर हयातीतच टपाल तिकीट निघाले. कॉंग्रेसच्या शताब्दीनिमित्त तत्कालीन पक्षाध्यक्ष म्हणून राजीवजींवर तिकीट निघाले. मदर तेरेसांना नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यावर, घाईघाईने आपल्या सरकारने त्यांना भारतरत्न दिले आणि तिकीटही प्रसिद्ध केले. २०० कसोटी पूर्ण करण्याच्या जागतिक विक्रमाबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकरवर दोन तिकिटे निघण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. मात्र लता मंगेशकर आणि अमर्त्य सेन हे दोन्हीही भारतरत्न हयात असल्याने त्यांच्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध झाले नाही.

डॉ. पां. वा. काणे हे अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांना अनेक सर्वोच्च सन्मान लाभले. त्यांना भारतरत्न देण्यात आल्यावर खरेतर त्या किताबाचीच शान वाढली. पण आजवर प्रत्येक भारतरत्नावर टपाल तिकीट काढणारे भारतीय टपाल खाते आणि सरकार, फक्त डॉ. पां. वा. काणे यांनाच साफ विसरले. नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, मोरारजी देसाई असल्या भारतरत्नांवर तर अनेकदा टपाल तिकिटे निघाली. मग फक्त डॉ. पां. वा. काणे यांच्यावरच एकदासुद्धा टपाल तिकीट न काढण्याचे कारण समजत नाही. 




#Article 217: माणिक सीताराम गोडघाटे (1692 words)


माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. वाऱ्याने हलते रान ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत.

१० मे, १९३७ रोजी नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती. कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. इ.स. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.  

इ.स. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी ग्रेस हे साहित्यिक नाव धारण केले.  दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.  वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन  खास गोष्टी संध्याकाळच्या कविता  ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.

श्रीनिवास हवालदार (निवृत्त अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा, इंदूर, मध्य प्रदेश) यांनी कविवर्य ग्रेस यांच्या प्रातिनिधिक कवितांचे  विश्लेषण आणि त्यांना आकळलेले रसग्रहण करून  ग्रेसच्या कविता 'दुर्बोध' आणि 'आत्मकेंद्रित' असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.  
निवडुंग (१९८९) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात 'वाऱ्याने हलते रान' ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झालेली आहे.

दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या 'महाश्वेता' या मालिकेत ग्रेस यांच्या 'निष्पर्ण तरूंची राई' (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला.

डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या चर्चबेल व मितवा या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले आहे. ग्रेस यांच्या निवडक कविता डॉ. उमाशंकर जेठालाल जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.
 

प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे 'मैत्र जीवाचे' या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग झाला होता. 

माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस. ग्रेस यांचं नाव घेतलं की आठवते…गूढरम्य संध्याकाळ आणि त्यांच्या संध्याकाळच्या कविता. त्यामागोमाग येतात… चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या आठवणी … राजपुत्र आणि डार्लिंग... या त्यांच्या काव्यसंग्रहानंही रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या शब्दांचं गारुड महाराष्ट्राच्या मनावर गेली दोन चार  दशक अव्याहत आहे.
गूढतेच्या विश्वात अलगद उतरवणारी कविता, काहीतरी प्रचंड हुरहूर लावणारी पण नक्की काय ते न सापडणारी पण तरीही आपली वाटणारी कविता लिहिणारे , मराठी साहित्य विश्वातले लखलखते माणिक माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस...!

ग्रेसांची कविता म्हणजे समुद्रासारखी अथांग असते... तिचा शोध घ्यावा तेव्हढा कमीच.. आणि तेव्हढीच चमत्कृती..!
दुर्गाबाई भागवतांच्या मते –दैवी, मानवी, पाशवी जीवनवृत्तींचे अद्भुत मिश्रण ज्यांच्या कवितेतून झाले आहे असे कवी ग्रेस......शब्द आणि अर्थाच्या या किमयागाराचे आपल्यावर आभाळाएवढे ऋण आहेत.

त्यांच्या काही गाजलेल्या कवीता...

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला....

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने......

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता.
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता...

घर थकले संन्यासी , हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळ......!

गूढार्थ आवर्तनांच्या आशयसूत्रात बंदिस्त करत शब्दांना अर्थालंकाराच्या नादलयींवर झुलवत ठेवणारा जोगिया पुरुष, प्राचीन नदीपरी खोल, दुःखाचा महाकवी ग्रेस.

       ग्रेस म्हणजे निसर्ग कृपेची भावाभिव्यक्ती, ग्रेस म्हणजे शब्दांतरीचे गूढात्म संदर्भ शोधू पाहणारी काव्यवृत्ती. ग्रेस म्हणजे मराठी काव्याचे मर्मबंध उलगडणारा अभिज्ञ शब्दप्रभू. आत्ममग्नतेतून संवेदनाप्रधान आशयाचे पैलू पाडणारा काव्यमहर्षि.
             मराठी वाङ्मयाच्या अन्वयाने मराठी साहित्यसृष्टीच्या कोंदणाला कवितेचा आणि लालित्याचा नवा अर्थालंकार परिधान केला तो कविवर्य ग्रेस यांनी. नवख्या अर्थांतरोपन्यासाचे मर्मभेदी परिमाण धारण करणारी ग्रेस यांची कविता अमूर्त संवेदनेतून शब्दांतीत काव्याशयाचे अवगाहन करते.ती वाचकांना आस्वादाच्या पातळीवर अर्थान्तराच्या परिमितीचे परिघ छेदून जाणारी असल्याने ती दुर्बोध वाटत असली तरी दुर्बोध नसून ती अबोध आहे.कारण कविता कधीच दुर्बोध नसते. 
                  कवीच्या आशयसृष्टीतील लेखनानुभूती मूलतः दोन पदे धारण करणारी असते किंबहुना ती तो जुळवून आणतो किंवा  ती कविच्या प्रतिभेची मजल असते.याचाच प्रत्यय कविवर्य ग्रेस यांच्या कवितेतून यथार्थत्वाने येतो.

  स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
  हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे 

  कवी, कवितेची भूमी अर्थछट्टाच्या बाहुपाशात अडकवतो..तेव्हा त्याचे आशयसुक्त कविच्या मनोभूमीत विषयाचे मर्मभेद निर्माण करत असते.तो वाचकांना आशयाच्या आवर्तांशी रूंजी घालत तिष्ठत ठेवतो..ही ग्रेसयांच्या कवितेची परिणती आहे. 

   समुद्रबंदी काठावरची, दोन पांढरी शहरे
   गगन निळाईत पार बुडाले, त्यांचे सर्व शहारे

प्रस्तुत काव्यपंक्तीच्या आशयाचे विश्लेषण करताना अभिधाच्या अन्वयाने असे विवेचन करता येईल की, ... समुद्र काठावरच्या दोन शहराला समुद्राच्या भरतीने केव्हा धोका होईल या कल्पनेने आलेले शहारेही आता अंधारलेल्या काळोखात अदृश्य झाले आहेत आणि याच बरोबर लक्षणाच्या अन्वयाने प्रस्तुत काव्यपंक्तीतून अभिव्यक्त झालेला प्रणयभाव हा रुपकात्मक प्रतिमांनी बंदिस्त केलेला दिसतो.हे समजून घेण्यासाठी वाचकांची अनुभूती कवीच्या प्रतिभेइतकी टोकदार,  प्रगल्भआणि चौफेर असतेच असे नाही. 
         सदरहु पंक्तीत आशय आणि अभिव्यक्तीची संदिग्धता आहेच. वाचकांच्या मनःपटलावर अभिधा आणि लक्षणाचे द्वंद्व चालू असते. तेव्हा कवीच्या अर्थविश्वाचा अदमास  वाचकांना केवळ स्पर्शून जातो. ही भावार्थता ग्रेस यांच्या कवितेत आहे. म्हणून कविची भूमिका ही वाचकांकडून विशिष्ट अनुभूती सिध्द करीत असली ; तरी तो कलाकृतीच्या चिकित्सेचा निश्चित अनुबंध ठरत नाही.
  
   भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
   मी संध्याकाळी गातो,  तू मला शिकविली गीते

ही ग्रेस यांची कविता महाश्वेता मालिकेसाठी संगीतकार हृहृदयनाथ  मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून  लता मंगेशकर यांनी  गायलेली आहे. तिचे गीत होऊन ती आता लहान थोरांच्या ओठांवर आहे. ग्रेस यांच्या भय इथले संपत नाही  या पंक्तित प्रश्नही आहे आणि उत्तरही. हा प्रश्न कवी यांना जेव्हा पडतो ; तेव्हा कवीला आईची आठवण येते. आणि लहानपणी जी गीते तू मला शिकविलीस ती मी संध्याकाळी गातो. कारण संध्यासमयी
मनात काळोख दाटून येतो आणि प्रत्येक घटनेने जीव भयव्याकुळ होत जातो, असा भावपूर्ण आशय उपरोक्त गीतपंक्तीतून व्यक्त होताना दिसतो.

    तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शूनी गेला
    सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला

 कवी ग्रेस यांच्या कवितेची भूमी  ही गूढानुभूतीच्या भूमिकेवर आधारित आहे म्हणून ती  तर्कार्थाच्या विश्लेषणास वाचकसापेक्ष असेलच असे नाही कारण कलाकृतीची निर्मितीमूल्ये कलावंताच्या मनोसंवेदनेत दडलेली असतात. म्हणून ग्रेस यांच्या कवितेतील रसभाव हा अभिधा किंवा लक्षणा सापेक्ष  राहत नाही तो विविध आशयछट्टांचे अग्रदूत ठरत जातो.   संध्याकाळच्या कवितामधून आलेल्या काव्यपंक्ती पाहूया...

   ही चंद्र-उदयिनी वेळा, घननीळ कांठ मेघांचे
   भरतीच्या क्षितिजावरूनी, घर दूर जसे सजणाचें
                                          किंवा 

  पाऊस कधीचा पडतो,  झाडांची हलती पाने 
  हलकेच जाग मज आली,  दुःखाच्या मंद सुराने

             कवितेचे मूल्य हे भावनानिष्ठ आणि तर्काधिष्ठीत अर्थान्वयाचे भाकीत करत जाते तेव्हा ती नव्या सृजनसृष्टीची प्रस्थापना करीत असते.
कवी ग्रेस यांच्या कवितेतील अर्थघटक प्रतिमांशी पुरक साधर्म्य निर्माण करतात.तोच त्यांच्या कवितेचा मूलाधार आणि स्वाभाविक गाभाघटक आहे आणि यातून निर्माण झालेली आपली वेगळी विशिष्ट शैली आहे. 

            तुला पाहिले मी  नदीच्या किनारी
            तुझे केस पाठीवरी मोकळें 
            इथे दाट छायातुनी रंग गळतात 
            या  वृक्षमाळेतले सावळें 

ही कविता सुद्धा गीत झालेली आहे. संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध करून ती गोड गळ्याचे गायक- सुरेशजी वाडकर यांनी गायिले आहे. 
           नव्या उपमा, नवी प्रतिमाने, मात्रावृत्त व गुणवृत्तांच्या आधारभूत काव्यनिर्मितीला नवखे सामर्थ्य देणारी ग्रेस यांची तरल भावकविता आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवेतून आलेल्या विविधरंगी पात्रांच्या माध्यमातूनही त्यांची कविता समाजमनाचे पैलू अधोरेखित करते. त्यांच्या मुक्तछंदातील कवितेतून संयमाधिष्ठित विद्रोह व्यक्त होतो. सामाजिक जाणीव आणि निसर्ग यांच्या मार्गाने जसे चिरंतनाकडे जाता येते.तसेच आत्ममग्नतेतूनही याची जाणीव ग्रेस यांच्या कवितेतून होते. शब्दलालित्य व प्रतिमासृष्टी यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या अंतर्मनात उतरणारी ग्रेस यांची कविता  समाजमनाचा ठाव घेत. तिने मराठी रसिकांच्या मनावर  गारुड केले आहे.  समग्र मराठी साहित्याच्या कक्षेचा परीघ ग्रेस यांच्या कवितेने विस्तीर्ण केला आहे. आणि काव्यस्वादाच्या पातळीवरही त्यांची कविता संकीर्ण प्रश्नांचे तांडव उभे करते.अपरिहार्य आणि  व्यामिश्र घटनांच्या आणि घटकांच्या नोंदी घेत निर्मोही आणि नित्तळ अभिव्यक्तीतून ती सर्वस्पर्शी होत जाते. त्यांची कविता  तरल लयबद्ध भावानुवादासह संगीताजवळ जाणारी आहे.ती सहज यमक साधणारी भावकविता आहे. ग्रेस यांच्या अनेक कविता संगीतबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. म्हणून त्यांची कविता मराठी साहित्य संस्कृतीचे वैभव आहे, अशा शब्दप्रभूचे साहित्यसृष्टीला मिळालेले योगदान मौलिक आणि उपकारक आहे.
 मोरांना कळते वेळ , कोकीळ असते हळवे .. ग्रेस समजुन यायला थोडं दुःख गाठीला असलं की बरं जातं , असं मला वाटतं. तो खरच क्रूर आहे. सगळं सोलून टाकतो , त्वचेला आंधळं म्हंटलंय त्याने ते उगाच नाही! सगळी आतडी टांगून ठेवतो तो आणि सौंदर्यस्थळं दाखवतो. ज्याच्यात हिंमत असेल तो बघेल.. 
आडवाच झोपलो असतो गर्भाशयात तर येऊ दिले असते का ? तुझ्या वाट्याला माऊलीचे भाग्यपण ? 
इतका थेट प्रश्न विचारायला ताकद लागते. 
आईबद्दल लिहितांनाही तीचं बाईपण जास्त जपतो हा माणूस म्हणूनही मला तो आवडतो. आईच्या स्त्रीत्वाचा हा सन्मान मी कुठेच बघितला नाही. म्हणून तो जेव्हा लिहितो,'माझी आई मत्त वासना..' तेव्हा ते हिडिस नाही वाटत. 

हा कवी महाराष्ट्राला लाभणं हे मराठीचं संचित आहे. तुम्ही त्यांना सादर करणं हे आमचं भाग्य आहे. 
'माझ्या कुळाप्रमाणे मृत्यू मला दुपारी , 
आकाशातून बोलावतात घारी' हे ग्रेस शिवाय कोण लिहू शकेल. 
मला भिडणारी एक अशी आहे,
घर कोसळले गं मधुरा मी उदासिनी बघ झाले
कपटाने जोगी माझ्या
गायींना घेऊन गेले.

संदर्भ:-
१.'ग्रेसविषयी', -डॉ.अक्षयकुमार काळे (२००९)
२.'रचनेच्या खोल तळाशी',- डॉ.नंदकुमार मुलमुले

कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या पुस्तकास मध्य प्रदेशातील मराठी साहित्य अकादमीच्या  म.प्र.संस्कृति परिषद (भोपाळ)ने 'राजकवि भास्कर रामचन्द्र तांबे ' पुरस्कार दिला आहे.(४ जुलै २०१८)

कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.




#Article 218: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध (496 words)


१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी () अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.

बंगाल प्रांत काबीज  केल्यानंतर  ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे. 

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली.  भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला. 

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’




#Article 219: विकिपीडिया (301 words)


विकिपीडिया हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला  मुक्त ज्ञानकोशांचा समूह आहे.

विकिपीडिया (हे संकेतस्थळ महाजालावर उपलब्ध असून ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

विकिपीडियाचे संकेतस्थळ विकी ही आज्ञावली (सॉफ्टवेयर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रित रीत्या महाजालावर काम करू शकतात. 

विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. , सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो. 

विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचा निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना, ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते. 

विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे. 

आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत. विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.  

मराठी विकिपीडियावर ()सध्या यात  लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत. 

विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली. 




#Article 220: रामायण (3808 words)


रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात  एक पवित्र ग्रंथ आहे. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. ५०२२ ते इ.स.पू ५०४० यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. या संदर्भात उपक्रमावर झालेली ही  चर्चा वाचावी. रामाचे राज्य हे आदर्श राज्य होते.

रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.

नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान  व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा  प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ,  हिंदी भाषा कवी  तुलसीदास,  इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब, इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.

रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो)  थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम व लाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.

रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यांतील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे. वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्त्या मिळाल्या आहेत. रामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडांत(प्रकरणांत) विभागले आहे. 

शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड ही मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे.

पूर्ण लिहा

वाल्मीकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे, यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मीकी रामायणचा अभिप्राय आहे. 

नारदमुनी हे संक्षेप रामायण या वाल्मिकी रामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या १६ गुणांचे वर्णन करतात. हे सोळा गुण येणेप्रमाणे -  

 

रामायणातील राम स्वतःस  मनुष्यच म्हणवितो. (आत्मानं मानुषं मन्ये)  पुढील काळात रामाचे दैवतीकरण होऊन तो विष्णूचा अवतार गणला जाऊ लागला.

परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसऱ्या युगात - त्रेतायुगात (सत्ययुगात) घडली. रचयिते वाल्मीकी हे सुद्धा या महाकाव्यातील एक सक्रिय पात्र होते. 

रामायणाची भाषा पाणिनीय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये फरक दिसतात. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इ.पू. पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले. रचनाकालाच्या अभ्यासासाठी भाषेचे स्वरूप हा पायाभूत आधार आहे. 

रामायणाच्या कथेचा काळ याहून पुरातन असू शकतो. रामायणाची पात्रांची नावे - राम, सीता, दशरथ, जनक, वसिष्ठ, विश्वामित्र हे वाल्मीकी रामायणापूर्वीच्या ब्राह्मणग्रंथांत व वेदांत आढळतात. रामायणाची मुख्य पात्रे वहिसुव(?), ब्रह्मा, विष्णु वा वेदोक्त देवता नाहीत. महाभारत-रामायणांच्या रचनेनंतर या देवता लोकप्रिय झाल्या. 

सामान्यपणे, रामायणाचे दुसरे कांड ते सहावे कांड हे भाग या महाकाव्याचे प्राचीनतम भाग मानले जातात. पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे. बालकांड व अयोध्याकांड यांतील घटना गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशाची व प्राचीन भारतातील १६ जनपदांची (मगध व कोसल प्रदेश) परिचिती दाखवतात. या भागांचे राजकीय व भौगोलिक वर्णन रामायणात आहे. 

रामायणाच्या अरण्यकांडात राक्षस, विचित्र प्राणी आदींचे काल्पनिक वर्णन आढळते. इतिहासकार एच.डी. सांकलिया यांनी रामायणाचा काळ सुमारे इ.पू. चौथ्या शतकातला असल्याचे प्रतिपादले आहे. तर इतिहासकार  ए.एल. भाषम हे रामकाळ इ.पू. ७व्या वा ८व्या शतकाचा असल्याचे मानतात.

रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते.

अनेक जानपद कथांमध्ये रामायणाच्या कथेचे विविध रूपांतरे दिसतात. उत्तर भारतातील रामायणकथा दक्षिण भारतातील व आग्नेय आशियामधील प्रचलित रूपांतरांपेक्षा भिन्न आहेत. रामायणाचा कथासंप्रदाय थायलंड, कंबोडिया, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम व इंडोनेशिया देशांमध्ये प्रचलित आहे.  

मलेशियातील काही रूपांतरांत लक्ष्मणास रामापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. या रूपांतरांत राम दुय्यम व दुर्बल भूमिकेत आहे. 

वाल्मीकी रामायणात रामचरित्राचे वर्णन आहे, तर वाल्मीकी यांनीच लिहिलेल्या अद्भुत रामायणात सीतेच्या चरित्र कथनाला प्राधान्य दिले आहे.

लाओसमध्ये रामायणाचे फ्रा लाक फ्रा राम या नावाने रूपांतर केले गेले.

१. श्री अद्भुत रामायण, संपादन- विष्णुशास्त्री बापट

भारतात विविध काळांत लिहिलेली रामायणे परस्परांपासून भिन्न आहेत. १८व्या शतकात मराठी भाषेत श्रीधरपंतांनी रामायण रचले.  १४-१५व्या शतकात कुमार वाल्मीकी यांनी कानडीत  तोरवे रामायण नावाने रूपांतर केले. कानडीत  कुवेंपु यांनी श्री रामायण दर्शनम्‌ व रंगनाथ शर्मा यांनी  कन्नड वाल्मीकि रामायण नावाची रामायणे लिहिली.

१२व्या शतकातील तमिळ कवी कंब यांनी  रामावतारम् अथवा कंबरामायण ग्रंथ रचिला. संत एकनाथांनी भावार्थ रामायण हा काव्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला. हिंदी भाषा भाषेचे प्रसिद्ध रामायण १५७६ सालात तुलसीदास यांनी श्री रामचरित मानस नावाने रचले. रामायणाच्या रूपांतरित आवृत्त्या गुजराती कवी प्रेमानंद यांनी १७व्या शतकात, बंगाली कवी कृत्तिवास यांनी १४व्या शतकात, उडिया कवी बलरामदास यांनी  १६व्या शतकात, तेलुगू कवी रंगनाथ यांनी लिहिल्या..

रामायणाच्या काही उप-रूपांतरांत रावण अहिरावण - महिरावण रूपात येतो. 

केरळच्या मापिळ्ळे रामायण  या रामायण रूपात रामायण लोकगीतांमध्ये गुंफण्यात आले आहे.
 

रामायणाची मुसलमान प्रत सुद्धा आहे. या रूपांतरात रामायणाचा नायक एक मुस्लिम सुलतान आहे. रामाचे नाव यात लामन असे बदलले आहे; इतर पात्रे रामायणाप्रमाणेच आहेत.

हंपी येथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष आहेत. तेथे सुग्रीवन गुहे (सुग्रीवाची गुहा) नावाची गुहा आहे. हे स्थळ सुंदरकांडातील किष्किंधेय वर्णनातील स्थळ असल्याचे मानण्यात येते. या ठिकाणी सुप्रसिद्ध हजारी राम मंदिर आहे.

आशियाच्या अनेक संस्कृतींवर रामायणाचा प्रभाव पडला आहे. काही देशांच्या राष्ट्रीय महाकाव्यांसाठी रामायण प्रेरणास्थान आहे. चीनचे महाकाव्य पश्चिमदत्त पयण याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. या महाकाव्याचे सुन् वुकांग् पात्र हनुमानाच्या पात्रावर आधारित आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रदेशातील सुमारे नवव्या शतकातील रूपांतर काकाविन् रामायण नावाने ओळखले जाते.यात संस्कृत रामायणाच्या तुलनेत अनेक ठिकाणी भेद आहे. लाओस देशाचे काव्य फ्रा लक फ्रा लाम हे सुद्धा रामायणाचे रूपांतर; या नावातील लक आणि लाम नावे म्हणजे लक्ष्मण व रामाच्या नावांचे लाओ रूपांतर. यात रामाचे जीवन बुद्धाचा पूर्वावतार म्हणून चित्रित केले आहे. मलेशियाच्या  हिकायत्‌ सेरि राम काव्यात रावणास ब्रह्माच्या वराऐवजी अल्लाचा वर प्राप्त झाल्याचे दाखविले आहे.

थायलंडचे काव्य रामकियेन रामायणावर आधारित आहे. यात सीता ही रावण व मंदोदरी यांची कन्या असल्याचे दाखविले आहे. ज्योतिषी विभीषण जेव्हा सीतेची कुंडली पाहून जेव्हा अपशकुन वर्तवितो तेव्हा रावण तिला पाण्यात फेकून देतो, नंतर ती जनकास प्राप्त होते. थाई रामायणात मारुती हे महत्त्वाचे पात्र आहे. काव्याची कथा बॅंकॉकनजीकच्या वात फ्रा कयेव देवस्थानाजवळ घडल्याचे सांगितले आहे. 

इतर आग्नेय आशियाई रूपांतरांत बालीचे रामकवच, फिलिपाईन्सचे मरडीय लावण, कंबोडियाचे रीम्कर आणि म्यानमारचे याम जात्दव प्रमुख होत.

कानडीतील कुवेंपु यांचे रामायण रामायण दर्शनम व  तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायण यांच्या रामायण कल्पवृक्षमु या कृतींस ज्ञानपीठ पुरस्कार लाभले आहेत. अशोक बॅंकर यांनी  इंग्लिश भाषेत रामायणाधारित सहा मालिका कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

कांचीपुरमच्या गेइटी रेल्वे थिएटर कंपनीने द्राविड स्वाभिमानाची पुनःस्थापना या उद्देशाखाली या महाकाव्याची पुनर्रचना केली. यात रावण विद्वान, राजनीतिज्ञ, सीता त्याची धर्मपत्‍नी, राम हा एकएक नीतिनियम धाब्यावर टाकणारा लंपट राजकुमार असे दाखविले आहे. रामायणाची ही आवृत्ती पारंपरिक आवृत्तीच्या उलटी असून ती लिहून द्राविड चळवळीस बळ देण्याचा प्रयत्‍न केला गेला.

रामचंद्र चरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड साहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा कर्ता आहे- नागचंद्र. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे.चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते.याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे.

उत्तर भारतातील घराघरांत तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सर्वज्ञात आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच सीमित राहिले.

या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.

कथेचा सारांश-

मिथीलेचा अधिपती महाराज जनकाची पत्‍नी गर्भवती राहिली. पूर्वजन्मीच्या वैमनस्यातून एक निशाचर त्या गर्भाला नष्ट करण्याची वाट पहात होता. राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांपैकी मुलाचे अपहरण निशाचराने केले. आकाशमार्गाने जात असता पूर्वजन्मीच्या तपस्येचे स्मरण होऊन निशाचराने त्या बालकाला कोणतीही इजा न करता, अलगदपणे पृथ्वीवर उतरविले. ते बालक हळूहळू पुढे जात रथनुपूर चक्रवालपूरचे महाराज इंदुगती यांना मिळाले. आनंदलेल्या राजाने त्या बाळाचे नाव प्रभामंडल ठेवले. जनकाने ज्योतिषांकडून  आपले दुसरे बालक सुखरूप आहे असे समजून घेतल्यावर कन्येचे नामकरण केले वा तिचे नाव सीता ठेवले. सौंदर्यवती सीता मोठी होऊन शास्त्रादी कलांमध्ये निपुण झाली. (वाल्मिकी रामायणात राजा जनकाला सीता ही शेतामध्ये नांगराच्या फाळाशी सापडली अशी कथा आहे.)

अनेक किरातांकडून होणाऱ्या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. या संकटातून सोडविण्यासाठी मदत करायला जनकाने राजा दशरथाला विनंती केली. त्यावेळी तरुण, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण यांनी त्या किरातांचा पराभव केला. या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले. ही बातमी समजताच नारद उत्सुकतेने पहायला गेले व स्वतःच मोहित झाले. त्यांनी सीतेचे एक चित्र तयार केले व मणिमंडपात ठेवले. प्रभामंडलाने (निशाचराने नेलेला तिचा जुळा भाऊ) सीतेचे ते चित्र पाहिले व त्याने आपल्या वडिलांना तिला मागणी घालायला सांगितले. जनक राजाने हा प्रस्ताव नाकारला. सीतेचा विवाह रामाशी करायचा असल्याचे जनक राजाने सांगितल्यावर इंदुगती राजा चिडला,  त्याने त्याच्या कुलातील वज्रावर्त धनुष्यावर प्रत्यंचा चढवून दाखविण्याचे सामर्थ्य रामात असेल तरच सीतेचा विवाह रामाशी करावा असा युक्तिवाद केला. रामाच्या पराक्रमावर विश्वास असलेल्या जनकाने स्वयंवर योजले. देशोदेशीचे राजे हरले, पण रामाने मात्र हे आव्हान पेलले व सीतेने रामाला वरमाला घातली. सागरावर्त नावाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून लक्ष्मणानेही आपला पराक्रम सिद्ध केला. त्यामुळे चंद्रध्वज राजाने आपल्या अठरा कन्यांचे विवाह लक्ष्मणाशी करून दिले. (वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाची पत्‍नी म्हणून ऊर्मिला हिचाच उल्लेख सापडतो.)

या पराक्रमामुळे प्रभामंडलाच्या मनात रामाविषयी ईर्ष्या व मत्सर निर्माण झाला. रामावर आक्रमण करण्यासाठी प्रभामंडल निघाला त्यावेळी आपल्या जन्माचे रहस्य समजल्यावर त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर आल्यावर त्याला शोक झाला कारण त्याने आपल्या बहिणीचाच लोभ धरला हे त्याला समजले होते. त्यानंतर प्रभामंडलावर राज्य सोपवून राजा इंदुगतीने जैन धर्माची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येस येताना राजा दशरथाने संपूर्ण परिवारासहित भूतहितरत भट्टारकांचे दर्शन घेतले. अयोध्येस आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होऊन वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दु:खी  झाली वा तिने दशरथाकडे भरतासाठी चौदा वर्षांपर्यंत राज्यभार मागितला. हे ऐकून सर्वजण व्यथित झाले, परंतु रामाने चौदा वर्षे दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता वा लक्ष्मणही रामासह निघाले. प्रयाणाला निघताना राम-सीता –लक्ष्मणाने रत्‍नभवनात जाऊन जिनदेवांचे आशीर्वाद घेतले. विविध नगरांमधून प्रवास करीत असताना राम-लक्ष्मणांनी वाटेवर आड आलेल्या शत्रूंचा नाश केला. विनयाने सामोरे आलेल्या राजांची मैत्री स्वीकारली.या राजांना त्यांची मदत झाली त्यांनी राम व लक्ष्मण यांच्याशी आपापल्या कन्यांचे विवाह करून दिले. (वाल्मिकी रामायणात श्रीराम हा एकपत्‍नी आदर्श पती म्हणून मान्यता पावला आहे.)  कर्णध्वज नावाच्या सरोवराकाठी शांतीच्या अपेक्षेने अणुव्रत स्वीकारलेल्या एका गिधाडाला सीतेने आपला पुत्र मानले- हा जटायू! दंडकारण्यात रहात असताना एक प्रसंग घडला- रावणाची बहीण चंद्रनखी  हिचा मुलगा अरण्यात तप करीत होता.अनवधानाने राम-लक्ष्मणाकडून त्याची हत्या झाली. ते ऐकून खर व दूषण रामावर चालून गेले. सीतेला एकटी सोडून जाण्यापेक्षा लक्ष्मणाने युद्ध करावे व गरज भासल्यास लक्ष्मण रामाला बोलावून घेईल असे ठरले. युद्धभूमीवर लक्ष्मण पराक्रम गाजवीत असताना रावणाने एका शक्तिदेवतेला वश केले. लक्ष्मणाच्या मदतीसाठी रामाला खोटी हाक त्या देवतेने मारली व ती ऐकून, सीतेला एकटे सोडून राम युद्धासाठी आला. त्यानंतर राम-लक्ष्मणांच्या लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता. परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम-लक्ष्मणांनी रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेतली व स्व-पराक्रमाने लंकेची नासधूस केली. ते सारे पाहून रावण अतिशय रागावला. नभोगमन – विद्या बलाने राम-लक्ष्मणासह सर्व सैन्य आकाशमार्गे लंकेच्या रणभूमीवर येऊन पोहोचले. युद्धात लक्ष्मणाने वीरश्री गाजविली. रावणाने फेकलेल्या सुदर्शन चक्रानेच रावणाचा नाश करण्याची आज्ञा रामाने लक्ष्मणाला केली व त्यानुसार  लक्ष्मणाने रावणाचा वध केला! ( वाल्मीकी रामायणात श्रीरामानेच दशानन रावणाचा वध केला आहे.)

रावणाच्या निधनानंतर त्याची पत्नी मंदोदरी हिने ४८,००० विद्याधर स्त्रिया व आपल्या कुटुंबासह जिनव्रताची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येला सुखरूप परत आल्यावर राम-लक्ष्मणांनी ज्या ज्या कन्यांचे पाणिग्रहण केले होते त्यांनाही अयोध्येला बोलावून घेतले.

एके रात्री सीतेला दोन स्वप्ने पडली. एका स्वप्नात  दिसले की दोन बाण तिच्या मुखात प्रवेश करीत आहेत व दुसऱ्या स्वप्नात ती पुष्पक विमानातून खाली पडली आहे. पहिले स्वप्न शुभसूचक असून सीतेला दोन पराक्रमी पुत्र होतील असा त्या अर्थ, पण दुसरे स्वप्न दु:खरूप ठरेल असे रामाने सीतेला सांगितले.

कालांतराने सीता गर्भवती राहिली. तिच्या मनात जिनपूजेची तीव्र इच्छा जोर धरू लागली. त्याचवेळी काही ग्रामीण लोक रामाकडे आले  व दुराचारी रावणाकडे राहिलेल्या सीतेचा रामाने स्वीकार केल्याबद्दल टीका करू लागले. याविषयी लक्ष्मणाने सीतेची बाजू घेतली व रामाने सीतात्याग करू नये असे रामाला सुचविले. पण रामाने आपला राजधर्म पाळायचे ठरविले. अयोध्येजवळ असलेल्या सम्मेद पर्वतापाशी असलेल्या जिनाल्यात सीतला पूजा करण्यासाठी न्यावे वा तेथेच सोडून द्यावे अशी आज्ञा रामाने दिली. अरण्यात पोहोचल्यावर सीतेला हे समजले व ती रडू लागली. पण जिनव्रती असल्याने परलोकप्राप्तीची साधना करण्याचे तिने ठरविले. याचवेळी जिनव्रती राजकुमार वज्रजंघ वनात शिकारीला आला.एकाकी सीतेचा वृतान्त समजल्यावर ते तिला आपल्या राज्यात घेऊन आला व तिला त्याने आपल्या बहिणीप्रमाणे सांभाळले. ( वाल्मिकी रामायणात  सीतात्यागानंतर  वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली असे कथानक आहे.) नवमास पूर्ण झाल्यावर सीतेने लव-कुशाना जन्म दिला. ते यथावकाश मोठे झाले; शास्त्र-कला पारंगत, पराक्रमी झाले. एकदा नारद, लव आणि कुशाला भेटले आणि राम-लक्ष्मण यांचा आदर्श घेऊन त्यांनी कीर्ति प्राप्त करावी असे ते त्यांना म्हणाले. नारदांकडून रामकथा ऐकल्यावर, आपल्या निरपराध मातेचा त्याग केलेल्या रामावर, लव आणि कुश यांनी ससैन्य हल्ला चढविला. त्यांच्या पराक्रमापुढे राम व लक्ष्मणही हतबल झाले. त्यावेळी नारदांनी लक्ष्मणाला सांगितले की सीतेवर झालेल्या अन्यायामुळे चिडून युद्धासाठी आलेले हे दोघे रामाचे पुत्र आहेत. हे ऐकून राम व लक्ष्मण आनंदित झाले. त्यांनी लव-कुशाचे प्रेमाने स्वागत केले. पुंडरीकपूरला जाऊन सुग्रीव सीतेला भेटला व तिला अयोध्येला घेऊन आला. आपण अकलंकित असल्याचा पुरावा म्हणून सीतेने अग्निपरीक्षाही दिली. रामाने तिला राजगृही येण्याची विनंती केली, पण ती नाकारून सीतेने विरागिनी होऊन तपस्या करण्याचे ठरविले. श्रीरामानेही सिद्धशैल शिखरावर जिनव्रताची कठोर तपश्चर्या केली व शाश्वत मुक्ती प्राप्त केली.

या रामायणावर जैन परंपरेचा प्रभाव असल्याने या रामायणातील सर्वच पात्रे ही जैन परंपरा पाळणारी आहेत, व ती त्याप्रमाणे आचरण करतात असे दिसून येते- हे या रामायणाचे वैशिष्टय!

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो. यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.

अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान. सर्व विश्वाला व्यापणारे अव्यक्त अविनाशी तत्त्व कोणते त्याचा विचार करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र. ईश्वरस्वरूपाची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म. या ग्रंथात श्रीराम हे सर्व जगाचे आदिकारण आहेत आणि भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी रामावतार घेतला आहे अशी या रामकथेचा मुख्य आशय असल्याने तिला अध्यात्म रामायण असे नाव दिले आहे.

रामकथा-
प्रमाणातीत, माया-जीव-ईश्वर यांच्या पलीकडे असलेल्या, निर्मल, विषयरूप मलविवर्जित, आत्म्स्वरूपज्ञान हेच शरीर, वाणी वा मन यांना अगोचर अशा दक्षिणामूर्तींना नमस्कार करून या रामायणाची सुरुवात होते.
देवर्षी नारद एकदा ब्रह्मलोकात गेले असता त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले- ‘कलियुगात अनेक चुकीच्या गोष्टींच्या अधीन झालेल्या नष्टबुद्धी लोकांना परलोकाची प्राप्ती कशी होईल यावर काही उपाय सांगा.’ त्यावर ‘रामाचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्याच्या इच्छेने पार्वतीने केलेल्या विनंतीनुसार भगवान शंकरांनी सांगितलेले अध्यात्म रामायण या कलियुगातील लोकांचे रक्षण करील’ असे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले.
अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे.-
१. वाल्मिकी रामायणाचे गायन राम-सीतेचे पुत्र लव-कुश यांनी केले आहे, तर अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे.
२. रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण वा त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला.
३. विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना मिथिलेला नेले.जनक राजाने आपली कन्या सीता हिच्या स्वयंवराची योजना केली होती. भगवान शिवाचे धनुष्य जो कोणी उचलेल आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता माळ घालेल असा स्वयंवराचा पण होता. सीता स्वयंवराचे असे आख्यान अध्यात्म रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम, मिथिलेहून  अयोध्येच्या वाटेवर परत जाणाऱ्या दशरथ आदि सर्वांना रागाने सामोरे गेले. प्रथम रामाविषयी त्यांनी आपला क्रोध व्यक्त केला परंतु नंतर मात्र श्रीरामाचे स्व-रूप लक्षात येताच त्यांना शरण जाऊन त्यांची स्तुती केली.परशुराम म्हणाले-  ‘मला तुझ्या भक्तांची संगती वा तुझ्या चरणी दृढ भक्ती सदा लाभो. जो हे तुझे स्तोत्र म्हणेल त्याला भक्ती, विज्ञान वा अंतःकाळी तुझे स्मरण लाभो.’

ज्याप्रमाणे सीता स्वयंवर आख्यान या रामायणात नाही त्याप्रमाणे प्रसिद्ध अशा लक्ष्मणरेषेचा उल्लेखही यामध्ये नाही. मारीचाने कांचनमृगाचे रूप घेऊन सीतेला मोहित केल्यावर श्रीराम त्याच्यामागे जातात, त्यावेळी श्रीरामांचा आवाज ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जायला सांगते. त्यावेळी तिच्याच रक्षणाचा विचार करून लक्ष्मण जायला तयार होत नाही. सीतेच्या आग्रहाखातर तो जातो, पण जाण्यापूर्वी लक्ष्मण एक रेषा काढतो वा कोणीही आले तरी ही रेषा ओलांडू नकोस असेही बजावतो. अध्यात्म रामायणातील सीता लक्ष्मणाचा अपमान करून त्याचा धिक्कार करते आणि त्यामुळे काहीसा चिडलेला लक्ष्मण तिला तसेच सोडून रामाच्या मदतीला निघून जातो असा कथाभाग आहे.
या रामायणामध्ये श्रीरामांनी शबरीला भक्तीची आणि लक्ष्मणाला ज्ञानाची साधने सांगितली वनवासाहून परत आल्यानंतर हनुमानाला प्रत्यक्ष सीतेने रामाचे स्वरूप सांगितले, त्याला ‘रामहृदय’ असे म्हटले जाते. त्याचे पठन जो करतो त्याची पापातून मुक्ती होते असे त्याचे फलही सांगितले आहे. योगमाया सीता सांगते- “राम हा सच्चिदानंदरूप आहे. तो गुणरहित, सर्वप्रेरक, स्वयंप्रकाशी, पापरहित आहे. राम हा शोकरहित आहे.  त्याच्या रूपात बदल होत नाही. तो सृष्टिरूप भासतो ते मायेमुळेच. उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी आदिमाया मीच आहे आणि  या रामायाणातील सर्व घटना मायारूपी सीतेनेच घडविल्या आहेत.”
.
या रामायणात गंधर्वाने केलेली रामस्तुती वैशिष्टपूर्ण आहे.- रामाचा देह म्हणजे ब्रह्मांड. पाताळ हे त्याचे तळवे, आकाश ही त्याची नाभी, अग्नी हे त्याचे मुख, सूर्य हे डोळे, चंद्र हे मन, यम ह्या त्याच्या दाढा, नक्षत्रे त्याचे दात, दिवस वा रात्र म्हणजे त्याच्या डोळ्यांची उघडझाप असे म्हणून श्रीराम हे सर्वव्यापी तत्त्व आहे असे म्हटले आहे.
या रामायणाच्या शेवटी भगवान शंकर म्हणतात-
अहं भवन्नाम गृणान्कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या |
मुमूर्षमाणस्य विमुक्तये S हं दिशामि मंत्रं तव रामनाम ||
मी (महादेव) तुझाच जप करीत काशीतच निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.

रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधार स्तंभ आहेत. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत, पडझडीत आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. रामायण, महाभारत या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान मिळाले. त्यातील महन्मंगल चारित्र्याच्या गुण संस्कारामुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतु हिमाचलपसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर ही संस्कृती अनेक भीषण आघात व इतिहासातील आक्रमणे पचवू शकली. 

भारतीय संस्कृतीची प्रसरणशीलता विलक्षण आहे. येथील पूर्वज जीवनाचे, संस्कृतीचे उच्च तत्त्वज्ञान घेऊन संपूर्ण जगात पसरले. कोणत्याही प्रकारची जुलूम-जबरदस्ती, हिसाचार न करता त्यांनी आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. त्याची साक्ष आज जे संशोधने होत आहेत, साहित्याचा अभ्यास होतो आहे, त्यातील भावधारा शोधण्याचा, तिचा उगम शोधण्याचा, संशोधक प्रयत्‍न करीत आहेत यावरून पटते आहे. जगाच्या निरनिराळ्या भागांत होत असलेल्या उत्खननांतून डोकावणारी भारतीय देव-देवतांची मंदिरे, त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेल्या कथा व त्यातील उल्लेख आपल्या या सांस्कृतिक अधिराज्याच्या खुणा दर्शवितात. 

इतिहासाच्या अनुशीलनाने हे लक्षात येते की, इ.स.च्या प्रारंभी काली ‘कुशाण' वंशाचे राज्य काशीपासून तो खोतानपर्यंत पसरले होते. त्यामुळे त्याला जोडून असलेले देश भारतीय संस्कृतीमुळे प्रभावित होणे हे अगदी स्वाभाविक होते. हा संपर्क स्थापित होण्याचे आणखीही एक कारण म्हणजे इ. स. ८५ ते १०५ या कालखंडात चिनी सम्राट ‘हो-ती' याचा सेनापती ‘यान्-छाव' याने मध्य आशियात केलेल्या स्वाऱ्या होत. त्यामुळे चीन आणि मध्य आशिया यांचा परस्परांशी संबंध प्रस्थापित होऊन दुसऱ्या शतकापर्यंत तेथे भारतीय साहित्याचा प्रभाव बराच वाढला. इ. स. ४७२ मध्ये ‘चि-चिया-यन्'ने‘पाओ-त्सांग-चिङग्' या त्याच्या ग्रंथाचा प्रारंभच रामायणाने केला. ‘चि-चिआ-य' हे संस्कृतच्या ‘केकेय' नावाचे रूपांतर आहे. या ग्रंथाच्या उपसंहारात रामराज्याचे मोठे गुणगान केलेले आहे. इ. स. ५८० मध्ये नेपाळ अधिपती ‘अशुवर्मा' याच्या मुलीचा विवाह ‘ल्हासा' या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळे त्याचा भारताशी अधिकच निकटचा संबंध आला. त्या काळात भारतात प्रभुत्व पावलेल्या बौद्ध साहित्याचा तेथे प्रभाव पडणे अगदी स्वाभाविकच होते. त्यापैकी ‘अनामकं जातकम्'नावाच्या बौद्ध जातकाचे ‘कांग-से-इ' नावाच्या चिनी लेखकाने चिनी भाषेत रूपांतर केले ते ‘लिये-उतुत्सी' नावाच्या ग्रंथात सुरक्षित आहे. त्यात राम-सीतेचा वनवास, सीताहरण, जटायुचा वृत्तान्त, वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध, सीतेची अग्निपरीक्षा इत्यादी घटनांचे मोठे रोचक वर्णन केले आहे. या ग्रंथाच्या कितीतरी हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत.

सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देशआहे. त्यालाच प्राचीन भारतीय साहित्यात ‘शिबिर देश' म्हणून उल्लेखिला जात असे. हा प्रदेश हिमाच्छादित आहे. त्याठिकाणी मंगोलियाच्या क्षेत्रात, तसेच रशियामधून वाहणाऱ्या ‘व्होल्गा' नदीच्या किनाऱ्यावर भगवान प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकविले जात असे. तेथे इ. स. ११८२ ते १२५१ मध्ये ‘कुबलाईखान' नावाचा सम्राट होता. त्याचे गुरू पंडित ‘आनंदध्वज' होते. त्यांनी ‘एर्देनियन-सांङ्ग-सुबाशिदि' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यातील ‘एर्देनि' हे रत्‍नाचे व ‘सुबाशिदि' हे सुभाषिताचे मंगोलियन भाषारूप होय. त्याचे सरळ भाषांतर म्हणजे ‘सुभाषित रत्‍ननिधी' हे होय. त्यावर ‘रिच्छेनपाल्साङ्पो'यांची टीका आहे. त्यात रामायणाचा सारांश मिळतो. त्यात असे सांगितले आहे की, लंकाधिपती रावण जनहितापासून विन्‍मुख झाल्यामुळे नाशाला प्राप्त झाला. खालील मूळ उताऱ्यात त्या कथेचे सार आले आहे.

ओलान्-दुर-आरव बोलुग्रासन येरवे रवुुमुन् देमि*आलिया नागादुम्बांŸ। ओख्यु आमुर सांगुरक्रुबा इद्रेन ओम्दागानदूर नेङ्ग उलु शिनुग्युयाईŸ। ओल्ज गुसेल दुर नेङ्ग येसेशिनुग्सेन-उ गेम इयेरŸ। ओरिदुमान्गोस-उन निगेन खागान् लंगा-दुर आलाग्दासान-

म्हणजे जनतेच्या नेत्यांनी, महापुरुषांनी क्षुल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये. विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्यानेव कामवश झाल्याने प्राचीन काळी राक्षसराज रावण लंकेत मारला गेला. अशा प्रकारे ही ‘रामन खागान्' म्हणजे ‘राजा राम' यांची कथा आज हजारो वर्षांपासून मंगोलियन, सैबेरियन, रशियन लोकांमध्ये वाचली जाते, सांगितली जात आहे.

कांबोडियालाच ‘कांबोज' किवा ‘कंबूज' असेही म्हणतात. याची स्थापना स्वायंभुव मनुने केली असे समजले जाते. या देशाची राजधानी ‘नॉम्पेन' आहे. या ठिकाणी संस्कृत भाषेतील सहस्रावधी शिलालेख सापडले आहे. येथील भाषेवर संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव आहे. येथील विराट सभागृहावरील भिंतीवर इ. स. १२०० मध्ये सम्राट द्वितीय सूर्यवर्मन याच्या काळात रामायण आणि महाभारत यांतील दृश्ये अंकित केली आहेत. येथील साहित्यात रामायण हे ‘रामकीर्ती' या नावाने प्रतिष्ठित झाले आहे.

कांबोडियानंतर रामायणाचा प्रचार व प्रभाव इंडोनेशियातही बराच असल्याचे आढळून येते. प्राचीन साहित्यात इंडोनेशियाला ‘द्वीपान्तर' या नावाने ओळखले जात असे. येथील दोन मंदिरांच्या भिंतीवर खोदलेल्या चित्रलिपीवरून रामायण कथेचे अस्तित्व दिसून आले. इंडोनेशियातील रामायणावर प्रामुख्याने वाल्मीकि रामायणाचा प्रभाव आहे. त्याचे नाव ‘काकाविन रामायण' असून, त्याचा रचयिता योगेश्वर कवी आहे, असे म्हणतात. याचा रचनाकाल ११ वे शतक आहे. यात संस्कृत काव्य रचनेतील प्रमुख वृत्तांचा व छंदांचा वापर केलेला आहे. रामायणातील सर्व महत्त्वाचे प्रसंग मर्मस्पर्शी पद्धतीने रंगविले असून, त्यातून रामायणातील तत्त्वज्ञानाची मांडणी केली आहे. राम-भरत भेटीच्या प्रसंगात पादुका देताना रामचंद्र भरताला उपदेश करतात-

शील रहयु रक्षन रागद्वेष हिलङकॅनŸ।
किम्बरू य त हीलनु, शून्याम्बक्त लवन अनवŸ।।
गॉंङग हॅंकार यत हिलनŸ। 
निन्दा तन् गवयाकॅन्Ÿ।
तं जन्मामुहर वॅक्रŸ । येक प्रश्नय सुमुखŸ।।

म्हणजे- ‘हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. राग-द्वेष सोडून दे. ईर्षा आदी दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्यधिक अहंकारापासून स्व्त:ला वाचव. निंदा करू नकोस. कुलीन घराण्याचा गर्व करू नकोस. हे भरता! हाच खरा धर्म आहेव हेच खरे सत्य आहे.' या प्रकाराचा रामाचा उपदेश ग्रहण करून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्यरक्षणात व्यस्त राहिला. 

वाल्मीकी रामायणात सांगितलेला प्रभू श्रीराम हा मर्यादा-पुरुषोत्तम आहे. कवीच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालले हे महन्मंगल व्यक्तिमत्त्व आहे असे समजायला हरकत नाही.  त्यानुसार, मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र.  आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता, आदर्श वीराग्रणी,‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी'  असा देशभक्तीचा  उत्तुंग आदर्श जीवनात आचरणात आणणारा मातृभक्त आणि ‘मरणान्तानि वैराणि न मे कृतानिच' हा प्रत्यक्ष वैरी व शत्रूच्याही बाबतीत अंत:करणाची विशालता दाखविणारा हा मानव आहे. या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा-पुरुषोत्तम म्हटले जाते.

महर्षी वाल्मीकींनी रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली.. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला. त्यासाठी आपले(?) पूर्वज विजिगीषु वृत्तीने जगाच्या अनेक भागांत गेले. श्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे पसायदान त्यांनी मुक्त हस्ते संपूर्ण मानवजातीला दिले. त्यांच्या जीवनात ‘राम' निर्माण केला. 

Rin Mochan Mangal stotra in Sanskri | ऋणमोचक मंगल स्तोत्र 
मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः।

स्थिरासनो महाकयः सर्वकर्मविरोधकः ॥1॥

लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः।

धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः॥2॥

अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः।

व्रुष्टेः कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रदः॥3॥

एतानि कुजनामनि नित्यं यः श्रद्धया पठेत्।

ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात्॥4॥

धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्।

कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्॥5॥

स्तोत्रमङ्गारकस्यैतत्पठनीयं सदा नृभिः।

न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्॥6॥

अङ्गारक महाभाग भगवन्भक्तवत्सल।

त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय॥7॥

ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यवः।

भयक्लेशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा॥ 8 ||

अतिवक्त्र दुरारार्ध्य भोगमुक्त जितात्मनः।

तुष्टो ददासि साम्राज्यं रुश्टो हरसि तत्ख्शणात्॥9॥

विरिंचिशक्रविष्णूनां मनुष्याणां तु का कथा।

तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलः॥10॥

पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गतः।

ऋणदारिद्रयदुःखेन शत्रूणां च भयात्ततः॥11॥

एभिर्द्वादशभिः श्लोकैर्यः स्तौति च धरासुतम्।

महतिं श्रियमाप्नोति ह्यपरो धनदो युवा॥12॥

       
       एकश्लोकिरामायणम्==

आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्

वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।

वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्‌

पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्




#Article 221: वाल्मिकी ऋषी (253 words)


वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते.
ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत.
रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली.त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते.म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.

मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.

अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला. 

स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात, लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते इतर लेखनात) म्हणून झाला. एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा ब्राह्मण, दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला. 
असे म्हंटले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत. 
जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघीतले, तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली. 

उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले. 
संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते. 

असे म्हंटले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृत मध्ये लिहिले. 




#Article 222: नारद मुनी (247 words)


  
हिंदू धर्मातील कल्पनेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.

नारद जयंती वैशाख कृष्ण प्रतिपदेला (किंवा, काहींच्या मते द्वितीयेला) असते. 

'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो.  पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाति सः नारदः')  त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तनकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.

नारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर केयूर व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतीचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. .

नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.पण या कळी लावण्यामध्येसुद्धा जगाचे हित असते

नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे.  प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये व सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात.




#Article 223: लक्ष्मण (104 words)


लक्ष्मण (शत्रुघ्नाचा जुळा सख्खा भाऊ) (संस्कृत: लक्ष्मण, चिनी: लोमान; जावी: लक्स्मना, लस्मना; ख्मेर: फ्र्या ल्याक्सा; लाओ: फ्रा लाक्षाना; मलय: लक्समना; मारानाव: मांगावर्ना; तमिळ: इलक्कुवान; थाई: พระลักษมณ์ , फ्रा लाक ; युआन: लाख्खाना ;) हा रामायणात उल्लेख असलेला अयोध्येच्या इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ व त्याची पत्नी सुमित्रा यांचा एक पुत्र आणि रामाच्या तीन भावांपैकी एक भाऊ होता. त्याला ऊर्मिला नावाची पत्नी होती. तिच्यापासून लक्ष्मणाला अंगद व धर्मकेतु हे दोन पुत्र लाभले. रामायणातील संदर्भांनुसार याने राम व सीता यांना चौदा वर्षांच्या वनवासात सोबत केली, तसेच राम-रावण युद्धादरम्यान रामाच्या पक्षातून लढताना अनेकदा पराक्रम गाजवला.

दशरथाची दुसरी पत्नी सुमित्रा हिला दोन जुळे पुत्र होते, एक लक्ष्मण आणि दुसरा शत्रुघ्न..




#Article 224: शबरी (786 words)


शबरीचा जन्म शरद पौर्णिमेला झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी शबरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना रस्ता दाखवणारी शबरी आठवते. 

ती शबर राजाची कन्या होती. राजाची कन्या म्हणून लाडा कोडात वाढली. तिला सर्व संपन्नता लाभली. राजकन्या म्हणून शिक्षणही झाले. या शिक्षणामुळे तिला तिचे ध्येय आध्यात्मिक मार्गावर नेण्यासाठी, दृढ राखण्यासाठी उपयुक्त झाले.

वनवासी भिल्ल समाज वनात राहणारा, निसर्गप्रेमी आणि निसर्गाची काळजी वाहणारा म्हणून ओळखला जातो. पुढील आयुष्यात शबरी वनात राहिली. गुरू मातंगांच्या आश्रयाला गेली. तिच्याही हातून वनवासी भागाचाच उद्धार झाला. आजही भिल्ल समाज रामाबरोबर तिचे नाम घेत निसर्गप्रेम अनुभवत आहे. निसर्गाची काळजी घेत आहे.

राजकन्या म्हणून जन्माला आली. मोठी झाली तरी गुरूपदेश घ्यावा, शिष्यत्व पत्करावे ही समर्पण वृत्ती तिच्यात दिसते. गुरू करणे, शिष्यत्व घेणे याचा अर्थ आपले स्वतःचे सर्व विसरून जाणे. कष्टमय जीवन जगायचे. जग रहाटीपासून दूर वनात रहायचे. गुरू घरी रहायचे. अशा पद्धतीत राजकन्या शबरीने ऋषी मातंगांना गुरू बनविले आणि त्यांच्या उपदेशानुसार रामाची वाट पाहत ती वनवासात राहिली.

रामायणात शबरी कथा काय आहे ? वाट पहात असलेल्या शबरीला भेटण्यासाठी राम लक्ष्मण शबरीच्या झोपडीत येतात आणि पाय धुवून, रानफुले देऊन शबरी त्यांना उष्टी बोरे खायला देते. तिचे प्रेम राम सहज स्वीकारतात. उष्टी बोरे दिल्ल्याचा व रामाने ती खाल्याचा लक्ष्मणाला राग येतो. राम त्याची समजूत काढून त्यालाही उष्टी बोरे खायला सांगतात. त्यानंतर शबरी योग सामर्थ्याने नश्वर देहाचा त्याग करून आत्म्याला परमात्म्यात विलीन करते, ही कथा आहे.

उष्टी बोरे यावर आपले संत मुरारी बापू यांनी मार्मिकपणे खूप ऊहापोह केला आहे. वर्षानुवर्षे शबरी वनात रहात होती. तिथेच फिरत होती. त्यामुळे वनातील झाड आणि झाड तिच्या परिचयाचे आहे. ती स्वतः फळे आणि कंदमुळे खाते व पाणी पिऊन राहते म्हणजे निसर्ग आहारच झाला. वर्षानुवर्षे बोरे खात असल्ल्याने त्यातील चांगली कोणती ? त्याचे बी काढून वेगळे ठेवणे, पावसाळयापूर्वी त्याचीच लागवड करणे, त्याला खतपाणी घालून त्याची देखभाल करणे हे सर्व शबरीने केले आहे. अशा तर्‍हेने जास्तीत जास्त मधुर व मोठी बोरे निर्माण करण्याचे कार्य ही तिने केले आहे. अशी बोरे तिने श्री रामांना दिली. आपल्या दैवताला जे द्यायचे ते उत्तम असले पाहिजे. त्यातील हिणकसपणा आपण काढून टाकला पाहिजे हाच संदेश उष्ट्या बोरातून जातो. आणि म्हणूनच अनेकांना उष्टी बोरे देणारी शबरी भावते.

शबरी राम भेटीमध्ये जो संवाद झाला त्याराम लक्ष्मण यांचे सीता शोधार्थ वनातून हिंडणे शबरी ऐकते. लंकापति रावणाने, राक्षसाने सीतेला पळवून नेले आहे व श्रीराम दक्षिण दिशेला जाणार आहेत. हे सर्व जाणून घेतल्यावर शबरी श्रीरामांना दक्षिण दिशेला असलेल्या हनुमान, वाली, सुग्रीव इ. ची मदत घेण्याच सुचविते. त्यांच्या सैन्याचे साहाय्य घेण्याची सूचनाही करते. त्यामुळे सीता शोध सुकर होईलच त्याचबरोबर रामाकडून असुर, राक्षसी, अधर्मी शक्तीचा नाश होईल हा विश्वास ती रामाला देते. हा दिशासंकेत श्रीरामांना शबरीकडुन मिळतो आणि त्या संकेताचे पालन श्रीराम करतात. त्यातूनच पुढे रावणाचा म्हणजे असुर शक्तीचा नाश होतो व रामराज्य निर्माण होते.

दिशा संकेत करणारी शबरी ही आजच्या काळातही आपली सर्वांची आदर्श व्हावी असे वाटते आणि म्हणूनच शबरी कुंभाचे आयोजन करीत आहोत.

कुंभ म्हणजे काय ? श्री क्षेत्राच्या ठिकाणी होणार कुंभ आपल्ल्याला माहीत आहे. काही जण कुंभाला जाऊन ही आले असतील. भक्तिभाव व पुण्यसंचय करण्यासाठी कुंभाला जाऊन येणे येवढा सीमित अर्थ आपण जाणतो.

जेव्हा जेव्हा सामाजिक नियमांमध्ये परिवर्तनाची आवश्यकता वाटली त्यावेळी कुंभाचे आयोजन समाजधुरीण, साधु संत आदिंनी मिळून केले. अशा कुंभाला नियमीतपणा असावा म्हणून दर 12 वर्षांनी, दर ६ वर्षांनी कुंभाचे आयोजन. या कुंभामध्ये समाजातील सर्व स्तरातले सर्व भागातले लोक तसेच सर्वत्र संचार करणार साधुसंत उपस्थित असतात. कुंभाची पर्वणी साधणे हा भाग आहेच तसेच धर्मचर्चा होणे त्यात काही निर्णय होणे, झालेला निर्णय सर्व समाजापर्यंत पोचणे हे सुलभ होते.

शबरी कुंभ का? शबरीला सर्वमान्यता आहे. पंपा सरोवर, राम लक्ष्मण भेट, उष्टी बोरे व सीता शोधार्थ दिशा संकेत हे सर्व विषय सर्व ठिकाणी उल्लेखिले जातात. भारतातील विभिन्न प्रदेशात शबरी आमची होती असे सर्वजण म्हणतात. याचा अर्थ शबरी सर्वांना पूजनीय आहे. शिवाय असुरी शक्तिंविरूध्दचा लढा रामाने लढावा व त्याचा नायनाट करावा अशी शबरीची इच्छा आहे. म्हणूनच ती दिशासंकेतही करते. असुरी अधर्मी शक्तिविरूद्ध लढण्याचा तिचा दिशासंकेत आजही लागू होणारा आहे.

आजची परिस्थिती काय आहे ? वनवासी समाजाच्या विकासाआड अनेक लोक, शक्ति कार्यरत आहेत. आणि म्हणूनच कुंभाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या लोकांना हाच दिशासंकेत द्यावा ही वनवासी हे हिंदू आहेत. हिंदू समाजाचे अंग आहे. जे कोणी वनवासी समाजावर, जीवनावर आघात करतील त्याचा नि:पात करण्यासाठी वनवासी समाजाने पुढे यावे, संघठीतपणे त्याला विरोध करावा व त्याचे पारिपत्य करावे. नगरवासी, वनवासी, ग्रामवासी सर्वांनी सावध रहावे व धर्म परिवर्तन करणार्‍या मायावी, विदेशी देशद्रोही, विध्वंसक शक्तींना नेस्तनाबूत करावे. ह्याचा धर्मनिर्णय करण्यासाठी शबरी कुंभ आहे.

शरद पौर्णिमेची शबरी मातेची जन्मतिथी साजरी करतांना लोक काय ठरवतात ? शबरी मातेच्या दर्शनाला, या कुंभामध्ये आपण अवश्य जाईन. अनेकांना बरोबर घेऊन जाईन. तसेच धर्माविरूध्द वागणार्‍या, धर्मपरिवर्तन करणार्‍या लोकांच्या कारवायांना आपण प्रतिबंध करेन व आपल्या धर्मात परत येणार्‍या लोकांना आपलेसे करून सामावून घेईल, अशी प्रतिज्ञाच आज लोक घेतात. दुर्गामातेला ही आम्ही जागृत आहोत हा प्रतिसाद यातूनच दिला जातो.




#Article 225: अहल्या (255 words)


हिंदू पौराणिक साहित्यानुसार अहल्या (मराठी लेखनभेद: अहिल्या) ही ब्रह्मदेवाची मानसकन्या व शरद्वत् गौतम ऋषीची पत्नी होती. देवांचा राजा इंद्र याच्यासह हिने केलेल्या जारकर्म उघडकीस आल्यावर संतापलेल्या शरद्वत् गौतमाने हिला शाप दिल्याची घटना व पुढे रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केल्याची घटना, अश्या हिच्या आयुष्यातील दोन प्रमुख प्रसंगांचे वर्णन वाल्मीकि रामायणात व अन्य पौराणिक साहित्यात आढळते. शरद्वत् गौतमाने दिलेला शाप ही पातिव्रत्याच्या निष्ठेस जागून भोगत राहिली, म्हणून ही शुद्धचरित मानल्या जाणाऱ्या पंचकन्यांपैकी एक मानली जाते. मात्र त्यासोबतच हिच्या हातून घडलेल्या पापकर्मामुळे पुरुषकेंद्रित दृष्टिकोनाच्या कथासंभारातून हिचे चित्रण पतिता म्हणून केले गेल्याचे आढळते

ब्रह्म देवाने विश्वातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून अहल्येची घडणा केली. तिचा विवाह तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे असलेल्या गौतम ऋषींसोबत करून देण्यात आला. सर्वात जुन्या कथेनुसार इंद्र गौतम ऋषींचे रूप घेऊन अहल्येसमोर येतो. तिला हे कळूनही ती इंद्राच्या या कृत्याचा विरोध करत नाही. नंतरच्या कथांमध्ये अनेकदा तिला या दोषातून मुक्त केले गेले व ती इंद्राच्या कपटाला बळी पडली किंवा इंद्राने तिचा बलात्कार केला असे मांडण्यात आले. मात्र सर्व कथांनुसार तिला व तिचा प्रेमी (किंवा बलात्कारी) इंद्र यांना गौतम ऋषी शाप देतात. या शापाचे स्वरूपही ग्रंथांमध्ये वेगवेगळे आहे मात्र सर्वांनुसार राम अहल्येच्या उद्धारास कारणीभूत ठरतो. काही कथांनुसार अहल्येने शापाचे प्रायश्चित्त म्हणून अज्ञातवास स्विकारला व रामाचे आदरातिथ्य करून तिचा हा अज्ञातवास संपला.  यानंतर प्रचलित झालेल्या कथांमध्ये असे मांडण्यात आले की ऋषींच्या शापामुळे ती दगड बनली व नंतर रामाचा पाय लागून तिचा उद्धार झाला.

तिची कथा प्राचीन धर्मग्रंथापासून ते आधुनिक साहित्य व कविता तसेच नाट्य व नृत्यांमधून अनेकदा मांडण्यात आली आहे. प्राचीन कथा रामावर केंद्रित असून सद्यःकालीन कथा अहल्येला केंद्रस्थानी ठेवतात. काही कथांमध्ये तिच्या मुलांचाही उल्लेख केला गेला आहे. 




#Article 226: विश्वामित्र (172 words)


२१व्या शतकात चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरात जे सप्तर्षी सांगितले आहेत, त्यांपैकी एक विश्वामित्र आहे. बाकीचे सहा - अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज व वसिष्ठ.

विश्वामित्राने खूप कडक तपश्चर्या केली,  पण त्याला महर्षिपद मिळू शकले नाही. ब्रह्मर्षी पदावर त्याला समाधान मानावे लागले. 

एका तप पूर्ण झाल्यावर विश्वामित्राला खूप भूक लागली. खायला दुसरे काहीच न मिळाल्याने, त्याने मेलेल्या कुत्र्याची तंगडी चोखली.

विश्वामित्राच्या तपश्चर्येला घाबरून इंद्राने त्याच्या तपभंगासाठी मेनका अप्सरेला पाठवले. तपभंग झाला आणि विश्वामित्राला मेनकेपासून शकुंतला (कन्या) झाली. 

विश्वामित्राने त्याच्या तपोबलाच्या जोरावर त्रिशंकूला सदेह स्वर्गाला पाठवण्याचा बेत केला. इंद्राने तो हाणून पाडला. त्याला उत्तर म्हणून, अंतराळात ज्या ठिकाणी त्रिशंकू लटकत होता, त्याच्या आसपास विश्वामित्राने नवी सृष्टी, नवा स्वर्ग निर्माण केला. मात्र, तेथे नवा इंद्र निर्माण करायचा त्याचा प्रयत्न देवांनी विफल केला. हा त्रिशंकू अजूनही आकाशात एका ताऱ्याच्या रूपात लटकत आहे. इंग्रजीत या ताऱ्याला  Crux म्हणतात. त्रिशंकूला The Upside Down King असेही म्हणतात. 

त्रिशंकू या नावाची अनेक पुस्तके आहेत. भारतातील राज्याामध्ये किंवा परदेशातल्या एखाद्या देशात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण होते. इंग्लंडमध्ये २०१० साली अशी स्थिती आली होती; भारतात अनेकदा होते.




#Article 227: सीता (256 words)


सीता ही रामायणातील प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक राम याची ही पत्‍नी होय. पतिनिष्ठ पतिव्रता पत्नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून ही आदर्शवत मानली जाते.

खरे म्हणजे सीता  ही रावणाची मुलगी असते. सीता जन्म घेतल्यानंतर आकाशवाणी होते . ही पुत्री तुझ्या मरणाचा कारण बनेल. म्हणून रावण सीतेला जमीनमध्ये ठेवतो. मग राजा सीरध्वज जनक यास जमीन नांगरताना गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह स्वयंवरपद्धतीने इक्ष्वाकु कुळातील रामाशी झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात हिला पती राम व दीर लक्ष्मण यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान दंडकारण्यात वास्तव्य करत असताना हिला लंकेचा राजा रावण याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला अयोध्येस स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने सीतेचा त्याग केला. अश्या परिस्थितीत हिने वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला लव व [कुश] असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्वतःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.

देवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात व सातारा जिल्ह्यात मान तालुक्यातील कलासाकरावाडी सितानगर गाव असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात.




#Article 228: सुग्रीव (100 words)


रामायणानुसार सुग्रीव (संस्कृत:सुग्रीव, मलाय आणि जावा भाषा: सुग्रीव, थाई भाषा: सुग्रीप, लाओ भाषा: सुगीप किंवा संग्किप, ख्मेर भाषा: सुख्रीब, क्रिओल भाषा: सूग्रिम, तमिळ: कुक्किरिवन, बर्मी भाषा: थुग्यीक) हा वानरांचा म्होरक्या व वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. हा सूर्याचा पुत्र व वानरराज वालीचा धाकटा भाऊ होता. प्रसंगोपात उद्भवलेल्या गैरसमजातून वाली व याच्यात वैर निर्माण झाले. वालीने याला किष्किंधेतून हाकून लावले व याच्या पत्नीचे, अर्थात रुमेचे हरण केले. पुढे रामाच्या साहाय्याने याने वालीचा निप्पात केला व वालीपश्चात हा किष्किंधेचा राजा बनला. वालीस वधण्याच्या कामी व राज्यप्राप्तीसाठी साहाय्य केल्याबद्दल कृतज्ञ राहून याने आपल्या वानरसेनेसह  राम-लक्ष्मणांना  रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्यासाठी साहाय्य केले.




#Article 229: रावण (1321 words)


रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. 

 रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ब्रह्मकुळातले तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती. 

रावण हा भगवान शिवाचा भक्त होता.असे म्हंटले जाते की एकदा स्वप्नात शिवा नी रावणाला दर्शन दिले आणि कैलासाला बोलावले,रावण कैलासाला जाऊन शिवाला म्हणाला की तुम्ही लंकेत या मी तुम्हाला सोन्याने मढवतो , त्यावर भगवान शिव म्हणाले की तू मला नेणार असशील तर कैलासा सोबत ने !
रावणाने रौद्ररूप धारण करून कैलासा सहित शिवाला उचलले , परंतु शिवाने आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर टेकवला त्याक्षणी रावणाची बोटे कैलासाखाली अडकून राहिली , अडकलेला हात बाहेर काढल्यानंतर त्याठिकाणी दहा गुहा तयार झाल्या सर्व गुहांमध्ये ५ किमी चे अंतर आहे .
(भोलेनाथ शिव शंकराचा उल्लेख [शिव] अस करण्यात आला आहे .) तो एक अहंकारी वृत्तीचा पुरुष होता.

रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण, अहिरावण, खर और दूषण असे सहा भाऊ व दोन बहिणी- शूर्पणखा आणि कुंभिनी होत्या. पैकी शूर्पणखा, कुंभकर्ण आणि रावण हीच फक्त सख्खी भावंडे होती. कुंभिनी ही मथुरेच्या मधुदैत्याची पत्नी झाली. लवणासुर हा त्यांचा पुत्र.  कालकेचा मुलगा दानवराज विद्युविव्हा हा शूर्पणखेचा पती.

एक उपकथानक सांगते की रावणाने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. त्यावेळी त्याने आपले एक एक शिर कापून ब्रह्मदेवाला समर्पण केले. ९ शिरे कापून समर्पण केल्यानंतर ब्रह्मदेव रावणाच्या तपश्चर्या व आंतरिक इच्छेवर प्रसन्न झाला. येथे जेव्हा रावण आपले शिर समर्पित करीत होता, त्यावेळी त्याला त्या मुखात अवगत असलेली ज्ञान संपदा तो ब्रह्मदेवाच्या चरणी ठेवत होता. हा एक महान त्याग होता. 

ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले होते. त्याला एक अमृताची कुपी दिली गेली. ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवली गेली.

२. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले  ” फक्त ह्या कुपीचे रक्षण कर. तुझ्याजवळ मृत्यू येणार नाही. ही जर फुटली तरच मृत्यू ओढवेल.”   त्याचा आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला हानी पोहचवणार नाही ह्याची त्याला खात्री होती. ह्या वरदानाला त्याने गुपित ठेवले. कारण ते त्याच्या मृत्यूशी संबंधित होते. फक्त एक चूक रावणाकडून झाली. तो आपला धाकटा भाऊ बिभीषण ह्याच्यावर फार प्रेम करीत असे. तसाच त्याचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याच विश्वासाने ब्रह्मदेवाचे वरदान त्यास सांगितले. त्याच्या नाभीजवळच्या अमृत कुपीविषयी त्यास सांगितले. कदाचित् ही देखील ब्रह्मदेवाचीही ती योजना असावी कां ? कारण कोणताही मानव अमरत्व पावू शकत नसतो. कालांतराने त्याचाच तो प्रिय बंधू त्याच्या विरोधात गेला. रामाला तो जाऊन मिळाला. रावणाच्या मृत्यूचे गुपित त्यानेच रामास सांगितले. रावणाचा त्यामुळेच अंत होऊ शकला.

एका कथाभागांत रावणाने शिवाला आपल्या तपश्चर्येने प्रसन्न केले. वरदान म्हणून शिवाचे आत्मलिंग मागितले. ही सारी शिवाची आंतरिक शक्ती समजली जाते. हीच रावणाने मागितली. शिवाने ती देऊ केली. रावण शिवाच्या त्या शक्तीला आपल्या जवळ बाळगण्यासाठी लंकेस घेऊन जाणार होता. शिवाने आत्मलिंग देतानाच फक्त एक अट घातली होती.  हे लिंग तू स्वतः बाळग. त्याला केव्हाही जमिनीवर ठेवू नकोस. ज्या क्षणी ते जमिनीवर टेकेल त्याची सारी शक्ती परत मजकडे येईल.”  आत्मलिंग हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून रावणाच्या ताब्यांत लंकेत असणे हे केव्हाही उचित नव्हते. मग काही घटना घडल्या. श्री विष्णूनी सूर्यप्रकाश झाकला. अंधार झाला. संध्याकाळ ही रावणाची संध्या करण्याची वेळ. गणपती याने ब्राह्मण बालकाचे रूप घेतले. रावणाने संध्या होईपर्यंत शिवात्मलिंग त्याच्या हाती दिले. मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस हे सांगितले. त्याच वेळी गणपती म्हणाला   मी तीन वेळी तुला बोलावीन. जर तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन.”  अर्थात असेच घडले. रावणाच्या संध्येमधल्या गर्क असण्याचा फायदा उठवत ते लिंग गणपतीने जमिनीवर ठेवले. ती जागा आज कर्नाटकांत मुरुडेश्वर ह्या नांवाने ओळखली जाते.

३) रावणाचे व्यक्तिमत्त्व :
तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. रावणाचे एक आजोबा (आईचे वडील) राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते. 

४)  रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.

रावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा (दशमुखी) हे नांव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे ह्याचा सांकेतिक अर्थ त्याला महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. प्रत्येक विषयामधील एकेका विद्वानाची (Total Ten Scholars) बौद्धिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांचा असे म्हटले जाते. अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावतात. टीका करतात. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण (Mahabrahmin ) संबोधित असे.  म्हणूनच जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले.

रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली   ”तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित आणि त्याची महानता समजून घे.”   रामाने जो अश्वमेध यज्ञ केला होता त्याचे एक कारण ब्रह्महत्या दोषाचे पापक्षालन करणे हे सुद्धा होते. (ती त्या काळानुरूप संकल्पना होती. गुरू वसिष्ठ यांनीच रामास तसे सुचविले होते.)

लंकाधिपती रावण ही रामायणातील एक उत्तुंग, भव्य, दिव्य  व्यक्तिमत्त्वप्राप्त रूपरेखा होता. रावणाचे पिता ऋषी विश्रवा हे वेद, उपनिषदे  ह्या शास्त्रांत पारंगत होते. त्यानीच रावणाला हे शास्त्रज्ञान दिले. त्याचप्रमाणे शस्त्रविद्येतही तरबेज केले होते. 

कुबेर याला देवांचा धन खजाना बाळगणारा समजले गेले. ( A treasure of God ). हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहिला मुलगा होता. कुबेर हा लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागितले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तिसामर्थ व महान बुद्धिमत्ता ह्यावर विश्वास होता. यांनी कुबेराची समजूत घातली व राज्य रावणास देऊ केले.  एक मात्र सत्य होते की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले.  सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होते. तो सर्वांवर प्रेम करी. त्या काळी प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती.

त्रेतायुगाच्या मानवी वैचारिक नीतिअनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक (परस्त्रीहरणाचे) वाईट कृत्य रावणाच्या हातून घडले. नीतिमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखित वा अलिखित मूल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे.  ही सनातनी व म्हणून अतिप्राचीन समजली गेली.

रावण आयुर्वेद ( Ayurveda Science ) जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ( Political Science) ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिषशास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता.

रावणसंहिता हे हिंदू ज्योतिषावरचे तगडे पुस्तक आहे..

रावणाला संगीताची आवड होती. तो चांगला वीणावादक होता.

फार पुरातन संस्कृतीमध्ये अवयवांची बहुसंख्या हे दिव्यत्वाचे व त्याप्रकारच्या शक्तीचे दर्शक मानले जात असे.  जसे चतुर्भुजा, षट्zwnj;भुजा, अष्टभुजा,  दशभुजा वगीरे देवी. दोन मुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी हे वर्णनपण येते. हे सारे शक्ती, बुद्धी ह्यांचे द्योतक समजले जात असे. रावणाचे दशानन हे वर्णनदेखील ह्याच संदर्भात प्रसिद्ध पावले आहे. ”दहा विद्वतापूर्ण बुद्धिमत्तांचा ठेवा”   ही त्यामागची संकल्पना होती. रावणाच्या विरोधकांनी त्याचा विपर्यास करून त्याला दहा तोंडाचा असुर बनवले.

काही इतिहास संशोधक रावणकथा ही पौराणिक न समजता घडलेला इतिहास मानतात. त्यांच्यामते हा काळ इ.स. पूर्वी २५५४ ते २५१७  ह्या काळातील असावा.

तिबेटमध्ये हिमालयाच्या पर्वतमय उंच पठारी प्रदेशात कैलास पर्वतानजीक मानससरोवर हा पाण्याचा साठा असलेला मोठा तलाव आहे. ते पाणी अतिशय चवदार व गोड आहे. त्याच्याच शेजारी तसाच एक मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. मात्र हे पाणी खारे आहे. जगामध्ये एक वैचित्र्यपूर्ण आणि विशिष्ट असा हा परिसर.  ह्याच परिसरांत रावणाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात.  ( खाऱ्य़ा पाण्याच्या तलावाला काहींनी राक्षसताल हे नाव दिले आहे.)

दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय ( Symbolization of Triumph over Evil )  हे व्यक्त करण्यासाठी रावणप्रतिमा करून तिचे दहन करतात. ही एक सामाजिक प्रथा झालेली आहे. भारतात “होळी पेटवून”  तिच्यात वाईट विचारांचे प्रतीकात्मक दहन करतात. प्रत्येकजण ह्या रूढीमध्ये सहकार्य करतो. त्यांत उत्साह, आनंद, आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली जाते. वाईट वृत्तीचे दहन त्या होळीला देवी समजून केले जाते. त्यांत कुणा व्यक्तीला टार्गेट केलेले नसते.

थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आहे. शिवभक्त रावणाच्या  शिवलिंगासह रावणाच्या कलाकृती तेथे आहेत. आहेत. भारतात काकिंद्रा (आंध्रप्रदेश) येथे कोळी समाज रावणाची पूजा करतो. हजारो कान्यकुब्ज ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रावणग्राम क्षेत्रात आहे. त्याला दररोज जेवण्याचा भोग दिला जातो. राजा शिवकरण याने रावणाचे मंदिर उत्तर प्रदेशांतील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. त्यादिवशी त्या रावणमूर्तीची पूजा होते. गुजरातमधील मुद्गल गोत्राचे दवे ब्राह्मण स्वतःला रावणाच्या वंशाचे समजतात.  

याशिवाय भारतात रावणाची पूजा खालील ठिकाणी होते :- 




#Article 230: कैकेयी (105 words)


कैकेयी (संस्कृत: कैकेयी ; थाई: Kaiyakesi, कैयाकेसी; ख्मेर: Kaikesi, कैकेसी ; बर्मी: Kaike, कैके ; भासा मलायू: Kekayi, केकायी ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या तीन पत्नींपैकी दुसरी पत्नी व अयोध्येची राणी होती. ती केकय देशाच्या अश्वपति राजाची कन्या होती. दशरथापासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. भरतास अयोध्येचे राज्य मिळावे या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. कैकेयीस आधी दिलेल्या वरांच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकेयीची मागणी मान्य करावी लागली. परंतु पुत्रविरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे वाल्मिकीकृत रामायणात व त्यावर आधारलेल्या उत्तरकालीन साहित्यात कैकेयीचे स्वभावचित्रण खलनायकी छटेत केले गेले आहे.




#Article 231: राम (252 words)


राम किंवा श्रीराम हे वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभु श्री राम सत्य वचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते.

राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.

रामचंद्र : रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.

श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.

श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. 
श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’ 

श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.

पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते.




#Article 232: मोक्षगुंडम विश्वेश्वरया (606 words)


सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक  भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर  तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले  समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर  तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा  यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळी ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर  येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. 

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण  म्हैसूर येथे बसविण्यात आली. 
विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बॅंक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. 
त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर,म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले.
कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी  मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रीकी संस्था होती.  ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

ते म्हैसूर येथे असतांना त्यांनीजनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले.  सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

त्यांचे आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मुर्ती दिसली.ती कोणाची आहे अशी गावात विचारपुस केल्यावर,कोणीच समोर येइना. म्हणुन तिने ती घरी आणुन त्याची घरी प्रतीस्थापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय.हे हनुमानाचे मंदिर अजुनही अस्तित्वात आहे.

 नंदी हिल्सच्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे.




#Article 233: विक्रम साराभाई (408 words)


विक्रम अंबालाल साराभाई  (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते.  विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.

आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली.

 डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले.

३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

 




#Article 234: श्रीनिवास रामानुजन (473 words)


श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; मृत्यू : कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले. 

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' असं सांगितलं. 
१२३+१३=१७२९आणि  १०३+९३=१७२९. तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी - रामानुजन संख्या म्हटले जात . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर १०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता . तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती .

१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी  हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.




#Article 235: गोवर्धन मेहता (187 words)


डॉ. गोवर्धन मेहता (जन्म : जोधपूर, २६ जून, इ.स. १९४३) हे एक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. राजस्थान विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून 
पीएच.डी. पदवी घेतली. नंतरच्या काळात त्यांनी बंगलोरची इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्सेस, हैदराबाद विद्यापीठ व इतरही अनेक संस्थांत संशोधनाचे पायाभूत काम केले. 

कार्बनी रसायनशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय असून कार्बन व त्यांचे बंध तसेच मूलद्रव्यातील नावीन्यपूर्ण गुणधर्म यावर त्यांनी काम केले आहे. औषधे म्हणजे प्रत्यक्षात रेणू असतात, 
रसायनशास्त्रात जे सौंदर्य आहे ते संयुगांच्या रचनेत आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी एकूण ४०० शोधनिबंध लिहिले असून वेगवेगळ्या देशांत २५० व्याख्याने दिली आहेत. वार्धक्यात मेंदूचा ऱ्हास होत जातो व मेंदूच्या पेशी नवीन तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा ऱ्हास रोखणारी औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. काही नैसर्गिक पदार्थ हा ऱ्हास रोखू शकतात, असा दावा ते करतात. 

संशोधन हाच त्यांचा छंद. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. हैदराबाद विद्यापीठात, बसायला खुच्र्या नव्हत्या तेव्हापासून त्यांचे काम सुरू आहे. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत. आपल्या आयुष्यातील यशाचे श्रेय ते पत्‍नी रंजनाला देतात.

डॉ. गोवर्धन मेहता यांना त्यांच्या कामाबद्दल ४०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, त्यांपैकी काही हे :- 




#Article 236: रघुनाथ अनंत माशेलकर (581 words)


रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.  रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले. 

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे  पहिले महाराष्ट्रीय आहेत.

 शिक्षण==
रघुनाथ माशेलकरांचा जन्म  गोवा राज्यातील  माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या कॉंग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचे ठरवले. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी.केम.ला प्रवेश घेतला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.

डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणार्‍या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळणार आहे. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. २३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८ हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत.  

डॉ. माशेलकरांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’अंजनी माशेलकर फाऊंडेशन’ स्थापन केले आहे.

जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले.

भारतीयांच्याकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्‍या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसर्‍यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला.

हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध १८९८ मध्येच लावला, पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले. कारण बोस यांनी पेटंट घेतले नव्हते. अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून माशेलकर जागरूक असतात.




#Article 237: महाभारत (1588 words)


                                  

महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.

या ग्रंथाचे आधीचे नाव जय  असे होते.

महाभारत हा ग्रंथ भारताच्या  धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे. 

महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.

महाभारत हा मूळच्या जय  नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. आर्यभट्ट आणि इतर भारतीय गणितज्ञांनुसार महाभारत ई.पू. ३१३९ या वर्षी घडले.  तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग.  यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरुप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे.

महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.

महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जैथे सांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच  घालून दिला. हाच कुरुराजा कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.

महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या सातव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व  स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते

शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दशराज कोळ्याकडे गेेला. दाशराजाने सांगितले की  सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला.त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.

इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पांडू राज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला. 

पुढे धृृृृतराष्ट्राचा गांधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पांडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला. 

पांडू राजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पांडूला शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता.त्या पुत्राचे नाव कर्ण असे होते आणि तोच कर्ण होय. पांडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले. 

पुढे वनात असतानाच पंडूने माद्रीशी संग केल्याने तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली. 

पाच पांडवांसह कुंती हस्तिनापुरास परत आली. 

कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली.
यादरम्यान पांडव भारतभर फिरले. भीमाला हिडिंबा, अर्जुनाला चित्रांगदा, नकुलला करेणुमती अशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले.

महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे:

महाभारतातील तत्त्वोपदेश मुख्यत्वे चार ठिकाणी आला आहे.

या खेरीज काही तत्त्वचिंतक भीष्मोपदेश व विदुरोपदेश यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनांत स्थान देतात.


पुणे शहरातल्या प्रसिद्ध भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरने काही वर्षांपूर्वी काही विद्वानांच्या खूप संशोधनानंतर महाभारताची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यावेळी,  एम. आर. यार्दी यांचा महाभारतासंबंधी एक इंग्रजी ग्रंथही त्या संस्थेने प्रकाशित केला. (रामायण आणि गीता ह्यांविषयीसुद्धा  यार्दींनी ग्रंथ लिहिले आहेत.). यार्दींच्या महाभारतासंबंधी संशोधनातले काही ठळक मुद्दे असे :

सुमारे ३,००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात जे एक मोठे युद्ध घडले त्याचे त्या युद्धानंतर लवकरच व्यासऋषींनी जय नावाच्या ग्रंथात त्याचे वर्णन केले. व्यासांच्या पश्चात सुमारे ५० वर्षांनंतर वैशंपायनऋषींनी जयमधले त्या युद्धाचे वर्णन स्वतःची भर घालून भारत नावाच्या एका ग्रंथात सादर केले. सुमारे ५०० वर्षांनंतर सुत आणि सौति ह्या पिता-पुत्रांनी भारतात भर घालून महाभारत तयार केले.  त्यानंतर सुमारे २५० वर्षांनी कोणी हरिवंशकाराने आणि मग १०० वर्षांनी कोणी पर्वसंग्रहकाराने महाभारतात आणखी भरी घातल्या.

.     
त्या काळी लोक श्रीकृष्ण देवाचा अवतार न मानता अर्जुन-भीष्मादींप्रमाणेच एक व्यक्ती मानत असत. श्रीकृष्णही स्वतःला देवाचा अवतार न मानता इतरांप्रमाणे शिव ह्या तत्कालीन दैवताची पूजा करत असत. सौति जन्मले त्या आधीच्या थोड्याशा काळात श्रीकृष्ण हे विष्णूचा काहीसा अवतार असल्याची कल्पना प्रचारात आली होती. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बाललीला आणि गोपींबरोबरची रासक्रीडा इत्यादी कथा हरिवंशकाराने हरिवंशात प्रथम अंतर्भूत केल्या. (राधेचा उल्लेख महाभारतात किंवा महाभारताला जोडलेल्या हरिवंशातही नाही; तिचा उल्लेख लोककथांमधे पहिल्यांदा सुमारे इसवी सन ९०० च्या सुमाराला झाला.)

वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, आणि योग व भक्तिसाधने ह्यांचा समन्वय घालून श्रीमद्‌भगवद्‍गीता रचणाऱ्या सौतींची बौद्धिक झेप निःसंशय असामान्य  होती.

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने ५० वर्षे खपून महाभारताची १९ खंडांची चिकित्सक आवृत्ती १९६६ साली काढली. तत्पूर्वी चिं.वि. वैद्य यांनी १९१७ साली मराठी महाभारताचे १८ खंड आणि उपसंहाराचा १९वा खंड लिहून प्रकाशित केले होते.

महाभारतातील पृथ्वीचे भौगोलिक संदर्भ:-
महाभारतात भारताव्यतिरिक्त जगातील अन्य भौगोलिक स्थानांचे संदर्भ पण येतात. उदा० चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तमधिल नील नदी, लाल समुद्र तसेच याशिवाय महाभारतातील भीष्म पर्वातील जंबुखंड-विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले गेले आहे. ते असे:-

सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः ||
यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले || द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशे च शशो महान् 

अर्थ:- ’हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे.  ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.’  आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते.

महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो.

महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं 
द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् ।
लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌
पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥




#Article 238: होमी भाभा (280 words)


होमी भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते.
 
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरिंगची पदवी प्राप्‍त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
 
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.




#Article 239: जगदीशचंद्र बोस (428 words)


डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे

पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला.  त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. 

जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.

इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.

.इ.स. 1896	 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१}

१ . लेले य .शं. , इतिहासातील सुवर्णकण   

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही  दोन उपकरणे तयार करुन त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.
वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली

जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे  नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.

डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.




#Article 240: अनिल काकोडकर (289 words)


डॉ. अनिल काकोडकर  (जन्म : बारावनी, मध्य प्रदेश, भारत, ११ नोव्हेंबर १९४३) हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी ते इ.स. १९९६ ते २०००च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.

भारतातील अनेक महत्त्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त, डॉ. काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.

डॉ. काकोडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील बारावनी गावात झाला. त्याच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील  पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले.

डॉ. काकोडकर हे मुंबईच्या रूपारेल कॉलेज मध्ये बारावीपर्यंत होते. त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली.

पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिॲक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणाऱ्या ध्रुव रिॲक्टरमध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

आतापर्यंत त्यांनी जवळजवळ २५०च्यावर शास्त्रीय संशोधनपर लेख लिहिले आहेत.

भारताला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अशा स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे. सध्या ते प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. ह्या भट्टीत थोरियम-युरेनिअम२३३ याचा मूळ ऊर्जास्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरुवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अशा प्रकारच्या भट्टीमुळे, भारताची ७५% ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.




#Article 241: सत्येंद्रनाथ बोस (383 words)


 (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ

बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते. 

सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळवून  उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येंद्रनाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येंद्रनाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच, यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि व्हायोलीन सारखे एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत. 

१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.

१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली. 

भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. 

१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.

दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले. 




#Article 242: शंतनू (314 words)


शंतनू हा महाभारतातील हस्तिनापूरचा भरतवंशी व चंद्रकुळातील राजा होता. तो राजा प्रतीपचा सर्वात लहान मुलगा व भीष्म, चित्रांगद व विचित्रवीर्य यांचा पिता होता. 

तरूणवयात शंतनू गंगेच्या प्रेमात पडतो व तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र गंगा एका अटीवर लग्नास तयार होते. ती अट म्हणजे तिने काहीही केले तरी शंतनू तिला त्याचे कारण विचारणार नाही. शंतनू ही अट मान्य करतो व गंगेशी लग्न करतो. मात्र त्यांना पहिला मुलगा झाल्यावर लगेच गंगा नवजात बालकास नदीमध्ये टाकून देते. मात्र वचनबद्ध शंतनू तिला याचे कारण विचारू शकत नाही. अशाप्रकारे गंगा एकामागोमाग एक सात नवजात बालकांना गंगेत टाकून देते. आठव्या मुलाच्या जन्मानंतर मात्र शंतनू न रहावून तिला त्याचे कारण विचारतो. गंगा त्या शेवटच्या बालकास मारत नाही मात्र शंतनूने वचनभंग केल्यामुळे ती त्याला सोडून जाते. हा शेवटचा मुलगा देवव्रत (नंतरचा भीष्म) या नावाने महाभारतातील प्रमुख पात्राच्या रूपाने पुढे येतो.

देवव्रत मोठा झाल्यावर शंतनू त्याला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित करतो. एकदा शंतनू व देवव्रत शिकारीला गेले असता यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवती या दाशराज नावाच्या कोळ्याच्या मुलीला पाहून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न  होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. या भीषण प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागतो. 

अशाप्रकारे सत्यवती व शंतनूचा विवाह होतो. व त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य ही दोन मुले होतात. मात्र आपल्यामुळेच भीष्माला ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करावी लागली या अपराधीभावनेमुळे यानंतर लवकरच शंतनूचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतर सत्यवती काही काळ भीष्माच्या मदतीने हस्तिनापूरच्या संत्तेचा सांभाळ करते व नंतर चित्रांगद हस्तिनापूरचा राजा बनतो.




#Article 243: सत्यवती (294 words)


सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरव व पांडवांची आजी होती. लग्नाआधी ती निषाद राजा दुशाराज  नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरिरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. महाभारतात तिचा उल्लेख मत्स्यगंधा या नावानेसुद्धा केला गेला आहे. ऋषी पराशर यांची स्त्रीसुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर ऋषी पराशर यांनी तिच्या शरिरास येणारा माशांचा गंध नाहीसा करतात व त्याजागी अद्वितीय असा सुंगध तिच्या शरिरास येईल, असे वरदान देतात. हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, यामुळे तिला योजनगंधा असे संबोधले जाऊ लागते. 

शंतनूशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा होतो. हा मुलगा म्हणजे ऋषी व्यास. त्यानंतर यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवतीला बघून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. परंतु शंतनूने त्याआधीच त्याचा जेष्ठ पुत्र देवव्रत याला भावी राजा म्हणून घोषित केले असते. त्यामुळे शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न  होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील.

या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह होतो व तिला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी दोन मुले होतात. शंतनूच्या मृत्यूनंतर ती काही काळ हस्तिनापूरचा राजकारभार पाहते. त्यानंतर चित्रांगद व त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो. सत्यवती त्याचे लग्न अंबिका व अंबालिका या काशीच्या राजाच्या मुलींसोबत करून देते. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश इथेच संपू नये यासाठी सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्ती होते.




#Article 244: भीष्म (996 words)


देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी  होण्याचा वर दिला होता. महाभारतीय युद्धात याने सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची याची नीती ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत याने प्राण रोखून धरले व ५८ दिवसांनी  दक्षिणायन संपल्यावर रणांगणावर प्राणत्याग केला.

सोमवंशातील राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष. ब्रह्मदेवाच्या शापाने गंगा शंतनूची पत्‍नी बनली आणि वासिष्ठांचा शाप व इंद्राची आज्ञा यांमुळे अष्टवसू हे गंगेचे पुत्र बनले. तिने पहिले सात पुत्र मारल्यानंतर शंतनूच्या विनंतीवरून आठव्या पुत्राला जीवदान दिले. हा आठवा पुत्र म्हणजेच भीष्म होत. एका मतानुसार ते अष्टवसूंचा सारभूत अवतार होते, तर दुसऱ्या मतानुसार ते अष्टवसूंपैकी 'द्यु' या आठव्या वसूचा मानवी अवतार होते.

त्यांचे मूळचे नाव देवव्रत असे होते. परंतु आपल्या वडिलांचे जिच्यावर मन बसले आहे, त्या सत्यवतीनामक धीवरकन्येचा त्यांच्याशी विवाह व्हावा आणि त्यासाठी तिच्या वडिलांनी घातलेल्या 'तिच्या पुत्राला राज्य मिळावे' याा अटीनुसार त्यांनी आमरण ब्रह्मचर्याची शपथ घेतली. या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना 'भीषण' या अर्थाचे 'भीष्म' हे नाव कायमचे प्राप्त झाले. त्यांच्या या प्रतिज्ञेमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छामरणी होण्याचा वर दिला. गंगेचा मुलगा असल्यामुळे त्यांनी गांगेय व नदीज अशी नावे मिळाली, तर शंतनूचा मुलगा असल्यामुळे शांतनव असे नाव मिळाले. ते महाभारत युद्धाच्या वेळी कुरुवंशातील सर्वांत वृद्ध पुरुष असल्यामुळे त्यांना कुरुवृद्ध असे म्हटले जाई तसेच त्यांचा निर्देश 'पितामह', 'भीष्माचार्य' इ. आदरार्थी शब्दांनी केला जात असे.

लहानपणी गंगेजवळ असताना वसिष्ठांनी त्यांना सर्व वेद शिकविले होते. त्यांनी बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडून शस्त्रास्त्रांचे, परशुरामाकडून शस्त्रास्त्रांबरोबरच राजधर्म व अर्थशास्त्र यांचे, च्यवनभार्गवाकडून सांगवेदांचे व मार्कंडेयांकडून यतिधर्माचे ज्ञान मिळविल्याच्या कथा आढळतात. यांतील काही कथा त्यांचे सर्वज्ञत्व दर्शविण्यासाठी रचल्या असण्याची शक्यता आहे. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्म, नीती, दर्शने इ. क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सर्वशास्त्रवेत्ता मानले जाई. महाभारतयुद्धामध्ये शरशय्येवर पडल्यानंतर त्यांनी युधिष्ठिराला (धर्मराजाला) केलेला उपदेश महाभारताच्या अनुशासन आणि शांतिपर्वांत विस्ताराने आला आहे. परंतु इतकी विद्वत्ता असूनही ते दुःशासनाने केलेली द्रौपदीची विटंबना थांबवू शकले नाहीत, हा त्यांच्या जीवनावरील कलंक असल्याचे काही अभ्यासक मानतात तसेच कौरवांचे दोष दिसत असूनही महाभारत युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, युद्धाच्या वेळी आपल्या पराभवाचा मार्ग पांडवांना सांगणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होत असतानाही प्रतिज्ञेला चिकटून राहणे इ. प्रकारचे दोष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याची टीकाही अनेकजण करतात.

कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. शंतनूसाठी ते आमरण ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर चित्रांगद व विचित्रवीर्य या सावत्र भावांचेही ते संरक्षक बनले. विचित्रवीर्यासाठी पत्‍नी म्हणून अंबिका व अंबालिका यांना त्यांनीच जिंकून आणले. धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांचे पालनपोषण, शिक्षण व विवाह त्यांनी केले. कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांनी केली. अशा रीतीने त्यांनी कुरुवंशातील चार पिढ्यांची काळजी वाहिली.

त्यांच्यावर युद्धाचे अनेक प्रसंग आले. शंतनूच्या मृत्यूनंतर शेजारच्या उग्रायुध राजाने सत्यवतीच्या अभिलाषेने त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी तीन दिवस लढून त्याला ठार मारले. काशिराजाने अंबा, अंबिका व अंबालिका या आपल्या मुलींसाठी स्वयंवर घोषित केले, तेव्हा त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव करून विचित्रवीर्यासाठी त्या मुली जिंकून आणल्या. अंबेच्या सांगण्यावरून परशुरामाने भीष्मांना तिच्याशी लग्‍न करावयास सांगितले; परंतु त्यांनी ते नाकारल्यामुळे परशुरामाने त्यांच्याशी युद्ध केले. तेवीस दिवस चाललेल्या या युद्धात भीष्मांनी परशुरामाचा पराभव केला; परंतु परशुरामाच्या काळाचा विचार करता ही घटना अनैतिहासिक असावी, असे मानले जाते. महाभारतयुद्धात पहिले दहा दिवस ते कौरवांचे सेनापती होते. या काळात त्यांनी बराच पराक्रम केला. एकदा तर ⇨अर्जुनाला त्यांनी मृर्च्छित केल्यामुळे ⇨कृष्णाने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडली. त्यांच्या रथाच्या ध्वजावर तालवृक्षाचे चिन्ह होते.

स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करावयाचे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते चिकटून राहिले. ही प्रतिज्ञाही त्यांनी स्वतःहूनच स्वीकारली होती. अंबेशी विवाह करण्याची आज्ञा प्रत्यक्ष परशुरामाने देऊनही त्यांनी ती नाकारली. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर स्वतः सत्यवतीने आपल्या विधवा सुनांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांना नियोगाची आज्ञा दिली; परंतु तीही त्यांनी मानली नाही. शंतनूने सत्यवतीशी लग्‍न होण्यापूर्वी त्यांना युवराज म्हणून अभिषेक केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांनी राज्याचा लोभ कधीच केला नाही. अखेरपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी राजा बनवून ते अधिकारपदापासून दूर राहिले.

महाभारत युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून त्यांच्यावर बाण मारले. भीष्मवधासाठी तपश्चर्येने पुनर्जन्म प्राप्त केलेली अंबा हीच शिखंडी असल्याचे सांगितले जाते. भीष्म शिखंडीला स्त्री मानत असल्यामुळे त्यांनी शिखंडीआडून आलेल्या बाणांचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते जखमी होऊन खाली कोसळले. पौष कृष्ण सप्तमीला फाल्गुनी नक्षत्रावर ही घटना घडली, असे मानले जाते; परंतु त्यावेळी दक्षिणायन चालू होते. भीष्म इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायण चालू होईपर्यंत प्राण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्जुनाने त्यांना शरशय्या करून दिली. माघ शुद्ध अष्टमीला विनशन नावाच्या क्षेत्रात त्यांनी प्राण सोडले. चित्रावशास्त्रींच्या मते मृत्युसमयी त्यांचे वय १८६ इतके असावे. इरावती कर्वे यांच्या मते त्यावेळी त्यांचे वय कमीत कमी ९० ते १०१ वर्षांचे असावे. माघ शुद्ध अष्टमी ही 'भीष्माष्टमी' मानली जाते. ज्यांचे पितर जिवंत आहेत, त्यांनीदेखील त्या दिवशी भीष्मासाठी तर्पण करण्याची प्रथा आढळते. भीष्म ब्रह्मचारी असल्याने अशी प्रथा पडली. गुजरातमध्ये भीष्माष्टमीला भीष्मप्रतिमेची पूजा करतात. माघ शुद्ध द्वादशीला 'भीष्मद्वादशी' म्हटले जाते. उत्तर भारतात 'भीष्मपूजा' नावाचे एक व्रत केले जाते तसेच कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस 'भीष्मपंचक' नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कुरुक्षेत्राच्या परिसरात 'भीष्मशरशय्या' या नावाचे एक तीर्थक्षेत्हीर आढळते.

देवव्रत हा हस्तिनापुराचा राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र होता. देवव्रताच्या जन्मानंतर पुढील काळात शंतनूचा धीवरकुळातील सत्यवतीवर जीव जडला. मात्र सत्यवतीचा पिता दाश याने शंतनूला सत्यवतीशी लग्न करायचे असल्यास शंतनूनंतर सत्यवतीच्या वंशजांकडेच राज्याधिकार देण्यात यावेत, असे वचन मागितले. शंतनूची विवाहाची इच्छा साकारण्यासाठी देवव्रताने ज्येष्ठ पुत्र असूनही हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म म्हणजे कठोर प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचे भीष्म असे नामाभिधान झाले.

पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याच्या विवाहासाठी भीष्माने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबेचे प्रेम सौभपती(?) शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर बीष्माने तिला शाल्वाकडे धाडले. परंतु शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन अंबेने परशुरामाला भीष्माला युद्धाचे आमंत्रण देण्याची विनंती केली. व जोपर्यंत अंबेचे समाधान होत नाही,  तोपर्यंत युद्ध करावे लागेल ही अट घातली. हा वाद खूप विकोपास गेल्यावर गंगेच्या मध्यस्थीने भगवान शिवास यात हस्तक्षेप करावा लागला. आणि महादेवाने अंबेला असे वरदान दिले की जेव्हा भीष्माला वृद्धाअवस्था ग्रासेल तेव्हा तुझा पुनर्जन्म होईल. अंबेने आत्महत्या केली  व नंतर शिखंडी म्हणून पुनर्जन्म घेतला. भीष्माला युद्धात हरवण्यासाठी शिखंडी कारणीभूत झाला, अशी कथा महाभारतात आली आहे.  




#Article 245: विचित्रवीर्य (181 words)


 हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनू व सत्यवती यांचा मुलगा, चित्रांगदाचा लहान भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता.

चित्रांगदाच्या मृत्यूनंतर भीष्माच्या देखरेखीखाली विचित्रवीर्याला हस्तिनापूरचा राजा बनवले गेले. भीष्माची इच्छा असते की त्याचा विवाह  काशीच्या राजाच्या मुली अंबा, अंबिका व अंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्यासोबत करून दिला जातो. 

मात्र विवाहानंतर मूल होण्याच्या आधीच क्षय रोगाने विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. तेव्हा सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबिका, अंबालिका व त्यांची एक दासी यांना अनुक्रमे धृतराष्ट्र, पांडू व विदुर ही मुले होतात. अंबिका व्यासांना पाहताच त्यांची वाढलेली दाढी व रूप पाहून भीतीने डोळे मिटून घेते त्यामुळे तिचा पुत्र धृतराष्ट्र जन्मतः अंध असतो. अंबालिका व्यासांना पाहून भीतीने पांढरीफटक पडते त्यामुळे तिचा पुत्र पांडू कोड घेऊन जन्मतो. दासी मात्र धीटपणे व्यासांना सामोर गेल्याने तिचा पुत्र विदुर ज्ञानी म्हणून जन्मतो.
धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असूनसुद्धा तो जन्मजात अंध असल्यामुळे पांडू हस्तिनापूरचा विचित्रवीर्यानंतरचा राजा बनतो.
 




#Article 246: अंबालिका (172 words)


 हे महाभारतातील एक पात्र आहे. ती काशीच्या राजाची मुलगी आणि अंबिका व अंबा यांची बहीण असते.

मुली मोठ्या झाल्यावर काशीचा राजा त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करतो. हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म याची इच्छा असते की त्याचा विवाह अंबा, अंबिका व अंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे विचित्रवीर्याचे लग्न अंबिका व अंबालिकाशी होते.

मात्र लग्नानंतर लगेचच क्षयामुळे विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश टिकून राहावा यासाठी पुत्रप्राप्तीसाठी, अंबालिकाची सासू (सत्यवती) अंबिका व अंबालिकाला सत्यवतीचा जेष्ठ पुत्र व्यास यांच्याकडे पाठवते. मात्र महर्षी व्यासांचे उग्र रूप पाहून अंबिका एकदम घाबरून जाते आणि आपले डोळे मिटून घेते. यामुळे तिचा मुलगा धृतराष्ट्र अंधळा जन्मेल अशी भविष्यवाणी व्यास करतात. सत्यवती अंबालिकेला व्यासांना बघितल्यावर डोळे मिटू नकोस असे सांगते. पण व्यासांना बघून तीसुद्धा घाबरते. सत्यवतीकच्या सांगण्यानुसार ती डोळे उघडे ठेवते पण भितीने पांढरी पडते. यामुळे तिचा मुलगा पांडु हा रोगीष्ट (पंडुरोगी) जन्मतो.




#Article 247: पंडू (231 words)


 हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसर्‍या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पांढरा (पंडुरोगी) होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. कुंती व माद्री या त्याच्या दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेले याचे पाच पुत्र पांडव म्हणून ओळखले जात.

पंडूला धृतराष्ट्र नावाचा थोरला भाऊ होता. धृतराष्ट्राहून वयाने लहान असूनही, धृतराष्ट्र आंधळा असल्याने  हस्तिनापुराचा कारभार पहात होता. 

एकदा पांडूने शिकार करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरणांची जोडी समजून बाण मारला. मरण्यापूर्वी किंदम ऋषींनी पंडूला शाप दिला की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तत्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागला.  पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पांडूने कुंतीला व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. तेव्हा कुंतीने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पांडूला माहिती दिली. पांडुने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कुंतीने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेतले. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने आपला मंत्र तिला दिला.. नंतर माद्रीने त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले.. पांडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंती माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत असे.

पुढे शापाचा विसर पडून पांडू  माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू झाला, व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री त्याच्याबरोबर सती गेली.




#Article 248: कुंति (458 words)


कुंति (देवनागरी लेखनभेद : कुंती) ही महाभारतातील हस्तिनापुराच्या पंडु राजाची पत्नी व पांडवांमधील थोरल्या तिघांची आई होती. यादव कुळातील शूरसेनाची कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव पृथा असे होते. नि:संतान असलेल्या कुंतिभोज राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव कुंति असे ठेवण्यात आले. 

कुंतिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषिंनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती.  या पुत्राचे नाव कुंतिने कर्ण असे ठेवले. परंतु अविवाहीत असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते म्हणून कुंति एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवते व ती पेटी नदीत सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या सूताला सापडते. तो या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो.

पुढे कुंतिचा विवाह हस्तिनापूरचा राजा पांडुशी याच्याशी होतो. तिला माद्री नावाची सवत देखील होती. एकदा पांडू मृगया करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरीणांची जोडी समजून बाण मारतो. मरण्यापूर्वी किंदम ऋषी पांडूला शाप देतात की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरिरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तात्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू  आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागतो. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पांडू  कुंति व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगतो. तेव्हा कुंतिने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पांडूला सांगते. पांडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवतो. त्याबरोबर कुंति यमापासून युधिष्ठीर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेते. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंति आपला मंत्र तिला देऊन टाकते. नंतर माद्री त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेते. पांडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंति माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देते.

पुढे शापाचा विसर पडून पांडू व माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू होतो व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री सति जाते. यानंतर कुंति आपल्या पाचही पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास परतते. या घटनेमुळेच दुर्योधनाच्या मनात असंतोष जागा होतो.

कौरव व पांडव कुमारवयीन असताना हस्तिनापुरात युद्धकला प्रतियोगितेचे आयोजन केलेले असताना तेथे कर्णास पाहिल्यावर कुंति त्याला आपला पहिला पुत्र म्हणून ओळखते, मात्र ती याची वाच्यता कुठेही करत नाही. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण जोपर्यंत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगत नाही तोपर्यंत कुंति ही आपली माता आहे, हे कर्णालादेखील ठाऊक नसते.

द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह होण्यास कुंतिच्या तोंडून अनावधानाने बाहेर पडलेले शब्द कारणीभूत होतात. 

पुढे महाभारत युद्धप्रसंगी एके दिवशी कुंति आपला पहिला पुत्र कर्ण यास भेटावयास जाते व त्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याला पांडवांना सामिल होण्याविषयी सुचवते, मात्र कर्ण या गोष्टीस नकार देतो. या युद्धामधे कर्ण अर्जुनाकरवी मारला जातो. यानंतर कुंती कर्णाच्या जन्माचे रहस्य पांडवांना सांगते व त्याचा अंत्यविधी योग्य प्रकारे व्हावा असे आवाहन करते. 

महाभारत युद्धसमाप्तीनंतर कुंति राजसुखाची अपेक्षा न करता धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासोबत वानप्रस्थाश्रमास निघून जाते.

कुंतीच्या जीवनावर अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :- 




#Article 249: माद्री (162 words)


माद्री ही महाभारतातील कथेमधील मद्र देशाची राजकन्या असते. ती कुरू सम्राट पांडूची द्वितीय पत्नी असते व नकुल व सहदेव या पाडूंपुत्रांची माता असते. 

पांडू जेव्हा दिग्विजयाच्या यात्रेवर निघालेला असतो त्यावेळेस मद्र देशाचा राजा शल्य विरोधाच्या ऍवजी मैत्रीचा प्रस्ताव पांडू पुढे ठेवतो व आपली बहीण माद्री हिला द्वितीय पत्नी म्हणून स्वीकारावे अशी विनंती करतो. माद्रीच्या रुपावर आकर्षीत होऊन पाडूं माद्रीला आपली पत्नी म्हणून स्वीकार करतो. माद्रीला द्वितीय पत्नी म्हणून कुंती स्वीकारेल की नाही अश्या चिंतेत असतानाच माद्री कुंती व इतर कुरू जनांचे मन जिंकुन घेते.  किंदम ऋषींच्या शापामुळे पांडू राज्यत्याग करतो व आपल्या दोन्ही पत्नीसोबत वनवासात रहातो. कुंतीला दुर्वास ऋषींच्या युधिष्ठीर, भीम व अर्जुन या पुत्रांची मंत्राने पुत्रप्राप्ती झाल्यानंतर कुंती माद्रीला तो मंत्र देते ज्याच्या प्रभावाने माद्रीला अश्वीनीकुमारांच्या प्रभावाने नकुल व सहदेव हे दोन पुत्र होतात. काही वर्षे वनवासात काढल्यानंतर एकदिवशी माद्री अंघोळ करून येत असताना. तिच्या रुपाकडे पाहून पांडूचा संयम तुटतो व माद्रीशी प्रणय करु पहातो. परंतु किंदम ऋषींच्या शापाने पांडूचा जागीच मृत्यु होतो. माद्री याचे प्रायश्चित्त म्हणून पांडूच्या चितेत सती जाते. 




#Article 250: भीम (210 words)


भीम ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, तो पांडवांमध्ये दुसरा आहे. तो वायूच्या कृपेने कुंतीस झालेला पुत्र होता. सर्व पांडवांमध्ये तो विशाल आकारमानाचा व अजोड सामर्थ्याचा होता. जन्मत: भीम वजनदार होता . कुंतीला त्याचे वजन सांभाळता न आल्याने, तो तिच्या हातातून निसटला. खालीएक शिळा होती , त्यावर पडला. कुंती घाबरली . तिने भीमला उचलून घेतले, ती खालची शिळा फुटली, त्यामुळे 'शिळाभंजन' हे एक नाव भीमास प्राप्त झाले.

द्रौपदीशी विवाह होण्याआधी भीमाचा हिडींबा या राक्षस कन्येशी विवाह झाला होता. हिडींबेचा भाऊ हिडींब याला भीमाने ठार केले होते. घटोत्कच हा हिडींबा व भीम यांचा पुत्र होय.

कुंति व इतर पांडवांसह एकचक्रा नगरीमधे एका ब्राम्हणाच्या घरी वास्तव्यास असताना बकासूर नावाच्या राक्षसास देखील भीमानेच ठार केले होते.

द्युतप्रसंगामधे दुर्योधनाने आपली उघडी मांडी दाखवून द्रौपदीला अपमानित व लज्जित केले होते, त्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी भीमाने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती. तसेच, द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या ाची छाती फोडून, त्याचे रक्त पिण्याची प्रतिज्ञादेखील भीमाने केली होती. या दोन्ही प्रतिज्ञा महाभारतीय युद्धामधे भीमाने पूर्ण केल्या.

अज्ञातवासात असताना विराट राजाच्या दरबारी भीमाने बल्लव या नावाने आचार्‍याची नोकरी पत्करली होती. तेथेच द्रौपदीवर अतिप्रसंग करू पहाणारा विराट राजाचा मेहुणा व राणी सुदेष्णा हिचा सख्खा भाऊ कीचक याचा वध भीमाने केला होता.

महाभारतीय युद्धात दुर्योधनाचा मृत्यू भीमाशी घडलेल्या द्वंद्व गदायुद्धात झाला.

महाभारतीय युद्धामधे सर्व कौरव एकट्या भीमानेच मारले होते.




#Article 251: अर्जुन (125 words)


 

अर्जुन ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून तो पांडव|पांडवांमधला] तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने पंडूची पत्‍नी कुंती हिला झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता सांगितली
.
महाभारतातील कृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, नारदमुनी आणि धृतराष्ट्र यांच्यानुसार तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर व अद्वितीय योद्धा होता. महाभारतात तोच एकटा अपराजित शूर होता. कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांच्या अपयशात याचा प्रमुख वाटा होता. हिंदू संस्कृतीमध्ये तो शौर्याचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मानुसार तो नराचा अवतार होता तर कृष्ण हा नारायणाचा अवतार होता. 

अर्जुनाला द्रौपदीव्यतिरिक्त उलुपी, सुभद्रा आणि चित्रांगदा या पत्‍नी होत्या.

अर्जुनाने अज्ञातवासात असताना षंढवेश धारण केला व बृहन्नडा या नावाने विराटाच्या नगरीत एक वर्ष काढले.

अर्जुनाच्या जीवनावर सुनील देसाई यांनी ’सर्वश्रेष्ठ धनुर्धर’ नावाची कादंबरी लिहिली आहे.

पहा : अर्जुन वृक्ष




#Article 252: गांधारी (419 words)


गांधारी ही मूळची गांधार (म्हणजे हल्लीचा अफगाणिस्तान) या देशाची राजकन्या होती. (म.आदिपर्व ९०.६१). गांधार देश भारताच्या वायव्य दिशेला होता. त्याची तक्षशिला ही राजधानी होती. आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे. बाल्यकाळातच गांधारीने रुद्राची आराधना करून शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते. हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी तिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता (म.आ.१०३. ९-१०). 

यथावकाश, महाभारतातील पितामह भीष्म यांनी [गांधार|गांधारच्या सुबल नावाच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि कन्या गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुनीला पसंत पडला नाही. गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्राच्याप्रमाणेही स्वतःलासुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य व्यतीत केले. 

महाभारतात अन्यत्र हिला द्वैपायन व्यासाच्या आशीर्वादानें शंभर पुत्र प्राप्त झाल्याचा निर्देश आढळतो. (म.आ.१०७.७-८). 

हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता असलेली गांधारी ही गांधार देशाधिपती सुबल राजाची कन्या असली तरी ती दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती, असे म्हणतात (म.आ.६१९८). एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात तिचे स्वभावचित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे तिच्या मनाची झालेली तडफड महाभारतात अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे.

गांधारी ही महाभारतातील १०० पुत्रांची व एका कन्येची माता होती. मुळात तिने केवळ एका मासांच्या पिंडाला जन्म दिला होता. परंतु व्यासांनी या पिंडाचे १०१ तुकडे करून ते एका तुपाच्या रांजणात ठेवण्यास सांगितले व १०१ कौरवांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. सर्वप्रथम दुर्योधन जन्माला आला त्यानंतर  व इतर कौरवांचा जन्म झाला. सरतेशेवटी कन्या  चा जन्म झाला. 

गांधारीला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने तिने आपला अपुऱ्या दिवसांचा गर्भ बाहेर काढला. त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड तिला पुत्र म्हणून प्राप्त झालला, आणि ती शोकातिरेकाने रडू लागली. गांधारीची ही अवस्था पाहून व्यासांस दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करून ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. काही काळाने तिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे तिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले (म.आदिपर्व भा.१०७१०-१४). कन्याप्राप्तीची तिची इच्छाही व्यासांनी तिला दुःशला नामक कन्या प्रदान करून पुरी केली (म.आ.१०७.३७).

गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. कौरवांची वागणूक खलनायकाप्रमाणे असली तरी महाभारतात गांधारीची वर्तणूक अतिशय सालस व धार्मिक होती. ती नेहेमी धृतराष्ट्र व आपले पुत्र यांना राजधर्म व चांगल्या वागणुकीसाठी बोलत असे. पांडवांचे कौरवांशी कितीही टोकाचे वैर असले तरी त्यांना गांधारीच्या बाबतीत परम आदर होता. द्रौपदी वस्त्रहरणाचे हीन काम चालू असताना सर्व कुरुसभा चिडीचूप होती त्यावेळेस केवळ गांधारीनेच येऊन मध्यस्थी केली व निर्वेध चाललेले वस्त्रहरण बंद पाडले. तिने धृतराष्ट्राला स्त्रीच्या शापापासून होणाऱ्या नुकसानाची कल्पना दिली व द्रौपदीला मानसन्मान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला.




#Article 253: दुर्योधन (274 words)


दुर्योधन हा महाभारतातील हस्तिनापुराचा जन्मांध राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी सर्वांत मोठा होता.त्याला भानुमती नावाची पत्नी व‌ लक्ष्मण नावाचा मुलगा व लक्ष्मणा नावाची मुलगी होती,जिच्याशी श्रीकृष्णा व राणी जांबवती चा मुलगा सांब याने विवाह केला होता. तो पांडवांचा राजकीय विरोधक होता. दुर्योधन गदायुद्धात अतिशय प्रवीण होता.तो कृष्ण बंधू बलरामाचा शिष्य होता. त्याने पांडवांना मारण्यासाठी अनेक उपाय योजले. लाक्षागृहात ठेवून त्यांना जाळण्याचा त्याने प्रयत्‍न केला. भीमाला विष पाजून जीवे मारण्याचा त्याने प्रयत्‍न केला. पण त्याला कधीच यश आले नाही. शेवटी शकुनी मामाच्या साहाय्याने युधिष्ठिरास द्यूतात हरवून दुर्योधनाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले. द्यूतप्रसंगात एके ठिकाणी त्याने द्रौपदीला आपली उघडी मांडी दाखवून लज्जित व अपमानित केले होते. यानंतर त्याने भर सभेमध्ये आपला बंधू दुःशासन याच्याकरवी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्‍न केला आणि पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यास पाठविले.

पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळातही दुर्योधनाने गंधर्वांकडून पांडवांना मारण्याचा बेत केला. दुर्वास मुनीना चाल करण्यास पाठवले आणि विराट राजाच्या गाई पळवून पांडवांच्या अज्ञातवासाचा भंग करण्याचा प्रयत्‍न केला. शेवटी १३ वर्षानंतर पांडवांतर्फे श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले तेव्हा सुईच्या अग्राएवढी सुद्धा जमीन देणार नाही, असे सांगून त्यांचा उपमर्द केला. महाभारत युद्धात पराभव झाल्यावर दुर्योधन स्वाती डोहामध्ये लपून बसला. तेथे भीमाने जाऊन त्याला गदायुद्धात हरविले, त्याच्या मांडीवर आघात करून त्याची मांडी फोडली व द्यूतप्रसंगी घेतलेली आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. महाभारतीय युद्धात दुर्योधन भीमाच्या हातून अखेर मारला गेला.

पांडवांची माता कुंती हिचा कानीन पुत्र कर्ण हा दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचा राजा बनविले होते.

दुर्योधनाचे खरे नाव दुर्योधन नसून ते सुयोधन असावे व दुर्व्यवहारामुळे ते दुर्योधन असे बदलले गेले असावे, असाही एक प्रवाद आहे.

दुर्योधन : 
संस्कृत : दुर्जयं अस्ति योधनम् यस्मै सः तत्  
अर्थ: ज्याचेशी (लढून) युद्धात जय मिळणे कठीण आहे असा जो तो.




#Article 254: कर्ण (महाभारत) (1417 words)


कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंतीपुत्र या नावानेही ओळखला जातो. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. राधा नावाच्या स्त्रीने त्याला लहानाचे मोठे केल्यामुळे तो राधेय ह्या नावाने ओळखला जात होता. तो आपल्या दानशूर पणा बद्दलसुद्धा प्रसिद्ध होता.

कुंतीभोज राजाची कन्या कुंती हिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषिंनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला, आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती.

कुमारी माता बनलेल्या कुंतीने घाबरून एका टोपलीत घालून त्या मुलाला गंगा नदीत सोडून दिले. अधिरथ नावाच्या हस्तिनापुरला सारथी म्हणून काम करणार्‍या  सूताला (रथचालकाला) ती टोपली मिळाली. त्याने आणि त्याची पत्‍नी राधा यांनी त्या मुलाचे पालन केले. त्यांनी त्या मुलाचे नाव वसुसेन ठेवले,  कुंडलांमुळे तो कर्ण नावाने प्रसिद्ध झाला. राधेचा पुत्र म्हणून तो राधेय नावानेही ओळखला जात असे.
अधिरथ आणि राधा यांना शोण नावाचाही एक मुलगा होता.

अधिरथ हा कर्ण आणि शोण ह्यांना घेऊन हस्तिनापुरास आला आणि कृपाचार्यांकडे त्याचे शिक्षण सुरू झाले.

जेव्हा कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांच्यातील सर्वोत्कॄष्ट योद्धा ठरविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये अर्जुनाने सर्व युद्धप्रकारांमध्ये आपले प्रावीण्य दाखविले. हे बघून चिडलेल्या कर्णाने आपले अर्जुनापेक्षा वरचढ कौशल्य सर्वांना दाखविले, आणि स्पर्धेचा खरा जेता ठरविण्यासाठी अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले. 
त्या काळातील नियमांनुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कूळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होऊ शकत असे. या नियमाचा आधार घेऊन कृपाचार्यांनी कर्णाला आपले कूळ जाहीर करावयास सांगितले. हे ऐकून दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेल्या अर्जुनाच्या तुल्यबळ करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला. दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीची ही सुरुवात मानली जाते.

कर्णाला दोन बायका होत्या, पहिली वृषाली, ही दुर्योधनाचा सारथी सत्यसेन याची बहीण होती.  दुसरी सुप्रिया (ऊर्फ उरुवी)  ही पुकेय देशाची राजकन्या व दुर्योधनाच्या पत्नीची-भानुमतीची मैत्रीण होती. 

कर्णाची सहा मुले :- वृषसेन, सु़षेण (हे दोघेही युद्धात मारले गेले) आणि तिसरा वृषकेतू, याचा अर्जुनाने सांभाळ केला..शिवाय सत्यसेन, चित्रसेन (?), शत्रुंजय आणि विपथ.

कर्णाचे भाऊ (राधा आणि अधिरथ यांची दोन मुले) : शोण आणि द्रूम .

द्रुपद राजाची कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरासाठी त्याने धनुर्विद्येचा कठीण पण लावला होता. हा पण जिंकण्यासाठी दुर्योधन कर्णास घेऊन पांचाल राज्यात गेला.  (पांडवांच्या वारणावतातील मृत्यूनंतर तो पण पूर्ण करू शकणारा कर्ण हा एकमेव योद्धा मानला जात होता) स्वयंवराच्या वेळी जेव्हा कर्ण पण पूर्ण करण्यासाठी पुढे आला तेव्हा द्रौपदीने मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही असे म्हणून त्याचा अपमान केला.

नंतर ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या अर्जुनाने तो पण जिंकला. ह्या घटनेनंतर पांडवांबद्दलचे (विशेषतः अर्जुनाबद्दलचे) कर्णाचे वैर आणखीनच वाढले.

पांडवांनी इंद्रप्रस्थात केलेल्या राजसूय यज्ञासाठी हस्तिनापुराहून गेलेल्या राजांमध्ये कर्णाचा समावेश होता. मयसभेत झालेल्या दुर्योधनाच्या अपमानाचा कर्ण साक्षीदार होता..
या मयसभेत कौरवांचा युवराज गदावीर दुर्योधन याचा त्या मायावी महालातील जमिनीसारख्या दिसणार्‍या तळ्यात पाय पडला व तो तळ्यात पडला, त्याचा मुकुट नकळत तळ्याच्या तळला गेला. त्यावर द्रौपदीसकट सर्व स्त्रिया हसल्या व त्यांनी अंध पित्याचे पुत्रही अंधेच असतात काय असे खोचक उद्गार काढले. याचा दुर्योधनाला खूप राग आला व तो म्हणाला योग्य वेळ येताच पित्याचे पुत्र किती डोळस असतात ते तुला दाखवून देईन. हा त्याचा अपमान महाभारताच्या युद्धाला कारणीभूत झाला.

पांडवांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल मत्सरग्रस्त होऊन दुर्योधनाने आपला मामा शकुनी ह्याच्या सल्ल्याप्रमाणे युधिष्ठिराला विष्णुजित यज्ञाच्या निमित्ताने द्यूत खेळण्याचे आमंत्रण दिले. ह्या द्यूतात सर्व राज्य गमावलेल्या युधिष्ठिराने आपले बंधू, आपण स्वतः आणि अखेरीस आपली पत्‍नी द्रौपदी ह्यांना पणावर लावले. 

हरलेल्या द्रौपदीला निर्वस्त्र करण्याची दुर्योधनाने आज्ञा दिली

वनवासात असलेल्या पांडवांना आपल्या वैभवाचे दर्शन करवण्यासाठी दुर्योधनाने आपल्या दासदासींसह पांडवांच्या पर्णकुटीजवळ असलेल्या तलावात जलक्रीडेसाठी जायचे ठरवले. तिथे गेल्यावार दुर्योधन नी येका गंधर्व राजकुमारिशी जबरदस्ती करण्या चा प्रयात्न केला.हिच स्थिती राजकुमारी ने  भावाला आनी वाडिलान्नाना सांगिताली.तर आंध्रवाणी दुर्योधन ला पाकडुन नेले.त्यावेळी दुर्योधन, दुशासन आणि कर्ण मधिरात होते.कर्ण आणि दुशासन मधिरा मधुन बहेर येनार . अर्जुनाने युधिष्ठिराच्या आज्ञेवरून युद्धात चित्रसेनाचा पराभव करून दुर्योधनास मुक्त केले.

राजसूय यज्ञासाठी चार पांडवांनी एकेक दिशेला जाऊन दिग्विजय केला. त्यामुळे चिडून, आणि चित्रसेनाकडून झालेल्या अपमानकारक पराभवानंतर आपले शौर्य दाखविण्यासाठी कर्णाने हस्तिनापुराच्या सैन्याचा सेनापती बनून सर्व आर्यावर्तातील (चारी दिशांची) राज्ये जिंकली. 
कृष्णाबद्दल असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून कर्णाने त्याच्या मथुरा आणि द्वारका राज्यांवर ह्या दिग्विजयात चाल केली नाही.

दिग्विजयानंतर दानधर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली, की त्याच्या दारातून एकही याचक परत जाणार नाही. आपला मुलगा अर्जुन ह्याच्या रक्षणासाठी इंद्राने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच-कुंडलांचे दान मागितले. कवच-कुंडलांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत, हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच-कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली. त्याच्या ह्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखे केले, आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक अमोघ शक्ती (वैजयंती अस्त्र) कर्णाला दिली.

कवच-कुंडलांचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रह्मास्त्रप्राप्ती करण्याचे ठरवले. द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरू असलेल्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवले. 
परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला, आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली. परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना, एका भुंग्याने त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या, परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही, हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कूळ विचारले. सत्य कळताच त्यांनी कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही.

ह्याच काळात शिकारीच्या वेळी, एका गरीब ब्राह्मणाच्या, चिखलात अडकलेल्या गायीची हत्या कर्णाच्या हातून घडली. त्याने कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याच्या रथाचे चाक असेच जमिनीत अडकेल.

वनवास आणि अज्ञातवास भोगून पांडवांनी आपले राज्य परत मागण्यासाठी दूत म्हणून कृष्णाला हस्तिनापुरास पाठविले. दुर्योधनाने जेव्हा त्याची मागणी नाकारली, तेव्हा परत जाताना कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले, आणि पांडवांकडे चलण्याची विनंती केली. जरी कुंतीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्ण पांडवांच्या संपूर्ण राज्य आणि संपत्तीचा स्वामी झाला असता, तरीपण त्याने दुर्योधनाच्या मैत्रीस स्मरून युद्धकालात कौरवांची बाजू सोडून जाण्यास नकार दिला.

महायुद्धाच्या पहिल्या दिवशी कौरवांतर्फे भीष्मांना सेनापतीपद देण्यात आले. त्यांनी विविध सेनाप्रमुख नेमताना कर्णाचा सूतपुत्र, कवच-कुंडले नसल्याने शापित आणि अर्धरथी, म्हणून अपमान केला. हा अपमान सहन न होऊन कर्णाने भीष्म जिवंत असेपर्यंत रणभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा केली.

युद्धाच्या १०व्या दिवशी भीष्म शरपंजरी पडले असता, भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून त्यांनी कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले, आणि पांडवांच्या (व धर्माच्या) बाजूने लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्रकर्तव्याला जागण्याचे ठरविले.

त्याच दिवशी कुंतीने स्वतः येऊन कर्णाची भेट घेतली, आणि त्याचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले.

दुसर्‍या दिवशीच्या युद्धात कर्णाने प्रचंड पराक्रम गाजवला. सेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात तो इतर योद्ध्यांबरोबर सर्वात आतील कड्यात होता. चक्रव्यूह तोडून आत आलेल्या अभिमन्यूवर कर्ण, द्रोणाचार्य, जयद्रथ, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि लक्ष्मण ह्या ६ योद्ध्यांनी एकदम हल्ला केला. त्यानंतर दुर्योधनपुत्र लक्ष्मणाशी झालेल्या युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाला.

युद्धाच्या १५ व्या दिवशी शस्त्र खाली ठेवलेल्या द्रोणाचार्यांचा धृष्टद्युम्नाकडून शिरच्छेद झाल्याने चिडलेल्या कौरवांकडून रात्रयुद्धाला प्रारंभ झाला. त्या युद्धात भीमाचा पुत्र घटोत्कच याने कौरवांकडून लढणाऱ्या दोन राक्षसराजांचा वध केला. तेव्हा घटोत्कचाकडून कौरवसेनेचा पराभव होऊ नये म्हणून कर्णाने इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून त्याचा वध केला.

त्यानंतर दुर्योधनाने कर्णाला कौरवसेनेचा सेनापती म्हणून अभिषेक केला. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला, परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले.

युद्धाच्या १७ व्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले. परंतु, अखेरीस परशुरामाने दिलेल्या शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले, आणि त्याचा रथ जागेवर स्थिरावला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निशःस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला, परंतु द्रौपदी-वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगीच्या कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली, आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले. स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली, परंतु परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्रांचे स्मरण झाले नाही, आणि अर्जुनाचा आंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला.

युद्धानंतर कृष्णाने युधिष्ठिराला कर्णाच्या आणि पांडवांच्या नात्याबद्दल सांगितले, त्यानंतर युधिष्ठिराने त्याची आई तमाम स्त्रियांना शाप दिला की आजपासून स्त्री आपल्याला माहीत असलेली कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाही.  युधिष्ठिराने इतर नातेवाइकांबरोबर कर्णाचे अंत्यसंस्कार केले.

पहिल्यापासून कर्ण दानधर्म करीत असे. परंतु इंद्राला दिलेल्या कवच-कुंडलांच्या दानामुळे दानवीर कर्ण म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. पाच दिशा जिंकणारा तो एकमेव दानवीर होता.

द्रोणाचार्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये कर्णाने आपल्या युद्धनैपुण्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेचा खरा विजेता ठरविण्यासाठी ठेवलेला पण पूर्ण करू शकणारे अर्जुन आणि कर्ण हे केवळ दोघे धनुर्धारी आर्यावर्तात आहेत असे मानले जाई. पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञासाठी एकेका दिशेचा दिग्विजय केला, त्यानंतर कर्णाने एकट्याने कौरवसेना घेऊन सर्व आर्यावर्तात दिग्विजय केला. भीष्मांनी जरी त्याचा अपमान केला असला, तरी त्यांनी कर्णाकडून त्याच्या बंधूंचा वध होऊ नये म्हणून, आणि त्यांच्या पांडवांवरील प्रेमामुळे त्यास युद्धामधून बाहेर ठेवण्यासाठी त्याला स्वतः शरपंजरी पडले असताना तसा सल्ला दिला. 

महाभारतातील सर्वोत्कॄष्ट योद्धा म्हणून अर्जुनाचा लौकिक असला, तरी ह्या सर्व गोष्टींवरून, आणि अर्जुनाशी झालेल्या त्याच्या युद्धावरून ते दोघे तुल्यबळ योद्धे होते हे सिद्ध होते. जरी युद्धात अर्जुनाने कर्णाचा वध केला असला, तरीपण ह्या वेळी कर्ण हा शापित आणि कवच-कुंडलविरहित आणि निशस्ञ होता. त्यामुळे, कर्ण हा मुळात अर्जुनाहून प्रबळ योद्धा असण्याची शक्यता आहे.




#Article 255: धृतराष्ट्र (246 words)


धृतराष्ट्र हा अंबिका व विचित्रवीर्य यांचा नियोगाद्वारे जन्मलेला पुत्र होता. कुरू वंश टिकून राहावा यासाठी विचित्रविर्याच्या मृत्यूनंतर पुत्रप्राप्तीसाठी, अंबिका व अंबालिकेची सासू व राजमाता सत्यवतीच्या आदेशानुसार सत्यवतीचा कानिन पुत्र कृष्णद्वैपायन व्यास अर्थात्‌ व्यास पाराशर म्हणजेच महर्षी व्यास यांच्यामुळे अंबिकेला झालेला हा पुत्र होता. मात्र महर्षी व्यासांचे उग्र रूप पाहून तिने भितीने डोळे मिटून घेतले होते, यामुळे तिचा मुलगा धृतराष्ट्र आंधळा जन्मेल अशी भविष्यवाणी व्यासांनी केली होती. 

धृतराष्ट्र पांडुचा सावत्र भाऊ होता. तो शंभर कौरवांचा पिता होता. त्याच्या पत्नीचे व पट्टराणीचे नाव गांधारी होते. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव दुर्योधन होते. धृतराष्ट्र हा जन्मत:चा नेत्रहीन असल्याने त्याला हस्तिनापूरचे राज्य मिळू शकले नाही. त्याच्याऐवजी पांडूला हस्तिनापूरचा सम्राट करण्यात आले होते. पुढे शाप मिळाल्यामुळे विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासाला निघून गेला व सिंहासनावर बसण्याचा हक्क धृतराष्ट्राला आपोआपच प्राप्त झाला. मात्र काही वर्षांनंतर पंडूपुत्रांच्या म्हणजेच पांडवांच्या आगमनामुळे दुर्योधनाला हस्तिनापूरचा सम्राट बनविण्याचा हक्क डावलला जाऊ शकतो, हे लक्षात आल्यावर त्याने दुर्योधनाच्या पांडवविरोधातील सर्व कारवायांकडे दुर्लक्ष केले.

द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी त्याने आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचवण्यासाठी द्रौपदीला वरदाने देऊ केली होती, ज्यामुळे द्रौपदी आपल्या पांडवांना व आपल्या पुत्रांना दास्यत्वातून मुक्त करू शकली होती.

नेत्रहीन असूनही धृतराष्ट्राचे बाहूबल अचाट होते. भीमाने आपल्या सर्व पुत्रांना ठार केल्याचा प्रतिशोध घेता यावा, म्हणून महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्राने भिमाला आलिंगन देण्याच्या हेतूने आपल्या मिठीमधे ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र कृष्णाने चपळाईने भिमाऐवजी त्याच्या पुतळ्यास पुढे केले व धृतराष्ट्राने तो पुतळा मिठीत घेताच त्याचे तुकडे तुकडे झाले. कृष्णाच्या प्रसंगावधानामुळे धृतराष्ट्राच्या हातून घडू पाहणारी भिमाची हत्या टळली.

या प्रसंगानंतर त्याने आपली पत्नी गांधारी हिच्यासह वानप्रस्थाश्रम पत्करला.




#Article 256: देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा) (149 words)


हिंदू पुराणांनुसार देवयानी ही असुरांचा पुरोहित शुक्राचार्य व जयंती यांची कन्या होती. आयुवंशातील राजा ययाति याची ती पत्नी होती. महाभारतात हिने बृहस्पतीचा पुत्र कच याच्यावर केलेल्या असफल प्रेमाची व त्यातून पुढे हिला ययातीशी विवाह करणे भाग पडल्याची कथा वर्णिली आहे. ययातीपासून हिला यदु व तुर्वसु या नावांचे दोन पुत्र झाले.

पौराणिक साहित्यमते पुरंदर इंद्राची कन्या जयंती ही हिची माता होती. शुक्राचार्याची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने जयंतीला त्याच्याकडे पाठविले. त्यास प्रसन्न करून दहा वर्षेवृपर्यंत ती त्याच्याकडे राहिली. त्यावेळी हिचा जन्म झाला.

संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी देवांचे गुरू बृहस्पतीचा पुत्र कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहिला. त्याच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वावर मोहित होऊन देवयानीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु गुरुकन्येशी विवाह करणे अयोग्य असल्याचे सांगून कचाने हिचा विवाह प्रस्ताव झिडकारला. क्रुद्ध होऊन कचाची विद्या निष्फळ होण्याचा शाप हिने त्याला दिला. कचानेही कोणीहि ऋषिकुमार हिच्याशी विवाह करणार नाही असा प्रतिशाप दिला. त्यामुळे देवयानीला उत्तरकालात क्षत्रिय कुळातील ययाति राजाशी विवाह करणे भाग पडले. (महाभारत. आदीपर्व. ७३.१२)




#Article 257: यदु (242 words)


यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णु, भागवत व गरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते. कृष्ण हा यदुवंशात जन्मला.

ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - ययाति - (यदु). हे यदूचे क्रमशः पूर्वज होत. (यादीत फक्त ज्येष्ठ पुत्राचे नाव आहे)

यदु - क्रोष्टु - वृज्जीवंत - स्वाही - स्वती - रसदु - चित्ररथ - शशबिंदु - पृथुश्रवस् - अंतर - सुयज्ञ - उशनस् - शिनेयु - मरुत - कंबलबर्हिस् (?) - रुक्मकवच - परावृष्ट - जयमध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश (?) - शूर (२) - वसुदेव - (कृष्ण)

(कृष्ण) - प्रद्युम्न - अनिरुद्ध - वज्रनाभ - प्रतिबाहु - सुबाहु - शांतसेन - सत्यसेन - श्रुतसेन - गोविंदभद्र - सूर्यभद्र - शांतिवाहन - सद्विजय - विश्वराह - क्षेमराह/खेंगार - हरिराज - सोम.
जाधव माधव




#Article 258: बलराम (799 words)


बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता, सुभद्रा त्याची सख्खी बहीण. बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, इत्यादी अनेक नावे आहेत संकर्षण आदी नावे असून, अनंतशेषाचा अवतार आहे पांचरात्र शास्त्रानुसार बलराम (बलभद्र)  वासुदेवाचे  स्वरूप आहे; ‘नारायणीयोपाख्यात’ मध्ये वर्णन केलेल्या तत्वज्ञानानुसार , विष्णूचे चार रूपांतील 'चतुर्व्यूह'  दुसरे रूप म्हणजे ‘संकर्षण ’  

उत्तरभारत हिंदी भाषेत  'बलदाऊ' म्हणतात. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो.  

बलरामाची पत्नी रेवती आहे.घटनाक्रम सत्यायुगापासून द्वापर युगापर्यंतचा आहे. ज्यामध्ये काळचक्र भेद सांगितला आहे.सतयुगात महाराजा रैवतक हे पृथ्वीचा सम्राट होते, ज्याच्या मुलीचे नाव राजकन्या रेवती होते. महाराजा रैवतकने आपल्या मुलीला सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जेव्हा रेवतीची तारुण्यता झाली, तेव्हा तिचे वडील रैवतक यांनी लग्नासाठी पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट वराचा शोध सुरू केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेवतीसारखी दिसणारे, संपूर्ण पृथ्वीवर कोणालाही वर सापडले नाही, ज्यामुळे महाराजा रैवतक निराश झाला.नंतर

महाराज रैवतकने आपली कन्या रेवतीसाठी वराच्या शोधात ब्रह्मलोकात जाण्याचे ठरवले. महाराज रैवतक आपली मुलगी रेवतीसमवेत ब्रह्मलोकास गेले. ब्रह्मदेवाने सांगितला प्रमाणे,त्यानंतर बरेच युग निघून गेले.  यावेळी द्वापरयुग पृथ्वीवर आहे, आणि भगवान विष्णू स्वतः कृष्ण म्हणून अवतरले आहेत. आणि त्याचा भाऊ बलराम जो शेषनागचा अवतार आहे. 

रेवती २१ फूट उंच होती आणि बलरामाने  तिला नांगराच्या टोकाने दाबून , रेवतीला लहान केल.असे पाहून आश्चर्य वाटलं. महाराज रैवतक खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी रेवती आणि बलराम  यांच्या लग्नास मान्यता दिली.असे सांगितले जाते. 

श्रीविष्णु यांनी योगमायापासून  देवकीचा सातवा गर्भातुन  रोहिणीच्या गर्भाशयात ठेवले.  

क्रूर कंसाने वासुदेव-देवकीला तुरूंगात बंद केले तेव्हा रोहिणी अस्वस्थ झाली; पण  पती-सेवेसाठी रोहिणी तुरूंगात जाण्याची परवानगी मिळाली. ती तिथे जायची. यामुळे वासुदेवाचे दुःख बरेच कमी झाले. त्याच वेळी देवकीमध्ये जेव्हा सातवा गर्भ उघडकीस आला, तेव्हा त्याचवेळी गर्भाची लक्षणे एकाच वेळी दिसू लागली. वासुदेवला काळजी होती की ज्याप्रमाणे कंसाने  देवकीच्या ६ मुलांना ठार मारले गेलं त्याचप्रमाणे रोहिणीच्या मुलालाही संशयास्पदरीतीने ठार मारले जाऊ नये. या भीतीने त्याने रोहिणीला आपला भाऊ ब्रजराज नंदगोप यांच्याकडे गुप्तपणे पाठवले आणि रोहिणीला  यशोदा  नंदाने  रोहिणीला आपला गृहात राहायला दिले.  

मग तिला तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा झाली. ब्रजपुर येथे येऊन चार महिने योगमायाने आधीच गर्भाशयात गर्भ धारण केले होते आणि तेथून देवकीचा सातवा गर्भ , रोहिणीमध्ये  गर्भाशयात ठेवले. अशा प्रकारे रोहिणीला बलारामाची आई होण्याचे अंतिम भाग्य प्राप्त झाले. योगमाया नंतर, गर्भधारणेच्या सात महिन्यांनंतर - गर्भधारणेच्या चौदा महिन्यांनंतर, रोहिणीने श्रीकृष्णाच्या जन्माच्या आठ दिवस आधी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी . अनन्तरूप  बलराम रोहिणीच्या गर्भाशयातून उत्पन्न झाले. 

बलराम लहानपणापासूनच अत्यंत गंभीर आणि शांत होता. तो उत्तम कुस्तीपटू तर होताच शिवाय मुष्टियुद्धात तरबेज होता.कंसाच्या तालामीमध्ये कृष्णाने चाणूराला मारले, तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार केले.महाभारत युद्धप्रसंगी बलराम तटस्थ होता.  युद्ध सुरू होण्यापूर्वीच तो तीर्थयात्रेला गेला. 

आपआपसातील यादवीमुळे यदुवंशाचा नाश झाल्यानंतर बलराम समुद्रकिनारी आसन लावून बसला आणि त्याने आपला अवतार संपवला.

बलरामाला सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाचा चकवून, सुभद्रेला (चित्रा) लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.

श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी, म्हणजे हरछठ(हलषष्ठी) षष्ठीला (मराठी पंचांगाप्रमाणे श्रावण वद्य षष्ठीला) बलराम जयंती असते.

दाऊजी बलदेव मंदिर,ब्रजभुमी मथुरा

हुरंगा (होळी), होळीच्या नंतर एक दिवस साजरा केला जाणारा दाऊजी  मंदिराचा हुरंगा जगभरात प्रसिद्ध आहे. दाऊजी या बलरामाचे मुख्य 'बलदेव मन्दिर' मथुरात आहे 

कृष्णा च्या मोठा भाऊ बलराम संबंधित आहे. मथुरामध्ये हे ' वल्लभ संप्रदायाचे सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते. यमुना नदीच्या काठी वसलेल्या या मंदिराला 'गोपाळ लालजी मंदिर' देखील म्हणतात. मंदिरात दाऊजी बलदेव,मदन मोहन  व अष्टभुज गोपाळचे  श्रीविग्रह विराजमान आहे . मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराच्या मार्गावर सर्पाच्या कुण्डली  आहे. मंदिराच्या मागे एक विशाल तलाव आहे, ज्यास पुराणात् 'बलभद्र कुंड' असे वर्णन केले आहे. आजकाल त्याला 'क्षीरसागर' असे म्हणतात. 

ओडिशातील पुरी येथे जगातील रथयात्रेचा सण साजरा केला जातो. याला गुंडीचा उत्सव असेही म्हणतात. जगभरातील लाखो भाविक आज पुरी धाम येथे पोचत आहेत. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयाच्या दिवशी रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ति नीमवृक्षाचा लकडापासून बनवले जाते.विविध रंग,फुलाने,रत्न दगिनाने सजवले जाते 

पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं खूप महत्त्व आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येथे भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव असतो. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा संपन्न होते.   

जगन्नाथ मंदिर देशातील चार धाम पैकी एक आहे. भगवान जगन्नाथची रथ यात्रा जगन्नाथपुरी येथे आषाढ शुक्ल द्वितीयापासून सुरू होते आणि दशमी तिथीला संपते.  

रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक दाखल होतात. ओडिशातील पुरी इथल्या रस्त्यावरून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. या पवित्र यात्रेत भगवान बालभद्रचा रथ सर्वात पुढे असतो, याला तालध्वज म्हटलं जातं. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मा रथ असं संबोधलं जातं. सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो, ज्याला नंदी गरुड ध्वज म्हटलं जातं. खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते. 

बलराम यांचा अंश तीर्थंकर नेमिनाथ असल्याचे मानले जाते. 

दाऊजी (बलदाऊ) मंदिर ,बलदेव मथुरा, उत्तर प्रदेश 




#Article 259: कृष्ण (753 words)


कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ काळ्या मुखवर्णाचा आणि  सर्वाना आकर्षित करणारा असा होतो. 

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले.

कृष्णाचा देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे.
कृष्ण हे नाव विष्णू सहस्रनामात ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे.   कृष्ण हे नाव केशवनामांत २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापरयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापरयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपास झाला असावा.

कृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. बलराम त्याचा भाऊ आहे. कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, रुक्मिणी, लक्ष्मणा, सत्यभामा, सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या. शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.

ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय.

कृष्णाला फुलामध्ये पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे. प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. कृष्ण हा उत्तम (रथाचा) सारथी होता. 

शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.  त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील  गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.

कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्याला त्याचा पिता नंद याने दिली होती.

श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. 

त्यासाठी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा कर्मयोगाची महती सांगणारा ग्रंथ लिहिला. 

गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.

महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाला.

भागवत पुराणाने कृष्णाला विष्णुस्वरूप मानले आहे.महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.

कृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सूक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषीचे नावही होते. त्यानुसार इतिहास काळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. अध्यात्मात कृष्णाची २४ नावे आहेत.

कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात.  श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :

श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-

(अपूर्ण)




#Article 260: राधा (537 words)


राधा राधिका,राधे अशा नावांनी प्रसिद्ध असलेलीही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे.  त्याच जोडीने लक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स्थान आहे. वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याने प्रामुख्याने राधारानी अशा संबोधनाने ती पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा या प्रांतात विशेष पूजनीय आहे.  भारतीय संस्कृतीत  निंबाक संप्रदाय आणि चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्याशी तिचा संबंध जोडलेला दिसतो.
कालांतराने राधा ही लक्ष्मी किंवा अशा रूपात पूजनीय देवता म्हणून मान्यता पावली.

कीर्तिदादेवी वा रत्नगर्भा देवी आणि  महाराज वृषभानु यांची कन्या 

राधा या नावांमध्ये 'राध' असा संस्कृत धातू आहे , ज्याचा अर्थ प्रसन्न करणे  असा होतो. समृद्धी किंवा यशस्विता असाही राधा या शब्दाचा अर्थ आहे. 

भारतीय धर्मशास्त्राच्या परिभाषेत शृंगारभक्ती अशी संकल्पना प्रचलित आहे.  राधा ही व्यक्तिरेखा या संकल्पनेशी संबंधित आहे. गौडीय वैष्णव आणि पुष्टीमार्गी वैष्णव या उपसंप्रदायांतील अद्वैत तत्त्वज्ञानाला अनुसरून राधा ही नायिका म्हणून प्रसिद्ध पावली आहे. मूलतः गोपी असलेली राधा या साहित्यात कामिनी आणि रमणी अशा रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णाशी जोडली गेलेली आहे. 

हरिवंश पुराण किंवा महाभारत या ग्रंथात राधा ही व्यक्तिरेखा आढळत नाही. देवी भागवत या ग्रंथात तिचा उल्लेख आढळतो. तेथे श्रीकृष्णाची रासलीला आणि त्यातील त्याची प्रमुख सहचरी म्हणून राधेचा उल्लेख आढळतो. 
वैष्णव संप्रदायाच्या भागवत पुराणात राधा ही कृष्णाची परमभक्त असल्याचा केवळ उल्लेख आहे. बाराव्या शतकात  जयदेवाच्या गीत गोविंद काव्यातील राधेच्या वर्णनानंतर तिची देवी म्हणून लोकप्रियता अधिक वाढली असे अभ्यासक सांगतात. कवी जयदेवाच्या गीत-गोविंद या संस्कृत काव्यात राधेच्या प्रेमी नायिका रूपाचे वर्णन आढळते. श्रीकृष्ण आणि राधेच्या शृंगाराचे वर्णन या काव्यात प्रामुख्याने आलेले आहे. बंगाली लोककथा या राधा कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन  करतात. त्याचजोडीने दास्य भक्तीचे उदाहरण म्हणूनही या लोकसाहित्यात राधेची व्यक्तिरेखा मान्यता पावली आहे.

ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्म पुराण यांनी मात्र राधा आणि कृष्णाच्या उत्कट प्रेमाचे वर्णनच अधिक केलेले दिसते. 

प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळणाऱ्या-या अर्धनारीनटेश्वर शिल्प अंकनात राधा आणि कृष्ण यांचे अद्वैत प्रतिबिंबित होते आणि त्यातून त्यांचे प्रेम आणि भक्तीही अधोरेखित होते असे अभ्यासक मानतात.

राधा आणि कृष्ण यांच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार हा रासलीला या नृत्यप्रकारातून अभव्यक्त होते असे मानले जाते.गोपीच्या समवेत कृष्ण आणि राधा यांचे नृत्य असे या रासक्रीडेचे स्वरूप मानले जाते. मणिपुरी नृत्याच्या शास्त्रीय प्रकारात या रासनृत्याला विशेष महत्त्व आहे.भागवत पुराण,जयदेवाचे गीत-गोविंद यातील काव्य संकल्पना वापरून हे नृत्य केले जाते.

वैष्णव संप्रदायाच्या जोडीने राधा ही शाक्त संप्रदायाशी निगडित देवताही मानली जाते. प्रांताप्रांतानुसार तिच्या संकल्पनेच्या छटा आणि त्यांचा आशय बदलताना दिसतो. भक्तिसंप्रदाय हा भारतात लोकप्रिय होण्याच्या काळात मधुरा भक्तीचे प्रतीक म्हणून राधा ही देवता म्हणून अधिक मान्यता पावलेली दिसते.

भारतीय तत्त्वज्ञानाची महत्त्त्वाची संकल्पना म्हणजे परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. या तत्त्वाला अनुसरून राधा ही जणू काही कृष्णच आहे अशा परिभाषेत राधा आणि कृष्ण यांचे ऐक्य दाखविले जाते. 

श्रीकृष्ण हा ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व आहेत. अग्नी आणि त्याची धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.

राधा ही कृष्णापेक्षा वयाने खूप मोठी होती. जेव्हा कृष्ण साताठ वर्षांचा होता तेेव्हा राधा ही पंचवीसएक वर्षे वयाची महिला होती. तिच्या नवऱ्याचे नाव अनय. श्रीकृष्ण मथुरा सोडून जेव्हा द्वारकेला आला त्यानंतरच्या राधेची काहीच माहिती मिळत नाही. .

राधा आणि कृष्ण हे वैष्णव संप्रदायाचे देवता युगुल असल्याने त्यांची मंदिरेही स्थापन झाली आहेत. मथुरेतील वृंदावन येथे तसेच बनारस येथे अशी मंदिरे आहेत. राधावल्लभ हे त्यातीलच एक मंदिर आहे. दिल्लीस्थित श्री राधा पार्थसारथी मंदिर हेही त्यांपैकीच एक मंदिर आहे. परदेशांतही या देवता युगुलाची मंदिरातून आदराने पूजा केली जाते.




#Article 261: रुक्मिणी (123 words)


रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. 
देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. (संस्कृतमध्ये रखुमाई असे म्हणतात). देवी रुक्मिणी मातेची ननंद हि देवी लक्ष्मी व देवी सटवाई देवता असुन हे दोन्ही देवता प्रभु विठ्ठल पांडुरंगाच्या सख्या बहिणी आहेत.

रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले. 

जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.

रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -

असे असले असले तरी, राजवाड्यांचा अनुवाद केवळ विद्वानांच्या उपयोगाचा आहे, मराठी सामान्य रसिक वाचक अजूनही मुळच्या महानुभावीय रसास्वादाला पारखे झाले आहेत.




#Article 262: सत्यभामा (335 words)


सत्यभामा कृष्णाच्या   आठ राणीपैकीं  तिसरी पत्नी होती. ही राजा सत्राजित ची कन्या होती. हिच्या साहाय्याने भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. देवमाता आदिती कडून तिला चिरयौवन प्राप्त झाले होते. श्रीकृष्णाला हीच्याकडूूून दहा पुत्र झाले होते.

सत्यभामा ही राजा सत्राजितची कन्या आणि श्रीकृष्णाच्या पत्नींपैकी एक होती. सत्रजित सूर्याचे भक्त होते. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना स्यमंतक मणी दिला होता. हा मणी अत्यंत तेजस्वी व आताच्या कोहिनूर हिऱ्यासारखा लखलखीत होता.एक दिवस एका समारंभात श्रीकृष्णाने सत्राजितला तो मणी अक्रूरला देण्याची विनंती केली, परंतु सत्राजितने त्यास नकार दिला. 

दुसऱ्या दिवशी तो मणी देवघरात ठेवला असता सत्राजितचा भाऊ प्रसेनजीत तो मणी परिधान करून जंगलात शिकारीसाठी गेला. तेथे एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला व प्रसेनजीतला ठार केले व तो मणी स्वतःकडे ठेवला. तो सिंह व त्याकडील मणी रूक्षराज जाम्बवंताच्या दृष्टीस पडतो. तेव्हा त्या सिंहास ठार मारून तो मणी त्याच्याकडून काढून घेतो, व आपली मुलगी जांबवंती हिला देतो.

इकडे सत्राजितला वाटले श्रीकृष्णाने आपल्या भावाची हत्या करून तो मणी चोरला असावा. व त्याने श्रीकृष्णावर चोरी व हत्येचा आरोप केला. तेव्हा श्रीकृष्ण आपल्यावरील आरोप खोटा ठरवण्यासाठी त्या मनीच्या शोधात जंगलात निघाला.

जंगलात गेल्यावर तो जांबवंताच्या गुहेजवळ गेला. मण्याचा प्रकाश पाहून तो आत गेला. तेव्हा त्याला त्या मण्यासाठी जाम्बवंताबरोबर युद्ध करावे लागले. जेव्हा जाम्बवंत युद्धात हरू लागला तेव्हा त्याने आपले प्रभू श्रीराम यांचे स्मरण केले. त्याची धाव ऐकून विष्णूचाच अवतार असलेल्या श्रीकृष्णाला आपल्या रामस्वरूपात यावे लागले. आपल्या देवाला पाहून जाम्बवंत त्याला शरण गेला व आपली चूक स्वीकारली व तो मणी श्रीकृष्णाला देऊ केला व त्याला आपली मुलगी जाम्बवंती हिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. अशाप्रकारे श्रीकृष्ण व जांबवंती हीचा विवाह झाला.

नंतर तो मणी घेऊन श्रीकृष्ण सत्राजितकडे गेला.व त्यास तो मणी सुपूर्द केला तेव्हा सत्राजितला स्वतःची लाज वाटू लागली की त्याने विनाकारण श्रीकृष्णावर आरोप केला. त्याला या गोष्टीचे दुःख झाले. व त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. व आपली मुलगी सत्यभामा श्रीकृष्णाला देऊ केली, तसेच विनंती केली की हा मणी सुद्धा आपण आहेर म्हणून ठेवावा. तेव्हा श्रीकृष्ण हसत म्हणाला हा मणी म्हणजे आपत्ती आहे, एका मनीच्या नादात दोन - दोन मनी पदरात पडले. हा मणी मी नाही घेऊ शकत तो तुमच्याकडेच ठेवावा. व श्रीकृष्ण सत्यभामेबरोबर विवाह करून द्वारकेला निघाले.




#Article 263: अरूंधती (103 words)


अरुंधती (संस्कृत: अरुंधती,) ऋषि वशिष्ठांची पत्नी आहे.तसेच, नक्षत्रांमध्ये त्याला सात ऋषिंपैकी एक नक्षत्र (सप्तर्षी) म्हणूनही ओळखले जाते. तो एक सकाळी उगवणारा तारा आहे.अवकाशात ही चांदणी व सप्तष्रींपैकी असलेले वशिष्ट हे नक्षत्र एकमेकांभोवती फिरतात.  सात ऋषिंपैकी एकाची पत्नी असलेल्या अरुंधतीला सप्तर्षींचा सन्मान दिला जातो व त्यांच्यासोबतच तिची पूजा केली जाते.वैदिक आणि पौराणिक साहित्यांमध्ये ती पवित्रता, वैवाहिक आनंद आणि पतीसमर्पणासाठी म्हणून ओळखली जाते.संस्कृत आणि हिंदीतील पौराणिक महाकाव्य /कवितांमध्ये त्यांचे शुद्ध आणि आदरणीय म्हणून वर्णन केले आहे आणि ते अत्युत्कृष्ट, प्रेरणादायी आणि अनुकरण योग्य असे आहेत.हिंदू संस्कृतीत, सप्तपदी हा लग्नसमारंभातील विधी, उपवास, मृत्यूविषयीची आस्था आणि इतर अनेक विश्वास, प्रथा आणि परंपरा आहेत ज्या अरुंधतीवर केंद्रित आहेत. 




#Article 264: हनुमान (340 words)


हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी.  वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता.  त्याला अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले, व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.

पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ नारद मुनींनी आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे. 

लंकाधिपती च्या-रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत  आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्या ला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले. 

हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे,  म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. 

मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारत युद्धदरम्यान अर्जुनाच्या ध्वजावर बसून होता.

हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते.. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते. 




#Article 265: जरासंध (1522 words)


जरासंध हा महाभारतकालीन मगध देशाचा राजा व महाभारतातील कृष्णाचा प्रमुख शत्रू होता.

श्रीकृष्णालाही पलायन करायला लावणाऱ्या  जरासंधाला भानुमातीच्या स्वयंवरात महारथी कर्णाने  द्वंद्वयुद्धात जीवनदान दिले होते.  

तो एक शक्तिशाली राजा असून त्याचे स्वप्न एक चक्रवती सम्राट बनण्याचे होते, परंतु तो अत्यंत क्रूर होता. अनेक देशांच्या राजांना त्याने आपल्या कारागृहात बंदी बनवून ठेवले होते.

 मथुरा नरेश कंस त्याचा जावई होता व तो त्याचा सासरा होता. श्रीकृष्णाने केलेल्या कंसवधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने १७ वेळा मथुरा राज्यावर चढ़ाई केली, पण प्रत्येक वेळी त्याला असफल व्हावे लागले. 
श्रीकृष्णाने भीमाच्या हातून याचा वध घडवून आणला.
जरासंध वध

कृष्ण व पांडव यांची प्रथम भेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी झाली. बाळपणापासून भीम हा महाबलवान असल्याच्या कथा सर्वश्रुत झाल्या होत्या. अनेक कौरवांना तो एकटाच भारी पडे. यामुळे दुर्योधन त्याचा द्वेष करीत असे. ही पार्श्वभूमि कृष्णाला ऐकून माहिती असणारच. वारणावतातून सुटून गेल्यावर वनांत हिंडताना हिडिंब व बकासूर या दोन महाबलवानांचा त्याने निव्वळ शरीरबळावर वध केला होता. हे वध कोणी केले हे आधी नक्की कळलेले नसले तरी पांडवांचा परिचय झाल्यावर ते कृष्णाला कळले होते. अर्जुनाने पण जिकल्यावर इतर राजांशी युद्ध करावे लागले तेव्हा एक झाड उपटून घेऊन भीमाने सर्वांना झोडपलेले कृष्णाने स्वतःच पाहिले होते. या साऱ्या गोष्टीतून कॄष्णाने मनाशी काही आडाखे बांधले असावे पण तो योग्य संधीची वाट पाहात होता. त्याच्यापुढे एक मोठा प्रष्ण होता.
कृष्णाने कंसवध करून आजोबा उग्रसेन याला मथुरेच्या राज्यावर स्थापन केले. कंस हा जरासंधाचा जावई.जावयाच्या वधाने चिडलेल्या जरासंधाने तेव्हापासून वारंवार मथुरेवर हल्ले करून यादवांना सतावले होते. अठरावेळा युद्ध होऊनहि कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता. मात्र यादवांची खात्री झाली की आपण सुखाने मथुरेत राहू शकत नाही वा जरासंधाला मारू हि शकत नाही. नाइलाजाने वृष्णी, अंधक व भोज या तिन्ही यादवकुळानी, सर्व संपत्ति, गुरेढोरे यासह देशत्याग करून शेकडो मैल दूर पश्चिम समुद्रकिनारी नवीन द्वारकानगरी वसवून मजबूत राजधानी बनवली. यानंतर पुन्हा यादव व जरासंध यांचे युद्ध उद्भवले नाही. या अठरा युद्धांमध्ये, बहुधा, अनेक यादववीर कैदी झाले असावे. द्वारकेला दूर निघून गेल्यामुळे त्यांना सोडवण्याचा कोणताच मार्ग, यादवांना वा कृष्णाला उपलब्ध राहिला नव्हता. हा कृष्णापुढील जटिल प्रष्न होता.
द्रौपदी स्वयंवरानंतर कृष्ण व पांडव याची मैत्री उत्तरोत्तर दृढ होत गेली. भीष्माने निक्षून सांगितल्यामुळे अखेर धृतराष्ट्राने पांडवाना अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थाला पाठवले. इंद्रप्रस्थ वसवण्यास कृष्णाने पांडवांना सर्व मदत केली. दीर्घकाळ इंद्रप्रस्थात राहून कृष्ण द्वारकेला परत गेला. नंतर त्याची व अर्जुनाची पुन्हा भेट अर्जुन तीर्थयात्रा करीत द्वारकेला पोचला तेव्हा झाली. तेव्हाही अर्जुनाला आवडलेल्या   सुभद्रेशी त्याचा विवाह होण्यासाठी कृष्णाने सर्व मदत केली. त्याच्या सांगण्यावरूनच यादवानी अर्जुनाशी लढण्यापेक्षा अर्जुनाशी सख्य करणे श्रेयस्कर मानले अर्जुन-सुभद्रा इंद्रप्रस्थाला परत गेलीं, मग अभिमन्यूचा व पांच पांडवपुत्रांचा जन्म झाला. या सर्व सुखाच्या काळातील पांडव व कृष्ण यांची मैत्री व परस्पर आदरभाव वाढत गेला. कृष्णार्जुनांनी मिळून खांडव वन जाळणे ही यातील अखेरची पायरी म्हणता येईल. त्यानंतर कृष्ण द्वारकेला परत गेला. आगीतून वांचलेल्या मयासुराकडून पांडवांनी मयसभा बनवून घेतली. मग त्यांना राजसूय यज्ञाची कल्पना सुचवली गेली. त्यानी अर्थातच लगेच कृष्णाला सल्लामसलतीसाठी बोलावून घेतले. आपला जटिल प्रष्न सोडवण्यासाठी कृष्ण बराच काळ ज्या संधीची वाट पहात होता ती आता आयतीच चालून आली.
कृष्णाने राजसूय यज्ञ करण्याची कल्पना उचलून धरली. पण पांडवांना जरासंधाच्या सम्राटपदाची माहिती सांगून त्याला हरवल्याशिवाय युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे दाखवून दिले. जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला. जरासंधाच्या बाजूने असलेल्या राजांची नामावळी सांगितली. एक युधिष्ठिराचा मामा पुरुजित कुंतिभोज सोडला तर इतर सर्व राजे, त्यांत पांडूचा मित्र असलेला राजा भगदत्त, कृष्णाचा सासरा भीष्मक,शिशुपाल वगैरे सर्व, जरासंधालाच सम्राट मानतात ही वस्तुस्थिति ऐकवली. ’थोडादेखील विसावा न घेता घोर अस्त्रांनी तीनशे वर्षे लढलो तरी जरासंधाचा पराभव करणे शक्य नाही’ या कारणास्तव भोजांच्या अठरा घराण्यांनी व नंतर इतर यादव घराण्यांनीहि, मथुरा सोडून द्वारकेला नवीन शहर वसवून, बंदोबस्तात राहणे पसंत केले हा इतिहास सांगितला. जरासंध व त्याचे दोन सेनापति हंस व डिंभक यांच्या पराक्रमामुळे त्याने अनेक राजे युद्धात हरवून, त्याना तुरुंगात टाकले आहे व शंभर राजे पकडल्यावर त्यांचा यज्ञात बळि देण्याचा त्याचा विचार आहे, तेव्हा त्याला हारवल्याशिवाय वा मारल्याशिवाय तुम्ही राजसूय यज्ञ कसा करणार असा प्रष्न उपस्थित केला. वास्तविक, यादवांबरोबरच्या युद्धात हंस व डिंभक मरण पावले होते. तरीहि युद्धामध्ये जरासंधाला हरवण्याची उमेद यादवांना राहिली नव्हती. तेव्हा, द्वंद्वामध्ये गाठून जरासंधाला एखाद्या महान वीराने मारले तरच त्याचे पारिपत्य शक्य होते. यासाठी अर्थातच भीमाशिवाय दुसरा कोण समर्थ होता? वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाही परवडले नसते! युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीहि असती. पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता! त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवावयाचे होते.
कृष्णाच्या सूचनेवर बराच बेळ चर्चा चालून नंतर भीमाने मत दिले कीं आपण स्वतः, अर्जुन व कृष्ण यांनी जरासंधाच्या वधाचा प्रयत्न केला पाहिजे. कॄष्णाने पुन:पुन्हा जरासंधाचे बळ, त्याच्या अंगातील सम्राटाला शोभणारे सर्व गुण, त्याचबरोबर सर्व राजेलोकांचा त्याने चालवलेला छळ व कैदेतील राजांचे बळी द्यावयाचा त्याचा बेत वर्णन करून जो जरासंधाचा हा बेत हाणून पाडू शकेल तोच सम्राट म्हणविण्यास पात्र ठरेल असे सांगितले. या सर्व चर्चेच्या वेळी हे राजे कोण होते याचा काहीहि खुलासा महाभारतात नाही. भीम, अर्जुन व कृष्ण यांनी तिघानीच मिळून जरासंधाशी लढण्याचा भीमाचा बेत युधिष्ठिराला मुळीच पसंत झाला नाही. त्यापेक्षा तो राजसूय यज्ञ करण्याचा बेतच सोडून देण्यास तयार झाला. पण मग अर्जुनालाही जोर चढला. तोही भीमाच्या बेताला अनुकूल झाला. आपल्यासारख्या बलवानानी अन्याय्य गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे असे त्याने मत दिले. भीम व अर्जुन कृष्णाच्या मनातलेच बोलल्यामुळे आता कृष्णालाही जोर आला. जरासंधाबरोबर सरळ युद्ध करून जिंकणे अशक्य असल्यामुळे, गुप्तपणे त्याच्या वाड्यात प्रवेश करून त्याच्या वधाचा प्रयत्न करावा असाच बेत त्याने सुचवला. युधिष्ठिराच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने पुन्हा एकदा त्याला जरासंधाच्या जन्माचा सर्व अद्भुत इतिहास सांगितला. तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले. असे असूनहि, कृष्णाने त्याचा जावई कंस याचा वध केल्यामुळे त्याचे यादवांशी व कृष्णाशी मोठे वैर होते व त्याच्या राजेलोकांना बळी देण्याच्या बेतामुळे कृष्णाला त्याचा वध हवा होता. कोण होते हे राजे? महाभारतात काही खुलासा नाही. कुरु, पांचाल, यादव सोडून इतर राजघराण्यानी जरासंधाचे वर्चस्व मान्य केले होते. कुरूंचा व जरासंधाचा झगडा झालेला नव्हता. यादव द्वारकेला गेल्यावर इतर कोणा राजाशी जरासंधाचे वितुष्ट आल्याचाही उल्लेख दिसत नाही. तेव्हा हे राजे म्हणजे, वृष्णी, अंधक, भोज या यादवांच्याच वेगवेगळ्या कुळांतील असले पाहिजेत. यादव व जरासंध यांच्यांतील अनेक युद्धांमध्ये हे कैदी झाले असावे व यादव द्वारकेला गेल्यामुळे आता याना कसे सोडवावे हा प्रष्नच होता. कृष्ण सोडून इतर कुणा राजकुळाला याची चिंता पडलेली दिसत नाही. जरासंधाला विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती हे त्याचे कारण असू शकेल. अन्याय करणाऱ्या इतर राजांना नारद वा इतर थोर ऋषि उपदेश करीत तसाहि जरासंधाला कोणी केलेला दिसत नाही. या राजांना युद्धात जिंकून घेतलेले असल्यामुळे त्याना जरासंधाने कैदेत ठेवणे कोणाला फारसे अनुचित वाटले नसावे. यज्ञात बळी देणे अनुचितच होते पण ती वेळ आलेली नव्हती व त्याची चिंता एकट्या कृष्णालाच पडली होती यावरून ते सर्व यादवच असावे या तर्काला पुष्टि मिळते.
कृष्णाचा बेत सरळ होता. कृष्ण अर्जुन व भीम जरासंधासमोर द्वंद्वासाठी उभे राहिले तर आपल्या बळाच्या अभिमानामुळे तो भीमाशी मल्लयुद्ध करणेच पसंत करील व भीमच त्याचा वध करूं शकेल हा त्याचा विचार होता. म्हणून त्याने अखेर युधिष्ठिराचे मन आपल्या बेताकडे वळवून घेतले. कृष्ण, अर्जुन व भीम यांनी लवकरच गुप्तपणे मगधाची राजधानी गिरिव्रज गाठली. स्नातक ब्राह्मणाच्या वेषात गिरिव्रजाला पोचलेल्या या तिघांनी शहरात काही दंगामस्ती करून नागरिकांमध्ये स्वतःबद्दल धाक, आश्चर्य अशा भावना निर्माण केल्या व अखेर ते जरासंधासमोर आले.त्यांच्या ब्राह्मणवेषाचा मान ठेवून पण त्यांना न ओळखून, जरासंधाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला नाही. तुम्ही कोण आहात असे जरासंधाने स्पष्टच विचारल्यावर कृष्णाने त्याला आपल्या तिघांची ओळख करून दिली व तुझ्या दुष्कृत्यांमुळे, विशेषत: राजेलोकांचे बळी देण्याच्या तुझ्या बेतामुळे तुला शासन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे आव्हान त्याला दिले. जरासंधाने कृष्णाच्या आरोपांना समर्पक उत्तरे दिली. ’मी धर्मानेच राज्य करतो आहे व माझी प्रजा सुखी आहे. राजांना मी योग्य प्रकारे युद्ध करून जिंकले आहे व त्यांचे काहीहि करण्याचा मला अधिकार आहे. कुरुकुळाशी माझे मुळीच वैर नाही’ असे म्हटले. अखेर कृष्णाच्या मनांतील बेताप्रमाणेच, त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान स्वीकारले व कृष्ण वा अर्जुन यांना झिडकारून, बलवान भीमालाच प्रतिस्पर्धी ठरवले. कृष्ण व बलराम दोघेही मल्लविद्येत प्रवीण असूनहि, अद्यापपर्यंत त्यांची जरासंधाशी एकास एक अशी गाठ पडलेली नव्हती. कृष्णाचा मामा कंस याचा जरासंध हा सासरा तेव्हा भीमाच्या वा कृष्णाच्या मानाने तो खूपच वयस्क होता. तरीहि, स्वतः किंवा बलराम यांचेपेक्षाहि बक, हिडिंब याच्यासारख्या अमानुष बळ असलेल्या राक्षसाना मारू शकलेला भीम हाच एकटा जरासंधाशी लढू शकेल हे कृष्ण जाणून होता. महाभारतात, कृष्ण व बलराम यादवकुळातील असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जरासंध अवध्य होता असा खुलासा केला आहे पण तो फुसका वाटतो. ब्रह्मदेवाने हा वर जरासंधाला कां व केव्हा दिला हे सांगितलेले नाही! खरे कारण, माझ्या मते, जरासंधाने त्यांना मल्लयुद्धाची संधिच दिली नसती. त्यांना तो गवळीच मानत होता, बरोबरीचे राजकुळातले नव्हे!
भीम-जरासंध युद्ध तेरा दिवस अखंड चालले. अतिशयोक्ति सोडून दिली तरी दीर्घकाळ चालले हे खरे. अखेर जरासंध दमला पण भीम तरीहि जोरात होता. अखेर त्याने जरासंधाच्या तंगड्या धरून उलटसुलट ओढून त्याला मारले. कृष्ण, बलराम,शल्य, कर्ण वगैरे इतर कोणाही मल्लविद्येत प्रवीण व्यक्तीने एवढा दीर्घकाळ मल्लयुद्ध केल्याचे महाभारतात वा इतरत्रहि वर्णन आढळत नाही. भीमाच्या अफाट ताकदीवर कृष्णाने टाकलेला विश्वास भीमाने सार्थ ठरवला. जरासंध मेल्यावर, बंदीतील राजांना सोडवून, व जरासंधपुत्र सहदेव याला राज्यावर बसवून कृष्ण, अर्जुन व भीम विजयी होऊन इंद्रप्रस्थास परत आले. कृष्णाने जे योजले होते ते पार पडले.
या साऱ्या कथेमध्ये कृष्णाच्या अंगचे सर्व मानवी पातळीवरील लोकोत्तर गुण दिसून येतात. स्वतःचे शरीरबळ कदाचित पुरणार नाही व सैन्यबळावर विजय अशक्य तेथे त्याने योग्य व्यक्तीचा उपयोग केला. त्यासाठी दीर्घकाळ संधीची वाट पाहिली. राजसूय यज्ञच्या बेतामुळे ती प्राप्त होतांच तिचा कौशल्याने उपयोग करून घेतला. शत्रूचे बलस्थान जे अफाट शरीरबळ त्याच्या अभिमानालाच त्याने डिंवचले. सर्व बेत काळ्जीपूर्वक आखला व तडीस नेला. त्यांत, मुख्य म्हणजे, युधीष्ठिर, अर्जुन, भीम यांना समाविष्ट करून घेताना, ते कृष्णाच्या वैऱ्याशी लढत नसून जणू स्वतःच्याच वैऱ्याशी लढत आहेत अशी त्यांची मनोभूमिका करून घेतली व अखेर भीमाकरवी आपल्या कुळाच्या एका न आटपणाऱ्या वैऱ्याचा शेवट घडवून आणला. 




#Article 266: जयद्रथ (363 words)


जयद्रथ हा सिंधुदेशाचा नरेश वृद्धक्षत्र याचा पुत्र व महाभारतात उल्लेखिलेल्या सिंधु, शिबि  व सौवीर देशांचा राजा होता. धृतराष्ट्र व गांधारी यांची एकमेव कन्या असलेल्या दुःशलेशी याचा विवाह झाला. महाभारतीय युद्धात तो कौरवांच्या पक्षातून लढला व अर्जुनाच्या हातून मारला गेला. त्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता.

जयद्रथ हा पांडवांचा द्वेष करीत असे. त्याला बलाहक, आनीक, विदारण आदि सहा भाऊ होते.  हा एका स्वयंवरासाठी शाल्व देशाला जात असताना काम्यकवन नावाच्या गावात मुक्कामाला होता. त्याच्यासह त्याचे सहा भाऊ, शिबिकुलाचा राजपुत्र कोटिक, त्रिगर्तराजपुत्र क्षेमंकर, इक्ष्वाकुकुलातला सुपुष्पित आणि कलिंगपुत्र होते. त्याशिवाय इतर बारा राजपुत्र आणि त्यांचे सैन्य होते. शिकारीसाठी गेला असताना जयद्रथ पांडवांच्या वनवासातील आश्रमापाशी पोहोचला. तिथे फक्त द्रौपदी, तिची दासी आणि म्हातारे धौम्य ऋषी होते. जयद्रथाने आपल्या सैन्यासह तिथे जाऊन द्रौपदीला रथात घालून पळवून नेले. ते पाहून धौम्य ऋषींनी रथाचा पाठलाग करण्याचा प्रयत्‍न केला. पांडवांना हे समजताच त्यांनी दूर अंतरावर गेलेल्या जयद्रथाला गाठले आणि त्याच्याशी लढाई केली. तीत अनेक राजपुत्र मारले गेले. संपूर्ण सेनेचा नाश झालेला पाहून जयद्रथ पळाला,आणि भीम-अर्जुनांना बऱ्याच शोधानंतर सापडला. भीमाने त्याला खूप बडवले आणि त्याच्या केसाचे पाच पाट काढून त्याला आश्रमात आणले. त्याला मारून टाकले तर दु:शला आणि धृतराष्ट्र-गांधारी यांना फार दु:ख होईल म्हणून भीमार्जुनांनी शेवटी त्याला युधिष्ठिराच्या विनंतीवरून जिवंत सोडून दिले. 

अशा प्रकारे पांडवांकडून अपमानित झालेल्या जयद्रथाने खूप तप केले व  भगवान शंकरांकडून पांडवांच्यावर विजय मिळावा असा वर मागितला. शंकराने अर्जुनाच्या अनुपस्थितीत कोणताही पांडव तुला हरवू शकणार नाही असा वर दिला. त्यामुळेच अर्जुनाच्या अनुपस्थितीत चक्रव्यूह भेदायला अभिमन्यूबरोबर गेलेले पांडव जयद्रथाला हरवू शकले नाहीत, आणि शेवटी अभिमन्यू मारला गेला.  त्याच्या प्रेताला जयद्रथाने लाथ मारली. हे समजल्यावर बाहेरून परत आलेल्या अर्जुनाने पुढच्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन अशी प्रतिज्ञा केली. आणि आकाशात आलेल्या ढगांमुळे सूर्यास्त झाला असे समजून बाहेर पडलेल्या जयद्रथाला मारून अर्जुनाने ती प्रतिज्ञा पार पाडली.

जयद्रथाला त्याच्या पित्याने (वृद्धक्षत्राने) असा वर दिला होता की जो त्याचे मस्तक जमिनीवर पाडेल त्या पाडणाऱ्याच्या डोक्याचे शेकडो तुकडे होतील. श्रीकृष्णाने अर्जुनाला याबाबतीत इशारा दिला होता. अर्जुनाने जयद्रथाला बाण मारून त्याचे शिर असे उडवले की ते थेट शेकडो मैल दूर बसलेल्या जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीवर पडले. वडील दचकून उभे राहिले आणि त्यांच्या मांडीवरले जयद्रथाचे मस्तक जमिनीवर घरंगळले. त्याक्षणी वडलांच्या डोक्याची शंभरावर शकले होऊन त्यांचा मृत्यू झाला.

हिंदी कवी मैथिलीशरण गुप्त यांनी जयद्रथ वध नावाचे खंडकाव्य लिहिले आहे.(इ.स. १९१०). हे काव्य हरिगीतिका छंदामध्ये असून त्यात ७ सर्ग आहेत.




#Article 267: अश्वत्थामा (316 words)


अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. 

कौरव-पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खाऊ लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिङ्‌मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी आवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरेच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता अश्वत्थामा मेला खरा, पण  'नरो वा कुंजरो वा' असे उत्तर दिले. त्या वाक्यातला ’अश्वत्थामा मेला’ एवढेच शब्द ऐकून, मानसिक धक्का बसलेले द्रोणाचार्य यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. 

पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.  

अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला पांडवांची शिरे कापून आणतो असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते. 

अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो. 




#Article 268: द्रौपदी (682 words)


द्रौपदी ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती पांचाल देशाच्या राजा द्रुपदाची दत्तक कन्या व पाच पांडवांची पत्‍नी होती.

द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती.. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.

द्रौपदी, पांचाली, याज्ञसेनी, सैरंध्री

कृष्ण हा दौपदीचा मानलेला भाऊ आणि सखा होता. 

द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या फिरत्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी  नेम धरून माशाचा डोळा फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला. द्रौपदीला घरी आणल्यावर अर्जुनाने आपल्या (कुंती) आईला घराबाहेर उभे राहून भिक्षा आणल्याचे सांगितले. कुंतीने नेहमीच्या सवयीप्रमाणे भिक्षा 'सर्व भावंडांनी वाटून घ्या' असे म्हटले.  त्याचा फायदा घेऊन धृतराष्ट्राने ही सर्वांची पत्नी होईल असे ठरवले. त्याप्रमाणेच झाले आणि द्रौपदी पाचही पांडवांची सामाईक पत्नी झाली. 

पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्‍नी सत्यभामा हिने गृहिणीपद व पतीची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच द्रौपदी-सत्यभामा-संवाद असे म्हणतात. 

महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या द्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र दुःशासनाकरवी झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्याने व ते हरले असल्याने,  नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का? या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील निरुत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले.

वस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधनाने द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवली. ही मांडी मी युद्धात फोडीन अशी गर्जना भीमाने केली. दुर्योधनाच्या व दुःशासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष करणाऱ्या धृतराष्ट्रालादेखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणे भाग पडले होते. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वतःवर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगातदेखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अस्त्र-शस्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. पण युधिष्ठिराच्या द्यूतलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे लागले व बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास त्यांच्या नशिबी आला.

द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून ओढणाऱ्या दु:शासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामधे दुःशासनाचा वध करून, त्याची छाती फोडली आणि त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली.  युद्ध संपल्यावर एका विहिरीत लपून बसलेल्या दुर्योधानाला बाहेर काढून भीमाने त्याची मांडी फोडली आणि त्याचे रक्त पिऊन शेवटी त्याचा प्राण घेतला. 

वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्‍न कौरवांचा मेव्हणा व दुःशलेचा पती जयद्रथ याने केला होता. मात्र युधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. विराट राजाची पत्‍नी सुदेष्णा हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती कीचक याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केला.

द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, ती त्याने महाभारताच्या युद्धानंतर पूर्ण केली. वनवासामध्ये तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पहाणाऱ्या कीचकाचा वध करण्याचे काम भीमानेच केले होते. 

द्रौपदीला युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून श्रुतसोम, अर्जुनापासून श्रुतकर्मा, नकुलापासून शतानीक व सहदेवापासून श्रुतसेन असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने द्रोणाचार्य-पुत्र अश्वत्थामा याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.




#Article 269: धृष्टद्युम्न (312 words)


द्रुपदाचा पुत्र आणि द्रौपदी व शिखंडीचा भाऊ. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी द्रुपदाने यज्ञातून या भावा-बहीणीची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. महाभारतातील युद्धातात धृष्टद्युम्न पांडवसेनेचा सरसेनापती होता. द्रोणाचार्यचा वध धृष्टद्युम्नने केला.

पांचाळ देशाचा राजा द्रुपदयाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामी यज्ञ केला. द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवुन अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्य चा वध करण्यास द्रुपद राजाला पुत्र हवा असतो.
दोन ब्राह्मणांच्या मदतीने, द्रुपदने यज्ञ केले. यज्ञातुन सशस्त्र शक्तिशाली युवक धृष्टद्युम्न रथावर आपल्या बहीण द्रोपदसह प्रकट झाले. धृष्टद्युम्न यास पुर्वतः क्षत्रीय व धा‍र्मिक ज्ञान होते.

आपल्या क्षत्रीय कौशल्याने आपल्या बहिणीस स्वंमवरात जिंकणाऱ्या ब्राह्मणाचे धृष्टद्युम्न पाठलाग करतो. व त्यास समजते की ब्राह्मण पांडुपुत्र अर्जुन आहे.   
कुरुक्षेत्रातील युद्धात, कृष्ण व अर्जुन यांच्या सल्ल्याने, धृष्टद्युम्नास पांडवसेनेचा सरसेनापती बनविण्यात येते.

कुरुक्षेत्रात एका क्षणी द्रोणाचार्य पांडवसेनेचा नरसंहार करीत असताना, कृष्णानी युधिष्ठिरास त्यास मारण्याची नीति सांगितली. द्रोणाचार्य जेव्हा शस्त्रधारी आहेत तेव्हा त्यांना हरवीने अशक्य होते. कृष्ण असा सल्ला देतो की द्रोणाचार्यपुत्र अश्वत्थामा याचा वध झाला आहे असे घोषित करायचे. या दुखःउपरांतच द्रोणाचार्य काही काळाखातिर आपले शस्त्र खाली टाकतील. 
कृष्ण युधिष्ठिरास युध्दातील नीतिमत्तेचा विजय होण्यास हे खोटे बोलणे आवश्यक असे समजावतो. पंरतु युधिष्ठिर बिचकल्याने भीम कौरवसेनेतील अश्वत्थामा नामक हत्तीचा वध करून अश्वत्थामा मेला!, अश्वत्थामा मेला! अशी घोषणा करतो.
जेव्हा ही खबर द्रोणाचार्यला समजते ते अविश्वासाने अचंबित होतात. ही खबरची शाहनिशा करण्यासाठी द्रोणाचार्य सत्यवचनी युधिष्ठिर कडे अश्वत्थामाचा वध झाल्याची बातमी खरी आहे का म्हणुन विचारतात. तेव्हा युधिष्ठिर म्हणतात अश्वत्थामा मरण पावला आहे त्याच बरोबर युधिष्ठिर कुजबुजतात की नर की हत्ती जे द्रोणाचार्यास ऐकु येत नाही. असे म्हटले जाते की युधिष्ठिर पुर्ण वाक्य जोरात बोलले परंतु कृष्णाच्या शंखनादाने वाक्याचा शेवटचा भाग द्रोणाचार्यास ऐकु येत नाही.

महाभारताचे मुख्य युद्ध संपल्यानंतर, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वथामा, कृपाचार्य व कृतवर्मा हे फक्त तिघेच कौरव सेनेत जिवंत रहातात. पांडवांनी कौरव सेनेचा पराभव केल्याचे, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन यांना कपट नीतीने पांडवांनी मारल्याचे शल्य अश्वथामाला डाचत असते व द्रोणाचार्य् वधाचा बदला घ्यायचा असतो. म्हणून पांडव सेना झोपलेली असताना, अश्वथामा झोपेतच धृष्टधुम्नवर हल्ला करतो व ठार मारतो. या हल्यात द्रौपदीची मुलेही अश्वथामाकडून पांडव समजून मारली जातात. 




#Article 270: घटोत्कच (147 words)


घटोत्कच हा महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढलेला पराक्रमी योद्धा होता. तो भीम-हिडिंबा यांचा पुत्र होता. 

महाभारतीय युद्धाच्या १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध आणखीनच घनघोर झाले. दोन्ही बाजूंनी वेळेचे ताळतंत्र न ठेवता रात्रीदेखील युद्ध चालू ठेवले. रात्रीच्या वेळात घटोत्कचाच्या मायावी शक्ती अधिक सबल झाल्या व त्याने कौरव सैन्यामध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला. त्याच्या पराक्रमाने त्यादिवशी युद्धाचे पारडे पूर्णपणे पांडवांच्या बाजूने झुकले. त्याचा पराक्रम पाहून दुर्योधनाला युद्ध त्याच दिवशी संपते की काय, अशी भीती वाटू लागली व त्याने कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध करण्यास सुचवले. सुरुवातीस कर्ण तयार नव्हता. त्याला ती शक्ती अर्जुनावर वापरायची होती. परंतु दुर्योधनाच्या हट्टापुढे नाइलाज होऊन कर्णाने ती शक्ती घटोत्कचावर वापरली. त्याने घटोत्कच मृत्युमुखी पडला खरा, प‍रंतु मरतामरता आपले शरीर मोठे करून तो कौरवसेनेवर पडला आणि त्यामुळे आणखी मनुष्यहानी झाली.

घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या अमोघ शक्तीचा वापर करावा लागल्यामुळे कृष्णाला हायसे वाटले. त्यामुळे पांडवांच्या व अर्जुनाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.




#Article 271: अष्टावक्र (434 words)


अष्टावक्र हे हिंदू धर्मातील एक ऋषि होते.

अष्ट म्हणजे आठ, आणि वक्र म्हणजे वाकडा अर्थात ज्याचे शरीर आठ ठिकाणी वाकडे झालेले आहे, तो अष्टावक्र होय.

ऋषि उद्दालक यांचा कहोड नावाचा प्रसिद्ध शिष्य होता. उद्दालक ऋषींची कन्या सुजाता हिचा कहोडशी विवाह झाला. सुजाता ही गर्भवती असताना एक दिवस कहोड हे वेदपाठ करत होते. तेव्हा सुजाताच्या गर्भातील पुत्र कहोड यांना म्हणाला,पिताश्री, तुम्ही जे हे रात्रभर वेदपाठ करत आहात, ते ठीक नाही आहे. तेव्हा काहीद यांना राग आला. आणि त्यांनी त्या पुत्राला शाप दिला, की तू गर्भात असतानाच असे वाकडे बोलतोस, म्हणून तू आठ ठिकाणी वाकडा होशील.म्हणून त्या पुत्राचे शरीर आठ ठीकाणी वाकडे झाले, म्हणून त्याला अष्टावक्र असे नाव मिळाले.

अष्टावक्र यांनी अष्टावक्र गीता (अष्टावक्र संहिता) हा ग्रंथ लिहिला. मिथिला नरेश राजर्षी जनक व अष्टावक्र यांच्यातील संवाद, असे या गीतेचे स्वरूप  आहे. वेदान्ताविषयीचा प्रकरण ग्रंथ म्हणून ही गीता प्रसिद्ध आहे.  २० प्रकरणे आणि २९९ श्लोकांची ही गीता आहे. अद्वैत वेदान्तावरील ‘विवेकचूडामणि’ हा ग्रंथ व शंकराचार्याची अनेक स्तोत्रे यांमध्येही अष्टावक्र गीतेतील काही संकल्पनांचे स्पष्टीकरण आढळते.

अष्टावक्रगीतेचा पहिला भाग पुढीलप्रमाणे आहे-

अथ श्रीमदष्टावक्रगीता प्रारभ्यते ||
जनक उवाच ||
कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति |
वैराग्यं च कथं प्राप्तं एतद् ब्रूहि मम प्रभो ||१- १||
अष्टावक्र उवाच ||
मुक्तिं इच्छसि चेत्तात विषयान् विषवत्त्यज |
क्षमार्जवदयातोषसत्यं पीयूषवद् भज ||१- २||
न पृथ्वी न जलं नाग्निर्न वायुर्द्यौर्न वा भवान् |
एषां साक्षिणमात्मानं चिद्रूपं विद्धि मुक्तये ||१- ३||
यदि देहं पृथक् कृत्य चिति विश्राम्य तिष्ठसि |
अधुनैव सुखी शान्तो बन्धमुक्तो भविष्यसि ||१- ४||
न त्वं विप्रादिको वर्णो नाश्रमी नाक्षगोचरः |
असङ्गोऽसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव ||१- ५||
धर्माधर्मौ सुखं दुःखं मानसानि न ते विभो |
न कर्तासि न भोक्तासि मुक्त एवासि सर्वदा ||१- ६||
एको द्रष्टासि सर्वस्य मुक्तप्रायोऽसि सर्वदा |
अयमेव हि ते बन्धो द्रष्टारं पश्यसीतरम् ||१- ७||
अहं कर्तेत्यहंमानमहाकृष्णाहिदंशितः |
नाहं कर्तेति विश्वासामृतं पीत्वा सुखी भव ||१- ८||
एको विशुद्धबोधोऽहं इति निश्चयवह्निना |
प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ||१- ९||
यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जुसर्पवत् |
आनन्दपरमानन्दः स बोधस्त्वं सुखं भव ||१- १०||
मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि |
किंवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ||१- ११||
आत्मा साक्षी विभुः पूर्ण एको मुक्तश्चिदक्रियः |
असंगो निःस्पृहः शान्तो भ्रमात्संसारवानिव ||१- १२||
कूटस्थं बोधमद्वैतमात्मानं परिभावय |
आभासोऽहं भ्रमं मुक्त्वा भावं बाह्यमथान्तरम् ||१- १३||
देहाभिमानपाशेन चिरं बद्धोऽसि पुत्रक |
बोधोऽहं ज्ञानखंगेन तःनिकृत्य सुखी भव ||१- १४||
निःसंगो निष्क्रियोऽसि त्वं स्वप्रकाशो निरंजनः |
अयमेव हि ते बन्धः समाधिमनुतिष्ठति ||१- १५||
त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयि प्रोतं यथार्थतः |
शुद्धबुद्धस्वरूपस्त्वं मा गमः क्षुद्रचित्तताम् ||१- १६||
निरपेक्षो निर्विकारो निर्भरः शीतलाशयः |
अगाधबुद्धिरक्षुब्धो भव चिन्मात्रवासनः ||१- १७||
साकारमनृतं विद्धि निराकारं तु निश्चलम् |
एतत्तत्त्वोपदेशेन न पुनर्भवसंभवः ||१- १८||
यथैवादर्शमध्यस्थे रूपेऽन्तः परितस्तु सः |
तथैवाऽस्मिन् शरीरेऽन्तः परितः परमेश्वरः ||१- १९||
एकं सर्वगतं व्योम बहिरन्तर्यथा घटे |
नित्यं निरन्तरं ब्रह्म सर्वभूतगणे तथा ||१- २०||




#Article 272: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (166 words)


श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जून २९ इ.स. १८७१ - जून १ इ.स. १९३४) हे मराठी मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. बहु असोत सुंदर, संपन्न की महा या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.

त्यांचे १०वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. वडील अमरावती येथे शिक्षक होते. कोल्हटकरांना लहानपणापासून नाटकांची आवड होती आणि वडिलांमुळे त्यांना अनेक नाटके पाहता आली.  १०वी नंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे गेले. पुण्यात शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. इ.स. १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला. तसेच शिकत असतांनच विक्रम शशिकला या नाटकावर कोल्हटकर यांनी लिहिलेली समीक्षा  विविधज्ञानविस्तारमध्ये प्रसिद्ध झाली होती. इ.स. १८८७ साली कोल्हटकरांनी एल एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे आपला व्यवसाय करू लागले. १९०१ साली कोल्हटकर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.

कोल्हटकर पुणे येथील दुसऱ्या कविता संमेलनाचे आणि पुणे येथे इ.स. १९२७ साली भरलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

कोल्हटकर ज्योतिषतज्ज्ञदेखील होते. ते तिसऱ्या ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष होते.




#Article 273: भारतीय संस्कृती (773 words)


संस्कृती या शब्दामध्ये सम् हा उपसर्ग आणि कृ हा संस्कृत धातू आहे. संस्कृतीचा अर्थ सर्वसमावेशक कृती असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.

भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृतीदरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतींदरम्यान झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे.
भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.

भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. वैदिक साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळ साधन ग्रंथ आहेत. भारतीय संस्कृती समजून घेताना या धार्मिक साहित्याचा उपयोग होतो. वैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने वेदांचा. उपनिषदांचा. आरण्यक ग्रंथ यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वतःचा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःत बदल घडवून आणतो.संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.

भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची वाटचाल पाहिला असता तिच्यात प्रमुख तीन वैशिष्ट्ये दिसून येतात-
१.अखंडित परंपरा
२.राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव
३.संस्कृतिसंघर्ष टाळून संस्कृतिसंगम करण्याची प्रवृत्ती.भारतीय संस्कृती कोश खंड नववा

भारतीय संस्कृतीचा पाया वेद हा मानला जातो.वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारित अशी ही संस्कृती आहे. वेद बंगल्यावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जातात. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदांमधील काही सूक्त हे स्त्रियांनीही रचलेले आहेत. वैदिक मारण्याची भाषा संस्कृत होती वैदिक वाड्मय अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्य रूपामध्ये आहे. ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत. या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात म्हणजे जाणणे त्यापासून वेधही संज्ञा तयार झाली तिचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पटना च्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असेही म्हणतात

संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-
१.ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्त्वाची संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.
२.आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.
३.पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतिशास्त्राच्या दृष्टीने यांना विशेष महत्त्व आहे.
४.चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .

भारत हे हिंदू, बौद्ध, जैन व शीख या धर्मांचे जन्मस्थान आहे. आज हिंदू धर्म व बौद्ध धर्म हे जगातील अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे धर्म असून या दोन्ही धर्मांचे एकत्रित सुमारे २ अब्जांवर अनुयायी आहेत. तसेच भारतात ०.७% ते ६% बौद्ध धर्मीय, २.३% ख्रिश्चन धर्मीय, १.७% शीख धर्मीय व ०.४% जैन धर्मीय आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती ही अनेक प्रवाहातून तयार होत गेलेली आहे. या देशाच्या संस्कृतीला आणि इतिहासाला बौद्धिक ज्ञानाची तात्विक परंपरां लाभलेली आहे. या धार्मिक संकल्पनांची पकड भारतीय जनमानसावर आहे. जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म असून या धर्माला स्वतंत्र तत्वज्ञान आणि वैभवशाली अशी परंपरा लाभलेली आहे. बौद्ध आणि जैन धर्म हे तत्कालीन सनातनी धर्माच्या विरुद्ध प्रतिक्रियात्मक स्वरूपामध्ये पुढे आलेले धर्म असून याधर्मांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. लोकशाही विचारांचा व मूल्यांचा प्रचार व प्रसार करणारे हे धर्म भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही लोकप्रिय ठरले आहेत. विशेषतः भारतात ६% असलेला बौद्ध धर्म जगभरात प्रभावशाली आहे. पारशी धर्म, ज्यू धर्म आणि बहाई या धर्माचेही भारतात अनुयायी आहेत पण या धर्मीयांची संख्या कमी आहे. भारतात सुमारे २६% (३१ कोटी) लोक हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत. भारतीय जीवनप्रवाहात धर्मांची भूमिका प्रबळ असली तरी सहिष्णुतेसह बाळगलेला निरीश्वरवादी किंवा ईश्वराविषयी अनास्था असलेले नास्तिक आणि निधर्मी लोक ३० लाखापेक्षा अधिक भारतात आहेत. भारती संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. उच्चप्रतीची विचारसरणी भारतीय संस्कृतीने जगाला प्रधान केलेले आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत भारतीय संस्कृती ही अनेक स्थित्यंतरातून आणि समन्वयातून कायमच आपले अस्तित्व टिकून आहे. भारतीय धर्म आणि संस्कृतीचे वेगळेपण म्हणजे अनेक स्थित्यंतरं मध्ये आणि बदलाच्या काळातही  आपले अस्तित्व कायम टिकून आहे.

धर्मात दोन भाग असतात.धर्मातील यम नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. यम म्हणजे तीनही त्रिकाळ न बदलणारा भाग. सत्य, प्रेम, अहिंसा, दया, परोपकार, ब्रह्मचर्य यांना यम असे म्हटले जाते. नियम म्हणजे जानवे घालणे, गंध लावणे इत्यादी.  विद्वतरत्न के.ल दप्तरी यांनी म्हटले आहे की प्रत्येक युगात त्या त्या युगातील विचारवंत नवधर्म देत असत.




#Article 274: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (1149 words)


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. इ. स. १९९० च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृती च्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात . 

जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या शुक्रवारी या नागपूर येथील निवासस्थानी केली. १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले धर्मांतर, पुरोगामी आणि वैश्वीकरणामुळे येणार्‍या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे कॉंग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.

भारताला आपली मातृभूमी मानणारे हे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.

संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणार‍या संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महिला शाखा राष्ट्र सेविका समिती, पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष इत्यादी. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,०००  शाखा  चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.  

वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा  मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणार्‍या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणार्‍या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ  ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा🚩 ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती तसेच चालू घडामोडी इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
संघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल',  'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.

पूर्णवेळ संघकार्य करणार्‍या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणार्यांना  प्रचारक म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन प्रचारक देखील असतात. राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात. सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते.  जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे लोकशाही पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी शिस्त असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.

इ.स. १९४८ मध्ये संघावर गांधीहत्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती.. महात्मा गांधींवर हल्ला करणारा नथुराम गोडसे हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल. 

याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघाची सर्व धोरणे आणि कार्यपद्धती ब्राह्मणी हिताची आहेत. संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत. या टीकेला उत्तर देणे संघाला जमले नाही.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्‌ ।  
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे  
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।  

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता 
इमे सादरं त्वां नमामो वयम्‌ 
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्‌ 
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । 
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्‌ 
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्‌ 
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम्‌ 
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्‌ ।।२।। 

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम्‌ 
परं साधनं नाम वीरव्रतम्‌ 
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा 
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम्‌ । 
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् 
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्‌ । 
परं वैभवं नेतुमेतत्‌ स्वराष्ट्रम्‌ 
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्‌ ।।३।। 

।। भारत माता की जय ।।

अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो. 

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.

।। भारत माता की जय ।।




#Article 275: भारतीय जनता पक्ष (1548 words)


भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून  संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या.  तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत.

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. कॉंग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.

१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, कॉंग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.

जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता.

पक्षाच्या घटनेनुसार. सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजीनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे.

या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काऊन्सिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. 

मार्गदर्शक मंडळ

भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे. या मंडळातील सद्य सदस्यः

नॅशनल एक्झिक्युटिव्व्ह्ज

भाजपामध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह्ज अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत.:
ज्यात  अमित शहा हे चेअरमन,  अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त यातील सद्य सदस्य (सन २०२०) :

नॅशनल काऊन्सिल 

भाजपामध्ये 'नॅशनल काऊन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो. 

सेंट्रल इलेक्शन कमिशन

या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये  जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.

डिसिप्लिनरी कमिटी

पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लिनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.

नॅशनल सेल्स

याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.

१०
२० जानेवारी २०२० चालू
जे.पी.नड्डा(जगत प्रकाश नड्डा)

उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल.

इ.स.२००२ मध्ये नागपूर  महानगरपालिकेतील दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.

दोंडाईचा येथील दादासाहेब रावल सहकारी बॅंक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. औरंगाबाद खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बॅंकेतून नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कर्ज घेतले. कर्ज घेणाऱ्यांत जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बॅंकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश.

बॅंकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बॅंकेकडून या बॅंकेला पाच लाख रुपयांचा दंड.

२००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निर्दोष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्‍नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या (२०१९ साली) या प्रकरणी मिसाळ यांना जामीन.

पवन पवारवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत, पैकी काही हे - 

मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १० मार्च २००८ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम ७ व कलम १३ (१)(ई) खाली लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावर जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आहे.

मुंबई बॅंकेत १९९८पासून करण्यात आलेल्या गैरव्यवहारात बॅंकेचे सुमारे १२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यावर माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेकांवर त्यात सहभागाचा आरोप आहे. पुढील कारवाई प्रलंबित आहे. याशिवाय बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, इजा घडविणे आदी प्रकारचे १३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल.

बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष असलेले विक्रम पाचपुते व अन्य दोघांवर साईकृपा खासगी साखर कारखान्यावर (श्रीगोंदा) शिरूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल. बबनराव हे या कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे तब्बल ३८ कोटी रुपये या कारखान्यास देणे आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून पंजाब नॅशनल        
बँकेच्या पुणे शाखेकडून कारखान्यावर बॅंकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई झाली आहे. भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखाना १-१०-२०१६ रोजी पंजाब नॅशनल बॅंकेकडून तत्त्वत: ताब्यात घेण्यात आला. नगर जिल्हय़ातील श्रीगोंदा  तालुक्यामधील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने ऊस देयकांची थकवलेली रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ देण्यास  
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज पंजाब नॅशनल बॅंकेने पावणे चारशे कोटीच्या वसुलीसाठी कारखान्यावर तत्वत: ताब मिळवला. या कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी बॅंकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बबनराव पाचपुते यांना तारण ठेवलेला दैवदैठणचा कारखाना आणि श्रीगोंद्यातील घरही गमवावे लागणार आहे.

गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. कॉंग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे याच्या समर्थकांना मारहाण केल्या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३. विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्यांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण,  मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी यांचा समावेश.

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर (घाटकोपर-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल.

देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनावर तात्पुरती मुक्तता.

संजय  गांधी राष्ट्रीय निराधार योजनेत भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्याबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्यायमूर्ती गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी.

एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२० खाली गुन्हा दाखल; शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक झाली होती. सध्या खटला सुरू.  शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्यात पंधरा महिन्यांची शिक्षा.

मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रुपये कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बॅंकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील.

जनसंघाचे अधिकृत निवडणूक चिन्ह नांगरधारी शेतकरी हे होते. ते आता भाजपच्या काळात कमळ असे झाले आहे.




#Article 276: भारतातील राजकीय पक्ष (142 words)


१५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत.

भारतात २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.

मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.

मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांची यादी

मान्यताप्राप्त राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक पक्षांची यादी

२०१८ साली,

काही 'खास' नावांचे पक्ष :-




#Article 277: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (108 words)


भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे.या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड डांगे उर्फ श्रीपाद अमृत डांगे यांनी केली. अन्य पक्षांच्या तुलनेत हा पक्ष वेगळा आहे.ह्या पक्षाचे विचार पूर्णपणे मार्क्सवादी आहेत. कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्थेचा या पक्षावर संपूर्ण प्रभाव प्रभावित आहे. भारतात कॉंग्रेस पक्षानंतरचा हा सर्वात जुना पक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी नसून माओवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी आहे.  माओवादी कम्युनिस्ट पक्ष हिंसेचे समर्थन करतो.   

पुण्यामध्ये पीपल्स बुक हाऊस व मुंबईत लोकवाङ्‌मय गृह ही दुकाने साम्यवादी वाङ्‌मय मिळण्याचे प्रमुख ठिकाणे होती. आजही ही दुकाने आहेत, पण त्यांत इतरही पुस्तके मिळतात.

लोकवाङ्‌मय प्रकाशनाने शेकडो पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. एक मोठी यादी येथे आहे.




#Article 278: जनता दल (संयुक्त) (110 words)


जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत.

२००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते.
आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे




#Article 279: समाजवादी पक्ष (392 words)


समाजवादी पक्ष  किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत.  भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. (बाकीचे पक्ष - काँग्रेस , हिंदू महासभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष  आणि मुस्लिम लीग.) पुढे प्रजापक्ष (स्थापना इ.स.१९३०, हा पुढे प्रजा संयुक्त पक्ष झाला) नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन तो प्रजासमाजवादी पक्ष तयार झाला. याही पक्षाचे लोहिया समाजवादी (प्रजा सोशालिस्ट पार्टी), संयुक्त समाजवादी, बहुजन समाजवादी, लोकदल वगैरे नावाचे अनेक तुकडे होऊन बरेच राजकीय पक्ष तयार झाले. आजही हिंदुस्थान प्रजापक्ष, भारतीय प्रजापक्ष ता नावाचे काही प्रजापक्ष अस्तित्वात आहेत.

आचार्य कृपलानींचा 'किसान मजदूर प्रजा पार्टी' नावाचा पक्ष होता. पुढे त्यांनी राममनोहर लोहियांच्या बरोबर 'प्रजा सोशालिस्ट पार्टी'

जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही  उत्तरी भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.  मुलायम सिंग यादव हे त्यांच्या मुलाने - अखिलेश यादव याने - पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष होते. अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलीकडच्या काळात मुंबईत या पक्षाने आगमन केले होते. २००८ मध्ये मराठी भाषकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तिपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती. मुलायम सिंग यांच्या या समाजवादी पक्षात कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा ‘कौमी एकता दल’ हा पक्ष विलीन झाला आहे. (जून २०१६)   

भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे यथावकाश तुकडे होऊन (नीतीशकुमार/शरद यादव यांचा) संयुक्त जनता दल, (लालूप्रसाद यादव यांचा) राष्ट्रीय जनता दल, (ओमप्रकाश चौटाला यांचा) भारतीय राष्ट्रीय लोक दल, (देवेगौडा यांचा) 
जनता दल (धर्मनिरपेक्ष)  , शरद यादव यांचा संयुक्त जनता दल  आणि (कमल मोरारका यांचा) समाजवादी जनता पक्ष, जन मोर्चा, समाजवादी पक्ष (अखिलेश यादव गट), समाजवादी पक्ष (मुलायमसिंग यादव), बहुजन समाज पक्ष (मायावती), वगैरे वगैरे अनेक पक्ष निर्माण झाले.  यापैकी सहा पक्षांचे विलीनीकरण होऊन एक नवा राजकीय पक्ष उदयास येणार होता ((१५ एप्रिल २०१५  या तारखेची बातमी), पण ते शक्य झाले नाही.  

रामविलास पासवान, अजित सिंग, नवीन पटनायक अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. शिवपाल यादव यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील. (९ मे, २०१७ची बातमी).     

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे. 

पहा :  भारतातील राजकीय पक्ष  




#Article 280: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (147 words)


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान कॉंग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.  स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय कॉंग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. 

२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला. 

१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.




#Article 281: शिवसेना (161 words)


शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे.




#Article 282: झारखंड मुक्ति मोर्चा (133 words)


झारखंड मुक्ति मोर्चा (संक्षेप: जे.एम.एम.) हा एक भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. बिरसा मुंडा ह्या अदिवासी योद्ध्याच्या जन्मदिनादिवशी १९७२ साली झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली गेली. झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यात झारखंड मुक्ती मोर्चाचा मोठा सहभाग होता.

परंतु राजकारणापेक्षा गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष अशी झारखंड मुक्ती मोर्चाची कुप्रसिद्धी झाली आहे. पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष शिबू सोरेन ह्यांच्यावर खून, अपहरण इत्यदी अनेक आरोप असून केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना कोर्टाने दोषी ठरवले गेलेले सोरेन हे आजवरचे एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याचबरोबर २००९ सालच्या निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाकडून तिकिट मिळालेल्या सर्व उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी दाखले नोंदवले गेले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झामुमोला केवळ २ जागांवर विजय मिळाला तर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत सोरेन ह्याच्या नेतृत्वाखालील झामुमोला ८२ पैकी १९ जागांवर विजय मिळवता आला.
२०१९-२० च्या निवडणुकीत या पक्षाने ८१ पैकी ३० जागा जिंकल्या.




#Article 283: तेलुगू देशम पक्ष (357 words)


तेलुगू देशम पक्ष हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून एन.टी. रामाराव यांनी मार्च २९, १९८२ रोजी त्याची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत.

एन. टी. रामारावा 1 9 83 मध्ये पक्षाच्या स्थापनेच्या नऊ महिन्यांच्या आत आंध्रप्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री झाले आणि अशाप्रकारे आंध्रप्रदेशात पहिले बिगर कॉंग्रेस सरकार स्थापन झाले. [9] 1 9 84 ते 1 9 8 9 पासून 8 व्या लोकसभेत टीडीपी ही पहिली प्रादेशिक पार्टी बनली. [10]

विचारप्रणाली आणि प्रतीकवाद संपादन

तेलगू देसम पार्टी तेलुगू राष्ट्रवादी विचारधाराचा अवलंब करत आहे. तेलगू ते प्रादेशिक अभिमान आणि शेतकरी, मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एक पक्ष यावर जोर देऊन कॉंग्रेसच्या पुढाकारासाठी पर्याय म्हणून ही स्थापना झाली. 1 99 0 पासून, ग्रामीण भागाच्या खर्चावर आर्थिकदृष्ट्या एक व्यवसायिक आणि विकासात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून आले आहे. टीडीपी ध्वज फॉरग्राउंडमध्ये झोपडी, चाक आणि नांगर चिन्हांसह पार्श्वभूमी रंग म्हणून पिवळा वापरते. अधिकृत सायकल चिन्ह म्हणून एक सायकल वापरली जाते.

निवडणूक इतिहास संपादन

लोकसभा

आंध्रप्रदेश (1 9 56-2014) मधील लोकसभा मतदारसंघांची एकूण संख्या 42 होते. 2014 च्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा आणि तेलंगणमध्ये 17 लोकसभा मतदारसंघ आहेत. राष्ट्रीय संयुक्त आघाडीची स्थापना एन. टी. रामा राव अध्यक्ष म्हणून झाली. चंद्राबाबू नायडूतुले यांच्या नेतृत्वाखाली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारची भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तेलगू देसमधील लोकसभेचे 12 व्या अध्यक्ष म्हणून जी.एम. सी. बालयोगी होते.

वर्ष सार्वत्रिक निवडणुका जिंकली मतदारसंघांची संख्या बदलती टक्के मत बदल% 19848th लोकसभा 30-4.31% -1999 99 लोकसभा 2 283.2 9%  1.02% 199110 ला लोकसभा13  112.96%  3.3%% 199611 लोकसभा 16  32.97%  0.01% 199812 व्या लोकसभा12  42.77%  0.20% 1 999-13 लोकसभे 2 9 .3.65%  0.83% 2004 14 वे लोकसभा 5 9 243.04%  0.61% 200 9 लोकसभेची 12.51%  0.33% 2014 16 ला लोकसभा 16  102.52% ते 2.0.01%

मुख्यमंत्र्यांची यादी संपादन

एन.टी. राम राव फर्स्ट टर्म (9 जानेवारी 1 9 83 - 16 ऑगस्ट 1 9 84). दुसरी टर्म (16 सप्टेंबर 1 9 84 - 2 डिसेंबर 1 9 8 8). तिसरी संज्ञा (12 डिसेंबर 1 99 4 - 1 सप्टेंबर 1 99 5). चंद्रबाबू नायडू पहिल्यांदाच (1 सप्टेंबर 1995 - 13 मे 2004). दुसरा कार्यकाल (8 जून 2014 - पदाधिकारी) (2 जून 2014 पासून आजपर्यंतचे पोस्ट-विभाजित राज्याचे / नव्याने निर्माण झालेले आंध्र प्रदेशचे कार्यालय मानले जाणारे पहिले मुख्यमंत्री.




#Article 284: अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (1827 words)


अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळ्हम All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) (Tamil: அனைத்து இந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம்: अनैद्दु इन्दिय अण्णा दिराविड मुन्नेट्र कळम) हा तमिळनाडूतील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.त्याची स्थापना तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नट  मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (ए‍म्‌.जी. रामचंद्रन्‌) यांनी केली..रामचंद्रन हे १९७२ पर्यंत तमिळनाडूचे पहिले कॉंग्रेसेतर मुख्यमंत्री आणि सी.एन.अण्णादुराई यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे एम.करुणानिधी यांच्याकडे गेली. त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रामचंद्रन यांनी 'अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' या त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली.

३० एप्रिल १९७३ रोजी नव्या पक्षाने 'दोन पाने' हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.१६ मे १९७६ रोजी  रामचंद्रन यांनी पक्षाचे नाव बदलून 'अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम' हे ठेवले. त्यादरम्यान अ.भा.अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाचा मित्रपक्ष बनला. एम.जी.रामचंद्रन यांनी एम.करुणानिधी यांच्या सरकारवर केलेल्या भ्‍रष्टाचाराच्या आरोपामुळे केंद्र सरकारने करुणानिधींचे सरकार १९७६मध्ये बरखास्त केले.

जून १९७७ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या.त्यात अभाअण्णाद्रमुक पक्षाने २३४ पैकी १३० जागा जिंकल्या तर द्रमुक पक्षाने ४८ जागा जिंकल्या. एम.जी.रामचंद्रन स्वतः अरुपकोट्टाई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ३० जून १९७७ रोजी त्यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दरम्यान कॉंग्रेस आणि द्रमुक पक्षातले संबंध सुधारले आणि अभाअण्णाद्रमुक इंदिरा कॉंग्रेसपासून दूर गेला. कॉंग्रेस आणि द्रमुक पक्षांनी १९८० च्या लोकसभा निवडणुका युती करून लढवल्या. या निवडणुकांमध्ये अण्णाद्रमुकचा मोठा पराभव झाला. कॉंग्रेस आणि द्रमुक युतीने ३९ पैकी ३६ जागा जिंकल्या तर अभाअण्णाद्रमुक पक्षाला केवळ २ जागा जिंकता आल्या.

सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरा गांधींनी विरोधी पक्ष सत्तेत असलेली अनेक राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात रामचंद्रन यांचे सरकारही बरखास्त झाले. मे १९८० मध्ये राज्य विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये २३४ पैकी १२९ विधानसभा जागा जिंकून सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची भरपाई पक्षाने केली. कॉंग्रेस-द्रमुक युतीने ६८ जागा जिंकल्या. ९ जून,१९८० रोजी .एम.जी.रामचंद्रन यांनी दुसर्‍यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.

रामचंद्रन यांची तमिळ जनतेमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांच्या पक्षाशी इंदिरा गांधींनी संबंध सुधारले. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरच्या १९८४ मधील लोकसभा निवडणुका आणि त्याबरोबरच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका कॉंग्रेस आणि अभाअण्णाद्रमुक पक्षाने युती करून लढवल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या युतीने ३९ पैकी ३७ तर विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी १९३ जागा जिंकल्या. पक्षाचे नेते .एम.तंबीदुराई यांची निवड ८व्या लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून झाली. विशेष म्हणजे युतीने हे यश रामचंद्रन यांच्या अनुपस्थितीत मिळवले. तब्येत ढासळल्यामुळे .रामचंद्रन यांना ७ ऑंक्टोबर १९८४ रोजी मद्रासमधील (सध्याचे चेन्नाई) अपोलो हॉंस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे केलेल्या उपचारांनंतरही प्रकृती न सुधारल्यामुळे ५ नोव्हेंबर १९८४ रोजी ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले होते. राज्यात सर्वत्र रामचंद्रन यांची अभाअण्णाद्रमुक-कॉंग्रेस  युती जिंकणार आणि द्रमुकचा धुव्वा उडणार असे वातावरण होते. त्यामुळे द्रमुकचे नेते .करुणानिधी यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. १० फेब्रुवारी १९८५ रोजी एम.जी. रामचंद्रन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे तिसर्‍यांदा हाती घेतली.

त्यानंतरच्या काळात .रामचंद्रन यांची प्रकृतीत चढउतार होत राहिले. उपचारांसाठी ते वेळोवेळी अमेरिकेला जाऊन आले. तरीही जुलै १९८७ मध्ये राजीव गांधींच्या सरकारने श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या प्रश्नावर त्या देशाचे अध्यक्ष जुनियस जयवर्धने यांच्याशी केलेल्या श्रीलंका करारसंबंधीच्या वाटाघाटींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

डिसेंबर १९८७ मध्ये त्यांची प्रकृती आणखी बिघडली. राज्यात शोकाकुल वातावरण झाले. शेवटी २४ डिसेंबर १९८७ रोजी .एम.जी.रामचंद्रन यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्षात नेतृत्वावरून संघर्ष झाला. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जानकी रामचंद्रन या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांना पक्षाच्या दुसर्‍या नेत्या जयललिता यांनी आव्हान दिले. परिणामी पक्षात फूट पडून जानकी रामचंद्रन यांचे सरकार जानेवारी १९८८ च्या शेवटी कोसळले.  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राज्य विधानसभेसाठी जानेवारी १९८९ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवल्या. अभाअण्णाद्रमुक पक्षात पडलेली फूट आणि कॉंग्रेस पक्षाने त्याची सोडलेली साथ याचा फायदा द्रमुक पक्षाला झाला.  निवडणुकीत द्रमुकने २३४ पैकी १५०, कॉंग्रेसने २६, जयललिता गटाने २७ तर जानकी रामचंद्रन गटाने २ जागा जिंकल्या. .करुणानिधींनी १३ वर्षांच्या खंडानंतर २७ जानेवारी १९८९ रोजी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्षात जयललिता नेत्या बनल्या आणि जानकी रामचंद्रन नेतेपदाच्या शर्यतीत मागे पडल्या. राजीव गांधींच्या लक्षात आले की स्वतंत्र निवडणुका लढवून कॉंग्रेस पक्षाला फारसे काही साध्य झाले नाही आणि द्रमुकला सत्तेवर यायची संधी मिळाली.त्यामुळे नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका कॉंग्रेस आणि 
अभाअण्णाद्रमुक पक्षांनी युती करून लढवल्या. युतीने ३९ पैकी ३८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आणि द्रमुकचा मोठा पराभव झाला.

३० जानेवारी १९९१ रोजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारने करूणानिधींचे सरकार राज्यात आश्रय घेतलेल्या श्रीलंकेतील तमिळ अतिरेक्यांविरूध्द पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे असा ठपका ठेऊन बरखास्त केले. १९९१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका कॉंग्रेस आणि अभाअण्णाद्रमुक पक्षांनी युती करून लढवल्या. निवडणूक प्रचारादरम्यान श्रीपेरुम्बुदुर येथे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधीची हत्या झाली.त्यामुळे राज्यातील मतदान पुढे ढकलून १२ आणि १५ जून १९९१ रोजी झाले. त्यात अभाअण्णाद्रमुक-कॉंग्रेस युतीने अभूतपूर्व यश संपादन केले.युतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व ३९ जागा जिंकल्या तर विधानसभेच्या २३४ पैकी २२४ जागा जिंकल्या. तर द्रमुकला केवळ २ जागा मिळाल्या. २४ जून १९९१ रोजी जयललिता यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

जयललितांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली.त्यांच्या सरकारने मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले. त्यात सरकारी जमिनी जयललितांच्या संस्थेला बाजारभावापेक्षा कमी भावाने विकणे, ग्रामपंचायतींना दिलेल्या रंगीत दूरदर्शन संचांच्या वाटपात गैरव्यवहार, दारिद्र्यरेषेखालील लोकांना दिलेल्या साडया आणि धोतर यांच्या वाटपात गैरव्यवहार अशा अनेक आरोपांचा समावेश होता.  नोव्हेंबर १९९५ मध्ये जयललितांचे दत्तकपुत्र सुधाकरन यांचा विवाह झाला. त्यासाठी जयललितांनी सरकारी यंत्रणा स्वतःच्या खाजगी कामासाठी दावणीला लावल्याचा आरोप झाला. त्यांच्या सरकारविरुद्ध जनमत जाऊ लागले. त्यातच तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार रजनीकांत यांनी जयललितांविरुद्ध बाजू घेऊन 'तमिळ जनतेने जयललितांना परत निवडून दिल्यास ईश्वर कधीच माफ करणार नाही' असे जाहीर विधान केले. या सर्वांचा परिणाम म्हणून १९९६ च्या निवडणुकींमध्ये अभाअण्णाद्रमुक-कॉंग्रेस युतीचा मोठा पराभव झाला. लोकसभेच्या ३९ पैकी सर्व जागांवर युतीचा पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी केवळ ६ जागा जिंकण्यात युतीला यश मिळाले. स्वतः जयललितांचा बारगूर मतदारसंघातून पराभव झाला. अभाअण्णाद्रमुक पक्षाची स्थापना झाल्यानंतर हा त्याचा सर्वात मोठा पराभव ठरला.

१५ मे १९९६ रोजी करुणानिधींनी तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले .त्यानंतर त्यांच्या सरकारने जयललितांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायचे आदेश दिले. स्वतः जयललिता आणि त्यांच्या सरकारमधील सेल्वगणपती, इंदिरा कुमारी यांच्यासारख्या मंत्र्यांना काही दिवस तुरुंगवास घडला.

नोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी हत्याकांडाच्या कटाची चौकशी करणार्‍या जैन आयोगाचा अंतरिम अहवाल इंडिया टुडे या नियतकालिकाकडे फुटला. राजीव गांधींची हत्या करणार्‍या एल.टी.टी.ई. या तमिळ अतिरेकी संघटनेला हातपाय पसरायला छुपी मदत केल्याबद्दल आयोगाने द्रमुक विरुद्ध ताशेरे ओढले आहेत असे इंडिया टुडेने जाहीर केले.  द्रमुक हा संयुक्त आघाडीचा घटकपक्ष होता आणि त्या पक्षाचे ३ मंत्री गुजराल सरकारमध्ये होते. कॉंग्रेस पक्षाने आयोगाचा अंतरिम अहवाल संसदेत सादर करण्याची मागणी केली. सरकारने अहवाल १९ नोव्हेंबर, १९९७ रोजी सादर केला. इंडिया टुडेने जाहीर केल्याप्रमाणे जैन आयोगाने खरोखरच द्रमुकविरुद्ध ताशेरे ओढले असल्याचे समजताच त्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची मागणी कॉंग्रेस पक्षाने केली. तसे न केल्यास पाठिंबा काढून घ्यायची धमकी कॉंग्रेस पक्षाने दिली. कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि पंतप्रधान गुजराल यांच्या दरम्यान या संदर्भात आठवडाभर पत्रव्यवहार झाला. मात्र गुजराल यांनी कॉंग्रेस पक्षाची मागणी अमान्य केली. २८ नोव्हेंबर १९९७ रोजी कॉंग्रेस पक्षाने गुजराल सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान गुजराल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कोणतेही पर्यायी सरकार स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती नारायणन यांनी डिसेंबर ४, १९९७ रोजी ११वी लोकसभा बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.

जयललितांनी द्रमुक-तमिळ मनिला कॉंग्रेस युतीविरूध्द अभाअण्णाद्रमुक-पटटाली मक्कल काची- भारतीय जनता पक्ष- मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम-तमाझिगा राजीव कॉंग्रेस आणि जनता पक्ष अशी  आघाडी उभारली.जयललितांच्या ६ पक्षांच्या या आघाडीस ३९ पैकी ३० तर द्रमुक- तमिळ मनिला कॉंग्रेस युतीला ९ जागी विजय मिळाला.त्यानंतर केंद्रात स्थापन झालेल्या भाजपप्रणित सरकारमध्ये अभाअण्णाद्रमुक सामील झाला. पक्षाचे ४ मंत्री वाजपेयी सरकारमध्ये समाविष्ट झाले. ८ व्या लोकसभेचे उपाध्यक्ष .एम.तंबीदुराई कायदामंत्री झाले. त्याव्यतिरिक्त .एस.आर.मुथय्या हे कॅंबिनेटमंत्री तर आर.के.कुमार आणि के.आर.जनार्दनन हे राज्यमंत्री झाले.

अभाअण्णाद्रमुक पक्षाने वाजपेयी सरकारपुढे मोठया प्रमाणावर प्रश्न निर्माण केले.जयललितांनी कधी करूणानिधी सरकार बरखास्त करायची मागणीवरून तर कधी कावेरी पाणीवाटपप्रश्नावरून सरकारवरचा दबाव कायम ठेवला.त्यांची समजूत काढायला वाजपेयींना कधी जसवंतसिंग तर कधी जॉर्ज फर्नान्डिस यांना चेन्नाईला पाठवावे लागले.

३० मार्च १९९९ रोजी सुब्रमण्यम स्वामींनी आयोजित केलेल्या चहा पार्टीत जयललिता आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघीही उपस्थित राहिल्या आणि भविष्यात होणार्‍या घटनांची नांदी जयललितांच्या 'राजकीय भूकंपाने होणार आहे' या वाक्याने लागली. अभाअण्णाद्रमुक पक्षाने नौदलप्रमुख विष्णू भागवत उचलबांगडी प्रकरणी संरक्षणमंत्री जॉंर्ज फर्नांडिस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर श्रीलंकेतील एल.टी.टी.ई. या अतिरेकी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत असा आरोप केला. जॉंर्ज फर्नांडिस यांच्यावर विष्णू भागवत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करायला संयुक्त संसदीय समिती नेमावी आणि विष्णू भागवत यांना परत नौदलप्रमुख पदावर नियुक्त करावे अशीही मागणी पक्षाने केली अन्यथा केंद्रातील भाजपप्रणित आघाडीचा पाठिंबा काढून घ्यायची धमकी पक्षाने दिली. पण पंतप्रधान वाजपेयींनी या मागण्यांची पूर्तता करायला ठामपणे नकार दिला. शेवटी १४ एप्रिल १९९९ रोजी जयललितांनी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांची भेट घेऊन वाजपेयी सरकारचा पाठिंबा अभाअण्णाद्रमुक पक्षाने काढून घेतला आहे असे पत्र दिले. वाजपेयींनी १५ एप्रिल रोजी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर दोन दिवस चर्चा होऊन १७ एप्रिल रोजी त्यावर मतदान झाले. ठराव २६९ विरुद्ध २७० अशा एका मताने फेटाळला गेला आणि वाजपेयींनी राजीनामा दिला.

त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्ष पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाचा मित्रपक्ष बनला तर द्रमुक भाजप आघाडीत सामील झाला.
१९९९ च्या लोकसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी अनुक्रमे कॉंग्रेस आणि भाजप यांच्याशी युती करून लढवल्या.२००१ च्या राज्य विधानसभा निवडणुकींसाठी अभाअण्णाद्रमुक-कॉंग्रेस-तमिळ मनिला कॉंग्रेस-भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी मजबूत आघाडी जयललितांनी उभारली.मात्र त्याआधी तमिळनाडूतील विशेष न्यायालयाने जयललितांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा केली. जयललितांनी त्याविरूध्द उच्च न्यायालयात अपील करून शिक्षेला स्थगिती मिळवली. पण कायद्याप्रमाणे जयललिता मे २००१ च्या निवडणुका लढवू शकल्या नाहित. त्यांच्या आघाडीने २३४ पैकी १९६ जागा जिंकल्या.जयललिता स्वतः निवडणुका लढवायला अपात्र ठरल्यामुळे त्यांना राज्यपाल सरकार स्थापण्यासाठी बोलवणार नाहीत असा अंदाज होता. पण राज्यपाल मीर साहेबा फातिमा बिवी यांनी जयललितांनाच सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करून १४ मे २००१ रोजी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज्यपालांच्या त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

जयललिता सत्तेवर आल्यावर करुणानिधींना तुरुंगात डांबून त्यांच्यावर सूड उगवतील अशी सर्वांची अटकळ होती.आणि झालेही तसेच. ३० जून २००१ रोजी मध्यरात्री पोलिसांनी करुणानिधी आणि त्यांचे पुत्र स्टॅंलिन यांना चेन्नाई शहरात बांधलेल्या फ्लायओव्हर ब्रीज बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून, तर केंद्रीय मंत्री मुरासोली मारन आणि टी.आर.बालू यांना पोलिस कारवाईत अडथळा आणल्याबद्दल अटक केली .त्यावेळी पोलिसांनी ७८ वर्षांच्या करुणानिधींना अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप झाला, त्याचा देशभरात निषेध झाला. जयललितांचे सरकार बरखास्त करायचीही मागणी उठली.

२४ सप्टेंबर २००१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जयललितांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करायचा तत्कालीन राज्यपाल मीर साहेबा फातिमा बिवी यांचा निर्णय रद्दबादल ठरवला. त्यानंतर जयललितांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ.पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर २००१ मध्ये न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणातून जयललितांची निर्दोष मुक्तता केली आणि त्यांचा निवडणुका लढवायचा मार्ग मोकळा झाला. २४ फेब्रुवारी २००२ रोजी आंदिपट्टी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक जिंकून जयललितांनी आपल्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्यातील सर्व अडसर दूर केले. २ मार्च २००२ रोजी ओ.पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि जयललिता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनल्या.

जयललितांनी मुख्यमंत्रिपदाच्या तिसर्‍या कारकिर्दीत संप करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांविरुद्ध कडक कारवाई केली. त्यामुळे सरकारी कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला. त्यांनी धर्मांतरवर बंदी घातली, त्यामुळे मुसलमान आणि ख्रिश्चन त्यांच्यावर नाराज झाला. तसेच पोटा कायद्याखाली मरुमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सरचिटणीस व्ही.गोपालस्वामी (वायको) यांना तुरुंगात टाकण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला.

२००४ च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी द्रमुक पक्षाने भाजपची साथ सोडली. जुने वैर विसरून जयललितांच्या अभाअण्णाद्रमुक पक्षाने भाजपशी पुन्हा एकदा युती केली. पण वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे जनमत अभाअण्णाद्रमुक पक्षाविरुद्ध गेले होते.लोकसभा निवडणुकीत अभाअण्णाद्रमुक-भाजप आघाडीचा धुव्वा उडाला. ३९ पैकी एकही जागा त्या आघाडीच्या हाती लागली नाही.

नोव्हेंबर २००४ मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना एका खून खटल्यात अटक करायचा जयललिता सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला.

२००६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अभाअण्णाद्रमुक पक्षाने वायको यांच्या मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाशी मतभेद संपवून युती केली.  निवडणुकीत अभाअण्णाद्रमुक-मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम युतीने २००४ च्या मानहानीकारक पराभवाची काही अंशी भरपाई केली, पण युतीला विधानसभेत बहुमत मिळवता आले नाही.द्रमुक प्रणीत आघाडीला २३४ पैकी १६३ तर अभाअण्णाद्रमुक-मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम युतीला ६७ जागा मिळाल्या. १४ मे २००६ रोजी  एम.करुणानिधी यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

२००६पासून अभाअण्णाद्रमुक पक्ष राज्य विधानसभेत प्रमुख विरोधीपक्ष झाला.




#Article 285: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (1086 words)


 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस () (INC, ज्याला बहुधा कॉंग्रेस म्हणतात) () हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. कॉंग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल कॉंग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात प्लेगची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल  संस्कृत  पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. कॉंग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरवातीच्या काळामध्ये कॉंग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत कॉंग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं(लोकमान्य टिळक,नेताजी सुभाषचंद्र बोस,गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण कॉंग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात  माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, कॉंग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही कॉंग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या  कॉंग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे स्थान  कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले.  देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण  या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या.  आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत  सत्तेवर असताना कॉंग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना चा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. कॉंग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा कॉंग्रेस सरकारने तयार केला. कॉंग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. 

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या घटनेनुसार, एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरीकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे.

श्री सुरेन्द्र्नाथ बॅनजी॔ यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्त्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच १८८३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी ' इंडियन नॅशनल कॉन्फरन्स ' चे पहिले अधिवेशन बोलाविले होते. राष्ट्रभर दाैरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली . सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा कसून विरोध केला व ती प्रतिगामी चळवळ असल्याची घोषणा केली. 

ए. ओ. ह्यूम व लाॅड॔ डफरिनने मिळून बॅनजी॔ची चळवळ हाणून पाडण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाहिला सुरुवात केली. भारतातील सौम्य विचारांच्या सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करून त्या सर्वाना एकत्रित आणून ब्रिटिश सत्तेला अनुकूल अशा राष्ट्रीय पातळीवरील एका संघटनेची स्थापना करण्यासाठी अतोनात धडपड केली. इ. स. १८८४ मध्ये ' इंडियन नॅशनल युनियन ' ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे एक अखिल भारतीय संमेलन मार्च १८८५ मध्ये पुणे येथे भरवण्याचे ठरले परंतु पुण्यात यावेळी प्लेगचा प्रादुर्भाव झाल्याने , २७ डिसेंबर १८८५ रोजी ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत काॅलेजच्या प्रशस्त सभाग्रहात भरविण्यात आले. या संमेलनाला भारताच्या निरनिराळ्या भागातून ७२ प्रतिनिधी आले होते. अशा प्रकारे प्रथमच देशाच्या  निरनिराळ्या भागातून प्रतिनिधीनी एकत्रित येण्याची हि घटना अपूर्व मानली जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद बंगालचे श्री उमेशचंद्र बॅनजी॔   यांनी भूषविले. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी , के. टी. तेलंग , दिनशाॅ वाछा इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तीहि उपस्थित होत्या. कॉंग्रेसचा जनक समजला जाणारा ह्यूम पण या अधिवेशनाला खास उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून परत आला होता. याशिवाय स्थानिक पत्रकार व नेतेही उपस्थित होते.

इ.स. १९३६च्या फैजपूर येथील अधिवेशनात कॉंग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच्याच वर्षी इ.स. १९३७च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे कॉंग्रेसने समर्थन केले होते.

या पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसर्‍या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली.

अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरी, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत

कॉंग्रेस वर्किंग कमिटी
कॉंग्रेस पक्षामध्ये कॉंग्रेस वर्किंग कमिटी (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ.मनमोहन सिंग, ए.के.ॲंटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत.

याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे)

राज्यस्तरावर प्रदेश कॉंग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो.

केंद्रीय निवडणूक विभाग
केवळ कॉंग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात केंद्रीय निवडणूक विभाग नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो.

हल्लीच्या भारतामध्ये कॉंग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :-

पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते.नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे.




#Article 286: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (250 words)


१९६५ साली वैचारिक मतभेदांमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली, त्या वर्षी भा.क.प. आणि भा.क.प.(मार्क्सवादी) अशी दोन अधिवेशने भरली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) वेगळा झाला. ह्या विभाजनाचा १९६२ च्या भारत चीन युद्धाशी संबंध आहे असा एक गैरसमज आहे.

या पक्षाचा केरळ व पश्चिम बंगाल या राज्यांत प्रभाव असून हा पक्ष भारत सरकारमध्ये, कॉंग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य होता.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात.

१९८० च्या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि कॉंग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामार्‍या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसर्‍याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसर्‍याला कापून काढले. यानंतर तर सारे कॉंग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले. 

केरळच्या कोझीकोड येथील स्थानिक न्यायालयाने बंडखोर मार्क्सवादी नेते टीपी चंद्रशेखरन यांच्या हत्येची सुनावणी करताना ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे (३ फेब्रुवारी २०१५). यांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन नेते, कन्नूर जिल्ह्यातील पन्नूरचे समिती सदस्य पी.के. कुंजुनंदन, स्थानिक समितीचे सचिव के.सी. रामचंद्रन आणि शाखा सचिव टी. मनोज यांचा समावेश आहे. 

४ मे २०१२ रोजी रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पार्टीचे नेते टी.पी. चंद्रशेखरन यांची केलेली क्रूर हत्या म्हणजे ‘सुनियोजित राजकीय हत्या’ असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ’टी.पी. चंद्रशेखरन यांच्या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढत होती. केवळ हिंसेवरच विश्‍वास असलेले मार्क्सवादी ही बाब पचवू शकले नाहीत’ असे न्यायाधीश म्हणाले..

(अपूर्ण)




#Article 287: पर्वत (105 words)


पर्वत हे नाव नैसर्गिकरित्या इतर भूस्तराहून उंच असलेल्या भौगोलिक रचनेसाठी वापरले जाते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार पर्वत डोंगर व टेकडीपेक्षा उंच असतात. बरेचदा पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखराच्या स्वरूपाचा असतो. तसेच बव्हंशी पर्वत एखाद्या पर्वतरांगेचा भाग असतात.

हिमालयामधील माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असून त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मी (२९,०२९ फूट) इतकी आहे २१,१७१ मी (६९,४५९ फूट) उंची असलेला मंगळ ग्रहावरील ऑलिंपस मॉन्स हा सूर्यमालेमधील सर्वात उंच पर्वत मानला जातो.

सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. ह्यापैकी आशिया खंडात ६४ टक्के, युरोपा २५ टक्के, दक्षिण अमेरिका खंडात २३ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये १७ टक्के तर आफ्रिकेत ३ टक्के जमिनीचा समावेश होतो.




#Article 288: कर्नाटक (1846 words)


कर्नाटक Karnataka (कन्नड भाषेत :,  ) हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले...... 

कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे.  कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमीळ ह्याही काहि भाषा बोलल्या जातात. 

कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत.  करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. श कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.

कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी  बंगळूर ही असून आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.   

कर्नाटकाचा इतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथिक व निओलिथिक संस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पामध्ये मिळालेले सोने कर्नाटकातील सोन्याच्या खाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते  हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी  ५००० वर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शवतात. बौद्ध कालात कर्नाटक  मगध साम्राज्याचा भाग होता व नंतर मौर्य साम्राज्याचा भाग बनला. अशोकाचे अनेक शिलालेख कर्नाटकात आहेत.  मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर जुन्नरच्या सातवाहनांनी कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. कदंब व पश्चिमी गंगा ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती. पश्चिमी गंगा घराण्याने तलक्कड येथे राजधानी स्थापली होती.

घराण्याने कन्नड भाषेला राज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरूवात केली. पाचव्या शतकातील बनावसी येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो. ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले. the Rashtrakuta Empire of Manyakheta and the Western Chalukya Empire, चालुक्यांनी दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले. यांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली..

दक्षिणेकडील चोल साम्राज्य ९ व्या शतकात अतिशय शक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता. राजाराज चोलाने (इस. ९८५-१०१४)सुरु केलेला विस्तार राजेंद्र चोलाच्या (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला. सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबिज केली. राजाराज चोलने बनावसीपर्यंत विस्तार केला.  १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मरणार्थ कोलार येथे स्तंभ उभा केला होता.  

११ व्या शतकात होयसाळांचे राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकिर्द ही कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानली जाते. होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तमिळनाडूचेही भाग काबिज केले होते. चौदाव्या शतकात हरिहर-बुक्क यांनी  विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी तुंगभद्रेच्या काठी होशपट्टण येथे केली. याच गावाचे नाव नंतर विजयनगर म्हणून रूढ झाले. विजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणाऱ्या इस्लामी आक्रमणांना बऱ्याच काळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. राजा रामदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर  शहराचे अवशेष आहेत.

सन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा तालिकोटा येथील लढाईत इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्याचे अनेक इस्लामी शाह्यांमध्ये (निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही) विभाजन झाले. विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही संपुष्टात आणली. बहामनी व आदिलशाही स्थापत्याची चुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. गोल घुमट हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे. 

मराठा साम्राज्याच्या विस्तारकालात पूर्वी विजयनगर साम्राज्याचे विभाग असलेली दक्षिण कर्नाटकातील अनेक छोटी राज्ये अजूनही स्वतंत्र होती. म्हैसूरचे वडियार, मराठे व निझाम यांच्या ताब्यात कर्नाटक होता. म्हैसूर राज्याचा सेनापती हैदर अली  याने (....साली) म्हैसूर राज्यावर ताबा मिळवला व स्वतः राज्यकर्ता बनला. त्याचा मुलगा टिपू सुलतान हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धा मानला जातो. त्याने इंग्रजांशी चार युद्धे केली. १७९९ मधील चौथ्या युद्धात त्याचा म्रुत्यू झाला व इंग्रजांनी म्हैसूरचे संस्थान काबिज केले व नंतर वडियार घराण्याला पुन्हा म्हैसूरच्या गादीवर बसवले.  

संस्थाने खालसा करण्याच्या धोरणांमुळे इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. कित्तुर चिन्नमा ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.  म्हैसूर संस्थान व आजूबाजूचा विलीन झालेला प्रदेश यांचे म्हैसूर राज्य झाले. पुढे  १९७३ साली   राज्याचे नाव अधिकृतरीत्या बदलले आणि कर्नाटक असे झाले.

कर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे. राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो. त्यातील उत्तरेकडच्या भागाचा अंतर्भाव भारतातील कोरड्या प्रदेशांमध्ये होतो. . कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मलयनगिरी. त्याची उंची   इतकी आहे. कावेरी कृष्णा, मलप्रभा, तुंगभद्रा व शरावती ह्या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत. 

भूस्तरशास्त्रीयदृष्ट्या कर्नाटकाचे चार भाग आहेत......

राज्यातील अंदाजे ६०% भूभाग आर्चियन कॉम्प्लेक्सने बनलेला असून त्यान नाइस, ग्रॅनाईट आणि चार्नोकाइट खडक आढळतात. जांभ्या दगड हा सुरुवातीच्या टर्शियरी कालखंडातील ज्वालामुखी उद्रेक संपल्यावर तयार झाला.

कर्नाटकात अकरा प्रकारच्या माती आढळतात. यांचे शेतकीशास्त्रानुसार सहा प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे - लाल माती, जांभी माती , काळी माती, ॲलुव्हियो-कॉलुव्हियल, जंगलमाती आणि किनारी माती.

कर्नाटकात चार प्रमुख ऋतू आहेत. सौम्य हिवाळा(जानेवारी व फेब्रुवारी), उन्हाळा(मार्च ते मे), पावसाळा(जून ते सप्टेंबर) व उत्तर पावसाळा(ऑक्टोबर ते डिसेंबर).  हवामानाच्या दृष्टीने कर्नाटकाचे चार भाग पाडता येतील. पहिला, समुद्रकिनाऱ्यालग दमट हवामानाचा. या किनारपट्टीच्या भागात पावसाळ्यात जबरदस्त पाऊस पडतो. इथली पावसाची वार्षिक सरासरी ३६३८ मिलीमीटर इतकी आहे. हे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या कितीतरी पटीने अधिक आहे. अगुंबे हे कर्नाटकातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. कर्नाटकाचा पूर्व भाग अतिशय शुष्क आहे. रायचूर येथे सर्वाधिक ४५.६° सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यातील सर्वात कमी तापमान बिदर २.८° सेल्सियस येथे नोंदवले गेले आहे. उत्तरेकडचा भाग व दक्षिणेकडचा भाग हे सौम्य प्रकारच्या हवामानात मोडतात.कर्नाटक हे एक सांस्कृतिक वारसा असलेल राज्य आहे 

कर्नाटकची २२% टक्के जमीन ही जंगलांनी व्यापली आहे. बहुतांश जंगल  किनारपट्टी व सह्याद्रीच्या क्षेत्रात येते. याशिवाय म्हैसूर शहराच्या दक्षिणेला एक मोठे जंगल आहे. त्याची गणना भारतातल्या मोठ्या जंगलक्षेत्रांत होते. 

यावरील विस्तृत लेख पहा - कर्नाटकातील जिल्हे.

कर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटक राज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी रुपये इतके आहे. कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ साली ७ टक्के होता. 

वार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक राज्य हे भारतातले, २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होणारे राज्य आहे, असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजरात आहेत.. सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी गुंतवणूक मिळवण्याऱ्या भारतातील राज्यांत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे. २००६-०७ या आर्थिक वर्षात राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता. कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.

राज्यातील ५६% जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडित आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी १.२३१ कोटी हेक्टर  शेती-वापरासाठी आहे. राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही ओलिताखाली आहे.

कर्नाटकात भारत सरकाचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेवी इलेट्रिकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टूल्स ह्या कंपन्यांचे महत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. इस्त्रो, राष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी भारतातील सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत. 

कर्नाटकने १९८० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. सध्या कर्नाटकात २००० पेक्षाही जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेत. इन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूरमध्ये आहेत. तसेच सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यालये आहेत.  या कंपन्यांकडून होणाऱ्या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के एवढी आहे.. सॉफ्टवेर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.

कर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेत. तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे.

देशातील काही बॅंकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बॅंक, सिंडीकेट बॅंक, वैश्य बॅंक, कर्नाटक बॅंक ह्या काही प्रसिद्ध बॅंका मुळच्या कर्नाटकमधील आहेत. उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारतातील बॅंकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बॅंकेची एक शाखा असे समीकरण आहे. 

रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .

कर्नाटक मध्ये इतर राज्यांप्रमाणेच विधानसभा अस्तित्वात आहे. तसेच विधान परिषद ही आस्तित्वात आहे. विधानसभा हे कनिष्ट सभागृह तर विधान परिषद हे वरिष्ट कायम-सभागृह आहे. विधानसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होतात व एकूण २२४ आमदार निवडले जातात. विधान परिषदेत ७५ आमदार असून १/३ आमदारांची दर दोन वर्षांनी नियुक्ती होते. विधान परिषदेतील आमदाराचा कार्यकाल एकूण ६ वर्षाचा असतो.

कर्नाटकातील हवाई वाहतूक फारशी विकसित झालेली नाही. बंगळूरचा केंपेगौडा विमानतळ राज्यातील सर्वात मोठा विमानतळ आहे. मंगळूर, हुबळी, बेळगाव, हंपी व बेळ्ळारी येथेही विमानतळे आहे व बंगळूरहून  बहुतेक जोडली आहेत.  भारतातील खाजगी विमान कंपन्यांपैकी किंगफिशर व एअर डेक्कन ह्या बेंगलोरमधल्या कंपन्या आहेत. 

कर्नाटक मध्ये ३०८९ किमी लांबीचे लोहमार्ग आहेत. किनारपट्टीच्या भागातील रेल्वे कोकण रेल्वेच्या अंतर्गत येते तर बहुतेक इतर भाग नैरुत्य विभागात येतात. रेल्वेचा काही भाग दक्षिण रेल्वे मध्येही मोडतो.. बेंगलोरचे इतर शहरांशी लोहमार्गाचे जाळे विस्तृत आहे. परंतु इतर शहरांचे एकमेकांशी जाळे तेवढे विकसित झालेले नाही.

कर्नाटकात एकूण ११ बंदरे आहेत. मेंगलोर हे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे.  

राज्याची मुख्य वाहतूक राज्य व ‍राष्ट्रीय महामार्गावरून होते. राज्यात एकूण १४,००० किमी लांबीचे रस्ते आहेत. कर्नाटक राज्य परिवाहन ही राज्यातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक संस्था असून २५,००० लोक काम करतात. जे दिवसाला सरासरी २२ लाख प्रवाशांची वाहतूक करतात. 

कर्नाटकातील भौगोलिक वैविध्य, राज्याचा प्राचीन कालापासूनचा इतिहास व इथली असंख्य ऐतिहासिक स्थळे, यामुळे कर्नाटक राज्य हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो., राज्यसरकारने आत्तापर्यंत ७५२ स्थळे संरक्षित केली आहेत. या स्थळांव्यतिरिक्त आणखी २५००० स्थळे संरक्षित करण्याजोगी आहेत.

राज्याच्या पश्चिम घाटावरच्या आणि दक्षिणेकडच्या जिल्ह्यांत  कुद्रेमुख, मडिकेरी आणि अगुंबे यांसारखी सृष्टीसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. कर्नाटकात २५ अभयारण्ये आणि ५ राष्ट्रीय उद्याने आहेत.  बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि  नागरहोळ राष्ट्रीय उद्यान ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत.  हंपी येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष  व पट्टडकल येथील स्मारके यांना  जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.बादामीच्या गुहांमधली मंदिरे आणि ऐहोळे येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात. क्लोरिटिक खडक वापरून बांधलेली बेलूरची आणि हळेबीडची होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत येण्याची शक्यता आहे.  विजापूरचा गोलघुमट हा दख्खनी सल्तनतींच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. श्रवण बेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मीय भेट देतात.

भारतातील दोन सर्वात जास्ती उंचीचे धबधबे कर्नाटकातच आहेत. जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारतातील सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत. जोग धबधबा हा भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा आहे. इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.

अलीकडेच कर्नाटकने आरोग्य पर्यटनात आघाडी घेतली आहे. केरळ मधील आयुर्वेदिक उपचार केंद्रांच्या धर्तीवर कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू झाले आहेत. देशातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक अशा प्रकारच्या उपचार केंद्रांमध्ये हवापालट व उपचारांसाठी येतात.




#Article 289: उत्तर प्रदेश (104 words)


उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदी व उर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.

     




#Article 290: केरळ (2349 words)


केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे.  कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत.  केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून  सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.

केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो. पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो. or chera alam (Land of the Cheras). केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.
पुराणात केरळासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती विष्णूचा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशू फेकून केली. केरळमधील लोकांनी पारंपारिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखलेले आहेत सण-उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरी करतात पोंगल हा इथला महत्त्वाचा सण मानला जातो यावेळी प्रत्येक जण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात केरळ मध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे ख्रिसमस सण याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात वर्षभरामध्ये पर्यटकांची मोठी रेलचेल या परिसरात सातत्याने असते

केरळच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात.

केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते. केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो.

इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती. चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी  Nelcynda येथे होती. चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. संगम साहित्यांमध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही जहाजे मसाल्यांच्या व्यापारासाठी येत. केरळ या राज्याला एक वेगळी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ब्रिटिश काळापासूनच  या राज्यांमध्ये  ब्रिटिश शासकांनी शिक्षणाचा विकास केला  त्याचबरोबर धर्माचा देखील प्रसार केला यातून या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी दिसते  ब्रिटिश काळातील चर्च हे या राज्याचे मुख्य वैशिष्ट आहे जगभरात आणि देशभरात या राज्यातील  लोक  मोठ्या संख्येने शासकीय सेवेमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत  जगभरामध्ये  केरळ मधील तरुण  हे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत  या राज्याने आपली वेगळी संस्कृती जोपासलेली आहे  निसर्ग सौंदर्य  या राज्याला  लाभलेले आहे  त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही  या ठिकाणाचा मोठा विकास झालेला आहे  रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते.  पश्चिम आशियाई सेमेटिक , ख्रिस्ती,ज्यू आणि इस्लाम समाजगट  नसरानी मप्पिला, जुदा मप्पिला इ. ठिकाणी स्थायिक झाले.  इ.स.पू. ५७३ मध्ये  ज्यू समाजाचे लोक प्रथम केरळमधे आले.. येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी  इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही. इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.

केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्रीच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते.  राज्याचा पसारा  ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे. केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला  किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळचे उंच पर्वत, खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून  भारताच्या  अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च शिखर आहे.

केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने  सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या  यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. वेंबनाड तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून  अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळच्या महत्त्वाच्या ४४ नद्यांमध्ये पेरियार (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे.  बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे त्रिभुज प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात. या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , पूर यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.

केरळ मध्ये भरपूर प्रेक्षणीय स्थळे आहेत .त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत. 

१) कसारागोड मधील बेकल किल्ला:केरळमधील उत्तरेकडील जिल्ह्याच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी., कासारगोड येथे बेकल किल्ला आहे. हा केरळमधील सर्वात मोठा किल्ल्यांपैकी आहे आणि वर्षानुवर्षे निर्दोषपणे देखभाल केली जाते. हे समुद्रसपाटीपासून १ फूटांपर्यंत वाढते आणि ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या हेडलॅंडवर आहे. बेकल फोर्ट बीच नावाचा एक सुंदर बीच विकसित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. या स्थळांवर लोक मोठ्या संख्येने येतात. समुद्राच्या कडेने उंच डोंगरावर आरामात वसलेला हा किल्ला समुद्र किनाऱ्या भव्य दर्शनासाठी आहे. लॅराइट स्लॅबचा वापर करून आणि बहुभुज आकाराने बनवलेले हे केरळमधील सर्वाधिक भेट दिलेल्या साइट्सपैकी एक आहे.

साइटची लोकप्रियता वाढविणारे बरेच घटक आहेत. सुंदर पेफोल्ससह सज्ज असलेले एक निरीक्षण टॉवर, अंजनेया मंदिर ज्याचे प्रसिद्ध दगडी बांधकाम आहे आणि लाइटलाईटपासून बांधलेली दोन थ्याम शिल्पे प्राथमिक आकर्षण आहेत. टिपू सुलतान यांनी बांधलेली एक प्राचीन मशिदी आणि विविध भूमिगत मार्गही या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे आहेत. पार्किंग क्षेत्रात लॉटराईटचा वापर करून एक रॉक गार्डन तयार केले गेले होते आणि हे स्वतः एक वास्तुशिल्प आहे. समुद्रकिनार्यावर भव्य वॉकवे बांधण्याबरोबरच झाडे लावण्यात आली आहेत ज्यामुळे समुद्रकिनारा ओलांडणे आणि त्याच्या दृष्टीकोनातून जाणे सुलभ होते. रात्री, संपूर्ण ठिकाण विशेष दिवे जळते जे त्याच्या सौंदर्यात संपूर्ण नवीन आयाम जोडते.

भेट देण्याचे तास:०८:०० - १८:०० वाजता

प्रवेश फी: प्रौढ, रु. १५/ - (१५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी विनामूल्य)

तपशीलांसाठी संपर्क साधा: +९१ ४६७ २३१०७००. 

कसे पोहोचावे?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: कोझिकोड-मंगलोर-मुंबई मार्गावर कासारगोड.

जवळचे विमानतळ  : मंगलोर= कासारगोड शहरापासून ५० किमी अंतरावर; कॅलिकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, कासारगोड टाऊनपासून सुमारे २०० किमी.

जिल्हा मुख्यालयापासून अंतर: १६०० मीटर दक्षिणेकडे

२) इलिक्क्कल कल्लू, कोट्टायम:कोटायम येथे समुद्रसपाटीपासून 6००० फूट उंचीवर इलीलिकल कल्लू हे लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे. तीन डोंगर, प्रत्येकी ४००० फूट आणि त्यापेक्षा जास्त उंचीवर इलीक्कल टेकड्या बनतात. या प्रत्येक टेकडीला एक विचित्र आकार आहे. टेकड्यांपैकी एक मशरूमसारखे आहे आणि त्याला कुडाकल्लू (छत्रीच्या आकाराचे खडक) म्हणतात. दुसऱ्या  टेकडीच्या कडेला एक लहान कातळ आहे आणि म्हणून त्याला Kunu kallu (हंचबॅक रॉक) म्हणून संबोधले जाते. हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखरे आहे.

३) मुनरो बेट,कोल्लम :मुनरो बेट  हे पाणलोट क्षेत्रातील एक लपलेला मोती आहे जो ८ बेटांच्या समूहातून बनलेला आहे. त्यातील प्रत्येक लहान जलवाहिन्या आणि तलाव यांनी विभक्त केले आहेत. कोल्लमपासून २७ किमी अंतरावर मुनरो बेट आहे. त्रावणकोर राज्यातील पूर्व रहिवासी रहिवासी कर्नल जॉन मुनरो यांच्या सन्मानार्थ या जागेचे नाव देण्यात आले आहे. कालवे खोदून त्याने बॅकवॉटरच्या अनेक क्षेत्रे समाकलित केली असे म्हणतात. या बेटाचे मुख्य आकर्षणे म्हणजे अरुंद जलमार्ग, कालवा जलपर्यटन आणि ओणमच्या १० दिवसीय महोत्सवात येथे आयोजित प्रसिद्ध कल्लादा बोट रेस. हे आधुनिक जीवनाच्या निरंतर अनागोंदीपासून खूपच दूर एक अद्वितीय आणि शांत सेटिंग ऑफर करते.

ट्रिप दिवसातून दोनदा चालते

सकाळी क्रूझ सकाळी ०९:०० वाजता.

दुपारी ०२:०० वाजता पासून जलपर्यटन.

दर: - ६०० रुपये प्रति व्यक्ती.

संपर्काची माहिती:

डीटीपीसी कोल्लम

फोनः +९१ ४७४ २७४५६२५, २७५०१७०

ईमेल: info@dtpckollam.com / संपर्क@dtpckollam.com

तेथे पोहोचत आहे

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: मुनरो बेट, सुमारे ३km किमी

जवळचे विमानतळ: त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ८४ किमी

४) कक्कथुरुथ - कावळ्याचे बेट:कक्कथरुथ हे केरळच्या अलाप्पुझामधील पाण्यावरील एक नेत्रदीपक लहान बेट आहे, जगातील पर्यटन-योग्य स्पॉट्सच्या छायाचित्रणातील पर्यटन नॅशनल जिओग्राफिकच्या ‘सुमारे २४ तासांत जगभरातील’ मध्ये त्या सूचीबद्ध आहेत. व्हेमनाड तलावाच्या आजूबाजूला पन्नाशीने झालेले ‘क्रोध बेट’ हे एक शांत ठिकाण आहे.  

तेथे कसे पोहोचाल ?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन : चेरथाळा, सुमारे १५ कि.मी.

जवळचे विमानतळ: त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे १८६ किमी.

५)कुमारकोम :कुमारकोम हे गाव वेम्बानाड तलावावरील छोट्या बेटांचे एक समूह आहे आणि ते कुट्टनाड प्रदेशाचा भाग आहे. येथील पक्षी अभयारण्य, जे १ एकरांवर पसरलेले आहे.ते स्थलांतरित पक्ष्यांचा एक आवडते स्थान आहे आणि पक्षीशास्त्रज्ञांचे नंदनवन आहे. एग्रेट्स, डार्टर्स, हेरन्स, टील्स, वॉटरफॉल्स, कोकिल, वाईल्ड डक आणि सायबेरियन सारस सारख्या स्थलांतरित पक्षी येथे कळपात येतात आणि सर्व अभ्यासकांना आकर्षित करतात.

ताज गार्डन रिट्रीट येथे बोटिंग आणि फिशिंगची सुविधा उपलब्ध आहे.केरळ टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बॅकवॉटर रिसॉर्ट वॉटरस्केपमध्ये स्वतंत्र कॉटेज आहेत ज्यात स्ट्रीटवर बांधले गेले आहे. हाऊसबोट्स आणि पारंपारिक केट्टूवॉलॉम्स (तांदूळ बार्जेस) हॉलिडे पॅकेजमध्ये उत्कृष्ट अनुभव येतात.

कसे पोहोचाल ?

६)पेरियार व्याघ्र प्रकल्प, थक्कडी : थेक्कया शब्दाच्या ध्वनीने हत्तींच्या प्रतिमा, टेकड्यांच्या अखंड साखळ्या आणि मसाल्याच्या सुगंधी वृक्षारोपणांची प्रतिमा तयार केली आहे. थेकड्याचे पेरियार जंगले हे भारतातील एक अत्यंत वन्यजीव साठा आहे. संपूर्ण जिल्ह्यात पसरलेली नयनरम्य वृक्षारोपण आणि डोंगराळ शहरे ही ट्रेक्स आणि माउंटन वॉकसाठी सुंदर पायवाटे वसवतात. हा देशातील सर्वात प्राचीन वाघाचा साठा आहे आणि पेरियारची जंगले श्वेत वाघांसह धोकादायक प्रजातींच्या उपस्थितीने सुशोभित आहेत.

पेरियार टायगर रिझर्व वाळवंटात अन्वेषण करण्यासाठी पर्यटकांकडे बोटिंग ते ट्रेकिंग पर्यंत अनेक पर्याय आहेत.

अ )पेरियार तलावात नौकाविहार : पेरियारचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बोटवरील आपल्या सीटच्या काठावरुन जाणे. जर आपण थोडे अधिक साहसी असाल तर वन्य आपल्याला पहात असताना आपण बांबूचा तारा आणि पंक्ती घेऊ शकता. पेरियार येथील बांबू राफ्टिंग पूर्ण दिवस आणि अर्धा दिवस अशा दोन स्लॉटमध्ये उपलब्ध आहे.

ब )ट्रेकिंग ट्रेल्स : पेरियार येथे गाईड डे ट्रेक- पेरियार टायगर ट्रेल, एक साहसी ट्रेकिंग आणि कॅम्पिंग; बॉर्डर हायकिंग - संरक्षण देणारी रेंज हायकिंग; बांबू राफ्टिंग; जंगल गस्त, जंगलातील शेफर्डिंग; आदिवासी वारसा - भूतकाळातील डोकावले; जंगलातील रात्रीची सफर .  

क )कॅम्पिंग : बांबू ग्रोव्ह - इको लॉजः स्टिव्ह ओव्हर प्रोग्राम बांबूच्या झाडाच्या आत ईको-लॉजची सोय करतो. आरोग्यदायी आणि आधुनिक फर्निचरसह डबल-बेड बिझिनेस असणार्‍या १५ बांबूच्या झोपड्या उपलब्ध आहेत.

पेरियार जंगलांची संपत्ती

फ्लोराः येथे १९६५हून अधिक फुलांची रोपे आहेत आणि येथे १७१ गवताच्या  प्रजाती आणि ऑर्किडच्या १४३ प्रजाती आहेत.दक्षिण भारतीय शंकूच्या आकाराचे, वैज्ञानिकदृष्ट्या पोदोकारपस वॉलिचियानस म्हणून ओळखले जाते, पेरियार व्याघ्र प्रकल्पात जंगलात वाढतात.

सस्तन प्राणी: येथे ६० हून अधिक प्रजाती आढळतात ज्यात एशियन हत्ती, बंगाल टायगर, इंडियन बायसन, सांबर हरण, इंडियन वाइल्ड डॉग, बिबट्या, बार्किंग डियर आणि स्मूथ-लेपित ओटर यांचा समावेश आहे, ज्याला पेरियार तलावात बोटच्या प्रवासात पाहता येईल.नीलगिरी तहर उच्च खडकाळ प्रदेशातच मर्यादित आहे तर लायन टॅलेड मकाक अंतर्गत सदाहरित जंगलात आढळू शकते. बोनेट मकाक आणि नीलगिरी लंगूर हे दोघेही बोटीला ज्या ठिकाणी उतरतात त्या जवळच असलेल्या झाडांपासून कुसळताना दिसतात.

पक्षीः येथे २६५ प्रजाती आहेत. मलबार ग्रे हॉर्नबिल, इंडियन पायड हॉर्नबिल, व्हाइटबेलिडेड ट्रीपी, ड्रोन्गोस, वुडपेकर्स, फ्लाइकॅचर्स, बॅब्बलर्स, नेत्रदीपक मालाबार ट्रॉगन इत्यादी अनेक प्रजाती बोट ज्या ठिकाणी उतरतात तेथे पाहिल्या जाऊ शकतात.

सरीसृप: कोब्रा, साप, क्रैट, असंख्य विषारी साप आणि भारतीय मॉनिटर लिझार्ड इ . 

उभयचरः रंगीबेरंगी मालाबार ग्लाइडिंग फ्रॉग, फनगोईड फ्रॉग, बाइकलर्ड फ्रॉग, बरीच प्रकारचे टोड आणि लिंबलेस कॅसिलियन्स सारखे बेडूक.

मासे : पेरियार सरोवर आणि ओढ्यांमध्ये मासेच्या अनेक प्रजाती आहेत, ज्या महसीर, भारतातील प्रसिद्ध आणि धोकादायक खेळातील मासे आहेत. स्मूथ-लेपित ऑटर बोटमधून वारंवार दिसू शकतो.

वृक्षारोपण: व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या भागात चहा, वेलची, मिरपूड आणि कॉफीची लागवड भरपूर प्रमाणात केलेली आढळून येते. 

वॉच टावर्स: पेरियार टायगर रिझर्वमध्ये काही वॉच टॉवर्स आहेत जे वन्यजीव पाहण्यास उत्कृष्ट आहेत. थेककडी येथील वन माहिती केंद्रात आरक्षण देता येते. फोनः + ९१- ४८६९ -२२२०२७

७)पोक्कोट तलाव, वायनाड :पोक्कोट तलाव, वायनाड सदाहरित वने आणि रोलिंग टेकड्यांनी वेढलेले एक नैसर्गिक ताजे पाण्याचे तलाव. मोठ्या प्रमाणात माशांसह एक ताज्या  पाण्याचे हे एक आकर्षण आहे. पर्यटकांना बोटिंगची सुविधा, मुलांचे पार्क आणि हस्तकलेचे आणि मसाल्यांचे खरेदी केंद्र देखील उपलब्ध आहेत.

वायनाड समुद्रसपाटीपासून ७००- २१०० मीटर उंच उंचीवर आहे. केरळमध्ये सर्वाधिक आदिवासी वस्ती या जिल्ह्यात आहे. व्यथिरी तालुक्यातील डोंगर रांगा (तालुका हा जिल्ह्याचा उपविभाग आहे), कोझिकोड येथून वायनड पठारावर जाणाऱ्या  रस्तावर सुंदर रांगा दिसतात , वायनाड जिल्ह्याचे उच्चतम स्थान आहे.

कसे पोहोचाल ?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: कोझिकोड, सुमारे६३ कि.मी.

जवळचे विमानतळ: कॅलिकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ६३किमी. 

८)कोल्लुकुमकले - भारतातील उंचावरील  चहाची बाग : कोल्लुकुमकले - खडकाळ प्रदेशात वसलेले, मुन्नारमधील कोलुककुमालय हे देशातील सर्वात जास्त उंचीवरील चहाची बाग आहे जीची उंची  ७९०० फूट आहे. फक्त जीपद्वारे प्रवेशयोग्य असलेल्या या इस्टेटच्या भेटीत चहाच्या शेताभोवती ड्राईव्ह आणि कारखान्याचा दौरा समाविष्ट आहे. काय कोलुककुमले चहाचा एक विशेष स्वाद आहे.

कसे पोहोचाल ?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: अंगणमल्ली, मुन्नारपासून सुमारे १०९ किमी

जवळचे विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे १०८ किमी

केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम ,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी , माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात.मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते.चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात.
चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.

स्वातंत्र्यानंतर, लोकशाही समाजवादी कल्याण अर्थव्यवस्था म्हणून हे राज्य व्यवस्थापित केले गेले. १९९० पासून मिश्र अर्थव्यवस्था उदारीकरणामुळे भांडवलशाही, आर्थिक विस्तार, विदेशी गुंतवणूक परवाना आणि रोजगारमध्ये वाढ झाली. केरळ इंद्रियगोचर किंवा विकासाचे केरळ मॉडेल आणि तुलनेत कमी आर्थिक विकासाचा परिणाम मजबूत सेवा क्षेत्रामुळे झाला आहे. 

केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.  हे आर्यन आणि द्रविड संस्कृतींचे संश्लेषण आहे, त्याच्या पुरातनपणामुळे आणि मलायली लोकांनी टिकवलेल्या सेंद्रिय निरंतरतेद्वारे परिभाषित. हे शेजारच्या आणि परदेशी संस्कृतीत शतकानुशतके झालेल्या संपर्कात तपशीलवार वर्णन केले गेले होते. तथापि, उर्वरित देशातील केरळच्या भौगोलिक पृथक्करणामुळे विशिष्ट जीवनशैली, कला, वास्तुकला, भाषा, साहित्य आणि सामाजिक संस्था विकसित झाल्या आहेत. राज्यात दरवर्षी १०,०००हून अधिक सण साजरे केले जातात.  मल्याळम दिनदर्शिका, केरळमध्ये इ.स. ८२५ पासून सुरू झालेल्या सौर कॅलेंडरमध्ये  कृषी आणि धार्मिक उपक्रमांच्या नियोजनात सामान्य वापर आढळतो.मल्याळम, भारतातील शास्त्रीय भाषांपैकी एक, केरळची अधिकृत भाषा आहे. डझनभराहूनही अधिक अनुसूचित आणि अनुसूचित नसलेल्या भाषा देखील बोलल्या जातात.

मल्याळम हि मातृभाषा आहे.

१८ व्या शतकापर्यंत तीन चतुर्थांश भूभाग दाट जंगलाखाली होते. २००४ पर्यंत, भारतातील १५,००० वनस्पती प्रजातींपैकी २५ % पेक्षा जास्त प्रजाती केरळमध्ये आहेत.

केरळमधील विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात उच्च दरासाठी उल्लेखनीय आहे. यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ११८ प्रजाती, ५०० पक्ष्यांच्या प्रजाती, १८९ प्रजातींचे मासे, सरपटण्याच्या १७३ प्रजाती आणि १५१ प्रजातींचा समावेश आहे.

 




#Total Article count: 289
#Total Word count: 198803